text stringlengths 0 6.48k |
|---|
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १३ मार्चपासून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू केला. |
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बंधन टाकण्यात आली होती. |
मात्र आता आर्थिक व्यवहारांना गती यावी यासाठी अनेक व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. |
नव्या मार्गदर्शक सूचनांसह लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आले आहे. |
त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करताना रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. |
मनमानी पद्धतीने कुणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही, असे सांगत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले. |
लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. |
अफवांवर विश्वास ठेऊ नकापुन्हा लॉकडाउन करण्यात येणार, आता ई-पासची गरज नाही अशा स्वरूपाच्या अफवा सोशल माध्यमांवर पसरविण्यात येत आहे. |
मात्र नागरिकांना यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले. |
लक्षणे लपवू नकाकरोनाचे वाढते रुग्ण आणि मृतांची संख्य नक्कीच चिंता व्यक्त करणारी आहे. |
नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. |
लक्षणे असूनही ती माहिती लपविली जाते, उशिरा रुग्णालयात पोहोचल्याने मृत्यूंची संख्या वाढत असल्याचे ठाकरे म्हणाले. |
वेळेत रुग्णालयात येणारे करोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जात आहे. |
नागरिकांनी सतर्क राहिले तर करोनावर नक्कीच नियंत्रण आणता येईल, असा विश्वास ठाकरे यंनी व्यक्त केला. |
जिनिव्हा: करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी लस विकसित केला असल्याचा दावा रशियाने केला होता. |
करोनावरील रशियन लस या महिन्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने म्हटले होते. |
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. |
रशियाने निर्देशांचे पालन केले नसल्याचा ठपका जागतिक आरोग्य संघटनेने ठेवला आहे. |
त्यामुळे आता रशियन लशीबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. |
रशियाने पुढील महिन्यांपासून करोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरण सुरू करणार असल्याचे म्हटले होते. |
त्याशिवाय ऑक्टोबर महिन्यात लशीकरणाची मोहीम हाती घेणार असल्याचे म्हटले होते. |
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लशीवर शंका उपस्थित केली आहे. |
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्टीयन लिंडमियर यांनी सांगितले की, कोणत्याही देशाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी न घेताच लशीच्या उत्पादनासाठी परवानगी दिली तर त्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. |
लस निर्मितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने निर्देश, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. |
लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांना या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. |
वाचा: करोना लस: ब्रिटनसोबत आणखी एका भारतीय कंपनीचा करारवाचा: मस्तच! |
दुबई विमानतळावर श्वान करतात करोना चाचणीक्रिस्टीयन लिंडमियर यांनी सांगितले की, अनेकदा संशोधकांकडून लस विकसित झाल्याचा दावा करण्यात येतो. |
ही खरंतर आनंदाची बातमी असते. |
मात्र, लस प्रभावी असल्याचे संकेत मिळणे आणि क्लिनिकल चाचणीच्या सर्व टप्प्यांमधून लशीची चाचणी करणे यामध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले. |
सुरक्षित लस तयार करण्याचे अनेक नियम आहेत. |
त्यासाठी मार्गदर्शक तत्वेही आहेत. |
त्यांचे पालन करणेही आवश्यक आहे. |
लशीच्या चाचणीबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे उपचारासाठी संबंधित लस वापरल्यास त्याचे काही दुष्परिणाम होतात का, हेदेखील पाहिले जाते. |
त्यामुळे रुग्णांना त्याची झळ बसत नाही. |
करोना लशीबाबत दावा करण्यात आला आहे. |
मात्र, आम्हाला त्याची अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. |
अधिकृत माहिती आली असती तर, आमच्या युरोपीय कार्यालयाने लशीबाबत नक्कीच माहिती घेतली असती असेही त्यांनी सांगितले. |
२५ ट्रिलियन नोटा जाळल्यावाचा: विम्यासाठी कारला आग लावली पण शेकडो एकरावरील जंगल पेटलं! |
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या संकेतस्थळावर क्लिनिकल चाचणी सुरू असलेल्या २५ लशीची यादी जाहीर केली आहे. |
तर, १३९ लशी अद्यापही प्री-क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत. |
तर, दुसरीकडे रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी मिखाइल मुराशको यांनी रशिया ऑक्टोबरपासून करोनाची लस सर्व नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले. |
ऑगस्टमध्ये या लशीला मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. |
काठमांडू: सीमावादामुळे भारत आणि नेपाळच्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. |
या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि नेपाळमध्ये राजनयिक पातळीवर चर्चा होणार आहे. |
नेपाळ- भारतमधील ओवरसाईट मॅकन्झिमची ही आठवी बैठक असून दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वाची समजली जात आहे. |
या बैठकीच्या विषयपत्रिकेवर सीमावादाचा समावेश नसला तरी मागील काही महिन्यांमध्ये दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव या बैठकीच्या माध्यमातून कमी होऊ शकतो. |
या बैठकीत भारताने नेपाळला विविध विकासकामांसाठी दिलेल्या निधीवर चर्चा होणार आहे. |
या बैठकीत नेपाळच्यावतीने शंकरदास बैरागी प्रतिनिधीत्व करणार आहेत. |
तर, भारताकडून नेपाळमधील राजदूत विनय मोहन क्वात्रा सहभागी होणार आहेत. |
ओवरसाईट मॅकन्झिमची बैठक सप्टेंबर २०१६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या भारत दौऱ्यानंतर निश्चित करण्यात आली. |
दोन्ही देशांत निश्चित करण्यात आलेले प्रकल्प आणि हे वेळेत प्रकल्प पूर्ण होण्याबाबत पावले उचलण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात येते. |
१९४७ चा 'तो' करार नव्यानं करण्याची मागणीवाचा: चीन, पाकिस्तानसोबत नवीन गट? |
नेपाळने सांगितली 'मन की बात'! |
भारतासोबतच्या चर्चेला नेपाळ उत्सुकभारतासोबतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नेपाळ आता चर्चेसाठी उत्सुक आहे. |
यामध्ये भारतीय स्वतंत्रता दिनानिमित्त नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या. |
भारत आणि नेपाळ यांच्यात घनिष्ट संबंध असून चर्चेद्वारे समस्यांचे निराकरण करू शकतो असे भारतातील नेपाळच्या राजदूतांनी म्हटले. |
दोन्ही देश एका योग्य वेळी बैठक घेतील आणि कोणत्याही समस्येवर तोडगा काढू शकतात, असेही त्यांनी म्हटले. |
वाचा: पाकची 'नेपाळी' आगळीक; नव्या नकाशात लडाख, जुनागडवर ठोकला दावालिपुलेख, कालापानी आणि लिपिंयाधुरीसह भारताच्या ३९२ चौकिमी भूभागावर नेपाळने दावा ठोकला होता. |
या नव्या नकाशाला नेपाळच्या संसदेने मान्यता दिली. |
भारतासोबत वाद सुरू झाल्यानंतर नेपाळमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. |
तर, नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आमचा सीमावाद हा चीनसोबत नसून भारतासोबत असल्याचे सांगत वादात आणखी तेल ओतले होते. |
दरम्यान, नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळ या चार देशांच्या गटाबाबतचा विचार याआधीच धुडकावून लावला आहे. |
चीनसह झालेली बैठक ही करोना संसर्गाच्या मुद्यावर होती. |
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. |
नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश 'सार्क'चे सदस्य आहेत. |
तर, चीन निरीक्षक आहे. |
त्यामुळे इतर नवीन गट बनवण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. |
अहमदनगर: कोणतीही परवानगी नसताना टोनो १६ या नावाने प्रतिकारशक्ती वाढविण्याचे औषध विक्री सुरू केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील कथित डॉक्टर स्वागत तोडकर (Swagat Todkar) याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे. |
संगमनेर येथील एका औषधाच्या दुकानात हे औषध उपलब्ध असल्याची जाहिरात सोशल मीडियात केल्याने हा गुन्हा संगमनेर येथे दाखल करण्यात येणार आहे. |
कोल्हापूरमध्ये रिक्षाचालक ते बोगस डॉक्टर असा प्रवास केलेल्या तोडकर याच्याविरुद्ध यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कारवाई झाली. |
संगमनेर येथेही बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल आहे. |
त्यानंतरही हे प्रकार सुरू आहेच. |
अलीकडेच तोडकर याने एका औषधाची जाहिरात केल्याचे आढळून आले आहे. |
यासंबंधी आलेल्या तक्रारीवरून संगमनेरच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घारगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तोडकर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. |
वाचा: 'पाकव्याप्त काश्मीर, लडाखमधील वैद्यकीय पदवी भारतात चालणार नाही'जीवन संकेत या यू ट्युब चॅनलवर TONO-16 या औषधाची जाहिरात करण्यात आली आहे. |
स्वागत तोडकर याचे हे औषध गुरूदत्त मेडीकल, घारगाव, ता. |
संगमनेर येथे उपलब्ध असल्याचे त्यात म्हटले आहे. |
प्रतिकार शक्ती वाढीसाठी हे औषध उपयुक्त असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. |
हा प्रकार बेकायदा आहे. |
त्यामुळे तोडकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमाचा भंग केल्याचा तसेच औषध व जादुटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करावा, असा आदेश देण्यात आला आहे. |
तोडकर याच्याविरुद्ध यापूर्वीही संगमनेर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे. |
याशिवाय कोल्हापूरमध्येही त्यांच्याविरुद्ध कारवाई झालेली आहे. |
आरोग्य विभागाने अनेकदा नोटीसाही दिल्या आहेत, तरीही हे प्रकार सुरू आहेत. |
करोनाच्या काळात लोकांच्या मनातील भीतीचा गैरवापर करण्याचा प्रकार दिसून आल्याने आरोग्य विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. |
वाचा: पुण्यात गणपती विसर्जनासाठी यंदा 'लय भारी' व्यवस्थाकोल्हापूरमध्ये तीन वर्षांपूर्वीच तोडकर याचा भांडाफोड झाला आहे. |
मूळचा रिक्षाचालक असलेल्या स्वागत तोडकरने कोणतीही वैद्यकीय पदवी न घेता स्वत:च्या नावासमोर डॉक्टर लावण्यास सुरुवात केली. |
इंटरनेटवरून निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक औषधांचा वापर करून आपली दुकानदारी सुरू केली. |
त्याने 'हसत खेळत आरोग्यविषयक घरगुती उपचार' या विषयावरील आठ हजार व्याख्याने राज्यभर दिली आहेत. |
व्याख्यानांचे व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून आपल्या व्यवसायाचा ग्राफ वाढवला. |
तोडकर स्वत:च्या नावापुढे एम. |
डी, एनएलपी, एन. |
डी, मनोविकार तज्ज्ञ, समाजसेवक अशी बिरुदावली लावतो. |
कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही घातक उपचार करणाऱ्या स्वागत तोडकर व कोमल पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने मार्च २०१७ मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. |
पोलिस ठाण्यातून सुटका झाल्यावर तोडकरने न्यू महाद्वार रोडवर संजीवनी निसर्ग आधार केंद्र सुरू केले. |
यू ट्यूब आणि सोशल मिडियावर त्याची भाषणे ऐकून राज्यभरातील रुग्ण कोल्हापुरात जतात. |
पुणे, संगमनेर येथे त्याने केंद्रे सुरू केली. |
तेथेही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. |
संगमनेर येथे गुन्हा नोंद होऊनही त्याच्या निसर्ग उपचार केंद्रात गर्दी पहायला मिळते. |
स्वागत तोडकर हे स्वतःला निसर्गोपचार तज्ञ म्हणवून घेतात त्या नावाखाली रुग्णांना विविध औषधे देतात आणि समाज माध्यमातून जाहिरात करतात. |
कोव्हिड बद्दल प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांनी एक औषध विक्रीसाठी बाजारात आणले आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.