text
stringlengths
1
2.66k
पंतप्रधान कार्यालय हनुमान जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली 11 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत
पंतप्रधान कार्यालय महात्मा फुले जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली नवी दिल्ली 11 एप्रिल 2017 महात्मा फुले जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे
महात्मा फुले जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो
सामाजिक सुधारणा महिला सक्षमिकरण आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ प्रयत्नांचे परिवर्तनकारक परिणाम दिसून येत आहेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे
संरक्षण मंत्रालय नौदल कर्मचारी प्रमुखांचा मलेशिया दौरा नवी दिल्ली 11 एप्रिल 2017 नौदल कर्मचारी प्रमुख डमिरल सुनिल लांबा सदिच्छा भेटीसाठी मलेशिया येथे गेले आहेत 11 ते 15 एप्रिल 2017 या अवधीत ते मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत
भारत आणि मलेशिया यांच्यात द्विपक्षीय सागरी संबंध वृध्दिंगत करणे हा या सदिच्छा भेटीमागचा हेतू आहे दोन्ही देशांमधील संरक्षण विषयक संबंध या भेटीमुळे अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे
मलेशिया दौऱ्यादरम्यान डमिरल सुनिल लांबा मलेशियाच्या उपसंरक्षण मंत्री तसेच मलेशियाच्या संरक्षण दल प्रमुखांशी चर्चा करणार आहे
पंतप्रधान कार्यालय ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले संयुक्त निवेदन नवी दिल्ली 10 एप्रिल 2017 ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान श्री माल्कम टर्नबुल माध्यम प्रतिनिधी आणि मान्यवर आपल्या पहिल्या वाहिल्या भारतभेटीत आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे
गेल्याच महिन्यात आपण दोन्ही देशांच्या बॉर्डरगावस्कर क्रिकेट चषक स्पर्धेचा चित्तवेधक अनुभव घेतलाऑस्ट्रेलियाच्या संसदेत २०१४ साली मी केलेल्या भाषणात मी सर ब्रडमन आणि तेंडुलकर या दोघांचा उल्लेख केला होता
आज भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ हे क्रिकेटमधल्या युवा खेळाडूना आकार देत आहेत
मला आशा आहे की तुमचा भारतातील दौरा हा स्मिथच्या फलंदाजीसारखाच फलदायी ठरेल
मान्यवर महोदय जी २० शिखर परिषदे दरम्यान आपल्या झालेल्या भेटी मला व्यवस्थित स्मरणात आहेत
त्या भेटींमध्ये एक निश्चित उद्देश आणि एकत्रित काम करण्याची इच्छाशक्ती होती
आपल्या संयुक्त उपक्रमांना पुढे नेण्यात तुम्ही दाखवलेली रुची आणि सक्रीय सहभागाबद्दल मी आपले व्यक्तिशः आभार मानतो
आपल्या सहकार्याचा हा प्रवास एका निश्चित आणि योग्य दिशेने होतो आहे
आपल्या नेतृत्वाखाली आपल्यातील संबधानी मैलाचा दगड गाठला आहे
आपल्या राजनैतिक भागीदारीत नवे प्राधान्यक्रम निश्चित करण्याची संधी आज तुमच्या भेटीमुळे आम्हाला मिळाली आहे
मान्यवर महोदय हिंदी महासागराच्या जलामुळे प्रस्थापित झालेल्या आपल्या दोन्ही देशांमधल्या ऐतिहासिक संबंधांची मला आठवण होते
हा महासागर आपल्या एकत्रित भाग्योदयाचेही निदर्शक आहे
आपल्या दोन्ही देशांमध्ये लोकशाहीची तत्वे आणि कायद्याचे राज्य याविषयीची मूल्ये समान आहेत
आज सव्वाशे कोटी भारतीयांची आर्थिक प्रगतीची आस आणि ऑस्ट्रेलियाची क्षमता आणि ताकद या दोन परस्पर समन्वय असलेल्या बाबींमुळे आपल्यातले संबध अधिक दृढ करण्यास संधी निर्माण झाली आहे
मित्रांनो आज आमच्यात झालेल्या चर्चेतमी आणि पंतप्रधान टर्नबुल यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला
आपली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले यात सर्वसमावेशक वित्तीय सहकार्य कराराच्या वाटाघाटी सुरु करण्याचीही चर्चा झाली
मला इथे विनोदाने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आम्ही घेतेलेले निर्णय हे क्रिकेटमधल्या डी आर एस सारखे म्हणजेच निर्णय पुर्नआढावा प्रक्रियेतून जाण्यास बांधील नाहीत
आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आणि संशोधन यांचे मध्यवर्ती स्थान आहे ही गोष्ट भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश जाणून आहेत
त्यामुळेच ही अजिबात आश्चर्याची गोष्ट नाही की शिक्षण आणि संशोधन हा आमच्यातल्या संबधातला सर्वात महत्वाचा पैलू आहे
मी आणि पंतप्रधान टर्नबुल यांनी आताच नैनो आणि जैवतंत्रज्ञानविषयक टेरी डायकिन संशोधन केंद्राचे उद्घाटन केले दोन्ही देशांमधे विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य अधिक बळकट करण्याविषयीचे हे केंद्र म्हणजे समर्पक उदाहरण आहे
दोन्ही देशांनी संयुक्तरीत्या उभा केलेला १०० दशलक्ष डॉलर्सचा संशोधन निधी नैनो तंत्रज्ञान स्मार्ट सिटी पायाभूत सुविधा कृषी आणि रोगनियंत्रण अशा क्षेत्रामधे संशोधन करण्यासाठी वापरला जाणार आहे
केळे आणि अ जीवनसत्व याविषयीचे आपले संयुक्त संशोधन पूर्ण झाले असून ते आता प्रत्यक्ष चाचणीसाठी वापरले जात आहे
डाळींच्या अधिक पोषणद्रव्य असलेल्या जातींवरही आमचे संशोधक काम करत आहेत
दोन्ही देशातील लोक विशेषतः शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये काही नवे संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक सहकार्याची ही केवळ दोन उदाहरणे आहेत
पंतप्रधान टर्नबुल यांच्यासोबत व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांच्या कुलगुरूंचे शिष्टमंडळ आले आहे त्यांचेही मी स्वागत करतो या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधल्या अनेकविध संस्थांमध्येही करार करण्यात आले
दोन्ही देशांमधील शैक्षणिक संबंधातील महत्वाचा भाग म्हणजे विद्यार्थी एकमेकांच्या देशात शिक्षणासाठी जाणे हा होयऑस्ट्रेलियामध्ये ६० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी शिकतात
तसेच भारतात येणाऱ्या ऑस्ट्रेलियन विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढते आहे
भारतीय युवकांच्या आशा आकांक्षांना प्रतिसाद देत भारतात जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था उभारणे हे माझ्या सरकारचे लक्ष्य आहे
ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे भारतीय विद्यापीठांशी जोडून या उद्दिष्टासाठी भारताला कशाप्रकारे मदत करु शकतील पंतप्रधान टर्नबुल आणि मी मिळून आज चर्चा केली आहे
मित्रांनो आपला आर्थिक विकास आणि समृद्धी साधताना आपण पर्यावरणाप्रति संवेदनशील असायला हवे यावर पंतप्रधान टर्नबुल आणि मी दोघांचाही दृढ विश्वास आहे
आम्हाला समाधान आहे की शाश्वत उर्जेसह उर्जेच्या इतर प्रकारांविषयी आमच्यात संवाद आणि चर्चा सुरु आहे
ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा सहकार्य गटात सहभागी झाल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो
तसेचऑस्ट्रेलियाच्या संसदेने द्विपक्षीय सहकार्याचे विधेयक संमत केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा होऊ शकेल
मित्रांनो भारतप्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य यावर दोन्ही देशांचे भविष्य अवलंबून आहे याची आम्हा दोघांनाही जाणीव आहे
आज जागतिकीकरण वेगाने घडत असतानादहशतवाद आणि सायबर सुरक्षेसारखे धोके आता देशांच्या सीमा ओलांडून संपूर्ण प्रदेशासाठीच विघातक ठरत आहेत याचीही आम्हाला कल्पना आहे
आणि म्हणूनच यावर जागतिक पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे
दोन्ही देशाना भेडसावणाऱ्या या संकटांचा सामना करण्यासाठी प्रादेशिक व जागतिक प्रश्नाबाबत पंतप्रधानाची परिपक्व समज आणि दूरदृष्टी परस्पर सहकार्य वाढवण्यात नक्कीच उपकारक आहे
संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रात आपले सहकार्य एका नव्या उंचीवर पोहचले आहे
संयुक्त सागरी अभ्यास आणि आदानप्रदान दोन्ही देशांसाठी उपयुक्त आहे
दहशतवादविरोधी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे तपास मोहिमेत दोन्ही देशांच्या यंत्रणा समन्वयातून काम करत आहेत
या भेटीदरम्यान दोन्ही देशात सुरक्षा सहकार्यविषयक सामंजस्य करार पूर्ण झाला याचे मला विशेष समाधान आहे
आपल्या प्रदेशाचा समतोल राखण्यासाठी तसेच शांतता समृद्धी कायम ठेवण्यासाठी सक्षम प्रादेशिक संस्था आवश्यक असल्याबाद्ल दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहेत्यामुळेच पूर्व आशिया शिखर परिषद आणि हिंदी महासागर क्षेत्रातील देश यांच्यासोबत काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे
मित्रांनो दोन्ही देशातील समाजांमध्ये असलेले संबंध हे आमच्या भागीदारीचे मुख्य स्तंभ आहेत
सुमारे पाच लाख भारतीय नागरिकांचे ऑस्ट्रेलियात वास्तव्य आहे
कन्फ़्लुएन्स हा भारतीयांचा एकत्रित सोहळा गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील अनेक शहरात यशस्वीपणे आणि उत्साहात साजरा झाला
या सोहळ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने केलेली मदत आणि पाठींबा याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो
मान्यवर महोदय गेल्या काही वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या द्विपक्षीय भागीदारीत वेगाने वाढ झाली आहेयेत्या काही काळात दोन्ही देशांसाठी परस्पर सहकार्याची ग्वाही आणि संधी आम्हाला दिसते आहे
आमच्यातील ही भागीदारी दोन्ही देशांची सुरक्षा आणि समाजाच्या कल्याणासाठी लाभदायक तर आहेच पण प्रादेशिक शांतता स्थैर्य आणि सुरक्षेसाठीही ती महत्वाची बाब आहे
यासोबतच महोदय मी पुन्हा एकदा भारतात आपले स्वागत करतो आणि आपला हा दौरा फलदायी ठरो अशा शुभेच्छा देतो
पंतप्रधान कार्यालय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांसाठी केलेले निवेदन नवी दिल्ली 8 एप्रिल 2017 माननीय पंतप्रधान शेख हसीना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी माननीय पंतप्रधान शेख हसीना यांचे भारतात स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे
माननीय महोदया अतिशय शुभ प्रसंगी पोयला बोइशाखच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भारत भेटीवर आला आहात
आपले संबंध आणि आपल्या भागीदारीने साध्य केलेल्या कामगिरीमुळे झालेले असामान्य परिवर्तन तुमच्या भक्कम आणि निर्णयक्षम नेतृत्वाची प्रचिती देत आहे
1971च्या मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाया भारतीय सैनिकांचा सन्मान करण्याच्या तुमच्या निर्णयामुळे भारतीय जनता अतिशय भारावून गेली आहे
भारतीय सैनिक आणि बीर मुक्तिजोधा यांनी बांगलादेशला दहशतीच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी एकत्रितपणे दिलेला लढा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे
मित्रांनो आज माननीय शेख हसीना आणि मी दोन्ही देशांच्या भागीदारीविषयीच्या सर्व पैलूंसंदर्भात अतिशय फलदायी आणि सर्वसमावेशक चर्चा केल्या
आमच्या सहकार्याचा जाहीरनामा पूर्णपणे उद्देशपूर्ण कृतीवर आधारित असावा याबाबत आमची सहमती झाली
आमच्या देशांच्या संबंधाना पुढे नेण्यासाठी नव्या संधींचा शोध घेणे आणि नवी दालने खुली करण्याकडे आम्ही विशेषत्वाने पाहात आहोत
आम्हाला नव्या क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य वाढवायचे आहे विशेषतः उच्च तंत्रज्ञानाची काही क्षेत्रे ज्यामध्ये आमच्या दोन्ही देशांच्या समाजातील तरुणांचा खोलवर संबंध असेल
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र माहिती तंत्रज्ञान सायबर सुरक्षा अंतराळ संशोधन नागरी अणुऊर्जा आणि इतर क्षेत्र यांचा त्यात समावेश असेल
मित्रांनो बांगलादेश आणि या देशाची जनता यांच्या समृद्धीसाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत
आम्ही बांगलादेशचे एका दीर्घ काळापासूनचे आणि विकास प्रक्रियेतील विश्वासू भागीदार आहोत
आमच्या सहकार्याची फळे आमच्या जनतेला फायदा मिळवून देणारी असली पाहिजेत हा देखील भारत आणि बांगलादेशचा निर्धार आहे
यासंदर्भात मला बांगलादेशमधील प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमधील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सवलतीच्या दराने 45 अब्ज ड़ॉलरचे नवे कर्ज जाहीर करायला आनंद होत आहे
यामुळे गेल्या सहा वर्षात आम्ही बांगलादेशसाठी उपलब्ध करून दिलेल्या संसाधनाचे मूल्य 8 अब्ज डॉलरच्याही वर पोहोचले आहे
आमच्या विकासविषयक भागीदारीमध्ये उर्जा सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे आणि आमची उर्जाविषयक भागीदारी सातत्याने वृद्धिंगत होत आहे
भारतातून बांगलादेशमध्ये आधीपासूनच दिल्या जात असलेल्या 600 मेगावॅटची भर घातली आहे
सध्याच्या अंतर्गत जोडणीद्वारे आणखी 500 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्याचे देखील यापूर्वीच मान्य करण्यात आले आहे
नुमालीगढ ते परबतीपूर अशी डिझेल ऑइल पाइपलाईन जोडण्यासाठी देखील अर्थसाहाय्य देण्याचे आम्ही मान्य केले आहे
बांगलादेशाला हाय स्पीड डिझेलचा पुरवठा करण्यासाठी आमच्या कंपन्या दीर्घ मुदतीचे करार करत आहेत
ही पाइपलाईन पूर्ण होईपर्यंत नियमित पुरवठा करण्यासाठी एका वेळापत्रकावरही आमची सहमती झाली आहे
या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आम्ही दोन्ही देशातील कंपन्यांना प्रोत्साहन देत आहोत
आगामी दिवसांमध्ये बांगलादेशमधील उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात अनेक भारतीय कंपन्यांकडून करार होण्याची अपेक्षा आहे
बांगलादेशाच्या उर्जाविषयक गरजा भागवण्यासाठी आणि 2021 पर्यंत सर्वांसाठी उर्जा हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत नेहमीच एक उत्सुक भागीदार असेल
मित्रांनो द्विपक्षीय विकासविषयक भागीदारीच्या यशस्वितेसाठी तसेच उपप्रादेशिक आर्थिक प्रकल्प आणि विशाल प्रादेशिक आर्थिक समृद्धीसाठी एकमेकांमधील संपर्कव्यवस्था फार महत्त्वाची आहे
आज पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही आमच्या वाढत्या संपर्क व्यवस्थे संदर्भात आम्ही अनेक नव्या लिंकची आमच्या वाढत्या संपर्क व्यवस्थेत भर घातली आहे
कोलकाता व खुलना आणि राधिकापूरबीरोल यांच्या दरम्यानची बस आणि रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे
अंतर्गत जलमार्ग योग्य प्रकारे वाहतूकयोग्य केले जात आहेत आणि किनारपट्टी नौवहन करार कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत
दोन्ही बाजूंनी चालणाया ट्रान्स शिपमेंट वाहतुकीमध्ये होत असलेली प्रगती पाहून आम्हाला आनंद होत आहे
आय एन मोटर वाहन करार तातडीने अंमलात येण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत
यामुळे उपप्रादेशिक एकात्मतेचा एक नवा अध्याय सुरू होऊ शकेल
मित्रांनो पंतप्रधान शेख हसीना आणि मी आमच्या वाणीज्यविषयक भागीदारीमध्ये विविधता आणण्याची गरज लक्षात घेतली आहे
दोन्ही देशांदरम्यान केवळ विस्तृत व्यावसायिक भागीदारीला बळकट करण्याचाच नव्हे तर अधिक जास्त प्रादेशिक फायदे मिळवून देण्याचा त्यामागे उद्देश आहे
यामध्ये दोन्ही देशांचे व्यवसाय व उद्योग यांचा सर्वाधिक वाटा असला पाहिजे
पंतप्रधान शेख हसीना यांच्या सोबत आलेल्या उच्च अधिकारप्राप्त व्यावसायिक शिष्टमंडळाचे स्वागत करायला आम्हाला आनंद होत आहे
सीमेवर नवे हाट सुरू करण्याच्या आमच्या करारामुळे सीमेवरील समुदायांना व्यापाराच्या माध्यमातून सक्षम करता येईल आणि त्यांच्या चरितार्थामध्ये भर घालता येईल
मित्रांनो आमच्या देशांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षणविषयक उपक्रम यांचे यश पंतप्रधान शेख हसीना आणि मी लक्षात घेतले आहे
बांगलादेशच्या 1500 सनदी सेवकांचे भारतातील प्रशिक्षण जवळजवळ पूर्ण झाले आहे
अशाच प्रकारे बांगलादेशच्या 1500 न्यायालयीन अधिकायांना आमच्या न्यायालयीन शिक्षण संस्थांमध्ये आम्ही प्रशिक्षण देणार आहोत
मित्रांनो आमच्या भागीदारीमुळे आमच्या जनतेला एकीकडे समृद्धी प्राप्त होत असताना दुसरीकडे त्यांचे मूलतत्ववादी आणि कट्टरवादी शक्तींपासून रक्षण देखील होत आहे
या शक्तींचा प्रसार केवळ भारत आणि बांगलादेश यांच्यासाठीच नव्हे तर या संपूर्ण प्रदेशासाठी एक गंभीर धोका निर्माण करत आहे
दहशतवादाशी सामना करण्यासाठी दाखवलेल्या खंबीर निर्धाराबद्दल आम्ही पंतप्रधान शेख हसीना यांची प्रशंसा करतो
दहशतवादाला अजिबात थारा न देण्याचे त्यांच्या सरकारचे धोरण आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे
शांतता सुरक्षितता आणि आमच्या जनतेचा आणि या प्रदेशाचा विकास आमच्या भागीदारीच्या केंद्रस्थानी असेल याबाबत आम्ही सहमती व्यक्त केली आहे