text
large_string
म्हाडा नाशिक मंडळ ४९ सदनिकांसाठी अर्ज, Homemaharashtraम्हाडा नाशिक मंडळ ४९ सदनिकांसाठी अर्ज, मुंबई, दि. १८ डिसेंबर, २०२० :- म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे निसर्गरम्य आडगांव शिवारातील श्रीराम नगर-कोणार्क नगर येथे मध्यम उत्पन्न गटातील ४९ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज विक्री व स्वीकृतीला म्हाडाच्या ना...
रियलमी कंपनीचा हा रियलमी सी३ Realme C3 स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत फक्त ६ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमधील फीचर्सवर नजर टाकल्यास या फोनमध्ये ६. ५ इंचाचा एचडी प्लस वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन टू बॉडी रेशियो ८९. ८ टक्के आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलिओ जी७० चिपसेट दिली आहे....
पिंपरी :- महाराष्ट्र राज्य पर्यावरण महामंडळाने कारवाई केल्यास थेरगाव येथील पद्मजी पेपर मिल बंद होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन व आर्थिक मंदीमध्ये तेथील १२०० कामगार बेकार होऊन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. हे कृत्य शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी करू नये, असा सल्ला माजी नगरसेवक संतोष बारणे आणि युवा नेते श्री....
Traffic Police Language, Nagpur News ट्रॅफिक पोलिसाच्या तोंडून तुम्हास सर, मॅडम किंवा श्रीमान, श्रीमती अशी हाक तुमच्या संदर्भात येत असेल तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कारण, सर्वसामान्यांशी ट्रॅफिक पोलिसांनी सभ्यतेने बोलण्याचा पुढाकार मुंबईमध्ये सुरू झाला आहे. वाहन चालक, नागरिकांशी सभ्य वागण्याचे निर्देश तेथील ट्रॅफ...
आजअखेर सांगली जिल्ह्यात ४६ हजार १२१ रूग्ण पाॅझीटीव्ह आले आहेत. यापैकी ४४ हजार ४२ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे तर १६८२ रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे. गेल्या महिन्याभरातील कोरोनाचा आलेख पाहता आगामी महिन्यात सांगली जिल्हा पुर्णतः कोरोना मुक्त होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र संभाव्य दुसर्या लाटेची शक्यता ग्...
रशियाने फेसबुकवर 'आंशिक बंदी' लावण्याची घोषणा केली आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियन सरकारला पाठिंबा देणाऱ्या अनेक खात्यांवर सोशल मीडिया कंपनीने प्रवेश मर्यादित केल्याने याचे कारण सांगितले जात आहे. Roskomnadzor या रशियन देशाच्या एजन्सीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकने राज्य वृत्तसंस्था आरआयए नोवोस्ती, राज्य टीव्ही चॅनेल झ...
रेसिडेन्सिअल हायस्कूलमधील १९९५-१९९७ बॅचचे व्हॉट्स एप ग्रुपचे प्रशांत गायकवाड हे प्रमुख आहेत. त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात रुग्णसेवेचे उत्तम कार्य करणाऱ्या बुथ हॉस्पिटलला मदत करण्याची संकल्पना मांडली. त्याला सर्वांनी मान्यता दिली. सर्वांनी आपापल्यापरीने मदत करीत ३८ हजार २२५ रुपये जमा केले. या रकमेचा धनादेश बूथ हॉस्पिटल...
सातारा -राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्ताराचा मुहूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याने शिंदे गटातील माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील दहा कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी मंगळवार, दि. 11 रोजी होत असल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु...
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या. सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता. वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता. हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती. भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं. समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला. शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा. फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा. तेव्ह जाळ काळीज ...
मुंबई । 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचं भाजपकडून दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली असल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रत्येकानं आप...
महाराष्ट्राचे राजकारण आणि पवार कुटूंब हे समिकरण चांगलेच दृढ झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता तिसरी पिढी उतरली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)अजित पवार आणि यानंतर रोहीत पवारअश्या पध्दतीने पवार कुटंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत रोहीत पवार या...
देहली महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी अभूतपूर्व गदारोळ ! लोकांनी म्हादईचे स्वप्न काँग्रेसद्वारे पहावे ! म्हादईप्रश्नी गोव्यात तीव्र असंतोष असतांनाही काँग्रेस पक्षाने कर्नाटक येथे होणार्या विधानसभेच्या निवडणूक घोषणापत्रात म्हादईचा केलेला उल्लेख ! भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाची ...
Eyes Flutter Scientific Reason : बऱ्याचदा आपला डावा किंवा उजवा डोळा फडफडतो. पूर्वापार त्या मागे काही शुभ, अशुभाचे संकेत लावले गेले आहेत. पुरुषांचा अमुक डोळा फडकला तर अशुभ असतं तर स्त्रियांचा तमुक डोळा फडकला तर अशुभ होतं असं समजलं जातं. पण खरंच डोळे का फडफडतात? कधी कधी पापणी ऐवजी फक्त भिवई फडफडते. कधी कधी शरीराच्या दुस...
RTE Admission: निवड यादीतील प्रवेशांनंतर 'आरटीई'साठी प्रतीक्षा यादीतील प्रवेशाच्या चार फेऱ्या राबविण्यात आल्या. वेळोवेळी त्याची सूचना जिप. शिक्षण विभागाला देण्यात आली होती. परंतु, सध्या या प्रक्रियेबद्दल शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही कोणतीच माहिती नाही. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी राबविली...
उन्हाळ्यात भोपळ्याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते आणि उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. बीन्समध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते खूप प्रभावी मानले जाते, उन्हाळ्यात बीन्स शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वांग्यामध्ये भरपूर फायबर असते जे पोट आणि आतड्यांसाठ...
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री असलेली नेहा धुपिया (Neha Dhupia) आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. सौंदर्याची काळजी घेतानाही तिचा विश्वास महागड्या सौंदर्य उत्पादनावर नसून आईनं सांगितलेल्या नैसर्गिक उपायांवर (natural remedy on beauty problems) आहे. स्टार आहे म्हणून त्यांची जीवनशैली आधुनिक, त...
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसून येत आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष मुंबईत आपापली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या काही ...
भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्यात अनेक ठिकाणी सरकारकडून क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे. मात्र या योजनेला आवश्यक ती गती मिळण्यासाठी राज्य सरकारने एक खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. क्लस्टर योजनेंतर्गत विविध...
जळगाव- डिझेलच्या दरवाढीचा निर्णय रद्द करावा व 2012च्या थकबाकीसह जानेवारीच्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता रोखीने देऊन कामगार करार करावा, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मान्यताप्राप्त संघटनेतर्फे येत्या 28 जानेवारी रोजी राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने केली जाणार आहेत. डिझेलच्या भावात नुकतीच दरवाढ झाली आहे. त्यात एसटीसाठी...
रक्तातून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारा हिमोग्लोबिन हा मुख्य घटक असतो. हा टेस्टद्वारा सहज मोजता येणारा घटक आहे. शरीरात हिमोग्लोबिन कमी असण्याला अॅनिमिया/ रक्तल्पता/ पंडुरोग असे म्हणतात. रक्तातून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारा हिमोग्लोबिन हा मुख्य घटक असतो. हा टेस्टद्वारा सहज मोजता येणारा घटक आहे. शरीरात हिमोग्लोबिन ...
वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होणे स्वाभाविक आहे. वयाच्या तिशीनंतर हाडे कमकुवत होऊ लागतात. वाढत्या वयानुसार हाडांच्या मजबुतीची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेकदा आपण आपल्या हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हाडे आपल्या शरीराला एक रचना देण्याचे काम करत असतात. हाडे निरोगी ठेवण्यासाठी व हाडांचे आजार टाळण्यासाठी आपण काय काळ...
नाशिक, 2 मे : नाशिक जिल्ह्यामध्ये 2 वर्षांपूर्वी एक विवाह सोहळा पार पडला होता. त्या विवाह सोहळ्याची चर्चा राज्यभरात चांगलीच रंगली होती. तो विवाह सोहळा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या संजय झाल्टे आणि मनमाडच्या शिवलक्ष्मी यांचा. त्याच कारण होत की येवल्याच्या संजय झाल्टे यांनी तृतीयपंथी शिवलक्ष्मी सोबत लग्नाची गाठ बा...
लातुर : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश करत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. अमित देशमुख आणि त्यांच्या चमू सोबत अभय साळुंके जेंव्हा पत्ररकारांना भेटले तेंव्हा नमस्कार करून सुरवात केली. शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकत साळुंके म्हणाले, मी शिवसेनेत काम क...
नागपूर : माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंहनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असून, त्यानं विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींवर निशाणा साधला आहे. शास्त्री प्रशिक्षकपदावर असताना, भारतीय संघ दोन विश्वचषक स्पर्धांमधील उपांत्य लढतीत पराभूत झाला आहे. त्यामुळं आताच प्रशिक्षणाच्या रचनेत बदल करणे गरजेचे आहे, असं रॉ...
जिल्ह्यात दोन लाख कोरोना चाचण्या झाल्या. आजघडीस ४८४ रुग्ण असून, त्यातील ५० टक्के होम आयसोलेशनमध्ये आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे तरीही कोरोना हद्दपार होईपर्यंत नागरिकांनी सूचनांचे पालन करावे. सोहळ्याला जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. , सीईओ अभिनव गोयल, पोलीस ...
"बाळा तू मोठी होवून काय होणार ..?" लहान मुलांना असा काही प्रश्न विचारला कि खूप भन्नाट उत्तर मिळतात. माझ्याच काय आपल्या लहानपणी आपणही खूप काही काही मोठी स्वप्न पाहिलेली होती. मी मोठी होवून हे होणार, ते होणार.... पण प्रत्येक्षात काही आपल्यापुढे वेगळेच मांडून ठेवलेले असते. माझे आई बाबा दोघेही शिक्षक. त्यामुळे अगदी घरातले ...
तऱ्हतऱ्हेच्या रंगछटा, चव, आकार, इतर वैशिष्ट्य असलेले आंबे आता दिसतात का? ही विविधता आपल्या डोळ्यांदेखत नष्ट होत आहे. याचं कारण आहे- हापूस तसेच, पायरी, केशर, दशहरा, तोतापुरी अशा ठराविकच आंब्यांचं वाढलेलं महात्म्य! या आंब्यांनी बाजार व्यापून टाकला, तशा इतर जाती नष्ट होत गेल्या. एकाच्या मुळावरच जणू दुसरा उठावा. अगदी त्याप...
चाळीसगाव - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाची माती आपल्या मस्तकी लावावी ही आस प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात घर करून असते. परंतु बरेच शिवप्रेमींना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे रायगड वारी करणे अशक्य असते. याच गोष्टीला दुजोरा देत माझ्या तालुक्यातील प्रत्येक गरिबातल्या गरीब शिवप्रेमींनी र...
परुळेकर सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून ओळखले जाऊ लागले. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना इच्छाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर, इंजिनीअर किंवा सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याची स्वप्ने पडत असताना एक मराठी तरुण मात्र व्यायामाच्या आवडीवर पोसला गेला, भारतातील उत्तम सायकलिस्ट झाला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड फिटनेस इन्स्ट...
मुंबई, 21 जानेवारीः आज दिनांक २१ जानेवारी २०२३ वार शनिवार. आज पौष अमावस्या . दर्श शनी अमावस्या प्रारंभ सकाळी ६. ३१ . वाजता होईल. आज चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य. आज चंद्र भ्रमण दशमात होणार असून प्रकृती जपा. स्वतः साठी वेळ काढा. शत्रू डोकं वर काढतील. लक्ष असू द्या. आर्थिक दृष्ट्या द...
बंगळुरू, 06 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. काँग्रेसकडून प्रचारादरम्यान जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचा प्रस्तावाचा समावेश करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसला आता अधिकृत नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेसने या प्रकरणी माफी मागावी किंवा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा इशारा काँ...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ चा बहुचर्चित अर्थसंकल्प लोकसभेत सादर केलेला आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान आणि कमीत कमी शासन व जास्तीत जास्त प्रशासन या संकल्पांना साकारण्याचा प्रयत्न करणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ चा बहुचर्चित अर्थसंकल्प लोकसभेत सादर केलेला आह...
महाराष्ट्रातील गडचिरोली (Gadchiroli) येथे पोलीस ( Gadchiroli Police) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी दोन लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला अटक केली. शुक्रवारी, दोन पोलीस आणि सीआरपीएफने (CRPF) संयुक्त कारवाईत पुरस्कृत नक्षलवाद्यांना अटक (Naxali Arrest) केली. एका अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली आहे...
नगर-मनमाड मार्गावर विळद घाटाजवळ श्रीरामपूर-नगर ही बस गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महामार्ग सोडून अचानक दीडशे फुटावर असलेल्या घरात घुसली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा प्रकार घडल्यानंतर प्रवाशांसह परिसरातील लोक...
Ahmednagar: अवघ्या जगावर घोंगावणाऱ्या करोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील कोपरगावातील (Kopargaon) यात्रेत करण्यात आलेल्या भाकिताची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हायलाइट्सः आणखी दोन वर्षे मानव जातीला पिडा राहील! भाकिताचा संबंध करोनाशी जोडला जातोय! आगामी काळातील हवामान, पीक-पाण्याच्या स्थितीसह संक...
कऱ्हाडच्या व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध! कऱ्हाड : सर्वसामान्यांचा विचार न करता लॉकडाऊन केले जात असून सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सतत लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. प्रशासनाने लॉकडाऊन मागे घ्यावा. अन्यथा, सर्वसामान्यांनी जगायचे कसे, याचे उत्तर द्यावे, असा सवाल कऱ...
जेजुरीः पुरंदर तालुक्यात विमानतळ होतोय, येथे भविष्यात मोठे उद्योग-धंदे येतील. औद्योगिक क्षेत्रामध्ये ब्लॅकमेल, खंडणीसारखे प्रकार घडतात. गुन्हेगारांच्या टोळ्यांना प्रतिकार करण्यासाठी चांगल्या लोकांच्याही टोळ्या हव्यात. गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी पोलीस कायम उद्योजकांच्या पाठीशी उभे राहतील असे आश्वासन भोर उपविभ...
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती, मंगळ 26 फेब्रुवारी 2022 रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे, जिथे शनिदेव आधीच उपस्थित आहेत. मंगळाच्या राशीतील बदलाला ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व दिले जाते. मकर राशीला मंगळाचे श्रेष्ठ (सकारात्मक) चिन्ह मानले जाते. अशा स्थितीत या राशीत मंगळ मजबूत स्थितीत असणार आहे. पण ज्योतिष श...
या भिंतींवर यांत्रिक ताण आणि प्रदूषणापासून संरक्षण होते. अँटीवॅंडल वॉलपेपर - वाढीच्या शक्तीचे सजावटीत्मक आवरण, जे घरगुती जनावरांचे अगदी नखे देखील सहन करू शकतात. त्यांनी एक सुंदर देखावा, एक विशेष गढी आणि एक दीर्घ सेवा जीवन एकत्रित केले. अॅन्टी व्हॅंडल वॉलपेपर म्हणजे काय? आधुनिक बाजारपेठेत, घरे पूर्ण करण्याच्या गुणवत्त...
देशांतर्गत विमानसेवा असलेल्या विमानतळावरील हे पहिलेच यांत्रिक दालन असल्याचा दावा विमानतळ प्रशासनाने केला आहे. पुणे : लोहगाव विमानतळावर शुक्रवारपासून खाद्यपदार्थांचे रोबोटिक दालन खुले करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांकडून पैसे घेण्यापासून ते पदार्थ देण्यापर्यंतचे सर्व काम यंत्राद्वारेच केले जाणार आहे. देशांतर्गत विमानस...
विरार आणि वसई परिसरात गेले 4 दिवस होत असलेल्या पावसानं ट्रॅक पाण्याखाली गेलाय. आणि मुंबईत येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या उंबरगावजवळ अडकून पडल्यात. . ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या विरार ते बोरीवलीदरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे इकडे मानखुर्दमध्ये पाणी साचल्यामुळे वाशी ते छत्रप...
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढली आहे. प्रत्येक कंपनी स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढली आहे. प्रत्येक कंपनी स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे. यात आता होंडानेही आपली पकड मजबूत करण्याची जबरदस्त तयारी केली आहे. होंडा येत्या ३ वर्षात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या ला...
Tauktae Cyclone Update: समुद्र किनारी राहणाऱ्या कोकणी माणसांना मुसळधार पाऊस वादळी वारे हे काही नवे नाहीत. अशी अनेक वादळे आणि पाऊस त्यांनी अनुभवलाय. पण रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जे काही पाहिलं त्याचा केवळ भयावह असाच उल्लेख करता येईल. एकीकडे कोरोना विषाणू थैमान घालत असताना दुसरीकडे रविवारी...
गुजरात राज्याला जोडणार्या नाशिक- पेठ महामार्गावरील ( Nashik-Peth Highway ) उमराळे बुद्रुक ( Umrale Br )चौफुली जवळ नाशिक वरून येणारा ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत आलेल्या ओमनी गाडीतील वाहनात बसलेले पाच जण जखमी तर खातेदारांच्या 2 चार चाकी तर 20 ते 25 मोटरसायकल चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्...
रोहितचा बेजबाबदार फटका,सुनील गावसकरांनी केली टीका । Saamana (सामना) ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेरीस हिंदुस्थानचा संघ 307 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाचे आठ फलंदाज अद्याप बाकी आहेत. मात्र यापेक्षा चांगल्या स्थितीत पाहुणा संघ असू शकला असता. पण रोहित शर्माच्या बेजबाबदार फटक्यामुळे टीम इंडियाचा संघ दुसऱ्या दिवसअख...
बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे. बंगळुरू : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळघार पावसामुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे अनेकांनी चक्क ट्रॅक्टर आणि बुलडाेझ...
सिनेमांमध्ये जे जे चांगलं ते अनेकदा समाज आपलंसं करतो. यापूर्वी तीन सिनेमांमध्ये दाखवण्यात आलेल्या प्रार्थना शाळांनी घेतल्या. सौमित्र पोटेसिनेमांमध्ये जे जे चांगलं ते अनेकदा समाज आपलंसं करतो. यापूर्वी तीन सिनेमांमध्ये दाखवण्यात आलेल्या प्रार्थना शाळांनी घेतल्या. आताही बारा वर्षांनंतर एका नव्या सिनेमातली प्रार्थना शाळां...
डिजिटल पद्धतीने होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी यासाठी जनजागृती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव,दि. 4- डिजिटल पद्धतीने होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी यासाठी जनजागृती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात...
तालुक्यातील तिसगाव वडेल शिवारात खेळताना सोमवारी (दि. १९) दोन बहिणी विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुली विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. तालुक्यातील तिसगाव वडेल शिवारात खेळताना सोमवारी (दि. १९) दोन बहिणी विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुल...
लाईव्ह न्यूज : एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात? पोलादपूर - ग्रामपंचायत बोरज हद्दीतील साखर पेडेवाडीतील दरडग्रस्त वाडीमधील सर्व 8 कुटुंबातील एकूण 22 लोकांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले. अकोला : अकोला : कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला! अकोला : अकोला : अकोला ...
मिलाग्रो ह्युमनॉइड ईएलएफ हा रोबोट डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीशी संपर्क न करता संक्रामक कोव्हिड-१९ च्या रुग्णांवर देखरेख आणि चर्चा करण्यास मदत करतो. यामुळे संसर्गाची जोखीम खूप कमी होते. तसेच आयसोलेशन वॉर्डांमध्ये कंटाळा आलेले रुग्ण रोबोटच्या मदतीने वेळोवेळी आपल्या नातेवाईकांशी बोलू शकतात. यात हाय डेफिनेशन व्हिडिओ आणि ऑडि...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने गेल्या नोव्हेंबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याच्या कडून सर्वच फॉरमॅटमध्ये खराब कामगिरी होत आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना वाटते, की सध्या कोहली फॉर्ममध्ये नाही, मात्र तो एक उत्कष्ट फलंदाज आहे. जर तो...
Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी आता राज्य सरकारने तब्बल ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. (Latest Agriculture News) महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेत शेतकऱ्यांन...
आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Coconut Oil Benefits । सुंदर चेहरा सर्वांनाच हवा असतो. या इच्छेमुळे, महिला किंवा मुली नहमीच अनेक टिप्स वापरत असतात (Beauty Tips For Face). अशा लोकांसाठी खोबरेल तेल (Coconut Oil) देखील खूप फायदेशीर आहे. वाढत्या वयानुसार चेहर्यावर सुरकुत्याही दिसू लागतात (Coconut Oil Benefits). अशावेळी यापासून सुट...
वरचष्मा होऊन या हताश, विचारशून्य, मत्सरी ... लोकांस... मूळूमुळू रडत बसावे लागेल हें याचे कपाळ ठरलेलेच.' -आगर. कपाल धुऊन घेणे, कपाळ धुऊन घेणे - एखाद्याचे भाग्य हिरावून घेणे; नशिबात असेल ते घेणे. कपाल पाहणे, कपाळ पाहणे, कपाल वाचणे, कपाळ वाचणे - नशिबी काय आहे ते पाहणे; नशीब पाहणे. कपाल निवडणे, कपाळ निवडणे - दैवात असेल ते ...
खामखेडा : शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टमाटा या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते, पण सहा महिने कांदा साठवणूक करूनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसेल तर कांदा साठवणूक करायची कशाला? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. दरम्यान, टमाटा लागवडीतूनही पैसे वसूल होत नसल्याने शेतकऱ्यात नाराजीचे वातावरण आहे...
भिवंडीमधील कॉलेजने आधी हिजाबबंदी करत वर्गात बसू देण्यास मनाई केल्याने आपली हजेरी कमी भरली आणि आता त्या कारणाने जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात येत आहे, असे सांगत दाद मागणाऱ्या मुंबईतील विद्यार्थिनी फाकेहा बदामी हिला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. दरम्यान, हजेरीचे दिवस पूर्ण...
चाळीसगाव (जि. जळगाव) : गेल्या पाच वर्षांत मोबाईलचे (Mobile) मोठे मार्केट बनलेल्या चाळीसगाव शहरात मोबाईल दुरुस्तीच्या (Mobile Repairing) व्यवसायातून विशेषतः अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. मोबाईलची दुरुस्ती करणाऱ्या शहरासह ग्रामीण भागातील सुमारे दीडशेच्यावर तरुणांपैकी काहींनी स्वतःची दुकाने थाटली असून इ...
अनेक (परंतु सर्व नाही) विमा कंपन्या विमा सेवा कार्यालय (आयएसओ) द्वारे विकसित वर्गीकरण आणि रेटिंग प्रणाली वापरून सामान्य उत्तरदायित्वाच्या प्रीमियमची गणना करतात. या प्रणाली अंतर्गत, आपले प्रीमियम मुख्यत्वे खालील तीन घटकांवर आधारित आहेः - त्या वर्गीकरणासाठी नियुक्त केलेले दर (आपण निवडलेल्या मर्यादेसाठी समायोजित) रेटिंग प...
ठाणे : कोरोनाची लस घेतल्यानंतर सध्या काही ठिकाणी नागरिक थांबत नाहीत. परंतु, हे काही प्रमाणात धोक्याचे ठरू शकते. मुळात लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या नागरिकावर काही वेगळे परिणाम होतात का, यासाठी त्यांना अर्धा तास थांबविले जाते. मात्र, काही जणांना घाई असल्याने ते घरी जाण्याच्या तयारीत असतात. परंतु, अशा वेळेस चक्कर येणे कि...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाने देशात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल दीड कोटीवर गेली आहे. कोरोनाचा सुस्साट वेग सध्या पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्...
मुंबई, 11 जुलै : शेअर बाजारात आज भारती एअरटेलच्या स्टॉकमध्ये (Bharti Airtel Share Price) जोरदार घसरण पाहायला मिळाली. भारती एअरटेलमधील शेअर्समध्ये विक्रीचं कारण म्हणजे अदानी समूहाची (Adani Group) टेलिकॉम सेक्टरमधील प्रवेश आहे. भारती एअरटेलच्या शेअमध्ये जवळपास 5 टक्क्यांनी घसरण दिसत आहे. आज हा शेअर 5 टक्क्यांनी घसरून 661...
राजधानी दिल्ली येथे विधानसभा निवडणूक येत्या 8 फेब्रुवारी 2020 रोजी पार पडणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने आज केली आहे. तर दिल्लीत 70 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून त्याचा निकाल 11 फेब्रुवारी रोजी लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात सुरुवाती झाली आहे. या दरम्यान मुख्य निवडणूक आयुक...
विजापूरहून भोर खोऱ्यात संसाराचा गाडा ओढण्यासाठी निघालेल्या ३७ मजुरांवर टेम्पोचालकाच्या इच्छितस्थळी पोहोचत पुन्हा लवकर माघारी जाण्याच्या अतिघाईमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. कारण, हवेशी स्पर्धा करत निघालेल्या या चालकामुळे हकनाक १८ जीव गेले तर अनेकांना अपंगत्व आले. शिरवळ : विजापूरहून भोर खोऱ्यात संसाराचा गाडा ओढण्यासाठी ...
काबूल : अफगाणिस्तानमधील पक्तीया प्रांतातील चमकानी भागातील गुरुद्वारा थालासाहिबच्या छतावरील पवित्र ध्वज निशान तालिबान्यांनी उतरविले आहे. 'एएनआय'शी संबंधित नवीन कुमार यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या गुरुद्वारात श्री गुरु नानक देव यांनी भेट दिली होती, असे सांगण्यात येते. याच गुरुद्वारातून गेल्या वर्षी निदान सिंग ...
नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी जंग जंग पछाडले असून या प्रयत्नांचाच भाग म्हणून आता दोन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांवरही केंद्र सरकारने गदा आणली आहे. असा व्यवहार झाल्यास या व्यवहारांवर १०० टक्के दंड आकारला जाणार आहे. केंद्र सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्पात तीन...
भारतातील सर्वात मोठी डिटीएच कंपनी टाटा स्काय (Tata Sky) त्यांच्या ग्राहकांसाठी नवे नवे पॅकेज घेऊन येतात. आता कंपनीने ग्राहकांच्या शिखाला परवडतील असे पॅकेज आणले आहेत. या पॅकेजची किंमत ग्राहकांना टाटा स्कायच्या अॅपवरुन पाहता येणार आहेत. मोबाईल अॅपमध्ये तुम्हाला स्वस्त किंमतीतील पॅकेज निवडणता येणार आहे. त्याचसोबत कंपनी लॉ...
कॅमेरात कैद झालं निसर्गाचं रौद्र रूप, व्हिडीओ पाहून म्हणाल - वाह, काय नजारा आहे! सोशल मीडियावर निसर्गाचं सौंदर्य दाखवणारे अनेक व्हिडीओ बघायला मिळतात. तुम्ही कधी विचारही केला नसेल की, ज्या ढगफुटीमुळे इतकं मोठं नुकसान होतं ते दृश्य इतकं सुंदर असेल. Video Of Stunning Cloudburst: भारतातील काही भागांमध्ये सध्या पावसाने धु...
पोलीसनामा ऑनलाईन टीम : काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची चर्चा होत आहे. तुम्हाला संधी मिळाली तर काँग्रेसचे नेतृत्व करणार का ? या प्रश्नावर माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, खरे म्हटले तर मला काही माहिती नाही. आता काही सांगता येत नाही. बाजारात तुरी आणि कशाला मारी या म्हणीच...
सलमान खानची(Salman khan) हिरोईन "चांदनी" पूर्वीसारखीच सुंदर दिसते. 'सनम बेवफा' चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आजही तिचे सौंदर्य अबाधित आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत...
प्रथम आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन मराठी जनतेच्या इच्छेला मान देऊन महाराष्ट्र शासनाचे साहित्य आणि संस्कृती मंडळ महात्मा जोतीराव फुले यांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध करीत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. जोतीरावांच्या काळी ब्रिटिशांची राजवट चालू होती. त्या राजवटीत अधिकारावर असलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी त...
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गााजवणारा निळू फुले अवलिया माहित नाही असा एकही सिनेरसिक सापडणार नाही. निळू फुले यांनी 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर सलग चाळीस वर्षे सिनेसृष्टीत घालवली. निळू फुले यांनी १२ हिंदी तर जवळपास १४० मराठी सिनेमात भूमिका साकारल्या. त...
पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे पहिले स्टेशन हे पंधरा मीटर उंचीवर (सुमारे पाच मजले) असणार असून, त्यासाठी मोरवाडी चौकात इमारत बांधण्यात येणार आहे. म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे पहिले स्टेशन हे पंधरा मीटर उंचीवर (सुमारे पाच मजले) अस...
वाल्मिकनगर येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. गुरुवारी (दि. ८) रात्रीच्या साडेदहा वाजेच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. त्यात ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाल्मिकनगर येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. गुरुवारी (दि....
लहानपणी मला हार्मोनियम वाजवायला शिकायचे होते मला खुप आवडायचे हार्मोनियम वादन पण काय करणार? बेताची परिस्थिती असल्यामुळे मला छंद जोपासता आला नाही माझ्या मैत्रिणीचे वडील म्हणजेच वडिलांचे सख्खे मामा भजनी मंडळात होते त्यांच्याकडे हार्मोनियम होता मैत्रिण असल्यामुळे त्यांच्या घरी मी नेहमीच जायचे... मला वाजवायला शिकवा म्हणायचे...
काही दिवसांपूर्वी इंदापूर येथील अत्यंत व्यस्त कामाच्या वेळी अजित पवार यांनी फोनवरून डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या आणि कोणत्याही परिस्थितीत उपचारात कमी होऊ देऊ नका, जालिंदर काका वाचलेच पाहिजे अशी सूचना केली होती, ही सूचना ज्यांच्यासाठी केलेली होती, त्या जालिंदर शेंडगे यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. उपमुख्यमंत्री अज...
दूध-दुधाचं दही-दह्याचं ताक-ताकाचं लोणी. . . हे ऐकत आणि म्हणत आपण लहानाचे मोठे होतो. दुधाशी आपला परिचय अगदी शैशवावस्थेपासून असतो. हळूहळू ही ओळख वाढत जाते. अनेक पदार्थांमध्ये दुधाचा समावेश अपरिहार्य असतो. प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधाला पर्याय शोधले गेले आहेत; परंतु ते फारसे स्वीकारले गेलेले नाहीत. दूध म्हणजे सस्तन प्रा...
Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मात्र तरीही मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली आजपासून सुरु झाली आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल वसुली आजपासून सुरू होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील हा पहिलाच टोल नाका आहे....
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत (Premier League) एव्हर्टन आणि न्यूकॅसल युनायटेड यांच्यातील सामन्यादरम्यान एक अजब प्रकार घडला. हा सामना एका अनोख्या आंदोलनामुळे (Protest) आठ मिनिटे थांबवण्यात आला होता. एका आंदोलकाने गुडीसन पार्क मैदानावरील ग्वालाडेज स्ट्रीट एंडच्या गोलपोस्टला स्वतःला बांधून घेतले. त्याने आपला गळा गोलपोस्टच्...
नवी दिल्ली/मुंबई : लसीकरणाची मोहीम सुरु असतानाच देशात दररोज आढळून येणाऱ्या नव्या बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार शनिवारी देशात कोरोनाचे १३,९९३ नवे रुग्ण आढळले. एका दिवसात सुमारे १४ हजार नवे रुग्ण सापडण्याची घटना २२ दिवसांनंतर घडली आहे. २९ जानेवारी रोजी कोरोनाचे १८,...
अहमदनगर : अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांच्या माहितीनुसार अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती. या कारवाईत पाच कत्तलखान...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शहराध्यक्ष निवडण्यासाठी २२ एप्रिलला पुण्यात बैठक होणार आहे असे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र या बैठकीत अध्यक्षाच्या निवडीची घोषणा होइल की, सर्वाधिकार अजित पवार यांना दिले जातील हे स्पष्ट होऊ शकले नाही. खासदार वंदना चव्हाण गेली १० वर्षे पक्षाच्या शहराध्यक्ष आहेत. राज्यसभा सदस्य ...
कृष्णूर धान्य घोटाळा; टोलनाक्यावर १९३ ट्रकची नोंदच नाही! राजेश गंगमवार। कृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे आहे. या घोटाळ्यातील बड्या माशांच्या नाड्या त्यांनी आवळून तपास अगदी योग्य रितीने केल्याने काही राजकीय पुढारी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. तपास सीआयडीकडे द्या, अन्य कोणत्...
प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 - यंदा शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असल्याने महापालिकेने यंदा शहरात तब्बल 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यासाठी काढलेल्या निविदांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनास फेरनिविदा काढावी लागली आहे. या कामासाठी 1 कोटी 32 लाख रुपयांची निव...
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council elections) आता कुणालाच सोपी राहिलेली नाही. मुळचे भाजप (Bjp) आणि संघ स्वयंसेवक असलेले डॉ. रवींद्र भोयर यांना कॉंग्रेसने (Congress) उमेदवारी दिल्याने अफवांचा बाजार चांगलाच गरम झाला आहे. मात्र, कोण कुणाचा हिशेब चुकता करणार हे...
पानतावणे अनंतात विलीन । पुढारी\tTop\nहोमपेज › Aurangabad › पानतावणे अनंतात विलीन\nपानतावणे अनंतात विलीन\nपहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर छावणी येथील स्मशानभूमीत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्क...
कांदा भावात घसरण : शेतकरी संतप्त; लिलाव पाडले बंद नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाºयाच्या साठवलेल्या मालावर अचानक प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले असून, शेतकरी व व्यापाºयांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवार...
मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे. नाशिक : मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय...
- हिरवीगार झाडे केवळ दिसायलाच चांगली नाहीत तर मनाला शांतीही देतात. - काही झाडे अतिशय शुभ मानली जातात. - यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण होते. वास्तुदोषांमुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात. वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरातील प्रत्येक लहान-सहान गोष्ट वादविवादापर्यंत पोहोचत असेल तर घरामध्ये पेओनिया किंवा ...
नाशिकमध्ये कोरोना(nashik corona cases) रुग्णात मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाने कठोर निर्बंध (restrictions)लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. आज संध्याकाळी यासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी माध्यमांशी बोलतांना निर्बंधासंदर्भात माहिती दिली. लहान मुलांना संसर...
मुंबई १४ नोव्हेंबर : सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे. एकदा का येथे आपण आलो की येथे माहिती पाहाण्यात किंवा व्हिडीओ पाहाण्यात आपला वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्याला कळत नाही. पण खरोखरंच येथील व्हिडीओ हे फारच मनोरंजक असतात. जे आपला दिवसभराचा थकवा घालवतात. तर काही व्हिडीओ हे आपल्यासाठी एक शिकवण किंवा उदाहर...
ते म्हणतात ना... आवड आणि आत्मविश्वास असेल तर माणूस काहीही करू शकतो. अगदी असच काहीसं आहे 'त्याच्या'बाबत. 'त्याने' ना अभिनयाचे धडे गिरवले, ना 'तो' आजकालच्या नेपोटिस्ममध्ये मोडतो. 'त्याला' अभिनयाची आवड होती आणि ती 'त्याने' अशी काही जोपासली की आज 'तो' एक चांगला अभिनेताच नव्हे तर चांगला दिग्दर्शक बनण्याच्या वाटेवर आहे. स्वब...
तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु, या वेळात घरातील...
चाहतने सुकेशची तुरुंगात भेट घेतली होती आणि त्याच्याकडून मौल्यवान भेटवस्तूही घेतल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर उर्फीने चाहतवर कमेंट केली. चाहतने रागाने उर्फीला दीदी म्हणून हाक मारली होती, तर उर्फीने त्याला उत्तर म्हणून चाहतला आंटी म्हटले. एवढंच नाही तर उर्फीने चाहतला गोल्ड डिगरही म्हटले. आता चाहतने उर्...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सायकलवरून जात असताना करणे दिलेल्या धडकेत वेस्ट इंडिजचे माजी जलदगती गोलंदाज इझ्रा मोसली यांचे निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. १९९०च्या सुरुवातीला दोन कसोटी व ९ वन डे सामन्यांमध्ये मोसली यांनी वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केलं. मोसली यांच्या निधनाची बातमी समजताच वेस्ट इंडिजचे क्रिकेट डायरेक्...
मृगजळाला. रोहिणी नक्षत्रांत ऊन फार कडक पडतें; त्या वेळी मृगजळ दिसतें म्हणून मृगजळाला 'रोहिणी' असे म्हणतात. बरळु - बडबड. - ज्याप्रमाणे नांव 'लक्ष्मी' व धंदा गोवऱ्या विकण्याचा, किंवा नांव 'धनपाल' उदरनिर्वाह भिक्षेवर, हीं नांवें जशीं अर्थशून्य आहेत ( ' कुबेर नांव मोळी वाहे । कैसी पाहें फजिती ॥' तुका. - २८८६; 'घोळण्या नां...
मिपाकरहो ! आत्ताच फेसबुकच्या मराठी भाषांतराबद्दलचा संदेश आला. तुम्हालाही तो आला असेलच. भाषांतर बघताना जाणवलं की बरेच शब्द आणि वाक्प्रचार अजून चांगले होऊ शकतील. तंतोतंत आणि समजायला सोपं भाषांतर करण्यात मिपाकरांचा कळफलक कोण धरणार? https://www.facebook.com/?sk=translations इथे जरा बघाल? आपल्यासारख्या जाणत्यांनी योगदान दिल...
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा युती चा विषय समोर आला आहे. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूका एकत्र लढणाऱ्या शिवसेना भाजपने दोन दशकांपेक्षा अधिक काळाची युती तोडत २०१४ च्या विधानसभा निवडणूका वेगवेगळ्या लढवल्या होत्या. २०१९ ला ही शिवसेना भाजपने एकत्र येत लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, आता २०१९ च्या विधानसभा...
Nashik News: बंडखोरी करून शिंदे गटात (Eknath Shinde) गेलेले खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे देवळाली कॅन्टोनमेंट हे होमटाऊन आहे. गोडसे यांनी पक्ष सोडला तरीही बहुसंख्या नेते, कार्यकर्ते मात्र ठाकरे गटातच (Uddhav Thackeray) राहिले. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गट (Shivsena) पुर्ण ताकदीनिशी उतर...
लस "नोवेविक" डीएचपीपीआय ही एक जिवंत कोरडी तयारी आहे, ज्यामध्ये एक विशेष दिवाळखोर तयार होते, ज्यामुळे कुत्रेमध्ये विविध संसर्गजन्य रोग रोखता आले. नेदरलँड कंपनी इंटरव्हेन्ट इंटरनॅशनलने कांचच्या बाटल्यांमध्ये एक वैक्सीन डोस (0. 5 सें. मी. ), दहा किंवा पचास काचेच्या वाहिन्यांचे पेटीमध्ये तयार केले जाते. कोरड्या, hermetica...