id
stringlengths 14
20
| text
stringlengths 1
481
| audio
audioduration (s) 0.39
43.8
|
|---|---|---|
MAR_M_SAD_00069
|
या गावातल्या प्रत्येक दुकानात फोन लावून बघितला मी, पण त्यांच्याकडे डिशवॉशरच नाहीये विकायला.
| |
MAR_M_WIKI_00863
|
सीव्हियर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस टू सार्स कोव्ह टू हा एक व्हायरसचा वाण आहे ज्यामुळे कोरोनाव्हायरस रोग दोन हजार एकोणीस कोविड नाईन्टीन हा श्वसन रोग होतो.
| |
MAR_M_INDIC_00463
|
प्रजेला स्वतःच्या अपत्याप्रमाणे मानून तिचे पालन करतो, म्हणून तो प्रजेला पित्यासारखा असतो.
| |
MAR_M_NEWS_00489
|
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत .
| |
MAR_M_CONV_01548
|
तू मला सांगू शकशील का की कॉपी केलेल्या मजकुराची वाक्यरचना जर मी बदलली तर ते सॉफ्टवेअर शोधू शकेल का?
| |
MAR_M_NEWS_00285
|
वीजेचा कडकडाट आणि पावसामुळे भिंत अंगावर पडुन दोन महिलांचा मृत्यू झाला .
| |
MAR_M_BOOK_00120
|
शेजारी त्याची स्तुती करीत.
| |
MAR_M_NAMES_01160
|
महावीर जन्म कल्याणक
| |
MAR_M_CONV_01694
|
विशेष मुलांच्या शाळा ह्या सामान्य शाळांपेक्षा वेगळ्या असतात.
| |
MAR_M_NEWS_00631
|
नेमबाजीत आज पंचवीस मीटर पिस्टल प्रकारात मनू भारेक, पन्नास मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात अंजुम मौदगील यांच्यासह
| |
MAR_M_UMANG_00039
|
बावन्न, एकोणचाळीस, पंचावन्न पिनकोडजवळ मला स्पुटनिक लस मिळू शकेल का?
| |
MAR_M_CONV_02441
|
तू तसं केलंस तर त्या सगळ्यांना त्याचा खूप आनंद होईल.
| |
MAR_M_WIKI_00959
|
बेवफा या चित्रपटातही तो एका श्रीमंत उद्योगपतीच्या भूमिकेत होता, ज्याला, बाळंतपणात त्याची पत्नी वारल्यानंतर तिच्या बहिणीशी लग्न करण्यास भाग पाडले जाते.
| |
MAR_M_WIKI_00437
|
सुस्पष्ट दिशा, पुरेसा निधी, आणि सखोल वैज्ञानिक ज्ञान या त्रिसूत्रीने डीएसटी करत असलेली वाटचाल देशाला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीला चालना देईल.
| |
MAR_M_NEWS_00375
|
आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातमीपत्र दु .तीन वाजता दोन मार्च , दोन हजार वीस सोमवार, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलली जातील , अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत दिली .
| |
MAR_M_BOOK_00262
|
"""चला निघा !"" आलेला नायक म्हणाला."
| |
MAR_M_BOOK_00953
|
प्रत्यक्षात पुरुषांना त्याच्यावर व स्त्रियांना बहुतेक कामांना सातच्या वर रोज आहे. शेजारी महाराष्ट्र उद्योग महामंडळाची उद्योगनगरी उभी राहते आहे
| |
MAR_M_WIKI_00696
|
टाईमआऊट कॉल करण्याच्या हेतूने, ओव्हरटाइम आणि शूटआउट हे दुसऱ्या भागाचे विस्तार आहेत.
| |
MAR_M_INDIC_00398
|
खड्ग, बिळातून आरडाओरडा ऐकू येतो आहे.
| |
MAR_M_DISGUST_00162
|
विक्री करताना तुम्ही लोक सतत पाठपुरावा करता, पण जेव्हा सेवेचा प्रश्न येतो तेव्हा आमच्या समस्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्याची तुमची वृत्ती भयंकर असते.
| |
MAR_M_ALEXA_00377
|
ऑली मी पास्ता कसा शिजवू
| |
MAR_M_INDIC_00325
|
अशा स्थितीत पृथ्वीवरील यज्ञयागादी क्रिया बंद पडतील.
| |
MAR_M_WIKI_00888
|
रॉबिडौपाशी पदव्या होत्या, पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीची मानववंशशास्त्रातील आणि सांता फे, न्यू मेक्सिको येथील इन्स्टिट्यूट ऑफ नेटीव्ह अमेरिकन आर्टमधील कला शाखेची.
| |
MAR_M_HAPPY_00290
|
व्यावसायिक कलाकारांनी सादर केलेलं ज्युलियस सीझर हे नाटक इतकं मनोरंजक होतं की मला मुळीच झोप आली नाही.
| |
MAR_M_FEAR_00279
|
शहरातल्या रस्त्यांवर उद्रेकांच्या वाढत्या घटनांमुळे दिल्लीतले रहिवासी धास्तावले आहेत.
| |
MAR_M_HAPPY_00173
|
बॉलिंग ॲलीवर सलग तीन फटके मिळाल्यावर मी बेफाम नाचलो.
| |
MAR_M_SAD_00372
|
लोकांनी ऐतिहासिक स्मारकांच्या भिंतींना विद्रूप केले आहे हे बघणे अत्यंत निराशाजनक आहे.
| |
MAR_M_SAD_00116
|
तुम्ही निवडलेल्या केकला त्याच्या नाजूक नक्षीमुळे आणि तुमच्या पसंतीच्या पर्यायांमुळे ज्यादाचा खर्च येतो हे सांगतांना मला खेद वाटतोय. कोणत्याही गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे.
| |
MAR_M_NAMES_01290
|
बांद्रा टर्मिनस हिसार सुपरफास्ट एक्स्प्रेस
| |
MAR_M_NAMES_00837
|
बनास
| |
MAR_M_INDIC_00004
|
चित्रकार श्री सुदाम वाघमारे यांचे आभार मानले तर त्याला खचितच रुचणार नाही म्हणून थांबतो
| |
MAR_M_BOOK_01074
|
पुण्याला एकदा गेलो म्हणजे तेथून सुटका केव्हा होईल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे नांदेडहून अगदी मध्यरात्री निघून दुसरे दिवशी सकाळी लासलगावला भाऊंच्या भेटीला गेलो
| |
MAR_M_WIKI_03235
|
मत्य तालम म्हणजे तालमांचा समूह आहे, ज्यामध्ये एक लघु, त्यानंतर एक धृतम आणि त्यानंतर एक लघु असतात.
| |
MAR_M_WIKI_01273
|
यज्ञजीवी ॠत्विजांचा वर्ग स्थापिला गेल्यानंतर त्या वर्गामध्ये अनेक भेद कसकसे उत्पन्न झाले व पुढें त्यांच्या जाती कशा बनल्या.
| |
MAR_M_NAMES_00589
|
बीएएसएफ इंडिया लिमिटेड
| |
MAR_M_CONV_02105
|
बहुतांश भागात टीम्सही तयार केल्या गेल्या आहेत, ज्या गरज पडल्यास कोणत्याही प्रकारची मदत पुरवू शकतात.
| |
MAR_M_DISGUST_00404
|
काही चाहत्यांकडून वापरली जाणारी अपमानास्पद भाषा प्रचंड त्रासदायक आहे.
| |
MAR_M_BOOK_00403
|
ते नकोच.
| |
MAR_M_WIKI_00364
|
सिंधफणा नदी देवनागरी लेखनभेद सिंदफना नदी ही महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातून वाहणारी नदी आहे.
| |
MAR_M_NAMES_00533
|
माइंडस्पेस बिझनेस पार्क्स आरईआयटी
| |
MAR_M_ALEXA_00019
|
आवाज पन्नास टक्क्यांनी कमी कर
| |
MAR_M_INDIC_00220
|
इथं कृष्णेच्या तीरावर वाळुंज म्हणजे सॅलिक्स टेट्रास्पर्माची झाडे आहेत.
| |
MAR_M_SAD_00160
|
इतक्या वर्षांनंतर तुम्ही माझ्या तुमच्याशी असलेल्या मोकळेपणाबद्दल गैरसमज करून घ्याल याचं मला वाईट वाटतंय.
| |
MAR_M_WIKI_01362
|
बाहेर जाणारा पहिला बैल हा एक जुना बैल असतो, ज्याच्या शिंगांवर लाकडी चौकट कंसात ज्याला मखर म्हणतात बांधलेली असते.
| |
MAR_M_SAD_00164
|
शहरातील दुसऱ्या एका इमारतीत बदली झाल्याचे कळल्यानंतर सुरक्षा रक्षक उदास झाला होता.
| |
MAR_M_NAMES_00234
|
न्यू जल शक्ती मिनिस्ट्री
| |
MAR_M_CONV_01697
|
ह्यामध्ये छोटे वर्ग, व्यक्तिगत अध्यापन आणि वैयक्तिक पाठबळ असू शकतं.
| |
MAR_M_WIKI_00298
|
जीवनमुक्त अवस्थेचे वर्णन करताना त्या स्थितीत प्रारब्ध कर्म संपून जातात असे समजावून दिलेले आहे परंतु हे स्पष्ट केलेले आहे की ही अवस्था मिळविण्याआधी केलेल्या कर्मांचे प्रारब्धफळ अवश्य भोगावे लागते इंद्रियवृत्तीप्रमाणेच प्रारब्ध कर्म देखील केवळ देहाभिमान्यांनाच बंधनकारक असते.
| |
MAR_M_WIKI_02366
|
पंधराशे चाळीस मध्ये, मिर्झा मुहम्मद हैदर दुघलत, चगताई तुर्को मंगोल लष्करी सेनापतीने काश्मीरवर हल्ला केला आणि त्यावर कब्जा केला, तेव्हा सल्तनत थोड्या काळासाठी खंडित झाली.
| |
MAR_M_CONV_00326
|
हो, सर, आम्हालाही आनंद वाटतोय ह्याचा.
| |
MAR_M_WIKI_03000
|
उच्च श्रेणीतील अर्बुदांवर अधिक आक्रमकपणे उपचार केले जातात आणि त्यातून वाचण्याच्या जात्याच वाईट प्रमाणामुळे अधिक आक्रमक औषधांचे प्रतिकूल परिणाम उद्भवू शकतात.
| |
MAR_M_NAMES_01000
|
साबरमती
| |
MAR_M_ANGER_00085
|
इतके मूर्ख का असतात लोक? हे युनेस्कोच्या यादीतले वारसा स्थळ आहे आणि तरीही लोक कचरा टाकतात सर्वत्र.
| |
MAR_M_CONV_00046
|
पाच मिनिटात मिळून जाईल तुमची पॉलिसी तुम्हाला.
| |
MAR_M_CONV_01071
|
तुझा पाहुणचार करण्याची मी खूप उत्सुकतेने वाट बघते आहे.
| |
MAR_M_NAMES_00461
|
थ्रीएम इंडिया लिमिटेड
| |
MAR_M_WIKI_02275
|
इतर अनेक पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत ते एका रात्रभोजनामध्ये सहभागी झाले होते.
| |
MAR_M_CONV_00166
|
त्यासाठी आधी तुम्हाला अॅक्सिडेंटचा पोलीस रिपोर्ट सादर करावा लागेल.
| |
MAR_M_BB_00206
|
हेझेल स्टीलचा आयताकृती हँगर हे उत्पादन परत करणे शक्य आहे का?
| |
MAR_M_WIKI_01368
|
त्यामुळे हे सर्व पक्षकारांसाठी उपलब्ध असतील तर त्यामुळे पक्षकारांचे आणि ॲक्सेस टू जस्टीसचे सक्षमीकरण होईल.
| |
MAR_M_FEAR_00388
|
कार्यक्रमादरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार आहे असे माझ्या ऐकिवात आहे, पण कार्यक्रम व्यवस्थापक ते कसे हाताळतील हे मला जाणून घ्यायचे आहे.
| |
MAR_M_WIKI_00941
|
केरळच्या पूर्व भागात पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेच्या लगतच पश्चिमेस उंच डोंगर, घळी आणि खोल दऱ्या आहेत.
| |
MAR_M_SURPRISE_00347
|
सायकलच्या दुकानात गेल्यानंतर पाच मिनिटांच्या आत माझ्या बजेटमध्ये इतकी विलक्षण मस्त सायकल मिळेल अशी मला अपेक्षाच नव्हती.
| |
MAR_M_CONV_00437
|
हो प्रश्नच नाही, तुला काय जाणून घ्यायचंय?
| |
MAR_M_WIKI_01922
|
आता उदाहरणार्थ एका व्यक्तीचे ॲलिसिस स्वयंपाकाची क्षमता यासाठी मी दहा गुण देईन अशावेळी मी म्हणू शकतो की ते गुण नऊ आहेत किंवा आठ.
| |
MAR_M_NAMES_02034
|
रितेश अगरवाल
| |
MAR_M_BOOK_00121
|
आईबापांना तर अपार आनंद होई.
| |
MAR_M_WIKI_03097
|
भविष्यातील यशासाठी सज्ज होण्यासाठी हे उपक्रम हा तुमच्या आर्थिक वाढीसाठीचा तात्पुरता मार्ग गृहित धरावा.
| |
MAR_M_NAMES_00675
|
इक्लर्क्स सर्व्हिस लिमिटेड
| |
MAR_M_WIKI_02583
|
परंपरेनुसार, जन्मापासूनचे केस भूतकाळातील अप्रिय लक्षणांशी संबंधित आहेत.
| |
MAR_M_DISGUST_00386
|
विरोधी संघानी उघडपणे केलेली फसवणूक लाज आणणारी होती.
| |
MAR_M_WIKI_01283
|
ट्रेन ऑपरेशन या नावाने या लिंकवर आऱएफक्यू, आणि संबंधित दस्तावेज, कराराच्या सवलतीचा मसुदा, व्यवहार्यता अहवाल उपलब्ध आहे.
| |
MAR_M_WIKI_02015
|
स्थूल नफा म्हणजे कंपनीच्या महसूल आणि विक्री केलेल्या वस्तूंची किंमत किंवा प्रदान केलेल्या सेवांच्या किंमतीमधील फरक.
| |
MAR_M_WIKI_01599
|
नॉर्दम्प्टनशायर क्रिकेट संघ
| |
MAR_M_CONV_00771
|
फारच उदास दिसत आहेस तू.
| |
MAR_M_CONV_00295
|
पण आता वाटतंय आपणच तेव्हा मूर्ख होतो.
| |
MAR_M_CONV_01325
|
हो. आणखीही काही आहे.
| |
MAR_M_CONV_01057
|
ए. ऐक ना, थोड्या दिवसात ईद आहे.
| |
MAR_M_CONV_02031
|
राजहंसाची नक्षी प्रवेशद्वार सजवते.
| |
MAR_M_UMANG_00064
|
माझ्या सध्याच्या स्थानाजवळ असलेले इंजेक्शन वॉटर पॉलीपॅकची जेनेरिक आवृत्ती विकणारे मेडिकल स्टोअर तुम्ही शोधू शकाल का?
| |
MAR_M_WIKI_03126
|
उपकरणे आणि कच्च्या मालाच्या किंमती तसेच आपल्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी लागणारी मेहनत मोजा.
| |
MAR_M_HAPPY_00369
|
वस्तू विनासायास परत करण्याच्या प्रक्रियेसाठी मी कुरिअरचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत, ती प्रक्रिया फारच सोयीस्कर आणि वेगवान होती.
| |
MAR_M_FEAR_00010
|
माझ्या वडिलांनी जर माझं मार्क शीट बघितलं तर ते काय म्हणतील कोण जाणे.
| |
MAR_M_SAD_00361
|
नवीन उत्पादनाची वाट बघणाऱ्या ॲपलच्या कट्टर चाहत्यांनी किंमत ऐकल्यावर एकासुरात आरडाओरडा केला.
| |
MAR_M_CONV_00655
|
तुम्हाला स्ट्रेच्ड कॅनव्हास हवाय की कॅनव्हास बोर्ड?
| |
MAR_M_WIKI_03263
|
तरतारिणी मंदिरातील शक्तीपीठ मंदिरात हजारो भक्त जमतात, कारण चैत्र यात्रेदरम्यान हा अनेक शुभ दिवसांपैकी एक असतो.
| |
MAR_M_DISGUST_00414
|
मला चांगले पर्याय देणाऱ्या विद्यापीठाऐवजी एक विशिष्ट विद्यापीठ निवडून मीच स्वतःला या स्थितीत पाडून घेतलंय.
| |
MAR_M_SURPRISE_00269
|
वॉशिंग्टनमधल्या स्थानिक आर्ट गॅलरीत इतक्या वैविध्यपूर्ण कलाकृती दिसतील याची मला कल्पना नव्हती.
| |
MAR_M_DIGI_00106
|
मला अडकलेल्या व्यवहारातील पाच हजार रुपये झारखंड राज्य ग्रामीण बँके मधील नऊ, एक, पंचावन्न, शहाण्णऊ, सतरा, सतरा, अडुसष्ट, एकोणतीस, सत्तेचाळीस ह्या खात्यामध्ये कधी परत मिळतील?
| |
MAR_M_NEWS_00212
|
देशाचा विकास , हवामान बदलाचा सामना आणि दहशतवादाला विरोध या तीन मुद्यांवर त्यांनी भर दिला .
| |
MAR_M_CONV_00469
|
आणि तशीही सरकारी शाळांत काय कमी असते ?
| |
MAR_M_CONV_01510
|
आपल्याला आत्ता बोलता येईल.
| |
MAR_M_NAMES_01420
|
दादर चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस
| |
MAR_M_WIKI_01589
|
हे आश्चर्य यामुळे होते कारण त्यांना कच्छसाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे माहितच नाही.
| |
MAR_M_BOOK_00680
|
शिरीषचे मुखकमल प्रसन्न पाहून आदित्यनारायणास आनंद झाला.
| |
MAR_M_SAD_00297
|
एका चित्रपटात मी एक गलिच्छ रुग्णालय बघितलं आणि त्या गरीब रुग्णांसाठी मला दुख्ख वाटलं.
| |
MAR_M_DISGUST_00440
|
कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी त्यांच्या हितसंबंधांचा संघर्ष उघड करण्यास नकार दिल्याने मला भीती वाटत आहे.
| |
MAR_M_NEWS_00132
|
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे .
| |
MAR_M_FEAR_00045
|
चिडवू नका तिला. आपल्या वर्गशिक्षकांकडे तक्रार करणार ती आणि मग मुख्याध्यापकांकडे पाठवले जाईल आपल्याला.
| |
MAR_M_WIKI_00874
|
भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्व प्रकारच्या भेदभावांना अवैध ठरवण्यासह विविध नागरी स्वातंत्र्यांची हमी आणि संरक्षण देते.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.