text
stringlengths
0
6.48k
या निर्णयामुळे व्यवहारात निश्चित फायदा होणार असल्याचे संकेत आहेत.
कारण 'लॉकडाऊन'चे निर्बंध शिथिल केल्यावर मुद्रांक व शुल्क दस्त नोंदणीचे (रजिस्ट्री) व्यवहार सुरू झाल्यानंतर औरंगाबाद विभागात अवघ्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये शासनाला तब्बल १४ कोटी ६७ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता, यामध्ये औरंगााबद जिल्ह्याने पाच कोटी ५४ लाख, जालना चार कोटी ७१ लाख आणि बीड जिल्ह्यातील व्यवहारातून चार क...
'लॉकडाऊन'नंतर मे महिन्यामध्ये कार्यालये सुरू करण्यात आली.
त्यानंतर नोंदणी विभागाचे कर्मचारी 'करोना'चे वातावरण असतानासुद्धा 'रिस्क झोन'मध्ये काम करून आपली जबाबदारी पाडत आहेत.
मागील वर्षी ६२५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते.
६२९ कोटी रुपये शुल्क संकलन करून औरंगाबाद विभागाने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, मुद्रांक शुल्क दरकपातीच्या निर्णयामुळे व्यवहारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
करोना संसर्गाच्या काळात सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना निश्चित होईल.
- सोहम वायाळ, नोंदणी उपमहानिरिक्षक, औरंगाबाद विभाग
मुंबई: मुंबईत काल चार तासात ३०० मिमी विक्रमी पाऊस पडला.
गेल्या ३० वर्षात मी असा पाऊस कधीच पाहिला नाही.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच, असं सांगतानाच काल मुंबईतील काही भागांत एकप्रकारचे वादळच आले होते, असं मुंबई महापालिकेचे पालिका आयुक्त आय.
चहल यांनी सांगितलं.
पेडर रोडवरील हँगिग गार्डनजवळ आज भिंत खचून सुमारे ५० वृक्ष उन्मळून पडले.
त्याची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त आय.
चहल आले होते.
या पाहणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
मुंबईत काल ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते.
हे एक प्रकारचं वादळच होतं.
पण संपूर्ण मुंबईत हे वादळ नव्हतं.
दक्षिण मुंबईतच त्याचा प्रभाव होता.
वादळ दोन प्रकारचे असतात कालचे वादळ हे त्यापैकी एक होते, असं चहल म्हणाले.
काल कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसरात विक्रमी पाऊस झाला.
मुंबईत चार तासांत ३०० मिमी पाऊस पडला.
मी ३० वर्षांपासून मुंबईत आहे.
पण असा पाऊस कधीच पाहिला नाही.
२६ जुलैलाही मी मुंबईत होतो.
पण त्यावेळीही असा पाऊस कधीच पाहिला नव्हता, असं त्यांनी सांगितलं.
सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर सुरूपावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं.
रस्त्यावर आणि रेल्वेरुळावर पाणी साचल्याने अनेक लोक अडकून पडले होते.
आम्ही रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून दोघांच्या समन्वयाने अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
पालिकेने या लोकांच्या राहण्याची पालिकेच्या शाळेत व्यवस्था केली होती.
त्यांना पालिकेकडून भोजनही देण्यात आले.
आता मुंबईतील पाणी ओसलं आहे.
त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
हिंदमाता परिसरातही पाणी तुंबलेलं नाही.
काल जेजे रुग्णालयात संध्याकाळी ७ वाजता पाणी भरलं होतं.
संध्याकाळी १० वाजेपर्यंत आम्ही पाण्याचा निचरा केला, असंही ते म्हणाले.
वाचा: सावधान!
मुंबईवर अतिवृष्टीचे ढग; पुढचे २४ तास अतिधोक्याचेमेट्रोला क्लिनचिटयावेळी चहल यांनी मेट्रोला क्लिनचिट दिली.
साधारणपणे ६५ मिमी पाऊस पडला तरी अतिवृष्टी झाली असं मानलं जातं.
इथं तर ३०० मिमी पाऊस पडला.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातली कोणतंही शहर तुंबणारच, असं सांगतानाच साधारण पाऊस पडून पाणी तुंबले असते तर मेट्रोच्या कामांमुळे मुंबई तुंबल्याचं आपण बोलू शकलो असतो.
पण विक्रमी पाऊस पडल्याने मेट्रोवर खापर फोडता येणार नाही, असं सांगत त्यांनी मेट्रोला क्लिनचिट दिली.
गणपतीला कोकणात जाताय; खासगी वाहनांना ई-पास हवाच!
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी देण्यात आलेली मोरॅटोरियमची (कर्जहप्ते स्थगिती) सुविधा आज, सोमवारपासून (३१ ऑगस्ट) संपुष्टात येत आहे.
ही सुविधा आणखी काही काळ चालू ठेवण्यास रिझर्व्ह बँक इच्छुक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोरॅटोरियमची सुविधा संपुष्टात आल्यास संबंधितांना सप्टेंबरपासून कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहेत.
करोना संक्रमणाचे आर्थिक परिणाम पाहता रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यापासून तीन महिने कर्जहप्ते स्थगितीची सुविधा देऊ केली होती.
ही सुविधा १ मार्च ते ३१ मेपर्यंत लागू करण्यात आली.
त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ३१ ऑगस्टपर्यंत आणखी तीन महिने मुदत वाढवली.
याचाच अर्थ सहा महिने कर्जहप्ते स्थगितीची सुविधा देण्यात आली.
सराफा तेजीत ; सोने-चांदी सलग दुसऱ्या सत्रात महागलेमुदतवाढीस बँकांचा विरोधएचडीएफसी लिमिटेडचे चेअरमन दीपक पारेख, कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांच्यासह अन्य बँकांच्या प्रमुखांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कर्जहप्ते स्थगितीचा कालावधी न वाढविण्याची विनंती केली होती.
बँकांच्या मते काही ग्राहकांकडून या योजनेचा गैरफायदा करून घेतला जात आहे.
याशिवाय अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वप्रकारे प्रयत्न करीत आहे.
त्यामुळे अशा योजना राबवून काहीही उपयोग होणार नाही, असं बँकांचे मत आहे.
'EMI' स्थागिती संपुष्टात; निर्णय न झाल्याने कर्जदारांचा जीव टांगणीलारिझर्व्ह बँकेची नवी योजनामोरॅटोरियमचा कालावधी संपल्यानंतर कर्जदारांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वनटाइम लोन रिस्ट्रक्चरिंग योजना सादर केली आहे.
बँकेच्या मते त्याअंतर्गत कॉर्पोरेट घराण्यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य ग्राहकांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे.
शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, समभाग खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज, ग्राहकोपयोगी वस्तू घेण्यासाठी घेतलेले कर्ज, क्रेडिट कार्ड कर्ज, वाहन कर्ज, सोने, दागिने, वैयक्तिक कर्ज अथवा अन्य कामांसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जांसाठी या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो.
सुप्रीम कोर्टात होणार सुनावणीसुप्रीम कोर्टाने रिझर्व्ह बँकेची कर्जहप्ते स्थगिती योजना डिसेंबरपर्यंत वाढविण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी १ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
सध्या करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता रिझर्व्ह बँकेकडून समाप्त करण्यात येणाऱ्या मोरॅटोरियम योजनेची मुदत डिसेंबरपर्यंत वाढविण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.
या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.
प्रतिनिधी, ठाणे 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात विघ्नहर्त्या गणेशाचे आज, शनिवारी आगमन होत आहेत.
गणेशाच्या स्वागताला अवघा ठाणे जिल्हा सज्ज झाला असून गेले सहा महिने डोक्यावर असणारे करोनाचे सावट बाजूला ठेवून काही काळ तरी अवघे जन गणरंगी रंगून जातील.
यंदा उत्सवाचे अवडंबर नसले तरी साधेपणातही तो भक्तिभावाने साजरा होत आहे.
अनेक ठिकाणी आरोग्यउत्सवाचे रूप घेऊन तो आगळ्या पद्धतीने साजरा होईल.
आरोग्य सुरक्षेचे भान ठेवत करोनाचे विघ्न दूर करून पुन्हा एकदा आनंदाचे दिवस परत यावेत यासाठी घरोघरी, सार्वजनिक मंडपात मनोभावे प्रार्थना होतील.
ठाणे जिल्ह्यात १ हजार ८२७ सार्वजनिक गणपतीची प्राणपतिष्ठा होणार आहे.
खासगी गणपतींची संख्या हजारोंच्या पटीत असून करोनाच्या संकटामुळे दीड दिवस गणेशोत्सव साजरी करण्याकडे यंदा अधिक कल दिसून येत आहे.
तर, गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिस सज्ज झाले आहेत.
गणेशोत्सवानिमित्त ठाणे ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सवात ११ दिवस चोख बंदोबस्त ठेवला आहे.
चार डीवायएसपी, एक हजार २०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असेल, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिली.
बंदोबस्तासाठी मुख्यालयातील कर्मचारी घेण्यात आले असून एसआरपीएफच्या दोन प्लाटूनची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे ग्रामीणमध्ये यंदा ९०१ सार्वजनिक, तर ३७ हजार १७६ खासगी गणपती असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.
ठाणे ग्रामीणबरोबर ठाणे शहर पोलिसही गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदरच सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सॅनिटायझरसह थर्मल स्कॅनरचा वापर, मास्क लावणे याबाबतही मंडळांना सांगण्यात आले आहे.
यंदा गस्तीवर अधिक भर देण्यात आला आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक गणपतींची संख्या ९२६ असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणपतींची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.
२०१९ मध्ये १०६७ सार्वजनिक गणपती होते.
यंदा दीड दिवसाचे २४२ सार्वजनिक गणपती असून तीन दिवस ४५, पाच दिवस ७६, सहा दिवस ५५, सात दिवस ३३, आठ दिवस ३०, नऊ दिवस ६, १० दिवस १५ आणि ११ दिवसांचे ४२४ सार्वजनिक गणपती आहेत.
गेल्या वर्षी दीड दिवसाचे केवळ तीन सार्वजनिक गणपती होते.
करोना महामारीमुळे दीड दिवसच गणेशोत्सव साजरा करण्यावर अधिक भर देण्यात आल्याचे चित्र आहे.
आज, शनिवारी गणरायाची प्राणप्रतिष्ठा होणार असली तरी शुक्रवारपासून बाप्पाला घरी घेऊन जाण्यास सुरुवात झाली.
सकाळपासून ठाणे शहरात पाऊस असला तरी दुपारनंतर पाऊस थांबल्याने नागरिकांचे पाय खरेदीसाठी बाजारपेठेच्या दिशने वळू लागले होते.
त्यामुळे बाजारपेठेत गर्दी झाली होती.
नियमांचे पालन कराशहरातील करोना आटोक्यात येत असला तरी करोना पूर्णतः संपलेला नाही.
पूर्वीप्रमाणेच आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आपल्याबरोबर इतरांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे काळाची गरज लक्षात घेऊन सर्वांनी यंदाचा गणेशोत्सव गर्दी न करता सर्व नियमांचे पालन करून साजरा करू या, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.
दरवर्षी आपण गणेशोत्सव आनंदात साजरा करतो.
परंतु यंदा तशी परिस्थिती नसल्यामुळे नागरिकांनी याचे भान ठेवून गणेशोत्सव साजरी करावा.
गणपती दर्शनासाठी ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुकच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेची व्यवस्था विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेने प्रत्येक विभागात प्रभागसमितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रे उभारली आहेत.
फिरती विसर्जन व्यवस्थाही करण्यात आली असून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सोसायटीच्या आवारात विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेने सॅनिटायझर आणि निर्जंतुकीकरणाची व्यवस्थाही केली आहे.
प्रतिनिधी, नागपूरलॉकडाउनच्या काळात सार्वंजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्याने जिल्हा सोडून बाहेर जाता येत नाही.
मात्र अत्यावश्यक कामांसाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष बाब म्हणून परवानगी दिली जात आहे.
आतापर्यंत ३२ हजार जणांना नागपुरातून इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
जिल्ह्याची सीमा ओलांडायची असेल तर ई-पास काढावी लागेल असे ठाकरे यांनी सांगितले.