dataset collection
Collection
contain datatset for train indic parler tts • 30 items • Updated • 1
audio audioduration (s) 2.12 21.5 | transcription stringlengths 18 172 | file_name stringlengths 12 16 |
|---|---|---|
त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. | sample_0.wav | |
राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, आपण कोण आहात. | sample_1.wav | |
त्यावर त्या स्त्रीने सांगितले, मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे. | sample_2.wav | |
तेव्हा राजाने तिला सांगितले, तू जाऊ शकतेस. | sample_3.wav | |
लक्ष्मी बाहेर पडली, नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले. | sample_4.wav | |
त्याने उत्तर दिले, माझे नाव दान आहे. | sample_5.wav | |
लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे. | sample_6.wav | |
राजाने सांगितले आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता. | sample_7.wav | |
त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष यश निघून गेला. | sample_8.wav | |
त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. | sample_9.wav | |
तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. | sample_10.wav | |
तो पुरुष म्हणाला, माझे नाव सदाचार. | sample_11.wav | |
राजाने त्याला म्हटले, मी तर तुझा कधीच त्याग केला नाही, तू मला सोडून का जात आहेस. | sample_12.wav | |
तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे, मी तुला जाऊ देणार नाही. | sample_13.wav | |
तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल. | sample_14.wav | |
राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. | sample_15.wav | |
सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले. | sample_16.wav | |
मुलांनो, सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. | sample_17.wav | |
जीवनात सदाचार, नीतीमत्ता, धर्माचरण, आदी नसेल, तर दान, लक्ष्मी, श्रीमंती, आदींचा काहीच उपयोग नाही. | sample_18.wav | |
एक राजा खूप मोठा देवभक्त होता. | sample_19.wav | |
गावात एक शंकराची पिंडी होती, त्याचा एक पुजारी होता. | sample_20.wav | |
तोही श्रद्धेने, मनोभावे देवाची पूजा आणि सेवा करायचा. | sample_21.wav | |
त्याला मधून मधून देवदर्शन होत असे. | sample_22.wav | |
राजा रोज देवळात जायचा, देवासाठी सोन्याच्या ताटातून जेवण पाठवायचा, देवासाठी दानधर्म करायचा. | sample_23.wav | |
राजाला वाटायचे, मी देवासाठी इतके करतो, तरी मला देवदर्शन का होत नाही. | sample_24.wav | |
पुजारी तर देवाला काहीच देत नाही, तरी त्याला देव कसा दर्शन देतो. | sample_25.wav | |
एके दिवशी राजा देवळात गेला असतांना पुजारी पूजा करत होता, तेवढ्यात थोडा भूकंप झाला. | sample_26.wav | |
देवळाच्या भिंती आणि छप्पर हलू लागले. | sample_27.wav | |
पुजारी पिंडीवर ओणवा झाला; कारण छप्पर पडले, तर देवाला लागू नये. | sample_28.wav | |
राजा लगेच पळून गेला, त्या वेळी पुजार्याला देवदर्शन का होते, हे राजाला समजले. | sample_29.wav | |
एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. | sample_30.wav | |
आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणाऱ्या भांडणांमुळे तो दु:खी होई. | sample_31.wav | |
त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घड्यावर पाणी. | sample_32.wav | |
एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एक-एक काठी घेऊन यायला सांगितले. | sample_33.wav | |
त्याप्रमाणे ती मुले एक-एक काठी घेऊन आली. | sample_34.wav | |
त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. | sample_35.wav | |
वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. | sample_36.wav | |
पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. | sample_37.wav | |
पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. | sample_38.wav | |
वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली, आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. | sample_39.wav | |
पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी होती. | sample_40.wav | |
आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना, एकीचे बळ किती असते ते ? | sample_41.wav | |
वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. | sample_42.wav | |
तेव्हापासून ते एकजुटीने वागू लागले. | sample_43.wav | |
एका गावात रथोत्सव चालू असतो. | sample_44.wav | |
भाविक तो रथ एका गावातून दुसऱ्या गावात वाजत-गाजत नेत असतात. | sample_45.wav | |
मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते, त्यामुळे भाविक चिंतित होतात. | sample_46.wav | |
त्यांना प्रश्न पडतो, रथातील देवाला दुसऱ्या गावाला कसे पोहोचवायचे ? | sample_47.wav | |
भाविक पर्यायी म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात; पण काहीही उपलब्ध होत नाही. | sample_48.wav | |
मार्गात मध्येच भाविकांना कचरा खाणारे एक गाढव दिसते. | sample_49.wav | |
सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात. | sample_50.wav | |
रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. | sample_51.wav | |
उत्सव पुन्हा चालू होतो अन् सर्वजणदुसऱ्या गावाकडे प्रयाण करतात. | sample_52.wav | |
काही भाविक गाढवावरील देवाला हार घालू लागतात. | sample_53.wav | |
काही वेळाने देवाला हार घालायला जागा राहात नाही. | sample_54.wav | |
म्हणून लोक गाढवालाच भक्ती-भावाने हार घालू लागतात. | sample_55.wav | |
मार्गाने जातांना गाढव विचार करते, आत्तापर्यंत कधी मिळाले नाही, ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे. | sample_56.wav | |
देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे, असे गाढव मानू लागले आणि त्यामुळे ते अधिकच आनंदी झाले. | sample_57.wav | |
काही क्षणांनंतर त्याच्या मनात विचार आला. | sample_58.wav | |
मला हे राजवैभव मान्य आहे; पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे. | sample_59.wav | |
हा विचार आल्यावर ते स्वतःचे अंग झाडते, त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो. | sample_60.wav | |
हे पाहून भाविक भडकतात आणि गाढवाला धोपटतात. | sample_61.wav | |
जोपर्यंत आपल्यावर देवाची कृपा आहे, आपल्याजवळ त्याचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. | sample_62.wav | |
ज्या क्षणी अहंकार बळावतो, त्या वेळी आपली स्थिती गाढवापेक्षा वेगळी राहत नाही. | sample_63.wav | |
म्हणून देवाला विसरू नये, अहंरहित रहावे, सर्व मानसन्मान देवाचरणी अर्पण करावेत. | sample_64.wav | |
एक माणूस परीस शोधायला निघाला. | sample_65.wav | |
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा. | sample_66.wav | |
असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. | sample_67.wav | |
दिवस गेले, महिने लोटले, वर्षे सरली, पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही. | sample_68.wav | |
शेवटी तो माणूस म्हातारा झाला. | sample_69.wav | |
ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता, त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले. | sample_70.wav | |
ती साखळी सोन्याची झाली होती. | sample_71.wav | |
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही. | sample_72.wav | |
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो. | sample_73.wav | |
कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहिणींच्या नात्याने, कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने, तर कधी प्रेयसीच्या नात्याने. | sample_74.wav | |
कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो, आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो. | sample_75.wav | |
आपण जे काही असतो, किंवा बनतो, त्यात त्यांचा बराच हातभार असतो. | sample_76.wav | |
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. | sample_77.wav | |
मुंबई कधीही न झोपणार शहर, पण इथे सुद्धा मनमोहक सकाळ रोज होते बर का! | sample_78.wav | |
अशीच सकाळची वेळ होती, सुर्यदेवांची कोवळी किरणे अलगद शरीरास स्पर्श करून जात होती. | sample_79.wav | |
काल रात्री एका मित्राने सकाळी भेटण्याचं वचन माझ्याकडून घेतल होत, त्यालाच भेटण्यासाठी म्हणून मी घराबाहेर पडलो. | sample_80.wav | |
ठरल्या ठिकाणी अगदी वेळेच्या आधीच पोचायची माझी सवयच होती. | sample_81.wav | |
साधारण साडे नऊ ची वेळ असावी. | sample_82.wav | |
ह्या अनोळखींच्या जगात तिथे मी एकटाच होतो जो प्रत्येक येणाऱ्या, जाणाऱ्यांकडे टक लाऊन पाहत होतो. | sample_83.wav | |
मिनिटाला शंभर पावल, असा इथे नियम असतो, हे वाक्य खरच आहे, हे त्या दिवशी मी प्रत्यक्ष अनुभवलं. | sample_84.wav | |
तितक्यात काही पावलं, माझ्या दिशेने दबकत येताना जाणवली. | sample_85.wav | |
पण मागे वळून पाहण्याच्या अगोदरच, कोणीतरी माघून डोळे गच्च पकडले. | sample_86.wav | |
अनेकांची नावं घेतली, पण नकारार्थी हुंकार कानावर पडले. | sample_87.wav | |
डोळ्यांवरचा हाथ अलगद सरकला, ती व्यक्ती दृष्टीक्षेपात आली. | sample_88.wav | |
ती होती सतरा ते अठरा दरम्यान रेंगाळत असलेली एक तरुणी, जीला मी पहिल्यांदाच पाहत होतो. | sample_89.wav | |
मी काही बोलण्याचा अगोदरच ती उत्साहाने बोलली. | sample_90.wav | |
पण तिच्या चाललेल्या बऱ्याच वेळेच्या बडबडीत एक गोष्ट उमजली. | sample_91.wav | |
अगदी योगायोगाने मी त्या दिवशी त्याच पोशाखात तिथे पोहोचलो होतो. | sample_92.wav | |
तिला बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलू देईनाच. | sample_93.wav | |
ती काय बोलत होती ह्याकडे माझ पूर्ण लक्ष होत. | sample_94.wav | |
शेवटी मला कॉलेज ला उशीर होतोय, आपण उद्या पुन्हा इथेच भेटू अस बोलून ती निघून गेली. | sample_95.wav | |
प्रत्यक्ष दहा मिनिटं माझ्या पुढे उभी राहून मला एकही शब्द बोलू न देणाऱ्या त्या अनोळखी मुलीला. | sample_96.wav | |
तिच्या होणाऱ्या गैरसमजाबद्दल उद्या नक्की सांगू असा निश्चय करून, मी त्या विचारांना स्वल्पविराम दिला. | sample_97.wav | |
ज्याला भेटायला आलो तो अजून आला नाही म्हणून मी त्याला फोन लावला. | sample_98.wav | |
त्याचाशी बोलत असतानाच अचानक खांद्यावर भक्कम अशी थाप पडली. | sample_99.wav |