text stringlengths 1 2.66k |
|---|
गृह मंत्रालय हंसराज अहिर यांच्या हस्ते एन पी डी आर आर या संकेतस्थळाचे अनावरण नवी दिल्ली 6 एप्रिल 2017 एनपीडीआरआरची दुसरी बैठक एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे होणार असून बैठकीचा विषय शाश्वत विकासासाठी आपत्ती जोखीम निवारण वर्ष 2030 पर्यंत भारताला आश्वासित करणे असून यासंदर्भातील पहिली मिटिंग नवी दिल्ली येथे ... |
पार्श्वभूमी केंद्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था संसद आपत्ती निवारण्यासाठी विशेष कार्यरत संस्था उद्योग माध्यम नागरी सेवा संघटन आणि काही आंतरराष्ट्रीय संघटनांचा समावेश असलेल्या प्रतिनिधींचा एक समूह राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण प्लॅटफॉर्मवर कार्यरत असून केंद्रीय गृहमंत्री याचे प्रमुख असतात |
एनपीडीआरआरच्या निर्णय क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाचे आपत्ती निवारण धोरण बळकट करण्यासाठी ही समिती कार्य करते |
मंत्रिमंडळ बेलमाँट फोरम सेक्रेटरियटला पाठबळ उपलब्ध करणाया परस्पर सहकार्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 बेलमाँट फोरम सेक्रेटरियट या फ्रान्सच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेला जानेवारी 2015 ते डिसेंबर 2017 पर्यंत पाठबळ देण्यासाठी 40000 युरो खर्चाच्या परस्पर सहकार्यविषयक कराराला केंद्रीय मंत्रिमंडळा... |
2017 नंतरही या संस्थेला आर्थिक पाठबळ देण्याची मंजुरी मंत्रिमंडळाने दिली आहे |
2009 मध्ये स्थापन झालेला बेलमाँट मंच जागतिक पातळीवरचा एक उच्च स्तरीय गट असून पर्यावरणीय बदलाविषयीचे संशोधन आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदांना अर्थसाहाय्य उपलब्ध करत आहे |
भारतासह ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा युरोपीय आयोग फ्रान्स जर्मनी जपान नेदरलँड दक्षिण आफ्रिका युके आणि अमेरिका या मंचाचे सदस्य आहेत |
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कॉल गळतीची समस्या अंतर्गत भागात अधिक दूरसंचार विभाग नवी दिल्ली 6 एप्रिल 2017 मोबाईल नेटवर्कमधील कॉल गळतीची समस्या दूर करण्यासाठी दूरसंचार विभाग अनेक उपाययोजना करत आहे |
जून 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान दूरसंचार सेवा पुरवठादारांनी देशभरात सुमारे 212917 अतिरिक्त बीटीएस स्थापित केले |
माहिती आणि प्रसारण मंत्रालय राजधानीतील उगादी समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती वैविध्य ही भारताची ओळख आणि सामर्थ्यहीवेंकय्या नायडू यांनी उगादी मिलन समारंभाचे आयोजन केले नवी दिल्ली 26 मार्च 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथे उगादी समारंभाला उपस्थित राहिले यावेळी त्यांनी वैविध्य ही भारताची ओळख आणि सामर्थ्य असल... |
माहिती आणि प्रसारण शहर विकास गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री एमवेंकय्या नायडू यांनी त्यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन केले |
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की उत्सव हे निसर्गाच्या बदलत्या रुपाचे प्रतिबिंब आहे आणि आपली संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले आहेत |
सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमामुळे नवीन पिढीला विविध राज्यांचे वैविध्य आणि त्यांची संस्कृती जाणून घ्यायला मदत होईल तसेच सर्व भारतीयांमध्ये एकतेची भावना दृढ होईल |
आपती संस्कृती आणि परंपरा यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांनी एकमेकांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले |
एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमासंदर्भात पंतप्रधानांनी हरियाणा आणि तेलंगण यांच्यातील सामंजस्य कराराचे उदाहरण दिले या करारामुळे दोन्ही राज्यांना चित्रपट महोत्सव भाषा खाद्य पदार्थ या क्षेत्रात सहकार्य करण्याची तसेच खेळाडू धोरणकर्ते आणि कायदेतज्ञ यांच्यातील आदानप्रदानासाठी संधी मिळेल |
जटायू मोक्षम या सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की जटायूचा संघर्ष हा आपणा सर्वांसाठी दहशतवादाचा धैर्याने सामना करण्यासाठी प्रेरणादायी आहे |
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांनी झारखंडमध्ये विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला नवी दिल्ली 6 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधील साहेबगंज येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला |
त्यांनी गंगा नदीवरील चार पदरी पुलाचे आणि एका मल्टिमोडल टर्मिनलचे भूमिपूजन केले |
वाराणसी ते हल्दिया दरम्यान राष्ट्रीय जलमार्ग एक च्या विकासाचा मल्टिमोडल टर्मिनल हा महत्वाचा घटक आहे |
पंतप्रधानांनी 311 किलोमीटर लांबीच्या गोंविदपुरजामतारादुमाकासाहेबगंज महामार्गांचे उद्घाटन केले आणि साहेबगंज जिल्हा रुग्णालय येथील सौर ऊर्जा सुविधांचे लोकार्पण केले |
पहारिया विशेष भारत राखीव तुकडीच्या हवालदारांना नियुक्तीचे प्रमाणपत्र आणि बचत गटांच्या महिला उद्योजकांना स्मार्टफोनचे प्रतिकात्मक वितरणही पंतप्रधानांनी केले |
यावेळी पंतप्रधान म्हणाले की या विकास प्रकल्पांचा संथाल परगणा परिसराला लाभ मिळेल आणि आदिवासी समुदायांचे अधिक सक्षमीकरण करण्यास मदत मिळेल |
ते म्हणाले की भारताील गरीबाची सन्मानाने आयुष्य जगण्याची इच्छा आहे आणि स्वतला सिध्द करण्याची संधी ते शोधत आहेत |
त्यांच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले |
पंतप्रधान म्हणाले की प्रामाणिकपणाचे युग भारतात सुरु झाले आहे |
गरीबांना त्यांचा अधिभार मिळवून देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जनतेकडून आशिर्वाद मागितले |
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संवाद साधला नवी दिल्ली 6 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संवाद साधला |
सेंट पीटर्सबर्ग मेट्रोमध्ये झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधानांनी रशिया सरकार आणि तेथील जनतेचे सांत्वन केले |
माहिती आणि प्रसारण मंत्रालय 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा कासव सर्वोत्कृष्ट चित्रपट तर सथमनम भवतीला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार अक्षय कुमारला रुस्तमसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सर्वाधिक चित्रपटस्नेही राज्याचा पुरस्कार उत्तर प्रदेशला झारखंडला विशेष उल्लेखनीय पुरस्कार सुरभि सर्वोत्क... |
चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन राजू मिश्रा भावन सोमय्या आणि राधाकृष्ण जगरलामुद्री या परीक्षकांनी या पुरस्कारांची घोषणा केली |
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 3 मे 2017 रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जातील |
कासव चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला तर (फायरफ्लाईजला) नॉनफिचर चित्रपट विभागात पुरस्कार मिळाला |
सोनम कपूरला नीरजा चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे |
सर्वोत्कृष्ट मोरन चित्रपटाचा पुरस्कार हांडूक ला तर सर्वोत्कृष्ट तुलू चित्रपटाचा पुरस्कार मडिपुला जाहीर झाला |
चित्रपटाचा विषय ब्रॅण्ड कराचा प्रभाव आणि तिकिट दर अशा विविध बाबींचे सखोल विश्लेषण करणाऱ्या जी धनंजयन यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे |
पी जयशंकर आणि अंजली माँटेरो यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार घोषित झाला आहे |
चित्रपटविषयक सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार लतासूर गाथा ला मिळाला आहे |
विविध प्रकारच्या भूमिका साकारणारे मोहनलाल यांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे |
चित्रपट निर्मितीत स्थानिक गुणवत्तेला संधी दिल्याबद्दल झारखंडला विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे |
विविध प्रकारातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
अर्थ मंत्रालय सौर पारेषण प्रणाली सुधारण्यासाठी भारत आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यात 175 दशलक्ष डॉलर्सचा करार नवी दिल्ली 7 एप्रिल 2017 नवीन मेगा सौर पार्कमध्ये निर्माण होणारी वीज आंतरराज्य ग्रीडशी जोडण्यासाठी उच्च क्षमतेच्या पारेषण यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांनी 175 दशलक्ष डॉलर्सच्य... |
कृषी मंत्रालय ईराष्ट्रीय कृषी बाजारपेठ नवी दिल्ली 7 एप्रिल 2017 मार्च 2017 पर्यंत 13 राज्यातील 417 बाजारपेठा ईराष्ट्रीय कृषी बाजारपेठेशी (ईनाम) जोडण्यात आल्या आहेत |
मार्च 2018 पर्यंत देशभरातील 585 निमंत्रित बाजारपेठा या पोर्टलशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे |
कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली |
महिला आणि बालविकास मंत्रालय आत्महत्या करणाऱ्या महिलांच्या संख्येत घट नवी दिल्ली 7 एप्रिल 2017 राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार 2013 ते 2015 या तीन वर्षात आत्महत्या करणाऱ्या महिलांच्या संख्येत घट होतांना दिसून येत आहे |
केंद्र सरकार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असून आत्महत्या प्रतिबंधक सेवा कामाच्या ठिकाणी तणावाचे व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण आदी बाबी त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत |
महिला आणि बालविकास राज्यमंत्री कृष्णा राज यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली |
पंतप्रधान कार्यालय स्टॉकहोममधील हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध नवी दिल्ली 7 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनमधील स्टॉकहोम येथील हल्ल्याचा निषेध केला आहे |
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या शोकभावना आणि जखमी झालेल्यांप्रति प्रार्थना |
या दुःखद समयी भारत स्वीडनच्या जनतेबरोबर खंबीरपणे उभा आहे |
पंतप्रधान कार्यालय इजिप्तमधील हल्ल्यांचा पंतप्रधानांकडून निषेध नवी दिल्ली 9 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमधील हल्ल्यांचा निषेध केला आहे |
इजिप्तमधील हल्ल्यामुळे मला तीव्र दुख झाले आहे या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो |
या हल्ल्यात दगावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना करतो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे |
पंतप्रधान कार्यालय चंपारण्य सत्याग्रहाची 100 वर्षे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या स्वच्छताग्रह प्रदर्शनाचे उद्घाटन नागरिकांनी स्वच्छाग्रही व्हावे आणि स्वच्छ भारताची निर्मिती करावी पंतप्रधानांचे आवाहन नवी दिल्ली 9 एप्रिल 2017 चंपारण्य येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग महात्मा गांधीजींनी केला त्याला उद्या 100 वर्षे पूर्ण होत... |
राष्ट्रीय संग्रहालयातर्फे आयोजित ऑनलाईन इंटरक्टिव्ह क्वीझ या प्रश्नमंजुषा उपक्रमाचेही पंतप्रधान उद्या उद्घाटन करतील |
चंपारण्य सत्याग्रह ही ऐतिहासिक लोक चळवळ होती आणि त्याचा अभूतपूर्व परिणाम दिसून आला असे सांगत पंतप्रधानांनी नागरिकांना स्वच्छाग्रही होण्याचे आणि स्वच्छ भारताची निर्मिती करण्याचे आवाहन केले |
ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाचा 100 वर्षांचा महत्वाचा टप्पा ओलांडताना उद्या मी स्वच्छाग्रह बापू को कार्यांजली या विशेष उपक्रमात सहभागी होणार आहे |
या उपक्रमात चंपारण्य सत्याग्रहाची झलक दाखविणारे प्रदर्शन पहायला मिळेल आणि सत्याग्रहाला स्वच्छाग्रहाशी जोडणारी आधारभूत तत्वे त्याद्वारे प्रदर्शित होतील |
स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी स्वच्छ भारत मोहिमेंतर्गंत लोक चळवळ उभारताना केलेले कार्य ही या प्रदर्शनात पाहता येईल |
शतकापूर्वी भारतीयांनी सत्याग्रही होऊन वसाहतवादाविरुध्द लढा दिला होता |
आज आपण सारे स्वच्छाग्रही होऊ या आणि स्वच्छ भारताची निर्मिती करुया |
चंपारण्याचा सत्याग्रह ही बापूंच्या नेतृत्वाखालची ऐतिहासिक लोक चळवळ होती आणि त्याचा प्रभाव अभूतपूर्व होता असे पंतप्रधानांनी म्हटले आहे |
पंतप्रधान कार्यालय महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली 9 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत |
महावीर जयंतीच्या शुभेच्छा |
भगवान महावीराच्या शिकवणीचे आपण स्मरण करुया त्यांची शिकवण कित्येक पिढयांना मार्गदर्शन करीत राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे |
भारतीय निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्याइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षिततेची वैशिष्ट्ये यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न नवी दिल्ली 9 एप्रिल 2017 अलीकडेच सामान्य जनतेच्या मनात भारतीय निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत काही शंका निर्माण झाल्या होत्या तसे प्रश्नही उपस्थित करण्यात आलेत |
निवडणूक आयोगाने यासंदर्भात मतदान यंत्रांच्या सुरक्षितता गोपनीयतेबाबत पूर्वीपासून खबरदारी घेत असल्याची ग्वाही दिली आहे |
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान प्रणाली नवीनतम तांत्रिक वैशिष्ट्ये सुरक्षितता तसेच उत्पादन ते विक्री योग्य बनविण्याच्या सर्व प्रक्रिये मध्ये कडक सुरक्षा प्रशासकीय मापदंड अवलंबिल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून या संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न खालील प्रमाणे 1 |
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अनधिकृत हस्तक्षेप म्हणजे काय |
वर्तमान कंट्रोल युनिटच्या मायक्रो चिपवरील लिखित सॉफ्टवेअर कार्यक्रमात बदल करणे किंवा नवीन मायक्रो चिप घालणे आणि बॅलेट युनिटमध्ये दाबल्या जाणाऱ्या अशा कीज बनवणे ज्या कंट्रोल युनिटमध्ये खरा निकाल दाखवणार नाहीत हा हस्तक्षेप होय |
निवडणूक आयोगाची ईव्हीएम यंत्रे अनधिकृतरित्या हस्तक्षेपित आहेत का |
वर्ष २००६ पासून एम १ मॉडेलची निर्मिती करण्यात येत असून अनधिकृत हस्तक्षेप होऊ नाही यासाठी योग्य तांत्रिक प्रक्रियेचा अंतर्भाव एम१ यंत्र निर्मिती करतांना करण्यात आला आहे |
वर्ष २००६ मध्ये तांत्रिक मूल्यमापन समितीच्या शिफारशीनुसार २००६ ते २०१२ पर्यंत एम२ मॉडेलची निर्मिती चालू होती यामध्ये डायनॅमिक कोडींग असल्याने बॅलेट युनिट द्वारे संदेश कंट्रोल युनिटला कोड किंवा पासवर्ड स्वरूपात अतिरिक्त सुरक्षा हेतूने पोहचविण्यात यायचा |
यानंतर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांची निर्मिती कुठल्याही इंटरनेट किंवा संगणक नियंत्रण संलग्नता किंवा कालबद्ध इतर नेटवर्कशी संपर्क विरहित ठेवल्याने रिमोटद्वारे नियंत्रणाची शक्यता उरली नाही |
आयोगाच्या मतदान यंत्रांना कुठलीही वारंवारिता प्राप्त करण्याची सुविधा किंवा डेटा मिळविण्यासाठी वायरलेस बहिर्गत हार्ड वेअर पोर्ट डीकोडर किंवा इतर गैर ईव्हीएम डीव्हाईस संलग्नता नव्हती |
तथापि ब्लूटूथ वाईफाई वायरलेस डिव्हाईस ची संलग्नता नसल्याने अनधिकृत हस्तक्षेपाची शक्यताच नव्हती कारण नियंत्रण एकक फक्त कोड स्वरूपातील डेटा बीयु कडून प्राप्त करतो इतर कोणताही डेटा नियंत्रण एकाकाकडून स्वीकारण्यात येत नाही |
निर्माता पातळीवर सॉफ्टवेअर सुरक्षा संबंधित खूप कडक सुरक्षा प्रोटोकॉल आहे |
वर्ष २००६ पासून सतत प्रत्येक वर्षी इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन्स उत्पादित केले जात असून ते राज्य व जिल्हा पातळीवर पाठविले जातात |
उत्पादकाला उमेदवाराच्या भविष्यातील कित्येक वर्षांसाठी निवडण्यात येणाऱ्या मतदारसंघा विषयी माहिती असण्याची परिस्थिती नाही |
तसेच प्रत्येक निवडणूक मतदान यंत्राला मालिका क्रमांक असतो जो निवडणूक आयोग सॉफ्टवेअरद्वारे डाटाबेस शोधून काढू शकतो यामुळे कुठली मशीन कुठे लावली आहे याची माहिती आयोगाला मिळून काही गडबड झालीच तर लगेच शोधून काढता येते |
नियंत्रण एककात चिपद्वारे ट्रोजन हॉर्स बसविता येणे शक्य आहे का |
खाली दिल्याप्रमाणे मतदानाचा क्रम इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन मध्ये ट्रोजेन हॉर्स टाकण्याची शक्यता मोडीत काढतो |
चे कडक सुरक्षा मापदंड मशीन मध्ये विविध ठिकाणी ट्रोजन हॉर्सची ओळख करून देण्याची शक्यताही नाकारतात |
एकदा का बॅलेट कळ नियंत्रण एककात दाबली की सीयु ला बॅलेट युनिटला मतदानाच्या नोंदीसाठी आणि बॅलेट एकका मध्ये कळ दाबण्या च्या प्रक्रियेसाठी वाट बघावी लागते |
या कालावधीत जो पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत सर्व कळा बंद असतात |
मतदारांकडून बॅलेट युनिटमध्ये कळ दाबल्यानंतर बीयू कळ संदर्भातील माहिती सी यू ला देतो |
नियंत्रण एककात बॅलोटच्या शक्यते नंतर फक्त पहिली कळ नियंत्रण एककाद्वारे स्वीकारण्यात येते |
यानंतर जरी मतदारांनी इतर कळ दाबणे चालू ठेवले तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण सीयू आणि बी यू मध्ये संदेशवहन नसते याची दोन्ही एककात नोंद होत नाही |
वेगळ्या भाषेत सांगायचे झाल्यास एकदा का योग्य कळ दाबली कि मतदान प्रक्रिया पूर्ण होते आणि जो पर्यंत दुसरा बॅलट द्वारे कळ दाबण्यात येत नाही तोपर्यंत बी यू व सीयु मध्ये कुठलीही कृती गतिविधी नसते |
तथापि देशात कुठेही इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे विविध क्रमवार कळा दाबून हानिकारक संदेश पाठविणे अशक्य आहे |
जुने मतदान यंत्रे अजूनही वापरात आहेत का |
जसे सुरवातीला सांगितले की एम१ मॉडेल चे उत्पादन वर्ष २००६ पर्यंत करण्यात येत होते वर्ष २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शेवटचा वापर करण्यात आला |
वर्ष २०१४ मध्ये अशा ई व्ही एम मशीन्स ज्यांचे १५ वर्षांचे आयुष्य पूर्ण झाले होते आणि एम१ मॉडेल हे मतदारांच्या मतपत्रिकांचे अंकेक्षण करण्यास असक्षम होते त्यामुळे भारताच्या निवडणूक आयोगाने एम१ मॉडेलच्या निर्मिती थांबविण्याचे ठरविले |
निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान मशीनसाठी प्रमाणक कृती प्रक्रिया ठरविली असून अशा मशीन्स काढून टाकण्याचे काम आणि राज्याच्या मुख्य मतदान अधिकाऱ्याच्या समक्ष किंवा त्याच्या प्रतिनिधीला निर्मात्याच्या कारखान्यात मशीनची चिप वाहण्याचे अधिकार आहेत |
नाही असा अधिकार फक्त मुख्य मतदार अधिकारी किंवा त्याच्या प्रतिनिधीला आहे या व्यतिरिक्त जुन्या एम१ आणि एम२ या इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन मॉडेल्स च्या सुरक्षे ऐवजी नवीन एम३ ईव्हीएम ची निर्मिती वर्ष २०१३ नंतर करण्यात आली ज्या मध्ये काही अतिरिक्त सोयींचा समावेश आहे जसे की हानिकारक कृती शोध आणि स्व संशोधन |
प्रोटो टाईप २०१३ चे नवीन मॉडेल लवकरच तयार होत आहे |
तांत्रिक तज्ज्ञ समिती द्वारे या यंत्राची पहाणी करण्यात येऊन नंतर उत्पादन घेण्याचे ठरविण्यात येईल एम३ मॉडेलच्या निर्मितीसाठी नवीन प्रगत तंत्रज्ञानासाठी तसेच त्याच्या विशिष्ट भागांसाठी सरकारने जवळपास २००० कोटी रुपये दिले आहेत |
अशा कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे ज्यामुळे नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन हानीविरहित आहे |
ईसीआई च्या इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन निर्मितीसाठी काही तांत्रिक बाबी उपयोगात आणल्या आहेत जसे की वन टाईम प्रॉग्रॅमेबल मायक्रो कंट्रोलर कळ कोडसाठी डायनॅमिक कोडींग पद्धत प्रत्येक कळ दाबल्या गेल्या नंतर स्वयंचलित तारीख आणि वेळ छापण्याची सुविधा अद्ययावत एन्क्रिपशन तंत्रज्ञान तसेच ई व्ही एम लॉजिस्टिक शोध सॉफ्टवेअर यामुळे म... |
या व्यतिरिक्त नवीन एम३ मॉडेल मध्ये हानिकारक कृती शोधून काढण्याची सुविधा आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.