adhyay
float64
1
18
shlok_number
stringclasses
693 values
ovi_number
float64
1
1.81k
ovi_text
stringlengths
14
138
2
null
68
तैसे राज्यभोगसमृद्धि, उज्जीवन नोहे जीवबुद्धि। एथ जिव्हाळा कृपानिधि, कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
2
null
69
ऐसें अर्जुन तेथ बोलिला, जंव क्षण एक भ्रांति सांडिला। मग पुनरपि व्यापिला, उर्मीं तेणें ॥ ६९ ॥
2
null
70
कीं मज पाहता उर्मी नोहे, हें अनारिसें गमत आहे। तो ग्रासिला महामोहें, काळसर्पें ॥ ७० ॥
2
null
71
सवर्म हृदयकल्हारीं, तेथ कारुण्यवेळेचां भरीं। लागला म्हणोनि लहरी, भांजेचि ना ॥ ७१ ॥
2
null
72
हें जाणोनि ऐसी प्रौढी, जो दृष्टीसवें विष फेडी। तो धावया श्रीहरी गारुडी, पातला कीं ॥ ७२ ॥
2
null
73
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा। तो कृपावशें अवलीळा, रक्षील आतां ॥ ७३ ॥
2
null
74
म्हणोनि तो पार्थु, मोहफणिग्रस्तु। म्यां म्हणितला हा हेतु, जाणोनियां ॥ ७४ ॥
2
null
75
मग देखा तेथ फाल्गुनु, घेतला असे भ्रांती कवळूनु। जैसा घनपडळीं भानु, आच्छादिजे ॥ ७५ ॥
2
null
76
तयापरी तो धर्नुधरू, जाहलासे दुःखे जर्जरु। जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु, वणवला कां ॥ ७६ ॥
2
null
77
म्हणोनि सहजे सुनिळु, कृपामृते सजळु। तो वोळलासे श्रीगोपाळु, महामेघु ॥ ७७ ॥
2
null
78
तेथ सुदर्शनाची द्युति, तेचि विद्युल्लता झळकती। गंभीर वाचा ते आयती, गर्जनेची ॥ ७८ ॥
2
null
79
आतां तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुनाचळु निवेल। मग नवी विरुढी फुटेल, उन्मेषाची ॥ ७९ ॥
2
null
80
ते कथा आइका, मनाचिया आराणुका। ज्ञानदेवो म्हणे देखा, निवृत्तिदासु ॥ ८० ॥
2
2.09
null
संजय उवाच: एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः। न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९ ॥
2
null
81
ऐसें संजयो सांगतु, म्हणे राया तो पार्थु। पुनरपि शोकाकुलितु, काय बोले ॥ ८१ ॥
2
null
82
आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें, आतां नाळवावें तुम्हीं मातें। मी सर्वथा न झुंजें येथें, भरंवसेनि ॥ ८२ ॥
2
null
83
ऐसें येकि हेळां बोलिला, मग मौन धरोनि ठेला। तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला, देखोनि तयाते ॥ ८३ ॥
2
2.10
null
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत। सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥ १० ॥
2
null
84
मग आपुला चित्तीं म्हणे, एथ हें काय आदरिलें येणें। अर्जुन सर्वथा कांही नेणे, काय कीजे ॥ ८४ ॥
2
null
85
हा उमजे आतां कवणेपरी, कैसेनि धीरु स्वीकारी। जैसा ग्रहाते पंचाक्षरी, अनुमानी कां ॥ ८५ ॥
2
null
86
ना तरी असाध्य देखोनि व्याधी, अमृतासम दिव्य औषधी। वैद्य सूचि निरवधि, निदानींची ॥ ८६ ॥
2
null
87
तैसा विवरितु असे श्रीअनंतु, तया दोन्हीं सैन्याआंतु। जयापरी पार्थु, भ्रांति सांडी ॥ ८७ ॥
2
null
88
तें कारण मनीं धरिलें, मग सरोष बोलों आदरिले। जैसें मातेच्या कोपीं थोकलें, स्नेह आथी ॥ ८८ ॥
2
null
89
कीं औषधाचिया कडुवटपणीं, जैसी अमृताची पुरवणी। ते आहाच न दिसे परी गुणीं, प्रकट होय ॥ ८९ ॥
2
null
90
तैसे वरिवरि पाहतां उदासें, आंत तरी अतिसुरसें। तियें वाक्यें हृषीकेशें, बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
2
2.11
null
श्रीभगवानुवाच: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे। गतासूनगतासूंश्च नानुशोचंति पंडितः ॥ ११ ॥
2
null
91
मग अर्जुनाते म्हणितलें, आम्ही आजि हें नवल देखिलें। जें तुवां येथ आदरिलें, माझारींचि ॥ ९१ ॥
2
null
92
तूं जाणता तरी म्हणविसी, परी नेणीवेतें न संडिसी। आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी, बहुसाल नीति ॥ ९२ ॥
2
null
93
जात्यंधा लागे पिसें, मग तें सैरा धांवे जैसें। तुझे शहाणपण तैसें, दिसतसे ॥ ९३ ॥
2
null
94
तूं आपणपें तरी नेणसी, परी या कौरवांते शोचूं पहासी, हा बहु विस्मय आम्हांसी, पुढतपुढती ॥ ९४ ॥
2
null
95
तरी सांग पां मज अर्जुना, तुजपासोनि स्थिती या त्रिभुवना। हे अनादि विश्वरचना, तें लटकें कायी ॥ ९५ ॥
2
null
96
एथ समर्थु एक आथीं, तयापासूनि भूतें होती। तरी हें वायाचि काय बोलती, जगामाजीं ॥ ९६ ॥
2
null
97
हो कां सांप्रत ऐसें जहालें, जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले। आणि नाशु पाविले, तुझेनि कायी ॥ ९७ ॥
2
null
98
तूं भ्रमलेपणें अहंकृती, यांसी घातु न करिसी चितीं। तरी सांगे कायि हे होती, चिरंतन ॥ ९८ ॥
2
null
99
कीं तूं एक वधिता, आणि सकळ लोकु हा मरता। ऐसी भ्रांति झणें चित्ता, येवो देसी ॥ ९९ ॥
2
null
100
अनादिसिद्ध हें आघवें, होत जात स्वभावें। तरी तुवा का शोचावे, सांग मज ॥ १०० ॥
2
null
101
परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावें तें चिंतसी। आणि तूंचि नीति सांगसी, आम्हाप्रति ॥ १०१ ॥
2
null
102
देखें जे विवेकी जे होती, ते दोहींतेही न शोचती। जे होय जाय हे भ्रांती, म्हणऊनियां ॥ १०२ ॥
2
2.12
null
न त्वेवाहं जातुं नासं न त्वं नेमे जनाधिपाः। न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥
2
null
103
अर्जुना सांगेन आइक, एथ आम्ही तुम्ही देख। आणि हे भूपति अशेख, आदिकरुनी ॥ १०३ ॥
2
null
104
नित्यता ऐसेचि असोनि, ना तरी निश्चित क्षया जाऊनि। हे भ्रांति वेगळी करूनी, दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥
2
null
105
हे उपजे आणि नाशे, ते मायावशें दिसे। येर्ह वीं तत्वता वस्तु जे असे, ते अविनाशचि ॥ १०५ ॥
2
null
106
जैसें पवनें तोय हालविलें, आणि तरंगाकार जाहलें। तरी कवण कें जन्मलें, म्हणों ये तेथ ॥ १०६ ॥
2
null
107
तेंचि वायूचे स्फुरण ठेलें, आणि उदक सहज सपाटलें। तरी आता काय निमालें, विचारीं पां ॥ १०७ ॥
2
2.13
null
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा। तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्त्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥
2
null
108
आइकें शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक। हें प्रत्यक्षचि देख, प्रमाण तूं ॥ १०८ ॥
2
null
109
एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्यीं तें भ्रंशे। परी देहचि न नाशे, एकेकासवें ॥ १०९ ॥
2
null
110
तैसीं चैतन्याचां ठायीं, इयें शरीरांतरे होति जाति पाहीं। ऐसें जाणे जया नाहीं, व्यामोहदुःख ॥ ११० ॥
2
2.14
null
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः। आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥
2
null
111
एथ नेणावया हेंचि कारण, जें इंद्रियांआधीनपण। तिहीं आकळिजे अंतःकरण, म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
2
null
112
इंद्रियें विषय सेविती, तेथ हर्ष शोकु उपजती। ते अंतर आप्लविती, संगें येणें ॥ ११२ ॥
2
null
113
जयां विषायांचां ठायीं, एकनिष्ठता कहीं नाहीं। तेथ दुःख आणि कांहीं, सुखहि दिसे ॥ ११३ ॥
2
null
114
देखें हे शब्दाची व्याप्ति, निंदा आणि स्तुति। तेथ द्वेषाद्वेष उपजति, श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
2
null
115
मृदु आणि कठीण, जे स्पर्शाचे दोन्ही गुण। जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥ ११५ ॥
2
null
116
भ्यासुर आणि सुरेख, हें रुपाचें स्वरूप देख। जें उपजवी सुखदुःख, नेत्राद्वारें ॥ ११६ ॥
2
null
117
सुगंधु आणि दुर्गंधु, हा परिमळाचा भेदु। जो घ्राणसंगे विषादु -, तोषु देता ॥ ११७ ॥
2
null
118
तैसाचि द्विविध रसु, उपजवी प्रीतित्रासु। म्हणूनि हा अपभ्रंशु, विषयसंगु ॥ ११८ ॥
2
null
119
देखें इंद्रियां आधीन होईजे।तें शीतोष्णांते पाविजे। आणि सुखदुःखी आकळिजे, आपणपें ॥ ११९ ॥
2
null
120
या विषयावांचूनि कांही, आणीक सर्वथा रम्य नाहीं। ऐसा स्वभावोचि पाहीं, इंद्रियांचा ॥ १२० ॥
2
null
121
हे विषय तरी कैसे, रोहिणीचें जळ जैसें। कां स्वप्नींचा आभासे, भद्रजाति ॥ १२१ ॥
2
null
122
देखें अनित्य तियापरी, म्हणऊनि तूं अव्हेरीं। हा सर्वथा संगु न धरीं, धनुर्धरा ॥ १२२ ॥
2
2.15
null
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषषर्भ। समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥
2
null
123
हे विषय जयाते नाकळिती, तयाते सुखदुःखें दोन्ही न पवती। आणि गर्भवासुसंगती, नाहीं तया ॥ १२३ ॥
2
null
124
तो नित्यरूपु पार्था, वोळखावा सर्वथा। जो या इंद्रियार्था, नागवेचि ॥ १२४ ॥
2
2.16
null
नासंतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः। उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥ १६ ॥
2
null
125
आतां अर्जुना आणिक कांही एक, सांगेन मी आइक। जें विचारें परलोक, वोळखिती ॥ १२५ ॥
2
null
126
या उपाधिमाजि गुप्त, चैतन्य असे सर्वगत। तें तत्वज्ञ संत, स्वीकारिती ॥ १२६ ॥
2
null
127
सलिलीं पय जैसें, एक होऊन मीनलें असे। परीं निवडूनि राजहंसें, वेगळें कीजे ॥ १२७ ॥
2
null
128
कीं अग्निमुखें किडाळ, तोडोनियां चोखाळ। निवडिती केवळ, बुद्धिमंत ॥ १२८ ॥
2
null
129
ना तरी जाणिवेच्या आयणी, करितां दधिकडसणी। मग नवनीत निर्वाणीं, दिसे जैसें ॥ १२९ ॥
2
null
130
कीं भूस बीज एकवट, उपणितां राहे घनवट। तेथ उडे तें फलकट, जाणों आले ॥ १३० ॥
2
null
131
तैसें विचारितां निरसलें, तें प्रपंचु सहजें सांडवलें। मग तत्वता तत्व उरलें, ज्ञानियांसी ॥ १३१ ॥
2
null
132
म्हणोनि अनित्याचां ठायीं, तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं। निष्कर्ष दोहींही, देखिला असे ॥ १३२ ॥
2
2.17
null
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमैदं तत्। विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति ॥ १७ ॥
2
null
133
देखें सारासार विचारितां, भ्रांति जे पाहीं असारता। तरी सार तें स्वभावता, नित्य जाणें ॥ १३३ ॥
2
null
134
हा लोकत्रयाकारु, तो जयाचा विस्तारु। तेथ नाम वर्ण आकारु, चिन्ह नाही ॥ १३४ ॥
2
null
135
जो सर्वदा सर्वगतु, जन्मक्षयातीतु। तया केलियाहि घातु, कदाचि नोहे ॥ १३५ ॥
2
2.18
null
अन्तवंतः इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः। अनाशिनोऽप्रमेयस्य तस्याद् युध्यस्व भारत ॥ १८ ॥
2
null
136
आणि शरीरजात हे आघवें, हें नाशवंत स्वभावें। म्हणोनि तुवा झुंजावें, पंडुकुमरा ॥ १३६ ॥
2
2.19
null
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्। उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥
2
null
137
तूं धरूनि देहाभिमानातें, दिठी सूनि या शरीरातें। मी मारिता हे मरते, म्हणत आहासी ॥ १३७ ॥
2
null
138
तरी अर्जुना तूं हें नेणसी, जरी तत्वता विचारिसी। तरी वधिता तूं नव्हेसी, हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥
2
2.20
null
न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता न भूयः। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥
2
2.21
null
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजव्ययम्। कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥
2
null
139
जैसें स्वप्नामाजिं देखिजे, तें स्वप्नींचि साच आपजे। मग चेऊनियां पाहिजे, तंव कांही नाहीं ॥ १३९ ॥
2
null
140
तैसी हे जाण माया, तूं भ्रमत आहासी वायां। शस्त्रें हाणितलिया छाया, जैसी आंगी न रुपे ॥ १४० ॥
2
null
141
कां पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला। परी भानु नाहीं नासला, तयासवें ॥ १४१ ॥
2
null
142
ना तरी मठीं आकाश जैसें, मठाकृती अवतरले असे। तो भंगलिया आपैसे, स्वरूपचि ॥ १४२ ॥
2
null
143
तैसें शरीराचां लोपीं, सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं। म्हणऊनि तूं हें नारोपीं, भ्रांति बापा ॥ १४३॥
2
2.22
null
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही ॥ २२॥
2
null
144
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे। तैसे देहांतराते स्वीकारिजे, चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
2
2.23
null
नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥
2
2.24
null
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च। नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥
2
null
145
हा अनादि नित्यसिद्धु, निरुपाधि विशुद्धु। म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु, न घडे यया ॥ १४५ ॥
2
2.25
null
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते। तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५ ॥
2
null
146
हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे। एथ महाशोषु न प्रभवे, मारुताचा ॥ १४६ ॥
2
null
147
अर्जुना हा नित्यु, अचळु हा शाश्वतु। सर्वत्र सदोदितु, परिपूर्णु हा ॥ १४७ ॥
2
null
148
हा तर्काचिये दिठी, गोचर नोहे किरिटी। ध्यान याचिये भेटी, उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
2
null
149
हा सदा दुर्लभु मना, आपु नोहे साधना। निःसीमु हा अर्जुना, पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥
2
null
150
हा गुणत्रयरहितु, व्यक्तीसी अतीतु। अनादि अविकृतु, सर्वरूप ॥ १५० ॥