text
stringlengths
1
2.66k
ओ टी पी सॉफ्टवेअर आधारित कार्यक्रम असल्याने पुनर्रलिखाण पुनर्रवाचन किंवा जागरूकतेचा संदेश देऊ शकत नाही
सॉफ्टवेअर कार्यक्रम कोड कारखान्यात लिहिण्यात येतो
याबाबत काहींनी चुकीची माहिती पसरविली आहे भारताने ईव्हीएम ची निर्मिती कधीही विदेशात केली नाही
भारत इलेक्ट्रॉनिक्स मर्यादित बेंगुलुरू आणि भारतीय इलेक्ट्रॉनिक महामंडळ मर्यादित हैदराबाद या दोन देशांतर्गत सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या कंपन्यांना ईव्हीएम उत्पादनाची जबाबदारी देण्यात आली
कारखान्यात उच्च स्तरावर एकात्मता राहावी यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यक्रम मशीन कोड मध्ये रूपांतरित करण्यात येतो
त्यानंतर मुख्य निर्मिती विभागाला चिप बनविण्यासाठी परदेशात देण्यात येते कारण भारतात सेमी कंडक्टर माइक्रोचिप बनविण्याची क्षमता नाही
प्रत्येक माइक्रोचिप ला मेमरी मध्ये एक ओळख क्रमांक देण्यात आलेला असतो आणि निर्मात्याची त्यावर स्वाक्षरी असते
त्यामुळे बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही कारण मिक्रोचिप्स ह्या सॉफ्टवेअर संबंधी कृती चाचण्या आहेत
कुठलाही माइक्रोचिप बदलण्याचा प्रयत्न नवीन कार्यक्रमाची ओळख तसेच जुना कार्यक्रम बदलण्यासाठी वापरण्यात आलेला सॉफ्टवेअर कार्यक्रम शोधून काढता येतो आणि ईव्हीएम कृतिशील ठेवता येऊ शकते
इलेक्ट्रॉनिक मशीन साठवणुकी च्या ठिकाणी अप्रत्यक्ष नियंत्रणाची शक्यता आहे का
जिल्हा मुख्यालयात सुरक्षिततेच्या दृष्टीने ईव्हीएम् दुहेरी टाळा पद्धतीत ठेवण्यात येतात
त्यांची सुरक्षितता दैनंदिन पातळीवर तपासण्यात येते
अधिकारी दैनंदिन रित्या स्ट्रॉंग रूम उघडत जरी नसले तरी ते ईव्हीएम ची रोजची स्थिती काय आहे हे आजमावत असतात
कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश निषिद्ध आहे
गैर निवडणूक कालावधीत दैनंदिनपणे ईव्हीएमची पाहणी केंव्हाही करण्यात येऊन डीईओ द्वारे वार्षिक अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्यात येतो
अलीकडेच निरीक्षण आणि तपासणी पूर्ण करण्यात आली आहे
स्थानिक पातळीवरील मतदानात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या संदर्भात लावण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे
११
ईसीआयईव्हीएम बरोबर छेडछाड होऊ नये यासाठी नियमित देखरेख आणि निरीक्षणाचे विविध स्तर कोणते आहेत
मतदान सुरु होण्यापूर्वी मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या मतदान एजंटांसमक्ष मतदान केंद्रांवर कृत्रिम मतदानाचे आयोजन केले जाते
मतदानानंतर ईव्हीएम सील केले जाते आणि मतदान एजंट सीलवर स्वाक्षरी करतात
मतदान एजंट ईव्हीएमच्या प्रवासादरम्यान स्ट्रॉंग रूम पर्यंत जाऊ शकतात
स्ट्रॉंग रूम उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी स्ट्रॉंग रूमवर आपले स्वतःचे सील लावू शकतात जिथे मतदानानंतर मतदान केलेले ईव्हीएम ठेवले जातात आणि ते स्ट्रॉंग रूमच्या समोर शिबीर देखील लावू शकतात
या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा २४ तास बहुस्तरीय पद्धतीने केली जाते
मतमोजणी केंद्र मतदान झालेले ईव्हीएम मतमोजणी केंद्रांवर आणले जातात आणि मतमोजणी सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींना सील आणि सीयूची विशिष्ट ओळख दाखवली जाते
१२
फेरफार केलेले ईव्हीएम कुणालाही न कळता मतदान प्रक्रियेत पुन्हा समाविष्ट करता येतात का
हा प्रश्नच उद्‌भवत नाही
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम छेडछाड मुक्त करण्यासाठी उचलण्यात आलेल्या नियमित देखरेख आणि निरीक्षणाच्या ठोस पावलांची वरील शृंखला पाहता हे स्पष्ट आहे कि यंत्रांबरोबर छेडछाड करणे शक्य नाही आणि दोष असलेली यंत्रे कधीही मतदान प्रक्रियेत पुन्हा आणता येत नाही कारण बिगर ईसीआयईव्हीएमची वरील प्रक्रिया आणि बीयू व सीयुशी जुळत ...
कडक देखरेख आणि चाचणीच्या विविध स्तरांमुळे ईसीआयईव्हीएम ईसीआय प्रणालीबाहेर येऊ शकत नाहीत आणि बाहेरील दुसरे कोणतेही बोगस यंत्र या प्रणालीत समाविष्ट करता येत नाही
१३
अमेरिका आणि युरोपीय महासंघ यासारख्या विकसित देशांनी ईव्हीएमचा अवलंब का केला नाही आणि काही देशांनी हि प्रणाली का बंद केली
काही देशांनी पूर्वी इलेक्ट्रॉनिक मतदानाचा प्रयोग केला होता
या देशांमध्ये यंत्राबरोबर समस्या अशी होती कि ते संगणक द्वारे नियंत्रित होते आणि नेट्वर्कशी जोडलेले होते ज्यामुळे त्यामध्ये हॅकिंग केले जाण्याची शक्यता होती आणि यामुळे उद्देश पूर्ण झाला नसता
याशिवाय त्यांची सुरक्षा देखभाल आणि संरक्षण संबंधित कायदे आणि नियमांमध्ये पुरेशा सुरक्षा उपायांची कमतरता होती
काही देशांमध्ये न्यायालयांनी या कायदेशीर आधारांवर ईव्हीएमचा वापर बंद केला
भारतीय ईव्हीएम एक स्वतंत्र प्रणाली आहे तर अमेरिका नेदरलँड आयर्लंड आणि जर्मनीकडे प्रत्यक्ष रेकॉर्डिंग यंत्रे होती
भारताने आंशिक स्वरूपात पेपर ऑडिट ट्रेल सुरु केले
अन्य देशांकडे पेपर ऑडिट ट्रेल नाही
वरील सर्व देशांमध्ये मतदानादरम्यान सोर्स कोड बंद केला जातो
भारताकडेही मेमरीशी संलग्न क्लोज्ड सोर्स आणि ओटीपी आहेत
दुसरीकडे ईसीआयईव्हीएम स्वतंत्र उपकरणे आहेत जी कुठल्याही नेट्वर्कशी जोडलेली नाहीत आणि म्हणूनच भारतात वैयक्तिक स्वरूपात कुणासाठीही १४ दशलक्ष यंत्रांशी छेडछाड करणे अशक्य आहे
मतदानादरम्यान देशात पूर्वी होणार हिंसाचार आणि बनावट मतदान मतदान केंद्रे ताब्यात घेणे आदी अनुचित प्रकार लक्षात घेता ईव्हीएम भारतासाठी सर्वात जास्त अनुकूल आहेत
जर्मनी आयर्लंड नेदरलँड सारख्या देशांच्या तुलनेत भारतीय कायदे आणि ईसीआय नियमनामध्ये ईव्हीएमची सुरक्षा आणि देखरेखीसाठी पुरेसे सुरक्षा उपाय आहेत
भारतीय ईव्हीएम यामुळेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत कारण मतदारांसाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक बनवण्यासाठी टप्प्याटप्प्याने ईव्हीएममध्ये व्हीव्हीपीएटीचा वापर होणार आहे
ईसीआयईव्हीएम हे मुळातच मतदान यंत्रे आणि परदेशात अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रियांपेक्षा वेगळे आहे
कुठल्याही दुसऱ्या देशाची संगणक नियंत्रित ऑपरेटिंग सिस्टम आधारित यंत्रांबरोबर तुलना करणे अयोग्य होईल
१४
व्हीव्हीपीएटी सक्षम यंत्रांची सद्यस्थिती काय आहे
निवडणूक आयोगाने मतदार सत्यापित कागद लेखा परीक्षण निशाणाचा (व्हीव्हीपीएटी) वापर करत १०७ विधानसभा क्षेत्र आणि ९ लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका घेतल्या आहेत
व्हीव्हीपीएटी बरोबरच एम२ आणि नव्या पिढीच्या एम ३ ईव्हीएमचा वापर मतदारांचा विश्वास आणि पारदर्शकता वाढवण्याच्या दिशेने एक सकारात्मक योजना आहे
महामहीम तसेच सहकाऱ्यांनो अनेक कारणांमुळे आजचा दिवस ऐतिहासिक आहे
बांग्‍लादेशाच्‍या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांच्या कुटुंबांसाठी देखील हा कधी विसरता न येणारा क्षण आहे
आज बांगलादेश त्या १६६१ भारतीय जवानांचा गौरव करत आहे ज्यांनी १९७१ मध्ये बांग्‍लादेशाच्‍या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती
मित्रांनो बांगलादेशाचा जन्म एका नवीन आशेचा उदय होता त्याचबरोबर १९७१ चा इतिहास आपल्याला अनेक दुःखद क्षणांची आठवणही करून देतो
बांग्लादेशातील एक संपूर्ण पिढी संपवण्यासाठी संहार केला जात होता ती प्रत्येक व्यक्ती जी बांग्‍लादेशाच्‍या गौरवाशी जोडलेली होती प्रत्येक व्यक्ती जी भावी पिढीला बांग्‍लादेशाच्‍या भूतकाळाबाबत अवगत करू शकत होती तिला मार्गातून हटवले गेले
या नरसंहाराचा उद्देश केवळ निर्दोषांची हत्या करणे नव्हता तर बांग्लादेशाची संपूर्ण विचारसरणी मुळापासून मिटवणे हा होता
मात्र अखेरीस अत्याचाराचा विजय झाला नाही मानवी मूल्यांचा विजय झाला कोट्यवधी बांग्लादेशवासियांच्या इच्छाशक्तीचा विजय झाला
मित्रांनो बांग्लादेशाची जन्मगाथा अमर्याद बलिदानांची गाथा आहे
आणि तो आहे राष्ट्र तसेच मानवी मूल्यांप्रति अगाध प्रेमाचा
मुक्ती योध्दयांचे बलिदान देशप्रेमाने प्रेरित होते
पुढील पाच वर्षांमध्ये मुक्ती योद्धा शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आणखी दहा हजार मुलांपर्यंत पोहोचवला जाईल
मुक्ती योद्धयांबरोबरच बांग्लादेशासाठी भारतीय सैन्याने केलेला संघर्ष आणि बलिदान देखील कुणी विसरू शकणार नाही
असे करण्यात त्यांची एकमेव प्रेरणा होती बांग्‍लादेशाच्‍या जनतेप्रति त्यांचे प्रेम आणि बांग्‍लादेशाच्‍या लोकांच्या स्वप्नांप्रति त्यांचा सन्मान
आणि हे देखील लक्षात ठेवायला हवे कि युद्धाच्या क्रूरपणातही भारतीय सैन्य आपले कर्तव्य बजावत राहिले आणि युद्धाच्या नियमांचे पालन करून संपूर्ण जगासमोर एक उदाहरण ठेवले
मित्रांनो बांग्लादेशाबाबतची चर्चा बंगबंधूंशिवाय अपूर्ण आहे
दोघांचे अस्तित्व परस्परांशी जोडलेलं आहे
दोघेही एकमेकांच्या विचाराला पूरक आहेत
बंगबंधू बांग्‍लादेशाच्‍या स्वातंत्र्याचे प्रमुख सूत्रधार होते ते काळाच्या पुढचा विचार करणारे होते त्यांचा आवाज जनतेचा आवाज होता
त्यांची मुलगी महामहीम शेख हसीना आज बांग्‍लादेशाच्‍या पंतप्रधान म्हणून इथे उपस्थित आहेत याप्रसंगी मी त्यांच्या साहसाचे कौतुक करू इच्छितो
मित्रांनो आज आपल्या क्षेत्राला जगातील या प्राचीन भूभागाला प्रामुख्याने तीन विचारसरणी परिभाषित करतात
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत बांग्लादेशाची निर्यात १२५ पटीने वाढली आहे परिवर्तनाचे हे काही मापदंड खूप काही सांगत आहेत
पंतप्रधान शेख हसीना यांच्या दूरदृष्टीनुसार वाटचाल करताना बांगलादेश आर्थिक प्रगतीच्या नवीन सीमा पार करत आहे
आम्हाला हे देखील माहित आहे कि सर्वांची साथ सर्वांचा विकास हे केवळ शांततेचा पाया असेल तर शक्य आहे
म्हणूनच प्रत्येक देशाबरोबर आम्ही नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला
मित्रांनो मात्र खेदाची बाब आहे कि या दोन विचारप्रवाहांच्या विरुद्ध देखील दक्षिण आशियात एक मानसिकता आहे
असा विचार जो दहशतवादाची प्रेरणा आणि त्याला पोषक आहे
आणि यासाठी आमच्या सहकार्याची दारे सदैव खुली आहेत
मित्रांनो भारतबांगलादेश संबंध ना सरकारवर अवलंबून आहेत ना सत्तेवर
आम्ही सुखदुःखाचे साथीदार आहोत
मी नेहमीच म्हटले आहे कि जे स्वप्न मी भारतासाठी पाहतो तीच इच्छा माझी बांग्लादेशसाठी देखील असते
मी बांग्‍लादेशाच्‍या उज्वल भविष्याची प्रार्थना करतो
शेवटी मी पुन्हा एकदा मुक्ती योद्धयांना भारताच्या वीर जवानांना वंदन करतो
युवा पिढीने देशातील विविध भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानामागची भावना आणि त्यांची अभिलाषा जाणून घेतली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले
गांधीजींचे विचार आणि शिकवण पुस्तक रुपात उपलब्ध व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली
चंपारण्याचा सत्याग्रह हे गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशात झालेले पहिले अहिंसक जन आंदोलन होते
हा संघर्ष पुढच्या काळात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रेरक ठरला होता अतिगरीब नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहून गांधीजींच्या आदर्शांना मुख्य प्रवाहात आणणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे नायडू यांनी यावेळी सांगितले
तेंडुलकर लिखित रोमन रोलॅण्ड ण्ड गांधी कॉरस्पॉन्डन्स आणि महात्मा श्रृंखला (आठवी आवृत्ती) या पुस्तकांचेही प्रकाशन केले
वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय जैव उत्पादन निर्यात नवी दिल्ली 10 एप्रिल 2017 जैव उत्पादनांच्या प्रमाणनासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जैव उत्पादनांसाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला आहे
2001 सालापासून हा कार्यक्रम लागू करण्यात आला
या कार्यक्रमांतर्गत प्रमाणित झालेली जैव उत्पादनांचीच देशातून निर्यात करता येते
201415 या वर्षात 285663 मेट्रीक टन जैव उत्पादनाची निर्यात भारतातून झाली
तर 201617 या वर्षात 309767 इतक्या विक्रमी जैव उत्पादनांची निर्यात झाली
या उत्पादनांचे भारतीय चलनातील मूल्य 247817 कोटी रुपये इतकं होतं
वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली
मनुष्यबळ विकास मंत्रालय उन्नत भारत अभियान नवी दिल्ली 10 एप्रिल 2017 ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्रालयासह मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्नत भारत अभियानांतर्गत सर्व उच्च शिक्षण संस्था ग्राम विकास प्रक्रियेशी संलग्न करण्यास सहमती दर्शवली आहे
ग्रामीण भागात विकास योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तिन्ही मंत्रालयांनी यासंदर्भात एका करारावर 12 जानेवारी 2017 रोजी स्वाक्षऱ्या केल्या
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील काही भागात अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे
मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ
महेंद्रनाथ पांडे यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली