text stringlengths 1 2.66k |
|---|
पण आज मी अभिमानाने सांगेन की जरी या बोगद्याच्या निर्मितीसाठी भारत सरकारचे पैसे खर्च झाले असले तरीही मला या गोष्टीचा आनंद आहे की या बोगद्याच्या निर्मितीमध्ये भारत सरकारच्या पैशांबरोबरच जम्मू काश्मीरच्या तरुणांच्या घामाचा सुगंध दरवळत आहे |
अडीच हजारांहून जास्त युवकांनी जम्मू काश्मीरचे 90 टक्के जवान जम्मू काश्मीरचे आहेत ज्यांनी कष्ट करून या बोगद्याची निर्मिती केली आहे |
रोजगाराच्या किती संधी उपलब्ध झाल्या असतील याचा आपण अंदाज लावू शकतो |
बंधुभगिनींनो जम्मू काश्मीरच्या ज्या तरुणांनी हे कातळ कापून बोगद्याची निर्मिती केली एक हजार पेक्षा जास्त दिवस ते खडक फोडत राहिले आणि बोगद्याची निर्मिती करत राहिले |
एका बाजूला काही भरकटलेले तरुण दगडफेक करण्यात गुंतले आहेत तर दुसया बाजूला त्याच काश्मीरमधले तरुण दगडांना फोडून काश्मीरचे भाग्य उज्वल करण्यामध्ये गुंतले आहेत |
बंधुभगिनींनो हा बोगदा काश्मीर खोयातील पर्यटनाचा एक नवा इतिहास रचण्यामध्ये आपली ऐतिहासिक भूमिका निभावणार आहे |
प्रवासी पर्यटक गैरसोयींच्या वृत्तांनी त्रासून जातात |
पटनी टॉपवर हिमवृष्टी झाली आहे पाच दिवस रस्ते बंद असतील आणि पर्यटक अडकून पडले असतील तर पुन्हा ते पर्यटक येण्याची हिंमत करणार नाहीत |
पण बंधुभगिनींनो या बोगद्यामुळे काश्मीरच्या खोयात देशाच्या कानाकोपयातून ज्या लोकांना येण्याची इच्छा आहे त्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही ते थेट श्रीनगरला पोहोचू शकतात |
काश्मीर खोयातील लोकांना मला सांगायचे आहे हा बोगदा उधमपूर आणि रामबन यांच्यातील का असेना पण हा बोगदा म्हणजे काश्मीर खोयाची भाग्यरेषा आहे हे कधीही विसरू नका |
शेतात काम करत असतो बगीच्यात काम करत असतो अशा वेळी गरजेनुसार पाऊस झालेला असेल हवामान जसे हवे तसे असेल पीक चांगले आलेले असेल दिल्लीच्या बाजारात त्याची विक्री करायला निघायचे असेलत्याच वेळी जर पाच दिवस रस्ते बंद झाले तर त्या शेतकयाची निम्म्याहून अधिक फळे खराब होतात |
दिल्लीला पोहोचेपर्यंत पूर्ण कष्टाची कमाई पाण्यात जाते |
काश्मीर खोयातील शेतकयांसाठी हा बोगदा वरदानकारक ठरणार आहे |
जेव्हा ते आपले पीक आपली फळे आपली फुले आपल्या भाज्या निर्धारित काळात दिल्लीच्या बाजारात अतिशय सहजपणे पोहोचवू शकतील तेव्हा त्यांच्या कृषी खर्चामध्ये जे नुकसान होत होते ते आता होणार नाही |
बंधुभगिनींनो भारतातील प्रत्येक नागरिकाच्या उरात एक स्वप्न असते |
कधी ना कधी तरी काश्मीर पाहायचे आहे |
त्याला या दयाखोयांमध्ये पर्यटक बनून यायचे असते आणि ज्या पायाभूत सुविधांचे काम आम्ही हाती घेतले आहे त्यामुळे भारताच्या कानाकोपयातून पर्यटकांना येण्यासाठी सुविधा वाढणार आहेत |
पर्यटनाची पूर्ण हमी मिळणार आहे आणि जितक्या जास्त प्रमाणात येथील पर्यटनात वाढ होईल तशी जम्मूकाश्मीरची आर्थिक स्थिती संपूर्ण भारतात इतरांना मागे टाकत पुढे निघून जाईल असा मला विश्वास आहे |
बंधुभगिनींनो मी या खोयातील तरुणांना सांगेन की तुमच्या समोर दोन मार्ग आहेत जे तुमच्या नशिबाला कोणत्या दिशेला नेतील |
एका बाजूला आहे टूरिजम आणि दुसया बाजूला आहे टेररिजम |
40 वर्ष उलटून गेली आहेत आणि या काळात अनेक निरपराधांचे बळी गेले कोणाचाच फायदा झाला नाही मात्र रक्तबंबाळ झाले ते माझे आपले काश्मीरचे खोरे |
जर कोणी आपला पुत्र गमावला असेल तर तो माझ्या काश्मीरच्या मातेचा पुत्र आपण गमावला आहे कोणी आपण भारताचा पुत्र गमावला आहे |
बंधुभगिनींनो हा रक्तरंजित खेळ 40 वर्षांनंतरही कोणाचेही भले करू शकलेला नाही |
पण याच 40 वर्षात जर टूरिजमवर(पर्यटनावर) भर दिला असता तर आज संपूर्ण जग काश्मीर खोयाच्या पायाशी येऊन बसले असते काश्मीर खोयामध्ये ही क्षमता आहे आणि म्हणूनच आपण टूरिजमची ताकद ओळखली पाहिजे |
पर्यटनाला बळ देण्यासाठी जी काही व्यवस्था उभी करायची आहे दिल्लीत केंद्र सरकार काश्मीरच्या सोबत आहे जम्मू काश्मीरच्या सोबत आहे प्रवासाला चालना देण्यासाठी तुमच्या सोबत उभे आहे |
मेहबुबाजींचे मी विशेषत्वाने अभिनंदन करत आहे मी त्यांना शुभेच्छा देत आहे त्यांची प्रशंसा करत आहे |
गेल्या वर्षी भारत सरकारने जम्मू काश्मीरसाठी जे 80 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले मला अतिशय आनंद होत आहे की इतक्या कमी काळात त्यापैकी अर्ध्याहून अधिक अंदाजपत्रकीय खर्च पॅकेजचा खर्च प्रत्यक्ष जमिनीवर कार्यरत झाला आहे ही बाब सामान्य नाही |
नाहीतर पॅकेज फक्त कागदावरच राहतात त्यांना जमिनीवर उतरण्यासाठी वर्षे उलटून जातात |
पण मेहबुबाजी आणि त्यांच्या सरकारने प्रत्येक बारकाव्यावर भर देत प्रत्येक गोष्ट जमिनीवर प्रत्यक्षात आणण्यासाठी अतिशय कष्ट केले आहेत आणि त्याची फळे दिसत आहेत |
मी यासाठी जम्मू काश्मीरचे सरकार मुख्यमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देत आहे |
बंधुभगिनींनो आज भारतात दरडोई उत्पन्न जर जलदगतीने वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त राज्य कोणते असेल तर त्या राज्याचे नाव आहे जम्मू काश्मीर |
मला याच्या सामर्थ्याची पुरेपूर जाणीव आहे |
अनेक वर्षांपासून या खोयामध्ये पक्षाच्या कामासाठी येजा करण्याची संधी मला मिळाली आहे |
येथील दिलदार लोकांना मी ओळखतो |
येथील सूफी परंपरेच्या संस्कृतीची मला माहिती आहे |
बंधुभगिनींनो या अनमोल वारशाला जर आपण विसरलो तर आपले वर्तमान आपण गमावून बसू आणि आपण आपल्या भवितव्याला अंधकाराच्या खाईत लोटून देऊ |
ही भूमी हजारो वर्षांपासून संपूर्ण भारताला मार्गदर्शन करू शकेल अशा महान वारशाची भूमी आहे |
या वारशासोबत स्वतःला जोडून घ्या त्या वारशाचा सन्मान करा आणि परिश्रमांनी आपण आपले भविष्य घडवण्यासाठी सरकारच्या बरोबरीने वाटचाल करा मग पाहता पाहता जम्मू काश्मीरचे जीवन बदलून जाईल |
बंधुभगिनींनो ज्या ज्या वेळी जम्मू काश्मीरचा विषय निघतो प्रत्येक काश्मीरी व्यक्तीच्या हृदयात प्रत्येक जम्मूवासीच्या हृदयात प्रत्येक लडाखवासी व्यक्तीच्या हृदयात अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव नेहमीच आठवते |
काश्मिरीयत इन्सानियत जम्हुरियत या मूलमंत्राला घेऊन जो मूलमंत्र अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला आहे त्याच मूलमंत्राला घेऊन आम्ही काश्मीरला विकासाच्या नव्या उंचीवर सद्भावनेच्या वातावरणाला बंधुभावाच्या वातावरणाला तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय भक्कमपणे दृढ संकल्पाने एकामागून एक पावले उचलत पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहोत |
कोणताही अडथळा आम्हाला अडवू शकणार नाही आणि जे सीमेवर बसले आहेत ते स्वतःलाच सांभाळू शकत नाही आहेत |
बंधुभगिनींनो सीमेपलीकडच्या काश्मीरमधील भागातील नागरिकांची देखील प्रगती करून दाखवण्याची आणि काश्मीर कशा प्रकारे विकसित होत आहे ते दाखवून देण्याची आमची इच्छा आहे आणि जे लोक तुमच्यावर ताबा मिळवून बसले आहेत त्यांनी तुम्हाला किती उद्ध्वस्त केले आहे ते आम्ही दाखवून देणार आहोत |
विकास हाच आमचा मंत्र आहे विकासाचा मंत्र जपत वाटचाल करण्याची आमची इच्छा आहे लोकसहभाग आमचा मार्ग आहे |
तरुण पिढीला घेऊन पुढील भविष्य घडवायचे आहे |
बंधुभगिनींनो आता एक बोगदा जर काश्मीरची भाग्यरेखा बनत असेल खोयातील शेतकयांचे जीवन बदलत असेल खोयामध्ये पर्यटनाला चालना देत असेल तर भविष्यात अशा प्रकारचे नऊ बोगदे बनवण्याची योजना आहे |
नऊ संपूर्ण भारताशी याची अशी जोडणी होईल आणि हे केवळ रस्त्यांचे जाळे नसेल तर एकमेकांच्या हृदयांना जोडणारे जाळे बनेल असा मला विश्वास आहे |
बंधुभगिनींनो विकासाच्या या प्रवासाला आपण पुढे नेऊ या |
जम्मू काश्मीरच्या तरुणांनो या भागाचे नशीब बदलून टाकण्यासाठी भारत सरकारच्या रोजगाराच्या योजनांचा लाभ घ्या |
शिक्षणाची जी नवीन क्षेत्रे या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांचा लाभ घ्या |
विकासाची नवी शिखरे सर करा आणि माझ्या जम्मूच्या बांधवा या जम्मू क्षेत्राचा विकासही जलदगतीने होत आहे |
स्मार्ट सिटीच्या दिशेचा विषय असो हृदय योजना असो अमृत योजना असो शिक्षणाच्या क्षेत्राचा विषय असो पायाभूत सुविधा तयार करायच्या असोत येथील तलावाची पुनर्रचना असो प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते लडाख असो खोरे असो वा जम्मू असो एक संतुलित विकास झाला पाहिजे आणि त्याचा फायदा संपूर्ण जम्मू काश्मीरच्या भावी पिढीला मिळत राहिला पाहिजे ... |
मी पुन्हा एकदा नितीनजींचे त्यांच्या टीमचे डॉक्टर जितेंद्र सिंह यांचे जम्मू काश्मीरच्या सरकारचे खूप खूप अभिनंदन करत आहे |
कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय माहितीचा अधिकार कायद्याच्या नियमावलीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावावरची सत्यस्थिती नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 माहितीचा अधिकार कायद्याच्या नियमावलीत सरकार समोर प्रस्तावित असलेल्या सुधारणांबाबत प्रसार माध्यमांमध्ये अतिशय चुकीचे आणि दिशाभूल करणारे वृत्त आले आहे त्या वृत्ताव... |
31 जुलै 2012 ला केंद्र सरकारने आर टी आय कायद्याविषयीची अधिसूचना काढली |
सध्याच्या नियमावलीची प्रत तक्रार निवारण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे |
त्यानुसार तक्रार करण्यासाठीची शब्द मर्यादा 500 शब्द तर शुल्क अत्यल्प असेच कायम ठेवण्यात आले आहे |
यात कुठलाही बदल प्रस्तावित नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे |
दरम्यान केंद्रीय माहिती आयोग (व्यवस्थापन) नियमावलीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे |
अर्थ मंत्रालय भारतातील पर्यावरण पूरक पायाभूत प्रकल्पात इंग्लंड करणार गुंतवणूक भारतइंग्लंड संयुक्त निधी कोषाची घोषणा नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 भारतातील पर्यावरण पूरक पायाभूत प्रकल्पांमध्ये इंग्लंड गुंतवणूक करणार असून त्यासाठी दोन्ही देशांच्या संयुक्त निधी कोषाची आज घोषणा करण्यात आली |
या कोषातून इंग्लंडमधील खाजगी क्षेत्र भारतातील पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाईल |
या कोषात दोन्ही सरकारं प्रत्येकी 120 दशलक्ष पाऊंडची गुंतवणूक करणार आहे |
सुरुवातीला 500 दशलक्ष पाऊंड निधी उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर वित्त मंत्री अरुण जेटली आणि इंग्लंडचे वित्त मंत्री फिल्पि हॅमाँड यांनी सांगितले |
भारतात वेगाने विकसित होत असलेल्या हरित ऊर्जा आणि नवीकरणीय प्रकल्पांमध्ये ही गुंतवणूक केली जाईल असेही दोन्ही नेत्यांनी सांगितले |
अवजड उदयोग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय भारतातील भांडवली वस्तूंना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने सक्षम करणाऱ्या योजनेचा आढावा नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 भारतातील भांडवली वस्तूंना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने सक्षम करणाऱ्या योजनेचा सरकारने आढावा घेतला असून या क्षेत्रातल्या तांत्रिक समस्या दूर करुन सर्व अवजड उद्योगांसाठी एक साम... |
तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जाणार असून त्या अंतर्गत अवजड उद्योगांसाठीच्या विविध शाखांच्या उत्पादनाला उपयुक्त अशी उपकरणे बनवली जातील |
केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली |
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांकडून राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत |
पंतप्रधान म्हणाले राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा |
भारताचा समृध्द सागरी वारसा आणि भारताच्या विकासात सागरी क्षेत्राचे महत्व आपण जाणून आहोत |
मंत्रिमंडळ आरोग्य व औषध क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्या... |
या सहकार्याची प्रमुख क्षेत्रे खालील प्रमाणेः 1 |
मलेरिया आणि क्षयरोग यांच्यासारखे संसर्गजन्य आजार 2 |
मानसिक आरोग्य व बिगर संसर्गजन्य आजार 3 जीवाणूजन्य प्रतिबंध आणि सार्वजनिक आरोग्य आकस्मिकतेला प्रतिसाद 4 |
औषधे लसी व वैद्यकीय उपकरणे यांचे नियमन 5 |
डिजिटल आरोग्य 6 |
तंबाखू नियंत्रण आणि 7 |
दोन्ही देशांदरम्यान परस्पर सामंजस्याने निश्चित करण्यात आलेले सहकार्याचे इतर कोणतेही क्षेत्र |
आरोग्य क्षेत्रात संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून सहकार्य निर्माण करणे आणि भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे |
मंत्रिमंडळ भारत आणि बांगलादेश यांच्यातील जनसंज्ञापन क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 भारत आणि बांगलादेश यांच्यात जनसंज्ञापन क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्... |
मंत्रिमंडळ भारत आणि बांगलादेश यांच्यात किनारपट्टीवर आणि शिष्टाचार मार्गांवर प्रवासी क्रूझ सेवाविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 भारत आणि बांगलादेश यांच्यातील किनारपट्टी व शिष्टाचार मार्गांवर प्रवासी क्रूझ सेवा सुरू करण्यासंदर्भातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच... |
हा सामंजस्य करार कार्यान्वित झाल्यावर दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संपर्क वाढीला लागेल आणि आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक जवळीक निर्माण होऊन सहकार्य वृद्धिंगत होईल |
तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांना रोजगारसंधीही उपलब्ध होतील |
मंत्रिमंडळ भारत आणि बांगलादेश यांच्यात न्यायालयीन क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 भारत आणि बांगलादेश यांच्यात न्यायालयीन क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यत... |
दोन्ही देशांच्या न्यायव्यवस्थांमध्ये परस्पर सहकार्य विकसित करणे चालना देणे व त्याला बळकटी देणे हा या कराराचा उद्देश आहे |
दोन्ही देशांचे न्यायाधीश व न्यायव्यवस्थेमधील विविध पातळ्यांवरील अधिकारी यांना परस्परांच्या देशांना भेटी प्रशिक्षण व शैक्षणिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधता येणार आहे |
त्यामुळे या क्षेत्रातील दोन्ही देशांच्या तज्ज्ञांना माहितीची व ज्ञानाची देवाणघेवाण करता येणार आहे |
मंत्रिमंडळ भारत आणि फ्रान्स यांच्यात नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 भारतीय विमानपत्तन प्राधिकरण आणि फ्रान्सचे त्याच पातळीचे नागरी हवाई प्राधिकरण यांच्यात नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद... |
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांना त्यांचे कौशल्य व ज्ञान वाढवण्यासाठी हा सहकार्य कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे |
तसेच अभियंते तंत्रज्ञ व्यवस्थापक आदींना प्रशिक्षण उपलब्ध करण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे |
मंत्रिमंडळ भारत आणि बांगलादेश यांच्यातील शिष्टाचार मार्गावर जमुना नदीचा सिराजगंजदाईखावा व कुशियारा नदीच्या आशुगंज झाकिगंज या पट्ट्यांमध्ये मुक्तमार्ग विकासासंदर्भातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 भारत आणि बांगलादेश यांच्यातील शिष्टाचार मार्गावर जमुना नदीचा सिराजगंजदाईखावा व कु... |
या सामंजस्य करारामुळे ईशान्य भारताकडे मालवाहतूक करण्यासाठी होणाया खर्चात लक्षणीय कपात होणार आहे |
तसेच सिलिगुडी चिकनच्या नेक मार्गिकेवरील ताणही कमी होणार आहे |
मंत्रिमंडळ महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद करायला केंद्रीय मंत्रिमडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला |
मात्र या योजनेंतर्गत अत्यल्प नोंदणी होत असल्याने तसेच वर्षभराहून अधिक काळ यात एकही नवी नोंदणी न झाल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला |
मंत्रिमंडळ रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यासाठी इटलीच्या कंपनीबरोबर सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत 31 जानेवारी 2017 रोजी इटलीतील फेरोवो डेलो स्टॅटो इटालियन या कंपनीबरोबर झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष... |
या सामंजस्य करारामुळे रेल्वे क्षेत्रात सुरक्षा कार्यक्षमता आणि शाश्वत प्रक्रिया यांना चालना मिळणार आहे |
तसेच तज्ज्ञांच्या बैठकी चर्चासत्रे यांच्या माध्यमातून या क्षेत्रातील अत्याधुनिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे या करारामुळे शक्य होणार आहे |
मंत्रिमंडळ भारत आणि जॉर्जिया यांच्यात हवाई सेवा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 भारत आणि जॉर्जिया यांच्यात नव्या आंतरराष्ट्रीय नागरी हवाई सेवा संघटनेच्या मानकांनुसार कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली |
सध्या या दोन्ही देशांदरम्यान कोणतीही हवाई सेवा सुरू नाही |
हवाई वाहतूक क्षेत्रातील नव्या घडामोडींना विचारात घेऊन दोन्ही देशांदरम्यान हवाई संपर्क सुधारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.