news stringlengths 344 19.5k | class int64 0 2 |
|---|---|
फुप्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणाऱ्या लोकांपर्यंत मर्यादित राहिला नसून धूम्रपान न करणाऱ्या अनेक युवकांना हा कर्करोग होत आहे . वाढते वायू प्रदूषण याला कारणीभूत असू शकते , असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे . सर गंगा राम रुग्णालय येथील डॉक्टरांनी मार्च २०१२ ते जून २०१८ या काळात १५० रुग्णांचा अभ्यास केला . या ... | 1 |
रोजच्या आहारातील पदार्थात दालचिनीचा समावेश केला तर शरीराचे तापमान दोन अंशांनी कमी होऊ शकते व त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होते , असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे . याबाबत डुकरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसून आले की , दालचिनीमुळे त्यांच्या पोटातील थर व्यवस्थित राहतात , अशी माहिती ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे ... | 1 |
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ( आयओए ) चेन्नईत झालेल्या वार्षिक बैठकीत सुरेश कलमाडी व अभयसिंह चौटाला यांची अनुक्रमे तहहयात आश्रयदाते आणि अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा निर्णय झालाच नसल्याचे , आयओएचे अध्यक्ष एन . रामचंद्रन यांनी सांगितले . सुरेश कलमाडी यांच्यावर 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवण्या... | 2 |
मिताली व स्मृती यांची अर्धशतके ; मालिकेत २ - ० अशी आघाडी मिताली राज व स्मृती मानधना या सलामीच्या फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतकांसह शतकी भागीदारी केली . त्यामुळेच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी - २० सामना नऊ विकेट राखून जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २ - ० अशी आघाडी घेतली . प्रथम फलंदाजी करताना आफ्रिक... | 2 |
क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिंपिक स्पर्धांच्या यजमानपदाचा निर्णय मतदानाशिवाय घेण्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला यश आले . पॅरिस आणि लॉस एंजलिस या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सामजंस्याने घेतलेल्या निर्णयामुळे आता ऑलिंपिक २०२४ पॅरिस , तर २०२८ मध्ये लॉस एंजलिसला होईल . पॅरिस आणि लॉस एंजलिस या... | 2 |
भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार लौकिक मिळवलेला महेंद्रसिंग धोनी आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत हे दोघेही सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे वावरत आहेत . बॉलीवूडचा उगवता तारा सुशांत सिंग राजपूत याने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित चित्रपटात तो धोनीची भूमिका साकारल्यानंतर लोकप्रिय झाला आहे . या चित्रपटाच्या... | 0 |
प्रकाशझोतातील ॲशेस कसोटीने तिसऱ्या दिवशी नाट्यमय वळण घेतले . मालिकेतील या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी एकूण १३ विकेट पडल्या . त्यामुळे कसोटी नाट्यमय वळणावर येऊन ठेपली आहे . १ बाद २९ वरून इंग्लंडचा पहिला डाव २२७ धावांत आटोपला . २१५ धावांच्या आघाडीनंतर मात्र कांगारूंची दिवसअखेर ४ बाद ५३ अशी घसरगुंडी उडाली . यानंतरही क... | 2 |
डार्क सर्कलची समस्या आपल्यातील अनेकांना सतावते . कधी जागरण झाल्याने तर कधी शरीराला आहारातून योग्य ते घटक न मिळाल्याने ही समस्या उद्भवते . मात्र त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक असते . अन्यथा ही सर्कल्स जास्त वाढत जातात . कधी ही सर्कल दिसून नयेत म्हणून सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो तर कधी आणखी काही उपचार केले जातात . म... | 1 |
फॅशन ट्रेंड्सना फॉलो करणं ही तरुणांसाठी क्रेझ असते . सध्या असे ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांना “फॅशन सेन्स” आहे असेही संबोधले जाते . आधुनिक काळानुसार ही फॅशन बदलत असते . प्रत्येकाची आवड , गरज आणि पैशांच्या स्वरूपाप्रमाणे फॅशनची व्याख्या बदलत जाते . कुठलाही ट्रेंड फॉलो करताना आपण बाजारात सुरु असलेल्या डिझाइन्सचा जास्तीत जास्... | 1 |
इंग्लिश येणं ही आता एक अतिशय गरजेची गोष्ट झाली आहे . पूर्वी फक्त पेपरा - पुस्तकात असणाऱ्या इंग्लिश भाषेने स्मार्चटफोन युगात आपल्या रोजच्या जीवनाचा ताबा कधी घेतला हे कळलंच नाही . अर्थात मातृभाषा शिकण्याचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही . पण त्याजोडीला इंग्लिश येत नसेल तर काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असते .... | 1 |
खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या नवव्या सिझनची शूटिंग सध्या अर्जेंटिनामध्ये सुरू आहे . यामध्ये सेलिब्रिटी थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स करताना पाहायला मिळतात . या स्टंटदरम्यान आदित्य नारायण आणि विकास गुप्ता हे स्पर्धक दुखापतग्रस्त झाले आहेत . एका स्टंटदरम्यान आदित्यच्या डोळ्याला इजा झाली . तातडीने त... | 0 |
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत . हल्ली वेडिंग फोटोग्राफी , प्री वेडिंग , पोस्ट वेडिंग असे नवनवे ट्रेंड सुरू झाले आहेत . पण फोटोग्राफीबरोबरच लग्नाच्या अल्मबबाबतही ग्राहकांनी सजक असायला हवं . अनेक जोडप्यांना वेडिंग अल्बमसाठी पैसे खर्च करणं म्हणजे मोठी खर्चिक बाब वाटते . ‘कशाला खर्च करायचे एवढे पैसे ? नाहीतरी अल्बम नंतर ... | 1 |
शुक्रवारी समिट अटेंप्टला रवाना व्हायचे असल्यामुळे वेगळाच उत्साह होता . मध्यरात्री दीड वाजता निघायचे ठरले होते . त्यामुळे त्याआधी मी आणि विशाल कडुसकरने दोन - तीन तास विश्रांती घेतली . आम्ही टेंटमध्ये पाठ टेकली . आमच्या कुकने १२ . ३० वाजता नाष्टा तयार ठेवेन असे कळविले होते . त्यामुळे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उठलो ... | 2 |
नाटक हे प्रेक्षकांचे मनोरंजन जरी करत असलं तरी ते मनोरंजन करणारे कलाकारही शेवटी माणूस असतात . त्यांनाही भावना असतात . पण कधी कधी कठीण प्रसंगातही ते फक्त नाटकाच्या प्रेमासाठी कसे सारं काही विसरुन जातात याचाच एक अनुभव सांगितलाय अभिनेता सुयश टिळक याने . . कोल्हापुरला आमचा स्ट्रॉबेरीचा प्रयोग होता . त्या दिवशी आम्ही गोव्याव... | 0 |
फेसबुक आपल्या आयुष्याचा जणू एक भागच बनला आहे . काहिंची दिवसाची सुरुवात फेसबुकच्या दर्शनाने होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . सोशल मीडिया फ्रेंडली एखादा व्यक्ती दिवसातून किमान दहावेळा तरी फेसबुकवर लॉगिन करतो . तर कित्येक जण असे असतात की ते दिवसातून जे जे काही करतील त्याच्या सगळ्या अपडेट्स फेसबुकवर टाकत असतात . नुकत... | 1 |
क्रोनिक फटिक सिंड्रोम किंवा गल्फ वॉर इलनेस या दोन शारीरिक व मानसिक ताणाशी निगडित रोग लक्षणसमूहांमध्ये मानसिक कारणे नसून मेंदूतील बदल कारणीभूत आहेत , असे नवीन संशोधनात दिसून आले आहे . आतापर्यंत हे दोन्ही लक्षण समूह हे निव्वळ मानसिक समजले जात होते ; पण ते मेंदूतील रेणूंच्या रचनेत होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात असे आता... | 1 |
माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांची सूचना भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी गमावणाऱ्या भारताने भविष्यात जागतिक दर्जाचे ड्रॅग - फ्लिकर्स घडवण्याची नितांत आवश्यकता आहे , अशी प्रतिक्रिया माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांनी रविवारी व्यक्त केली . विश्वचषक हॉकी स्पध्रेत यजमान भा... | 2 |
डेव्हिड वॉर्नरच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११७ धावांनी दणदणीत विजय मिळवला . या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश साकारले . नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला . मालिकेत भन्नाट सूर गवसलेल्या वॉर्नरने सहकारी निय... | 2 |
आपल्या शरीराने आणि हृदयाने अपेक्षेप्रमाणे काम करावं असं वाटत असेल , तर त्याला चांगली झोप हवीच . दीर्घकाळ निद्रानाशाचा विकार असेल तर त्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयाशी निगडीत विकार होण्याची शक्यता असल्याचे काही अभ्यासातून पुढे आले आहे . आपलं झोपेचं चक्र टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं . हलक्या झोपेपासून... | 1 |
१ . दूषित पाण्यापासून होणाऱ्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी , घातक जीवजंतू नाहीसे करण्यासाठी , १ लिटर पाण्यात ३ - ४ थेंब क्लोरीन घाला . २ . सरबत किंवा ताक करणार असाल तर त्यासाठी उकळलेलं पाणी वापरा . ३ . पावसाळ्यात पचनशक्ती कमी झाल्यामुळे काही जणांना दूध पचत नाही , त्यांनी ताक किंवा दही घ्यावं . दही बनताना दुधामधील लॅक... | 1 |
चेन्नई कसोटीत मोईन अलीचे दमदार शतक आणि जो रुटची ८८ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडचा डाव सावरला असून संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडला ४ बाद २८४ धावा केल्या आहेत . इंग्लंडकडून बेअरस्टो यानेही ४९ धावांचे योगदान दिले . सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता . पण सलामीजोडी स्वस्तात तंबूत परतल्याने इंग्लंड... | 2 |
गुगलने आपलं लोकप्रिय मेसेजिंग अॅप Allo बंद करण्याची घोषणा केली आहे . सप्टेंबर 2016 मध्ये कंपनीने हे अॅप लाँच केलं होतं . मात्र अपेक्षेऐवढी लोकप्रियता या अॅपला न मिळाल्याने कंपनीने हे अॅप बंद करण्याची घोषणा केली आहे . मार्च 2019 पर्यंत Allo बंद होईल . या अॅपमुळे बरंच काही शिकायला मिळालं , असं गुगलने एका ब्लॉगमध्ये म्हटल... | 1 |
विम्बल्डन ओपन स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे . जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालला विम्बल्डनची हिरवळ तितकीशी मानवत नाही . मात्र तरीही त्याच्या नावावर विम्बल्डनची २ विजेतेपद जमा आहेत . नदालप्रमाणेच प्रत्येक टेनिसपटूला चाहत्यांच्या अनेक विचित्र मागण्यांना सामोरं जावं... | 2 |
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेला इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याने सुरवात होईल . हा सामना ३० मे रोजी ओव्हलवर होईल . अंतिम सामना १४ जुलैस लॉर्डसवर खेळविण्यात येईल . ऑस्ट्रेलिया विजेतेपद टिकविण्याच्या मोहिमेस १ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुरवात करेल . माजी विजेते पाकिस्तानची सलामी वेस्ट ... | 2 |
त्यांनी कथ्थक , भरतनाटय़म्चे प्रशिक्षण घेतले होते . नृत्याचे कार्यक्रमही त्या करत होत्या . सितारादेवी , गोपीकृष्ण , मंजुश्री बॅनर्जी , रोशनकुमारी यांच्याप्रमाणे त्यांना शास्त्रीय नृत्यांगना व्हायचे होते . पण नियतीने त्यांच्या बाबतीत काही वेगळेच योजिले होते . पुढे नृत्य सुटले ते सुटलेच . मराठी रंगभूमी व चित्रपटातून त्या... | 0 |
OnePlus 6T Launch Event : वनप्लस कंपनी OnePlus 6 ची पुढील आवृत्ती OnePlus 6T भारतामध्ये लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे . गेल्या काही दिवसांपासून OnePlus 6T या फ्लॅगशिप फोनबद्दल अनेक माहिती समोर आली आहे . टेलिकॉम क्षेत्रातील जाणकरांच्या माहितीप्रमाणे OnePlus 6T हा फोन भारतामध्ये १७ ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे . One... | 1 |
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकताच तिचा २४ वा वाढदिवस साजरा केला . बी - टाऊनमधल्या अनेक कलाकारांनी तिला आपआपल्या परिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . पण आलिया मात्र तिच्या कुटुंबात सहभागी होणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीत व्यग्र होती . आलियाने स्वतःसाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक मांजरीचे पिल्लू घेतले आह... | 0 |
पुढच्या माणसाला ठेच लागली , की मागचा माणूस शहाणा होतो व काळजीपूर्वक तो पाऊल टाकतो , असे आपण नेहमी म्हणत असतो . मात्र , आपल्या देशातील बॉक्सिंग संघटकांना याचा विसर पडला असावा . बॉक्सिंग क्षेत्राचे उच्चाटन होण्याची वेळ आली तरी ते आपापसात ठोसेबाजी करीत आहेत . आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने अंतिम मुदत दिल्यानंतर आता राष्... | 2 |
क्रिकेट विश्वात हल्ली प्रत्येक सामन्यात नवनवे विक्रम रचले जातात , तर जुने विक्रम मोडले जातात . हल्ली ट्वेन्टी - २० क्रिकेटला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे . तीन तासांत झटपट क्रिकेटचा रोमांचक आनंद देणारा हा प्रकार घड्याळाच्या काट्यावर धावणाऱया लोकांना सर्वार्थाने आपलासा वाटू लागला . कसोटी आणि एकदिवसीय सामन्याचा आनंद घ... | 2 |
अनेकदा नवोदित कलाकारांना सिनेमा किंवा मालिका मिळाल्यावर आपले करिअर आता सुरू झाले असेच वाटते . सिनेमा आणि मालिका करुनच आपण पैसा , प्रसिद्धी मिळवू शकतो आणि ती टिकवू शकतो असं वाटत असतं . किंबहुना तशीच काहीशी स्वप्नही त्यांना पडत असतात . पण कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकवण्यासाठी करावा लागणारं तपही तेवढंच महत्त्वपूर्ण असतं . म... | 0 |
दहिसर क्राईम ब्रँच युनिट १२च्या पोलीस टीमने २००६ साली मुंबईशी काडीमात्र संबंध नसलेल्या हैदराबाद येथे घडलेल्या एका गुन्ह्याचा कसा छडा लावला ते तुम्हाला येत्या १३ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येणार आहे . त्याचप्रमाणे गुन्ह्यातील अनेक प्रकारांमधला एक प्रकार म्हणजे मिसींग केस . त्याचप्रमाणे आजवरच्या पोलिसी अभ्... | 0 |
स्टेडियमवर जाऊन " याची देही याची डोळा ' एखादा सामना पाहणे ही एक अनुभूती असते . ऑस्ट्रेलियाच्या एका मुलाला अशीच अनुभूती झाली आणि प्रेरित होऊन त्याने थेट विश्वकरंडकापर्यंत मजल मारली . ऑस्ट्रेलियन संघातील जॅक्सन आयर्विन याची यशोगाथा अशीच आहे . जॅक्सन 12 वर्षांचा असताना सिडनीतील विश्वकरंडक पात्रता सामना पाहण्यासाठी स्टेडिय... | 2 |
लोकप्रिय फोटो - मेसेजिंग अॅप इन्स्टाग्रामने अनेक दिवसांच्या पडताळणीनंतर आपल्या सर्व युजर्सना अकाउंट व्हेरिफायचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे . आता कोणताही इन्स्टाग्राम युजर आपल्या अकाउंटला ‘ब्ल्यू टिक’सह व्हेरिफाय करु शकतो . विशेष म्हणजे तुम्ही इन्स्टाग्राम अॅपवरुनच अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करु शकतात . तर जाणून घेऊय... | 1 |
भारतात २००५ ते २०१५ या काळात पाच वर्षांखालील १० लाख मुलांचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे . न्यूमोनिया , अतिसार , धनुर्वात , गोवर यांसारख्या रोगांवर मात करण्याने हा फरक दिसून आला , असे लँसेट या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या नव्या संशोधनात म्हटले आहे . भारतात १ ते ५९ महिन्यांच्या मुलांमध्ये मृत्युदर कमी होण्याची आवश्यकता ... | 1 |
धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे . ज्या वेळी आधुनिक शस्त्रे उपलब्ध नव्हती , त्या वेळी अनेक युद्धांमध्ये सवरेत्कृष्ट धनुर्धाऱ्यांचाच विजय होत असे . भारतीय संस्कृतीमधील रामायण - महाभारतामधील युद्धे धनुर्विद्येवरच आधारित होती . असे असूनही या क्रीडा प्रकारात भारताला एकही ऑलिम्पिक पदक मिळवता आल... | 2 |
रणबीर आणि कतरिना येत्या काळात ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . या दोन्ही कलाकारांमध्ये असणाऱ्या नात्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही . एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले रणबीर आणि कॅट आता मात्र या नात्यातून वेगळे झाले असून फक्त आणि फक्त एकमेकांचे सहकलाकार म्हणून वावरताना दिस... | 0 |
दीपिका पदुकोण सध्या संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे . आपल्या कामात ती कितीही व्यस्त असली तरी स्वतःसाठी वेळ काढायला ती विसरत नाही . शॉपिंगला जाणं , चांगल्या ठिकाणी जेवायला जाणं यातून ती स्वतःला वेळ देते . तिची नवीन जाहिरात पाहून हे तर अजूनच स्पष्ट होतं . या जाहिरातीत दिसणाऱ्या त... | 0 |
महिला आशिया ट्वेन्टी - २० कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आशियाई ट्वेन्टी - २० क्रिकेट स्पध्रेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्स आणि चार चेंडू राखून विजय मिळवला . भारताने १९ . २ षटकांत ५ बळींच्या मोबदल्यात ९८ धावांचे लक्ष्य पार केले . कौरने दोन बळी टिपले , तर २२ चेंड... | 2 |
नवी दिल्ली : उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोनच दिवसांनी आज ( मंगळवार ) दुपारी पाकिस्तानच्या लष्कराने प्रत्यक्ष ताबारेषेवर पुन्हा गोळीबार केला . पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानांच्या ठाण्यांना लक्ष्य केले . या गोळीबारामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही . दुपारी 1.10 ते 1.30 या कालावधीमध्ये हा गोळीब... | 2 |
मुंबई : भारतीय बॉक्सिंग खेळाडूंनी ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील यशोमालिका मंगळवारी देखील सुरू ठेवली . भारताचे मनोज कुमार तसेच सुमीत सांगवान ऑलिंपिक पात्रतेपासून एक विजय दूर आहे . त्याचबरोबर विकास कृष्णननेही बाकू ( अझरबैझान ) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विजय मिळवत पात्रतेच्या आशा कायम ठेवल्या . मनोज कुमारने लाईट वेल्टर ... | 2 |
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान इम्तियाज अली याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . नुकतेच या जोडीचे पंजाबमधील चित्रीकरणावेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले . इम्तियाजच्या चित्रपटाचे पंजाबमधील चित्रीकरण पूर्ण झाले असून याची संपूर्ण टीम मुंबईला परतली आहे . मुंबईच्या विमा... | 0 |
साधारण ३० जीवनसत्त्वे आणि क्षार यांच्या मिश्रणाचा पूरक आहार घेतल्यास अल्झायमर्स आणि पार्किन्सन्स यांसारख्या चेतासंस्थेच्या विकारांच्या वाढीचा वेग बराच मंदावता येतो , असे नव्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे . कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातील जेनिफर लेमन यांनी हे संशोधन केले असून त्याचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्नमेंटल अँड मोलेक्... | 1 |
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताला तिसरा सलामीवीर आणि दुसरा यष्टीरक्षक या राखीव पर्यायांची प्रमुख चिंता आहे . राष्ट्रीय निवड समिती आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे . ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला ६ डिसेंबरपासून अॅडलेडच्या पहिल्या कसोटीने प्रारंभ होणार आहे .... | 2 |
दिल्लीला हरवून जयपूर अव्वल स्थानी ’ यू मुंबाची तेलुगूशी बरोबरी दबंग दिल्लीचा इराणी संघनायक मेराज शेखने आपल्या लवचीकतेचा प्रत्यय घडवत हुकमी चढाया आणि पकडी केल्या . परंतु त्याची ही एकाकी झुंज अपयशी ठरली . जयपूर पिंक पँथर्सने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत दिल्लीला २४ - २२ असे पराभूत केले आणि प्रो कबड्डी लीगच्या गुणताल... | 2 |
बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या दिवसभरातील गोष्टींमधील शारीरिक श्रम कमी झाले आहेत . त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन न झाल्याने शरीरावरील चरबी वाढते . ही समस्या सध्या अनेकांना भेडसावत असून त्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जातो . भारतीय योगविद्येमध्ये हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही विशेष आसने सांगण्यात ... | 1 |
गुजरातमध्ये सरदार पटेल क्रिकेट स्टेडियममध्ये काही बदल करण्यात येणार असून या स्टेडिअमला जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे मैदान बनविण्यात येणार आहे . तसेच एक लाख दहा हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्थाही तयार करण्यात येत आहे , याबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशन महामंडळाने माहिती दिली आहे . या भव्य - दिव्य मैदानाच्या उभारणीसाठी लार... | 2 |
मोकळा वेळ घालविण्यासाठी आपण मोबाईलवर सतत काही ना काही करत असतो . यामध्ये सोशल मीडियावर सर्फिंग करण्याबरोबरच मोबाईलवरचे वेगवेगळे गेम खेळणे आणि क्विझची अॅप डाऊनलोड करणे हे सामान्य झाले आहे . आपल्याला असलेले ज्ञान अजमावण्यासाठी आपण या अॅपमधील क्विझ सोडवत राहतो आणि पुढचे टप्पे गाठतो . मात्र आता अशाप्रकारचे अॅप्स वापरणे काह... | 1 |
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी हॉकी इंडियाने आज १८ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे . भारताची सर्वात अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे . तर गोलकीपर सविताकडे संघाचं उप - कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे . राष्ट्रकुल स्पर्धांसाठी भारतीय महिला... | 2 |
‘लवरात्री’ या चित्रपटातून सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे . सलमानचा मेहुणा असल्यानेच मला हा चित्रपट मिळाला असं खुद्द आयुष याने म्हटलं आहे . सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला . या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान आयुषनं पत्रकारांशी संवाद साधत पहिल्या चित्रपटाचा अनुभव सांगितला . ‘सलमानचा... | 0 |
जुनाट चेतावेदनेशी संबंधित आजारावर प्रभावी औषध तयार होण्याच्या मार्गावर आहे . चेतावेदना प्रकारात दात किंवा चेहऱ्याच्या काही भागात थेट मेंदूत वेदना जाणवतात , त्या विकाराला ट्रायजेमिनल न्यूरालगिया असे म्हटले जाते . यात काही औषधे उपलब्ध असली तरी त्यांचे दुष्परिणाम अधिक आहेत . या विकारात अतिशय तीव्र वेदना दात व चेहऱ्याच्य... | 1 |
हॉलिवूड अभिनेता पिअर्स ब्रॉस्नॅन गेल्यावर्षी पान मसालाच्या जाहिरातीमुळे चांगलाच चर्चेत आला होता . हॉलिवूडमधला हा जेम्स बॉन्ड भारतात पान मसाल्याची जाहिरात करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता , विशेष म्हणजे आपण शरीरास हानिकारक पदार्थाची जाहिरात करतोय हे मला माहितीच नव्हतं असं म्हणत पिअर्सनं त्यावेळी ... | 0 |
गेल्या तीन दशकांपासून आपल्या दमदार अभिनय कौशल्याने अभिनेते परेश रावल यांनी बरेच चित्रपट गाजवले . आगामी संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकमध्ये ते सुनील दत्त यांची भूमिका साकारणार आहेत . याशिवाय आणखी एक आव्हानात्मक भूमिका ते भविष्यात साकारणार आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका . गेल्या काही दिवसा... | 0 |
बॉलिवूडमध्ये कलाकार त्यांच्या चित्रपटांच्या आणि व्यावसायिकतेच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकत असले तरीही या चौकटीपलीकडे जात कलाकारांमध्ये नात्याचे अनोखे बंध असतात हे नाकारता येणार नाही . मित्र , बहिण - भाऊ , गुरु , सल्लागार , ते अगदी आई - वडिलांचे आदराचे नातेही काही कलाकारांमध्ये खुलल्याचे पाहायला मिळते . बॉलिवूडमध्... | 0 |
चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पत्करावा लागलेला पराभव आजही अनेक भारतीयांच्या मनात सलतोय . भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले , मात्र एकट्या हार्दीक पांड्याने पाकिस्तानी आक्रमणाचा नेटाने सामना केला . हार्दीक पांड्या सामना भारताच्या बाजूने झुकवणार अस वाटतच असताना चोरटी धाव ... | 2 |
मालिका आणि रिअॅलिटी शो विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि सध्याच्या घडीला प्रकाशझोतात असणाऱ्या अभिनेत्री हिना खानने एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे . ‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या ११व्या पर्वाची उपविजेती ठरलेल्या हिनाने आपल्याला या कार्यक्रमाविषयी काही आठवत नसल्याचं स्पष्ट केलं आहे . तिच्या या वक्तव... | 0 |
१७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचा इटलीवरील विजय फसवा भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाने शुक्रवारी इटलीच्या संघावर २ - ० असा विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली , असा दावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ( एआयएफएफ ) जाहीर केलेल्या प्रत्येक निवेदनातून केला जात आहे . हा विजय भारतीय फुटबॉल क्षेत्राचा नवा अध्याय असल्याची क... | 2 |
आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंगच्या आयुष्यात एक नवे वळण आले आहे . काही दिवसांपूर्वीच गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगमध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची लग्नगाठ बांधली गेली . चार दिवस रंगलेल्या या सोहळ्यात बऱ्याच टेलिव्हिजन सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती . सोशल मीडियावरह... | 0 |
राजीव मेहता सरचिटणीसपदी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे ( एफआयएच ) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या ( आयओए ) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे , तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे . आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपद... | 2 |
सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर तामिळनाडूने देवधर चषक क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघावर ७३ धावांनी मात केली . तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावांची मजल मारली . कर्णधार दिनेश कार्तिकने ६ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावांची खेळी केली . नारायण जगदीशनने ७१ धावा केल्या . भारत अ संघातर्फे शार्दूल ठाकूरने ३ बळी घेतले . प्रत्युत... | 2 |
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानचा एक चाहता चर्चेचा विषय ठरला आहे . त्याने पाकिस्तानच्या वन - डे संघातील क्रिकेटपटूंची जर्सी घातली आहे . ही जर्सी अशासाठी विशेष आहे , की मागील बाजूस धोनी असे नाव असून त्याचा नंबर सातही आहे . अलीकडेच आसाममध्ये एका सामन्यादरम्यान शाहीद आफ्रिदीच्या नावाची जर्सी घातल्याबद्दल स्थानिक पोलिस... | 2 |
प्रासंगिक प्रशांत मोरे – response . lokprabha @ expressindia . com सिनेमा पाहताना काही प्रमाणात का होईना , डोके बाजूला ठेवावे लागते . रूपेरी पडद्यावरचे विश्व वेगळे असते , सरावाने त्याची सवय होत असते आणि त्यात वावगेही नसते . कारण सिनेमागृहात येणारी व्यक्ती स्वतःची दोन घटका करमणूक करण्याच्या हेतूने आलेली असते . त्यामुळे ... | 0 |
आशियाई चषकासाठी भारतीय फुटबॉल संघाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भारताचा संघ २७ डिसेंबरला अबुधाबी येथे ओमानशी झुंजणार असल्याचे फुटबॉल महासंघाने म्हटले आहे . संयुक्त अरब अमिरातमध्ये ५ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान आशियाई चषकाचे सामने रंगणार आहेत . भारतीय फुटबॉल संघाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दर्जेदार देशांविरुद्ध खेळल... | 2 |
ब्रिटन आणि भारत या दोन देशांमधील आरोग्य आणि त्याच्याशी जोडलेल्या विविध क्षेत्रांतील गुंतवणूक आणि सहकार्यविषयक झालेल्या सामंजस्य कराराविषयी चर्चा करण्यासाठी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे ( एनएचएस ) चे अध्यक्ष सर मालकोम गॅ्रन्ट यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतभेटीवर आले आहे . या प्रतिनिधी मंडळाचा भा... | 1 |
तुम्ही तुमच्या मोबाईलवरील व्हॉटसअॅप या सोशल मीडियावरचे अॅडमिन आहात ? एखाद्या तरी ग्रुपचे नक्की असाल…त्यांच्यासाठी एक खूशखबर आहे . व्हॉटसअॅपच्या अॅडमिनला एक नवीन अधिकार मिळणार आहे . आता असा कोणता अधिकार आहे जो या अॅडमिनला मिळू शकेल ? तर एखाद्या ग्रुपचा फोटो , नाव कोण बदलू शकेल हे आता अॅडमिन ठरवणार आहे . या नव्या फिचरचे ... | 1 |
आपल्याला बऱ्याचदा झटपट होणारे काही तरी हवे असते . पण झटपट करण्याच्या नादात त्यातली पोषणमूल्ये मात्र आपण हरवून बसतो . ही पाककृती नेहमी घाईत असणाऱ्यांसाठी खास . हिचे वैशिष्टय़ म्हणजे ही जरी झटपट होणारी असली तरी पोषणमूल्येही त्यात भरपूर आहेत . याला ओट्स इन जार असे म्हणतात . साहित्य काचेची बऱ्यापैकी आकाराची आणि मोठय़ा त... | 1 |
जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि विश्वनाथन आनंद यांच्यातील लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील लढत झटपट बरोबरीत सुटली . या स्पर्धेतील पहिल्या तीन फेऱ्यांतील सर्व लढती बरोबरीत सुटल्या आहेत . आनंद - कार्लसन लढत कॅटालॅन पद्धतीने झाली . डावाच्या सुरवातीस जगज्जेत्या कार्लसनने एका प्याद्याचा मोबदला दिला . आक्रमण सुकर करण्याची त्याच... | 2 |
सध्या मल्टिपल मायलोमा या कर्करोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वेदनादायी बायोप्सीला पर्याय म्हणून कमी खर्चाची रक्तचाचणी विकसित करण्यात आली असून त्यात प्लास्टिक चिपचा वापर करण्यात आला आहे . ही चिप क्रेडिट कार्डच्या आकाराची आहे . अमेरिकेतील कन्सास विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी मल्टिपल मायलोमा या कर्करोगात प्रभावित होणाऱ्या प्ल... | 1 |
अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे . गेल्या बऱ्याच काळापासून आमिरच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे . त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे . या चित्रपटात काम केलेल्या कलाकारांचे अमिरने कौतुक क... | 0 |
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मागील काही दिवसांपासून धमाकेदार ऑफर्स देऊन अक्षरशः वेड लावले आहे . काही दिवसातच कंपनीने आपला मोबाईल फोनही बाजारात दाखल होणार असल्याचं जाहीर केलं आणि त्याचं बुकींगही सुरु झालं . कंपनीच्या मोबाईल मार्केटमधील आक्रमक पवित्र्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे मात्र धाबे दणाणले . यामुळे त्यांनी नव... | 1 |
महाराष्ट्राच्या मुलींनी ३४व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मंगळवारी दुबळा प्रतिस्पर्धी असल्याचा फायदा उठवून मोठ्या विजयासह उपांत्य पूर्व फेरीतील स्थान निश्चित केले . त्याचवेळी गच्चीबौली क्रीडा संकुलातील बंदिस्त हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला . म... | 2 |
एकेकाळी फेब्रुवारी - मार्चमध्ये मिळणारी अंजीर आता वर्षातील सहा महिने मिळतात . अंजीरमध्ये आर्द्रता , पिष्टमय पदार्थ , प्रथिने , मेद , कार्बोहायड्रेट , कॅल्शिअम , फॉस्फरस , लोह , तंतुमय पदार्थ , ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते . अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते . हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हण... | 1 |
‘बाहुबली २’ चित्रपट जगभरात सर्वत्र आपली छाप पाडत असल्याचे चित्र आहे . जगभरातील सर्वच लोक या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत . नेपाळमधील बॉक्स ऑफिसवरही ‘बाहुबली २’ने दमदार कमाई केल्याचे वृत्त नुकतेच येऊन गेले होते . नेपाळमधील ‘छक्का पंजा’ या चित्रपटालाही त्याने कमाईत मागे टाकले आहे . त्यानंतर आता पाकिस्तानमध्येही एसएस रा... | 0 |
शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असल्याने यकृताचा कर्करोग होण्याची संभावना कमी होत असल्याचे एका अभ्यासात संशोधकांना आढळले आहे . सूर्यप्रकाशामुळे त्वचेत ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते . ‘ड’ जीवनसत्त्वामुळे शरीरात कॅल्शियमची पातळी राखणे त्याचप्रमाणे दात आणि स्नायू निरोगी ठेवण्यात मदत होते . हाडांच्या रोगांमध्ये ‘ड’ जीवनसत्त... | 1 |
कुस्तीमध्ये भारताला खरे तर सुरवातीलाच धक्का बसला . डबल ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार पात्रता फेरीचा अडथळाही दूर करू शकला नाही . बहारिनच्या आदमविरुद्ध सुरवातीला मिळविलेल्या आघाडीचा त्याला फायदा घेता आला नाही . दुसऱ्या फेरीत सुशीलला आक्रमकच होता आले नाही . आदमविरुद्ध दुसऱ्या फेरीत तो चपळताही दाखवू शकला नाही . बचावाच्य... | 2 |
२००२ मध्ये झालेल्या नॅटवेस्ट सीरिज क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार नासीर हुसेनने मला बसचालक म्हणून हिणवले होते , असा गौप्यस्फोट भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केला आहे . लॉर्ड्सचा अंतिम फेरीचा सामना कैफने युवराज सिंगसोबत साकारलेल्या १२१ धावांच्या सामना जिंकून देणाऱ्या भागदारीसा... | 2 |
कोरिया सुपर सीरिज विजेतेपदामुळे पी . व्ही . सिंधू जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसरे स्थान मिळवण्याची दाट चिन्हे दिसत आहेत . सध्या सिंधू चौथ्या क्रमांकावर आहे . सिंधूला कोरिया विजेतेपदाबद्दल ९ , २०० गुण मिळतील . तिचा गतवर्षी या स्पर्धेत सहभाग नव्हता . त्यामुळे या स्पर्धेबद्दलचे तिचे गुण कमी होणार नाहीत . त्यामुळे गेल्या ५२ ... | 2 |
नाना पाटेकर हे इंडस्ट्रीतील बडं नाव . पण , कितीही बडं नाव असलं तरी ते किती साधे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच . नाना पाटेकर " आपला मानूस ' हा त्यांचा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत . त्यांच्याबरोबर अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री इरावती हर्षेही या चित्रपटात काम करत आहेत . चित्रपटात नाना पोलिस ऑफिसरची भूमिका करत आह... | 0 |
वेब सीरिज आणि सुमित व्यास हे समीकरण जणू ठरलेलंच आहे . ‘परमनंट रुममेट्स’ , ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमधून झळकलेला अभिनेता सुमित व्यास अनेकांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे . सुमित व्यासने अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे . नुकताच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात झळकलेला या अभिनेत्याने त्याच्... | 0 |
ऍडलेड : दुसऱ्या अॅशेस कसोटीत आज ( बुधवार ) पाचव्या दिवशी दोन्ही संघांना समान संधी असताना मिशेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ 233 धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली . इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसन याच्या पाच विकेट आणि कर्णधार रुटच्य... | 2 |
भारतीय संघाविरोधात खेळण्यासाठी उत्सुक ; मात्र कारवाईचे दडपण आशियाई क्रीडा स्पर्धेतील मैदानी लढाईत कबड्डीमधील हक्काची सुवर्णपदके गमावल्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये भारतीय कबड्डी संघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे . भारतीय संघाला आव्हान देऊ शकणारा संघ त... | 2 |
नवीन किंवा चित्रपटगृहात सुरू असलेल्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याचे नानाविध मार्ग आज चित्रपटनिर्मात्यांकडून अवलंबले जातात . पण चित्रपटांच्या इतिहासाच्या सुरुवातीला चित्रपटांची प्रसिद्घी कशी व्हायची याची काही देखणी उदाहणे राष्ट्रीय चित्रपटसंग्रहालयाच्या संग्रहात समाविष्ट झाली आहेत . भारतात चित्रपटांचे पर्व सुरू झाल्यानं... | 0 |
भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेत मंगळवारी ७०वा स्वातंत्र्यदिन साजरा केला . या वेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी ध्वजारोहण केले . या वेळी भारतीय संघ आणि साहाय्यक मार्गदर्शकही उपस्थितया वेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी ध्वजारोहण केले होते . या वेळी ध्वजारोहणानंत... | 2 |
नॉर्थ साऊंड ( अँटिगा ) : भारतीय महिला संघ एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानेच शुक्रवारी सकाळी टी - 20 विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरतील . भारतीय महिला संघाला त्या वेळी इंग्लंड संघाकडून चुरशीच्या लढतीत 9 धावांनी पराभव पत्करावा लागला ह... | 2 |
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे . गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रोमो प्रदर्शित करण्यात येत आहेत . त्यामधील एका प्रोमोमध्ये असलेल्या ‘इंटरकोर्स’ या शब्दावरून वाद उद्भवला आहे . सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्... | 0 |
World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने पदक निश्चित करत उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या एका भारतीय महिला बॉक्सरनेदेखील उपांत्य फेरीत धडक मारली आहे . भारताच्या लोव्हलीना बोरगोहैन हिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट ५ - ० ने धुवा उडवत हा पराक्रम केला आहे . त्यामुळे भ... | 2 |
Australia vs India 2nd Test Perth live update – भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली . उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे . त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला . त्या डावात कर्णधार विराट कोहलीने ... | 2 |
आधारकार्ड ही प्रत्येक व्यक्तीची अतिशय महत्त्वाची ओळख आहे . व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार आणि इतर गोष्टीही मोदी सरकारने आधार कार्डशी संलग्न केल्या आहेत . त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे . आधार क्रमांक म्हणजे तुमचा युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक असतो . व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सध्य... | 1 |
तुमच्या आमच्या , सर्वाच्या जीवनात दोन प्रकारच्या ‘कडकीचा’ अनुभव आपण घेत असतो . आपण दोन - चार मित्र हॉटेलात जातो . वयाने मोठी व्यक्ती फक्त ‘चहा’ मागवते . का तर , आज ‘कडकी’ आहे . खिशात चार जणांच्या चहापुरतेच पैसे आहेत . असो . दुसरी शारीरिक कडकी म्हणजे तळहात , तळपाय नेहमी गरम राहतात . डोळ्यांची आग होते , लघवीला गरम हाते .... | 1 |
‘चीनची भिंत’ ही एक अभेद्य तटबंदी म्हणून ओळखली जाते . कबड्डीविश्वात सामथ्र्यशाली बचावामुळे इराणच्या संघालासुद्धा हेच महत्त्व प्राप्त झाले आहे . शनिवारी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेमकी हीच भिंत भेदून सलग तिसरा विश्वचषक आपल्याकडे राखण्याचे आव्हान भारतापुढे असणार आहे . भारत सलग तिसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इराणशी झुं... | 2 |
बॉलीवूड अभिनेत्रींचे करोडो प्रशंसक आहेत . त्यांचा अभिनय आणि स्टाइलचे अनेक चाहते आहेत . दरम्यान , काहीजण त्यांच्यासारखे काम करून किंवा त्यांची स्टाइल कॉपी करून आपले प्रेम व्यक्त करतात . तर काहीजण मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराविषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात . आपले चाहते असणे ही आनंदाची ग... | 0 |
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली . पहिले चार गडी झटपट गमावल्यानंतर शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली . आता भारताला विजयासाठी ६ बळींची गरज आहे तर ऑस्ट्रेलियाला २१९ धावांची आवश्यकता आहे . या सामन्याचा ... | 2 |
प्रशांत केणी सचिन तेंडुलकर , प्रवीण अमरे , विनोद कांबळी , अमोल मुझुमदार यांच्यासारखे एकापेक्षा एक क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर सरांचे गुरुकुल सर्वश्रुत आहे . परंतु निष्णात प्रशिक्षकांचे विद्यापीठ म्हणूनसुद्धा त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठे योगदान आहे . मुंबईतील यशस्वी प्रशिक्षकांमध्ये आचरेकर यांच्या शिष्य... | 2 |
अपराजित मालिका कायम राखणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाची जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी टप्प्यात मंगळवारी नेदरलँड्सविरुद्ध खरी कसोटी लागणार आहे . मात्र पाकिस्तानविरुद्धच्या मोठय़ा विजयानंतर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सला पराभूत करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे . ही लढत ‘ब’ गटातील अव्वल स्था... | 2 |
कुठल्याही सणाच्या निमित्ताने केले जाणारे खास पदार्थ हे त्या सणाचं खास वैशिष्ट्य असतं . त्या त्या सणाच्या वेळेस केले जाणारे हे पदार्थ चवदार तर असतातच पण त्या ऋतुमधला तो एक वैशिष्ट्यपूर्ण आहार असतो . तर आज आपण पाहणार आहोत होळीनिमित्त केल्या जाणाऱ्या कटाच्या आमटीची रेसिपी . पुरणपोळीचं पुरण करताना सुरूवातीला आपण हरभऱ्याच... | 1 |
काही लोक नाताळाला ‘ख्रिसमस’ म्हणतील , काही त्याला ‘ख्रिस्तजयंती’ म्हणतील . अशा अनेक नावांच्या मागे अंतर्भूत आहे एकच घटना – येशू ख्रिस्ताचा जन्म . येशू स्वर्गातून पृथ्वीवर आला . दोन हजार वर्षांपूर्वी घडलेली ही घटना . आशिया खंडातील इस्रायल देशामधील बेथलेहेम गावात डोंगराळ प्रदेशात एका गुहेत गुरांच्या गोठय़ात झालेला येशूचा... | 0 |
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन - डे सामन्याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे . आपल्या आजारी बायकोची काळजी घेण्यासाठी शिखर धवनला संघातून सुट्टी देण्यात आलेली आहे . १७ सप्टेंबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वन - डे सामना रंगणार आहे . याआधीही श्रीलंका दौऱ्यात पाचवा वन - डे सामना आ... | 2 |
अंडी सेवनाने टाइप - २ मधुमेही आणि इतरांच्या हृदयाची हानी होते हा समज खरा नसून त्यामुळे कुठलेही दुष्परिणाम होत नसल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे . ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचा वाद संपुष्टात आणताना सांगितले की , अंडी सेवन करण्यात कुठलाही धोका नाही . आठवडय़ाला बारा अंडी खाण्याने मधुमेहाची पूर्... | 1 |
स्वयंपाकघरात आपण रोज जे टॉवेल हात पुसण्यासाठी वापरत असतो , त्यामुळे घातक जीवाणूंचा प्रसार होऊन काही वेळा विषबाधेचा धोका निर्माण होतो , असे भारतीय वंशाच्या संशोधकाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे . एकूण ४९ टॉवेल यात तपासण्यात आले . त्यात जीवाणूंची वाढ जास्त प्रमाणात दिसून आली . कुटुंबातील जास्त सदस्य हे टॉवेल भांडी पुसण... | 1 |
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा ‘रेस ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला . ‘रेस ३’ ने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट २०० कोटी रुपयांचा गल्ला सहज पार करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे . ‘रेस ३’ प्रदर्शित झाल्यानंतर भाईजानने त्याचा मोर्चा अन्य प्रोजेक्ट्सकडे वळविला असून त्याच्या आगामी चित्रप... | 0 |
राज कपूरच्या अनेक वैशिष्ट्यातील एक म्हणजे , त्याच्याच दिग्दर्शनातील चित्रपटातील गाण्यांचे रुपेरी सादरीकरण . मेहबूबा . ओ मेहबूबा मेरे दिल के पास हो तुम मेरी मंझिले पटकन ‘संगम ' ( १९६४ ) चित्रपटातील राज कपूर आठवला ना ? एका निसर्गरम्य स्थळावरील नदीत स्वयंचलित छोट्या बोटीतून प्रवास करताना पुढील प्रवाशी बोटीत असणार्या वैजयं... | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.