text
stringlengths
0
6.48k
नागरिकांच्या सातत्याने सुरू झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून गेल्या तीन ते चार दिवसांत खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री येणार असल्याने महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी व्यापक मोहीम सुरू झाली.
परंतु मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची ही मलमपट्टी असल्याची टीका विरोधकांनी सुरू केली.
भाजप आणि मनसेकडून मुख्यमंत्र्यांना कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरपर्यंत दौरा करण्याचे आवाहन करत त्यानिमित्ताने खड्डे बुजवले जातील, अशी खोचक टीका करण्यात आली.
ठाणे शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टीकेनंतर ठाणे महापालिकेकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे.
तर मुख्यमंत्र्यांच्या अचानक ठरलेल्या दौऱ्यानंतर ठाण्यातील महत्त्वांच्या महामार्गांवर रविवारी दिवसभर वेगाने काम सुरू झाले होते.
मध्यरात्रीनंतरही अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांचा मार्ग बऱ्यापैकी खड्डेमुक्त करण्यात आला.
त्यामुळे विरोधकांनी यावरून टीका केली.
भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री येणार असल्याने खड्डे दुरुस्तीची तात्पुरती मलमपट्टी असल्याचे सांगत ही खड्डेदुरुस्ती दर्जाहीन असल्याचा दावा केला.
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरापर्यंत मुख्यमंत्री गेल्यास या भागांतील खड्डेही काही अंशी भरले जातील.
त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल, अशी खोचक टीका डावखरे यांनी केली.
तर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करत शिळफाट्यावर फेरफटका मारण्याचे आवाहन केले.
खड्डे बुजवण्याच्या कामाचा आढावाठाण्यातील महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा आढावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून रविवारी रात्री उशिरा घेतला.
नितीन कंपनी उड्डाणपुलावर जाऊन त्यांनी कामाची पाहणी केली.
ठाणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर व खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.
तसेच खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ व सुयोग्य पद्धतीने करण्याबाबत अधिकारी वर्गास निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिनिधी, औरंगाबादलाडक्या गणरायाच्या स्वागतानंतर आता बाप्पाला सुरक्षित वातावरणात निरोप देण्याचे नियोजन सुरू झाले आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सिडको - हडको गणेश महासंघाचे पदाधिकारी प्रयत्न करत असून, यंदा प्रत्येक वार्डांमधून घरगुती गणेशमूर्ती गोळा करून त्यांचे विसर्जन केले जाणार आहे.
गणेशोत्सव म्हटला की आनंद, उत्साह, जल्लोषाचे वातावरण असते.
मात्र, यंदा करोनामुळे या आनंदावर विरजण पडले.
सार्वजनिक गणेश मंडळांनी कोणत्याही उपक्रमांशिवाय केवळ परंपरेचे पालन म्हणून बाप्पांची प्रतिष्ठापना केली.
त्यात गणेशोत्सव मंडळांची संख्याही खूप कमी झाली असून, दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन नाही.
सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमी असली, तरी घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
त्यामुळे विसर्जन विहिरींवर अधिक गर्दी होऊ नये तसेच सुरक्षित वावराचे नियम पाळण्यात यावे यासाठी गणेश महासंघाच्या वतीने प्रत्येक वार्डांमधून घरगुती गणेशमूर्ती गोळा करण्याचे नियोजन आहे.
यासाठी महापालिकाही स्वतंत्ररित्या नियोजन करत असून, सिडको- हडको भागातील बहुतांश वार्डांमध्ये ही सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान, महासंघाच्या वतीने गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश महासंघाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मास्क तसेच सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे.
सिडको - हडकोमधील गणेश मंडळांचे तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन एन १२ येथील विसर्जन विहिरीत करण्यात येते.
या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून महासंघाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, नवीन औरंगाबादचा महत्त्वाचा भाग असलेल्या सिडको -हडको भागामध्ये दरवर्षी नोंदणीकृत गणेश मंडळांची संख्या ७५ ते ८० असते.
मात्र, यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या घटून यंदा केवळ दहा ते बारा मोठ्या मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना केली आहे.
रिक्षातून जनजागृतीगणेश विसर्जनासाठी प्रत्येक वार्डामध्ये एका निश्चित ठिकाणी वाहन उभे करण्यात येणार असून, हे वाहन कोठे उभे राहणार या संदर्भात लोकांना माहिती व्हावी यासाठी महासंघाच्या वतीने वार्डा-वार्डांमध्ये रिक्षाला भोंगे लावून नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.
गणेशमूर्ती गोळा करण्यासाठी प्रत्येक वार्डात किमान दोन ट्रॅक्टरचे नियोजन आहे.
महासंघाच्या नियोजनात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल, अशी माहिती सिडको-हडको गणेश महासंघाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली.
यंदाचा गणेशोत्सवात करोनामुळे मंडळांच्या संख्येमध्ये मोठा फटका बसला आहे.
केवळ मोठ्या दहा ते बारा गणेशमंडळांचे विसर्जन राहणार आहे, तर दुसरीकडे घरगुती गणेशमूर्तींची संख्या अधिक राहील.
विसर्जन विहिरींवर गर्दी होऊ नये या अनुशंगाने सिडको- हडको गणेश महासंघाच्या वतीने प्रत्येक वार्डात वाहन उभे करून गणपती मूर्ती गोळा करण्याचे नियोजन आहे.
- दीपक पाटील, अध्यक्ष, सिडको - हडको गणेश महासंघ
विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये उपयोगी ठरलेल्या टोसिलिजुमैब इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
मागील आठ दिवसांपासून हे इंजेक्शन मिळण्यात मुंबई-ठाण्यात अडचणी येत आहेत.
ज्या औषध कंपन्यांकडून, वितरकांकडून या इंजेक्शनची उपलब्धता होते, त्यांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला असता, औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
येत्या दोन आठवड्यांत ते उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.
त्यामागील कारण सांगण्यात आले नाही.
वांद्रे येथील खासगी रुग्णालयात दाखल अभय पाटील (नाव बदलले आहे) यांना या इंजेक्शनची गरज होती.
मात्र, पूर्व तसेच पश्चिम उपनगरात कुठेही ते मिळाले नाही.
अभय पांडे यांच्या नातेवाईकालाही या इंजेक्शनची गरज होती.
त्यांनी अनेक ठिकाणी विचारणा केली.
संबधित कंपनीच्या हेल्पलाइनवरही फोन केला.
तेव्हा त्यांना केवळ मुंबईतच नव्हे, तर राज्यातही इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
येत्या १५ दिवसांत हे इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
यासंदर्भात विचारणा करण्यासाठी 'एफडीए'कडे सातत्याने संपर्क साधूनही होऊ शकला नाही.
औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय धनावडे यांनीही हे इंजेक्शन मिळत नसल्याचे सांगितले.
सध्या रेमिडिसीविर इंजेक्शन मिळत आहे.
मात्र रेमिडिसीविरची मात्रा चालली नाही, तर या इंजेक्शनच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी धाव घेतली जाते.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते इतर राज्यांमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध आहे काय, याविषयी विचारणा करणे गरजेचे आहे.
'ठाम निष्कर्ष नाही''रेमिडिसीविर तसेच टोसिलिजुमैब इंजेक्शन देण्यासंदर्भात आयसीएमआरने दिलेल्या निर्देशांचे पालन होणे गरजेचे आहे.
त्यामुळे ही इंजेक्शन देण्यापूर्वी संबधित रुग्णांच्या नातेवाईकांची संमती घेणे, त्याच्या परिणामांबद्दल माहिती देणेही गरजेचे आहे.
या इंजेक्शनमुळे करोना बरा होतो, असा ठाम निष्ष्कर्ष अद्याप पुढे आलेला नाही', असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ.
ए.
एस.
नायर यांनी सांगितले.
जयंत चौगुलेअँड्राइड टीव्ही २०१४ साली लाँच झाले.
तेव्हापासून या टीव्हीच्या कार्यप्रणालीत सावकाश पण नियमित अपडेट्स येत आहेत.
आजकाल बाजारात वेगवेगळ्या ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत.
पण, त्याचा अँड्रॉइड टीव्ही प्रकारावर फारसा फरक पडलेला नाही.
जर तुमच्याकडे अँड्रॉइड टीव्ही असेल आणि त्यात कोणते अॅप्स डाऊनलोड करावेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा लेख तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
अँड्रॉइड टीव्हीमध्ये विविध ओटीटी माध्यमांच्या अॅप्सशिवाय कोणते इतर अॅप्स डाऊनलोड करु शकता, याविषयी.
..सेंड फाइल्स टू टीव्हीनावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की, हे अॅप फाइल्स पाठवण्यासाठी उपयोगी पडतं.
एक वेळ अशी होती जेव्हा आपल्याला मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी पेन ड्राइव्ह वापरावा लागायचा.
पण, आता या अॅपच्या मदतीनं तुम्ही वायफायचा उपयोग करून फाइल्स पाठवू शकता.
हे अॅप तुम्हाला अँड्राइड टीव्हीमध्ये आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल.
त्यानंतर स्मार्टफोनमधले व्हिडीओ, फोटो तुम्ही तुमच्या अँड्रॉइड टीव्हीवर सहज पाठवू शकता.
हे अॅप वापरताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमचा टीव्ही आणि तुमचा स्मार्टफोन/टॅब्लेट एकाच वायफायवर जोडलेले आहेत.
हे अॅप वापरायला सोपं असून ट्रान्स्फरचा वेगसुद्धा चांगला आहे.
व्हीएलसी मीडिया प्लेअरतुम्हाला तुमच्या अँड्रॉइड टीव्हीमधला कुठलाही व्हिडीओ प्ले करायचा असेल तर हे अॅप तुमच्याकडे असायला हवं.
अनेकदा टीव्हीमध्ये काही व्हिडीओ फॉरमॅट चालत नाहीत.
अशा वेळी व्हीएलसी मीडिया प्लेअर उपयोगी पडतो.
यात जवळपास सगळे फॉरमॅट प्ले करू शकता.
हे अॅप सुरु झालं की लगेच तुमच्या टीव्हीमधल्या मीडिया फाइल्स हे अॅप शोधतं.
त्या फाइल्स ऑडिओ, व्हिडीओ आणि इतर प्रकारात तुम्हाला दाखवतं.
या अॅपमध्ये असलेल्या वेगवेगळ्या सेटिंग्जच्या मदतीनं तुम्ही मीडिया फाइल्स विविध स्वरुपात प्ले करू शकता.
हे अॅप खूप लोकप्रिय असून लूकच्या बाबतीतही आकर्षक आहे.
एअर स्क्रीनअँड्रॉइड टीव्हीवर गुगल क्रोमकास्ट वापरून तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा टॅब्लेट कास्ट करू शकता.
कास्ट म्हणजे तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेटच्या स्क्रीनवरील डिस्प्ले टीव्हीवर दाखवणं.
पण, जर तुमच्याकडे आयफोन किंवा आयपॅड असेल आणि तुम्हाला स्क्रीन कास्ट करायची असेल तर अशा वेळी एअर स्क्रीन तुमच्या मदतीला धावून येईल.
हे अॅप वापरायला सोपं असून लॅपटॉप, आयपॅड, आयफोन अगदी काही सेकंदात कास्ट करू शकतं.
एक्सप्लोर फाइल मॅनेजरकाही वेळेला तुमच्या अँड्रॉइड टीव्हीमध्ये अनेक फाइल्स, व्हिडीओ आणि फोटोज विनाकारण पडून असतात.
त्यामुळे टीव्हीमधील मेमरी कमी होते.
अशा वेळी तुमच्या स्मार्टफोनमधील फाइल एक्सप्लोररसारखंच अॅप असावं असं नेहमी वाटतं.
एक्सप्लोर फाइल मॅनेजर हे असंच एक खास अँड्रॉइड टीव्हीसाठी बनवलेलं फाइल एक्सप्लोरर अॅप आहे.
हे अॅप गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्सशीसुद्धा जोडलेलं आहे.
याच्या मदतीनं टीव्हीमधील नको असलेल्या फाइल्स क्लाऊडवर अपलोड करण्याची आणि वायफायच्या मदतीनं शेअर करण्याची सुविधा दिलेली आहे.
पफिन टीव्ही ब्राऊजरगुगल क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोरर सगळ्यांनाच माहीत आहे.
इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी याचा वापर केला आहे.
पण, समजा असंच इंटरनेट ब्राऊजर आपल्याला टीव्हीवर वापरायचा असेल तर पफिन टीव्ही ब्राउझर प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.
हे खास टीव्हीसाठी असलेलं लोकप्रिय इंटरनेट ब्राऊजर आहे.
या अॅपच्या मदतीनं अँड्रॉइड टीव्हीच्या रिमोटद्वारे इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाइट बघू शकता.
एवढंच नाही तर क्यूआर कोडच्या मदतीनं तुमच्या स्मार्टफोनला जोडून त्यातील बुकमार्क जतन करण्याची सुविधासुद्धा यात दिली आहे.
स्पोटीफायतुम्हाला ऑनलाइन गाणी ऐकायला आवडतात?
तर स्पोटीफाय हे अॅप तुम्हाला उपयोगी पडू शकतं.
ऑनलाइन म्युझिकच्या यादीमध्ये स्पोटीफाय हे खूप लोकप्रिय अॅप आहे.