text
stringlengths
0
6.48k
नव्या नीतीमुळे भारत अंतराळ क्षेत्रात आपली नवी ओळख तयार करेल.
सध्या इस्रो संशोधन आणि विकासाद्वारे रॉकेट आणि सॅटेलाईट बनवण्यात सक्षम आहे.
सरकारनं अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं करण्याच्या केलेल्या घोषनेनंतर खासगी कंपन्याही ही साधनं बनवण्यात मदत करेल.
त्यामुळे जास्तीत जास्त सॅटेलाईट अवकाशात सोडता येतील, असंही के सिवन यांनी म्हटलं.
खासगी कंपन्यांची भूमिका स्पष्ट करताना के सिवन म्हणाले, 'अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे.
देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठ्या संख्येत संचार उपग्रहांची गरज असेल.
यासाठी खासगी कंपन्या पुढे येऊन इस्रोसोबत काम करू शकतील.
पण, याचा अर्थ इस्रोचं खासगीकरण होणार असं नाही' इतर बातम्या :वाचा :Corona Vaccine : देशात करोना लशीसाठी असा ठरणार प्राधान्यक्रम?
वाचा :‘पीएम केअर’ला छाननीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पी चिदंबरम यांचा आरोपवाचा :करोनाकाळात शिक्षण 'ऑनलाईन', पण २७ टक्के विद्यार्थी स्मार्टफोनविना'इस्रो' प्रमुख रडले, मोदींनी दिला धीर
विशेष प्रतिनिधी, मुंबई'आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे.
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढा असणाऱ्या ऑगस्ट क्रांतीलढ्याला रविवारी, ७८ वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने महसूलमंत्री थोरात यांनी सकाळी ऑगस्ट क्रांती मैदानातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
'१९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून इंग्रजांविरोधात 'भारत छोडो'चा नारा दिला होता.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जात, धर्म, प्रांत विसरून देशातील लाखो लोक या लढ्यात सहभागी झाले व देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी या देशात लोकशाही रूजवली.
ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४२च्या लढ्याला विरोध केला.
त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून या देशातील लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे.
सत्ता आणि पैशाचा वापर करून विविध राज्यांतील विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत, असे थोरात म्हणाले.
प्रतिनिधी, नागपूरएकाच दिवशी झालेले उच्चांकी मृत्यू आणि नव्या बाधितांच्या उच्चांकी संख्येनंतर आता करोनामुक्त होणाऱ्यांनीही सोमवारी नव्या उच्चांकाची नोंद केली.
त्यामुळे विषाणू लागण झाल्याने आतापर्यंत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही १२,०३२ वर गेली आहे.
या घडामोडीत आज दिवसभरात ३० करोनाबाधितांचा मृत्यू, तर नव्या ७१५ बाधितांची नोंद घेण्यात आली.
नव्याने करोनाची बाधा झालेल्या ७१५ जणांपैकी ५८५ हे शहरातील, तर १२७ जण ग्रामीण भागातील आहेत.
आज दिवसभरात दगावलेल्या ३० जणांपैकी २१ शहरातील, ३ जिल्ह्याबाहेरचे, तर ६ जण ग्रामीण भागातील रहिवासी होते.
त्यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातून करोनामुळे मृत झालेल्यांची संख्याही १११ पर्यंत गेल्याने विषाणू प्रादुर्भावाची समूह साखळी आता ग्रामीणमध्येही पोहोचल्याचे सिद्ध होत आहे.
करोनाची बाधा झाल्याचे निदान झालेल्यांपैकी अँटिजन चाचणीत ३६३, खासगीतून १३४, मेयोतून ९४, मेडिकलमधून ९३ आणि नीरीतून ३१ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
करोनाची लागण झाल्यानंतर उपचारांदरम्यान दगावलेल्यांमध्ये सदर परिसरातल्या छावणी येथील ५०, जयभीम चौक हिवरी नगर येथील ६६, जुनी मंगळवारीतील ६४, कामठीतील ५५, महाकालीनगर मानेवाडातील ६८ वर्षीय पुरुष आणि यासिन प्लॉट मोठा ताजबाग येथील ५५, खरबीतील ५३, मौदा येथील ५४ वर्षीय महिलांचा समावेश आहे.
दिवसभरात जवळजवळ ३ हजार नमुने निगेटिव्हजिल्ह्यातून आज दिवसभरात ३ हजार ६६० संशयितांच्या घशातील स्त्रावनमुना तपासला गेला.
त्यापैकी २ हजार ८६७ नमुने शहरातील, तर १ हजार २०६ नमुने ग्रामीण परिसरातील होते.
शहरातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या या नमुन्यांपैकी आज २ हजार ९४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.
दोन टक्क्यांनी वाढला करोनामुक्तीचा दर आज दिवसभरात करोनामुक्त झालेल्या ९७९ जणांमुळे करोनामुक्तीचा दर दोन टक्क्यांनी वाढून ५६.
आजार मुक्त झालेल्या १२ हजार ३२ जणांपैकी ८ हजार २३४ हे शहरातील, तर ३ हजार ७९८ हे ग्रामीण भागातील आहेत.
सोमवारचे पॉझिटिव्ह- ७१५सोमवारचे निगेटिव्ह- २,९४५सक्रिय करोनाबाधित- ८,३६०ग्रामीणमधील सक्रिय बाधित- ६,०४६
मुंबई : कोटक महिंद्रा बँकेने (कोटक) एटीएमद्वारे कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा (इन्स्टंट मनी ट्रान्सफर-IMT) सुरू करण्याची घोषणा आज केली.
यामुळे कार्डचा वापर न करता कोटकच्या खातेधारकांना पैसे काढता येतील किंवा देशभरातल्या कुठल्याही लाभार्थ्याला पैसे हस्तांतरित करता येतील.
बँकेकडे नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे कोटकचे ग्राहक कोटक नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मच्या आधारे या व्यवहाराला सुरुवात करता येईल.
लाभार्थी कोटकचा खातेधारक असण्याची गरज नाही किंवा देशातल्या इतर कुठल्याही बँकेत खाते असण्याचीही गरज नाही.
लाभार्थ्याला देशभरातील कुठल्याही कोटकच्या एटीएममधून पैसे काढता येतील.
हा नियम समजून घ्या; नाही तर द्यावा लागेल ८३ टक्के टॅक्सकोटक महिंद्रा बँकेच्या प्रोडक्ट, अल्टरनेट चॅनेल्स आणि कस्टमर एक्सपीरियन्स डिलीव्हरीचे प्रेसिडेंट पुनीत कपूर म्हणाले, डिजिटल फर्स्ट बँक म्हणून ग्राहकांना मिळणारा अनुभव अधिकाधिक चांगला व्हावा ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा सोपी, सुरक्षित आणि सुलभ आहे आणि यासाठी ग्राहकांना नेहमी डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज भासत नाही.
देशात रोख रक्कम नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावते आणि ही सुविधा आमच्या ग्राहकांना व इतर लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा पुरवेल, असे कपूर यांनी सांगितले.
सराफा बाजार ; आज पुन्हा सोनं झालं स्वस्तअशा प्रकारे काढू शकता पैसे- कोटकच्या खातेधारकाला कोटक नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग ॲपवर लॉग ऑन करावे लागेल आणि लाभार्थ्याचे नाव, मोबाइल क्रमांक आणि पत्ता नोंद करावा लागेल.
लाभार्थी नोंदणीची ही प्रक्रिया एकदाच करायची आहे.
स्वतः पैसे काढायचे असतील तर यात स्वतःचे नाव आणि इतर माहितीची नोंद करता येईल.
- लाभार्थ्याची यशस्वी नोंदणी झाल्यावर नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे किती पैसे पाठवायचे आणि पाठवणाऱ्याचा कोड ठरवून IMT सुरू करता येईल.
- IMT यशस्वीरित्या तयार झाल्यावर लाभार्थी देशभरातील कोटकच्या कुठल्याही एटीएममध्ये स्क्रीनवर कार्डशिवाय पैसे काढण्याचा पर्याय (IMT) निवडून पैसे काढू शकतो.
लाभार्थी त्याचा/तिचा मोबाइल क्रमांक, पाठविणाऱ्याचे नाव, एसएमएस कोड आणि नेमकी रोख रक्कम टाकून पैसे काढू शकतो.
अबालवृद्धांचा लाडका असलेल्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव सुरू झाला आहे.
गणेशाचे नामस्मरण, आराधना, जप, उपासना करण्यासाठी चतुर्थी ही तिथी उत्तम मानली गेली आहे.
प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात चतुर्थी तिथी येते.
या दोन्ही पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीची उपासना केली जाते.
यातील शुद्ध पक्षातील तिथी विनायक चतुर्थी नावाने ओळखली जाते.
तर वद्य पक्षातील तिथी संकष्ट चतुर्थी नावाने ओळखली जाते.
गणपती उपासकांसाठी वर्षभरातील तीन तिथी सर्वाधिक महत्त्वाच्या आणि गणपती नामस्मरण, उपासना, आराधनेसाठी सर्वोत्तम मानल्या जातात.
त्यापैकी एक म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी.
गणपती बाप्पाला अजिबात पसंत नाहीत 'या' गोष्टी; नुकसान अटळगणेश चतुर्थीपासून १० दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो.
देशभरातील गणेशभक्त या दिवसात पार्थिव गणपती पूजन करतात.
प्रत्येक घरातील मान्यता आणि परंपरांनुसार दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस, दहा दिवस असे गणपती पूजन केले जाते.
गणेशाच्या आराधना उपासनेसाठी कोणतीही तिथी असो, त्या दिवशी गणपतीचे विविध श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हटल्या जातात.
यापैकी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते ते अथर्वशीर्ष.
अनेक गणेशभक्त दररोज, प्रत्येक चतुर्थीला, संकष्ट चतुर्थीला, गणेश चतुर्थीला, गणेश जयंतीला अशा अनेकविध वेळेला ते पठण करत असतात.
गणपतीला अभिषेक करताना याचेच पठण केले जाते.
वाचा तथ्यअथर्वशीर्षअथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे.
ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.
यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे.
गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे.
अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे.
थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर.
शीर्ष म्हणजे मस्तक.
ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो.
यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे.
गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे.
गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे.
व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे.
यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे.
या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे.
श्रीगणेश तत्त्व व स्वरुपाचा नेमका भावार्थ काय?
वाचा, मूळ संकल्पनाअथर्वशीर्ष म्हणताना पाळावयाचे नियम- उच्चार अगदी स्पष्ट असावे.
- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.
- जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः ।' येथेपर्यंतच म्हणावे.
त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.
- अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.
- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
दुर्वांशिवाय गणेश पूजन अपूर्ण; वाचा, महत्त्व, मान्यता आणि कथा- अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
- अथर्वशीर्ष पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.
- अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये, याची काळजी घ्यावी.
- दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
- अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्‍यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.
- अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे.
- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.
नवी दिल्लीः शाओमीकडून यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Redmi Note 9 सीरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रेडमीचे स्मार्टफोन्स अनेकांच्या पसंतीस उतरले आहे.
Redmi Note 9, Note 9 Pro आणि Note 9S च्या खूप साऱ्या युजर्संना त्रास होत आहे.
याचे कारण, म्हणजे नवीन लाइनअपच्या कॅमेऱ्यात धूळ जात आहे.
त्यामुळे याचा परिणाम कॅमेऱ्यावर होत आहे.
हार्डवेअर मध्ये कमतरता असल्याने हा परिणाम होत असल्याचे निदर्शनात आले आहे.
वाचाः जियो vs एअरटेल vs वोडाफोन: १४९ रुपयांत कोणता प्लान बेस्टवाचाः रेडमी ९ प्राईमचा आज सेल, पाहा किंमत-फीचर्सकॅमेऱ्यात कमतरता येत होत्या.