adhyay
float64
1
18
shlok_number
stringclasses
693 values
ovi_number
float64
1
1.81k
ovi_text
stringlengths
14
138
1
1.44
null
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥
1
1.45
null
अहो वत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयमं । यद् राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥
1
null
257
देवा अवधारी आणिक एक । एथ घडे महापातक । जै संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥ २५७ ॥
1
null
258
जैसा घरीं आपुला । वानिवसे वन्ही लागला। तो आणिकांही प्रज्वळिला । जाळुनि घाली ॥ २५८ ॥
1
null
259
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधु पावती । निमित्तें येणें ॥ २५९ ॥
1
null
260
तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥
1
null
261
पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतीही उगंडु नाही । येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
1
null
262
देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां ॥ २६२ ॥
1
null
263
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ॥ २६३ ॥
1
null
264
हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा ॥ २६४ ॥
1
1.46
null
यदि मामप्रतीकारमशस्त्रतं शस्त्रपाणयः । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तनं मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥
1
null
265
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवे । जे शस्त्र सांडूनि साहावे । बाण त्यांचे ॥ २६५ ॥
1
null
266
तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥
1
null
267
ऐसें देखोनि सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥ २६७ ॥
1
1.47
null
संजय उवाचः एवमुक्तवार्जुन: संख्ये रथोपस्य उपाविशत् ।
1
null
268
ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
1
null
269
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरू आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥
1
null
270
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहृतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥
1
null
271
ना तरी महासिद्धीसंभ्रमें । जिंतला त्रासु भ्रमे । मग आकळुनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥
1
null
272
तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दुःखें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
1
null
273
मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐके राया तेथ वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥
1
null
274
आता यावरी तो वैकुंठ्नाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरुपील ॥ २७४ ॥
1
null
275
ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकतां। ज्ञानदेव म्हणे आतां निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
1
null
null
॥ प्रथम अध्याय समाप्त ॥
null
null
null
null
2
2.01
null
संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम्। विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥
2
null
1
मग संजयो म्हणे रायातें, आइकें तो पार्थु तेथें। शोकाकुल रुदनातें, करितुसे ॥ १॥
2
null
2
तें कुळ देखोनि समस्त, स्नेह उपनलें अद्भुत। तेणें द्रवले असे चित्त, कवणेपरी ॥ २ ॥
2
null
3
जैसें लवण जळें झळंबलें, ना तरी अभ्र वातें हाले। तैसे सधीर परी विरमलें, हृदय तयाचें ॥ ३॥
2
null
4
म्हणोनि कृपा आकळिला, दिसतसे अति कोमाइला। जैसा कर्दमीं रुपला, राजहंस ॥ ४ ॥
2
null
5
तयापरी तो पांडुकुमरु, महामोहें अतिजर्जरु। देखोनि, शार्गङधरु, काय बोले ॥ ५ ॥
2
2.02
null
श्रीभगवानुवाच : कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्। अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन ॥ २ ॥
2
null
6
म्हणे अर्जुना आदि पाहीं, हें उचित काय इये ठायीं। तूं कवण हें कायी, करीत आहासी ॥ ६ ॥
2
null
7
तुज सांगे काय जाहलें, कवण उणें आलें। करितां काय ठेलें, खेदु कायिसा ॥ ७ ॥
2
null
8
तूं अनुचिता चित्त नेदिसी, धीरु कंहीच न संडिसी। तुझेनि नामे अपयशीं, दिशा लंघिजे ॥ ८ ॥
2
null
9
तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रियांमाजीं रावो। तुझिया लाठेपणाचा आवो, तिहीं लोकीं ॥ ९ ॥
2
null
10
तुवा संग्रामीं हरु जिंतिला, निवात्कवचांचा ठावो फेडिला। पवाडा तुवां केला, गंधर्वासी ॥ १० ॥
2
null
11
हें पाहता तुझेनि पाडें, दिसे त्रैलोक्यही थोकडें। ऐसें पौरुष चोखडें, पार्था तुझे ॥ ११ ॥
2
null
12
तो तूं कीं आजि एथें, सांडुनिया वीरवृत्तीतें। अधोमुख रुदनातें, करितु आहासी ॥ १२ ॥
2
null
13
विचारीं तूं अर्जुनु, कीं कारुण्यें कीजसी दीनु। सांग पां अंधकारे, भानु ग्रासिला आथी ॥ १३ ॥
2
null
14
ना तरी पवनु मेघासी बिहे, कीं अमृतासी मरण आहे। पाहे पा इंधनचि गिळोनि जाये, पावकातें ॥ १४ ॥
2
null
15
की लवणेंचि जळ विरे, संसर्गें काळकूट मरे। सांग महाफणी दर्दुरें, गिळिजे कायी ॥ १५ ॥
2
null
16
सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडु आथी कां जाहला। परी तो त्वां साच केला, आजि एथ ॥ १६ ॥
2
null
17
म्हणोनि अझुनि अर्जुना, झणें चित्त देसी या हीना। वेगीं धीर करूनियां मना, सावधान होईं ॥ १७ ॥
2
null
18
सांडी हे मूर्खपण, उठीं घे धनुष्यबाण, संग्रामीं हें कवण, कारुण्य तुझे ॥ १८ ॥
2
null
19
हां गा तू जाणता, तरी न विचारीसी कां आता। सांगे झुंजावेळें सदयता, उचित कायी ॥ १९ ॥
2
null
20
हे असतिये कीर्तीसी नाशु, आणि पारत्रिकासी अपभ्रंशु। म्हणे जगन्निवासु, अर्जुनातें ॥ २० ॥
2
2.03
null
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते। क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३ ॥
2
null
21
म्हणोनि शोक न करीं, तूं पुरता धीरु धरीं। हे शोच्यता अव्हेरीं, पंडुकुमरा ॥ २१ ॥
2
null
22
तुज नव्हे हें उचित, येणें नासेल जोडले बहुत। तूं अझुनिवरी हित, विचारी पां ॥ २२ ॥
2
null
23
येणें संग्रामाचेनि अवसरें, एथ कृपाळुपण नुपकरे। हे आतांचि काय सोयरे, जाहले तुज ॥ २३ ॥
2
null
24
तूं आधींचि काय नेणसी, कीं गोत्र नोळखसी। वायांचि काय करिसी, अतिशो आतां ॥ २४ ॥
2
null
25
आजिंचे हें काय झुंज, काय जन्मा नवल तुज। हें परस्परें तुम्हां व्याज, सदाचि आथि ॥ २५ ॥
2
null
26
तरी आतां काय जाहलें, कायि स्नेह उपनले। हें नेणिजे परि कुडे केले, अर्जुना तुवा ॥ २६ ॥
2
null
27
मोह धरिलिया ऐसें होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल। आणि परलोकही अंतरेल, ऐहिकेंसी ॥ २७ ॥
2
null
28
हृदयाचे ढिलेपण, एथ निकयासी नव्हे कारण। हें संग्रामीं पतन जाण, क्षत्रीयांसी ॥ २८ ॥
2
null
29
ऐसेनि तो कृपावंतु, नानापरी असे शिकवितु। हे ऐकोनि पंडुसुतु, काय बोले ॥ २९ ॥
2
2.04
null
अर्जुन उवाचः कथं च भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन। इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥
2
null
30
देवा हें येतुलेवरी, बोलावे नलगे अवधारीं। आधीं तूंचि चित्ती विचारीं, संग्रामु हा ॥ ३० ॥
2
null
31
हें झुंज नव्हे प्रमादु, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु। हा उघडा लिंगभेदु, वोढवला आम्हा ॥ ३१ ॥
2
null
32
देखें मातापितरें अर्चिजती, सर्वस्वें तोष पावविजती, तियें पाठीं केवीं वधिजती, आपुला हातीं ॥ ३२ ॥
2
null
33
देवा संतवृंदु नमस्कारिजे, कां घडे तरी पूजिजे। हें वांचूनि केवीं निंदिजे, स्वयें वाचा ॥ ३३ ॥
2
null
34
तैसे गोत्रगुरु आमुचे, हे पूजनीय आम्हां नियमांचे। मज बहुत भीष्मद्रोणांचे, वर्ततसे ॥ ३४ ॥
2
null
35
जयालागीं मनें विरु, आम्ही स्वप्नींही न शको धरूं। तया प्रत्यक्ष केवीं, घातु देवा ॥ ३५ ॥
2
null
36
वर जळो हें जियालें, एथ आघवेयांसी हेंचि काय जाहले। जे यांचां वधीं अभ्यासिलें, मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
2
null
37
मी पार्थु द्रोणाचा केला, येणें धनुर्वेदु मज दिधला। तेणें उपकारें काय आभारैला, वधीं तयातें ॥ ३७ ॥
2
null
38
जेथींचिया कृपा लाभिजे वरु, तेथेंचि मने व्यभिचारु। तरी काय मी भस्मासुरु, अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
2
2.05
null
गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके। हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥
2
null
39
देवा समुद्र गंभीर आइकिजे, वर तोहि आहाच देखिजे। परी क्षोभु मनीं नेणिजे, द्रोणाचिये ॥ ३९ ॥
2
null
40
हें अपार जें गगन, वर तयाही होईल मान। परि अगाध भलें गहन, हृदय यांचे ॥ ४० ॥
2
null
41
वरी अमृतही विटे, कीं काळवशें वज्र फुटे। परि मनोधर्मु न लोटे, विकरविला हा ॥ ४१ ॥
2
null
42
स्नेहालागीं माये, म्हणिपे तें कीरु होये। परि कृपा ते मूर्त आहे, द्रोणीं इये ॥ ४२ ॥
2
null
43
हा कारुण्याची आदि, सकळ गुणांचा निधि। विद्यासिंधु निरवधि, अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
2
null
44
हा येणें मानें महंतु, वरी आम्हांलागी कृपावंतु। आतां सांग पां येथ घातु, चिंतूं येईल ॥ ४४ ॥
2
null
45
ऐसे हे रणीं वधावे, मग आपण राज्यसुख भोगावें। तें मना न ये आघवें, जीवितेंसीं ॥ ४५ ॥
2
null
46
हें येणें मानें दुर्भर, जे याहीहुनि भोग सधर। ते असतु येथवर, भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
2
null
47
ना तरी देशत्यागें जाइजे, का गिरिकंदर सेविजे। परी शस्त्र आतां न धरिजे, इयांवरी ॥ ४७ ॥
2
null
48
देवा नवनिशतीं शरीं, वावरोनि यांचां जिव्हारीं। भोग गिंवसावे रुधिरीं, बुडाले जे ॥ ४८ ॥
2
null
49
ते काढूनि काय कीजती, लिप्त केवीं सेविजती। मज न ये हे उपपत्ति, याचिलागीं ॥ ४९ ॥
2
null
50
ऐसे अर्जुन तिये अवससरीं, म्हणे श्रीकृष्णा अवधारीं। परि ते मना न येचि मुरारी, आइकोनियां ॥ ५० ॥
2
null
51
हें जाणोनि पार्थु बिहाला, मग पुनरपि बोलों लागला, म्हणे देवो कां चित्त या बोलां, देतीचिना ॥ ५१ ॥
2
2.06
null
न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६ ॥
2
null
52
येर्ह वीं माझां चित्तीं जें होते, तें मी विचारूनि बोलिलों एथें। परि निकें काय यापरौते, तें तुम्ही जाणा ॥ ५२ ॥
2
null
53
पै विरु जयांसी ऐकिजे, आणि या बोलाचि प्राणु सांडिजे। ते एथ संग्रामव्याजें, उभे आहाती ॥ ५३ ॥
2
null
54
आतां ऐसेयांतें वधावे, कीं अव्हेरुनिया निघावें। या दोहोंमाजी काइ करावे, तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
2
2.07
null
कार्पण्यदोषोपहत्स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः। यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥
2
null
55
आम्हां काय उचित, तें पाहतां न स्फुरे एथ। जे मोहें येणें चित्त, व्याकुळ माझे ॥ ५५ ॥
2
null
56
तिमिरावरुद्ध जैसें, दृष्टीचे तेज भ्रंशे। मग पांसीच असतां न दिसे, वस्तुजात ॥ ५६ ॥
2
null
57
देवा मज तैसे जाहले, जें मन भ्रांती ग्रासिलें। आतां काय हित आपुलें, तेंही नेणे ॥ ५७ ॥
2
null
58
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें, निकें तें आम्हां सांगावें। जे सखा सर्वस्व आघवें, आम्हांसी तूं ॥ ५८ ॥
2
null
59
तूं गुरु बंधु पिता, तूं आमची इष्ट देवता। तूंचि सदा रक्षिता, आपदीं आमुतें ॥ ५९ ॥
2
null
60
जैसा शिष्यांते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरु। कीं सरितांते सागरु, त्यजी केवीं ॥ ६०॥
2
null
61
नातरी अपत्यातें माये, सांडुनि जरी जाये। तरी ते कैसेनिं जिये, ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
2
null
62
तैसा सर्वांपरी आम्हांसी, देवा तूंचि एक आहासी। आणि बोलिलें जरी न मानिसी, मागील माझें ॥ ६२ ॥
2
null
63
तरी उचित काय आम्हां, जे व्यभिचरेना धर्मा। तें झडकरी पुरुषोत्तमा, सांगें आतां ॥ ६३ ॥
2
2.08
null
न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम्। अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥
2
null
64
हें सकळ कुळ देखोनि, जो शोकु उपजलासे मनीं। तो तुझिया वाक्यावांचुनि, न जाय आणिकें ॥ ६४ ॥
2
null
65
एथ पृथ्वीतळ आपु होईल, हें महेंद्रपदही पाविजेल। परि मोह हा न फिटेल, मानसींचा ॥ ६५ ॥
2
null
66
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं, तरी सुक्षेत्री जर्ही पेरिलीं। तरी न विरुढती सिंचलीं, आवडे तैसीं ॥ ६६ ॥
2
null
67
ना तरी आयुष्य पुरलें आहे, तरी औषधें काही नोहे। एथ एकचि उपेगा जाये, परमामृत ॥ ६७ ॥