text stringlengths 0 147 |
|---|
सोप्या शब्दात इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हे माझे पहिलेच पुस्तक. तेही जवळपास |
चार वर्षांपूर्वी लिहून झालेले. परंतु, नंतरही अनेक साधने हाती येत गेली आणि काही |
ठिकाणी मांडलेल्या गोष्टींना भक्कम पुरावे मिळाले. अर्थात, हे संदर्भ तपासून लिहिण्याचे |
वेड म्हणा वा व्यसन म्हणा, ते अंगिकारले गेले, दोन व्यक्तींमुळेच. ज्येष्ठ इतिहास संशोधक, |
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पेशवाईचे अभ्यासक, संशोधक श्री. निनादराव |
बेडेकर यांच्यामुळे. इतिहास हे एकप्रकारे पाहिले तर एक शास्त्रच आहे आणि त्याचा |
शास्त्रशुद्ध अथवा प्रमाणभूत चौकटीत राहून अभ्यास करणे हे महत्त्वाचे असते, हे या दोन |
संशोधकांमुळे मला समजले. निनादराव आज आपल्यात नाहीत, याचे दुःख फार आहे. पण |
भाग्याने म्हणा वा पुण्यकर्माने, मला त्यांचा काही सहवास लाभला. माझे भाग्य एवढे |
थोर की, मला महाराष्ट्रभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रस्तावना लिहून या |
पुस्तकाला आशिर्वाद दिले. ही गोष्ट खरे सांगायचे तर जाहली'. त्याबद्दल त्यांचे |
आभार मानावे इतकाही मी मोठा नाही. इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे आणि श्री. |
सदाशिव शिवदे यांच्याकडूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, ही |
गोष्टही मला विसरून चालणार नाही. नानासाहेब पेशव्यांच्या अंतःकाळचे वर्णन करणारे दोन |
अस्सल मोडी कागद इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांनी तत्काळ उपलब्ध |
दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. काही ऐतिहासिक नोंदींसंबंधी विशेष मदत करणारे |
आमचे स्नेही भारत महारुगडे, कोल्हापूर यांचे मनःपूर्वक आभार. कोणत्याही परिस्थितीत |
कायमच घरच्या मंडळींनी, माझी आई सौ. स्वामिनी कस्तुरे, वडील श्री. सतीश शंकर कस्तुरे |
आणि दादा समीर यांनी इतिहासाच्या अभ्यासाला प्रोत्साहनच दिले, याबद्दल खरेच शब्दच |
कमी आहे. आज मी जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच. |
मी 'पेशवाई'वर पुस्तक लिहिले आहे आणि आता दीर्घ प्रतिक्षेनंतर ते प्रकाशित |
करण्याचा मानस आहे, असे गप्पांच्या ओघात बोललो असता, तत्क्षणी हे पुस्तक |
'राफ्टर'कडूनच प्रकाशित करू असे सांगणारे वास्तविक वयाने मोठे असले तरीही माझे |
मित्रवर्य श्री. उमेश जोशी यांच्याबद्दल काय बोलावे? उमेश स्वतः थोरल्या रायांच्या |
इतिहासातील अभ्यासक आणि विशेष म्हणजे कै. निनादराव बेडेकर यांचे शिष्य |
असल्यामुळे पुस्तक अतिशय बारकाईने तपासून त्यातील त्रुटी दाखवून मगच स्वीकारणार, |
याची खात्री होती. पुस्तक कसे सजवावे जेणेकरून, वाचकांना तत्कालीन घटना समजून घेणे |
सोपे जाईल. विशेषतः ठिकाणे आणि हालचाली वगैरे माहित असाव्यात म्हणून |
नकाशे बनवण्याचा विषय निघाला. पण हे नकाशेही अगदीच कंटाळवाणे नसावेत, याकरिता |
स्वतः उमेशरावांनी नकाशात जीव येण्याकरिता त्याच्या भौगोलिक रचना अभ्यासून आपल्या |
हातातील कामाचा डोंगर कौशल्याने हाताळत अत्यंत कमी वेळात हे अवघड काम पूर्ण केले. |
'येकरिता राजेश्रींचे ऋण कैसे उतरावे?' पुस्तकासाठी अक्षरजुळवणी करणारे श्री. मिलिंद- |
मंजिरी सहस्रबुद्धे, मुद्रितशोधन करून अत्यंत बारीक चुका शोधण्याचे काम करणाऱ्या उमेश |
जोशींच्या आईसाहेब सौ. मेघना जोशी, लोकसन्मुख चेहरा असणारे पुस्तकाचे मुखपृष्ठ |
बनवणारे 'अस्मी क्रिएशन्स'चे श्री. आशुतोष केळकर आणि सरतेशेवटी पुस्तकाचे मुद्रण |
<<< |
उत्तमप्रकारे करणारे 'मौज प्रकाशन' चे श्री. संजय भागवत यांचे मनापासून आभार! |
या सर्वांव्यतिरिक्त बाह्य जगातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतिहासप्रेमी वाचक. सदर |
पुस्तकातील माझे हे लिखाण कोण्या मोठ्या भाषापंडिताच्या गोडीचे नाही अथवा एखाद्या |
इतिहासपंडिताच्या तोडीचेही नाही. त्यामुळे आपला अभिप्राय हाच मार्गदर्शक असल्याने |
त्याच्या प्रतिक्षेत आहे. |
अखेरीस शाहीर प्रभाकराच्या शब्दातच पेशवाईचे महत्त्व सांगावेसे वाटते- |
"मुलुख सरंजामास देऊन केली कायम गलिमाई। |
मनुष्य मात्रादिकांचे माहेर होती पेशवाई।।" |
बहुत काय लिहिणे लेकराचे कायम ऐसेच अगत्य असो द्यावे ही विज्ञापना. |
राजते लेखनावधी।। |
आपला |
<<< |
शिवराज्याभिषेक |
२. दक्षिण दिग्विजय |
३. छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज |
४. श्रीमंत पेशवे बालाजी विश्वनाथ |
५. पेशवे बाजीराव बल्लाळ (थोरले बाजीराव) |
६. पेशवे बाळाजी बाजीराव (थोरले नानासाहेब) |
७. पेशवे माधवराव बल्लाळ (थोरले माधवराव) |
८. पेशवे नारायणराव बल्लाळ |
९. पेशवे रघुनाथराव बाजीराव (राघोबादादा) |
१०. पेशवे माधवराव नारायण (सवाई माधवराव) |
११. पेशवे बाजीराव रघुनाथ (दुसरे बाजीराव) |
१२. पेशवाई : समज-गैरसमज |
१३. मोडी पत्रे |
१४. छत्रपती आणि पेशवे यांच्या मुद्रा |
<<< |
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, श्री नृप शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सर, शनिवारची |
पहाट झाली. महाडच्या उत्तरेस असणाऱ्या, आठ कोसांवरच्या किल्ले मोठी |
लगबग उडाली होती. पहाटेच मंगलवाद्ये वाजायला लागली होती. गडाच्या टोकाटोकांवर, |
बुरुजा-बुरुजांवर अन् इमारतींच्या हरएक कोनाड्यात मशाली, पणत्या उजळल्या जात |
होत्या. बालेकिल्ल्याच्या दोनही दरवाज्यांबाहेर- पालखी आणि मेणा दरवाज्याबाहेरचा |
परिसर गोमयानी सारवलेला होता. राजवाड्यातल्या स्त्रिया आज नाकात नथ घालून, |
डोईवरचा पदर सांभाळत हातातल्या चांदीच्या तबकातून दरवाज्याबाहेर रंगोळी घालीत |
होत्या. राजवाड्यातल्या कारकूनांची सदरेच्या पाठीमागचा प्रचंड परिसर सजवायची घाई |
लागली होती. फुलांच्या माळा भराभर उलगडल्या जात होत्या. महादरवाजा आज |
सूर्य उगवायच्या आधीपासून 'आ' वासून सताड होता. पायथ्याच्या चित |
दरवाज्यापासून आणि नाणे दरवाज्यापासून गडावर जाण्याकरता माणसांची रीघ लागली |
होती. गडाखालच्या पाचाड, रायगडवाडी, कोंझर या गावांमधून गोरसाचे अन् दह्याचे हंडे |
भरून घेऊन गवळणी गडाच्या वाटेला लागल्या होत्या. गडाच्या जगदीश्वर-भवानी |
टोकाकडून, बाजारपेठेकडून येणारी माणसे आणि महादरवाज्याकडून गड चढून येणारी |
माणसे होळीच्या माळापाशी एकत्र येऊन नगारखान्याच्या दिशेने झपाझप पावले उचलत |
होती. |
होळीच्या माळाच्या दक्षिणेला असलेल्या एका प्रचंड या नगारखान्याची |
भव्य इमारत उभी होती. वास्तविक हा एक प्रचंड मोठा दरवाजाच होता. हत्तीवरच्या |
अंबारीवरचा झेंडा जराही न वाकवता हत्तीला दरवाजातून जाता येईल इतका हा दरवाजा उंच |
होता. दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना मंगलमय अशी कमलपुष्पे कोरली होती. अन् त्यांच्याही |
बाजूला दोन अप्रतिम शिल्पं खोदली होती. एका वनराजाने आपल्या चारही पायांखाली चार |
हत्ती चिरडले असून शेपटीत एका हत्तीला पकडले आहे. असं वाटतं की जणू हा वनराज |
सह्याद्रीच्या एका उत्तुंग कड्यावर उभा आहे आणि पाहता पाहता तो त्या शेपटीतल्या हत्तीला |
खालच्या खोल दरीत भिरकावून देईल. महादरवाज्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर झुली पांघरलेले, |
दातांच्या अग्रभागी मोत्यांच्या घसघशीत माळा लावलेले दोन 'गजराज' उभे होते. |
बालेकिल्ल्यातल्या राजवाड्यात गोड धांदल उडाली होती. राजवाड्याच्या द्वारांवरती |
तोरणे लागली होती. स्वस्तिकादी शुभचिन्हे उमटवण्यात आली होती. नगारखान्यातला |
चौघडा लागला. त्यातच सनईचे सूर मिसळले जाऊ लागले. राजवाड्यातल्या देवघरात |
आई भवानीच्या मूर्तीची पूजा सुरू होती. राजपुरोहित मंत्र म्हणत होते अन् समोर महाराष्ट्राचे |
महाभाग्य, श्री शिवाजी महाराज वीरासन घालून बसले होते. बाळंभट्ट आर्विकरांच्या पाया |
पडून महाराज राजवाड्याच्या आतल्या भागात गेले. इकडे राजवाड्यातल्या एका प्रशस्त |
महालात गागाभट्ट, महाराजांचे राजोपाध्ये व इतर वैदिक ब्राह्मण वेदमंत्रांचे घोष करू लागले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.