text
large_string
आटपाडी : तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांना सरपंच पदावरून काढून टाकावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. दिघंचीच्या ग्रामपंचायत सदस्या आशाराणी समाधान नळ यांनी सरपंच मोरे आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावि...
आपण कदापि सुडाचे राजकारण करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना टोला लगावला. मागील फडणवीस सरकारच्या राजवटीत आम्ही पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो. मात्र आपण कदापि सुडाचे राजक...
कोल्हापूर - ही पोरगी तुमच्या आमच्या घरातल्या पोरीसारखीच. ताराबाई पार्कात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दोन खोल्यांच्या क्वार्टर्समध्ये राहाणारी. वडील वारले आणि त्यांच्या जागी आई नोकरीला लागली. या पोरीला कसलीही खेळाची पार्श्वभूमी नाही, पण धावायची आवड. काहीही करायला निघाली की वुंईऽऽऽ करत पळतच सुटायची आणि आपली आवड जपायची. ...
पुणे : खासदार गिरीश बापट श्वसनाच्या त्रासामुळे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजकीय नेते, मंत्री सर्वच गिरीश बापट यांना भेटून तब्बेतीची विचारपूस करत आहेत. देवेंद फडणवीस यांनीसुद्धा भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पव...
Shark Tank India Season 2 : 2021 मध्ये डिसेंबर महिन्यात शार्क टॅंक इंडियाचा पहिला सीझन सुरू झाला होता. याचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असून यात अश्निर ग्रोव्हर आणि गझल अलग हे शार्क दिसणार नाहीत. Shark Tank India Season 2 : 'शार्क टॅंक इंडिया शो'च्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली होती. या शोच्या माध्य...
कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या १० बंडखोर आमदारांना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेश कुमार यांची भेट घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हे आदेश दिले. आमदारांनी दिलेल्या राजीना...
मकरसंक्रांतीची नांदी देणारे पतंग आकाशात दिसू लागले, की पक्ष्यांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ लागतो. नभांगणी स्वच्छंदी विहरणाऱ्या पक्ष्यांच्या विश्वात पतंगाचा मांजा जातो अन् त्यांच्या जिवाशी 'खेळ' होतो. मकरसंक्रांतीची नांदी देणारे पतंग आकाशात दिसू लागले, की पक्ष्यांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ लागतो. नभांगणी स्वच्छ...
विनिता गेरा यांनी पुणे विद्यापीठामधून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम कोलकाता येथून अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. प्रोडक्ट इंजिनिअरिंग, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आदी क्षेत्रात त्यांनी काम केले असून डेल टेक्नोलॉजीज या जागतिक स्तरावर अग्रगण्य अशा संस्थेच्या बंगळुरू व पुण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'विषारी' टीका केल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात भाजपने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली. खरगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून प्रतिबंधित करण्याची मागणी भाजपने केली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र...
मुंबई - कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री...महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे यांच...
अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. चक्क एका पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक संदीप भगवान फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा ...
नवी दिल्लीः नागा लोक कधीही भारतीय संघराज्याचे भाग नव्हते व ते कधीही भारतीय राज्यघटना स्वीकारणार नाहीत, अशी मोदी सरकारला अडचणीत टाकणारी भूमिका नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम (इसाक मुईवा )ने घेतली आहे. एनएससीएन(आय-एम)चे सरचिटणीस थुईनगालेंग मुईवा (८६) यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना सुमारे ५५ मिनिटांची एक मुलाखत...
रायचंद शिंदे, प्रतिनिधी आंबेगाव : मेडिकल, इंजिनिअरिंग आणि पदवी शिक्षणासाठी मुलांची धडपड सुरू आहे. विधी महाविद्यालयात नागपूरमध्ये अॅडमिशन घेतली आणि मुलाला सोडून पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले. कुटुंबातील तिघेही विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्याकडे येत असताना हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गवर झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्याती...
पोलीस दलाशी संबंधित विविध घडामोडी राज्यात घडत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील दीक्षांत समारंभाला मार्गदर्शन केलं. (Uddhav Thackeray Praises Maharashtra Police) हायलाइट्सः नाशिकः 'चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खऱ्या पोलिसांना जमिनीवर...
चर्चासत्रात उध्र्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची उपलब्धता, औपचारिक मान्यता नसलेला पाणी वापर, प्राधिकरण व इतर कायद्यातील उणिवा, उपलब्ध पाण्याच्या वाटपाचे नियोजन आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. गोदावरी खोऱ्यात पाणी वाटपावरून वाद सुरू आहे. ज्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असते. धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नसतो. त्या वर्षी पा...
। म्हसळा । वार्ताहर । कल्याण मटका जुगार चालविणार्या आरोपीला रायगड जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बुधवारी सायंकाळी फिर्यादी अलिबाग गुन्हे शाखेचे पो. ना. अक्षय तुकाराम जाधव यांनी स्थानिक पोलीस सूर्यकांत जाधव, विजय फोफसे यांच्या सहकार्याने आरोपीला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आरोपी इजाजद रशीद गावकर (35, रा. साळी आळ...
जर पार्थ अपरिपक्व तर त्याला उमेदवारी का दिली हेही पवारांनी स्पष्ट करावे - दरेकर । My Marathi\nHome Feature Slider जर पार्थ अपरिपक्व तर त्याला उमेदवारी का दिली हेही पवारांनी स्पष्ट करावे - दरेकर\nPosted By: SHARAD LONKARon: August 12, 2020 In: Feature Slider, Politician\nपुणे-पार्थ पवारांनी केलेल्या मागणीला कवडीचीही किं...
मराठा सेवा संघ ही सेवाभावी संस्था आहे. मराठा-कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास करणे हाच मूळ उद्देश आहे. पुसद : मराठा सेवा संघ ही सेवाभावी संस्था आहे. मराठा-कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास करणे हाच मूळ उद्देश आहे. मराठा सेवा संघाची लोककल्याणकारी भूमिका घराघरात पोहोचवा असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत...
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचा जन्म १७ मार्चला झाला. आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व राष्ट्रवादी पक्षाच्या युवा नेत्या आहेत. विशेष म्हणजे त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या ...
सौंदर्य हे फक्त चेह-यापुरतं मर्यादीत राहिलेलं नाही. आजकाल सौंदर्याच्या बाबतीत मुली लहान-सहान गोष्टींनाही महत्त्व देऊ लागल्या आहेत. केसांपासून ते अगदी पायांच्या बोटांपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्याकडे त्यांचा भर आहे. हाता-पायांची बोटं, नखं सुंदर ठेवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. सुंदर, नितळ, स्वच्छ बोटं आणि नखं सगळ्यांनाच ...
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा शेळकेवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमाला राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंवर केलेल्या ...
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत दत्ता यांस अन्न आणि पुरवठा विभागातून आरकेएसवाय रेशनकार्ड मिळाले होते. पश्चिम बंगालच्या बाकुंडा जिल्ह्यात एका युवकाने संतप्त होऊन प्रशासनाचा हटके निषेध नोंदवला. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या कारसमोर हा ४० वर्षीय तरुण कुत्र्यासारखे भोकताना दिसून आला. सध्या सोशल मीडियावर ह्या निषेध ...
आंसास खिळलेले चाक. आंसही फिरतो; एक दोर चाकास कोठे तरी बांधलेला असून तो चाकावर गुंडाळिलेला असतो, त्याचा योगानें वरची गोष्ट घडत्ये, दुसरा एक दोर आंसास बांधिलेला असतो आणि जेव्हां चाकाबरोबर आंस फिरतो तेव्हां त्याभोवता तो गुंडाळतो. जो आंसाचा दोर खालीं लोंबत असतो, त्यास वजन टांगितात; आणि चाकाशी लाविलेली शक्ति, चाकास व आंसास ...
चोपडा लॉन्समार्गे मखमलाबाद रोड कडे जाणाऱ्या मार्गावरील धनदाई लॉन्स समोर एका स्कार्पिओने पेट घेतल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे. मात्र, स्कार्पिओ संपूर्ण जळून खाक झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी स्कार्पिओ क्रमांक एम एच...
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षा 4 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होत आहेत. यातील 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीए (BA) आणि बीएस्सी (Bsc) सत्र 5 च्या परीक्षा 4 नोव्हेंबर तर तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 ची परीक्षा 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होत आहेत...
स्वतंत्र विदर्भ हा भाजपाच्या राष्ट्रीय अजेंड्यावरील महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार दत्ता मेघे यांना दिले. विदर्भ विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने मेघे यांच्या नेतृत्वात रविवारी मुख्यमंत्र्यांची 'रामगिरी'वर भेट घेतली. त्याव...
इस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तान सोशल मीडियावर महादेवाच्या रूपात इमरान खानाचा फोटो व्हायरल होत आहे. यामुळे गोंगाट पसरला आहे. पाकमध्ये राहणारे हिंदूच नव्हे तर पाक संसदेतही हल्ला होत आहे. सूत्रांप्रमाणे पाकिस्तानी संसदने तहरीक-ए-इंसाफ चे अध्यक्ष...
परळी : सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी मराठवाड्यात अजून अनेक भागात हवा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी अजूनही अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासोबत पिण्याच्या पाण्यासाठी अजून स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान परळीतील राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्...
एमएससीआय आशिया पॅसिफिक फायनान्शिअल इंडेक्समध्ये २. ७ टक्क्यांची घट दिसत असून ही २९ नोव्हेंबरनंतरची सर्वाधिक घट आहे. कळंबच्या आरोग्य प्रशासनाला कोविड काळात रुग्णावर उपचार करण्यासाठी बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर मागवावे लागत होते. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाल...
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या लायम लिव्हिंगस्टोनने दमदार फटकेबाजी करत ६२ धावांची खेळी साकारली त्यामुळेच त्यांना निर्धारीत २० षटकांमध्ये १८० धावा उभारता आल्या. चेन्नईचा संघ यावेळी तिसऱ्या विजयासाठी उत्सुक होता. पण चेन्नईची सुरुवात वाईट झाली आणि त्यांची त्यानंतर ५ बाद ३६ अशी दयनीय अवस्था झाली. त्यानंतर शिवम...
तास न तास मोबाईल बोलणा-या बहिणीची भावाने रागाच्या भरात हत्या केल्याचे उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे उघड झाले आहे. मुरादाबाद, (उत्तरप्रदेश )दि. ७ - तास न तास मोबाईल बोलणा-या बहिणीची भावाने रागाच्या भरात हत्या केल्याचे उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे उघड झाले आहे. मुरादाबाद येथील रुक्साना (नाव बदलले आहे )या १८ वर्षीय य...
काय आहे आजचा भाव? आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,८३० रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ५८,२६० रुपये इतका आहे. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर दिवसातून दोन वेळा जाहीर केले जातात. सकाळ आणि दुपारी अशा दोन सत्रात जाहीर होतात. त्यामुळे दोन्ही धातूंचे दर बदलत असतात. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच...
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Actor Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीनची पत्नी आलिया आणि आई मेहरुनिसा यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद सुरू आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दिकी यांनी नुकतीच सूनेविरोधात एफआयआर दाखल केली होती. तर नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच...
एकतर विक्रेते यूरियाची टंचाई दाखवितात किंवा सुफला, पोषक आदी खतांची सक्ती करत असून, गोणीला गोणी फॉर्म्युला अवलंबत आहेत. अनेक ठिकाणी तर सर्रास वाढीव दराने विक्री सुरू असून, शेतकरी मात्र निमूटपणे वाढीव पैसे व लिंकिंगने खरेदी करत असून, तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. नाशिक / येवला : तालुक्यात कपाशी, मका, बाजरी, का...
दत्तक मूल घरात येण्याने 'घराला घरपण येते' असा सगळ्यांच पालकांचा अनुभव असतो. मूल घरात आले, की त्याचा लळा लागतो आणि ते 'दत्तक मूल' आहे हेच विसरायला होते. काळाच्या ओघात काही पालकांकडून आपल्या मुलांना ती दत्तक आहेत, हे सांगणे राहून जाते. मुले मोठी झाल्यानंतर हे हे सत्य त्यांना बाहेरच्या व्यक्तींकडून कळू नये, ही काळजीही त्य...
महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधितांची संख्या १ हजारांपेक्षा जास्त असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत ५०० रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या २४ तासात दीड लाखांपेक्षा जास्त झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात १ लाख ५९ हजार ४२४ नवे रुग्ण आढळले ...
डोंबिवलीकरांच्या संतापाने धास्तावलेल्या शिवसेनेने शुक्रवारी दुपारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे लोटांगण घालत मेट्रो डोंबिवलीपर्यंत आणण्याची मागणी केली. ठाणे- डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरच्या २५ लाख लोकसंख्येला मेट्रोची गरज असताना ठाण्यापर्यंत आलेली मेट्रो भिवंडीमार्गे कल्याणपर्यंत नेण्याचा निर्णय एमएमआरडी...
'आवाज'मध्ये 'संत ज्ञानेश्वर' या भूमिकेतून यशोमन आपटेनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. नंतर या कलाकाराची, 'टीव्हीवरचा निळ्या डोळ्यांचा अभिनेता' अशी ओळख बनली. सध्या तो 'फुलपाखरू' या मालिकेमधून लोकप्रियता मिळवतोय. त्याचे सोशल मीडियावरील वाढते चाहते आणि अभिनयाचा संयमी भाव या गोष्टी त्याला 'मोस्ट डिझायरेबल मॅन ऑन टीव्ही' (२०१...
Crime News : पुष्पा पतीसोबत खूप वाद घालत होती. छोट्या छोट्या कारणांवरुन दोघांमध्ये भांडण होतं. यात किर्तीला पत्नी मारत होती. नवी दिल्ली - पती-पत्नींमध्ये नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवरून वाद होतात. कधी कधी काही वाद हे टोकाला देखील जातात. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दररोज घरात होणारा वाद आणि पत्नीकडून होणाऱ्या ...
चेन्नईः 6 एप्रिलपासून तामिळनाडू विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मोठ्या संख्येनं मतदान करायला सुरुवात केली आहे. यामध्ये दक्षिणात्य चित्रपट विश्वातील बड्या कलाकारांनीही हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आज सकाळी अभिनेता कमल हसन अभिने...
नागरी सेवा परिक्षा देणाऱ्या सर्वसाधारण गटातील उमेदवारांची वयोमर्यादा ३० वरुन २७ वर्षे करायला हवी, अशी सूचना निती आयोगाने सरकारकडे केली होती. काही दिवसांपूर्वी निती आयोगाने केंद्र सरकारकडे शिफारस केली होती की, नागरी सेवा परिक्षेसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा कमी करण्यात यावी. यावर मंगळवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिं...
मुंबई - दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय ऍलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर गुरूवारी एका दुचाकीमध्ये स्फोट झाला. यात एका पोलीस हवालदारासह चार जण जखमी झाले. यामागे इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या पार्...
। मुंबई । वृत्तसंस्था । २००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद प...
आता परीक्षा घेतली किंवा खरेदी वाळवलेले मासे काही पाच किंवा सहा वर्षांपूर्वी पेक्षा जास्त महाग होते. बाजारात किंवा शॉप मध्ये येत आहे, आपण स्वतः ला विचार, पकडणे "पिण्यास नाही मी वाळवलेले मासे एक बिअर काय आहे? " आणि मग आपण काउंटर जा, किंमत बघितलं तर एक मासे करू शकत नाही जाणतो, आणि दोन आधीच महाग खरेदी. आणि काहीही घरी परत. ...
मुंबई, 3 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपतीचा (KBC 13) कर्मवीर स्पेशल एपिसोडचं आज प्रसारण करण्यात आलं. या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आले. या शोदरम्यान अमिताभ बच्चन यांनी सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांना एका गाण्याची धून ऐकवून प्रश्न विचारला....
50,000 deaths in Maharashtra by corona । महाराष्ट्रात काेराेनाने 50 हजार मृत्यू, जगातील एकमेव राज्य; 19.65 लाख रुग्ण, पैकी 18.61 लाख कोराेनामुक्त - Divya Marathi\n50,000 Deaths In Maharashtra By Corona\nमहाराष्ट्र कोरोनाःमहाराष्ट्रात काेराेनाने 50 हजार मृत्यू, जगातील एकमेव राज्य; 19.65 लाख रुग्ण, पैकी 18.61 लाख कोराेना...
लडाखमधील चीनसोबतच्या संघर्षावरून काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर वारंवार निशाणा साधत आहे. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी मोदींवर टीका करत पंतप्रधानांच्या भित्रेपणामुळे चीनने भारताच्या जमिनीवर ताबा मिळवला असल्याचे म्हटले आहे. Everybody believes in the capability and valour of the Indian army. Except the PM...
सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने (BJP) बाजी मारली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या सिद्धिविनायक पॅनेलचे ११ उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ८ ...
मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती आव्हानात्मक आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण आहे. अगदी लसींपासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यापर्यंत सगळ्याच गोष्टींचा तुटवडा आहे. या गंभीर स्थिती केंद्र सरकारकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जात असताना आता राज्य सरकारपुढे एक अडचण निर्माण झाली आहे. कारण, केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ५० म...
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २०५ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून, १८१ जणांनी करोनावर मात केली. शहरात १४६, तर ग्रामीणमध्ये ५२ रुग्ण बाधित आढळले. नाशिक : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २०५ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून, १८१ जणांनी करोनावर मात केली. शहरात १४६, तर ग्रामीणमध्ये ५२ रुग्ण बाधित आढळले. दिवसभरात दोन बाधितांनी जीव ...
महाराष्ट्रीय ज्ञानकोश. ( आ ) १३४ या तहानें परांडा व सोलापूर हे दोन किल्ले व त्यांच्या खालील प्रदेश, सोलापूरच्या पूर्वेस असलेले नळदुर्ग, बेदर, व कल्याणी हे जिल्हे, आणि उत्तरेस वसईनदीपावेतोंचा व भीमा व निर। या नद्यांमधील निजामशाहीचा मुलुख एवढे विज.पुराकरांकडे ठेवण्यांत येऊन, त्यांनी मोगल बाद शहास सालीना वीस लक्ष होन खंडण...
प्रस्तावना - भाषा ही मानवाला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे. माणसाला भाषेविषयीचे प्राचीन काळापासून कुतूहल वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे. या साधनाचे स्वरूप नेम...
१९८४ च्या शीख हत्याकांडातील आरोपींना पाठिशी घालत असल्याबद्दल अमेरिकेतील एका न्यायालयाने भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना समन्स बजावले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. १९८४ च्या शीख हत्याकांडातील आरोपींना पाठिशी घालत असल्याबद्दल अमेरिकेतील एका न्...
prestigious taken advantage of Reservation since from hundreds of year । प्रतिष्ठित 3-3 पिढ्यांपासून घेताहेत आरक्षणाचा लाभ; 10% सवर्ण आरक्षणाच्या निर्णयावर दिव्य मराठीची पडताळणी - Divya Marathi\nPrestigious Taken Advantage Of Reservation Since From Hundreds Of Year\nप्रतिष्ठित 3-3 पिढ्यांपासून घेताहेत आरक्षणाचा लाभ; 10...
माझ्या काही जिज्ञासा. १) रामायणावर आधारीत सर्वात जुनी ज्ञात (सर्वप्रकारातील) चित्रे, शिल्पाकृती कोणत्या हे शोधण्यासाठी गूगल शोधले तर मला त्याचे चटकन उत्तर मिळाले नाही. ३) त्यातच ऋग्वेद आणि रामायणात चित्र हा शब्द मुख्यत्वे सुंदर / आकर्षक आणि इतर अर्थानी विशेषण स्वरुपात येतो असले दिसले. मग आकृती अथवा पेंटींग या अर्थाने '...
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी, बाळाच्या तोंडात एकमेकांच्या वाढतात की दोन स्वतंत्र भागांना पासून तयार होतो. कुठेतरी ते वरच्या जबडा तयार करण्यासाठी, आठव्या आठवड्यात सहाव्या एकत्र सामील झाले आहेत. शिवाय, शिवण जीभ सह तोंड शिक्कामोर्तब केले मागे आणि पुढे चालते. गरोदरपणाच्या दहाव्या आठवड्यात पूर्णपणे तोंड, नाक आणि व...
विधानसभा निवडणूक आणि येथील 35 गावांचा पाणी प्रश्न हे गेल्या अनेक वर्षापासूनचे समीकरण आहे. याच प्रश्नावरती अनेक निवडणुका लढल्या गेल्या आणि त्या जिंकल्या सुध्दा परंतु येथील पाणी प्रश्न अजूनही जैसे थे आहे. पंढरपूर (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या पाणी प्रश्ना संबंधी गेली 11 वर्षे सातत्याने विधानसभेत...
हिवाळ्यात हिरवी मेथी बाजारात येऊ लागते. मेथीमध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्वे ए, सी, के, बी, मॅंगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि पाणी असते. ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती मुख्यतः प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. जेवणात चव वाढवणे, मधुमेह नियंत्रित क...
गंगाजमुनातील तरुणींना वेश्याव्यवसायासाठी नेणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी पकडले. नागपूर : गंगाजमुनातील तरुणींना वेश्याव्यवसायासाठी नेणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातील चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. आरती अर्जुनसिंग बेडिया (वय ३७, रा. भास्कर बिल्डिंग, गंगाजमुना) आणि शेख युनूस शे...
न्यूयॉर्क - लहान बाळ एक वर्षाचे होईपर्यंत आई हेच त्याचे सर्वस्व असते. त्याची आई त्याला क्षणभर जरी दिसली नाही किंवा जाणवली नाही तर ते लगेच अस्वस्थ होते, इतके हे एकाच व्यक्तिमत्वाचे दोन पैलू असतात. त्यामुळे बाळाने आईच्या कुशीत झोपी जाणे हे बाळासाठी सुरक्षित मानले जाते. या गोष्टीला आजपर्यंत एकमुखी मान्यता होती. परंतु आता ...
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) आयपीएल २०२१ चा पहिला सामना रंगणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७. ३० वाजता सुरू होणार आहे. या रोमहर्षक सामन्यात सर्वांचे लक्ष आरसीबीचा युवा धुरंधर देवदत्त पड्डीकल याच्या कामगिरीवर...
symbolic image ( Image Source : Getty ) Nagpur News : नागपूर शहरात जीवघेण्यात नायलॉन मांजा विक्रेता आणि वापर करणाऱ्यांवर पोलीस आणि महानगरपालिका अपयशी ठरली असल्याचे दिसून येत आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरा बाराखोली परिसरात नायलॉन मांजाने गळा कापलेल्या दहा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील मह...
जंगलातून नष्ट होत असलेल्या वाघांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'ग्रेट आउटडोअर्स'तर्फे 'टायगर सायक्लो-वॉक' हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. म. टा. प्रतिनिधी, पुणेजंगलातून नष्ट होत असलेल्या वाघांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'ग्रेट आउटडोअर्स'तर्फे 'टायगर सायक्लो-वॉक' हा अनोखा उपक्रम आयोजित क...
लाईव्ह न्यूज : 2700 कोटींचा खर्च, ऑस्ट्रेलियातील ऑपेरा हाऊसपेक्षाही मोठे. . . कसे आहे IECC कन्व्हेन्शन सेंटर? अर्जुनी मोरगाव (गोंदिया ) : शेतात काम करीत असताना अंगावर विज पडल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाला. बॉलीवुड : सोनम कपूर आणि मलायका अरोरामध्ये झाली भांडणं? बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : अमिताभ बच्...
indira gandhi - Latest News on indira gandhi । Read Breaking News on Zee News Hindi English\nHome » Marathi » Indira gandhi 'देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?' देशासाठी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधींनी बलिदान केलं, देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का? 'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली' 1971...
जेव्हा 4 ऑक्टोबर 2008 रोजी बराक ओबामा पहिले अफ्रिकन अमेरिकन चे लोकप्रतिनिधी अध्यक्ष झाले, तेव्हा जगातील संबंध दृढ करण्यासाठी ही एक वरदान ठरली. परंतु ओबामा पदभार स्वीकारल्यानंतर ते जातिवाद, कट रचणे आणि इस्लामोफोबिया यांचे लक्ष्य होते. आपण वंशांच्या आधारावर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या कोणत्याही रणधुमाचे नाव दे...
Nashik Accident : स्कॉर्पिओसह कार असलेला हा कंटेनर, या ट्रकवरून नेला जात होता. समोरून जाणाऱ्या या महाकाय क्रेन नेणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली. नाशिक - नाशिक शहरातून जाणाऱ्या 6 किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरवर झालेल्या अपघाताने एका बाजूची वाहतूक खोळंबली आहे. 172 फुटी महाकाय क्रेन नेणाऱ्या ट्रकला, 4 चाकी वाहनं घेऊन ज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग मंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. राणे यांनी ठामपणे बजावले की, त्यांना या क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ अपेक्षित असून त्यासाठी मंत्रालयाच...
चेतेश्वर पुजाराचे वेगवान शतक, १४४३ दिवसांचा दुष्काळ संपवला! भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर जाहीर करून बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. चेतेश्वर पुजाराने १३० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा चोपल्या. ३ वर्ष व ३४७ दिवसानंतर ( एकूण १४४३) चेतेश्वर पुजाराने कसोटीत शतक झळकावले. चेतेश्वर पुजाराने १...
ई-लोकमान्य । विशेष लेखःआज २२ सप्टेंबर. शिक्षणाची गंगा तळा गावात पोहचविणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. अज्ञानाचा अंधार मिटवण्यासाठी खेडोपाडी ज्ञानाची मशाल पेठवण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केले. त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ ला कुंभोज येथे झाला. तर प्राथमिक शिक्षण विटा येथे तर माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे ...
Satara NCP News : स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी मधील मतभेदामुळे जिल्हा औद्योगिक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय ऊर्फ बंडु ढमाळ यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला . यामुळे तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या गोटात विविध राजकीय तर्कविर्तकांना आज दिवसभर उधाण आले . दत्तात्रय ऊर्फ बंडु ढमाळ यांनी आपल्या राजीनामा राष्ट्रवादी NCP...
अभिनेता आविष्कार दार्वेकर बिगबॉस सीझन ३ पासून चांगलाच चर्चेत आला होता. या कार्यक्रमात त्याने अनेक कारणांमुळे प्रेक्षकांमध्ये त्याच्या नावाची चर्चा झाली होती. या कार्यक्रमात आविष्कारची घटस्फोटित पत्नी स्नेहा वाघनेही सहभाग घेतला होता. त्यामुळेच त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा अभिन...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस एका वादग्रस्त पत्रामुळे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र हे पत्र बनावट असल्याचं सांगितलं जातंय. गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणाची तक्रार केली आहे. ज्यावर त्यांची स्वतःची स्वाक्षरी आहे. एम. बी. पाटील यांनी ट्वी...
पोलीसनामा ऑनलाईन टीम : मिथुन - तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. कुटुंबात आनंद आणि प्रेम दिसून येईल. विरोधक तुमच्यासमोर पराभव पत्करतील आणि तुमचे वर्चस्व राहिल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. व्यापारासाठी दिवस सामान्य आहे. विवाहितांसाठी दिवस ठिक आहे. सासरच्या लोकांना भेटाल आणि त्यांची विचारपूस कराल. प्र...
मुंबई :- अनेक वर्षांपासून आमच्या मनामध्ये जो संशय होता, तो आता अधिकच वाढत चालला आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब होत चालल आहे. खरच उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? की त्याला मुंबईतील कुठल्या कचऱ्याचून उचलून ठाकरे आडनाव दिल. त्याच्यामधील गुण, विचार पाहता आता त्यांच रक्त, डीएनए तपासण्याची वेळ आली आ...
मुंबई : राज्य सरकारमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बदल्या करण्यात येतात. पण नव्याने आलेल्या शासन निर्णयानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या अपवादात्मक परिस्थितीमुळे आणि विशेष कारणामुळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात ३...
पुणे : घरात शिरलेले शेजा-यांचे मांजर घरातून बाहेर फेकल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने महिलेला मारहाण करण्यात आल्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना म्हाळुंगे (मुळशी) येथे घडली. प्रभा मोहन रंगपिसे (वय ४०, रा. सुहास पाडाळे चाळ,म्हाळुंगे,पुणे) असे झालेल्या महिलेचे नाव असून, पोलिसांनी या प्रकरणी...
तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, जिऑलॉजीः noosphere शिकवण मानकांवर अनेक उशिर सामान्य शिस्त थोडे आहे मेळ. काय ही संकल्पना आहे का? त्या noosphere आहे, प्रथम जग त्याच्या प्रकाशने मध्ये फ्रेंच गणितज्ञ Eduard Lerua 1927 मध्ये सांगितले. फक्त काही वर्षे तो जिओकॅमेस्ट्री (आणि biogeochemistry) समस्या यासंबंधी, थकबाकी रशियन शास्त्रज्ञ...
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाला दुर्वा अर्पण कराव्या. असे मानले जाते की गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे. गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात. जेव्हा तुम्ही दुर्वा अर्पण करत असाल, तेव्हा हा मंत्र 'इदम दुर्वादलम ओम गणपतये नमः' म्हणावा. संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून गणपतीची पूजा करुन गण...
द्राक्षांवरील गारपिटीच्या अस्मानी संकटातून द्राक्ष उत्पादक अजून सावरला नसताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट शेतकऱ्यांसाठी आणखी एक संकट ठरले. द्राक्षांवरील गारपिटीच्या अस्मानी संकटातून द्राक्ष उत्पादक अजून सावरला नसताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट शेतकऱ्यांसाठी आणखी एक संकट...
केंद्रात सत्ता स्थापित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेत विविध योजना सर्वसामान्य नागरिकांना दृष्टीक्षेपात ठेवून सुरू केल्या. चंद्रपूर : केंद्रात सत्ता स्थापित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेत विविध योजना सर्वसामान्य नागरिकांना दृष्टीक्षेपात ठेवून सुरू केल्या. सन...
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२मधील ४२व्या सामन्यात अष्टपैलू कृणाल पंड्या याने धमाकेदार प्रदर्शन केले. त्याला फलंदाजीत विशेष प्रदर्शन करता आले नाही. परंतु त्याने गोलंदाजीत आपला दम दाखवला. ४ षटके गोलंदाजी करताना केवळ ११ धावा देत त्याने २ विकेट्स काढल्या. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्या...
राजस्थानने पहिल्याच सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव केला. संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या विस्फोटक फलंदाजीनंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यजुवेंद्र चहलने चार विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदरा...
भयंकर स्वप्न. चिठी शुक्रवारींच आली होती. त्याप्रमाणे मी तिला पाहण्याकरितां गेलो.. पण मला जायाला फार रात्र झाली. ती जरा गुंगींत असल्याचें दिसलें म्हणून मी तिला विशेष हकीगत विचारिली नाहीं. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मी आपणांला भेटेन. " जशी सवड होईल तसें. केव्हांही आलां तरी सारखेंच. ", आनंदराव म्हणालेः - " तर मग आजच ...
पिंपरी दि. ३०(पीसीबी)- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुल आयोजित वसंत व्याख्यानमाला समारोप कार्यक्रमात खास भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींना संगीतमय आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचंड उत्साहात सर्वांनी लतादीदीच्या गीतांना भरभरून दाद दिली.स्वा...
मुंबई : ठाकरे सरकारला (Thackeray government) घेरण्याचा इरादा केलेल्या विरोधीपक्ष भारतीय जनता पक्षाने विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक पाऊल मागे घेण्याची तयारी ठेवली आहे. मागील अधिवेशनात गोंधळ घातल्याच्या आरोपावर दिलीगिरी व्यक्त करीत, भाजपचे (bjp) १२ आमदार आपल्या निलंबन मागे घेण्याचा आग्रह सरकारकडे करणार आहेत. पर...
CNG Car Tips : भारतीय बाजारात दरवर्षी लाखो कारची विक्री होते तसेच लाखो कार बाजारात येत असतात. अशातच आता पुढच्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिलपासून या कारच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना नवीन कार खरेदी करण्यासाठी पूर्वींपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. इतकेच नाही तर बाजारात वापरलेल्या कारची खरेदी व...
' समलैंगिकता, आपण आणि अजूनही अनुत्तरीत असलेले काही प्रश्न!\nJune 29, 2017 October 2, 2020 इनमराठी टीम 3573 Views0Comments india, LGBT community\nआयर्लड देशाच्या पंतप्रधान पदी लिओ वराडकर या महाराष्ट्राय वंशाच्या मराठी माणसाची निवड झाली. आपल्याकडे पंतप्रधान पदासाठी झटणाऱ्या मराठी माणसाचा संघर्ष चालू असताना परदेशात सर्वोच...
पुणे : शहरातील पथदिव्यांवर ५२ हजार एलईडी फिटिंग्ज बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने मे. ईईएसएल कंपनीचे नाव सुचविले असून, या कंपनीसोबत करार करण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. यासोबतच अपेक्षित असलेल्या १९ कोटी १६ लाख ६८ हजार रुपये खर्चासही मान्यता मिळावी, असेही नमू...
यवतमाळ : आपल्या कामांसाठी पोलीस महासंचालक कार्यालयातील कार्यासन अधिकारी, त्यांच्या लिपिकांना भेटलात तर खबरदार, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा महाराष्ट्र पोलीस दलातील तमाम अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ४ आॅगस्ट २०१४ रोजी यासंबंधी लेख...
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा सामना निश्चित आहे. कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार विनय कोरे (Vinaya Kore) व प्रकाश आवाडे (Prakasha Awade) यांच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पक्षाचे बळ वाढणार आहे. या दोघांकडे निर्णायक मते आहेत आणि गेल्या निवडणुकीत या दोघांनीही पालकमंत्री सतेज पाटील (S...
'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट'मध्ये रविवारी (१५ एप्रिल) झालेल्या कार्यशाळेत कर्करोग शस्त्रक्रियांच्या थेट प्रक्षेपणासह चर्चासत्र तसेच व्याख्यानांमधून एकूणच कर्करोग आणि त्यावरील निरनिराळ्या उपचार व शस्त्रक्रियांवर मंथन घडून आले. विशेष म्हणजे 'स्टेट कॅन्सर'मध्ये पहिल्यांदाच शस्त्रक्रियांचे प्रक्षेपण झाले आणि सुमारे शंभर तज्...
नेवासा : नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे आयोजित दत्तजयंती महोत्सवाची सांगता बुधवारी महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून करण्यात आली. भास्करगिरी महाराज म्हणाले, श्रद्धा ही अशी आहे की, जी नष्ट करता येत नाही. श्रद्धेमुळेच भारतीय माणूस आज टिकून आहे. युवा पिढी ही देशाची रक्षक असून दूध हाच ...
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या 'संडे सिंघम' या एक दिवसीय आमंत्रितांच्या बास्केटबॉल स्पर्धेत धरमपेठ क्रीडा मंडळाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. सुभेदार नरेंद्र सिंग बैस मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मध्यप्रदेशातील चार जिल्ह्यांच...
Ration Card : नागरिकांनो सावधान , चुकूनही फ्री रेशनच्या नावाखाली 'या' चुका करू नका , नाहीतर होणार . . Ration Card: खुशखबर ! रेशन कार्डधारकांना सरकार देणार दिवाळी भेट ; केली 'ही' मोठी घोषणा ; आता . .
कुस्तीपटूंनी जंतर-मंतरवर धरणा धरून सरकारला जाब विचारला आहे आम्हाला न्याय अजूनही मिळाले नाही. गेले तीन महिने आम्ही येथे न्यायाची वाट पाहत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय दिला गेला नाही. यावर समिती नेमली होती तरीही त्या समितीने आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाही. दिल्ली, दिल्लीच्या जंतर-मंतरवर पुन्हा एकद...
अंबाझरी उद्यान व तलाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मृत मासोळ्यांचा खच पडला आहे. या मृत मासोळ्यांवर कुत्रे तुटून पडतात. तलावाच्या काठावर पसरलेल्या दुर्गंधीने उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपाचे याकडे दुर्लक्ष असून, कुठलीही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या ११ एप्रिल...
नवी दिल्ली - बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय हिंसाचार प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी असा जो आदेश कोलकाता हायकोर्टाने दिला आहे त्याच्या विरोधात बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला नोटीस जारी करून त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितल...
नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गहू...
डेहराडून - येत्या गुरुवारपासून केदारनाथ यात्रा सुरू होत आहे. यावेळी येणाऱ्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टर सेवा देण्यासाठी सात विमान कंपन्यांना उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेवून उत्तराखंड सरकारने दोन मार्गावर हेलिकॉप्टरची सेवा देण्यासाठी परवानगी दिली आहे. यामधील ...