text
stringlengths
0
6.48k
फेसबुकवर या स्क्रीनग्रॅबला एका युजरने पोस्ट केले आणि लिहिले, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्या सैन्याकडून बेरूतील स्फोटाची जबाबदारी घेतल्याचे मान्य केले आहे.
नाही, इस्रायलने बेरूत स्फोट घडवल्याचे मान्य केले नाही.
व्हायरल होत असलेले ट्विट इस्रायल पीएम यांच्या अकाउंटवरून करण्यात आले आहे.
परंतु, हे ट्विट बेरुत स्फोटाआधीचे आहे.
आणि याचा संबंध गोलन हाइट्स मधील सीरियाच्या गमलेच्या प्रयत्नापैकी एक आहे.
बेरूत स्फोटो ४ ऑगस्ट २०२० रोजी भारतीय वेळेनुसार, ८ वाजून ५० मिनिटाच्या जवळपासू झाला होता.
तर इस्रायल पीएमचे ट्विट भारतीय वेळेनुसार, सायंकाळी ४ वाजून ३९ मिनिटांनी जवळपास ४ तास आधीचे आहेत.
तसेच Al Jazeera च्या रिपोर्टनुसार, हे ट्विट इस्रायलीच्या गोलन हाइट्सेच्या संदर्भात करण्यात आले होते.
सीरियाई हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने उत्तरादाखल दक्षिण सीरियावर हल्ला केला होता.
सीरियाई सैन्यांच्या ठिकाणावर हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी ट्विट करुन इस्रायलवर कोणत्याही हल्ल्याचे उत्तर देणारे ट्विट केले होते.
तर, नेतन्याहूने बेरूत स्फोटानंतर शोक व्यक्त करताना मदतीसाठी हात पुढे केला होता.
निष्कर्ष बेरूत स्फोट केल्याची जबाबदारी घेतल्याचा इस्रायलचा दावा खोटा आहे, असे 'मटा फॅक्ट चेक'च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
मुंबई: गावांतील आणि दुर्गम पाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड आणि जिद्द असते.
पण साधनं , मार्ग आणि आर्थिक साहाय्याच्या अभावामुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहते.
त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायची गरज असते.
गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीअभावी या विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट राहण्याची शक्यता असते.
हलाखीच्या परिस्थितीसोबत झगडत दहावीच्या परिक्षेत तब्बल ९९.
६० गुण मिळवत डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेल्या एका विद्यार्थिनीला अभिनेते आणि खासदार डॉ.
अमोल कोल्हे यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ दिलं आहे.
अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
'डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी आमलेवाडी, बोतार्डे, तालुका.
जुन्नर येथील ऋतुजा प्रकाश आमले ही दहावीच्या परीक्षेत ९९.
६० गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या पंखास बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
त्याला प्रतिसाद देत 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले', अस अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इतकंच नाही तर करोनामुळं ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाल्यानं ऋतुजाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तिला एक अॅन्ड्राइड मोबाइल फोनही तिला भेट म्हणून 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीनं देण्यात आला आहे.
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मुस्लिम पक्षाला अयोध्येत मशिदीसाठी पर्यायी ५ एकर जागा देण्यात आली आहे.
या जागेत मशिदीसह, रुग्णालय आणि संस्थेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे, तसेच रुग्णालयाचे नाव बाबरी मशीद, आणि बाबरी हॉस्पिटल असे ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
मात्र, येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीच्या नावाबाबत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
पर्यायी जागेवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीला बाबरी असे नाव देणार नाही, असे सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे.
सुन्नी वक्फ बोर्डाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
अयोध्येतील मशीद निर्मितीच्या कार्यक्रमात भूमिपूजन करण्याची इस्लाममध्ये परवानगी नसल्याचे इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने निर्माण केलेल्या नव्या ट्रस्टच्या प्रवक्त्याने सांगितले.
केवळ पाया खोदून मशीदीची निर्मिती केली जाते, मात्र या जमिनीवर रुग्णालय किंवा ट्रस्ट भवनची निर्मिती होताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येईल असेही ट्रस्टच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
मी नेहमीच माझे कार्य कर्तव्य आणि धर्म मानतो.
मला माहित आहे की कोणीही मला मशीदीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला बोलावणार नाही.
यामुळे मी जाणारही नाही, अशी प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांनी ५ ऑगस्ट या दिवशी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली होती.
वाचा- 'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'अयोध्येजवळली रौनाहीमधील धन्नीपूर येथे तयार होणाऱ्या मशिदीला बाबराचे नाव देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत.
मात्र या निव्वळ अफवा असून या मशिदीचे नाव बाबराच्या नावावर ठेवण्यात येणार नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे.
वाचा- राम भक्तांवरील कारवाई महागात पडली, २ अधिकाऱ्यांच्या बदल्यासुन्नी वक्फ बोर्डाने नुकतेच इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टची निर्मिती केली आहे.
या ट्रस्टच्या माध्यमातून अयोध्येत मशीद, रुग्णालय आणि कम्युनिटी किचन उभारण्यात येणार आहे.
या बरोबरच येथे इस्लामिक विषयांवर संशोधन करण्यासाठी एक संशोधन केंद्र देखील असणार आहे.
वाचा- Babri Masjid: बाबरी मशीद कायम राहील; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ट्विट
नवी दिल्ली : केरळ नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल याला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय.
आपल्याला आरोपमुक्त करण्याची मागणी करणारी एक याचिका आरोपी बिशपननं केली होती.
यात आपण निर्दोष असल्याचा दावाही आरोपीकडून करण्यात आला होती.
आपल्याला फसवण्यात आलं आहे, असं सांगतानाच पीडित ननच्या आर्थिक व्यवहारांवरही त्यानं प्रश्न उपस्थित केले होते.
यापूर्वी केरळ उच्च न्यायालयानं बिशप मुलक्कल याची याचिका फेटाळून लावताना खटल्याला सामोरं जाण्याचे निर्देश दिले होते.
इतकंच नाही तर ट्रायल कोर्टानंही आरोपीची एक याचिका फेटाळून लावलीय.
जून २०१८ मध्ये ४३ वर्षांच्या नन महिलेनं कोट्टायममध्ये पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
बिशपनं २०१४ आणि २०१६ दरम्यान अनेक वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.
बलात्कार पीडित महिला पंजाब स्थित 'मिशनरी ऑफ जिजस मंडळा'ची सदस्य आहे.
वाचा :Assam Rifles : जम्मू काश्मीरच्या सीमेवर पहिल्यांदाच लष्कराच्या महिला सैनिक तैनात!
वाचा :बॉयफ्रेंडसोबत लग्नाला विरोध; गर्लफ्रेंड १०० फूट उंच वीजेच्या टॉवरवर चढली अन्.
..केरळ पोलिसांच्या विशेष चौकशी समितीनं (SIT) अनेकदा चौकशी केल्यानंतर आरोपीला सप्टेंबर २०१८ मध्ये अटक केली होती.
४० दिवस तुरुंगात काढल्यानंतर आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता.
योग्यतेच्या आधारावर आम्ही काहीही भाष्य करणार नाही, परंतु आरोपीला आरोपमुक्त करण्याची याचिका फेटाळत असल्याचं पीठानं आरोपीच्या याचिकेवर म्हटलं.
सरन्यायाधीश एस ए बोबडे यांनी हे प्रकरण आरोपीला आरोपमुक्त करण्याचं नाही, अशीही टिप्पणी यावेळी केली.
वाचा :पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे दिरासोबत लग्न लावले; सासूने वेश्याव्यवसायात ढकललेवाचा :भयानक!
तरुणाला घराबाहेर फरफटत आणलं, मारहाणीनंतर मूत्र पाजलं
नवी दिल्लीः WhatsApp युजर्ससाठी एक गुड न्यूज आहे.
WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार कंपनी पुन्हा एकदा चॅट अटॅचमेंट मध्ये कॅमेरा आयकॉन उपलब्ध करीत आहे.
कंपनीने नुकतेच व्हर्जन नंबर 2.
20.
198.
9 मधून एक नवीन गुगल बीटा प्रोग्राम सबमिट केले आहे.
यात अॅपच्या अटॅचमेंटमध्ये लोकेशन आयकॉन सुद्धा नवीन डिझाईनला पाहिले जावू शकते.
वाचाः LG K31 स्मार्टफोनमध्ये दोन रियर कॅमेरे, जाणून घ्या किंमतवाचाः वाचाः शाओमीने लाँच केला स्मार्ट ओव्हन, जाणून किंमत-वैशिष्ट्येरुम्सवरून रिप्लेस झाले होते कॅमेरा आयकॉन परत आलेल्या कॅमेरा आयकॉनला काही दिवसांआधी कंपनीने रूम्स मध्ये शॉर्टकट सोबत रिप्लेस केले होते.
रूम्स कंपनीचा व्हिडिओ कॉन्प्रेसिंग प्लेटफॉर्म आहे.
ज्याला नुकतेच लाँच करण्यात आले होते.
आता WABetaInfo च्या लेटेस्ट रिपोर्ट मध्ये दावा करण्यात येत आहे की, हे आयकॉन बीटा व्हर्जन मध्ये पुन्हा एकदा लाइव करण्यात आले आहे.
कॅमेरा शॉर्टकट परत आल्याने त्या युजर्संना मोठा फायदा मिळणार आहे.
ज्या अॅपच्या मध्ये फोटो क्लिक करून कॉन्टॅक्ट्सला सेंड करण्याची सवय आहे.
वाचाः रेडमी नोट ८ प्रोला मिळतोय लेटेस्ट MIUI 12 अपडेटवाचाः नोकिया घेवून येतेय अँड्रॉयडवर चालणारा जगातला पहिला फीचर फोनसर्व बीटा युजर्सपर्यंत पोहोचेल अपडेट अँड्रॉयड अॅपसाठी आलेल्या या अपडेटला सर्व बीटा युजर्स पाहू न शकतील.
परंतु, हे जवळपास निश्चित आहे की, काही दिवसात कंपनी सर्व बीटा युजर्संपर्यंत हे अपडेट पोहोचले जाईल.
बीटा टेस्टिंग नंतर कंपनी या फीचरच्या स्टेबल अपडेट ला सुद्धा युजर्ससाठी रोलआउट करणार आहे.
वाचाः जगातील सर्वात फास्ट इंटरनेट स्पीड, एका सेकंदात पूर्ण Netflix डाउनलोडवाचाः जगातील सर्वात फास्ट इंटरनेट स्पीड, एका सेकंदात पूर्ण Netflix डाउनलोडया महिन्यात आले होते अडवॉन्स सर्च मोड फीचर या महिन्याच्या सुरुवातीला अँड्रॉयड बीटा अॅप साठी अडवान्स सर्च मोड ऑप्शन दिले होते.
हे अपडेटचे व्हर्जन नंबर 2.
197.
7 होते.
या फीचरच्या मदतीने युजर्स चॅटमध्ये फोटो, व्हिडिओ आणि ऑडियो सह सर्व कॉन्टॅक्टला मेन सर्च टूल बार मध्ये जावून सर्च करू शकते.
वाचाः जिओचे ८४ दिवसांचे प्लान, अनलिमिटेड कॉलिंग आणि जबरदस्त डेटावाचाः ओप्पोचा नवा स्मार्टफोन भारतात येतोय, २०२० मधील सर्वात स्लीम फोन
silver school parisar jawal street light nhi, tasech untawadi parisar jawl sudha nhi, mothi gadi high beam use krta bike wale cha problem hoto.
करूर (तामिळनाडू): चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत होरपळून आई आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
तामिळनाडूच्या करूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रामनाथपुरम येथील बालकृष्णन (वय ३१) याचे मुथुलक्ष्मी (वय २१) हिच्याशी सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
या दोघांना दर्शित (वय ३) आणि रणजित (वय २) अशी दोन मुले होती.
बालकृष्णन आणि मुथुलक्ष्मी या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती.
त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते.
मुथुलक्ष्मी ही दोन वर्षांपूर्वी करूरमध्ये राहायला आली होती.
तिच्यासोबत तिची दोन्ही मुले होती.
सोमवारी सकाळी तिच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजारच्या काही लोकांनी पाहिले.
त्यांनी घराचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला.
मुथुलक्ष्मी ही होरपळली होती.
तर दोन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत सापडली.
त्यांनी दोन्ही मुलांना उचलले आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तेथे डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या बंबासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
मुथुलक्ष्मीचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला आणि विच्छेदनासाठी रुग्णालयात नेला.