text
stringlengths
0
6.48k
योग्य निर्णय घ्यावादरवर्षी वसई-विरार पालिका प्रशासन मोहीम सुरू करून धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावते.
मात्र यामुळे पालिकेच्या धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांसमोर पेच निर्माण होतो.
दुसरे घर घेणे परवडणारे नसल्यामुळे आणि समाधानकारक पर्याय नसल्याने जायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.
त्यामुळे या इमारती रिकामी होतच नाही.
अशामध्ये पालिकेने या इमारतींबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत वसईकरांनी व्यक्त केले आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पालिकेतर्फे पाठविण्यात आल्या होत्या.
या इमारतींमधील अनेक नागरिकांनी आपली घरे रिकामीदेखील केली आहेत.
- गंगाथरन डी.
, आयुक्त, वसई-विरार महापालिका
चेन्नई: इंटरनेट जोडणीतील दोष, सर्व्हरच्या कार्यात आलेला अडथळा, यामुळे वादग्रस्त ठरलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील भारत आणि रशिया यांच्यातील अंतिम लढतीत दोन्ही देशांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) ही घोषणा केली.
ऑलिंपियाडमधील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.
वाचा- धोनीचा संघ मोठ्या संकटात; स्पर्धेतील ओपनिंग मॅच खेळता येणार नाही, BCCIने घेतला हा निर्णयअंतिम लढतीत भारत रशियाकडून १.
५-४.
५ असा पराभूत झाला होता.
अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या पटावर दिव्या देशमुख, निहाल सरीन यांच्या लढतींना इंटरनेट जोडणीतील दोषाचा फटका बसला आणि वेळेच्या बंधनात अडकल्यामुळे त्यांना लढत गमवावी लागली.
तिसऱ्या पटावर खेळणाऱ्या कोनेरू हम्पीलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला.
याचा फटका अर्थातच भारताला बसला.
त्यावर भारतीय संघाने 'फिडे'कडे दाद मागितली आणि या संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या समितीने दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद घोषित करण्याचा निर्णय घेतला.
वाचा- 'राजीव गांधी यांनी भारतातून इटलीत भाला फेकला होता'; खेलरत्न पुरस्काराच्या नावावरून आक्षेपया अंतिम लढतीतील पहिल्या डावात भारत-रशिया यांच्यात ३-३ अशी बरोबरी झाली होती.
सगळ्या सहा डावांत 'स्टेलमेट' झाले.
रशियाने दुसरा डाव मात्र ४.
५-१.
५ असा जिंकला.
यात आंद्रे एसिपेन्कोने निहाल सरीनवर मात केली, तर पोलिना शुवालोव्हाने दिव्याला नमविले; पण भारताने इंटरनेटच्या जोडणीत झालेला बिघाड या पराभवास कारणीभूत असल्याची तक्रार केली.
त्याआधी, दुसऱ्या डावात आनंदने इयन नेपोमनियाकचीविरुद्ध बरोबरी केली, तर कर्णधार विदीत गुजराथीनेही दानिल दुबोव्हला बरोबरीत रोखले होते.
कोनेरू हम्पीला अलेक्झांड्रा गोऱ्याखकिनाने नमविले आणि डी.
हरिकाने अलेक्झांड्रा कोस्तेनिउकला बरोबरीत थोपविले.
वाचा-IPL 2020: विराट म्हणाला, मी खुप घाबरलो होतोवेंकट सर्वानन याने केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले होते, की दिव्या देशमुखचे दुर्दैव, की तिला वेळेच्या बंधनात अडकून पराभव पत्करावा लागला; पण ती विजयाच्या अगदी जवळ पोहोचली होती.
दिव्याने ही लढत जिंकली असती, तर त्याचा फायदा भारताला मिळाला असता; पण इंटरनेटमधील दोषाचा फटका भारताला बसला.
याआधी, उपांत्यपूर्व झुंजीतही भारताला सदोष इंटरनेटमुळे त्रासाला सामोरे जावे लागले.
या सामन्यात अर्मेनियाला पराभव पत्करावा लागला; पण त्यात इंटरनेटच्या जोडणीचा फटका बसल्याची तक्रार अर्मेनियाने केली होती.
मात्र, 'फिडे'ने त्याची दखल घेतली नाही.
उपांत्य फेरीत भारताने पोलंडवर मात करून अंतिम फेरीत धडक मारली.
'आम्ही विजेते ठरलो, रशियाचे अभिनंदन!
'- करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच बुद्धिबळ ऑलिंपियाड ही स्पर्धा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती.
- प्रथमच भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
प्रथमच या स्पर्धेच्या आराखड्यात बाद फेरीचा अंतर्भाव करण्यात आला होता.
- वादग्रस्त आणि तेवढ्याच सनसनाटी ठरलेल्या अंतिम सामन्यात भारत प्रथम पराभूत झाला होता.
- इंटरनेटच्या जोडणीतील दोषाचा फटका भारताला बसल्याची तक्रार भारताकडून करण्यात आल्यानंतर 'फिडे'ला त्याची दखल घ्यावी लागली.
- त्याआधी, स्विस लीग पद्धतीने स्पर्धा होत होती.
शिवाय, याआधी, पुरुष आणि महिला असे स्वतंत्रपणे खेळत होते, या वेळी पुरुष, महिला, ज्युनियर खेळाडू असे मिश्र स्वरूप होते.
- 'आम्ही विजेते ठरलो, रशियाचे अभिनंदन!
' अशा शब्दांत विश्वनाथन आनंदने आनंद व्यक्त केला.
भारतीय संघाचं उपमुख्यमंत्री तथाराज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदनमुंबई: बुद्धिबळ क्षेत्रात विश्वविजेता स्पर्धेनंतर मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑलिंपियाड स्पर्धेत रशियाच्या सोबतीनं संयुक्त विजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभि...
माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरु हम्पी या दिग्गजांचा सहभाग असलेल्या संघाचं नेतृत्वं महाराष्ट्राच्या विदिथ गुजराथीसारख्या तरुणानं करणं, त्याला दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहार सरीन यांच्या युवा टीमची साथ मिळणं, यातून संयुक्त विजेतेपदाचं हे ऐतिहासिक यश मिळाले आहे.
भारतीय संघानं मिळवलेल्या यशाचा महाराष्ट्राला आनंद, अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेत्या संघाचं कौतुक केलं आहे.
बुद्धीबळाच्या क्षेत्रात भारताची गौरवशाली परंपरा युवा खेळाडू तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहेत.
या विजेत्यापदामुळे येणाऱ्या काळात अनेक युवक बुद्धीबळाकडे प्रोत्साहित होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
- मधुरा बाचलगणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या आवडत्या खाद्यपदार्थाची सुरुवातही मोदकापासून होते.
मोदक या शब्दाचा अर्थ 'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे छोटा भाग.
म्हणजेच आनंदाचा छोटा भाग.
थोडक्यात मोदक म्हणजे, आनंद देणारा पदार्थ.
तद् भक्ष्‍यार्ह पत्र्चविधं नैवेद्यमिति कथ्‍यतेभक्ष्‍यं भोज्‍यंच लेह्यंच पेयं चूष्‍यंच पत्र्चमम्सर्वत्र चैतं नैवेद्यमारार्ध्‍यास्‍यै निवेदयेत्नैवेद्य म्हणजे देवास अर्पण करावयाचा पदार्थ.
पूजा करताना जे षोडशोपचार करण्यात येतात, त्यातीलच नैवेद्य हा एक महत्त्वाचा उपचार आहे.
देवांस नैवेद्य अर्पण करताना ते खाण्यास योग्य आणि पाच प्रकारातील असावे, असे सांगितले जाते.
भोज्य - म्हणजे मऊ, फार चाऊन न खाण्याचे पदार्थ भक्ष्य - पोळी, वडे या सारखे चाऊन खाण्याचे पदार्थ चोष्य - म्हणजे उसासारखे चोखून खाण्याचे पदार्थ लेह्य - मधासारखे चाटून खायचे पदार्थ पेय - आमटी, रस, कधी यांसारखे पदार्थ थोडक्यात काय तर, नैवेद्यामध्ये षडरसांचा समावेश असावा.
त्याचप्रमाणे 'यथा देह तथा देव' असे मानले जाते.
त्यामुळे नैवद्य अर्पण करताना शक्यतो खूप गरमागरम अर्पण करत नाही.
पदार्थ थोडा निवला म्हणजे कोमटसर झाला, की नैवेद्य अर्पण करण्यास योग्य मानले जाते.
(Ganesh Chaturthi 2020 बाप्पाचा आवडता पदार्थ उकडीचे मोदक, जाणून घ्या याचे आरोग्यवर्धक फायदे)कुठल्याही विभागाच्या खाद्यसंस्कृतीवर तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा बराच प्रभाव असतो.
बांद्यापासून चांद्यापर्यंत खाद्यसंस्कृती बदलते.
जिथे जे पिकते तेच शिजते आणि त्याचा प्रभाव प्रत्येक भागाच्या नैवेद्यावरही दिसून येतो.
कोकणात सर्वांत मोठा उत्सव कुठला असेल, तर तो गौरी गणपती.
कोकणात प्रमुख पीक तांदूळ, त्यामुळे दहा दिवस तांदळाचा समावेश असलेले विविध पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात.
त्यात उकडीचे मोदक सर्वांनाच भुरळ घालतात.
गौराईला कोकणमध्ये काही ठिकाणी सामिष नैवेद्यही बनवला जातो.
उकडीचे मोदक बनवून उकड राहिली, की आवर्जून निवग्र्या बनवल्या जातात.
१.
निवग्र्या साहित्य - एक कप तांदळाचे पीठ, एक कप पाणी, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे, मीठ, चमचाभर तेल कृती - जिरे आणि हिरवी मिरची ओबडधोबड कुटून घ्यायची.
पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये तेल, मीठ, तेल घालून उकळून घ्यावे.
गॅस लहान करून तांदळाचे पीठ घालून, पटकन मिक्स करून घ्यावे.
झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यावे.
उकड एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये जिरे, मिरची पेस्ट घालून मळून घ्या.
आता मळून घेतलेल्या उकडीचा छोटा भाग घेऊन त्याचे छोटे वडे हातावर थापून घ्यावेत.
नंतर कढईमध्ये पाणी गरम करून घ्या.
त्यावर केळीचे पान ठेवून वडे ठेवून मध्यम आचेवर ७ ते ८ मिनिटे वाफवून घ्यावे.
दही किंवा शेंगदाणा तेलाबरोबर खाण्यास द्यावे.
(Ganesh Chaturthi 2020 काजू, मलई, मावा.
.. आहाहा !
)२.
भिरडी साहित्य - १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी पाणी, १/२ वाटी गूळ, मीठ, जिरेपूड, हळद १/४ चमचा.
एका कढईमध्ये पाणी गरम करून घ्या.
त्यामध्ये गूळ, हळद, जिरेपूड, मीठ घालून गूळ विरघळेपर्यंत उकळून घ्या.
तांदळाचे पीठ घालून पटकन एकजीव करून घ्या आणि मंद आचेवर ५ मिनिट वाफवून घ्या.
उकड काढून मऊ करून घ्या.
आता उकडमधून छोटे गोळे करून त्याच्या छोट्या वाती करून घ्याव्यात.
वाती म्हणजे छोटा गोळा हातावर वातीसारखा वळून त्याला शेंगोळ्या किंवा कडबोळीचा आकार द्यावा.
आता भिरडी तेलामध्ये खमंग तळून घ्यावीत.
पश्चिम महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रामध्ये गहू, ज्वारीचे पीक मुबलक प्रमाणात घेतले जाते आणि त्याचा प्रभाव नैवेद्याच्या पदार्थांमध्येही दिसून येतो.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गव्हाचे मोदक आणि खपली गव्हाची खीर ही गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रामुख्याने बनवली जाते, तर पुण्याकडे विसर्जनाच्या दिवशी वाटली डाळ बनवली जाते.
खपली गव्हाची खीर सडून घेतलेला खपली गहू १ वाटी, १ वाटी गूळ, ओल्या खोबऱ्याचे काप, खसखस, जायफळ पूड, सुकामेवा आवडीप्रमाणे.
सडून घेतलेला गहू पाणी घालून व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
गहू शिजत आला, की त्यामध्ये गूळ, खोबऱ्याचे काप, जायफ़ळ, सुकामेवा घालून आणखी १० मिनिटे शिजवून घ्या.
रवा बेसन लाडू मराठवाड्यात गौरी आगमनाच्या दिवशी रवा बेसन लाडू बनवले जातात.
१ कप बारीक रवा, १/२ कप बेसन, ४ चमचे तूप, १ कप साखर, १/२ कप पाणी, १/२ चमचा वेलची पूड.
रवा मध्यम आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या.
तो काढून त्याच कढईमधे तूप घालून मध्यम आचेवर बेसन खमंग भाजून घ्या आणि ते रव्याच्या परातीत काढून घ्या.
दुसऱ्या कढईमध्ये १ कप साखर आणि १/२ कप पाणी घालून एकतारी पाक करा.
हा पाक रवा बेसनाच्या मिश्रणात घालून ढवळून घ्या आणि झाकून ठेवणं.