text
stringlengths
0
6.48k
पाघलवनच्या पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी सांगितले की, घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, त्यात मोबाइल फोन, पंखा, फ्रिज, टीव्ही हे पूर्णपणे जळून खाक झाले होते.
प्राथमिक चौकशीनंतर शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असे पोलिसांनी सांगितले.
महिलेचा मृतदेह सोफ्यावर आढळून आला.
तर तिच्यासमोरच तिची दोन्ही मुले बेशुद्धावस्थेत पडली होती.
दोघांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती.
मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
आणखी बातम्या वाचा: धक्कादायक!
कुमारी मातेनं नवजात बाळाला ६व्या मजल्यावरून फेकलंपत्नी सेक्स करू देत नव्हती, पतीनं गळफास घेऊन केली आत्महत्या'तिच्या'सोबतच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ प्रियकराने केला व्हायरल अन्.
..लॉकडाउनमध्ये नाइट पार्टी; पोलिसांनी भररस्त्यात 'धनाढ्यां'ची काढली धींडपुणे: पत्नी नांदायला येत नाही म्हणून वाद; जावयाने केला सासऱ्याचा खून
पुणेः येत्या २७ ऑगस्ट रोजी माजी खासदार राजू शेट्टी हे बारामतीत दुध उत्पादकांसमवेत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीशी सूत जुळल्यानंतरही ते येथे मोर्चा काढत आहेत.
राज्यातील एकूण संकलित दूध उत्पादनापैकी निम्मे दूध पुणे जिल्ह्यातच संकलित होत असल्याने दुधाचे आंदोलन येथून सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचा राजकीय अंदाज बांधला जात आहे.
राज्यातील दुध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असून २५ रुपये प्रतिलिटरचा दर राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचे सरकार आल्यानंतरही १७ ते १८ रुपयांवर घसरला आहे.
उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने दुध उत्पादकांना दर मिळत असून प्रतिलिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च असलेल्या दुधाचा दर वाढवून द्यावा, दुधावरील जीएसटी रद्द करावी, केंद्र सरकारने दुधाच्या भुकटी आयातीचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या घेऊन स्वाभिमानीने दुध दर आंदोलन सुरू केले आहे.
महाड दुर्घटना; बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखलयेत्या २७ ऑगस्ट रोजी बारामतीतील प्रांत कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे.
या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेट्टी यांनी केले असून या आंदोलनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नेमकी कशी राजकीय उभारी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
लॉकडाऊन हवं की नको?
मनसेच्या ऑनलाइन सर्वेक्षणाचा रिझल्ट आलाराजू शेट्टी यांना नेमके काय साधायचेय?
सन २०११ मध्ये राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते, तेव्हा राजू शेट्टी यांनी नोव्हेंबर २०११ मध्ये गळीत हंगाम २०१२-१३ च्या पहिला हप्ता २३५० रुपये प्रतिटनी मिळावा यासाठी त्यांनी पंढरपूर ते बारामती ही पदयात्रा काढली होती आणि आघाडी सरकारविरोधात राळ उठवली होती.
या आंदोलनानंतर त्यांनी बारामतीतच ठिय्या दिला आणि त्यांनी केलेल्या उपोषणाच्या घोषणेने राज्य सरकारही हादरले होते.
राजू शेट्टी यांच्या या आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभरात चर्चेत आली.
त्यानंतर मधल्या काळात भाजप सरकारशी या संघटनेने सूत जुळवले.
त्यातून सदाभाऊ खोत हे राज्यमंत्री झाले.
मात्र नंतर संघटनेत दोन विचारधारा झाल्या व खोत यांना संघटनेतून काढण्यात आले, खोत यांनी स्वतंत्र रयत क्रांती संघटना काढली.
त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणूकीत राजू शेट्टी पराभूत झाले.
आता राज्याच्या राजकारणातील अवकाश भरून काढण्यासाठी शेट्टी सातत्याने संधी शोधत आहेत.
मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात त्यांनी केलेले दूध दराचे आंदोलनही गाजले.
विशेषतः त्यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात रेल्वे स्थानकात थांबून गुजरातमधून येणाऱ्या दुधाच्या रेल्वेस केलेला विरोध सर्वांच्याच लक्षात आला.
त्यांच्या आंदोलनामुळे सरकारलाही नमते घेत प्रतिलिटर २५ रुपये दराची घोषणा करावी लागली होती.
आता बारामतीत पुन्हा एकदा राजू शेट्टी येत आहेत.
फरक थोडा पडला आहे.
पुन्हा सरकार महाविकासआघाडीचे असले तरीदेखील राजू शेट्टी यांनी काळानुसार या सरकारशी मिळतेजुळते घेतले आहे.
अशा परिस्थितीत त्यांचे हे आंदोलन पूर्वीसारखेच टोकदार होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
अर्थात इंदापूर- बारामतीत दुधाचे अनेक प्रकल्प आहेत व सर्वाधिक दूध संकलन याच ठिकाणी होते.
त्यामुळेही येथेच आंदोलन करण्याचा निर्णय शेट्टी यांनी घेतला असण्याची शक्यता आहे.
- पं.
ओम्‌कार अ.
जोशी, ज्यो.
शास्त्री रविवार, २३ ऑगस्ट २०२०.
ऋषिपंचमी.
आज चंद्र तुळ राशीत विराजमान असणार आहे.
काही राशीच्या व्यक्तींचा कुटुंबासोबतचा वेळ उत्तम जाईल.
तर काही राशीच्या व्यक्तींना वर्क फ्रॉम होम करताना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जाणून घेऊया.
..आजचे मराठी पंचांग : रविवार, २३ ऑगस्ट २०२०मेष : आपल्या तत्ववादी धोरणाला थोडीशी मुरड घाला.
नवीन लिखाण वाचण्याचं काम सुरू करा.
कुटुंबासोबतचा वेळ अगदी उत्तम आणि प्रसन्न जाईल.
फिरायला जाण्याची संधी प्राप्त होईल.
धनवृद्धीचे योग आहेत.
मानसिक शांतता लाभेल.
दिवसाच्या उत्तरार्धात नवीन ओळख होईल.
सदर व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.
अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ : घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या.
खाण्यापिण्याची रेलचेल होईल.
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
आरोग्याची काळजी घ्या.
व्यापारी वर्गाने आळस झटकून केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे.
अति तेथे माती, ही उक्ती स्मरणात ठेवावी.
कौटुंबिक वातावरण आनंदी व सकारात्मक राहील.
दिवसाच्या उत्तरार्धात सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल.
मिथुन : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.
एखादा महत्त्वाचा प्रकल्प अमलात आणाल.
नवीन कार्यारंभातून यशप्राप्ती व फायदा मिळण्यासाठी साधारण एका वर्षाचा कालावधी जाईल.
निराशात्मक विचार टाळावेत.
संयम बाळगावा.
आर्थिक लाभाचे योग जुळून येत आहेत.
जागा, जमीन यांत केलेली गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल.
आर्थिक स्थिती संतुलित ठेवणे हिताचे ठरेल.
ऋषिपंचमीचे व्रत का आचरतात?
जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व व मान्यताकर्क : गरज नसताना आक्रमक रूप धारण करू नका.
आपल्या बौद्धिकतेची लोकांना प्रचिती येईल.
भाग्याची उत्तम साथ लाभेल.
वर्क फ्रॉम करताना लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
व्यवसाय, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना नवीन करार, प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
यामुळे कामे गतिमान होतील.
नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
सिंह : मुलांचे प्रेम लाभेल.
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वैवाहिक जीवन आनंददायी असेल.
उत्साहाने कार्यरत राहाल.
जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल.
भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
आध्यात्मिक आवड निर्माण होईल.
कन्या : आपल्या बोलण्याने लोकसंग्रह कराल.
घरातील व्यक्तीशी सल्ला मसलत करून निर्णय घ्या.
कार्यालयातील सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.
प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्णत्वास न्याल.
कुटुंबातील एखादा वाद ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्तक्षेपानंतर संपुष्टात येऊ शकेल.
रचनात्मक कार्ये हातून घडतील.
नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी एकंदरीत परिस्थितीचा सारासार विचार करावा.
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल.
आर्थिक स्थिती उत्तम राहील.
मुंबईचा सिद्धिविनायक, मंदार वृक्ष आणि स्वामी समर्थांची लीलातुळ : घरामध्ये बरेच दिवस राहिलेले कार्य पूर्ण करायचा ध्यास घ्या.
छोटे प्रवास घडतील.
व्यापार, उद्योग व व्यवसायाशी निगडीत व्यक्तींना त्रिकोणीय भागीदारीतून लाभ मिळतील.