text stringlengths 0 6.48k |
|---|
त्यामुळे मला कोणीही फोन करू नये, असे आवाहन डॉ. |
इंगळे यांनी केले आहे. |
'वाटल्यास मला गोळी घाला, पण सुशांतसिंहला न्याय द्या; यात राजकारण नाही'सुशांतसिंह प्रकरण: सीबीआय सर्वात आधी 'या' प्रश्नाचे उत्तर शोधणारसुशांतसिंह प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना केवळ नामसाधर्म्यामुळे मला सुशांतच्या समर्थकांचे फोन येत आहेत. |
त्यामुळे मला कोणीही फोन करू नये. |
संदीप इंगळे, नेत्रचिकित्सक, पनवेल |
म. |
विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यभरात करोनाचे एकूण चार लाख एक हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. |
राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०. |
०९ टक्के एवढे आहे. |
शुक्रवारी १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या एक लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. |
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी पाच लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८. |
८ टक्के) आले आहेत. |
राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक गृह विलगीकरणात आहेत. |
सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. |
राज्यात शुक्रवारी ३६४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर ३. |
३९ टक्के एवढा आहे. |
मुंबई: 'सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या चौकशीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील एक युवा मंत्री अडथळे आणत आहेत. |
त्यांच्या दबावामुळं मुंबई पोलीस या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करू शकत नाहीत,' असा गंभीर आरोप भाजपचे आमदार व राज्याचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केला आहे. |
सीबीआयनं तातडीनं हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. |
वाचा: सुशांतसिंह प्रकरणात ईडीने हस्तक्षेप करावा: फडणवीससुशांतसिंह याच्या आत्महत्येला महिना उलटून गेला असला तरी या प्रकरणात रोजच्या रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. |
मुंबई पोलीस या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासतील, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. |
मात्र, सीबीआय चौकशीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहेत. |
सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतला फसवल्याचा आरोप झाला आहे. |
सुशांतच्या खात्यातून तब्बल १५ कोटींची रक्कम गायब आहे, असंही तपासात पुढं आलं आहे. |
हे सगळ्या घडामोडींमुळं या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. |
राजकीय पातळीवरही याची दखल घेतली गेली आहे. |
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनी गृहमंत्र्यांना पत्र देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. |
त्यानंतर आता भाजपनंही या प्रकरणात लक्ष घातलं आहे. |
फडणवीस यांनी ईडीनं या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली असतानाच आता आमदार भातखळकर यांनी थेट केंद्र सरकारलाच साकडं घातलं आहे. |
भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. |
'राज्यातील पोलीस सुशांतच्या आत्महत्येचा तपास नीट करू शकत नाहीत, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. |
राज्य सरकारमधील मुंबईस्थित एक युवा मंत्री या चौकशीत हस्तक्षेप करत आहे. |
सुशांतच्या बहिणीनंही असाच आरोप केला आहे. |
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे. |
भातखळकर यांनी उल्लेख केलेला युवा मंत्री कोण आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. |
त्याला उत्तर देताना 'माझा रोख कोणाकडे आहे हे उघड गुपित आहे,' असं ट्वीट भातखळकर यांनी केलं आहे. |
वाचा: 'हे सोनू सूदचं एकट्याचं डोकं नाही, त्याच्या मागे कोणीतरी असावं' |
भारत सरकारने चीनच्या अनेक अॅपवर बंदी घातली आहे. |
अनेक स्तरांवर या बंदीचे स्वागतही झाले. |
हे अॅप बंद झाल्याने भारतीय अॅप किंवा उत्पादनांना वाव मिळण्याचीही लोक आशा करत आहेत. |
मात्र वीचॅट आणि त्यासारख्या अनेक चायनीज अॅपवर बंद आल्याने चीनमध्ये शिकणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा संवादाचा दुवाच तुटला आहे. |
यापैकी अनेक विद्यार्थी कोविड - १९ महामारीमुळे भारतात माघारी परतले आहेत. |
मात्र तेथील शिक्षणात सातत्य ठेवताना या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. |
WeChat बंद झाल्याने तेथील विद्यार्थी मित्र, प्राध्यापकांशी संवाद साधता येत नाहीए. |
'भारतात जसे व्हॉट्स अॅप आहे तसेच चीनमध्ये वीचॅट आहे. |
विद्यापीठांचे अधिकृत निवेदन, सूचना, घोषणा ईमेलद्वारे कळवल्या जातात, मात्र असाइनमेंट, ग्रुप अॅक्टिव्हिटी आणि दररोजच्या डेव्हलपमेंट्स वीचॅटद्वारे शेअर केल्या जातात. |
भारताने चीनच्या अॅपवर बंदी घातल्याने वीचॅटची भारतीय सेवा बंद आहे. |
त्यामुळे तेथील दैनंदिन घडामोडी समजणे कठीण जाते,' चीनमधून एमबीए करणारी एक विद्यार्थिनी एज्युकेशन टाइम्सला सांगत होती. |
ती म्हणाली, 'मी माझ्या बॅचमध्ये एकमेव भारतीय विद्यार्थीनी आहे. |
त्यामुळे रोजचं लर्निंग मटेरिअल सहजपणे शेअर होत नाही. |
इतरही अनेक अडचणी येतात. |
'यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवातरिशॉ ही एमबीबीएसची एक विद्यार्थिनी म्हणते, 'माझे ऑनलाइन वर्ग सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहेत. |
पण संवादच नसल्याने विद्यापीठात नेमकं काय सुरू आहे हे कळायला मार्ग नसतो. |
'DU ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक समस्याअसे आणखी अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांना या आणि अशा अनेक अडचणी येत आहेत. |
तसेच ज्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणी चीनमध्ये नोकरीनिमित्त राहात आहे, त्यांनाही संवादाच्या अडचणी येत आहेत. |
जोसेफ तुस्कानोसध्याच्या करोनावासात(म्हणजेच करोना विषाणूच्या अटकावासाठी स्वीकारलेल्या बंदिवासात) मानवी जीवन आणि निसर्ग याबाबतीत अनेक गोष्टींचा साक्षात्कार होत आहेत. |
या काळातील लॉकडाउनमुळे हवामानावर निश्चित परिणाम झाला आहे. |
कारखाने, बाजार, दुकाने, देवस्थाने, बांधकामे, वाहतूक; सारे ठप्प झाल्याने सातत्याने होणाऱ्या हानीकारक प्रदूषणाला आळा बसला. |
देशातील तज्ज्ञांनी गोळा केलेल्या डेटानुसार देशातील वातावरणातील २. |
५ पी. |
( particulate matter)म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूक्ष्मकणात घट झाली आहे. |
माणसाच्या श्वसनसंस्थेला हानी पोहोचविणारे हे कण आणि नायट्रोजन ऑक्साइड वायू ही प्रदूषके वाहने आणि ऊर्जा-संयंत्रे वातावरणात उत्सर्जित करतात. |
हे सूक्ष्म कण २५ मायक्रोमीटरपेक्षा आकाराने छोटे असतात. |
ते फुफ्फुसात घुसून, तिथून शरीराच्या अन्य नाजूक भागात ठाण मांडून बसतात. |
रक्ताभिसरणात जाऊन, शरीराला आरोग्याच्या विविध व्याधींना बळी पाडतात. |
नायट्रोजनयुक्त वायू तर मूत्रपिंडे बिघडवितात. |
जगातल्या ३० प्रदूषित शहरांत आपल्या देशातील २१ शहरांचा समावेश आहे. |
आपल्या देशाची राजधानी तर यासाठी कुप्रसिद्ध आहे. |
पण तिथे झालेली हवेच्या प्रदूषणाची घट सुखद नि विस्मयकारक आहे. |
केवळ एक आठवड्यात ( मार्च २० ते २७) ७१% घट झाली आणि एरवी प्रती घनमीटरमध्ये असणारे ९१मायक्रोग्राम सूक्ष्म कण एकदम २६मायक्रो ग्रामवर येऊन ठेपले. |
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणानुसार हवेतील हे सुक्ष्मकण २५मायक्रो ग्रामपर्यंत मर्यादित ठेवायला हवेत. |
याच काळात नायट्रोजन ऑक्साइडची पातळी प्रती घनमीटर ५२ युनिटपासून १५पर्यंत खाली आली होती. |
अशीच घट मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू नगरीत आढळून आली. |
या प्रमुख शहरांतील वातावरणात नायट्रोजन ऑक्साइड चे प्रमाण ४०ते ५०%ने खाली गेले होते. |
Breathing here is dangerous to health या पुस्तकाच्या लेखिका ज्योती पांडे-लवकर रे दिल्लीविषयी सांगतात: गेल्या दहा वर्षांत प्रथमच दिल्लीचे निळे आकाश नजरेस पडले. |
घराबाहेर पडून मोकळा श्वास घेण्याची ही नामी संधी आहे. |
केवळ पी. |
२५ च नव्हे तर त्याच्यापेक्षा लहान असलेल्या पी. |
१० कणांचे हवेतील प्रमाण रोडावले. |
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिअर एअर( CREA) आणि सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च(SAFAR) या संस्थांतील संशोधकांनी देशभरातील हवेचा आढावा घेऊन काढलेले निष्कर्ष निश्चितच आल्हादायक आहेत. |
त्यांनी गतवर्षीच्या याच हंगामातील हवेच्या उपलब्ध डेटाशी तुलना केली आहे. |
अर्थात,जगभरदेखील हाच पॅटर्न आढळला आहे, त्यात नवल ते काय? |
हवेच्या प्रदूषणाबाबतीत राजधानी दिल्लीतील नोव्हेंबर२०१९ मधील परिस्थिती भयावह झाली होती. |
ते शहर पिवळ्या धुक्याने वेढले गेले होते. |
शाळा-कॉलेजेस बंद ठेवावे लागले होते. |
उत्तर भारतातील आजुबाजूच्या प्रदेशांनादेखील या वायूप्रदूषणाचा फटका बसला होता. |
वास्तविक प्रदूषण ही मानवनिर्मित समस्या आहे. |
'केअर फॉर एअर'सारख्या उपक्रमांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न होत असले तरी ही समस्या समूळ निपटून काढता आलेली नाही. |
त्यामुळे दमा, क्षय रोगासारखे श्वसनसंस्थेचे आजार मुलाबाळांत पसरतात व साथीच्या रोगांपेक्षा जास्त जीवघेणे ठरतात. |
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी जगभरात ७०लाख लोक प्रदूषणामुळे जिवाला मुकतात. |
भारतात दर दोन मिनिटाला एक मृत्यू होतो. |
करोना विषाणू आणि प्रदूषण माणसाच्या श्वसन संस्थेला चरे पाडीत असतात. |
त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. |
करोनाचा प्रताप दृश्य स्वरूपाचा आणि जलदगतीचा असतो, तर हवेचं प्रदूषण मंदगतीने होणारे अदृश्य रुपातली आक्रमण असते. |
संशोधकांनी घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, करोना विषाणूची साथ व हवेचे प्रदूषण यात मेतकूट दिसून येते. |
-ज्या लोकांना हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या व्याधी जडलेल्या असतात, ते करोना विषाणूचे आयते भक्ष्य बनतात. |
-प्रदूषणाने ग्रासून हृदय विकार, दमा, फुफ्फुसाच्या व्याधी, मधुमेह यांचे रुग्ण बनलेले असतील तर ती मंडळी करोना विषाणूंना प्रतिकार करण्यास कमी पडते. |
.-हवेतील सूक्ष्मकण शरीरात घुसले असतील तर ते विषाणूचे आयते वाहक बनतात. |
त्यामुळेच तर दाट प्रदूषण असलेल्या लॅटिन अमेरिका, आशिया, आफ्रिका येथील देशांना जागतिक आरोग्य संघटनेने आगाऊ इशारा देऊन सावध केले होते. |
जगभरातील विविध संशोधन केंद्रांतील शास्त्रज्ञांनी कोविड १९ च्या वाढीव प्रसाराला प्रदूषणाला जबाबदार धरले आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.