text stringlengths 0 6.48k |
|---|
जे औषधे जादूटोणा ( आक्षेपार्ह जाहिरात ) व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी कायद्याचा भंग ठरणारे आहे. |
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी. |
गणेश बोराडे (आरोग्य क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते) |
दिल्ली: दिल्लीतल उच्च सुरक्षा क्षेत्रातील राष्ट्रपती भवनाजवळ एक महिला नग्नावस्थेत फिरताना आढळली. |
संतापजनक म्हणजे आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी या महिलेची छायाचित्रे घेणे सुरू केले. |
या घटनेची माहिती मिळताच दिल्ली महिला आयोगाचे पथक घटनास्थळी पोहोचली आणि त्या महिलेला कपडे घातले. |
त्यानंतर त्यांनी या महिलेला संसदभवन रोड पोलिस ठाण्यात नेले. |
तपासात ही महिला मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले असून या महिलेजवळ आढळलेल्या कागदपत्रांवरून ती कंझावल परिसरातील रहिवाशी आहे. |
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. |
या महिलेचे वय सुमारे ३५ वर्षे इतके असल्याचे सांगितले जात आहे. |
ती राष्ट्रपती भवन परिसरात फिरत असताना आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. |
जमलेले लोक आपल्या मोबाइल फोनद्वारे या महिलेचे फोटो आणि व्हिडिओ तयार करताना दिसले. |
लोक फोटो काढत असल्याचे पाहून देखील बी महिला आपले शरीर झाकण्याचा कोणताही प्रयत्न करत नव्हती. |
या मीडियाच्या प्रतिनिधीने या घटनेची माहिती फोनद्वारे दिल्ली महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी आणि ओएसडी राहुल तहिलयानी यांना दिली. |
ही महिला असहाय्य असून आसपास असलेले लोक तिचे आक्षपार्ह नग्न फोटो खेचत असल्याची माहिती या प्रतिनिधीने महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना दिली. |
राहुल तहिलयानी यांनी तत्काळ ही माहिती दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना दिली. |
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार, घटनास्थळी तत्काळ एक पथक पाठवण्यात आले. |
या पथकाने या महिलेला कपडे दिले. |
या महिलेजवळ एक शाळेची बॅग होती. |
तसेच काही पुस्तके आणि आधारकार्ड होते. |
आधारकार्डावरील पत्त्यानुसार ही महिला कंझावल येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. |
महिलेची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ती विशेष अशी माहिती देऊ शकली नाही. |
महिलेने दिलेल्या जुजबी माहितीनुसार, तिला दोन मुले आहेत. |
त्यानंतर महिला आयोगाचे पथक महिलेच्या घरी गेले. |
मात्र तिची मुले तिच्या जावेकडे असतात असे स्पष्ट झाले. |
क्लिक करा आणि वाचा- परराष्ट्र मंत्री एस. |
जयशंकर यांचे पाकिस्तानला खरमरीत उत्तर, म्हणाले. |
..या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे मानसिंक संतुलन बिघडले आणि त्यानंतर ती घर सोडून निघून गेली. |
त्यानंतर महिलेच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या मोठ्या जावेने घेतली आहे. |
या महिलेवर उपचार सुरू करण्यात आल्याचे दिल्ली महिला आयोगाने सांगितले. |
क्लिक करा आणि वाचा- सुशांतसिंह प्रकरणी काँग्रेसचा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोलक्लिक करा आणि वाचा- मोदी सरकारची 'आत्मनिर्भर भारत' संकल्पना हा 'ढोंगीपणा'; कोर्टाचे ताशेरे |
नगर : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचं स्वागत करण्याच्या मुद्द्यावरून वाद रंगलेले असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका घोषणेच्या प्रेमात पडले आहेत. |
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी लालकिल्यावरून भाषण करताना महिलांना एक रुपयात सॅनिटरी पॅड देण्याची घोषणा केली. |
रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या या घोषणेचं स्वागत केलं आहे. |
तसेच खुद्द पंतप्रधानांनीच या विषयाला हात घातल्याने महिला-भगिनींच्या आरोग्याबाबत प्रत्येकजण संवेदनशीलतेने विचार करेल आणि त्यामुळे समाज सुदृढ होण्यास हातभार लागेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. |
‘महिला-भगिनींच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानायला हवेत. |
समाजात जनजागृतीच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. |
वैयक्तिक स्वच्छता व त्यातही महिलांच्या मासिक पाळीचा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. |
पण आपल्या समाजात अजूनही या विषयावर उघडपणे चर्चा केली जात नाही. |
विशेषतः ग्रामीण भागामध्ये याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे दिसते, परिणामी अनेक महिला-भगिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींना सामोरे जावे लागते. |
या पार्श्वभूमीवर महिलांना १ रुपयात सॅनिटरी पॅड देण्याचा पंतप्रधानांनी केलेला उल्लेख हा महत्त्वपूर्ण ठरतो,’ असं रोहित पवार यांनी सांगितलं. |
रोहित पवार हेही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून या विषयावर काम करीत आहेत, त्याची माहितीही या निमित्ताने त्यांनी दिली. |
बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांकडून 'सोबती' नावाने सॅनिटरी पॅडस् तयार करण्यात येतात. |
आतापर्यंत सुमारे अडीच लाख मुलींना ते मोफत देण्यात आले आहेत. |
त्यासाठी रोहित यांच्या आई सुनंदाताई पवार यांनीही परिश्रम घेतले. |
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासह सातारा, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, जालना या भागांतील शाळकरी मुलींपर्यंत पोचून सुनंदाताई यांनी महिला व मुलींशी मोकळेपणाने संवाद साधला. |
त्यांचे गैरसमज, शंका दूर करत त्यांना सॅनिटरी पॅडचे महत्त्व पटवून दिले. |
महिला पालकांनाही विश्वासात घेऊन त्यांच्यातही याबाबत जागृती केली. |
हे पॅड बचत गटाच्या महिलांकडूनच बनवून घेण्यात येत असल्याने त्यांनाही रोजगार मिळतो, शिवाय ते पर्यावरण पूरक असल्याने प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होत नाही. |
पहिल्या टप्प्यात सोबतीचे अडीच लाख पॅड मोफत दिले असून दुसऱ्या टप्प्यात ते ना नफा ना तोटा या तत्त्वावर २० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असेही पवार यांनी सांगितले. |
मॉल उघडलेत, मग मंदिरं का नाही; राज ठाकरेंचा सवालपदाधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळं मनसे धक्क्यात; कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहनविरोधासाठी विरोध आणि टीका करण्याची पद्धतच सध्या राजकारणात दिसून येते. |
या पार्श्वभूमिवर चांगल्या योजना आणि घोषणांचे कौतूक करण्याचा हा पवार यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. |
अर्थात सध्याच्या राजकीय परिस्थितीत पवार यांच्या या भूमिकेचा वेगळा अर्थही काढला जाऊ शकतो. |
रोहित यांचे आजोबा ज्येष्ठ नेते शरद पवार हेही अधूनमधून मोदींची पाठराखण करणारी विधाने करताना दिसतात. |
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित यांनीही ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. |
कुलरच्या करंटमुळे चिमुरड्याचा मृत्यू; 'या' चुका कधीही करू नका! |
प्रतिनिधी, पुणेशहरात शुक्रवारी ८१८ करोना पॉझिटिव्ह आढळले असून, ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. |
त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या असतानाच, डिस्चार्जचे वाढते प्रमाण दिलासा देणारे ठरत आहे. |
दिवसभरात ११८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. |
त्यामुळे करोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या नागरिकांची संख्या ३५ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. |
शहरातील ६२६ गंभीर रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून, त्यापैकी ३७६ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. |
अडीचशे रुग्ण आयसीयूत करोनाशी लढत आहेत. |
ऑक्सिजनवर ठेवलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. |
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढवत आहे. |
दिवसभरात ६ हजार १५१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. |
त्यामुळे शहरात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या २ लाख ७३ हजार ३९२ वर जाऊन पोहोचली आहे. |
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत ३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, त्यापैकी ११ पुण्याबाहेरचे रहिवासी होते. |
मृतांमध्ये २६ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. |
शहरात आतापर्यंत १३१२ जणांचे प्राण करोनामुळे गेले आहेत. |
पुण्यातील शुक्रवारची स्थितीबरे झालेले रुग्ण - ११८५दिवसभरात मृत्यू - ३९ (११ शहराबाहेरील)नवीन पॉझिटिव्ह रुग्ण - ८१८गंभीर रुग्णांची संख्या - ६२६व्हेंटिलेटरवरील रुग्ण - ३७६ |
मुंबई: मुंबईच्या क्रिकेट विश्वात ज्युनिअर डेल स्टेन अशी ओळख असलेल्या करण तिवारी या युवा क्रिकेटपटूने आत्महत्या करून आयुष्य संपवले. |
करोना काळात एका बाजूला देशातील क्रिकेट बंद असताना आयपीएलच्या १३व्या हंगामामुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. |
पण त्यातच करणच्या आत्महत्येची धक्कादायक बातमी समोर आली. |
वाचा- IPLमध्ये संधी न मिळाल्याने मुंबईत तरुण क्रिकेटपटूची आत्महत्यागेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत करण वानखेडे मैदानावर गोलंदाजी सराव सत्रात गोलंदाजी करताना दिसला होता. |
स्थानिक क्रिकेटमध्ये करनला ज्युनिअर डेल स्टेन असे म्हटले जात होते. |
करनची गोलंदाजी करण्याची अॅक्शन आणि उंची दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन सारखी होती. |
करणकडे नोकरी नव्हती तो मुंबईतील काही क्रिकेट क्लबकडून खेळत होता. |
त्याने काही दिवसांपूर्वी कोचिंगच्या लेव्हल १ चा कोर्स पूर्ण केला होता. |
करणला IPL मध्ये का संधी मिळाली नाहीआत्महत्या करण्यापूर्वी करणने त्याचा राजस्थानमधील उदयपूर येथील मित्राला फोन करून संधी मिळत नसल्याने निराश असून आयुष्य संपवणार असल्याचे म्हटले होते. |
त्याला यावर्षी आयपीएलमध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा होती. |
करणचा फोन झाल्यानंतर संबंधित मित्राने करनच्या बहिणीला फोन करून याची माहिती दिली. |
करणची बहिण देखील राजस्थानमध्ये राहते. |
मित्राच्या फोननंतर करणच्या बहिणीने मुंबईत आईला फोन करून सांगितले. |
पण तोपर्यंत फार उशिर झाला होता. |
रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले. |
वाचा- भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडले; यावेळी निमित्त ठरले. |
..भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमानुसार आयपीएलच्या लिलावात अशाच खेळाडूंना संधी मिळते जे राज्य संघाकडून खेळले आहेत. |
पण करणने कधीच राज्याकडून प्रथम श्रेणी अथवा टी-२० सामना खेळला नाही. |
करण नेहमीच आयपीएलच्या संघासाठी वानखेडे मैदानावर गोलंदाजी करत असे. |
पण त्याला कधी संधीच मिळाली नाही. |
कारण बीसीसीआयच्या नियमात तो बसत नव्हताकरण आयपीएलच्या सराव सत्रात गोलंदाजी करत होता. |
त्याला आशा होती की राज्य संघात संधी मिळेल. |
तो एक चांगला क्रिकेटपटू होता. |
गोलंदाजी आणि फलंदाजीचा व्हिडिओ त्याने अखेरचा WhatApp status म्हणून ठेवले होते, असे मित्राने सांगितले. |
वाचा- आधीच ब्रेन ट्युमर आणि आता करोनाची लागण; क्रिकेटपटू म्हणाला. |
..या वर्षी १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत संधी न मिळाल्याबद्दल करण निराश होता असे पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीनंतर सांगितले. |
प्रतिनिधी, नागपूरकुटुंबातल्या एखाद्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, चालताना दम लागत असेल, छातीत धडधडत असेल, घाबरल्यासारखे होत असेल तर घरातल्या व्यक्ती छोट्यातला छोटा बदल हेरू शकतात. |
डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्याला रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांचे वा त्याचे बोट धरून येणाऱ्या हृदयरोगाचेही निदान करता येते. |
पण, दुर्लक्षित घटक असलेल्या मनोरुग्णांच्या बाबतीत सहसा हे घडत नाही. |
त्यामुळे हृदयरोगाचा झटकाही सहसा निदान होण्यापासून राहून जातो. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.