text
stringlengths
0
6.48k
तसेच राधा देवीचे जीवन श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे.
भाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमीला राधा देवीचा जन्म झाला.
हा दिवस उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
देशभरातील राधा-कृष्ण भक्त या दिवशी उपास करून राधाष्टमीचे व्रत आचरतात.
राधेला लक्ष्मी देवीचा अंशावतार मानला जातो.
भाद्रपद शुद्ध अष्टमीपासून कृष्ण जन्माष्टमीपर्यंत जो साधक वा भाविक दररोज किंवा नियमितपणे राधा देवीचे पूजन, नामस्मरण, राधा मंत्राचा जप, आराधना करतो, त्यावर कुबेर आणि लक्ष्मी देवीची विशेष कृपा होते, अशी मान्यता आहे.
राधा देवीचे पूजन आणि व्रताबाबत भविष्य पुराण व नारद पुराणात उल्लेख आल्याचे आढळून येते.
भाद्रपदातील शुद्ध अष्टमीला अनुराधा नक्षत्रावर केलेले राधा देवीचे पूजन सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करणारे ठरते, अशी मान्यता आहे.
सन २०२० मध्ये २५ ऑगस्ट रोजी अष्टमी तिथी प्रारंभ होते.
तर २६ ऑगस्ट रोजी अनुराधा नक्षत्र लागणार आहे.
जो राधाष्टमीचे व्रत करू इच्छितो त्यांनी २५ किंवा २६ ऑगस्ट रोजी आपापल्या परंपरा, मान्यता यांनुसार व्रताचरण, पूजाविधी करावा, असे सांगितले जात आहे.
राधाष्टमी केव्हा साजरी करावी?
२५ वा २६ ऑगस्टपैकी योग्य तिथी जाणून घ्याराधाष्टमी पूजा विधीसकाळी स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर सूर्य नारायणाला अर्घ्य द्यावे.
राधा देवीच्या पूजनाचा व व्रताचा संकल्प घ्यावा.
पूजा स्थानी चौरंग मांडावा.
लाल वस्त्रावर राधा आणि कृष्णाची स्थापना करावी.
राधा-कृष्णाची मूर्ती किंवा तसबीर यापैकी काहीही स्थापन केले तरी चालेल.
यानंतर फूले, अक्षता, लाल चंदन, हळद-कुंकू, अत्तर, धूप, दीप, नैवेद्य (यात फळे, खीर, मिठाई) दाखवून राधा-कृष्णाचे पूजन करावे.
पूजनानंतर, ‘ऊं ह्नीं श्रीं राधिकायै नम:।’, या मंत्राचा यथासंभव जप करावा.
राधा देवीचे पूजन दुपारी करावे, असे शास्त्र सांगते.
या दिवशी एकभुक्त राहावे.
दुसऱ्या दिवशी सुवासिनींची ओटी भरून त्यांना भेटवस्तू द्याव्यात.
यानंतर भोजन करून उपास सोडावा आणि व्रताची सांगता करावी.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमधील आत्मनिर्भर भारत' या विषयावरील वेबिनारला संबोधित केलं.
गेल्या काही वर्षांपासून आम्ही संरक्षण उत्पादनात क्षेत्राच्या बेड्या तोडण्याचे काम करत आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी भारतातील संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
'संरक्षण उत्पादन क्षेत्राशी संबंधित सर्व बंधनं तोडण्याचा गेल्या काही वर्षांपासून आमचा प्रयत्न आहे.
भारतातील उत्पादन वाढवणं, भारतात नवीन तंत्रज्ञान विकसित करणं आणि या क्षेत्रातील खासगी क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करणं हे आमचे उद्दिष्ट आहे.
आजच्या मंथनातून जे काही निष्कर्ष बाहेर येतील ते आत्मनिर्भरतासाठीच्या आपल्या प्रयत्नांना गती देतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
'आतापर्यंत मर्यादित दृष्टीकोन होता'दशकांपासून देशातील ऑर्डिनन्स फॅक्टरी सरकारी विभागांप्रमाणे चालवल्या जात होत्या.
मर्यादित दृष्टीकोन ठेवल्याने देशाचे नुकसान झालेच त्यासोबत तिथे काम करणाऱ्या मेहनती, अनुभवी आणि कुशल कामगार वर्गालाही खूप त्रास सहन करावा लागला आहे.
बऱ्याच कालावधीपासून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची (CDS) नेमणूक करण्याचा निर्णय घेतला जात नव्हता.
हा निर्णय सरकराने घेतला.
हा निर्णय भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
'फक्त आश्वासनं देत नाही' संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेबाबत आमची वचनबद्धता केवळ चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही.
त्याच्या अंमलबजावणीसाठी बरीच पावलं उचलली गेली आहेत.
'सीडीएसच्या नियुक्तीनंतर सैन्याच्या तिन्ही दलांमधील समन्वय सुधारला आहे.
यामुळे संरक्षण सामग्रीच्या खरेदीत मदत होत आहे.
आगामी काळत देशांतील उद्योगांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्या जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वदेशी शस्त्रांनी युद्ध जिंकण्याइतका मोठा आनंद कुठलाच नसेलः बिपीन रावत'देशाला करोना लशीचे धोरणच नाही; सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक'आत्मनिर्भरतेसाठी प्रगत तंत्रज्ञान आवश्यक: पंतप्रधान मोदीअलिकडेच १०१ संरक्षण उपकरणं आणि सामग्रीच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे.
ही यादी वाढवली जाईल आणि त्यात आणखी वस्तूंचा समावेश होईल.
आधुनिक साधन-सामग्रीत आत्मनिर्भरतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.
जी उपकरणं आज तयार केली जात आहेत त्यांची पुढच्या पिढीतील अत्याधुनिक उपकरणं तयार करणंही गरजेचं आहे.
यासाठी डीआरडीओ व्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि शैक्षणिक संस्थांमध्येही काम करण्यात येत आहे.
संरक्षण कॉरिडॉरवर वेगाने काम सुरू आहे.
उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकार सहकार्यातून 'स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर' तयार केले जात आहे.
यासाठी येत्या ५ वर्षात २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमधील आत्मनिर्भर भारत' या विषयावरील वेबिनारला संबोधन
नवी दिल्लीः पोकोकडून नुकताच लाँच केलेला Poco M2 Pro चा आज सेल आहे.
पॉवरफुल फीचर्सचा हा फोन फ्लॅश सेल मध्ये खरेदी केला जावू शकतो.
आज फ्लिपकार्टवरून या फोनला खरेदी केले जावू शकते.
या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
या फोनचा सेल आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.
तीन रॅम आणि तीन कलरमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः आजपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्सPoco M2 Pro ची किंमत-ऑफर्स कंपनीने घोषणा केली आहे की, आज होणाऱ्या या फ्लॅश सेल दरम्यान सर्व व्हेरियंट्स उपलब्ध होणार आहे.
पोको एम२ प्रोचा बेस व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी सोबत १३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
फोनचा टॉप अँड व्हेरियंट ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसोबत येतो.
या सेलमध्ये १६ हजार ९९९ रुपयात खरेदी केला जावू शकतो.
अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड्सवर १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे.
तसेच यूपीआय किंवा रूपे पहिला प्रीपेड ट्रान्झॅक्शन केल्यास ३० रुपये आणि RuPay डेबिट कार्ड किंवा यूपीआय वरून ट्रान्झॅक्शन केल्या ७५ रुपयांची सूट मिळणार आहे.
वाचाः सॅमसंगचा ड्यूल कॅमेऱ्याचा टॅब S7 आणि S7+ लाँच, पाहा किंमतपोकोच्या या डिव्हाईसला तीन ग्रेडिएंट कलर्समध्ये लाँच करण्यात आले आहे.
ग्राहक ब्लू, ग्रीन अँड ग्रीनर आणि ब्लॅक कलरच्या दोन शेड्सचे कलर व्हेरियंट्समध्ये आपला डिव्हाईस निवडू शकतो.
Poco M2 Pro चे फीचर्स जवळपास रेडमी नोट ९ प्रो या स्मार्टफोनशी मिळते जुळते आहेत.
तसेच हा फोन रेडमी डिव्हाईसचा व्हेरियंट वाटतो.
दोन्ही बाजुला चार्जिंग स्पीड सुद्धा आहे Poco M2 Pro मध्ये 33W चे फास्ट वायर्ड चार्जिंग सिस्टम देण्यात आले आहे.
वाचाः रिलायन्स जिओची कमाल, ३ महिन्यात १ कोटी नवीन ग्राहकPoco M2 Pro चे वैशिष्ट्ये पोकोच्या या डिव्हाईसमध्ये Redmi Note 9 Pro प्रमाणे 6.
67 इंचाचा IPS LCD फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे.
चारही बाजुला बेजल्स देण्यात आले आहेत.
सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात पंच होल कॅमेरा कटआऊट देण्यात आला आहे.
ज्यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा युजर्संना मिळणार आहे.
तसेच ऑथेंटिकेशन साठी यात साईड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.
फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर सोबत येतो.
वाचाः मित्रों अॅप ३ कोटींहून जास्त डाउनलोड्स, एका महिन्यात ९०० कोटी व्ह्यूजरियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे.
मॉड्यूलमध्ये ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि चौथा डेप्थ सेन्सर दिला आहे.
६ जीबी रॅमपर्यंत आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज असणाऱ्या या फोनमध्ये Android 10 बेस़्ड MIUI 11 आणि त्यावर Poco Launcher 2.
0 मिळतो.
फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सिस्टम देण्यात आली आहे.
वाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्यावाचाः फ्लिपकार्टवर आजपासून सेल; फोनवर ४०% तर TVवर ५०% सूटवाचाः आजपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्स
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे करण्यात येणाऱ्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना येणारी अडचण लक्षात घेता भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (इर्डा) जीवन विमा कंपन्यांना ऑनलाइन पद्धतीने विमा पॉलिसी जारी करण्याची परवानगी दिली आहे.
इर्डाने एक निवेदन जारी करून ही सवलत २०२०-२१ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या सर्व पॉलिसींना लागू होणार असल्याचे म्हटले आहे.
सोने-चांदी गडगडले ; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात मोठी घसरणई-पॉलिसी मिळाल्यानंतर ग्राहक त्या विषयी फारसा समाधानी नसेल, तर तो फ्री लूक पीरियडचा वापर करू शकणार आहे.
इर्डाच्या आदेशानुसार जीवन विमा आणि आरोग्य विमा कंपन्यांना ग्राहकांना तीस दिवसांचा फ्री लूक पीरियड देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इर्डाच्या आदेशानुसार कोणत्याही ग्राहकाने पॉलिसीची कागदपत्रे मागितल्यास ती कंपनीला देणे बंधनकारक आहे.
इर्डाने जीवन विमा कंपन्यांना दर तिमाहीला त्यांच्या गुंतवणुकीची माहिती ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देण्य़ासाठीही परवानगी दिली आहे.
करदात्यांना खूशखबर ; कर प्रणाली पारदर्शक, भ्रष्टाचाराचे मार्ग बंदगेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इर्डाने महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
फसवणूक होऊ नये यासाठी अधिकृत आणि नोंदणीकृत एजंटांकडूनच विमा पॉलिसी घेण्याचे स्पष्ट केले आहे.
इर्डाच्या मते बरेच लोक विमा एजंट बनून ग्राहकांना फसवत आहेत.
त्यामुळे ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचेही इर्डाने स्पष्ट केले आहे.
सर्वसाधारण विमा कंपन्यांची शिखर संस्था असणाऱ्या जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या आकडेवारीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ७१,४२३ ग्राहकांनी करोनाच्या उपचारासाठी ११४५.
८७ कोटी रुपयांचे दावे सादर केले होते.
तत्पूर्वी, २२ जूनपर्यंत केवळ २०,९६५ ग्राहकांनी करोनाच्या इलाजासाठी ३२३ कोटी रुपयांचे दावे केले होते.
जुलै महिन्यात रोजगार वाढला; पाहा तुमच्या शहरात किती संधी आहेतआरोग्य विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली, तरी देशातील विमाधारकांचे प्रमाण अद्याप मर्यादित आहे.
देशामध्ये एकूण करोनाबाधितांपैकी केवळ ४.
०८ टक्के बाधितांनीच आरोग्य विम्यासाठी दावा केला आहे.
प्रति व्यक्ती दावा १.
६० लाख रुपयांचा आहे.
देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी असणाऱ्या एलआयसीकडे आतापर्यंत केवळ ५६१ मृत्यूदावे आले असून, त्यांची एकूण रक्कम २६.
७४ कोटी रुपये आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ७१,४२३ दाव्यांमध्ये आयुष्मान भारत योजनेशी संबंधित दाव्यांचे प्रमाण मोठे आहे.