text
large_string
कांदिवलीतील अमोल खराडे यांना २०१५ मध्ये म्हाडाच्या मालवणीतील घराची लाॅटरी लागली. मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, यामुळे संपूर्ण खराडे कुटुंब आनंदात होतं. नोव्हेंबर २०१६ मध्ये खराडे यांनी घराची संपूर्ण रक्कम भरली. आता त्यांना प्रतिक्षा लागली होती ती हातात घराची चावी पडण्याची. एक-एक महिने पुढे सरकू लागले; पण य...
अजय चौधरी यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता।Narhari Zirwal\nAjay Chaudhary & Eknath ShindeAgrowon\nअजय चौधरी यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता\nविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मात्र शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. या निर्णयाला शिंदे गटाकडून उच्च न्...
नवी दिल्ली - सरकारचे देणे आणि कर्जाच्या बोजाखाली अडकलेली कंपनी व्होडाफोन आयडिया 25 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीला यासाठी परवानगी दिली आहे. एकत्रित महसुलाच्या आधारावर सरकारचा हिस्सा 10 वर्षांत द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यातील दहा टक्के रक्कम कंपनीला या वर्ष...
१० नोव्हेंबरला आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून दोन्ही संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्ती...
चिंबळी - निघोजे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रूपाली नंदकुमार येळवंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निघोजे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून नम्रता येळवंडे यांनी स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी सरपंच रमेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्...
राज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध विभागांच्या सरकारी कार्यालयात दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सवलत देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी घेतला आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध विभागांच्या सरकारी कार्यालयात दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थि...
कल्याण : केडीएमसीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ताधारकांना तीन वर्षे सामान्य करआकारणी व तीन वर्षांनंतर प्रतिवर्षी २० टक्के करवाढीचा ठराव महापालिकेने केला होता. हा ठराव महापालिका अधिनियमाशी विसंगत असल्याने तो रद्द करण्यासाठी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी जूनमध्ये राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकड...
ठाकरे सरकारच्या काळात कार्यान्वित न झालेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरु केले आहे. सह्याद्री अतिथिगृहावर याबाबतची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वर्ल्ड बँकेचे अधिकारी उपस्थित असून बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्...
मूळचा पंजाबचा असलेला बिपुल शर्मा पंजाबव्यतिरिक्त हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन संघांसाठी खेळला आहे. तो आता अमेरिकेतून खेळणार असल्याने यापुढे भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकणार नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार, परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंना आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागते. बिपुल य...
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावासाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. हवामान विभागाने ( Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत मंगळवार (13 ऑक्टोबर) आणि बुधवारी (14 ऑक्टोबर) राज्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निर्णय़ दिल्यानंतर राज्यात शिंदे सरकार कायम राहणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडे सोपवला होता. आता राहुल नार्वेकर यावर कधी निर्णय़ देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावर...
आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंना भाजपा कार्यकर्त्यांची चिंता! राष्ट्रवादीतील बंडाळीचे खरे कारण सांगितले भुजबळांनी! पंधरा दिवस आधीच पवारांच्या 'राजीनाम्या'चे ठरले होते! शरद पवार पुन्हा भिजले! शरद पवारांचा हुबेहूब आवाज काढत त्याने का केला होता मंत्रालयात फोन? कोवॅक्सिनवर लवकरच जागतिक आरोग्य संघटनेच्...
बीड । भगवानभक्ती गडावरील मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या कार रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की दसरा मेळाव्याची परंपरा ही मुंडे साहेबांची परंपरा होती, त्यांनी या मेळाव्याच्या परंपरेला सुरुवात के...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेन्डंट म्हणून कार्यरत असलेले अभिजीत या खासगी कंपनीच्या १६० कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक संपाचे हत्यार उपसले. वेतनात वाढ व पगारी सुटीची त्यांची मागणी होती. नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेन्डंट म्हणून कार्यरत असलेले अभिजीत या खासगी कंपनी...
मंडणगडः रथावर आरूढ झालेले बाबासाहेब. बाबासाहेबांच्या रथयात्रेत सहभागी झालेले रिपाइंचे कार्यकर्ते. मंडणगड, ता. १४ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीला त्यांच्या मूळगावी आंबडवे येथील स्फूर्तिभूमीत रथातून बाबासाहेब अवतरले. या जिवंत देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे यावर्षीची जयंती सर्वार्थाने वेगळ...
दिल्ली - लॉकडाऊन, करोनामुळे आधीच जगासह देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे यात भर पडली असून महागाईने सर्वच देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस इंधन दरवाढही सुरूच आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होतो. महागाईचा थेट परिणाम सर्वसामान्या...
नागपूर : शहर व ग्रामीण भागातील ३,७५७ स्कूल बस व व्हॅनमधील २,९९५ वाहनांनी फिटनेस सर्टीफिकेट म्हणजे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण के ले आहे. उर्वरीत ७६२ वाहने अद्यापही विना 'फिटनेस' रस्त्यावर धावत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. अशा वाहनावर कारवाई करण्यासाठी सोमवारपासून आरटीओ व पोलीस विभागाची संयुक्त...
दारू तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ पोलिसांवर गाडी चढवित हल्ला करण्यात आला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना देसाईगंज परिसरात घडली. या घटनेनंतर वाहन उलटल्याने सुमारे १५ लाखांच्या ऐवजासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारू तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ पोलिसांवर गाडी चढवित हल्ला करण्यात आला. शनिवारी रात...
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या मागच्या दौऱ्यातलं अपयश यंदा धुवून काढण्याचा चंग बांधला आहे. टीम इंडिया ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी विराट कोहलीने इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या कौंटी...
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल US ओपनचा चॅम्पियन । स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल US ओपनचा चॅम्पियन । महाराष्ट्रनामा\n13 May 2021 1:30 AM\nMarathi News » Sports (Page 5)\nस्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल (Rafael Nadal)याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत 'अमेरिकन ओपन' (US Open २०१९) स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम ...
मागील ४ दिवसापासून शेतकरी संघटना तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद करावी यासाठी आंदोलन करत होते. आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी वीज पुरवठा खंडित करण्यास आमचा विरोध कायम राहील असे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले आहे. वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद कर...
अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- विदेशातील आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे नव्हे, तर नागरिक मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग न पाळत नाहीत,नागरिकांचा हा हलगर्जीपणाच देशातील कोरोनाची रूग्णसंख्या वाढवत आहे,असे मत सीएसआइआर-सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक राकेश मिश्र यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय आरोग्...
Viral Video: उत्तर प्रदेश येथील 26 वर्षीय अजीम मंसूरी (Azim Mansoori) यांनी नुकतीच एक विनंती घेऊन शामली पोलिसांकडे संपर्क साधला. अजीम यांनी पोलिसांना आपल्यासाठी नवरी शोधण्याचं आवाहन केलं. कारणं, त्यांचे कुटुंब आपल्या लग्नासाठी योग्य सहकार्य करत नसल्याचं अजीम यांनी म्हटलं आहे. अजीम यांनी पोलिसांना आपल्यासाठी नवरी शोधण्य...
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात अजूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आता सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांवर नेमलेल्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांना पत्र लिहिलं आहे. समितीचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दहीहंडीवरील उंचीची मर्यादा उठवून मुंबई उच्च न्यायालयाने गोविंदा मंडळांना दिलासा दिला आहे. परंतु विविध निर्बंधांमुळे यंदा दहीहंडीचे आयोजन करावे का, याबाबत राजकीय मंडळींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे गोविंदा मंडळांमध्येही अजूनही दरवर्षीचा उत्साह दिसत नाही. एकूणच दहीहंडी उत्सवासाठी हे वर्ष कसोटीचे ठरणार आहे यात शंक...
नगर (प्रतिनिधी) -विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दृष्टीने अस्तित्वाची तर भाजप व शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असताना जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मात्र "काटेकी टक्कर' झाल्याने विद्यमान आमदारांसाठी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात अस्तित्वासाठी संघर्षाची झाली आह...
मुंबई : "जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूद असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करु नये. " अशी प...
उमेने शंकराचे महत्त्व जाणले होते त्याच्या विरक्त वृत्तीवरच ती भाळली अन शेवटपर्यंत त्याच्या बरोबर कैलासावरच राहिली. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठात रुसवे फुगवे केले नाहीत की आपल्या श्रीमंत माहेराचे गोडवे गायले नाहीत, बापाच्या घरून संपत्ती आणली नाही. वास्तविक विष्णू त्यांच्या जातीचा (जात म्हणजे तरी काय एकाचप्रकारचे संस्कार, सां...
नाशिकः महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या भारतातील प्रीमिअम एसयूव्ही उत्पादकाने आज मराझ्झो दाखल केली. मराझ्झोमध्ये सर्वोकृष्ट अभियांत्रिकीचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आरामदायी व तत्पर नियंत्रण, शांत केबिन, शीघ्र कूलिंग व आतमध्ये ऐसपैस जागा अशा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. आजपासून, भारतभरातील महिंद्रा डील...
जबलपूर : मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये एक अशी घटना घडली आहे की जिची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. येथे १०वी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने फ्रेंडशिप डे निमित्त आपल्या वडिलांचे तब्बल ४६ लाख रुपये चक्क मित्रांना वाटले. ज्या मुलाने हे पैसे वाटले आहेत त्याचे वडील हे एक बिल्डर आहेत. १० शिकणाऱ्या या मुलाचा एक मित्र हा रोजंदारी...
ओडिशा, 03 मे : गेल्या 20 वर्षांतलं सर्वात भीषण वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. त्याचं नाव आहे फानी. . ताशी तब्बल 175 किलो मीटर इतक्या वेगानं घोंघावणाऱ्या या वादळानं आपलं रौद्र रूप दाखवायला सुरूवात केली आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरसह कटक, भद्रक या शहरांमध्ये फनीचा हाहाकार सुरू आहे. सोसाट्याचा वारा आणि धो धो को...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने ७५ टक्के व वखार महामंडळाने २५ टक्के असे सांगोला शीतगृहासाठी सुमारे २ कोटी रुपये मंजूर केले होते. दरम्यान, ऑगस्ट २०१०मध्ये वखार महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एम. एम. आरतानी सांगोल्यात आले होते. त्यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठ...
नवी दिल्लीः कोळसा घोटाळ्यातील सीबीआयचे मुख्य तपास अधिकारी विवेक दत्त यांना १५ लाखांची लाच घेतांना अटक करण्यात आली. दिल्लीतील सीबीआयच्या दक्षता पथकाने दत्त यांना लाच घेत असताना शनिवारी अटक केली. दत्त हे सीबीआयमधील अधीक्षक स्तराचे अधिकारी आहेत. जमीनीचा वाद मिटवण्यासाठी दत्त ही लाच घेत होते. त्याचबरोबर दत्त यांच्यासह एका...
मुंबई : राज्य सरकारने घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या मुद्रांक शुक्ल वसुलीत दोन ते तीन टक्क्यांची सवलत दिल्यानंतर आता रेडी रेकनरच्या दरांमध्ये आणि अतिरिक्त एफएसआयसाठी आकारल्या जाणाºया प्रिमियमच्या शुल्कात कपात करण्यासाठी विकासकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सरकार या दोन्ही प्रस्तावांसाठी अनुकूल अ...
मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं ते २०१९ साली. बकिंगहम कॅनॉलमधून मी चाललो होतो. तिथल्या पाण्यात एखाद्या बदकाच्या चपळाईने त्या पाण्यात डुबकी मारत होत्या, पाण्याखाली पोहत होत्या. माझं लक्ष त्यांच्या हालचालींनीच वेधून घेतलं होतं. नदीच्या तळाशी असलेल्या रेतीतून त्या फटक्यात कोळंबी पकडतात. सगळ्यांपेक्षा वेगात. गोविंदम्मा वेलु इ...
हायलाइट्सः लखनऊ, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये एकूण ४०३ जागांपैंकी कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २०२ जागा मिळवणं गरजेचं होतं. सध्याच्या घडीला जवळपास २५० जागांसहीत भाजपनं राज्यात स्पष्ट आघाडी घेतल्याचं हाती आलेले कल सांगत आहेत. तर समाजवादी पक्ष १२४ तर बहुजन समाज पक्ष २ तर काँग्रेस...
Goa: वास्को मुरगांव (Vasco - Mormugoa) गोवा येथील युवा लेखक व संकल्पित संदेश भानुदास नेरुरकर (Author Sandesh Nerurkar) यांच्या कोंकणी भक्तीगीतांचे विमोचन (Konkani Devotional songs Redemption) आज गोवा राज्याचे आरोग्य मंत्री श्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane) यांच्या शुभहस्ते वाळपई येथे त्यांच्या कार्याल...
भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडचे दुकाने टाकून अतिक्रमण केले असून, त्याकडे देवळाली छावणी परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तकेली आहे. भगूर : भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक ...
पनवेल आणि उरण भागांतून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पनवेल आणि उरण भागांत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पनवेलमधील घटनेत सावत्र बापाने १४ वर्षीय मुलीवर तर, दुसऱ्या घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या पाचव...
दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । मुंबई । 'आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,' अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी म...
उत्तर प्रदेशात अयोध्येमध्ये एक महिला आपल्या आई आणि बहिणीच्या मृतदेहांसोबत दोन महिने घरात राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अयोध्येतील देवकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श नगर कॉलनीमध्ये असलेल्या एका घरातून अत्यंत उग्र वास येत असल्याची तक्रार आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी ध...
मुंबईत ईडीकडून (ED Raids in Mumbai) विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (gangster Dawood Ibrahim) याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील एक ...
Kolhapur News : विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) काेल्हापूरात शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्याचे आर्थिक शिस्त बिघडली असून त्याला जबाबदार कोण असा सवाल पवार यांनी केला आहे. महाविकास काळातील विकास कामांवरची बंदी हायकोर्टाने उठवली तरी हे सुप्रीम कोर्टात गेले अरं काय कारण आहे. आम्ह...
हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड ! प्रत्येक वेळेला या मशिदींवरील भोंग्यांवर लक्ष ठेवत रहाण्यापेक्षा मशिदींवर भोंगे लावण्याचीच अनुमती रहित करण्याची आवश्यकता आहे ! प्रत्येक वेळेला या मशिदींवरील भोंग्यांवर लक्ष ठेवत रहाण्यापेक्षा मशिदींवर भोंगे लावण्याचीच अनुमती रहित करण्याची आवश्यकता आहे ! प...
ओटीटीवर चित्रपट पाहण्यासाठी तुमच्या खिशाला आता आणखी फोडणी बसण्याची शक्यता आहे. थिएटरप्रमाणेच ओटीटीवरही आता तिकीटबारी सुरू होण्याची शक्यता असून, काही बड्या चित्रपटांसाठी 'पे पर व्ह्यू' लागू करण्यावर गांभीर्यानं विचार सुरू आहे. येत्या काळात चित्रपटगृहं आणि मल्टिप्लेक्स सुरू झाली तर त्यांची संपूर्ण भिस्त 'सूर्यवंशी' आणि ...
मुंबई, 22 डिसेंबर । आज म्हणजे बुधवारीही क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बिटकॉइनसह अनेक मोठ्या क्रिप्टोकरन्सी ग्रीन चिन्हात ट्रेड करत आहेत. आज सकाळी 10 पैकी 9 डिजिटल चलन तेजीत दिसले. बिटकॉइन पुन्हा एकदा 50 हजार डॉलर्सच्या जवळ पोहोचला आहे. Cryptocurrency Prices Today This morning 9 out of the top 10 d...
कामशेत - "ओला-उबेर'कडून मिळालेल्या प्रवाशांनी चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मोटार पळविली. बऊरगावच्या (ता. मावळ) हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगतीवर पंधरा दिवसांपूर्वी वाहनचालकांना धमकावून लुटमार करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा छडा लावण्यात कामशेत पोलिसांना यश आले. द्रुतगतीवर रात्रीचा प्रवास असुरक्षित होत असताना लुटमारीला परप्रांत...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक बँकेच्या इज ऑफ डुइंग बिझनेस इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी सुधारण्याच्या दिशेने पाऊल टाकत सरकारने मालमत्ता नोंदणीला राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड (NJDG) शी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केवळ जमीन विवादांमध्ये अधिक पारदर्शकता येणार नाही, तर जलदगती व्यावसायिक बाबींमध...
या नोंदणीला २२ ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दिंडोरी परिसरात राज्य व केंद्र शासनाच्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कृषी अधिकारी पाटील व तलाठी चौरे यांनी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. काही तांत्रिक मदत लाग...
मुंबई - जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ज्या प्रमाणात वाढत आहे ते प्रमाण लक्षात घेतले तर सन 2050 पर्यंत मुंबईतल्या नरिमन पॉईन्ट परिसरातील बराचसा भाग समुद्राच्या पाण्याखाली जाणार आहे. त्यात मंत्रालयाच्या परिसराचाही समावेश असणार आहे, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे, अशी माहिती मुंबईचे महापालिका आ...
एमपीसी न्यूजः घरामध्ये पाळण्यात येणाऱ्या पाळीव प्राण्यांसाठी घ्यावा लागणारा परवाना आता ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होणार आहे या संदर्भातील काम पुणे महापालिकेकडून करण्यात येत असून पुढील एक महिन्यात ही प्रणाली सुरू होणार आहे. महापालिका हद्दीत अंदाजे साडेतीन लाख भटकी आणि 80 ते एक लाखापर्यंत घरगुती पाळीव श्वान आहेत. यामध्ये स...
प्रसिद्ध आणि नामंकित व्यक्तींच्या नावाने फेक अकाउंट बनवून त्या द्वारे पैशाची मागणी करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून आले आहेत. त्यातच आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत हाच प्रकार घडला आहे. जयश्री थोरातचं फेसबुकचं बनावट अकाऊंट बनवण्यात आल...
तालुक्याची आरोग्यसेवा कमालीची कोलमडली आहे. नागरिकांना उपचारासाठी तालुका किंवा शहर गाठावे लागते. घाटंजी : तालुक्याची आरोग्यसेवा कमालीची कोलमडली आहे. नागरिकांना उपचारासाठी तालुका किंवा शहर गाठावे लागते. गंभीर रुग्णांना तर थेट रेफर केले जाते. या बाबीकडे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी गरी...
Horoscope Weekly (12 December to 18 December 2022), Saptahik Rashi Bhavishya, Weekly Horoscope : मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्याच्या मध्यापर्यंत प्रवासासाठी तयार राहावे लागेल, केव्हाही जावे लागेल, तर धनु राशीच्या तरुणांना प्रेमसंबंधात तुम्ही या दिशेने चालत असाल, तर प्रत्येक पाऊल जपून ठेवा, तरच तुम्हाला यश मिळेल, घाईन...
जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज्-Jijau The Mothers Off All Guru's (Marathi) by Pra Namdevrav Jadhav - Rajmata Prakashan - BookGanga.com\nHome > Books > ऐतिहासिक > जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज्\nAuthors: प्रा नामदेवराव जाधव\nमुलांचे संगोपन हि एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. मात्र, आदर्श माता बनायचे असेल, तर जिजाऊ आईसाहेबांना आदर्श ठेवायला...
मुंबई, 14 जुलै : एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह (Planet) राश्यांतर (Transit) करतो. ग्रहांच्या राशिपरिवर्तनाचा, ग्रहयोगांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे ग्रहांचं राशिपरिवर्तन कोणत्या राशीला कसं फलदायी ठरू शकतं, याचा अंदाज घेणं महत्त्वाचं ...
Coronavirus : 'कोरोना' चा प्रसार वाढत असताना गोव्यात डान्स करताना दिसली अभिनेत्री रश्मी देसाई (व्हिडीओ) मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे कोरोना व्हायरसची दहशत वाढत आहे अशात बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि नागिन 4 या मालिकेची अभिनेत्री रश्मी देसाई हिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. असा दावा केला जात...
Talpona River: तळपण नदीच्या मुखाशी पोर्तुगीज राजवटीपासून कार्यरत असलेली जेटी आहे. त्याचप्रमाणे लहान होड्या नांगरून ठेवण्यासाठी तळपण येथे रॅम्प आहे. जेटी व रॅम्पची दुरुस्ती करण्याची मागणी, गेली वीस वर्षे येथील मच्छीमार करीत आहेत. मनोहर पर्रीकरांपासून अनेकांनी आश्वासन दिले, पण अद्याप नदीचे पात्र गाळमुक्त करण्याबरोबरच जेट...
हिंदूंच्या विरोधानंतर आस्थापनाने मागितली क्षमा ! विदेशात हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयी जागृत असलेल्या हिंदूंचे अभिनंदन ! भारतातील हिंदूंनी यातून बोध घेऊन देशात होत असलेल्या विडंबनाच्या घटना वैध मार्गाने रोखण्यास कृतीशील झाले पाहिजे ! लंडन : इंग्लंडमधील 'विशबोन ब्रूअरी लिमिटेड' या मद्यनिर्मिती करणार्या आस्थापनाने ...
नवी दिल्ली :- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडी येथे धोनीच्या चाहत्यांनी त्याच्या निरोपाचे फलक लावले. त्यानंतर लगेच रोहित शर्माला (Rohit Sharma) 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' (Rajiv Gand...
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मराठी इंडस्ट्रीत स्पृहा जोशीच्या खास चाहतावर्ग आहे. स्पृहा सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच स्पृहाने पारंपारिक वेशातले फोटो पोस्ट केले आहे. जांभळ्या रंगाच्या साडीत स्पृहानं तिचं सौंदर्य खुलवलं आहे. स्पृहाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेम...
सकाळी थोड्या रागातच मीना शाळेत गेली. कारण आज शाळेत निघताना मीनाचे आईशी कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाचे कारण होते वही! मीनाला नवी वही हवी होती. पण आईने जुन्या वह्यांचे कोरे कागद फाडून तिला एक वही बनवून दिली होती. जुनीपुराणी पानं, ओबडधोबड शिवलेली, पानांचा रंगदेखील एक सारखा नव्हता. आईने दिलेली वही मीनाने कोपऱ्यात भिर...
सत्तांतरोत्तर पदपुरस्कार पद्धती : (स्पॉइल्स सिस्टिम). अधिकारारूढ पक्षाने आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची - अनुयायांची उच्च शासकीय पदांवर नियुक्ती करण्यासाठी उपयोजलेली एक पद्धती. या पद्धतीला संरक्षक व्यवस्था असे देखील म्हटले जाते. या पद्धतीत निवडणूक जिंकणारा राजकीय पक्ष आपल्या मोहिमेतील कार्यकर्ते आणि इतर सक्रिय समर्थक...
'पारी'च्या 'जात्यावरील ओव्या' या प्रकल्पातील पुढच्या २३ ओव्या पुणे जिल्ह्यातील राजमाची गावातल्या रेणुका उंबरेने गायल्या आहेत. एका स्त्रीचं वाढत चाललेलं दुखणं आणि त्यात तिचा अंत आणि या सगळ्या काळात तिची भावंडं आणि आईवडील यांच्या शोकाने तिच्या हळव्या मनाला मिळणारे समाधान याबद्दलच्या या ओव्या आहेत. वीस वर्षांपूर्वी जेव्हा...
विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा सरकारने काढलेला आदेश हा प्रयोग असला, तरी त्यातून संस्थाचालक-क्लासेसच्या युतीला कितपत धक्का बसेल, हा प्रयोग पुढे किती काळ यश मिळवेल, त्यातून काय साधले जाईल हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक ह...
Ramesh Tawadkar : काणकोणातील वृक्षतोड प्रकरणी सभापती रमेश तवडकर यांच्या विरोधात दक्षिण गोवा वनपालाकडे तक्रार केलेल्या कॉंग्रेसचे नेते जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्डचे नेते विकास भगत यांच्यावर अब्रुनुकसनाची खटला दाखल करणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. "काणकोणमध्ये व...
अश्विन अमावस्येच्या किर्द काळोखाला लक्ष लक्ष दिपांच्या प्रकाशाने दूर सारत सुरू झालेल्या प्रकाश पर्वात सोन पावलांनी आलेल्या लक्ष्मीचे मनोभावे पुजन झाले. यानंतरच्या यंदा दिवाळीत उद्या (दि. 16) बलीप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, गोवर्धन पुजा व भाऊबीज असे सण एकत्रीत आल्याचा दुर्मिळ योग येत आहे. या सणानिमित्त विशेतषः बळीराज...
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी व सर्व शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जवळीकता साधता येण्यासाठी राज्य सरकारने आता 'जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' कार्यक्रमाची आखणी केली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी व सर्व शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जवळीकता साधता येण्...
'देऊळ' आणि मायबोली' नविन लेखनात दिसले आणि मायबोलीने एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजकत्व स्विकारल्याचे वाचुन खरंच खूप अभिमान वाटला. या उपक्रमाचा एक भाग म्हणुन मायबोलीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे त्याला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातच प्रकाशचित्र स्पर्धेची घोषणा झाली. यातील दुस...
औषधे मध्ये एक तुलनेने दुर्मिळ स्पेशलायझेशन हीमॅटॉलॉजी आहे, त्यामुळे बर्याच लोकांना याची जाणीव नसते, हिमॅटोलॉजिस्ट म्हणजे तो कोण आहे, कोणत्या प्रकारचा उपचार करतो आणि कोणत्या परिस्थितीत या डॉक्टरची सल्ला घ्यावी लागते. या सर्व गोष्टींबद्दल आणखी चर्चा करूया. हेमॅटोलॉजिस्ट - हे कोण आणि काय बरे आहे? हेमॅटॉलॉजी - औषधांचा एक...
"समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला"\nBy Bhagyashri Konarde On June 22, 2022 6:45 pm\nमुंबई । एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच समोर येत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांन...
नागपूर : महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमाेल चाैरपगार यांच्याविरुद्ध पर्यावरण कार्यकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)कडे तक्रार केली आहे. अजनीवन, अंबाझरी उद्यान आणि निर्मलनगरी परिसरात झालेल्या अवैध वृक्षताेड प्रकरणात चाैरपगार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आराेप तक्रारकर्त्यांनी केला आहे. पर्यावरण कार्यकर...
नाशकात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पाथर्डी फाटा परिसरातील माऊलीनगर रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली आहे. नाशिक : परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पाथर्डी फा...
खेड (प्रतिनिधी) : ख्रिसमससह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरेल्वेच्या चार स्पेशल रेल्वेगाड्या शनिवारपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागल्या आहेत. या पाठोपाठ पश्चिम रेल्वे प्रशासनाने आणखी ३ साप्ताहिक गाड्या जाहीर केल्या आहेत. सुरत-मडगावच्या दोन फेऱ्यांसह बांद्रा-करमळी स्पेशल गाडीचा समावेश आहे. २१ डिसेंबरपासून वसईमार्गे धा...
शेख जावेद शेख रहीम असे संशयित आरोपीचे नाव आहे. जालना शहरातील मिलन चौक येथील अजंठा पान सेंटरवर राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. नागवे यांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून पानटपरीची झाडाझडती घेतली असता, राज्यात बंदी असलेला गोवा, रजनीगंधा ...
या समस्येवर थेरपिस्ट आणि अनादर लाइट काउंसिलिंगच्या संस्थापक आंचल नारंग सांगतात की माणूस म्हणून सर्वांना प्रेम, काळजी, आपुलकी आणि आपुलकीची भावना हवी असते. दुर्दैवाने, एकाकीपणा हा एक आजार आहे. जर तुम्हाला याआधी कधीच लग्न करण्याची गरज भासली नसेल, तर आधी विचार करा की आता तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवत आहेत. लग्न हा एकटेपणा...
Business Idea : आजकाल तरुणवर्ग खूप कमी पगारांवर नोकरी करत आहेत. अशा वेळी नोकरीतून त्यांना हवे तेवढे पैसे मिळत नसल्याने त्यांचे आथिर्क बजेट कोलमडून जाते. अशा वेळी तुम्ही आता नोकरी न करता 10,000 रुपयांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला 50हजार रुपये सहज कमवू शकता. हा व्यवसाय करून तुम्...
व्हॉट्सअॅपवर पोर्नोग्राफी व हिंसेला उत्तेजन देणारे संदेश पाठविणा-या मूळ व्यक्तींची माहिती मिळावी यासाठी मोदी सरकार या समाजमाध्यमावर सातत्याने दबाव आणत आहे. नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर पोर्नोग्राफी व हिंसेला उत्तेजन देणारे संदेश पाठविणा-या मूळ व्यक्तींची माहिती मिळावी यासाठी मोदी सरकार या समाजमाध्यमावर सातत्याने दबाव आणत...
दिवाळी आली की चाकरमान्यांना, कर्मचाऱ्यांना वेध लागतात ते दिवाळी सुट्ट्या आणि कंपनीकडून मिळणाऱ्या दिवाळी बोनसचे. आजकाल दिवाळीचा बोनस हा दिवाळीचा एक अविभाज्य घटक बनला आहे. घरात काम करण्याऱ्या कामगारांनाही दिवाळीचा बोनस द्यावा लागतो. साधारण कंपन्याकडून कामगारांना त्यांचा पूर्ण अथवा अर्धा पगार अथवा काही भेटवस्तू दिवाळी ...
योग करत असताना थंडगार पाणी पिणं टाळावं. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण योग करताना शरीरात उष्णता निर्माण होते आणि असं असताना थंडगार पाणी प्यायल्यास, तुम्हाला सर्दी, खोकला आणि अलर्जीसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला तहान लागल्यास, तुम्ही गरम अथवा साधं पाणी प्या. जेव्हा तुमचं पोट भरलेलं अस...
fire at lalbuag building in mumbai One Avighna Apartment - vsk 98 । लालबागमध्ये इमारतीला भीषण आग, महापौर किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, "समयसूचकता दाखवली असती तर..." लालबागमध्ये इमारतीला भीषण आग, महापौर किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, "समयसूचकता दाखवली असती तर..." लालबागमधील सर्वात उं...
पोलिसांनी जेलमध्ये उदयपूर हत्याकांडातील (Udaipur Murder Case) दोन्ही आरोपींना खाण्यासाठी बिर्याणी दिल्याचा दावा करण्यात आला होता. राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) ट्विटरच्या माध्यमातून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. उदयपूरमध्ये (Udaipur Horror) शिवणकाम करणाऱ्या व्यावसायकाची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे (Udaipur ...
ओबीसींचा मुख्य प्रश्न आहे तो सामाजिक व आर्थिक स्थान मिळवत राजकीय प्रतिनिधित्वात योग्य वाटा मिळण्याचा. त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्वतंत्र बजेट असण्याचा. अनुसूचित जाती-जमातींप्रमाणेच योग्य ते राजकीय आरक्षण असण्याचा. ओबीसींची बोगस प्रमाणपत्रे प्राप्त करून ओबीसींच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांवर चाप बसवण्याचा. पण याबाब...
चौकटीपल्याडचे मेनन.. इतिहासातील कर्तृत्ववानांचे मूल्यमापन यश-अपयशाच्या चौकटीतच केले जाते. पण ती चौकट टाळून शोध घेतल्यास अनेक गाळलेल्या जागा भरून निघतात, हेच व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यावरील या चरित्रपर पुस्तकाचे सांगणे.. १९३४ ते १९६४ या कालखंडाचा भारताचा इतिहास लिहायचा झाला, तर व्ही. के. कृष्ण मेनन यांचे नाव सुवर्णाक्ष...
आंतरजातीय, आंतरधर्मीय किंवा आंतरभाषीय विवाह झाला असेल, तर घरात कुठली संस्कृती स्वीकारायची, असा प्रश्न नवरा-बायकोला पडतो. पण या प्रश्नात गुरफटण्याऐवजी दोन्ही संस्कृतींचा आदर केला, तर घरातलं वातावरण अधिक संपन्न होईल. . . अजितकुमार बिडवे, समुपदेशक(सहजीवन) प्रश्न - घरच्यांचा विरोध असूनही आम्ही दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह क...
। गोवे-कोलाड । वार्ताहर । रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा नामदेव लोखंडे यांचे 15 ऑगस्ट रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षाचे होते. ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते. ते आपला वीटभट्टी व्यवसाय सांभाळून सामाजिक कामात सक्रिय होते...
कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते. भाऊबीजेच्या दिवशी काय करावे? सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे. बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी...
लंडन, 3 जुलै : क्रिकेटला जुलै महिन्यात एक नवा फॉरमॅट मिळणार आहे. इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) 21 जुलैपासून द हंड्रेड (The Hundred) या स्पर्धेचं आयोजन करणार आहे, पण ही स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच आयोजकांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कमीत कमी 10 महिला क्रिकेटपटूंनी कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा खेळायला नका...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत खुद्द त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धनंजंय मुंडे यांनी या प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. याबाबत माझ्य...
शांती, समृद्धीच्या शोधात आहात; मग कोणताही विचार न करता या4ठिकाणी खर्च करा. मानसिक समाधान नक्की ... - Focused Marathi\nशांती, समृद्धीच्या शोधात आहात; मग कोणताही विचार न करता या4ठिकाणी खर्च करा. मानसिक समाधान नक्की ...\nआजारी लोकांना मदत करा -: चाणक्य नीतीनुसार आजारी लोकांना पैशाच्या बाबतीत शक्य तितकी मदत केली पाहिजे. या...
माझे नाव करीन अवाकोवा आहे आणि मी या कोर्समध्ये तुमचा प्रशिक्षक होईल जो तुम्हाला एका तासापेक्षा कमी वेळात रशियन भाषेत शिकण्यास अनुमती देईल. रशियन भाषा माझी मातृभाषा आहे, मी रशियामध्ये 16 वर्षे राहिलो. मी हा कोर्स करत आहे कारण मला परदेशी भाषा आणि शिकवण्याची आवड आहे. मी रशियन, इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश बोलतो. मी आधीच खा...
केंद्र सरकारला संकटात टाकणाऱ्या आलोक वर्मां यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाळत ठेवून हेरगिरी करण्याचा प्रयत्नच झाला. नवी दिल्ली : सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांना सक्तीने घरी बसवल्यानंतर आणि त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, केंद्र सरकारला संकटात टाकणाऱ्या आलोक वर्म...
बॅटकेन्ट-कॅझाले मेट्रो मधील सोमवार सिंड्रोमः केश्रेन मेट्रोच्या कनेक्शनसाठी बॅटेकेंट-कझाले दरम्यान एक्सएनयूएमएक्स महिन्याभराच्या अभ्यासाने भांडवलदारांना 'सोमवारी सिंड्रोम' दिले आहे आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी. जाणारे आणि येणाoming्या नागरिकांच्या सामान्य व्याख्येच्या हस्तांतरणासाठी अक्क्रीपी आणि एकेएम स्टेशन,...
नवी दिल्ली । 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप' कायदा दुरूस्ती विधेयकाला लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर आता फक्त पंतप्रधान आणि त्यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकांनाच 'एसपीजी' सुरक्षा मिळेल, असं केंद्रीय मंत्री अमित शहांनी स्पष्ट केलं आहे. 'एसपीजी' कायदा दुरुस्तीनंतर माजी पंतप्रधानांना ही सुरक्षा पदावरून...
बॉलिवूड, मराठी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज दुःखद निधन झाले आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. आज सकाळीच ८ . ४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपार ३ च्या सुमारास त्यांच्यावर वरळी येथ वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्नेहलता दीक्षित यांना चार अपत्ये आह...
दिल्ली, 5 डिसेंबरः वैद्यकशास्त्र (Medical Science) प्रगत झालं असल्यानं तुटलेला अवयव जोडणंही शक्य आहे. तसंच, अन्य देशांच्या तुलनेत भारतात अशा शस्त्रक्रिया कमी खर्चात होणंही शक्य आहे. दिल्लीतल्या आकाश हॉस्पिटलमध्ये नुकत्याच झालेल्या एका शस्त्रक्रियेवरून हे सिद्ध झालं आहे. तिथल्या डॉक्टर्सनी एका व्यक्तीचा तुटलेला अंगठा प्...
शेषनाग बेस कँपला लवकरात लवकर पोहोचणं हा माझा प्रयत्न होता. त्यासाठी मी शॉर्टकटचा पर्याय निवडला होता; पण आता त्याची किंमत मला चुकवायची होती. माझे पाय, कंबर दुखत होती. शक्तिपातच जणू शरीराचा! पण चालणं निकडीचं होतं. पुन्हा सखी काठीच्या साहाय्याने मी पाऊल टाकू लागलो... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटक...
Obama Praises Hilary Clinton । 'हिलरी क्लिंटनच्या रूपाने चांगला पर्याय', ओबामांनी केले कौतुक - Divya Marathi\nObama Praises Hilary Clinton\n'हिलरी क्लिंटनच्या रूपाने चांगला पर्याय', ओबामांनी केले कौतुक\nवॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन यांच्यातील लढाई काल्पनिक भूतकाळ विरुद्ध भ...
शहाणा, धार्तराष्ट्राच्याकाळहोयप्राणा; तोचरामाचा मुख्य शिष्यराणा, रामें कैसाफोडिलावीरदाणा. ७ उभयतांचेवारणकरायाला, कायशक्ती नव्हतीच त्याहरीला; राज्यसारें देऊ निकौरवांला, बरे होतेघडितावनाह्यांला. ८ बाइकुंती दैवचीतुझें फुटले, आयुष्याचें सूत्रतेंजय तुटलें; प्रेमराहिलयांचियामनीकुठलें, तुजवारेंवाटेलउभे सुटलें. ९ असाकं चुकिनेफ...
एक कला आणि माध्यम म्हणून सिनेमा भारतात कसा रुजला, हे बघणं गंमतशीर आहे. पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असणार्या श्री. अनिल झणकरांनी काही वर्षांपूर्वी 'सिनेमाची गोष्ट' हे सुरेख पुस्तक लिहिलं होतं. राजहंस प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलं होतं. सिनेमाचा जागतिक इतिहास, या इतिहासाचे मानकरी असलेले लेखक, दिग...