text
stringlengths
0
6.48k
थोड्या वेळाने वेलची पूड घाला आणि मिश्रण ढवळून घ्या.
मिश्रण लाडू वळण्याइतके घट्ट झाले, की त्याचे लाडू वळून घ्या.
(बाप्पाला प्रिय आहेत ३ रंग, गणेश चतुर्थीला या रंगांचे कपडे परिधान करणे मानले जाते शुभ)पंचखाद्य साहित्य - १ मोठा चमचा खसखस, १/२ कप किसलेलं सुके खोबरे, १/४ कप खडीसाखर, सुकामेवा (बदाम, पिस्ता, बेदाणे - ऐच्छिक), खारीक पावडर, १/४ चमचा वेलची पूडखसखस थोडीशी भाजून त्याची पूड करून घ्या.
सुके खोबरे थोडेसे भाजून ते खडीसाखरेबरोबर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
खसखस पूड आणि हे मिश्रण एका भांड्या काढून घेऊन त्यात सुका मेवा, खारीक पावडर आणि वेलची पूड घालून नीट ढवळून घ्या.
पंचखाद्य तयार आहे.
सांजोरी साहित्य - २ वाट्या मध्यम रवा, २ वाट्या, गूळ, १/२ वाटी तूप, १/२ वाटी खोवलेलं ओलं खोबरं, २ चमचे वेलची पावडर, ४ वाट्या दूध, ३ वाट्या कणिक, २ चमचे तेल, १/४ चमचा मीठ.
कणिक, मीठ आणि तेल एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून छान मऊसूत पीठ भिजवून घ्या आणि झाकून ठेवा.
रवा आणि तूप एकत्र करून माध्यम आचेवर ८-१० मिनिटे भाजून घ्या.
त्यात थोडे थोडे दूध घालून ढवळून घ्या, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत.
झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊन त्यात खोबरं आणि गूळ घालून मंद आचेवर सांजा शिजवून घ्या.
मंद आचेवर गूळ विरघळेपर्यंत सांजा ढवळत राहा.
वेलची पूड घालून सांजा ढवळून घेऊन थंड करून घ्या.
या सांज्याचे छोटे गोळे करून, ते कणकेच्या पारित भरून गोल सांजोरी लाटून घ्या.
तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या.
खान्देशखान्देशात गौराईला जास्त महत्त्व असते.
गौराईला विविध फराळाच्या पदार्थांचा फुलोरा बनवला जातो.
त्याचबरोबर गणपतीच्या दहा दिवसांमध्ये एक दिवस भंडारा केला जातो, ज्यामध्ये दाल बाटी बेत प्रामुख्याने असतो.
चुरमा मोदकसाहित्य - २ कप कणीक, २ कप पिठी साखर, २ कप तूप, २ चमचे भाजलेली खसखस, १/२ चमचा वेलची पूड आणि किंचित मीठ.
कणिक एका सुती कापडात बांधून कूकरमध्ये १५ मिनिटं वाफवून घ्या.
थंड झाल्यावर कणिक मोकळी करून घ्या.
कणिक रवाळ पिठासारखी झाल्यावर त्यात गरम तूप, पिठीसाखर, खसखस, वेलची पूड, किंचित मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
त्यातले थोडेसे मिश्रण घेऊन त्याला मोदकाचा आकार द्या.
मोदकाची आमटी साहित्य - तेल, १ चमचा काळा मसाला, १ चमचा लाल तिखट, गरम पाणी, चवीनुसार मीठ.
सारण बनवण्यासाठी खसखस लालसर होईपर्यत भाजून घेऊन त्यात सुके खोबरे घाला.
खोबरे लालसर होईपर्यंत भाजून झाले, की गॅस बंद करून त्यात काळा मसाला, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण नीट ढवळून घ्या.
ग्रेव्हीच्या मसाल्याकरता गरम तेलामध्ये कांदा, लसूण आणि आले घालून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
त्यात सुके खोबरे घालून ३-४ मिनिटे भाजून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात कोथिंबीर घाला आणि कमीतकमी पाणी घालून मसाला वाटून घ्या.
मोदक बनवण्यासाठी बेसन, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्या.
गरज पडल्यास थोडेसे तेल घालू शकता.
तेल लावून पीठ छान मळून घ्या आणि १० मिनिटे झाकून ठेवा.
ते पीठ घेऊन परत एकदा मळून त्यातून एक छोटा गोळा घ्या.
त्याची पारी लाटून, त्यात सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या.
मोदकांची आमटी बनवण्यासाठी गरम तेलामध्ये वाटलेला मसाला घालून २-३ मिनिटं परतून घ्या.
त्यात काळा मसाला, लाल तिखट घालून तेल सुटेपर्यंत अजून २-३ मिनिटे मसाले भाजून घ्या.
गरम पाणी आणि मीठ घालून मिश्रण ढवळून घ्या.
मोदक घालून, झाकण ठेवून मध्यम आचेवर १५-२० मिनिटे आमटी छान उकळून घ्या.
(लेखिका प्रसिद्ध फूड यू-ट्युबर आहेत.
प्रतिनिधी, पुणेकरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पोलिसांनी आचारसंहिता जाहीर केली आहे.
गणपती आगमन आणि मिरवणुकांना बंदी राहणार आहे.
त्याच वेळी सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतींच्या मूर्तीसाठी उंचीचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत.
मंदिर परिसरात पूजा साहित्याची दुकाने लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक गणपती मंडळांकडून बसविण्यात येणाऱ्या मूर्तींची उंची चार फूट, तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मंदिर परिसरात हार, नारळ, फुले यांची दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन पोलिसांनी मंडळांना केले आहे.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
याबाबत लोकप्रतिनी, पोलिस, महापालिका, गणेश मंडळे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
तरीदेखील गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणते नियम पाळावेत, याबाबत पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
गणेशमूर्ती खरेदीगणेश मूर्तींची खरेदी मंडळांनी व नागरिकांनी शक्य तो ऑनलाइन करावी.
मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून शाळांची मैदाने, मोकळ्या जागांवरच गणेश मूर्तीविक्रीस परवानगी दिली जाईल.
रस्त्यावरील दुकानात मूर्तीविक्रीस परवानगी दिली जाणार नाही.
गणरायाचे आगमन,प्रतिष्ठापना व पूजागणरायाचे आगमन व विसर्जनाला मिरवणुका काढण्यात येऊ नयेत; तसेच अगमन व विसर्जनाच्या विधीसाठी कमीतकमी व्यक्तींनी एकत्र यावे.
सार्वजनिक गणेश मंडळाची मंदिर असल्यास गणेशाची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी.
अन्य परिस्थितीत महापालिकेचे नियम व अटींचे पालन करून छोट्या मंडपासाठी परवानगी दिली जाईल.
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेश मूर्तीची उंची चार फूट व घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फुटांच्या आत असावी.
गणेशाच्या आरती व पूजेसाठी जास्तीत जास्त पाच व्यक्ती हजर राहतील.
या वेळी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक राहील.
गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत.
गणेशाची आरती व पूजन मंडळाचे कार्यकर्ते, पुजारी यांनीच करावे.
बाहेरील व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दर्शन ऑनलाइनगणेशदर्शन सुविधा ऑनलाइन, वेबसाइट, फेसबुकद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मंडळांनी करावा.
ऑनलाइन सुविधा करणे शक्य झाले नाही, तर छोटे व्हिडिओ तयार करून संबंधितांना पाठवावेत.
दर्शनासाठी ऑनलाइन टोकन, डिजिटल पास सुविधा देताना वेळेची मर्यादा ठेवावी.
सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.
कोणीही निमंत्रित अथवा व्हीआयपींना दर्शनासाठी बोलावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
परिसर व सुरक्षा नियमगणेशोत्सव कालावधीत मंडळाबाहेर नारळ, हार, फुले, मिठाई यांची दुकाने लावण्यास मनाई राहील.
गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच त्याचे रेकॉर्डिंग करावे.
जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
आरोग्य विषयक व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिरातींना प्राधान्य द्यावे, अशा सूचना आहेत.
खाद्यपदार्थ विक्रेते, अनाधिकृत फेरीवाल्यांना बंदी राहणार आहे.
ध्वनिप्रदूषण प्रतिबंध कायद्यानुसार रुग्णालय, शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.
गणेश मंडळांनी आग प्रतिबंधक उपाययोजना करावी.
अनोळखी व्यक्ती, बेवारस वस्तू अथवा संशयित व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, तसेच गणेशमूर्तीचे संरक्षण करण्यासाठी पाच कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षारक्षक २४ तास नेमावेत, असे निर्देशही मंडळांना देण्यात आले आहेत.
करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना- करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या सूचनाचे पालन करणे बंधनकारक राहील.
- सरकारने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या ठिकाणी गणेश मंडळांना प्रतिबंधित क्षेत्राचे नियम व अटींचे पालन करावे लागेल.
- गणेश मंडळाच्या सदस्य व अध्यक्षांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक राहील; तसेच उत्सवाच्या कालावधीत मंडळाला भेटी दिलेल्या व्यक्तींची नोंद, मोबाइल क्रमांक, पत्ता याची माहिती स्वतंत्र वहीत ठेवणे बंधनकारक.
- गणेशोत्सव देखावे न करता साधेपणाने साजरा करावा.
- आरती व प्रसादाचे ताट अनेक व्यक्तींनी हाताळू नये.
आरती करण्यापूर्वी ते ताट निर्जंतुक करून घ्यावे.
- गणेश मंडळाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याची साधने ठेवावीत; तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सहाच्या भरात हस्तांदोलन करू नये.
विसर्जनासाठी नियमावलीगणेश मूर्तीचे विसर्जन मंडपालगत विधिवत करावे, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.
हौदात विसर्जन करताना कमीत-कमी लोक उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
नदी पात्रातील घाटावर विसर्जनाची व्यवस्था केली जाणार नाही.
घरगुती गणपती व गौरी विसर्जन सोसायटीतील कृत्रिम हौदात करावे, तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना विसर्जनस्थळी घेऊन जाणे टाळावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
पोलिस मदतीसाठी संपर्क क्रमांकनियंत्रण कक्ष : १००, ०२०-२६१२६२९६, २६१२२८८०वाहतूक नियंत्रण कक्ष : २६६८५०००चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकजिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवामध्ये सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास चार दिवस परवानगी दिली आहे.
यामध्ये पाचवा दिवस, सातवा दिवस, दहावा दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या दिवसाचा समावेश आहे.
उत्सवात इतर दिवशी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे.
अंकारा: तुर्की आणि ग्रीस या दोन देशांदरम्यान भूमध्य सागरातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या हक्कावरून वाद वाढत चालला आहे.
तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी ग्रीसला थेट धमकी दिली.
ग्रीसने आमच्या जहाजावर हल्ला केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा सज्जड इशारा त्यांनी ग्रीसला दिला.
तर, दुसरीकडे युरोपीयन युनियन आणि फ्रान्सने ग्रीसला पाठिंबा व्यक्त करत तुर्कीने दिलेल्या धमकीवर नाराजी व्यक्त केली आहे.
मागील काही दिवसांपासून तुर्कीचे ओरूक रीस तेल शोधक जहाज हे ग्रीसच्या अखत्यारीत असणाऱ्या कस्तेलोरिजो या बेटाजवळ तेल विहीर, नैसर्गिक वायू साठ्याबाबत संशोधन करत आहे.
ग्रीसने यावर आक्षेप घेतला आहे.
तुर्कीचे जहाज ग्रीसच्या हद्दीत आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर, तुर्कीने ग्रीसचा हा दावा फेटाळून लावत तो समुद्री भाग आमचाच असल्याचे म्हटले आहे.
वाचा: अनेक वर्षांचे शत्रुत्व संपले!
'या' कारणामुळे इस्रायल व युएईमध्ये मैत्रीग्रीसला घाबरवण्यासाठी तुर्कीने सोमवारी कस्तेलोरिजो बेटाजवळ नौदलाचे काही जहाज पाठवले.
त्याच्या प्रत्युत्तरात ग्रीसनेदेखील आपले नौदल कस्तेलोरिजो बेटाजवळ तैनात केले आहेत.
दोन्ही देशांचे नौदल या भागात उभे ठाकले असून नौसैनिकांची संख्याही वाढत आहे.