text large_string |
|---|
लाईव्ह न्यूज : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीची आजची पातळी १६. ५० मीटर असून तेवढी इशारा पातळी आहे. मुंबई- मुंबई, आणि ठाण्यात गेल्या २४ तासांत ४०-१०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पनवेल येथे ९. ४० वाजल्यापासून एक पॉइंट बिघाड झाल्याने पनवेल ते बेलापूर दरम्यानच्या उपनगरीय लोकल गाड्यांवर परिणाम झाला आ... |
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रासाठी येत्या ६ फेब्रुवारीस खेळाडूंचा लिलाव होत आहे. एकूण ७१४ खेळाडूंच्या पूलमधून ३५१ खेळाडू लिलावास उपलब्ध राहतील. ईशांत आणि युवराजसह आठ खेळाडूंची बेसप्राईस (आधारभूत किंमत) दोन कोटी असेल. लिलावात भारताचे २३०, तसेच विदेशातील १२१ खेळाडूंचा समावेश राहील. आयपीएल चेअरमन राजीव ... |
सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव जोमात करणाऱ्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. बीड : सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव जोमात करणाऱ्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. विशेष... |
नवी दिल्ली । नोटबंदीनंतर लोकं नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूप सावध झाले आहेत. विशेषतः 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांच्या बातम्या रोज येत असतात. या मध्ये आता 500 रुपयांच्या नोटेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जर तुमच्याकडेही अशी 500 रुपयांची नोट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. वास्तविक, सोशल मीडियावर 500... |
हैरिस मॅट्रिक्स (किंवा हॅरिस-विंचेस्टर मेट्रिक्स) 1 9 6 9 -1 9 73 च्या दरम्यान बरमुडीयन पुरातत्त्ववेत्त्या एडवर्ड सेसिल हॅरिस यांनी विकसित केलेला एक साधन आहे ज्याने पुरातत्त्वीय साइट्सच्या स्ट्रेट्रिग्राफीची तपासणी व व्याख्या केली आहे. हैरिस मॅट्रिक्स विशिष्टपणे नैसर्गिक आणि सांस्कृतिक दोन्ही कार्यक्रमांची ओळख यांसाठी ... |
Easter Sunday 2023: ख्रिस्ती बांधवांनी नुकताच गुड फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे साजरा केला आहे. आज (9 एप्रिल) सर्वत्र इस्टर संडे म्हणुन साजरा केला जातो. जागतिक स्तरावर ख्रिश्चन समुदायासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा मानला जतो. प्रभू येशू ख्रिस्तांची वाढती... |
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथबाबत कौतुकोद्गार काढले आहेत. 'स्टीव्ह स्मिथ हा या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज आहे. जगात स्मिथसारखा सातत्यपूर्ण खेळ करणारा दुसरा फलंदाज नाही,' असे तो म्हणाला. त्याची गेल्या १० वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीच त्याला अन्य फलंदाजांपासून वेगळी ठरवते, असेही... |
कार, बाईक, फूड डिलिव्हरी नंतर उबर घेऊन आलं आहे 'बोट सर्व्हिस'...भाडं किती आहे बघा !!\nमांडवा जेट्टी, एलिफंटा किंवा अलिबागला फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर उबरने तुमच्यासाठी एक खुशखबर आणली आहे राव. टॅक्सी, बाइक आणि फूड डिलिव्हरी सर्व्हिस नंतर उबर 'बोट सेवा' सुरु करणार आहे. उबरच्या बोट सर्व्हिसने तुम्ही अवघ्या २० मिनिटात... |
रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. आरमोरी : रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यामुळे या परिसरातील कोंढाळा, अरसोडा येथील शेतकरी धास्तावले आहेत. वन वि... |
पंकज हा प्रचंड तणावाखाली होता कारण सगळ्याच गोष्टी बंद होत आहेत आणि कुठलाही रस्ता दिसत नाही म्हणून काही मदत होईल का अशा विश्वासाने फोन करून विचारात होता. तात्पुरती मदत करून त्याचा तणाव कमी करायच्या प्रक्रिया बोललो. ताणतणावाच्या परिणामाबद्दल सर्वाना भरपूर माहिती आहे आणि तणाव कमी करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न नेहमी करतो. आण... |
या निवडीमध्ये जिल्हाध्यक्ष दोन पदे देण्यात आली आहेत. पाटील यांच्याकडे कोल्हापूरसह करवीर, शाहूवाडी, गगनबावडा, कागल, हातकणंगले, पन्हाळा, इचलकरंजी, शिरोळचा, तर मोरे यांच्याकडे आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, चंदगड, बेळगाव, कर्नाटक, गोवा याचा प्रभार दिला आहे. अन्य निवडी अशा- शैलजा भोसले (जिल्हा महिला अध्यक्षा), डाॅ. शिवाजीराव हि... |
दर्शनमंडपाच्या जागेवरचे आरक्षण उठविण्यासाठी प्रशासनातील मंडळींनी आर्थिक लाभ पदरात पाडून घेतल्याची जोरदार चर्चा आळंदी शहरात आहे. यामुळे यंदाच्या वर्षी कार्तिकी वारीत दर्शनमंडप उभारण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले. प्रशासनातील बाबूगिरी, राजकीय मंडळींची अनास्था आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे दर्शन म... |
'कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन रयतच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. कर्मवीरांनी लावलेल्या या रोपट्याचे महावृक्षात रुपांतर झाले आहे. या महावृक्षाच्या छायेत गेल्या शंभर वर्षांत ज्ञानाने संपन्न असणारी एक फळी निर्माण झाली आहे. रयत शिक्षण संस्थेने समाजाच्या गरजा लक्षात घ... |
सीडरचा पेरणी दर स्थिर असतो, प्रत्येक ओळीचा पेरणी दर सुसंगत असतो, बियाणे बियाण्यांच्या फरोमध्ये समान रीतीने वितरीत केले जातात, बियाण्यांवरील मातीच्या आच्छादनाची जाडी मुळात सारखीच असते, बियाणे तुटण्याचे प्रमाण कमी असते. छिद्रांच्या संख्येचा पात्र दर जास्त आहे आणि धान्य अंतराचा पात्र दर जास्त आहे.मातीची चांगली स्थिती असल्... |
सूरजागड येथील लोहखनिजावर आधारित प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार बोलून दाखविल्याने ते माओवाद्यांच्या लक्ष्यस्थानी आले असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत धमकीची तीन पत्रे पाठविण्यात आली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ३५ वर्षांपासून माओवाद्यांच्या हिंसक कारवाय... |
जोधपुरः आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. जोधपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची एक टीम खासगी विमानाने मुंबईहून जोधपूरला रवाना झाली आहे. जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये सध्या अमिताभ बच्चन आहेत. मुंबई... |
यश (yash) स्टारर 'KGF' मधून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीला (shrinidhi shetty) आज कोण ओळखत नाही. चित्रपटाच्या दोन्ही भागांच्या यशानंतर श्रीनिधी चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव म्हणून उदयास आली आहे. 'KGF' च्या चॅप्टर वन आणि टू मधील यशसोबत इश्क फराने ही प्रेक्षकांची पहिली पसंती बनली आहे आणि ती तिच्या क... |
पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. मध्यरात्रीच्यावेळी सर्व गाढ झोपेत असताना चोऱ्या केल्या जात असल्याने नागरिकांच्यामध्ये भितीचे वातावरण आहे. शिरुर तालुक्यातल्या टाकळी गाजी गावामध्ये चोरट्यांनी ४ दुकानं फोडली. तर मलठण गावामध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरीची ही घटना सीसीटीव्ही... |
पहूर, ता. जामनेर : खर्चाना, ता. जामनेर येथील शेतकरी मुरलीधर नामदेव पाटील (५७) यांनी कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मुरलीधर पाटील यांच्यावर युनियन बँकेसह एका पतसंस्थेचे पंधरा ते वीस लाखाचे कर्ज होते, अशी माहिती पोलीस पाटील सुरेश मधुकर पाटील यांनी दिली. त्या... |
तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना 2525 मते मिळाली आहेत. परंतु अंबर चिंचवडे यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी अध्यक्ष पदाचा निर्णय राखून ठेवला आहे. शुक्रवारी ( दि. 25 फेब्रुवारी) मतदान झाले यानंतर सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मतमोजणी शनिवारी रात्री उशिर... |
नाशिक : गेल्या दोन महिन्यांत डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणाही आता हादरली असून, डेंग्यूला रोखण्यासाठी शुक्रवार (दि. ३०) पासून प्रभागनिहाय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रामुख्याने अनेक महिने, वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या घरांचीही तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, आरोग्... |
तीन कोटींचा धान्य घोटाळा. अकोलाः तार फैलातील वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याची परस्पर विक्री करून केंद्रीय वखार महामंडळाच्या पाच गोदामांमधील ३ कोटी रुपयांच्या वर गहू व तांदळाची संगनमत करून अफरातफर केल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोन वखार साहाय्यकांना गुरुवारी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोघाही आर... |
यूएस चेम्बर इन्स्टिट्यूट फॉर कायल रिफॉर्मनुसार 2015 च्या दहा सर्वात हास्यास्पद खटले आहेत. 01 - मकर आणि त्याचा फोटो एक ब्रिटिश छायाचित्रकार पीएटीए (मादक पदार्थ एक प्रकारचे उपचार प्राणी) यांनी "मादक पदार्थाचा एक प्रकारचा माकक" घेतलेल्या "फोटो" वर दावा दाखल केला गेला आहे. छायाचित्रकार इंडोनेशियात मॅककेस छायाचित्र घेत होत... |
संक्षिप्त चार्टः हे काय आहे, जो आहे, संक्षिप्त आलेख - एक भौगोलिक नकाशा, स्टेशन अनेक हवामान निरीक्षण असलेली हवामान, एक विशिष्ट वेळी गोळा आणि पूर्वानुमान चिन्हे आणि लक्षणे स्वीकार लॉग इन पाहणे. अशा कार्ड हवामान स्टेशन एक दिवस काही वेळा आहे, आणि ही माहिती systematization आणि विश्लेषण हवामान अंदाज करण्यासाठी वापरली जाते. ... |
'पठाण'ची घोषणा आणि या सिनेमातील शाहरुख खानचा फर्स्ट लुक समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या दुबईला सुरू असलं तरीही शाहरूख आणि त्याच्या टीमनं या चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे. मात्र दुबईतील एका चाहत्यानं या चित्रपटाच... |
नवी दिल्ली - वृत्त संस्था - कोरोना संकट काळात पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये वाद होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी तिरंग्याचा अपमान केला आहे. या विषयावरून केंद्रीय मंत्र्याने दिल्लीचे उपराज्यपाल अनिल ब... |
श्री तीर्थक्षेत्र देहू (dehu) हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून... |
सुझुकीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर आगामी कटाना लिटर-क्लास मोटरसायकलचा व्हिडिओ टीझर शेअर केला आहे. यासोबतच कंपनीने ही बाईक लवकरच लॉन्च करण्याचे संकेतही दिले आहेत. ऑरिजिनल कटाना जवळजवळ चार दशकांपूर्वी सादर करण्यात आले होते. ही बाईक पहिली भारतीय लाँच असेल. अपडेटेड 2022 Suzuki Katana ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये EICMA... |
कोलंबो । सध्या श्रीलंका क्रिकेट वा. दाच्या भो. वऱ्यात सापडलं आहे. इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळणार्या श्रीलंका संघाच्या एका सदस्याने वैद्यकीय कर्मचारी असणाऱ्या महिलेवर गै. रवर्तन केल्याचा आ. रोप श्रीलंकेत अनेक स्तरातून केला जात आहे. यामुळे श्रीलंका क्रिकेट विश्वात मोठी ख. ळब. ळ उडाली आहे. अनेक स्थानिक माध्यमांनी द... |
अभय... डोंबिवलीतील एका सुसंस्कृत घरातला देखणा मुलगा. घरात कुणाला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. वडील नामांकीत कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी. आई बँकेत नोकरीला. अभयच्या वाटेवर आज कॉलेजातल्या अनेक तरुणांची वाटचाल सुरू आहे. चरस, गांजा आणि कोकेनपेक्षाही कितीतरी घातक असलेल्या 'एमडी'ने असंख्य तरुणांचा 'ताबा' घेतल्याचे भयानक वास... |
पाकिस्तानमधील १६ दहशतवादी गटांच्या युनायटेड जिहादी कौन्सिलचा अध्यक्ष सैय्यद सलाहुद्दीन याने सिरीया आणि इराकप्रमाणेच काश्मीरसाठी जागतिक जिहाद पुकारल्याचे जाहीर केले असून तालिबान्यांसह जगातील सर्व जिहादी संघटनांनी काश्मीरमुक्तीसाठी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. मुजफ्फराबाद येथे पार पडलेल्या शहीद दिवसाच्या कार्यक्रमात तो... |
Thane News: जलवाहिनीच्या स्थलांतराच्या कामासाठी २७ मे रोजी सकाळी ९ ते २८ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने बुधवारी दिली. ठाणे - ठाणे शहरातील नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरीतील धोबीघाट जलकुंभाची ३०० मिमी व्यासाची मुख्य वितरण जलवाहिनी साईतीर्थ टॉवर ... |
तेलही गेलं ... (भाग - अंतिम) यापूर्वीही मी म्हटल्याप्रमाणे तेल कंपन्या त्यांच्याकडे असलेल्या तेल साठ्यांबाबत कधीही खरं बोलत नाहीत. कारण त्यांच्या समभागांचे बाजारभाव त्यांच्या तब्येतीवरच अवलंबून असतात. दुसरं म्हणजे या कंपन्यांच्या ख्यालीखुशालीवर देशाचं (विशेषतः अमेरिकेसारख्या) अर्थकारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात अवलंबून अस... |
मुंबईतून चार वर्षात 26 हजारांपेक्षा जास्त मुली-महिला बेपत्ता - तरुण भारत । तरुण भारत\nYou are here: Home » Top News » मुंबईतून चार वर्षात 26 हजारांपेक्षा जास्त मुली-महिला बेपत्ता\nPosted: 10:08 AM, 21/11/2018 by prashant chavan\nमुंबई महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादा... |
मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपाकडून (BJP) होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केले असून, यामध्ये त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्र परिवारावर 100 कोटींचा ... |
मुंबई : भाजपा (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहे. याच संदर्भात सोमय्या हे मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापुरला जाणार होते, मात्र, पोलिसांनी त्यांना अडविले. या पार्श्वभूमीवर त्यांनी कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आण... |
ढोल-ताशांचा आवाज. . . रॉक बँड आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई. . . सेल्फी काढण्याची लगबग अन् दिवाळीच्या शुभेच्छांच्या वर्षावात राम मारुती रस्त्यावर तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. मोठ्या जल्लोषात 'दिवाळी पहाट' साजरी करण्यासाठी समस्त तरुणाई राम मारुती रस्ता आणि तलावपाळी परिसरात जमली होती. मुलुंड, भांडुप, नवी मुंबई... |
मुंबई । आयपीएलचा 13 वा हंगाम सुरु होण्यास अजून 3 आठवडे शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीत बीसीसीआयला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. फ्यूचर ग्रुपनेही शेवटच्या क्षणी स्वतः ला आयपीएलपासून वेगळे केले आहे. आयपीएल असोसिएट सेंट्रल प्रायोजकत्वातून या ग्रुपने माघार घेतली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्यूचर ग्रुपन... |
सोळाव्या शतकात महाराष्ट्रात पाच शाहींची सत्ता होती. त्यातील एक सत्ता म्हणजे अहमदनगरची निजामशाही. तिचा संस्थापक असणारा मलिक अहमद हा पूर्वी सुभेदार होता. त्याचा पिता निजाम उल्मुल्क हा मुळात ब्राम्हण असून पोथरी (जिल्हाः परभणी) या गावचा कुलकर्णी होता. : मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा परा... |
एमपीसी न्यूज : भविष्य निर्वाह निधीचा (Pune Crime) अपहार केल्याप्रकरणी एस. एन. सिस्टम प्रा. लि. कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या 11 महिन्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केला असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात कंपनीचा डायरेक्टर ओमकार सूनिल नाथी (रा. ग्रीन... |
नॉटिंघम येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. आता भारताला लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घ्यायची आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (12 ऑगस्ट) पासू... |
साहित्य क्षेत्रातील मानाच्या अशा ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. 2018 चा ज्ञानपीठ पुरस्कार सुप्रसिध्द इंग्रजी लेखक अमिताव घोष (Amitav Ghosh) यांना जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीची बैठक आज पार पडली, त्यात ही घोषणा करण्यात आली. यंदाचा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. अमिताव घोष यांच्या 'द शॅडो लाइन्स'... |
नवी दिल्लीः Honor ने Honor Magic 3 सीरीजचा फ्लॅगशिप फोन, Honor X20 5G आणि Honor Watch GS स्मार्टवॉच सोबत आधिकृतपणे चीनी बाजारात आपला Tab V7 Pro लाँच केला आहे. Honor Tab V7 Pro चीन मध्ये तीन रंगाच्या पर्यायात म्हणजेच चेनहुई गोल्ड, डॉन ब्लू आणि टाइटेनियम सिल्वर मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. जाणून घ्या Honor Tab V7 Pro ची क... |
तिरुवनंतपुरम, 05 मे : केरळमधील पहिला ट्रान्सजेंडर बॉडीबिल्डर प्रवीण नाथने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणने विष प्राशन करून जीवन संपवलं. सध्या पोलिस प्रवीणच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. नाथने याच वर्षी व्... |
कुटुंबातील महिला ही एखाद्या विद्यापीठा सारखी असते, असे प्रतिपादन कर्जत-जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केले. शारदानगर (ता. बारामती) येथे स्वयंसिद्धा युवती संमेलन शनिवार (दि. १९) रोजी अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी मार्गदर्शन केले. बारामतीः कुटुंबातील महिला ही एखाद्या विद्यापीठा सारखी... |
मुंबई, 15 मार्च । आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हे या वर्षी 5 जानेवारी रोजी सिल्व्हर ईटीएफ लाँच करणारे पहिले फंड हाउस ठरले. त्याने फंड ऑफ फंड्स (FoF) योजना देखील सुरू केली होती. म्युच्युअल फंड जो इतर म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करतो तो फंड ऑफ फंड म्हणून ओळखला जातो. येथे आम्ही आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्... |
पोलीसनामा ऑनलाइन टीम - सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांवड (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळू... |
लोणी काळभोर : गेले आठ दिवसांपासून लसीचा तुटवड्या अभावी बंद असलेले लोणी काळभोर येथील केंद्रास जिल्हा परिषदेकडून डोस उपलब्ध झाल्याने आज एकूण ९०० जणांना लस देण्यात आली. यामध्ये मांजरी केंद्रातील ३०० जणांचा समावेश आहे. प्रथमच टोकण पद्धत अवलंबल्याने आज कोणत्याही गडबड गोंधळाविना लसीकरण सुरळीत पार पडले. राज्यात कोरोना लसीकरणा... |
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ट्रम्प प्रशासनाचे जाचक इमिग्रेशन धोरण बदलण्यासंदर्भातील तीन सरकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे कुटुंबीयांची होणारी ताटातूटही थांबणार असून हजारो भारतीयांना दिलासा मिळणार आहे. हायलाइट्सः वॉशिंग्टनः डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेले काही निर्णय... |
नवी दिल्ली : लक्ष्मी विलास बँक (Lakshmi Vilas Bank) आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने (RBI) या बँकेवर निर्बंध लादले आहेत. या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. 16 डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असून बँकेच्या खातेदारांना महिनाभरासाठी केवळ 25 हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने क... |
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) AJIT/ MMP/KTG/KGS/AKN/ पूर्वी श्रीमती रणदिवे.. डॉ. नीलम गोऱ्हे...... सभापती महोदय, अपघात झाल्यानंतर जी नुकसान भरपाई मिळावयास पाहिजे ती मिळत नाही. तेव्हा सरकारने स्वतः याचिकाकर्ते होऊन अपील करावे. तसेच अपघात करणाऱ्या टँकर चालकाकडून काही रक्कम वसूल केली पाहिजे. ट्रक किंवा कंटेनर अ... |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगा हा नेहमीप्रमाणे घरी परत न आल्याने अनंत आंग्रोळकर यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निखिल हा बिनयसिंग राजपूत याच्यासोबत दिसल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे काबुली दिली. घटनेच्या दिवशी... |
सोहेल आणि सीमा १९९८ मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. Sohail Khan Seema Khan Divorce : बॉलिवूडमध्ये अनेक घटस्फोट झाले आहेत. अनेक जोडप्यांमध्ये दुरावे आले आहेत. यात आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. लग्नाच्या २४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घ... |
प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या भावावरच पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून गंभीर जखमी केले. चंद्रपूर, दि. 10 - प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या भावावरच पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून गंभीर जखमी केले. ही थरारक घटना रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घुग्... |
नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) चे लवकरच बिगुल वाजणार आहे. २७ ऑगस्ट पासून रंगणाऱ्या या स्पर्धेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. भारत-पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना होणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण... |
निपाणी/सदलगा : वृत्तसंस्था - Anti Corruption Trap । पानमसाला कारखानदाराकडून 40 हजार रुपयाची लाच (Bribe) घेताना सदलगा पोलीस ठाण्यातील (Sadalga Police Station) पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) कुमार हित्तलमनी यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबलवर (police constable) बेळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Belgaon Anti Co... |
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाने चीनमध्ये पुन्हा उसळी मारली आहे. चीनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असले तरी पुन्हा कोरोनाचा संसर्ग फोफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच चीनमधील तब्बल ४० लाख लोकसंख्या असलेल्या लन्झाऊ या शहरात चीनने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. जगभरात कोरोनाच्या दुसऱअया लाटेने हाहाकार माजव... |
कोल्हापूर : जनता सुरक्षित राहावी, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून झटणारे पोलिसांचे हात कोरोना काळात लोकांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आले आहेत. पोलिसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्याचे काम केल्याने अनेक जण कोरोनापासून सुरक्षित राहिले. अशा पोलीस प्रशासनाच्या सुरक्षिततेसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी राबवलेला मास्क वाट... |
वीज वितरण कंपनी (Electricity Distribution Company) मध्ये कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या गणेश सिताराम गुंबाडे (३४) यांचे शॉक लागून जागीच निधन झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली. बाह्य स्रोत कर्मचारी (कंत्राट पद्धतीने) काम करणाऱ्या कंत्राटी सेवकाचा आज दुपारी अडीच वाजेच्या च्या दरम्यान गुंबाडे ह... |
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून एकात्मता, भाईचारा या भूमिकेतून त्यानिमित्ताने गावात विविध ठिकाणी सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भिवंडी परिमंडळ 2 अंतर्गत कोनगाव पोलीस स्टेशन व कोनतरी मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम बांधवांसाठी 'दाव... |
fire brokeout in bhandara hospitla Chief Minister orderedaprobe of fire incident in District General Hospital bmh 90 । भंडारा : मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश; राहुल गांधींनी केली मदतीची विनंती । Loksatta\nभंडारा : मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश; राहुल गांधींनी केलं मदतीचं आवाहन\nभंडाऱ्यातील दहा च... |
औरंगाबाद : जमिनीच्या फेरफार प्रकरणामध्ये स्थगितीचे अधिकार नसतानाही दिलेल्या आदेशावरून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले. सत्तार यांनी शपथपत्र सादर करून न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एन. लड्डा यांच्या पीठासमोर माफीही मागितली. मात्र, माफीनाम्यात दि... |
वर्धा : उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. अशात शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने भर उन्हात नागरिकांची पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे. सदर लिकेज हे अमृत योजनेचे काम करताना झाल्याची माहिती आहे. हा लिकेज दुरूस्त करण्याकरिता तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता खरच हा लिकेज ... |
गोपीनाथ मुंडे आणि महाजन यांनी शिवसेना भाजप युतीसाठी पुढाकार घेतला, शिवसेने भाजप युतीचे मुंडेसाहेबच शिल्पकार होते. बाळासाहेबांवरही त्यांचे प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती, आणि बाळासाहेबांनाही त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. विश्वास होता. याचे साक्षिदार आम्ही आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सिन्नर ये... |
Home इतर "एक पर्व, नवे पर्व, तेजस पर्व" "एक पर्व, नवे पर्व, तेजस पर्व" एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष फक्त तेजसदादा...! एक पर्व, नवे पर्व ,तेजस पर्व ...!" हे जोडलेले हात...! हातात घेतलेला हात...! श्वासात घेतलेला ध्यास...! हा हात जोडून उभा असणारा युवा जिल्हाध्यक्ष, आपल्या कृतीतून खूप काही सांगून जातोय. न... |
मंडळी २०२० हे वर्ष कोव्हीड आणि लॉकडाऊनमुळे गाजलं. या वर्षी अनेक गोष्टी घडणार होत्या पण या कोव्हीड काळात त्या पुढे ढकलल्या गेल्या. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे चित्रपट २०२० ऐवजी २०२१ मध्ये प्रदर्शित करण्याचं ठरवलं. तर काही सेलिब्रिटींनी त्यांची लग्न पुढे ढकलली. खरंतर २०२० हे वर्ष संपता संपता अनेक सेलिब्रिटींनी दोनाचे चार ... |
जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । सध्या बचत करणे ही काळाची गरज बनली आहे. बरेच जण चांगल्या परताव्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. सरकारी योजनांपाठोपाठ आपल्याकडे जीवन बीमा निगम अर्थात LIC मधील गुंतवणूक हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी LICची जीवन ... |
Mp Imtiaz Jalil Reaction News : दिल्ली महापालिका निवडणुकीत आप आणि भाजपसोबतच एमआयएमची देखील चर्चा होती. पण निवडणूक निकालानंतर फक्त आपचीच चर्चा सुरू आहे. Aimim एमआयएमने दिल्लीत निवडक १३ जांगावर उमेदवार उभे केले होते. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एक सभा, रोड शो दिल्लीच्या गल्लीबोळातून केला होता. तर औरंगाबादचे खास... |
किरणा दुकानातून सामान घेऊन जाणा-या एका अल्पवयीन मुलीचा छेड काढून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच तिचा पाठलाग करुन तिच्या घरी जाऊन तिच्या काकांना मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पाषाण येथे नुकताच घडला असून पीडित तरुणीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह... |
निर्णयानुसार आता खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक भरतीही थेट राज्य सरकारकडूनच केली जाणार आहे. भरतीवेळी होणारे गैरप्रकार आणि त्यामुळे ढासळणारा शिक्षणाचा दर्जा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भरतीसाठी 'पवित्र' ही संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे.. |
अजयने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण । Pune News Express । Pimpri Chinchwad News Portal\nHome breaking-news अजयने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण\n'हम नौजवान' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री तब्बूने आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. हिंदी चित्रपटांपासून करिअर... |
आता एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात नुकतंच लग्न झालेली रमा उखाणा घ्यायला सुरुवात करते. ती म्हणते, 'शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून', ती पुढे उखाणा पूर्ण करणार इतक्यात तिथे रमा येते आणि म्हणते, 'गाठ आहे माझ्याशी, आनंदी जरा जपून. ' रमाच्या भूमिकेत अनिता दाते आणि आनंदीच्या भूमिकेत पल्लवी पाटील आहे. अभिनेता कश्यप परुळेकर ... |
आपल्या देशाने स्त्रीशिक्षणाचे महत्त्व ओळखले. अर्थात आजही स्त्रीशिक्षणासाठी प्रोत्साहन देशात आवश्यकच आहेच. त्यादृष्टीने पावले उचलली जातच आहेत. मात्र, एकविसाव्या शतकात एकाही क्षेत्रात स्त्रीया कुठेही कमी नाहीत. तिथे तालिबानी मनोवृत्तीच्या सरकारला स्त्रीयांचे शिक्षण अमान्य झाले आहे. तालिबानने थेट महिलांचे शिक्षणच अमान्य अ... |
लसूणमध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळते. कच्च्या लसूणमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. या जीवनसत्त्वामुळे आपल्या केसांचं आरोग्य निरोगी राहण्यास आणि कोलेजन वाढण्यासही मदत मिळते. केसांची वाढ होण्यास व्हिटॅमिन सी पोषक आहे. तर लसूणमधील सेलेनियम घटकामुळे रक्त प्रवाह वाढ... |
गी० टी० भाषा यापदांनीं आत्मा उत्पन्न होऊन मरण पावणारा आहे असे मानमाने जे लोकायता दिक नास्तिक आणि आत्मा-नित्य असतां ही म्हणजे उत्पत्तिरहित आणिनाश रहित असतांही उत्पन्न होणाऱ्या शरीराचे संबंधानें उत्पन्न आणि मरण पावणा या शरीगने संबंधानें मृत अशा गौण व्यवहारास योग्य होतो- अमें बोलणारे जे नार्किकाहिक आस्तिक यांचे पक्षकचविल... |
सोशल मीडियावरील नियमनाबाबत जगभरात बरीच चर्चा होत आहे. यावर काही नियंत्रण असायला हवे, असे एक विभाग म्हणतो, तर दुसरा विभाग म्हणतो की सोशल मीडिया मुक्त राहिला पाहिजे कारण अनेक देशांमध्ये याने लोकांचा आवाज उठवला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जेव्हा सौदी अरेबियातील एका महिलेला ट्विट केल्याबद्दल 34 वर्षांची शिक... |
नवी दिल्ली // जगभरातील बहुतांश देशांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने शिरकाव केला असून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. WHO ने म्हटले आहे की, ओमिक्रॉन बहुधा बहुतेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि अभूतपूर्व वेगाने पसरत आहे. भारतातही ओमिक्रॉनची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. फक्त आफ्रिकन... |
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सरकार आणि प्रशासनामधील असमन्वय आणि गोंधळ समोर आला आहे. एकीकडे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाने राज्यात मास्क सक्ती असल्याचे पत्रक काढले आहे, तर दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कसलीही मास्क सक्ती नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा गोंधळ कोरोनाच्या... |
पुणे : ईश्वराने आपल्याला भारत देशात जन्माला घातले, हे आपले भाग्य आहे. भारत देश म्हणजे जगाला मिळालेली देणगी आहे. जगामध्ये अस्थिरता असताना भारत देशात मात्र शांतता पहायला मिळते. परंतु दुर्दैवाने देशात अजूनही जातीव्यवस्था टिकून आहे. जातीव्यवस्था ही देशाची शत्रू आहे. गीता, कुराण, संत तुकारामांचे अभंग यामध्ये समानतेचा आणि एक... |
प्रचंड इच्छा शक्ती आणि धाडसी वृत्ती असेल तर वयाची मर्यादा आपल्या कर्तृत्वाच्या आड येत नाही. याचंच उदाहरण म्हणजे वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक मिळवून पुण्यातील डॉ. शर्वरी इनामदार यांनी पॉवरलिफ्टिंग मध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वयाची तिशी ओलांडल्यानंतरही पॉवरलिफ्टिंगकडे वळणाऱ्या शर्वरी यांनी कल्याण येथील ग... |
नाशिक जिल्हयाच्या ग्रामीण भागात सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांमध्ये धाव घेतायत. जिल्ह्यातील येवला तालुक्यात हरीण आणि काळवीट यांच्यासह मोरांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असून रेंडाळेचे शेतकरी प्रवीण आहेर यांनी या वन्यप्राण्यांसाठी आपल्या शेतात सिमेंटची टाकी तयार करून या वन्यप्रा... |
चंद्रपूर; चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर, ऊर्जानगर, वेकोली व महाऔष्णिक विज केंद्र परिसरात दोघांचा बळी घेऊन दहशत माजविणाऱ्या वाघांपैकी काल मंगळवारी (21 फेब्रुवारी 2022) ला रात्री साडेनऊच्या सुमारास एका पट्टेदार वाघाला जेरबंद करण्यात आले आहे. उर्जानगर वसाहतीत रात्रीच्या सुमारास मुक्त संचार करताना वाघांच्या बंद... |
Sagittarius Horoscope Today 12 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. अविवाहित लोकांचे संबंध पुढे जाऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे सर्वजण खूप आनंदी दिसतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचाही बेत होईल. ... |
मध्ययुगीन भारत भाग २ अवश्यक आहे. अधिकाऱ्यांच्या या तपशिलावरून असे दिसून की, हिंदुस्थानची मुलकी व लष्करी व्यवस्था त्या वेळी चांग पूर्णावस्थेस पोंचली असून त्यांत हल्लींच्या सुधारलेल्या राज्यपद्धत सर्व खाती व अंगे समाविष्ट झालेली दिसतात. बंगालच्या राज्य अनुलक्षून अधिकान्यांची हीं नांवें दिली असली तरी तींच नांवें : सर्व र... |
नवी दिल्ली : suicide । कुस्तीच्या अंतिम लढतीत पराभव झाल्यानंतर भारतीय महिला पैलवान रितिकाने आत्महत्या केली. रितिका ही बबिता फोगाट आणि गीता फोगाट यांची मामे बहिण होती. तिने बलाली गावात सोमवारी रात्री गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. रितिकाने 12 ते 14 मार्च दरम्यान झालेल्या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. रितिका ही राजस्... |
Indian Navy New Submarine: भारतीय नौदलाला लवकरच आणखी एक पाणबुडी मिळणार आहे, ज्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. 'प्रोजेक्ट 75' अंतर्गत आतापर्यंत चार पाणबुड्या नौदलात सामील करण्यात आल्या आहेत, तर पाचव्या पाणबुडीच्या सर्व चाचण्या काही महिन्यात पूर्ण झाल्यानंतर नौदलात सामील होणार आहे. भारतीय नौदलाने बुधवारी सांगितले की, 'प्... |
शाळेचा दिवस असूनही सकाळीच सर्जा रानात आल्यानं एक-दोघांनी त्याला हटकलंदेखील. शाळेचा दिवस असूनही सकाळीच सर्जा रानात आल्यानं एक-दोघांनी त्याला हटकलंदेखील. पण त्यानं ताकास तूर लागू दिला नाही. टिवल्याबावल्या करून तो थेट साहेब्यापाशी आला. चोरटय़ा नजरेनं सगळीकडं बघत खुंटीला बांधलेलं दावं सोडून साहेब्याला त्यानं मोकळं केलं. त्... |
राजन खान : 'गू ते गुलाब लेखकाला काही परकं असू नये'\nराम जगताप, सुशील धसकटे\nया मुलाखतीमधील सर्व छायाचित्रे राजन खान यांच्या फेसबुक अकाउंटवरून साभार\nराजन खान अरेबियन नाईटस गौरी देशपांडे Rajan Khan\nकथा-कादंबरीकार राजन खान हे मराठी साहित्यातलं एक आघाडीचं नाव आहे. आजवर त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची अनेक पुस्तक प्रकाशित झाली... |
हिमाचल प्रदेश, 19 मे : घरी कोणीही नसताना एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतःला गळफास लावून तरुणीने आपलं आयुष्य संपवलं आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्याच्या सुंदरनगरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएल चौकी अंतर्गत येणाऱ्या एचपीएसईबी कॉलनीमध्ये आयटीआयच्या विद्यार्थीने... |
एमपीसी न्यूज : आळंदीत टेम्पो (Alandi Crime) तोडफोड व मारहाण करून जखमी केल्याप्रकारणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत शाम खंदारे (वय 25 वर्षे, रा. तापकीरनगर, देहू फाटा, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. ऋषिकेश पोद्दार (वय 25 वर्षे, पत्ता माहित नाही) याला अटक करण्यात आली आहे. दोन अनोळखी इसम देखील आरोपी आहेत. फिर्यादी 30 ज... |
एमपीसी न्यूज- अंगणात खेळत असलेल्या 11 वर्षीय मुलीला इलेक्ट्रिक खांबाचा शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील जनता वसाहत येथील गल्ली क्रमांक 18 मध्ये सोमवारी ही घटना घडली. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. गौरी अशोक शिळीमकर (वय-11) असे मृत्... |
महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ तत्काळ लागू केले असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. या धोरणानुसार १ एप्रिल पासून राज्य सरकार फक्त इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार असल्याचे जाहीर केले गेले होते मात्र आता हे धोरण १ जानेवारीपासून म्हणजे चार महिने अलीकडेच लागू केले गेले आहे. शासन यापुढे जी ... |
एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या संकटकाळात ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेतील कर्मचारी घरोघरी अहोरात्र सेवा देत आहेत. अनेक टपाल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने फ्रंटलाइन आरोग्य सेवकांप्रमाणे भारतीय टपाल सेवा कर्मचाऱ्यांना देखील मृत्यूपश्चात 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण... |
ह्या ब्रेव्हे २०० किमी पासून सुरू होतात ते पार १२०० किमी पर्यंतचा असतात. २००, ३००, ४०० आणि ६०० केली की तुम्ही सुपर रॅन्डो म्हणून क्वालिफाय होता. आणि दर चार वर्षानी होणारी पॅरिस - ब्रेस्ट - पॅरिस ही आंतरराष्ट्रीय रेस करायला क्वालिफाय होता. ( त्या वर्षी सुपर सिरीज केली तर) माझी ६०० किमी ब्रेव्हे असल्यामुळे मला ती ४० तासा... |
चिखलगाव परिसरातील मेघदूत कॉलनीतील रहिवासी महादेव कांबळे यांच्या मुलाचा गुरूवारी विवाह पार पडला. वणी (यवतमाळ) : लगतच्या चिखलगाव परिसरातील मेघदूत कॉलनीत लग्न समारंभासाठी आलेल्या दोघांना यवतमाळ मार्गावरील लालपुलियावर भरधाव ट्रकने चिरडले. यात दोघांचाही जागीच करूण अंत झाला. शुक्रवारी सकाळी ९. ३० वाजता घडलेल्या या घटनेनंतर ... |
नागपूर : जिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विभाग प्रमुखांना त्यांच्या जबाबदारीचा 'केआरए' काढून दिला आहे. सर्वच विभाग प्रमुखांनी केआरएमध्ये दिलेला दशसूत्री कार्यक्रम आपापल्या कार्यालयात राबविण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर केआरएमध्ये दिलेल्या नियोजनानुसार काम न झाल... |
शौचालय घोटाळ्यातील (toilet scam) आरोपीची (accused) पोलीस कोठडीतून (Police custody) न्यायलयीन कोठडीत (judicial custody) रवानगी सुरु असतांना अटकेतील आजी माजी विस्तार अधिकारी (Grandmother is a former extension officer) यांना आज रावेर न्यायालयात हजर केले असता दि. २८ जुलै पर्यत पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आह... |
मुंबई : आमदारांच्या बंडाने मोठं संकट कोसळलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना मंगळवारी (ता. 28) चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं समजतं. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. (Sanjay Raut Latest Marathi News) एकनाथ शिंदे... |
ठाणे : जिल्ह्यामधील नद्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करून त्या माध्यमातून मृत जलस्त्रोत परत जीवंत करण्याचे काम हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात मुरबाडमधल्या कनकवीरा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येत आहे. याचा आराखडा दोन दिवसांत तयार होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज सांगितले. पाणी नियोजन व पाणी ... |
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । यावल तालुक्यातील दहीवद येथील व्यापाऱ्याला उज्ज्वला योजनेच्या गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३० हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला होता. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी कालीदास विलास सुर्यवंशी (वय-३३) ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.