text
stringlengths
0
6.48k
कोल्हापूर: महाराष्ट्रासह देशात आणि सबंध जगात करोना महामारीने कहर केला आहे.
अशा परिस्थितीत समाज या गोष्टी गांभीर्याने घेणार की नाही ?
की अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार?
असा उद्विग्न सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.
Hasan Mushrif sushant singh rajput suicide case )वाचा: आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांत आत्महत्येशी माझा संबंध नाहीमंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, करोना विषाणूने गेली पाच महिने थैमान घातले आहे.
या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार यासह अनेकजण संघर्ष करत आहेत.
या सर्वांवर तणाव आहे.
राज्यातील या योध्दाचे कौतुक करत, करोनाचा शेवट होईपर्यंत त्यांना मानसिक आधार देण्याची गरज असताना, दिवसेंदिवस रुग्णांच्या व मयतांच्या संख्येत वाढ असताना या उपायावर चर्चा करण्याऐवजी सध्या सुशातसिंगच्या आत्महत्येचीच अधिक चर्चा होत आहे.
आत्महत्या का केली ?
कशासाठी केली ?
त्याचे किती तरुणींच्यावर प्रेम होते ?
तो जीवनात यशस्वी झाला की नाही ?
या सगळ्याची चौकशी होईल.
त्यासाठी मुंबई पोलीस जगामध्ये सक्षम आहेत.
तरीही त्याची चर्चा करायची तरी किती असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.
वाचा: सुशांतच्या एक्स मॅनेजरची बलात्कार करून हत्या, राणेंचा गंभीर आरोपजेव्हा अमृतावहिनी अवतरतातकरोना महामारीबाबत साधे एक अवाक्षरही न काढणाऱ्या आमच्यां अमृतावहिनी अवतरतात व एका आत्महत्या तपासावरुन मुंबई सुरक्षित राहिली नाही, असे वक्तव्य करतात.
हे आश्चर्यजनक आहे.
यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची वक्तव्ये, भिंतीवर नामदार उद्धव ठाकरे यांच्याबाबत लिहिलेली वाक्ये, नामदार आदित्य ठाकरे यांना रेशमी किडा संबोधणे व आता मुंबई पोलिसांवर दाखविलेला अविश्वास.
हे सर्व वाचून कोरोनाच्या संकटामध्ये नेमकं हे चाललंय तरी काय ?
हेच समजत नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
वाचा: पुरावे नष्ट करू पाहत आहेत मुंबई पोलीस, वकिलांचा आरोपनारायण राणे यांचे गंभीर आरोपअभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येची चौकशी का केली नाही?
, असा सवाल करतानाच दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.
दिशा सलियान ही सुशांतची एक्स मॅनेजर होती.
तिने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी तिचे पोस्टमार्टम करण्यात आलं.
तिच्या पोस्टमार्टमचा अहवालही माझ्याकडे आहे असा दावा करत पोस्टमार्टममधील विविध गंभीर बाबींकडे राणे यांनी लक्ष वेधले.
दिनो मारियोच्या घरी रोज पार्ट्या होता.
या पार्ट्यांना अनेक मंत्री हजर असतात.
त्यादिवशीही पार्टी होती.
त्या मंत्र्यांपैकी एक मंत्री सुशांतच्या आत्महत्येआधी त्याच्या घरी गेला होता.
त्याची चौकशी अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणीही राणे यांनी केली.
राणे यांनी मंत्र्याचा नामोल्लेख मात्र टाळला.
वाचा: 'पोलिसांनीच फेसबुकवर शेअर केले सुशांतच्या मृतदेहाचे फोटो'
नवी दिल्लीः माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तिथे त्यांच्या मेंदुवर सोमवारी शस्त्रक्रिया केली गेली.
ही शस्त्रक्रिया रक्ताच्या गाठी काढून टाकण्यासाठी केली गेली आहे.
त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मंगळवारी लष्कराच्या रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितले.
त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
मुखर्जींच्या तब्येतीत सुधारणा नाहीमेंदुवरील शस्त्रक्रियेनंतर प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा झालेली नाही.
त्यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.
माजी राष्ट्रपती मुखर्जी हे अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत.
त्यांची प्रकृती अद्याप नाजुक असल्याचे दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.
प्रणव मुखर्जी यांना गंभीर स्थितीत सोमवारी दुपारी १२ वाजता दिल्लीतील कॅन्ट येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
वैद्यकीय तपासणी त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गठी झाल्याचं समोर आलं होतं.
यानंतर तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
त्याते पॉझिटिव्ह असल्याचेही आढळले.
आपल्याला करोनाची बाधा झाली आहे.
आपली चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असं प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी सांगितलं होतं.
पण नंतर त्यांना दिल्लीतील लष्करा संशोधन आणि रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पण ते छोट्याशा ब्रेन सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं सांगण्यातलं.
कोरोना टेस्ट केली असता तो पॉझिटीव्ह आढळले.
सचिन पायलट जयपूरमध्ये पोहोचले; समर्थकांनी केली मुख्यमंत्री बनवण्याची मागणीकाश्मीरमध्ये भाजप नेत्यांचे एकामागून एक राजीनामे, 'हे' आहे कारणप्रणव मुखर्जी हे करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना त्वरित बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यात काँग्रेस खासदार राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा समावेश आहे.
प्रतिनिधी, पुणे गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना स्वतःची मंदिरे नसलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपुढील बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा संभ्रम अखेर रविवारी संपुष्टात आला.
मानाच्या गणपतींसह मंदिर उपलब्ध नसलेल्या मंडळांना लहान आकारातील मांडव घालण्यास महापालिका आणि पोलिसांनी अनुकूल भूमिका घेतली आहे.
दर वर्षाच्या मंडपापेक्षा कमी आकाराचा मंडप घालता येणार असून सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना मांडव घालणाऱ्या मंडळांना कराव्या लागणार आहेत.
शहरातील करोनाच्या संसर्गाचे प्रमाण अद्याप पूर्ण नियंत्रणात आले नसल्याने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आणि पोलिसांनी केले आहे.
रस्त्यावर मांडव टाकल्यास नागरिकांची गर्दी होऊन करोनाची साथ आणखी पसरण्याची भीती आहे.
त्यामुळे शक्यतोवर मंदिरांमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असा आग्रह पोलिसांनी धरला होता.
मंदिरे नसलेल्या मंडळांनी किमान लहान मांडव टाकण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती पालिका आणि पोलिसांनी केली होती.
मंडळांची मागणी अखेर मान्य झाली असून केवळ मंदिरे नसलेल्या सार्वजनिक मंडळांनाच रस्त्यावर लहान आकारातील मांडव घालता येणार असल्याचे महापालिका आणि पोलिसांनी स्पष्ट केले.
मंडप घालताना अॅम्बुलन्ससाठी पुरेसा रस्ता उपलब्ध असेल, याचे बंधन कायम राहणार आहे.
महापालिका आणि पोलिसांच्या भूमिकेमुळे मानाच्या मंडळांसह शहरातील इतर सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्या नेहमीच्या जागेत; पण आवश्यक गरजांपुरता मंडप घालणे शक्य होणार आहे.
या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी होणार नाही आणि दर्शनासाठी भाविकांना प्रवेश मिळणार नाही, याची खबरदारी मंडळांना घ्यावी लागणार आहे.
मंडळांकडून घालण्यात येणाऱ्या मंडपाच्या आकारावर स्थानिक पोलिस अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.
करोनाचे संकट लक्षात घेऊन यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे.
शहरात सर्व सार्वजनिक मंडळांची मंदिरे नाहीत.
उत्सवात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी अशा मंडळांनी पालिकेच्या सर्व नियमांचे पालन करून लहान मंडप उभारावा.
या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका कायम ठेवावी.
- मुरलीधर मोहोळ, महापौर ज्या गणेश मंडळांकडे मंदिर नाही आणि उत्सव करण्यासाठी जागा नाही, अशा अपवादात्मक परिस्थितीमध्येच मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून अतिशय छोटे मंडप उभारावेत.
मंडपांची पाहणी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जाईल.
अधिकाधिक मंडळांनी मंदिरांमध्येच गणपती बसविण्याचा प्रयत्न करावा.
- के.
व्यंकटेशम, पोलिस आयुक्त
प्रतिनिधी, औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५२ कोटी रुपयांच्या विशेष निधीतील कामांना 'एमआयडीसी'ने सुरुवात केली आहे.
शासनाने 'एमआयडीसी', 'एमएसआरडीसी' आणि महापालिका या तीन संस्थांना कामांची विभागणी करून दिली आहे.
'एमएसआरडीसी' देखील लवकरच काम सुरू करेल अशी माहिती मिळाली आहे.
महापालिका मात्र निधीची हमी शासनाकडून मिळाल्यावर काम सुरू करणार आहे.
राज्य शासनाने शहरातील रस्त्यांकरिता २०१६ मध्ये शंभर कोटींचा विशेष निधी दिला होता.
त्यानंतर जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला आले असता आणखी १५२ कोटींच्या निधी देण्याचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.
केवळ महापालिकेऐवजी 'एमआयडीसी' आणि 'एमएसआरडीसी' या संस्थांमार्फतही रस्ते करून घेण्याचे ठरविण्यात आले.
मात्र करोनाचे संकट आल्यामुळे हा विषय मागे पडला होता.
दरम्यानच्या काळात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरात विकास कामांच्या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 'एमएसआरडीसी' आणि 'एमआयडीसी' या संस्थांना स्वनिधीतून रस्ते करण्याचे आदेश दिले होते.
पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार, 'एमआयडीसी'ने रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे.
सिडको एन वन पोलिस चौकी ते एपीआय कॉर्नर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही कामेही होणार सिडको कॅनॉट प्लेसमधील रस्ते, राज हाइटस् ते सिडको एन पाच जलकुंभ, एपीआय कॉर्नर ते कलाग्राम, साई मेडिसीन हॉस्पिटल सर्व्हे क्रमांक १५३ हर्सूल, सिडको एन तीन साई ट्रांस्पोर्ट ते शिवनाथ राठी यांचे घर, ग्रीव्हज कॉटन ते जयभवानी चौक ते नारेगाव या रस्त्यांची कामे 'एमआयडीसी' मार्फत केली जाणार आहेत.
दावा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मूर्तीसमोर झुकून वंदन करताना पीएम नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप शेयर करण्यात येत आहे.
या फोटोला शेयर करताना अनेक फेसबुक युजर हा दावा करीत आहेत की, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहरू यांच्या महानतेपुढे झुकावे लागले.
त्यांच्या महानतेचा अंदाज मोदींना आला आहे.
खरं काय आहे ?
शेयर केला जात असलेला फोटो खोटा आहे.
खऱ्या फोटोत पीएम नरेंद्र मोदी हे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आहेत.
कशी केली पडताळणी ?
रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला ओरिजनल फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलेला मिळाला.
हा फोटो ऑगस्ट २०२० चा आहे.
ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्धाटन केले होते.
निष्कर्ष नेहरू यांच्या पुतळ्यासमोर उभे असलेले पीएम नरेंद्र मोदी यांचा शेयर केला जात असलेला फोटो फेक आहे.
मोदी हे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
प्रतिनिधी, ठाणेठाणे जिल्ह्यातील महामार्ग, प्रमुख रस्ते आणि महत्त्वाचे अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत.