text
stringlengths
0
6.48k
वारंवार लॉकडाऊन वाढवला तर आर्थिक संकट वाढेल.
करोनापेक्षाही हे मोठं संकट असेल.
बेरोजगारी वाढेल आणि लोक आत्महत्या करू लागतील, अशी भीती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
देशातील जनतेला आता करोनाबरोबरच जगावं लागणार असून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन केलंच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
करोनाचं संकट जागतिक संकट आहे.
या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने लॉकडाऊन सुरू केला.
परिस्थितीनुसार लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
हा निर्णय योग्य की अयोग्य हा वाद निरर्थक आहे, असं सांगतानाच आता शंभर टक्के लॉकडाऊन करणं योग्य नाही.
त्यातून आर्थिक संकट वाढलं तर ते करोनापेक्षाही मोठं असेल.
त्यामुळे त्यातून लोक बेरोजगार होतील आणि आत्महत्या वाढतील.
त्यातून वेगळीच समस्या निर्माण होईल.
त्यामुळे लॉकडाऊन वाढवणं हा आता पर्याय होऊ शकत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे.
अर्थात सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
देशाच्या हिताच्या दृष्टीनेच सरकार निर्णय घेत असते, असं नितीन गडकरी म्हणाले.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.
करोनाची लस येईपर्यंत आपल्याला जीवही जपावा लागणार आहे आणि संकटातूनही बाहेर पडावे लागणार आहे.
अमूक गोष्ट केल्याने करोना जाईल असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही.
तसं सांगणारा एकही नेता किंवा माणूस नाही.
त्यामुळे आहे त्या परिस्थितीत खबरदारी घेऊनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे.
राजकारण न करता संकटातून मार्गक्रमण करावं लागणार आहे, असं सांगतानाच लॉकडाऊन वाढवणं योग्य नसलं तरी रस्त्यावर, बाजारात किंवा कुठेही गर्दी करणं योग्य नाही.
केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे.
तोंडाला मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि सॅनिटाझेशन करणं या गोष्टी पाळाव्याच लागणार असल्याचं गडकरी म्हणाले.
तसेच गरीबाांना मदत करणार नाही असं कोणत्याही सरकारनं कधी म्हटलेलं नाही.
कोणतंही सरकार असं म्हणून शकत नाही.
पण मदतीला मर्यादा असतात.
मदतीवर कोणीही दीर्घकाळ जगू शकत नाही.
करोनाच्या सूचना पाळूनच त्यातून मार्गक्रमण करावं लागणार असल्याचंही ते म्हणाले.
गणेशोत्सव: मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या तीन किलोमीटर रांगा; चाकरमानी अडकले!
राफेल खरेदीत घोटाळा नाहीयावेळी त्यांनी राफेल खरेदीत घोटाळा झाला नसल्याचं सांगितलं.
राफेल विमाने चांगली असून देशाचं संरक्षण करण्यास सक्षम असल्याचं ते म्हणाले.
राफेल खरेदी आणि करोनावर बोलण्यासाठी पक्षाध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते आहेत.
त्यावर मला अधिक बोलायचं नाही.
मला या भानगडीत पडायचे नाही.
कोणत्याही वादात जायचे नाही.
मला सकारात्मक काम करायचे आहे आणि ते मी करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत जुलैमध्ये सर्वाधिक रुग्णांची करोनावर मातओवेसी नमाज पठण करत नाहीत काय?
करोनाचं संकट पाहता अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याला मोजक्याच लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
या सोहळ्याला मोजकेच मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं ते म्हणाले.
संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तिने एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणं संविधानविरोधी आहे, असं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं.
ओवेसी दररोज नमाज पठण करत नाहीत का?
तेही खासदार आहेत.
खासदारकी हे संविधानिकपद आहे, हे त्यांना माहीत नाही का?
असा सवाल करतानाच प्रत्येक व्यक्तिला आपआपल्या प्रार्थनास्थळात जाण्याचा अधिकार आहे.
संविधानाने कुणालाही मनाई केलेली नाही.
तसेच अमूक पदावरील व्यक्तीला देवदर्शनास मनाई असेल असं संविधानात नमूद करण्यात आलेलं नाही, त्यामुळे ओवेसी सारख्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नका, असा चिमटाही त्यांनी काढला.
CM उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियाच्या दबावात, सुशीलकुमार मोदींचा आरोप
वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला आहे.
करोनाच्या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करण्याचे आवाहन करण्यात येते.
मात्र, हॅण्ड सॅनिटायझर पोटात गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.
हॅण्ड सॅनिटायझर प्राशन केल्यामुळे १५ जणांना त्रास झाला.
त्यातील चौघे मृ्त्यूमुखी पडले असून तिघांना अंधत्व आले आहे.
हॅण्ड सॅनिटायझरमधील मिथेनॉल घटकामुळे ही जीवितहानी झाली असल्याचे म्हटले आहे.
अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझरच्या वापरामुळे करोनाच्या विषाणूला दूर ठेवता येत असल्याचे म्हटले जाते.
मान्यताप्राप्त हॅण्ड सॅनिटायझरमध्ये विषाणूंचा खात्मा करण्यासाठी मुख्यत: इथाइल अल्कोहोल असतो.
हे अल्कोहोल पोटात गेल्यास शरिराचे मोठे नुकसान होत नसल्याचे म्हटले जाते.
मात्र, काही कंपन्यांकडून इथाइल अल्कोहोलऐवजी विषारी मेथेनॉलचा वापर करत आहेत.
त्यामुळे मानवाच्या शरीराला अपाय होत असल्याचेही समोर आले आहे.
वाचा: मस्तच!
भारतात ऑक्सफोर्डची लस 'इतक्या' रुपयांना मिळणारआरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिथेनॉल किंवा इथेनॉल पोटात गेल्यास डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे आदी त्रास जाणवू शकतात.
मिथेनॉल विषबाधामुळे पचनक्रिया बिघडणे, पोटात विष निर्माण होणे, अंधत्व आणि मृत्यू देखील होण्याची दाट शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा: 'या' दिवशी जगातील पहिल्या करोना लशीची होणार नोंदणी!
वाचा: करोनामुक्त झालेल्या ९० टक्के बाधितांच्या फुफ्फुसावर परिणामअमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने जूनमध्ये मेक्सिकोमध्ये उत्पादित करण्यात येत असलेल्या हॅण्ड सॅनिटायझर जेलबाबत इशारा दिला होता.
या हॅण्ड सॅनिटायझरमध्ये मोठ्या प्रमाणावर मेथेनॉल असल्याचेही म्हटले होते.
मागील काही दिवसांपासून एफडीएकडून अशा उत्पादनांची यादी काढण्यात येत होती.
एफडीएने मिथेनॉल असलेल्या अनेक हॅण्ड सॅनिटायझर उत्पादनांची ओळख पटवलेली आहे.
एफडीएच्या सूचनेनंतर आता विक्रेत्यांनी आणि वितरकांनी हॅण्ड सॅनिटायझर बाजारातून मागे घेतले आहे.
दरम्यान, करोनाच्या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांना इतर आजार होण्याचा धोका संभावत असल्याचा इशारा याधीच देण्यात आला होता.
त्यातच आता चीनमध्ये करोना संसर्गावर मात केलेल्या ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम झाला असल्याचे समोर आले आहे.
चीनमध्ये करोना संसर्गाचे मुख्य केंद्र राहिलेल्या वुहान शहरातील एका रुग्णालयातील रुग्णांचा अभ्यास करण्यात आला.
वुहान विद्यापीठाच्या झोंगनन रुग्णालयाचे संचालक पेंग झियोंग यांच्या नेतृत्वात एक पथक एप्रिल महिन्यापासूनच करोनावर मात केलेल्या १०० रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहे.
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ईडीने रिया चक्रवर्तीशी केलेल्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत.
रियाने सुशांतला केले फक्त १४७ कॉल, उरलेल्या ८०८ कॉलचं जाणून घ्या सत्ययाशिवाय सुशांतच्या कंपन्यांच्या पैशांच्या बँक खात्यांमध्येही ईडीला हेराफेरी केल्याचं दिसलं.
याबाबतीत रियाला प्रश्न विचारले असता तिने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं दिली नाहीत.
सुशांतच्या वडिलांनी रियावर केले होते हेराफेरीचे आरोपयाआधी सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करताना मुलाच्या पैशांवर रियाचा डोळा असल्याचा आरोप केला होता.
सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये होते.
मात्र वर्षभरात त्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
ज्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले त्यांचा आणि सुशांतचा काहीही व्यवहारीक संबंध नव्हता.
'आम्ही एकुलती एक मुलगी गमावली, आता सोशल मीडिया आम्हाला मारून टाकेल'दरम्यान, सुशांतसिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होत आहे.
वृत्तसेवा, नवी मुंबई इराक देशातून स्वस्तात कांदा आयात करून देण्याचे आमिष दाखवून तिघा दलालांनी एपीएमसीतील दोघा व्यापाऱ्यांकडून तब्बल २२ लाख ८० हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
धर्मेश जोशी, गणेश विश्वासराव व हिंमतलाल भानुशाली अशी या दलालांची नावे असून एपीएमसी पोलिसांनी या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला.
या घटनेतील तक्रारदार व्यापारी कमलेश ताजणे (३३) हे एपीएमसीतील फळ बाजारात भागीदारीत फळ व भाजीचा व्यापार करतात.
त्यांची फसवणूक करणारे आरोपी गणेश विश्वासराव व धर्मेश जोशी व हिंमतलाल हे निर्यातदार व्यापाऱ्यांना माल पॅकिंग करून देण्याचे काम करतात.
त्यामुळे ते नेहमी फळ बाजारात येत असल्याने त्यांची कमलेश ताजणे यांच्यासोबत ओळख झाली.
नोव्हेंबर २०१९मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा तुटवडा झाल्यामुळे एपीएमसी बाजारात कांद्याच्या मालाला खूप भाव होता.
हा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने इराक देशातून कांद्याचा माल आयात करण्याची परवानगी दिल्याचे समजल्याने कमलेश ताजणे यांनी इराक देशातून कांदा आयात करण्याचा विचार सुरू केला.
त्यावेळी आरोपी गणेश विश्वासराव व धर्मेश जोशी या दोघांनी कमलेश ताजणे यांना १५ दिवसांत इराक देशातून ४० रुपये किलोने कांदा आयात करून देण्याचे आश्वासन दिले.
कमलेश ताजणे व त्यांचे भागीदार अविनाश शिंदे यांनी आरोपींच्या दिया इम्पेक्स कंपनीच्या माध्यमातून कांदा आयात करण्याचे निश्चित केल्यानंतर गणेश व धर्मेश या दोघांनी दिया इम्पेक्सचे हिंमतलाल भानुशाली याची भेट करून दिल्यानंतर त्याने ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर व्यवहारासंबंधी करार करून घेतला.
त्यानंतर ताजणे यांनी ठरल्याप्रमाणे डिसेंबर २०१९मध्ये दिया इम्पेक्सच्या बँक खात्यावर २२ लाख ८० हजार रुपये वळते केले.
त्यानंतर २५ डिसेंबर रोजी कांद्याचा माल ताब्यात देण्याचे आश्वासन आरोपींकडून ताजणे यांना देण्यात आले होते.
मात्र २५ डिसेंबरला त्यांनी मालाची डिलिव्हरी केली नाही.
त्यामुळे ताजणे यांनी गणेश आणि धर्मेश यांना संपर्क साधला असता, त्यांनी इराकमधून निघणाऱ्या जहाजाला यायला उशीर झाल्याचे व जहाज २ जानेवारी रोजी आल्यानंतर त्यांना माल देणार असल्याचे सांगितले.
ताजणे यांचा विश्वास बसावा, यासाठी गणेशने त्यांच्या मोबाइलवर बी.
चा फोटो पाठवून दिला.
ताजणे यांना बी.
बाबत संशय आल्याने त्यांनी जेएनपीटी येथे जाऊन त्याबाबत चौकशी केली असता, बी.
खोटे असल्याची त्यांना माहिती मिळाली.
ताजणे व शिंदे या दोघांनी भामट्या गणेश व धर्मेशला संपर्क साधून आपली रक्कम परत करण्यास सांगितल्यानंतर भामट्या गणेशने दिया इम्पेक्सचा २२ लाख ८० हजारांचा चेक ताजणे यांना दिला.
मात्र चेक बँकेत वटला नाही.
त्यानंतर ताजणे यांनी आरोपी गणेश, धर्मेश व हिंमतलाल या तिघांना अनेक वेळा संपर्क साधला.