text
large_string
६ तास तावी (Tawy) वडील वाहू (Wahu) यांना पाठीवर घेऊन जंगलात फिरला. आणि हो, लस घेतल्यानंतर त्याने वडिलांना पुन्हा पाठीवर बसवले, आणि पुन्हा ६ तास चालला. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा फोटो, यामागची कहाणी जाणून लोक झाले भावूक! अनेक भारतीय या तरुणाला आधुनिक काळातील 'श्रवणकुमार' म्हणत आहेत. खरे तर हे प्रकरण ब्राझीलमधील ए...
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte) मालिका रोज नवीन वळण घेत आहे. मालिकेत गोंधळ सुरू असला तरी कलाकार ऑफस्क्रीन (offscreen) मात्र धमाल करतात. आई कुठे काय करते सेटवरच्या गमती-जमती सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षकांची लाडकी संजनाने तिच्या इन्स्टाग्राम ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत की मन की बात' अभियानाला सुरुवात केली आहे. नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत की मन की बात' अभ...
मोनोरेलसाठी आवश्यक असणारे सुटे भाग मलेशियावरून मुंबईत दाखल झाले असून येत्या मार्चमध्ये चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यानच्या पूर्ण कॉरिडोरवर मोनोरेलची सेवा सुरू होणार आहे. नवा टप्पा सुरू होताच मोनोरेल तिकिटाचे दरही वाढणार आहेत. या बरोबरच मोनोरेलच्या ताफ्यात आणखी चार ट्रेन दाखल होणार आहेत. त्यामुळेच चेंबूर ते जेकब सर्कलदरम्या...
बारामती, 22 जानेवारी : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केली यापेक्षाही भाजपला उमेदवार मिळाला नाही, यावरून भाजपची ताकद कमी झाली हे स्पष्ट होत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. भाजपने ज्या ज्या ठिकाणी एमएलसीचे उ...
राष्ट्रीय राजधानीत आम आदमी पार्टीचे सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील अधिकारवाद शमण्याची चिन्हे नाहीत. प्रदीप शिंदे- कोल्हापूर प्रवासभाडे सवलतीच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना सामाजिक बांधीलकीच्या नात्याने एस. टी. महामंडळाकडून विविध प्रकारच्या एकूण ३५ सवलती देण्यात येतात. जिल्ह्यात एका वर्षात ए...
'कॉमेडी विथ कपिल' शोमध्ये नवेनवे पाहुणे येतच असतात. एका एपिसोडमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झानं त्याचीच विकेट काढली. 'कॉमेडी विथ कपिल' शोमध्ये नवेनवे पाहुणे येतच असतात. एरव्ही शोमध्ये हा पठ्ठ्या दुसऱ्यांची फिरकी घेत त्यांची विकेट घेत असतो. पण एका एपिसोडमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झानं त्याचीच विकेट काढली. या एपिसोडमध्ये स...
नंदुरबार : तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान नळगव्हाण फाटा ते गुजरात हद्दीतील डोडवापर्यंतचा रस्त्याची चाळण झाली आहे. गुजरात राज्यातून नंदुरबारकडे जाणारे व येणारे प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. गुजरात हद्दीपर्यंत एक किलोमीटर अंतरात मोठमोठे खड्डे असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नंदुरबार ...
संजूबाबा आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणतोय ? मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तन आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिलाय. आदित्य हा माझ्या लहान भावासारखा आहे. देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज असल्याचंही संजूबाबानं म्हंटलंय. संजय दत्तने नुकताच एक व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. यात. संजय दत्त याने आदित्य ठाकरे यांना मतदान करण्याचा आवाहन...
बोआओ फोरम फॉर आशिया 2023 च्या वार्षिक सभेचा भाग म्हणून बेल्ट आणि रोड संयुक्त विकास संधी उप-मंचमध्ये, सहभागींनी 10 वर्षांची उपलब्धी आणि बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्हचा भविष्यातील विकास यासारख्या विषयांवर चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, 2022 च्या अखेरीस, चीनी कंपन्यांनी बेल्ट आणि रोडच्या बाजूच्या देशांत एकूण US $57,13 अब...
सोमवारी विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध एका षटकात सात षटकार ठोकून महाराष्ट्राचा रुतुराज गायकवाड लिस्ट ए क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. शिवा सिंगने टाकलेल्या 49व्या षटकात गायकवाडने हा विक्रम केला. या षटकातील पाचवा चेंडू नो बॉल असल्याने शिवाला एकूण सात चेंडू टाकावे लागले....
। खोपोली । प्रतिनिधी । नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ येथील डी. पी. रोड सेव्हन वेळास या हॉटेलसमोर कचरा संकलन करणार्या खासगी ठेकादाराची आठ ते दहा छोटी-मोठी वाहने या परिसरातील रस्त्यावर उभी करीत असल्याने, या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा संकलन करणारी व...
समतेचा महामंत्र है होय. यास्तव आपल्या देशांत जो जो इंग्रजी विद्येचा प्रसार होत जाईल तो तो सुधारणा, स्वातंत्र्य, सुख, यांचा अवश्य प्रसार होत जाणार ! एक इंग्रजी विद्येचे वज्र आमच्या हाती असले, म्हणजे मग लिटनशाही, टॅपलशाही, चाटफिल्डशाही, मूरशाही वगैरे शंभर शाह्यांनासुद्धां आम्ही दाद देणार नाहीं !' वर तीनचार कार्यकर्त्यांच...
पांढुर्णा परिसरामध्ये सोयाबीन पिके करपली! मागच्या वर्षी पांढुर्णासह परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिके हातातून गेली होती. मात्र यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. यंदा तरी पीकपाणी चांगले राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु पेरणी करून पंधरा दिवस उलटले तरी, पावसाचा पत्ता नाही. त्...
अकोलाः नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी गुलजारपुरा परिसरातील नागरिकांना दिले. मनपाचे गट नेते अजय रामटेके यांच्यावर ११ जुलै रोजी गोळीबार करण्यात आला होता. रविवारी अकोल्यात आलेल्या अनिल दे...
ठाकरे सरकारकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला आता क्लीन चीट देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली असून उपसा वाढला तरी अनेक गावांमध्ये भूजल पातळी स्थिर आहे. तसेच जलयुक्तमुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमान दर्जातही व...
पूर्वी कलिंगड उन्हाळी हंगामातच प्रामुख्याने दिसून यायचे. परंतु, आता अन्य हंगामातही हे फळ बाजारात दिसू लागले आहे. विविध संकरीत वाणांच्या माध्यमातून आज या पिकाचे भरघोस पीक शेतकरी घेत आहेत. कलिंगडाची साधारणपणे जानेवारी महिन्यात लागवड केली जाते. मात्र, रोह्याच्या प्रवीण अनंत मगर यांनी ऑक्टोबरमध्येच गोल्डन जातीच्या कलिंगडाच...
मुंबईः रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro) जो मार्चमध्ये Redmi Note 9 आणि Note 9 Pro Max सोबत लाँच करण्यात आला होता. हे स्मार्टफोन आजपासून (बुधवार) भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. यापूर्वी हा फोन १७ मार्चला विक्रीसाठी होता. आता Mi. com आणि अमेझॉन इंडियाच्या अधिकृत स्टोअरवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक ग्राहक या ड...
कोरोना (कोविड-19) संसर्गजन्य आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून हा दंड आकारावा, असे विभागीय आयुक्त राव यांनी म्हटले आहे. एमपीसी न्यूज - कोरोना या संसर्गजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांना 500, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास 1 हजार रुपये दंड आकारन्याचे आदेश विभागीय आय...
A password will be e-mailed to you. नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेने (Second Wave) थैमान घातले होते. या लाटेने पुरते जनजीवन विस्कळीत केले होते, त्यातून अजून सामान्य सावरला नाही. तोच तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडाल...
साहेब, उपचाराअभावी मालेगावात ६०० मृत्यू झाले आहेत - माजी आमदार शेख यांचा आरोग्य मंत्र्यांना फोन, 600 hundred death without kovid 19 in malegaon breaking news\nWeb Editor April 29, 2020 3:22 pm\nसामान्य रुग्णालयसह शहरातील बहुतांश खाजगी रुग्णालय बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे वेळेवर उपचार मिळू न शकल्याने मधुमेह दमा उच्च रक...
अमरावतीः देवरणनगर येथील युनिव्हर्सल अलायमेंट गॅरेजजवळ एका ३७ वषीय बांधकाम कंत्राटदाराला लुटणार्या तीन आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. अमर आनंद बावरी, )पटेल कमल बावरी व रा. अर्जुन खीछी (सर्व रा. दसरा मैदान, अमरावती) असे अटक आरोपींची नावे आहेत. राजापेठ पोलिसांनी ही दमदार कारवाई केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असू...
नुकसानीचा महसूल विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. शिरोळ/ कुरुंदवाड : शिरोळ तालुक्याला बुधवारी मध्यरात्री वादळी वारा व पावसाने झोडपून काढले. त्यामुळे काढणीला आलेली गहू, हरभरा, शाळू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे तेरवाड (ता. शिरोळ) येथील बसथांब्याजवळ असलेली...
एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील गोदामात छापा टाकून पोलिसांनी ९ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहर हद्दीतील भेरा रोडवरील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील गोदामात छापा टाकून पोलिसांनी ९ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबा...
Shishir Shinde Resigns : रविवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच आपल्या पक्षात मनासारखं काम करायला मिळत नसल्याची तक्रार याव...
एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शुक्रवारी (दि. २३ ) १९ गावे आणि ३ पालिकांमध्ये ३३ रुग्ण मिळून आले आहेत. तर २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजगुरुनगर पालिका हद्दीतील ५६ वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटल येथे मृत्यू झाला असून, बहुळ येथील ५६ वर्षीय पुरुषाचा औंध हॉस्पिटल येथे मृत्यू झाल्याचे दैनंदिन अहवालात नमूद कर...
पालकमंत्री देशमुख म्हणाले, लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. लवकरच शासकीय यंत्रणा तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्राची मदत घेऊन व्यापक मोहीम हाती घेण्यात येईल. जोपर्यंत शंभर टक्के जनतेचे लसीकरण होणार नाही, तोपर्यंत सर्वांनी काळजी घेणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे यासारख्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. महामारीच्या उ...
SRH VS RCB IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज आणखी एक निर्णायक सामना रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर...
१७. ३. २०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात मेधा-दक्षिणामूर्ति याग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. याग होण्याआधी एक आठवड्यापासून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील परिसरात स्वच्छता चालू झाली होती, उदा. नदीच्या कडेने असलेल्या झाडांभोवती वीटा लावून सुशोभीकरण कर...
भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रामटेक - नगरधन मार्गावरील शनिमंदिर परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. नागपूर (रामटेक) : भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघा...
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात तीनवेळा विजेतेपदक पटकावणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. याच चेन्नई संघाची गाडी यावर्षी मात्र इतर संघांच्या तुलनेत पिछाडीवर राहिली. त्यामुळे लवकरच हंगामातून त्यांचा पत्ता कटला. मात्र जाता जाता चेन्नई संघाला ऋतुराज गायकवाडच्या रुपात उभरता सितारा मिळाला. आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापूर...
'जब तुम कहो' या आगामी हिंदी सिनेमात एक नवी बंगाली मॉडेल झळकणार आहे. पश्चिम बंगालमधली ही आघाडीची मॉडेल आहे. तिचा हा पहिलाच हिंदी सिनेमा. तिचं नाव अंबालिका सरकार. खरंतर बॉलिवूडमध्ये आल्यानंतर सोपी सुटसुटीत नावं घेण्याचा ट्रेंड असतो.
संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलं आणि वेगळ्या वाटेनं जाणार्या आयएएस अधिकार्यांबद्दल विषय निघाला की त्यात लक्ष्मीकांत देशमुख यांचं नाव अग्रक्रमानं समोर येतं. अधिकारी म्हणून काम करतानाही त्यांचं संवेदनशील मन सतत जागं असल्यानं त्यांच्या कामाकडे बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी असल्याचं जाणवतं. म्हणूनच दुष्काळी भागातला पाणी प्...
सातारा - करोनाच्या भीतीमुळे राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्ट्या दिल्या असून सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर यात्रा, जत्रा, उत्सव, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रम व राजकीय सभांवर बंदी घातली आहे. करोनाच्या धसक्यामुळे आणि प्रशासनाच्या आदेशाने चित्रपटगृह...
औरंगाबादः हैदराबाद संस्थानात असलेल्या कर्नाटक, आंध्रप्रदेशात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला. मात्र मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिला आहे. महाराष्ट्रात सामील होताना मराठा ओबीसीत होता. कालांतराने तो काढून टाकण्यात आला. यामुळे आता मराठवाड्यातील मराठ्यांचे ओबीसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. सहा...
नवी दिल्ली : मागील बऱ्याच महिन्यापासून पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी होऊनही सरकारने जनतेला पेट्रोल डिझेलचे दर कमी करून दिलासा देण्याचा प्रयन्त केला नाही. मात्र अशातच आता जागतिक बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. देशातील अन...
लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. बीड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेबाबत सरपंच, ग्रामसेवकांना त्यांचे कर्तव्य चोख बजावण्याचे पुन्हा एकदा आदेश देण्यात आले असून, हलगर्जी करणाऱ्यांना कारवाईची...
रायगड : नववर्ष साजरं करायला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 29 ते 31 डिसेंबरदरम्यान बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तसे आदेशही जारी केले आहेत. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी अनेक जण मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करतात. अशावेळी जड वाहनांमुळे प्रचंड ...
Nagpur News संस्कृतमध्ये देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा उपयोग करून विविध प्रकारचे स्टार्ट अप उद्योग संस्कृतच्या माध्यमातून नव्या पिढीने सुरू करण्याचे आवाहन राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले. नागपूरः संस्कृतमध्ये देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा उपयोग करून विविध प्रकारच...
पुणे - महापालिकेच्या गेल्या म्हणजे, 2012 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर शहरात सर्वाधिक कामे माझ्या प्रभागात केली आहेत. त्यात, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयसमोरील उड्डाण पूल, क्रीडांगणे, महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि आरोग्य योजना राबविल्या आहेत. आता नव्या प्रभागातील महिलांच्या सुरक्षितता, त्यांच्या आरोग्या...
प्रियजन गमावण्याचे दुःख काय असते ते शब्दात वर्णन करणे कठीण आहे. 'भाभी जी घर पर है' या प्रसिद्ध मालिकेत मलखानची भूमिका साकारणाऱ्या दीपेश भानच्या निधनानंतर टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी दीपेश भानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला नाही तर त्याचे करोडो चाहते आणि जवळचे मित्रही आपले अश्रू आवरू शकले नाह...
भारतात अघोरी कृत्ये आणि अशा गोष्टींची साधना करणाऱ्या समाजाला एक मोठी परंपरा आहे. याच गोष्टीसंदर्भात एक सुन्न करणारी घटना समोर येत आहे. स्मशानभूमीत राहणार्या एका बाबाने अंत्यसंस्कार झाल्यानंतर तब्बल 136 मृतदेह बाहेर काढून त्यांचे मांस भक्षण केले आहे. दिवाळीच्या रात्री बाबा आणि त्याच्या शिष्यांच्या हत्येनंतर स्मशानभूमीत...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने सध्या सुरू आहेत. प्रत्येक दिवस खास पद्धतीने साजरा केल्यानंतर आज आठवड्यातील मुख्य व्हॅलेंटाईन दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस जोडप्यांकडून साजरा केला जात आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. पण व...
ब्रेक रक्तस्त्राव हे एक असेच काम आहे जे आक्षेप दर्शविते. जर आपल्या ब्रेक पेडलला थोडा चपळपणा जाणवला तर आपण ठरवू शकाल की तुमच्या ब्रेक्समध्ये रक्त येत आहे . आपण चालत असतांना पेडलमध्ये काही फरक दिसू शकाल, परंतु बहुतेक लोक त्यांच्या ब्रेक्सला मच्छरदाणाचे नियोजन म्हणून मनाई करतात. हे कठीण काम नाही, सहसा. हे खूपच कठिण होते, ...
अनेक लोक इमारत, विशेषतः मणक्याचे महत्त्व कमी लेखू. तथापि, मानवी जीवनात एक महत्वाची भूमिका बजावते, कारण तो किमतीची त्यामुळे नाहीत करू. तो एक चांगला स्थितीत एक व्यक्ती समर्थन करतात, व्यतिरिक्त, तो स्नायू पेशी आणि अवयव एक आधार छातीतून आणि पोटातील पोकळी तयार होते भिंत अर्ज म्हणून करते. तो त्याच्या लवचिकता आणि गतिशीलता राखू...
नागपूर : ड्रग नेटवर्कशी कनेक्ट असल्याच्या संशयामुळे बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्तीसह फिल्म इंडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांची प्रदीर्घ चौकशी करून एनसीबीने बॉलिवूडमधील अनेकांना दिवसा तारे दाखविले. त्यामुळे मुंबईतील ड्रग माफियांनी नागपूरच्या माध्यमातून मध्य भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत...
खुणा, गावांची नावे, इत्यादी गोष्टी प्रवासात मार्गदर्शक ठरतात. भर समुद्रावर बोटींचे संचलन करताना यापैकी काहीच साधने उपलब्ध नसतात. वर आकाश व खाली चौफेर पाणी. तेव्हा बोटीवरच अशी व्यवस्था करावी लागते की, ज्यामुळे नियोजित मार्गावर बोटीचे सुकाणू योग्य त्या दिशेला राहील. प्रवासाचा आरंभ आणि अखेर या दोन बिंदूतील मार्गक्रमणासाठी...
Latur News : कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील अंगणवाडीसह पहिली ते चौथीच्या जिल्हा परिषद, खाजगी शाळा बंद होत्या. आता कोविडचा प्रभाव ओसरत असल्याने आजपासून अंगणवाडीसह पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आ...
जगात विनामूल्य काहीच मिळत नाही, परंतु असे असतानाही आपण मोबाइलद्वारे एका सोप्या प्रश्नांच्या बदल्यात लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची इच्छा ठेवत सायबर गुन्ह्यांच्या सापळ्यात अडकतो. त्यामुळे अशा मोफत मिळणाऱ्या, सोप्या पद्धतीने मिळणाऱ्याच्या मागे जाऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन प्राचार्य मजहर फारुकी यांनी विद्य...
नवी दिल्ली, 16 जानेवारी : भारतात आज 16 जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान (Coronavirus Vaccination) सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 10. 30 वाजता व्हिडीओ प्रेस कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण अभियानाची (vaccination Programme) सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी देशातील वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं असून...
सदरील योजनेचा लाभ घेणारा इच्छुक विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. बीड : अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. सदरील योजनेंतर्गत निवड झालेल्या ...
Sharad Pawar । बारामतीः काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठं वक्तव्य केलं होतं. मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत पद द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेमण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नसल्...
त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणी येत असून ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लेखाशीर्ष 3054 अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्या अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी नासिक येथे पार पडलेल्या नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. नाशिक ...
Coronavirus In Dharavi आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाने शिरकाव केल्यानंतर मुंबई पालिका प्रशासनाची आणि राज्य सरकारची झोप उडाली होती. मात्र, कष्टकऱ्यांच्या धारावीने करोनाला वेसण घालण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. मुंबईः आशियातील सर्वात मोठी झोटडपट्टी असलेल्या धारावीतून एक चांगली बातमी समोर आली आह...
ठाणे, दि. 8 - एमएमआर प्रदेशातील वेगवान वाहतुकीसाठी रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असून मोटागाव-माणकोली खाडी पूल तसेच, दुर्गाडी खाडी पुलाच्या मार्गातील अडचणी तातडीने दूर करून या कामांना गती द्यावी लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भिवंडी येथे माणकोली पुलाच्या उद्घाटनप्रसंगी केले. वर्...
लीवर्ड बेटे - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nलीवर्ड बेटे : अटलांटिक महासागरातील वेस्ट इंडीज बेटांमधील लेसर अँटिलीस बेटांपैकी सर्वांत उत्तरेकडील बेटे. फ्रेंचमध्ये 'ईल सूल व्हान' व पोर्तुगीजमध्ये 'इल्हास दू सोतार्व्हेतो' या नावांनी ही बेटे ओळखली जातात. उत्तरेस व्हर्जिन बेटांपासून दक्षिणेस ग्वादलूप बेटापर्यंत लीवर्ड बेटांचा...
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे तीन सामन्यांत दोन विजयांसह ४ गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने सलग तीन विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागण...
झाल्टन इब्राहिमोविच (स्वीडन) - झाल्टन इब्राहिमोविच यंदा चौथ्यांदा स्वीडनकडून युरो कपमध्ये खेळताना दिसतोय. इब्राहिमोविचच्या नावावर 10 सामन्यांत सहा गोल जमा आहेत. सावो मिलोसेविच (युगोस्लाविया )- युगोस्लावियाच्या सावो मिलोसेविचननं 2000 सालच्या युरो कपमध्ये चार सामन्यांत पाच गोल झळकावले आहेत. रुड वान निस्टलरॉय (नेदरलँड्स...
मठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील हनुमाननगर (बरडवस्ती) येथे अंगावर ट्रॅक्टर गेल्याने, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. रमेश मोकिंदा कुसळकर (वय ४०, रा. हनुमानगर, मठपिंपळगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. रमेश कुसळकर हे घरासमोर ट्रॅक्टरचे काम करत होते. अचानक ट्रॅक्ट...
तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वतःच्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. सिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वतःच्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. परिणामी येथील सरपंच व सचिव यांच्यावर प्रशासकीय कारवाई ...
जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोना विषाणूची निर्मिती कशी झाली याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात आता ब्रिटनचे प्रोफेसर अॅंगल डल्गलिश (Angle Dalglish) आणि शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर (Scientist Dr. Birger) यांनी कोरोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान शहारातील लॅबमध्य...
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनलने आपल्या ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये सुधारणा केलीय. या प्लानचे नाव BSNL Sixer plan असं आहे. आधी या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळत होता. आता कंपनीने त्यात वाढ केलीय. एक्स्ट्रा डेटा ऑफरनुसार बीएसएनएल ३१ डिसेंबरपर्यंत ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा देणार आहे.
दिवाळीचे दिवस सर्वत्र आनंद उत्साह चैतन्य भरभराट घेउन येणारे असतात. नैराश्याचे मळभ दुर सारून सर्वत्र चैतन्याचा सडा शिंपणारा हा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो आणि म्हणुनच या सणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट देखील पाहात असतो. या सणाची जवळपास १५ दिवस शाळांना सुट्टी असल्याने बच्चेकंपनीची तर मजाच असते त्यामुळे त्यांना या सणाची आ...
नवी दिल्ली - योग विद्या शिकवता शिकवता, सर्व गृहउपयोगी पदार्थ आणि पाकिटबंद खाद्यपदार्थ बाजारात आणणाऱ्या योगगुरू रामदेवबाबा यांच्या 'पतंजली'कडून आता चक्क जिन्स पॅण्टही विकण्यात येणार आहेत. रामदेवबाबा लवकरच वस्त्रोद्योग क्षेत्रात उतरणार असून देशभरात कपड्यांची दुकाने सुरू करणार आहेत. 'लाईव्ह मिंट'च्या वृत्तानुसार येत्या ए...
जुन्या गाण्यांची मजा काही औरच असते. मग त्या गाण्यांवर एखादा परफॉर्मन्स करायला किंवा ती गाणी गायला अनेकांना आवडतं. असाच एका प्रसिद्ध जुन्या गाण्यावर एक डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्तासोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा ...
सुरतः मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, पण तोच मोबाईल लोकांच्या जिवावर उठला आहे. गुजरातमधील सुरतमध्ये एक प्रकरण समोर आलं आहे. वडिलांनी आपल्या मुलाला मोबाईल गेम खेळून न दिल्यांमुळे मुलाने वडिलांचा गळा आवळून खून गेला आहे. सुरत शहरातील इच्छापोर पोलिस स्टेशन परिसरात हा गुन्हा घडला आहे. अर्जून सरकार हे...
संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी होळी सण साजरा न करता बुधवारी सायंकाळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांना त्यांच्या दालनात कोंडून घेतल्याने पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील 'सिग्नल' चालू करण्याच्या उद्देशाने नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने शहरातील नाशिक-पु...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांचे पारडे जड झाले आहे. भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला आणि आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळला. रविवारी कसोटीच्या चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीनं आफ्रिकेला फॉलोऑन दिला, अन् पहिल्याच षटकात इशांत शर्मानं पाहुण्यांना धक्का दिला. इशांतने एडन मार्करामला...
नवी दिल्लीः केंद्र सरकारकडून नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार (19 नोव्हेंबर) कृषी कायदा मागे घेण्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारला भूसंपादन कायदाही मागे घ्यावा लागला. आता केंद्र सरकारला कृषी कायदाही मागे घ...
मुंबई - बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांची भेट घेतली. लीलावती रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी केली. तसेच यापुढे प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी असा स...
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर । उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील वालवटी गावात दलीत वस्तीत सुधार रायगड जिल्हा परिषद योजनेंतर्गत नळ पाणी पुरवठा दुरुस्ती या कामाचे बील देण्यात येऊ नये. सदरचे बिल 10 लाखाचे असून दलीत वस्तीमध्ये कधीही पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली नाही. या योजनेचे बील दिले गेले तर आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्य...
'आधार' पॅन कार्डशी जोडणे गरजेचे आहे. महत्त्वाच्या आर्थिक कामांची शेवटची तारीख जूनमध्ये संपत आहे. वित्त मंत्रालयाने आता 22 वित्त कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांची आधारची पडताळणी करण्यास मान्यता दिली आहे. आधार कार्डमधील घरचा पत्ता अपग्रेड करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सायबर फसवणुकीचे सर्वात मोठे कारण बनले असल्याचे त्या संबं...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोेघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास झाला. सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोेघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास झाला. ...
बंदी घालण्यात आलेल्या प्रवर्तकांमध्ये नुस्ली एन वाडिया, नेस वाडिया आणि जहांगीर वाडिया यांचा समावेश आहे. यासोबतच सेबीने 15. 75 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सेबीने 45 दिवसांत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई । राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेच्या मूडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारनं अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केलं. लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन ...
Nykaa Share Price । नायका एक दिवसात शेअर अचानक 10 टक्के वाढला, पुढे काय होणार? स्वस्त झालेला शेअर खरेदी करावा का? Nykaa Share Price । सौंदर्य प्रसाधन ई-रिटेलर 'नायका' ची मूळ कंपनी 'FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड' कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. हा स्टॉक कधी अचानक अप्पर सर्किट स्पर्श करतो, तर कधी ...
पद्मकर दैत्यहर कुञ्जचर वीरवर नर्ममय कृष्ण जय " ( रूस्तमा १५६ ) त्याचिया मानसात कल्पना क्रीडतात, की सुवर्णी भ्रमाला पडित हंसमाला. ( २४९ ) शत्रुची फोडुनीया फळी घाव घालीत ये या स्थलीं अभिकाठे करी भक्षण, चीरलक्ष्मीस त्या वन्दन । ( २५० ) संस्कृतांत "रगतस्तोपितज्ञातिना" ( रूस्तमा २०० ) या पद्यांत वीरलामीचे ५४ चरण आहेत; आणि म...
मीडिया कमिटीने प्रमाणपत्र दिल्याशिवाय नमो टीव्हीवरून कोणत्याही कार्यक्रमांचे प्रक्षेपण न करण्याची ताकीद दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिले आहेत. नवी दिल्ली : मीडिया कमिटीने प्रमाणपत्र दिल्याशिवाय नमो टीव्हीवरून कोणत्याही कार्यक्रमांचे प्रक्षेपण न करण्याची ताकीद दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिले आह...
अंधेरी पोटनिवडणुकीच्या सुरुवातीलाच बरंच राजकारण बघायला मिळालं. भाजपनं उमेदवार दिला. राज ठाकरे, शरद पवारांच्या आवाहननंतर निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं गेलं. पण, व्हायरल झालेल्या एका कथा ऑडिओ क्लिपमुळे आणि त्यानंतर समोर आलेल्या एका ट्विटने भाजपचा ऋतुजा लटकेंविरोधात प...
मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याला कमी लेखले जाऊ शकत नाही कारण त्याचा वापर केवळ अंमली पदार्थांच्या व्यापारासाठीच नाही तर दहशदवादी कारवायांसाठीही केला जातो. आणि असा गुन्हा केवळ घृणास्पद नसून देशाच्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावरही परिणाम करतो, असे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पीएमएलएच्या विविध तरतुदी आणि फौजदा...
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; संसदेचे पावसाळी अधिवेशन हे सुरु होण्यापूर्वीच सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. आधीच असंसदीय शब्दांचा मुद्दा ताजा असतांन आज संसद भवन परिसरात खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयानं काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयानं जारी केले...
लातूर : प्रभावी पिचिंगच्या जोरावर अनेकवेळा मैदाने गाजविणाऱ्या लातूरच्या ज्योती पवारने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बेसबॉल खेळात उड्डाणे कायम ठेवली आहेत. हाँगकाँग येथे होणाऱ्या महिलांच्या एशियन कप स्पर्धेत भारतीय संघात आपली निवड पक्की करून दुसऱ्यांदा ही किमया साधली आहे. औसा तालुक्यातील नांदुर्गा तांडा येथील रहिवासी...
वणी : जऊळके (वणी) येथील महिलांनी पावसासाठी देवाकडे साकडे घातले. महाराष्ट्रामधील दुष्काळाचे सावट वाढत असतांना दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी) येथील महिलांनी देवाला पाण्याने अंघोळ घालून देवाला पावसासाठी साकडे घातले. या प्रसंगी दवंगे, . बैरागी,महाले, कलवर, सौ. डंबाळे, बोंबले आदि गावातील महिलांनी आपला सहभाग नोंदवला.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वन डे वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वन डे वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. वेस्ट इंडिज ( Away) , बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज ( Home) मालिकेत तो खेळला नाही. पुढील ऑस्ट्रेलिया व श्रीलं...
शेख हा पत्नी आणि दोन मुलांसह शिवाजी नगर येथे राहत होता. ओला कॅब कंपनीसाठी तो काम करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, कारमधील प्रवाशांना सोडून शेख सोमवारी संध्याकाळी शिवाजी नगर येथे परतत होता. त्याचवेळी एका दुचाकीनं कारला वेगानं ओव्हरटेक केलं. त्यावर शेखनं दुचाकीवरील तिघांना जाब विचारला. त्याचा राग आल्यानं तिघांनी काही अ...
लाईव्ह न्यूज : रोहित शर्मापाठोपाठ युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचेही अर्धशतक. . . भारताच्या बिनबाद ११८ धावा. "१५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार, व्हिडीओ आला नसता तर PM बोलले नसते" राष्ट्रीय : राष्ट्रीय : राष्ट्रीय : ३ पोलीस ठाणे, १२ किमीचा रस्ता आणि ९ PCR व्हॅन. . . तरीही तरुणीला फरफटत नेताना पोलिसांना दिस...
प्रवास करीत असताना अचानक एखाद्या यात्रेकरूला ह्रदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना आपण वाचत-ऐकत असतो. सुदैवाने काहींच्या बाबतीत त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे शक्य झाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले, तर काही मात्र दुर्दैवी ठरले. हृद्यविकाराचा झटका येण्याआधी आपले शरीर आपल्याला तशी सूचना देण्याचा प्रयत्न करीत असते. पण अनेकदा...
मुंबई : आदिवासी विकास निधी घोटाळ्याची चौकशी करण्याकरिता उच्च न्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घोटाळ्यास जबाबदार असलेल्या ज्या अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे, त्या सर्वांवर कारवाई करू. एकाही अधिकाoयाला मोकाट सोडणार नाही, अशी माहिती आदिवासी वि...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. Hyundai, Kia राहिल्या मागे, सर्वांना मागे टाकून मारुती बनली 'नंबर वन' Top 10 Selling Cars in July 2021: टाटाच्या Nexon ने दिला Hyundai ला झटका, Ven...
नाशिक : येत्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचा निर्धार प्रत्येक भाजपा पदाधिकाऱ्याने करावा. नाशिक विभागात प्रत्येक मंडल अधिकाऱ्याने किमान पाच हजार पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करून घेत आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या निवडणुकीकडे गांभिर्याने बघावे, असे आदेश राज्याचे जलसंधारणमंत्री राम ...
वॉशिंग्टन - अलकायदाचा प्रमुख हमजा बिन लादेन हा अमेरिकेसाठी धोकादायकच होता असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तथापी त्यांनी हमजाच्या निधनाच्या वृत्ताबद्दल मात्र कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे. मी त्याविषयी कोणतीही प्रतिक्रीया देणार नाही. पण तो आमच्यासाठी धोकादायकच होता असे त्यांनी म्हटले आ...
मुंबई, दि.१२ (पीसीबी) : महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. पुण्यात एकूण ७ ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक...
विश्वाची सामुहिक जबाबदारी आहे. जगातील सर्वच मुलांचे आरोग्य व त्यांना मिळणारे शिक्षण यांच्या दर्जावर आपल्या घराचा पाया भक्कम होणे अवलंबून आहे. या घरातील अर्थव्यवस्थेत काही हुशार व्यक्तीच श्रीमंत होउन चालणार नाही; तर जगातील गरिबांचे अश्रू पुसले जातील व बेकारांना रोजगार मिळेल, अशी व्यवस्था असणे जरूरीचे आहे. या अर्थव्यवस्थ...
मुंबई, 07 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने काही दिवसांपूर्वीच 'कॉफी विथ करण' शोमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचं सांगितले होतं. यानंतर कार्तिकनेही साराला डेट करण्याची तयारी दर्शवली होती. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत का? , अशी गॉसिप सुरू झाली आहे. या व्हिडी...
पणजी : संजय राऊत हे व्हिक्टि्म कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. गिधाडांच्या धमक्यांना सिंह घाबरत नाही, असे चोख प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना दिले आहे. संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देत फडणवीस य...
जर्मनमध्ये कोरोना महामारीची महाभयंकर स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या महामारीला कोरोनाविरोधी लस न घेतलेले नागरिक जबाबदार आहेत. अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, जर्मनी देश पुन्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेत अडकतोय. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, जर्मनीतील कोरोना रुग्णसंख्या अलीकडच्या आठवड्यात तिप्पट झा...
महाड - महाड शहरातील काजळपुरा भागात असलेली तारीक गार्डन ही पाच मजली इमारत काल सायंकाळी सहाच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून एनडीआरएफतर्फे ढिगारे उपसण्याची काम सुरु आहे. सरकारने या दुर्घटनेतील पीडितांच्या कटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या इमारतीमध्ये आपल्...
. मुंबई -शिवसेना एक प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. हे मोदीपासून फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांना माहिती आहे. बाबरी मस्जिद पडल्यानंतर ज्यांनी हात वर केले होते, त्यांनी शिवसेने बद्दल बोलू नये. जेव्हा मुबंईत १९९३ ला पाकिस्तानने दंगली उसळल्या तेव्हा देखील शिवसेनेने आपले हिंदुत्व दाखवले होते. तेव्हा त्यांनी आम्ह...
पुणे : सोनी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाला गेले काही आठवडे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे . १४ स्पर्धकांमध्ये सुरू झालेल्या या सुरांच्या मैफिलीला ग्रँड प्रिमिअरपासून अधिकच प्रतिसाद मिळू लागलाय. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून अनेक स्पर्धकांनी आपली हजेरी लावली होती . त्यातूनच प...
बाराबंकी (उत्तरप्रदेश) - येथील पैसार भागातील एचडीएफसी बँकेमध्ये नमाजपठण आणि इफ्तार आयोजित करण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याचा विरोध केला जात आहे. याविषयी बँक आणि पोलीस दोघेही काहीही बोलण्यास नकार देत आहेत. या प्रकरणी बजरंग दलाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली ...