text stringlengths 0 6.48k |
|---|
महापालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील (कंटेंन्मेंट झोन) लॉज, गेस्ट हाउस आणि निवासी हॉटेल्स खुली करण्यास परवानगी देण्याचे आदेश आयुक्त विक्रमकुमार यांनी सोमवारी काढले. |
त्यानुसार, लॉज-हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविणे, सुरक्षित वावर ठेवण्यासाठी जागोजागी खुणा करणे, हॉलेटमध्ये उतरणाऱ्या अतिथीची आरोग्यविषयक सर्व माहितीची नोंद ठेवणे, आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक करणे, अतिथी बाहेर पडल्यानंतर संबंधित खोली निर्जंतुक करून २४ तासांसाठी पूर्ण रिकामी ठेवण... |
हॉटेल, लॉजमधील लिफ्ट, रेलिंग, आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे यांची वेळोवेळी सफाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. |
बुधवारपासून हॉटेल्स, लॉजसह मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स नागरिकांसाठी खुले होणार असल्याने त्याबाबतची कार्यपद्धती (एसओपी) पालिकेने सोमवारी निश्चित केली. |
मॉलमधील कर्मचारी आणि ग्राहक या सर्वांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. |
मॉलमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राखण्याची दक्षता घेणे, त्यासाठी ठिकठिकाणी सुरक्षित अंतराच्या खुणा करणे, मॉलमध्ये प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत सर्व ठिकाणी मास्कचा वापर करणे, नागरिकांच्या वारंवार संपर्कात येणाऱ्या मॉलमधील जागांची सातत्याने स्वच्छता करणे, कर्मचारी-ग्राहक यांनी वापरलेल्या मास्क, हँडग्लोव्हजची विल्हेव... |
प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात त्याच्या 'सीए'ची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. |
पैसे नेमके कुठे व कसे वळवले गेले, तसेच नेमके कसे आर्थिक व्यवहार झाले, याचा तपास ईडीकडून केला जात आहे. |
सुशांतसिंह राजपूतच्या खात्यातून १५ कोटी रुपये त्याची मैत्रिण रीया चक्रवर्ती हिने खात्यात वळते केल्याचा ईडीला संशय आहे. |
त्यानुसार ईडीने गुन्हा दाखल केला आहे. |
या संबंधीच्या तपासात ईडीने सोमवारी सुशांतच्या सीएला चौकशीसाठी बोलवले होते. |
सुशांतने रीया व तिच्या भावाच्या सहकार्याने तीन कंपन्या स्थापन केल्या होत्या. |
त्या कंपन्यांमध्ये नेमके व्यवहार कसे झाले? |
त्यात पैशांचा गैरवापर तर झाला नाही ना? |
याचा तपास ईडी करीत आहे. |
यासाठीच सीएला सोमवारी पाचारण करण्यात आले. |
याच प्रकरणात सीएकडून संपूर्ण माहिती घेऊन लवकरच रीया व तिच्या भावालादेखील चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. |
प्रतिनिधी, नाशिक नाशिकमधील घरांना लॉकडाउनमध्येही चांगली मागणी असून, लॉकडाउनमध्ये अर्थचक्र संथ असतानाही त्यानंतरच्या अवघ्या सव्वादोन महिन्यांत मालमत्ता खरेदी विक्रीचे तब्बल २०७८९ दस्त नोंदविण्यात आले असून, त्यातून मुद्रांक शुल्क विभागाला १३७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. |
आता मुद्रांक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली असून, व्यवहारांची संख्या वाढल्यास त्यातून होणारा तोटा भरुन निघेल, अशी शक्यता आहे. |
नाशिक विभाग राज्यात मुद्रांक शुल्क वसुलीत आघाडीवर आहे. |
नाशिकची मुंबई-पुण्याशी असलेली कनेक्टिव्हिटी, येथील वातावरण तसेच इतर शहरांच्या तुलनेत आवाक्यातील गृहप्रकल्प यामुळे नाशिकमधील घरांना चांगली मागणी असते. |
लॉकडाउनच्या काळात २३ मार्च ते १८ मे दरम्यान सर्व व्यवहार बंद असल्याने एप्रिलमध्ये एकही दस्त नोंदविण्यात आला नाही. |
१८ मे रोजी सरकारी कार्यालये सुरू झाल्यानंतर दस्तनोंदणीस सुरुवात झाली. |
यानंतर रखडलेली खरेदीप्रकरणे मार्गी लागली. |
१८ मे ते ३१ जुलैदरम्यान नाशिक जिल्ह्यात २० हजार ७८९ दस्तांची नोंदणी झाली. |
त्यातून सरकारला स्टॅम्प ड्युटीच्या रुपाने १३७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. |
गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवहार २५ ते ३० टक्क्यांनी कमी असले तरी सध्याच्या परिस्थितीत आशादायी असल्याचे चित्र आहे. |
टार्गेटच्या १०३ टक्के वसुली ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सरकारकडून नाशिक मुद्रांक शुल्क विभागाला ७६० कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते. |
इतर जिल्ह्यांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी कस लागत असताना नाशिक विभागाने मात्र २० मार्च २०२० पर्यंतच टार्गेटच्या १०३ टक्के वसुली केली. |
या आर्थिक वर्षात १ लाख १६ हजार ४५६ दस्त नोंदविले गेले आणि त्यातून ७८० कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क नाशिक विभागाला प्राप्त झाला. |
२०१८-१९ या आर्थिक वर्षातही १ लाख १९ हजार ६७५ व्यवहार नोंदवले गेले, त्यातून विभागाला ७४० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. |
बांधकाम व्यवसायाला दिलासा देण्यासाठी सरकारने स्टॅम्प ड्युटीमध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. |
यामुळे व्यवहारांची संख्या वाढण्याची शक्यता असून, त्यातून निश्चित केलेल्या टार्गेटपर्यंत मुद्रांक शुल्क मिळण्याची अपेक्षा आहे. |
-अ निल पारखे, मुद्रांक जिल्हाधिकारी |
वृत्तसेवा, नवी मुंबईमागच्या तीन दिवस झालेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणच्या निसर्गसंपदेचे नुकसान झाले आहे. |
नेरूळ आणि बेलापूरच्या सीमेवर असलेल्या निसर्गसंपन्न पारसिक हिल टेकडीलाही याचा फटका बसला. |
येथील अनेक मोठमोठे वृक्ष मुळांसह उन्मळून पडले आहेत. |
या झाडांचे संगोपन करणाऱ्या रहिवाशांनी ही निसर्गसंपदा वाचवण्यासाठी पुढाकार घेतला असून उन्मळून पडलेल्या झाडांचे त्याच ठिकाणी पुनर्रोपण त्यांनी केले आहे. |
या वादळी वारा-पावसात पारसिक हिल टेकडीवरील सरासरी २५ ते ३० मोठी झाडे उन्मळून पडली. |
ही झाडे दहा ते पंधरा वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहेत. |
झाडांची लागवड येथील पारसिक हिल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. |
त्यांचे संगोपनही त्यांच्या वतीनेच केले जात होते. |
त्यांना सकाळ-संध्यकाळी पाणी घालण्याचे कामही असोसिएशनचे सदस्य करतात. |
त्यामुळे या झाडांबरोबर त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले. |
त्यांना कोसळलेले पाहून सर्वांनाच दुःख झाले. |
म्हणूनच या झाडांचे पुनर्रोपण करण्याची कल्पना काहींच्या मनात आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. |
या झाडांच्या उन्मळून पडल्याने या टेकडीची हिरवळ कमी झाली. |
या झाडांच्या जागी दुसरी झाडे लावली, तर ती मोठी व्हायला आणखी दहा-बारा वर्षे जातील. |
त्यापेक्षा याच झाडांचे पुनर्रोपण करून त्यांची काळजी घ्यायचा निर्धार त्यांनी केला. |
झाडे मोठी असल्याने ती हाताने उचलणे शक्य नव्हते. |
त्यामुळे क्रेन मागवून त्याच्या साह्याने झाडे उचलून योग्य ठिकाणी त्यांचे रोपण अगदी व्यवस्थित करण्यात आले. |
झाडे पडून जाऊ नयेत, यासाठी झाडांना एकमेकांशी दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. |
या झाडांची काळजी घेण्याची शपथ येथील रहिवाशांनी घेतली आहे. |
'तुफान वादळामुळे झाडांची पडझड झाली होती. |
ती पडझड नीट कापून पुन्हा क्रेनद्वारे पुनर्रोपण करण्यात आले. |
खूप वर्षांपासून लावलेली ही झाडे पडल्यामुळे पारसिक हिलवर राहणाऱ्या आम्हा सर्वांना अतिशय वाईट वाटले. |
परंतु पारसिक हिल असोसिएशनतर्फे या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. |
मोठी झाडे क्रेनद्वारे सरळ करून दोरी बांधून ठेवण्यात आली आहेत,' असे रहिवासी जयंत ठाकूर यांनी सांगितले. |
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना करोना व्हायरसच्या आजाराबाबत जनतेला मोठा दिलासा दिलाय. |
'देशात तीन करोना लसींवर काम सुरू आहे. |
शास्त्रज्ञांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांचे उत्पादन सुरू होईल', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. |
आता या तीन कंपन्या कोणत्या आहेत ज्या करोनाच्या लसीवर काम करत आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. |
तर याचं उत्तर खुद्द शास्त्रज्ञ आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) चे महासंचालक शेखर मांडे यांनी दिलं आहे. |
'सीरम इन्स्टिट्यूट', 'झाइडस कॅडिला' आणि 'भारत बायोटेक' या तीन कंपन्यांकडून करोनाची ल लस तयार करण्याचे काम सुरू आहे. |
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्यातून सीरम इन्स्टिट्यूट, झाइडस कॅडिला आणि भारत बायोटेक या कंपन्या करोना लसीवर काम करत आहेत. |
महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारतीय शास्त्रज्ञही मागे नाहीत. |
पुढील काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत, असं शेखर मांडे यांनी सांगितलं. |
झायडस कॅडिलाची करोनावरील लस क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. |
लसची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली. |
लस दिल्यानंतर स्वयंसेवक निरोगी असल्याचे क्लिनिकल ट्रायल्सच्या पहिल्या टप्प्यात आढळून आले, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. |
आता दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी ही देशाच्या विविध भागातील १००० नागरिकांवर घेण्यात येणार आहे. |
धूर्त चीनने भारताला 'अशा' दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाकरोना लसीच्या संदर्भात पंतप्रधान मोदींचं महत्त्वाचं विधानभारत बायोटेक कंपनीद्वारे देशातील १२ केंद्रांवर करोना लसीची चाचणी सुरू आहे. |
देशाच्या विविध भागांमध्ये लसचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. |
आता दुसरा टप्पा सप्टेंबरच्या सुरवातपासून सुरू होण्याची शक्यता आहे. |
काय म्हणाले पीएम मोदी? |
भारतात आज करोनावर एक, दोन नव्हे तर तीन लसींच्या चाचण्या सुरू आहेत. |
शास्त्रज्ञांकडून ग्रीन सिग्नल मिळताच त्यांचे उत्पादन सुरू केले जाईल. |
कमीत कमी वेळेत देशातील नागरिकांपर्यंत ही लस कशी पोहोचवायची याची ब्लू प्रिंट तयार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. |
कोलंबो: करोना विषाणूमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे चार महिने बंद असलेल्या श्रीलंकेतील सर्व शाळा नियमित सोमवारी सुरू झाल्या. |
श्रीलंकेत पहिला कोविड- १९ रुग्ण मार्च महिन्याच्या मध्यावर आढळला होता. |
त्यानंतर तेथे लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. |
जुलै महिन्यात काही ठराविक इयत्तांच्या शाळा सुरू झाल्या होत्या, पण करोना संक्रमण पुन्हा वाढल्याने त्या काही दिवसांतच बंद करण्यात आल्या. |
आता पुन्हा १० ऑगस्टपासून त्या सुरू करण्यात आल्या आहेत. |
'सर्व शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. |
प्रत्येक इयत्ता टप्प्याटप्याने सुरू होतील,' असं शिक्षण सचिव एनएचएम चित्रनंदा म्हणाले. |
२०० विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा लॉकडाऊनपूर्वी जशा सुरू होत्या तशाच नियमितपणे सुरू होतील. |
वर्गात मुलांमध्ये एक मीटरचं अंतर ठेवून या शाळा सुरू होतील. |
मात्र जेथे २०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्या शाळांचे वर्ग इयत्तानिहाय वेगवेगळ्या दिवशी सुरू राहतील. |
याबाबत आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशांचे पालन केले जाईल, असे चित्रनंदा म्हणाले. |
शाळांच्या कॅन्टीन तूर्त बंद राहतील. |
आरोग्य विभागाकडून कोविड - १९ विषाणू संसर्ग पूर्णत: नियंत्रित झाल्याशिवाय कॅन्टीन उघडायला परवानगी नसेल. |
शाळा कधी उघडणार? |
काय आहे सद्यस्थिती? |
'या' राज्याच्या दहावीच्या परीक्षेत एकही नापास नाही! |
देशात कोविड - १९ विषाणूचे कम्युनिटी संक्रमण पूर्णपणे नियंत्रणात आले असल्याने शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. |
३० एप्रिल पासून श्रीलंकेत करोनाची एकही कम्युनिटी केस नाही. |
मात्र करोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही, असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. |
श्रीलंकेत अद्यापपर्यंत २,८४४ करोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. |
यापैकी २,५७९ रुग्ण बरे झाले तर ११ जणांचा मृत्यू झाला. |
दावा इस्रायलचे पंतप्रधान यांच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आलेल्या स्क्रीनग्रॅब सोशल मीडियावर या दाव्याने शेयर केला जात आहे की, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकत्या लेबनानच्या बेरूत झालेल्या स्फोटाचा जबाबदारी घेतली आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.