text
stringlengths
0
6.48k
मात्र त्यांनी त्यांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
अखेर ताजणे यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गणेश, धर्मेश व हिंमतलाल या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
रियाध : संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायल यांच्यात शांतता करार झाल्यानंतर पश्चिम आशियातील आणखी काही देशही शांतता करार करू शकतात अशी चर्चा रंगली होती.
आता, संयुक्त अरब अमिरातीनंतर सौदी अरेबियानेदेखील इस्रायलसोबत मैत्री करण्याची तयारी दर्शवली आहे.
मात्र, सौदी अरेबियाकडून इस्रायलसोबत मैत्री करार करण्यापूर्वी अट ठेवण्यात आली आहे.
मात्र, त्याच वेळेस सौदी आणि इस्रायलमध्ये पडद्यामागे हातमिळवणी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये सुरू असलेल्या वादात अरब देशांनी आतापर्यंत पॅलेस्टिनच्या पाठिंब्यासाठी इस्रायलसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले नव्हते.
आता मात्र, बदललेल्या परिस्थितीनंतर संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलसोबत हातमिळवणी केली आहे.
त्यानंतर सौदी अरेबियादेखील इस्रायलसोबत मैत्री करू शकतो अशी चर्चा होती.
'एएफपी' या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाने इस्रायलसोबत मैत्री करण्याची तयारी दर्शवली आहे.
मात्र, पॅलेस्टाइनसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त शांतता करारावर इस्रायलने स्वाक्षरी करण्याची अट सौदी अरेबियाने ठेवली आहे.
जोपर्यंत इस्रायल पॅलेस्टाइनसोबत शांतता करारावर स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी राजनयिक संबंध प्रस्थापित करता येणे अशक्य असल्याचे सौदी अरेबियाने म्हटले.
वाचा: इस्रायल-युएई मैत्रीपर्व; भारताला होणार 'असा' फायदा!
मागील काही वर्षात सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक चांगले होत आहेत.
सौदी अरेबिया आणि इस्रायल हे दोन्ही देश इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमांच्या विरोधात आहेत.
त्याशिवाय, हे दोन्ही देश येमेन, सीरिया, इराक आणि लेबनॉनमध्ये इराणच्या महत्त्वकांक्षेबाबत अधिक चिंतेत आहेत.
सध्या सौदी अरेबिया, इस्रायल गुप्त माहितीची देवाण-घेवाण, तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेच्या मुद्यावर एकत्र काम करत आहेत.
तर, दुसरीकडे इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादचे अधिकारी अनेक सौदी अधिकाऱ्यांना आणि सौदी नेत्यांची भेट घेतल्याशी चर्चा सुरू आहे.
वाचा: इराणवर निर्बंध: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेला झटकाइस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मैत्री करार झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये फोन सेवादेखील सुरू झाली आहे.
इस्रायलचे राष्ट्रपती रेवेन रिवलिन यांनी युएईचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांना आपल्या देशात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
तर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीदेखील युएईच्या एका वृत्तवाहिनीच्या लाइव्ह कार्यक्रमात सहभाग घेतला.
त्याशिवाय दोन्ही देश करोना लशीवर एकत्र काम करत आहेत.
वाचा: पाकिस्तान 'गॅस'वर; सौदी अरेबियाने पाक लष्कर प्रमुखांना भेट नाकारली!
युएई, सौदी अरेबिया, बहरीन आणि येमेन आदी शेजारील देश इराणमुळे चिंतेत आहेत.
या देशांना इराणच्या वाढत्या ताकदीची भीती वाटत आहे.
त्यामुळेच इस्रायलसोबत मैत्री करून हे देश इराणची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर, इराणदेखील चीन व तुर्कीसोबत मैत्री करून आपली ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
इराण लवकरच चीनच्या मदतीने आपला स्वत:चा अणूबॉम्ब विकसित करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनामुळे नागरिक अकारण भयभीत झाले असल्याचे नमूद करून डॉक्टरांनी जनसामान्यांचे करोनाविषयक गैरसमज दूर करून त्यांना आत्मविश्वास द्यावा, असे आवाहन राज्यपालांनी डॉक्टरांना केली.
महाराष्ट्र आरोग्यदीप या आरोग्यविषयक वार्षिकाच्या करोना विशेषांकाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात शनिवारी प्रकाशन झाले.
त्यावेळी उपस्थित डॉक्टरना त्यांनी हे आवाहन केले.
माजी आरोग्यमंत्री डॉ.
दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेषांकामध्ये नामवंत डॉक्टर्स व तज्ज्ञांच्या करोना व्यवस्थापनाविषयक लेखांचा समावेश असल्यामुळे हा अंक ज्ञानवर्धक व वाचनीय झाला आहे, असे कौतुकोद्गार राज्यपालांनी काढले.
योग्य खबरदारी व आत्मविश्वास यांच्या मदतीने आपण करोनाला निश्चितपणे पराभूत करू शकतो असे ते म्हणाले.
करोनाचे मधुमेह व थायरॉईडवर होणारे परिणाम, होमिओपथीच्या माध्यमातून कोविडशी लढा, अतिदक्षता विभागातील कोविड रुग्णांचे व्यवस्थापन, कोविड आणि नेत्र आरोग्य, कोविडमध्ये आरोग्य दक्षता, मानसिक आरोग्य आणि कोविड यांसह अनेक लेखांचा या विशेषांकात समावेश आहे.
दीपक पाटकर, डॉ.
दीपक नामजोशी, डॉ.
पिनाक दंदे, डॉ.
स्वप्नेश सावंत, डॉ.
परेश नवलकर, डॉ.
जॉय चक्रवर्ती, डॉ.
राजेश राव, मुद्रक आनंद लिमये आदी यावेळी उपस्थित होते.
प्रतिनिधी, ठाणेठाणे महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विसर्जन घाटावर जाण्यासाठी पूर्वनोंदणीची व्यवस्था सुरू करण्यात आली असून २४ तासांमध्ये बाराशेहून अधिक ठाणेकरांनी त्यावर नोंदणी केली आहे.
शहरातील कृत्रिम तलाव आणि मूर्तिदान केंद्रांवर जाण्याच्या वेळा नोंदवण्याची व्यवस्था या वेबसाइटवर करण्यात आली आहे.
१४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही वेबसाइट सुरू झाली.
अवघ्या २४ तासांमध्ये त्यावर बाराशेहून अधिक ठाणेकरांनी नोंद केल्याने या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेने विसर्जन घाटांवर सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करण्यासाठी भाविकांना विसर्जनघाटांवर येण्याच्या वेळेची पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
महापालिका आयुक्त बिपीन शर्मा यांनी तसे आवाहन करून १४ ऑगस्टपासून ही सेवा सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले होते.
सायंकाळी या सेवेची सुरुवात झाल्यानंतर भाविकांनी त्यावर नोंदणी सुरू केली.
सुमारे २० हजार ५५५ वेळांचा पहिला स्लॉट वेबसाइटवर उपलब्ध झाला आहे.
त्यापैकी १२०० हून अधिक स्लॉट बुक झाले आहे.
दररोज यामध्ये काही नव्या स्लॉटची वाढ होणार आहे.
कृत्रिम तलावाची बराच वेळ आधीच नोंदणी झाल्याने काही ठिकाणी नोंदणी घेण्यास नकार सुरू झाला होता.
त्यामुळे काहींची निराशा झाली असून त्यांनी या वेबसाइटबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
परंतु अनेकांना या वेबसाइटवर चांगला अनुभव आला.
ही सेवा चांगली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या वेबसाइटला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी होत आहे.
सध्याच्या करोना स्थितीमुळे सगळ्यांना आप्तेष्टांना भेटणे, घरच्या बाप्पाचे दर्शन घेणे शक्य होईलच असे नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो.
प्रत्यक्ष नाही, तरी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या समाज माध्यमातून आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना, ओखळीच्या अनेकांना आपण गणपती बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ शुभेच्छा देऊ शकतो.
आपणास ठाऊक आहे का, आपली मराठी शास्त्रशुद्ध भाषा गणपतीनेच आपल्याला दिली आहे.
आपल्या बाराखडीत गणपतीने आपले नाव दडवून ठेवले आहे.
याचे कारण संपूर्ण बाराखडीमध्ये केवळ ‘ग’, ‘ण’, ‘श’ या अक्षरांना आपल्याला वेगळा काना लावावा लागतो, असे जाणकारांचे मत आहे आणि ते पटण्यासारखे आहे.
अशा गणपतीची देणगी आणि अमृतासमान असलेल्या मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश देऊन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करू शकतो.
गणेशोत्सव : श्रीगणेश चतुर्थी कधी आहे?
जाणून घ्या महत्त्व आणि मान्यतासजली अवघी धरती,पाहण्यास तुमची कीर्ती.
.तुम्ही येणार म्हटल्यावर,नसानसात भरली स्फ़ुर्ती.
.आतुरता फक्त आगमनाची,कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…|| गणपती बाप्पा मोरया |||| मंगल मूर्ती मोरया ||सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
..!!!श्रीगणेश तत्त्व व स्वरुपाचा नेमका भावार्थ काय?
वाचा, मूळ संकल्पनाहे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्याकोरोनासारख्या भयानक रोगापासूनसंपूर्ण देशाला मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
..गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
..!!!यंदा 'अशी' स्थापन करा गणेशमूर्ती; मिळवा सुख, शांतता आणि समृद्धीमोदकांचा प्रसाद केलालाल फुलांचा हार सजवलामखर नटून तयार झालेवाजत गाजत बाप्पा आलेगुलाल फुले अक्षता उधळेबाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
..!!!गणेशोत्सव : ५ हजार वर्षांपासून केले जाते पार्थिव गणपती पूजन?
वाचा तथ्यतुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीचबाप्पाच्या चरणी प्रार्थना.
..गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया.
..!!!गणपतीने वाहन म्हणून मूषकाची निवड का केली?
वाचा, कारणतुमच्या आयुष्यातील आनंद,गणेशाच्या उदराइतका विशाल असो,अडचणी उंदराइतक्या लहान होवो,आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो,प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो,हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना.
.. सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
..!!!दुर्वांशिवाय गणेश पूजन अपूर्ण; वाचा, महत्त्व, मान्यता आणि कथाबाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले,दुःख आणि संकट दूर पळाले,तुझ्या भेटीची आस लागते,तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते,गणेश चतुर्थीला भेट घडते…सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
..!!!'या' गणेश चतुर्थीला जुळून येताहेत धन, समृद्धीकारक अद्भूत शुभ योगगणराया तुझ्या येण्यानेसुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,सर्व संकटाचे निवारण झालेतुझ्या आशिर्वादाने यश लाभले,असाच आशीर्वाद राहू दे…गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
..!!!गणेश चतुर्थी : पूजनानंतर म्हणा गणपतीच्या 'या' विविध आरत्याफुलांची सुरुवात कळीपासून होते,जीवनाची सुरुवात प्रेमापासून होतेप्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,आणि आपली कामाची सुरुवातश्री गणेशा पासून होते.
..|| गणपती बाप्पा मोरया |||| मंगल मूर्ती मोरया ||सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
..!!!गणेशाचे मूळ शीर ठेवलेल्या 'या' गुहेचे रहस्य माहित्येय का?
जाणून घ्यामाझे गणराय.
..येतील गणराज मुषकी बैसोनी,स्वागत करुया तयांचे हसोनी,आनंदे भरेल घर आणि सदन,घरात येता प्रसन्न गजवदन,देतील आशिर्वादा सेवून ते मोदका,कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका,जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती,करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती,भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती,सर्वांना सद्बुद्धी...
..सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
..!!!मुंबईचा सिद्धिविनायक, मंदार वृक्ष आणि स्वामी समर्थांची लीलाश्रींच्या चरणी कर माझे जुळले,तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,अशीच कृपा सतत राहू दे…सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
..!!!
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष डॉ.
के सिवन यांनी 'इस्रोचं खासगीकरण होणार नाही, ही गोष्ट सगळ्यांच्याच डोक्यात खूप स्पष्ट आहे' असं म्हणत देशाला आश्वासन दिलंय.
सरकार इस्रोचं खासगीकरण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत परंतु हा केवळ भ्रम असून असं कधीही होणार नाही, असं के सिवन यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, लवकरच 'स्पेस अ‍ॅक्टिव्हिटी बिल' संसदेत मांडलं जाईल, असंही के सिवन यांनी म्हटलंय.
याद्वारे खासगी क्षेत्राला इस्रोसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
इस्रोकडून आयोजित करण्यात आलेल्या 'अनलॉकिंग इंडियाज पोटेन्शिअल इन स्पेस सेक्टर' (Unlocking India's Potential in Space Sector) या वेबिनार ते बोलत होते.
संबंधित बातम्या :वाचा :अंतराळ मोहिमांत खासगी क्षेत्राला परवानगी, इस्रोची घोषणावाचा :आत्मनिर्भर होण्यासाठी नेमकं काय करायला हवं?
इस्रो खासगी कंपन्यांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करणार आहे, त्यामुळे तंत्रज्ञान विकास आणि क्षमता विस्तार होऊ शकेल, असंही के सिवन यांनी म्हटलंय.
नव्या अंतराळ नीतीसहीत खासगी कंपन्या 'इस्रो'सोबत अंतराळ मोहिमांत भाग घेईल.
परंतु मुख्य काम इस्रो आणि त्याचे वैज्ञानिकच करतील.
अंतराळ क्षेत्रात बदलांकरता आणण्यात आलेली नव्या नीती इस्रो आणि देशासाठीही 'गेम चेंजर' ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.