text stringlengths 0 6.48k |
|---|
५२००० करोड राशी देशांतर्गत तयार होणाऱ्या साहित्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. |
अर्थमंत्री सीतारमण यांनी संरक्षण साहित्यासाठी येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) टक्केवारी ४९% पासून ७४% वाढवण्याची घोषणा मे २०२०मध्ये केली होती. |
ते पाऊलसुद्धा या नव्या प्रकल्पाला पूरक ठरेल. |
एप्रिल २०१५पासून ऑगस्ट २०२०पर्यंत संरक्षण साहित्यावर एकूण रु. |
३. |
५ लाख करोड खर्च करण्यात आले होते. |
पुढील ६-७ वर्षात सुमारे रु. |
४ लाख करोड भारतात बनणाऱ्या संरक्षण साहित्यावर खर्च होतील अशी सरकारची अपेक्षा आहे. |
यावरून या नव्या कार्यक्रमाबाबतीत भारत सरकार गंभीर आहे आणि त्यांनी आपला गृहपाठ चोख केला आहे, याची शहानिशा होते. |
भारताला सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भरतेशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव प्रकर्षाने गेल्या सहा महिन्यात झाली आहे. |
संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेकडील हे पाऊल म्हणजे कोव्हिड साथीच्या काळ्या ढगाची एक चंदेरी किनार आहे, असं म्हणायला हरकत नाही! |
प्रतिनिधी, मुंबईतोट्यात असलेले व त्याचवेळी आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा सामना करणारे मुंबई विमानतळ अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. |
विमानतळावरील ५०. |
५० टक्के व पुढे उर्वरित हिस्सा खरेदी करण्याच्या हालचाली अदानी समूह व जीव्हीके यांच्यात सुरू झाल्या आहेत. |
मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ 'मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड'मार्फत (मिआल) चालवले जाते. |
मिआल ही जीव्हीके होल्डिंगची उपकंपनी आहे. |
या कंपनीत ५०. |
५० टक्के हिस्सा जीव्हीके समूहाचा आहे. |
तर १३. |
५० टक्के भागीदारी दक्षिण आफ्रिकन कंपनीची आहे. |
तर १० टक्के भागीदारी अबु धाबीच्या पेन्शन प्राधिकरणाने केली आहे. |
उर्वरित २६ टक्के भागीदारी केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाची आहे. |
यापैकी जीव्हीकेचा ५०. |
५० टक्के पहिल्या टप्प्यात व दक्षिण आफ्रिकन कंपनी आणि अबुधाबीचा १० टक्के हिस्सा पुढील टप्प्यात खरेदी करण्याची तयारी अदानी समूहाने सुरू केली आहे. |
असा प्रयत्न त्यांनी मागीलवर्षीही केला होता, हे विशेष. |
याआधी मिआलमध्ये जीव्हीके व दक्षिण आफ्रिकन विमानतळ कंपनीसह बिडवेस्ट या कंपनीची भागीदारी होती. |
पण बिडवेस्ट मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये १० टक्क्यांसह बाहेर पडली. |
त्यावेळी बिडवेस्टचा हा हिस्सा १२४८ कोटी रुपयांना खरेदी करण्यासह एकूण १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी अदानी समूहाने केली होती. |
परंतु त्यावेळी जीव्हीकेने अबुधाबीहून ७६४८ कोटी गुंतवणूक आणत 'अदानी'ला रोखले होते. |
आता मात्र मिआल कंपनीच संकटात आहे. |
त्यामुळे अदानी समूहाने याबाबत आक्रमकरित्या चर्चा सुरू केली आहे. |
संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'अदानी समूहाचा हा व्यवहार येत्या काही आठवड्यांत पूर्ण होऊ शकतो. |
या व्यवहारांना अबुधाबी पेन्शन निधी आणि राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधीनेही मंजुरी दिली आहे. |
हा व्यवहार पूर्ण झाल्यास मुंबईचे विमानतळाची ७६ टक्के हिस्सेदारी अदानी समूहाकडे जाईल. |
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे ( एमएमआरडीए ) संचालक (प्रणाली) कुलवेंद्र सिंह कपूर यांचे चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून कोसळून निधन झाले असून हा अपघात आहे, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करीत आहेत. |
ही घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली. |
घटना घडली तेव्हा घरामध्ये त्यांची पत्नी आणि २५ वर्षीय मुलगा होता. |
( MMRDA Director Kulvindar Singh Kapur Death )वाचा: महापौरांवर कोसळला दु:खाचा डोंगर; मोठ्या भावाचे करोनाने निधनकुलवेंद्र सिंह कपूर (५५) हे वांद्रे कुर्ला संकुलातील एका इमारतीत कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. |
चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून ते काल रात्री कोसळले आणि एकच खळबळ उडाली. |
कुलवेंद्र सिंह हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाने तातडीने सर्वांना कल्पना दिली. |
त्यानंतर एमएमआरडीएतील अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. |
मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. |
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. |
कपूर हे एमएमआरडीएच्या सेवेत दाखल होण्याआधी पश्चिम रेल्वे येथे कार्यरत होते. |
२ जुला २०१९ पासून ते एमएमआरडीएमध्ये कार्यरत होते. |
बीकेसी पोलीस स्टेशनकड़ून या घटनेचा तपास सुरू आहे. |
वाचा: सोनू सूदच्या मागे कोण आहे हे भविष्यात कळेलच-राज ठाकरेघात की अपघात, अद्याप स्पष्ट नाहीकुलवेंद्र कपूर हे चौथ्या मजल्यावरून कोसळले आहेत. |
त्यांनी उडी मारली की ते अपघाताने कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. |
घटनेवेळी पत्नी आणि मुलगा घरातच होते. |
अपघातानंतर त्याना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. |
मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. |
याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे बीकेसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आनंद मुळये यांनी सांगितले. |
वाचा: राज्यात सरकारचे स्टेअरिंग कुणाकडे? |
; CM ठाकरेंनी दिले 'हे' उत्तरराजीव यांनी व्यक्त केला तीव्र शोकएमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. |
राजीव यांनी कुलवेंद्र सिंह कपूर यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. |
कुलवेंद्र यांच्या जाण्याने एमएमआरडीएमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. |
एमएमआरडीए एक परिवाराप्रमाणे या कठीण प्रसंगी कपूर कुटुंबाच्या सोबत आहे. |
ईश्वर कुलवेंद्र यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना, अशा भावना राजीव यांनी व्यक्त केल्या. |
वाचा: चंद्रपुरात करोनाचा पहिला बळी; अमरावतीत १५ दिवस वास्तव्याला होता |
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीरपणे झापल्यानंतर आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. |
एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं, अशी प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. |
निलेश राणे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. |
स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत शरद पवारांनी फटकारले हे वाचून व ऐकून धक्का बसला. |
एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले, असं सांगतानाच हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून होता? |
, असा सवाल निलेश राणे यांनी पवारांना केला आहे. |
अजितदादा शरद पवारांशी काय बोलले? |
; जयंत पाटलांनी दिली 'ही' महत्त्वाची माहितीतर, या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केली होती. |
त्यांनी पार्थ यांना लंबी रेस का घोडा म्हटलं होतं. |
आज परत सांगतो. |
पार्थ लंबी रेस का घोडा आहे. |
थांबू नकोस मित्रा, असं नितेश यांनी म्हटलं होतं. |
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा पवार कुटुंबातील प्रश्न आहे, असं सांगत पवारांना टोला लगावला होता. |
निशाणा नेमका कुणावर? |
काय म्हणाले होते पवार? |
पार्थचा अनुभव कमी आहे. |
तो प्रगल्भ नाही. |
त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले. |
तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. |
कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही. |
मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं पवार म्हणाले होते. |
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास पार्थ यांनी नकार दिला होता. |
मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. |
काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. |
त्यावेळी त्यांनी एक निवेदन देऊन सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. |
आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. |
खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. |
या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना आहे. |
त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, असं पार्थ यांनी म्हटलं होतं. |
Nitesh Rane: पवारांचा नातू झाला भाजपचा मित्र! |
; नितेश यांनी केलं 'हे' खास ट्विट |
प्रतिनिधी, औरंगाबाद'लॉकडाऊन'मुळे जवळपास सर्वच व्यवहार थांबले होते. |
'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. |
त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यामुळे घर खरेदी करताना ग्राहकांवरील बोजा हलका होणार असून, निवारा स्वस्त होणार आहे. |
शिवाय या निर्णयामुळे व्यवहार वाढून सरकारी तिजोरीला फायदाच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. |
'लॉकडाऊन'नंतर औरंगााबाद विभागात मुद्रांक शुल्क विभागाला तिन्ही जिल्ह्यांत व्यवहाराला हळूहळू सुरुवात झाली होती. |
आता सरकारच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य घर खरेदी करणाऱ्यांना मार्च २०२१पर्यंत फायदा होणार आहे. |
करोना संसर्गामुळे २५ मार्चपासून सर्व महसूल शासकीय कार्यालयातील बंद पडलेलेल्या व्यवहाराचा परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला. |
जमीन, गृह खरेदीचे सर्व व्यवहार देखील आठ मेपर्यंत बंद होते, मात्र आता दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. |
औरंगाबादसह बीड आणि जालना जिल्ह्यातील व्यवहारही सुरू झाले असून, शासनाला बऱ्यापैकी महसूल मिळण्यास सुरुवात झाली आहे. |
त्यातच राज्य सरकारने करोना आणि 'लॉकडाऊन'मुळे अडचणीत आलेल्या बांधकाम क्षेत्राला आणि घर खरेदीला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्काच्या दरात दोन ते तीन टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.