text
large_string
Quepem News : कुडचडे पालिका बाजार प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामामुळे यंदा पावसाळ्यात स्टेशन रोडवर पुराची स्थिती निर्माण होणार असल्याची भीती लोकांनी व्यक्त केली आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे व अशावेळी या प्रकल्पाच्या कामामुळे प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाणी कुठे सोडणार? याविषयी पालिका गंभीर नसल्याच...
मागील वर्षीच्या पावसात रस्ते आणि उड्डाणपुलांची खड्ड्यांनी चाळण केल्यामुळे मुंबईकरांच्या रोषाचे धनी व्हावे लागलेल्या महापालिकेने यंदा खड्डेमुक्त उड्डाणपुलांची हमी मुंबईकरांना दिले आहे. मागील वर्षीच्या पावसात रस्ते आणि उड्डाणपुलांची खड्ड्यांनी चाळण केल्यामुळे मुंबईकरांच्या रोषाचे धनी व्हावे लागलेल्या महापालिकेने यंदा खड...
फरारी पोलिस अधिकारी दिसले तर पकडा! सांगली : खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताने पोलिस ठाण्यात आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभारलेल्या उमदी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघे कुठे दिसले, तर त्यांना पकडा, अशी सूचना सांगलीच्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व प...
जळोची - देशात सर्वात मोठी संघटना ही आरएसएस'ची आहे. पण त्यांचे रजिस्ट्रेशन नाही. ही संघटना देशात काम करते. ते लोक व्हॉट्सऍपवर न बोलता प्रत्यक्षात भेटतात, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. बारामतीमध्ये हिंदू कोल्हाटी समाजाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला सुषमा आंधारे यांनी हजेरी लावली. मेळाव्य...
'अपुऱ्या निधीमुळे शिव नदीतील गाळ काढण्याचे काम ठप्प' चिपळूण : शिव नदीतील गाळ काढण्याचे सुरू असलेले काम पालिकेकडून थांबविण्यात आले. त्यामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले. पालिकेकडे चौकशी केल्यावर मंजूर निधी संपल्याने काम थांबवावे लागल्याचे सांगण्यात आले. नियोजनबद्ध पद्धतीने गाळ काढण्यासाठी एक कोटीचा प्रस्ताव तांत्रिक मान...
आत्मचरित्र : काही विचार ज्या व्यक्तीने ते लिहिलेले असते त्या व्यक्तीचे जीवनचित्र असते, त्याचप्रमाणे अनेक बाबतींत ते तुमचे-माझेही जीवनचित्र असते; खरेखुरे आत्मशोधन आणि आत्मदर्शन हे जीवनावर असा काही प्रकाश टाकू शकते की, त्या प्रकाशात जीवनातील कितीतरी गूढस्थले एकदम प्रकाशित होतात व त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाचाही अर्थ ल...
या परिभाषेनें सूत्रामध्यें सामान्य क्यपद आहे म्हणून क्यङ्, क्यष, क्यच, याप्रत्ययान्त धातूंवरूनहि उप्रत्यय होतो ( १८) कृत्यल्युटोबहुलम् ॥ ३।३।११३ ॥ कृत्यप्रत्यय व ल्युट् प्रत्यय हे बहुल याअर्थी होतात ( ज्याठिकाणीं सांगितले नाहीत अशा ठिकाणीहि होतात.) " पादाभ्यां न्हियते पादहारकः " इत्यादि ( १९ ) छन्दसि गत्यर्थेभ्यः ।। ३।...
पुणे : पुण्यातील एका कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत भोंदूबाबाने कुटुंबाला चक्क सहा लाख रुपयांचे कबुतर विकत घ्यायला लावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या कुटुंबाची ६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असून तुमच्या मुलावर करणी झाल्याची खोटी बतावणी भोंदू व्यक्तीने संबं...
आठवड्यापासून पावसाची रिपरिप, खरीप पिकांना पुन्हा धोका! जिल्ह्यात सोमवार १६ ऑगस्ट ते शनिवार २१ ऑगस्टदरम्यान सहा दिवसाच्या कालावधीत ७६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने ठाणच मांडले आहे. दोन तीन तासांची विश्रांती घेत पाऊस दरदिवशी सर्वत्र हजेरी लावत आहे. त्यामुुळेच पावसाच...
पिंपरी - लोकसभा निवडणुकीचा राज्यातील चौथा व अंतिम टप्पा पार पडला. यामध्ये मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात तरुण व नव मतदारांचा टक्का लक्षणीय आहे. या नवतरुण मतदारांनी वोट करत त्याचा सेल्फी काढून तो सोशल मीडियावर टाकत त्यांची एक प्रकारे युवाशक्तीची मतदानाप्रतिची आवड आणि लोकशाहीविषयीची आस्था दाखवून दिली. तरुणांची आवड लक्षा...
पंचवटीतील Panchavati बहुचर्चित टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी TDR scam inquiry महासभेने चौकशी समिती गठीत करुन सुमारे एक वर्षाचा काळ लोटला तरी अद्याप समितीची एकही बैठक झाली नसल्याची बाब आजच्या महासभेत समोर आली. यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपचे माजी गट नेते जगदीश पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी प्रचंड नाराजी व्यक...
आगामी काळात होणार्या काही खगोलशास्त्रीय घटना पुढील प्रमाणे असून त्यांचा फलज्योतिषाच्या अंगाने विचार भविष्यकाळात डोकावून पहाणार्यांसाठी केला आहे. वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील शनीस सक्रिय करते आणि त्यामुळे ते शनीने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची श...
भोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये भांडण झाले. या घटनेत दोघांनी एकमेकांचे केस ओढले, शिवीगाळ, लाथा-बुक्क्या केल्या. दोघेही मित्रांसोबत मद्यपान करण्यासाठी आल्या होत्या. हा संपूर्ण व्हिडिओ भोपाळच्या होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबसमोरचा आहे. पबमध्ये बॉयफ्रेंडवरून मुलींचे ...
केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या मोठ्या आर्थिक फटक्यामधून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिल्डरांना कोरोनाचा जबर फटका बसला. त्यामुळे या बिल्डरांना संजीवनी देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने प्रीमियममध्ये ५०% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला भाजपने विरोध दर्शविला, पण सत्ताधारी ...
जानेवारी २०२१ मध्ये टोयोटाची ११ हजार १२६ कारची भारतीय बाजारात विक्री झाली आहे. तर जानेवारी २०२० मध्ये टोयोटाची ५ हजार ८०४ कारची विक्री झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात कंपनीच्या कारच्या विक्रीत ९२ टक्के वाढ झाली आहे. तर डिसेंबर महिन्याच्या तुलनेत कंपनीची विक्री ४९ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी २०२० ...
IND vs AUS, Team India Playing XI: भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचे शतक, रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी, अक्षर पटेलची दमदार फलंदाजी आणि आर अश्विनची फिरकी, याच्या जोरावर भारताने पहिली कसोटीत एक डाव व १३२ धावांनी ही कसोटी जिंकली. आता ऑस्ट्रेलियाविरु...
शेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा या नावाने ओळखली जाते. ही एक बहुभक्षी कीड असून १८१ प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करते. शेंगा पोखरणारी अळी साधारणपणे ७ ते १६ शेंगाचे नुकसान करते. पूर्ण विकसित अळी प्रामुख्याने पोपटी रंगाची असून यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. अळी लहान असतांना...
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन जाम बदनाम होते व आजही आहे. कारण जो नियम कायदा पाळतो त्यालाच ही मंडळी जास्त छळतात. ज्यांनी सगळेच संकेत, नियम, कायदे पायदळी तुडवलेत त्यांना हातसुध्दा लावत नाहीत. नंगे से खुदाभी डरता है असा हा प्रकार. शहरात पावणे दोन लाखावर अवैध बांधकामे झाली आणि सुरूच आहेत. सर्व अवैध बांधकामे पाडण्याचे उच्...
रेती घाटाचा लिलाव जिल्हा प्रशासनाने केला नसल्याने रेती मिळविणे मोठी तारेवरची कसरत झाली आहे. याचाच फायदा घेत रेती घाटातून चोरटया मार्गाने रेतीची तस्करी करणाºयांचे चांगलेच फावत आहे. महसूल विभाग, पोलीस विभाग व वन विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केल्या जात आहे. ही रेती प्रति ट्रॅक्टर पाच हजार रुपये...
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद शहराची ओळख असलेला ऐतिहासिक 'बिबी का मकबरा'ची पडझड झाली आहे. यामुळे ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी कुतूबमिनारचा मनोरा ढासळला. जगातील सातआश्चर्यांपैकी एक ताज महालही पिवळट दिसू लागला आहे. त्यामुळे पर्यटन खातं, पुरातत्व विभाग यांच्या का...
Weight Loss by Drinking Water : मुंबई : वाढते वजन ही आता मोठी समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात, परंतु हवे तसे रिझल्ट मिळतातच असे नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पाणी पिऊनही वजन कमी करता येतं. हो हे खरं आहे. पाणी पिऊन वजन कमी करता येतं. आठ किमी धावून तुम्ही जेवढ्या कॅलरी बर्न करतात तेवढ्याच कॅलर...
Sameer Wankhede: एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना निरोप देण्यात आल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार बृजेंद्र चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. हायलाइट्सः समीर वानखेडे यांच्यानंतर एनसीबी मुंबईला नव्या बॉसची प्रतीक्षा. इंदूर विभागीय संचालक बृजेंद्र चौधरी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार. सोळा महिन्यांनंतर...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याला हादरून सोडणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यामध्ये फुटपाथवर झोपणाऱ्या एका ३ वर्षाच्या मुलीला उचलून नेत तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर या चिरमुरडीचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही....
नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांच्यानंतर माजी कायदा मंत्री शांती भूषण यांनी उडी घेतल्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणीत भर पडली आहे. नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांच्यानंतर माजी कायदा मंत्री शांती भूषण यांनी उडी घेतल्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि रा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाचा कार्यभार सोपविल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांनी नवीन उपक्रम आणि योजना सुरु केल्या. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी राज्य सरकारचा कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. या योजना पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमं...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे संसदेत आणखी एक विधेयक सादर करून १२ डिसेंबरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा चौथ्यांदा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षानेसुद्धा यासाठी तयारी दाखवली आहे. त्यामुळे देशात लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. युरोपीयन युनियनने ब्रेग्झिटला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर जॉन...
जी-20 राष्ट्रसमुह आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यासह शहराची विविधता दाखविण्याची एक संधी आहे. जी-20 परिषदेची जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) जय्यत तयारी सुरू असून या मध्ये नागरिकांचाही सहभाग महत्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी या निमित्ताने 'चला शहर घडवूया ' या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आव...
अर्थ मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकाकरिता राखीव ठेवलेली भांडवलाची काही रक्कम अद्याप दिली गेली नसून बँकांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. शासनाच्या इंद्रधनुष्य प्लॅन अंतर्गत ,सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पुर्नभांडवलीकरण करिता शासनाने रु.७०,०००/- करोड च्या रकमेची बजेट मध्ये तरतूद केली आहे. ...
एखादं प्रोडक्ट वापरल्यानंतर संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना व्यक्तींना रॅशेज येणे, जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी त्रासाचा सामना करावा लागतो. तुम्हाला देखील त्वचेच्या प्रकारासंदर्भात संभ्रम आहे का? तर लेखामध्ये नमूद केलेल्या पाच गोष्टींमुळे आपल्याला त्वचेशी संबंधित माहिती जाणून घेण्यास मदत मिळू शकते. (मॉडेल्सची त्व...
Road Safety Week 2023 : सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात 'रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा' केला जातो. यंदा दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्य...
नवी दिल्ली : देशातील महागाईचा भडका दिवसागणिक आणखी प्रखर होत आहे. शुक्रवारी बासमती तांदूळ आणखी ५00 रुपयांनी महाग झाला. गेल्या पाच दिवसांत बासमती तांदूळ तब्बल १,३00 रुपयांनी महाग झाला आहे. दरम्यान, उडदाची डाळ, साखर, मोहरी तेल, धणे आणि जिरे या वस्तूंचे भावही शुक्रवारी महागले. गेल्या काही दिवसांपासूनजीवनावश्यक वस्तू दररोज...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा-सोलापूर रोडवर सोनाई दुध घेवून जाणार्या दुधाच्या टँकरने दोन मोटर सायकलस्वारांना धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी 3. 00 वा. घडली असून या अपघातात दिनकर कोकरे हे मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन मोटर सायकलस्वारांना ...
विषारी विळखा ! - सनातन प्रभात\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > संपादकीय > विषारी विळखा !\nविषारी विळखा !\nराजधानी देहलीतील धोक्याची पातळी ओलांडून गेलेले वायूप्रदूषण हे भयावह आपत्काळाचे निदर्शक आहे. हवेचे प्रदूषण मोजण्याच्या परिमाणात (एअर क्वालिटी इंडेक्स) ० ते ५० हा चांगला स्तर आणि ५०० हा अतीगंभीर स्तर ...
सभेला येणाऱ्या लोकांना विचारावं. मागच्या मेळाव्यात ३०० रुपये देऊन लोकं आणली असा दावा चंद्रकांत खैरेंनी केला आहे. औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यातील सभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी केलेल्या आरोपानंतर राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तरसभा घेत विरोधकां...
त्यांच्या पार्थिवावर लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनीचे माजी व्यवस्थापक विश्वनाथ सावळे व लातुरच्या सिद्धेश्वर बँकेचे माजी व्यवस्थापक काशीनाथ सावळे यांचे ते वडील होत. अहमदपूर : येथील न्यू विद्यानगर कॉलनीतील रहिवासी उद्धव हरिभाऊ प...
पुणे, दि. १०ः घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ३१ डिसेंबरअखेर नोंदणी असलेल्या व ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या घरेलू कामगारांनी सन्मानधन योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे विशेष सहाय्य मिळण्याकरिता ३१ मार्च पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्ह्याच्या सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे. घरेलु कामगारांनी विहित नमुन्यातील प्रप...
गेल्या १० ते १२ वर्षांपासून भंडारा नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भंडारा : गेल्या १० ते १२ वर्षांपासून भंडारा नगर पालिकेच्या हद्दीतील ...
Crime News २४ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना २१ डिसेंबरला घडली. वाशिम : अज्ञात इसमांनी एका २४ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना २१ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास स्थानिक शिवाजी चौक परिसरात घडली. मृतकाचे नाव अ. वसीम अ. वजीद असे असून तो भवानी नगर परिसरातील रहिवाशी आहे. स्थानिक शिव...
मंगल वासर; करीं निरंतर; सप्रभ सत्वर. धृ. धन्य धन्य शब्बाथ हा. आवडे मला; प्रिय मला शब्बाथ - हा, आवडे मला. पवित्र समस्त ; मार्ग मी जीवंत; प्रभुपदिं रत, मिळेल त्या सतत, जल तें अनंत. दिन जावो नव, या करूं प्रभूस्तव, काढूं स्तुतिरव, हे त्रात्या अभिनव, तूं कृपेचा धव, हृदी ये घे धाव. Kindly share this on social sites so more p...
नवी दिल्लीः राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले दिसले, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर फोटो लावून मतं मा...
काली पोस्टर वादः 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरचा वाद थांबत नाहीये. या पोस्टरवर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. चित्रपटात माँ काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. यासोबतच त्याच्या एका हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वजही दिसत आहे. हा माहितीपट चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांचा आहे. सोशल मीडियावर ज्या पद्धतीने चि...
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 मुक्त करण्याच्या निर्णयाला २ वर्षे पूर्ण झालेत. त्यानंतर जम्मू- कश्मीरमध्ये झालेले बदल आणि तेथील परिस्थितीची अधिक माहिती देणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट आज पाहता येणार आहे. Cabinet Expansion Special Report : मंत्रिमंडळ विस्तारात माशी कुठे शिंकतेय? , नवे मंत्री का ठरेनात? Congress Delhi : ...
अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतरावर बुधवारी हायस्पीड रेल्वे (ताशी 144 किलोमीटर) बारा डब्यांसह धावली. (Ahmednagar-Beed-Parli Railway) बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वे आल्यानं, हे चित्र डोळ्यात साठविण्यासाठी सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी येथे...
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येथे आतापर्यंत 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक धोका, सर्व सामान्य जनतेच्या सेवेत असलेल्या पोलिसांना आहे. मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाउन शिथील केल्यानंतर, कोरोना र...
पाकिस्तानी अभिनेत्री आसमा यांनी जेव्हा अब्बास गिलबरोबर लग्न केलं तेव्हा त्या २३ वर्षांच्या होत्या. एका मुलाखतीमध्ये आसमा यांनी त्यांच्या लग्नाचं एक मोठं गुपीत सांगितलं आहे. मुंबई : सध्या प्रेक्षकांमध्ये पाकिस्तानी सिनेमाची क्रेझ दिसून येत आहे. हे धक्कादायक असलं तरी खरं आहे. टीव्हीवर पाकिस्तानी मालिका पाहणाऱ्यांची संख...
निवडणूक आयोगाचे आदेश धाब्यावर! अ� ��ब तर्हा : मौलाना आझाद संशोधन निवडणूक केंद्रावरील प्रकारऔरंगाबाद : महापालिका निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला मालमत्तेसंबंधी सविस्तर विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रत्येक उमदेवाराच्या मालमत्तेचे विवरणपत्र कार्यालयाच्या परिसरात प्रसिद्ध करावे, असे...
गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस व यंदाच्या पावसाच्या दिवसांत २३ दिवसांपासून पावसाने मारलेली दडी याचा परिणाम जाणवायला लागला आहे. अमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस व यंदाच्या पावसाच्या दिवसांत २३ दिवसांपासून पावसाने मारलेली दडी याचा परिणाम जाणवायला लागला आहे. १५ जुलै अखेर अमरावती विभागातील ४२० लघुप्रकल...
जेराल्ड परेरा हे कामगार संघटनेचे पुढारी, स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९२९ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एमए, एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. वास्कोतील सेंट जोसफ शाळेतील दत्तात्रेय देशपांडे यांच्या प्रभावाखाली येऊन ते स्वातंत्र्यसंग्रामात शिरले. देशपांडे यांनी तिरंगा फडकावला आणि पत्रके वाटली...
आपण एक क्लासिक किंवा कलेक्टर कार खरेदी करावी किंवा नाही हे ठरविण्यास आपण असे वाटते की आपण आपले सर्व गृहपाठ केले आहे आपण शीर्षक, कारच्या इतिहासाची तपासणी केली आहे, मूळ बनाम पुनर्संचयित आणि नाडाची किंमत आणि माहिती मार्गदर्शक किती आहे. आपण सर्व पुस्तके वाचली आहेत, एक चाचणी ड्राइव्ह घेतली आणि एक इंजिन संक्षेप तपासा होते; आ...
विशेष प्रवेशिकेद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेत नितीनकुमार सिन्हाने आशियाई कुमार टेनिस स्पर्धेतील मुलांच्या एकेरीत, तर मुलींमध्ये महाराष्ट्राच्या मिहिका यादवने अिजक्यपद पटकावले. बंगालच्या सिन्हाने उत्कंठापूर्ण अंतिम लढतीत मलेशियाच्या ख्रिस्तियन दीदीअरचा पराभव केला. सव्वादोन तास चाललेल्या या सामन्यात त्याने ६-४, ४-६, ६-...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था-भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांना स्वाइन फ्लू झाल्याने तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी ट्विटरच्या मध्यमातून दिली असून लवकरच आपली प्रकृती सुधारेल...
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाची कारवाई ! नाशिक - राज्यात सध्या रब्बी हंगामातील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनधिकृत खतांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून या माध्यमातून शेतकर्यांची फसवणूक केली जात आहे. याविषयी येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला माहिती मिळाली. त्यानंतर गुणवत्ता नियंत्रण विभा...
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या सर्वांगीण विकासाची कल्पना त्यांना मूलभूत लोकशाही अधिकारांची हमी आणि त्या अधिकारांचा सन्मान राखला जाईपर्यंत अपुर्णच राहील, असे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला म्हणाले की, मानवी हक्क हे प्रत्येक माणसाच्या प्रतिष्ठेसाठी अपरिहार्य आहेत आणि ते ज...
सायबर कॅफेत युवकांची नेहमीच गर्दी असायची. परंतु वर्षभरापासून जिल्ह्यातील युवकांच्या हाती दिसत असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्र ांत आली आहे. चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल खूप महागडे असायचे. त्यामुळे ...
नवी दिल्ली, 16 मार्च : सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today) जारी केले आहेत. आजही मुंबई-दिल्लीसारख्या देशातील चार शहरांत कोणतेही बदल झालेले नाहीत. परंतु लहान शहरांत इंधन दरात बदल झाले आहेत. तेल कंपन्यांनी आज लखनऊ, जयपूर, पटनासारख्या शहरांत इंधन दरात बदल केले आहेत. लखनऊ, गुरुग...
Lokmat Empact : . . . अखेर कर्मचारी चेकपोस्टवर हजर! जेवणाच्या नावाखाली चेकपोस्टवरुन दांडी मारणारे कर्मचाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच कर्मचारी चेकपोस्टवर हजर झाले असल्याचे १७ व १८ जुलै रोजी दिसून आले. वाशिम : जेवणाच्या नावाखाली चेकपोस्टवरुन दांडी मारणारे कर्मचाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच कर्मचार...
भिवंडी, 13 मे : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या धमाकेदार टीममध्ये कालचा आयपीएलचा सामना रंगला खरा. . . पण मुंबईमध्ये एका लग्नातच चक्क क्रिकेट पाहाण्यासाठी स्क्रीन लावण्यात आली होती. एकीकडे नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षता पडत होत्या तर दुसरीकडे आय़पीएलच्या सामन्यात होणाऱ्या धावा आणि विकेट्सवर वऱ्हाडी लक्ष ठेवून ह...
तैपेई : तैवानमध्ये पुन्हा एकदा पृथ्वी हादरली आहे. माहिती देताना वृत्तसंस्था रॉयटर्सने सांगितले की, गुरुवारी तैपेईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6. 2 इतकी मोजली गेली आहे. भूकंपामुळे कोणतीही दुखापत किंवा मोठे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. मात्र भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. सूत्रांनी दिलेल्या माहिती...
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त शंकराचार्य न्यासाने संस्कार भारतीच्या सहकार्याने आगळे वेगळे रांगोळी प्रदर्शन भरवले आहे. देशभरातून ४० रांगोळी कलाकार गेले दोन दिवस नाशिकमध्ये वास्तव्याला आहेत. महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, हैद्राबाद अश्या ठिकाणाहून हे कलाकार भारत...
लाईव्ह न्यूज : एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात? पोलादपूर - ग्रामपंचायत बोरज हद्दीतील साखर पेडेवाडीतील दरडग्रस्त वाडीमधील सर्व 8 कुटुंबातील एकूण 22 लोकांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले. पुणे : पुणे : पुणे : 'डीएसके' जामिनावर सुटले; गुंतवणूकदारांना न्याय मिळणार ...
सावंतवाडी : शिवसेना-भाजप युती महानगरपालिकेपुरती तुटली आहे. शिवसेनेचा सत्तेत जीव अडकल्याने ते सरकारमधून बाहेर पडू शकणार नाहीत आणि पडलेच तर सरकार पाच वर्षे टिकेल अशी व्यवस्था भाजपने करून ठेवली आहे, अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून, तशी चर्चा...
Bankim Chandra Chatterjee Birth Anniversary : बंकिम चंद्र चटर्जी (चट्टोपाध्याय) (Bankim Chandra Chatterjee) हे भारतीय कादंबरीकार, कवी आणि पत्रकार होते. ते 1882 च्या बंगाली भाषेतील आनंदमठ या कादंबरीचे लेखक होते. ही कादंबरी आधुनिक बंगाली आणि भारतीय साहित्यातील एक महत्त्वाची खूण आहे. ते वंदे मातरमचे संगीतकार होते. मूळतः स...
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलेल्या संबोधनावेळी काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या कानपिचक्या दिल्या. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईः शिवसेनेच्या ५५ व्या वर्धानपनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीला हे...
पुणे - भाजपकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, "मराठा आरक्षण' या विषयात भाजपने आग लावण्याचे काम करू नये, अशी टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी केली. कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची लढाई लढली जात आहे, याची पोटदुखी भाजपला होत आहे. त्यामुळे...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. कतरिना कैफच्या सिनेमाचा अभ्यासक्रमात आहे समावेश, वाचा कुठे घडला हा प्रकार? गँग्ज ऑफ वासेपुरपासून ते देव डीपर्यंत, अनुराग कश्यपच्या करिअरमधले हे ५ ...
Bigg Boss 16 Shiv Thakare: बिग बॉस १६ आता अखेरच्या टप्प्यावर आलंय. शिव ठाकरे, एम. सी. स्टॅन, प्रियंका चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे ५ जण फायनलचे मुख्य दावेदार आहे. या ५ जणांपैकी बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे फायनलमध्ये कळून येईलच. बिग बॉसच्या फायनलसाठी शीव ठाकरेचं नाव प्रचंड चर्चेत आहे. शिव ठाकरे ...
Cryptocurrency payment starts on WhatsApp : रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कॅसरिअल (Stephane Kasriel) यांनी संयुक्तपणे यासंदर्भात घोषणा केली. नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिस (WhatsApp Payment Service)जगभरात अतिशय संथ गतीने सुरू होत असली तरी कंपनीने आज एक म...
बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे न देता अर्धे पैसे घेऊन ते स्वतःच्या खिशात घालणाऱ्या तीन वाहकांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी माजलगाव आगारात झाली. या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे. माजलगाव : बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे न देता अर्धे पैसे घेऊन ते स्वतःच्या खिशात ...
मुंबई, 25 मे : आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. लीग स्टेजमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या या टीमनं पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) दिलेलं 189 रनचं आव्हान 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या संपूर्ण सिझनमध्ये गुजरातनं स...
योगदर्शनानुसार स्मृति ही चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी एक वृत्ति आहे. ज्या वस्तूचा अनुभव घेतला असेल, त्या वस्तूचेच स्मरण होऊ शकते व ज्या वस्तूचा अनुभव आधी घेतला नाही, त्या वस्तूचे स्मरण होऊ शकत नाही. म्हणून महर्षि पतंजलींनी "ज्या वस्तूंचा किंवा विषयांचा अनुभव (आधी) घेतला आहे, त्याव्यतिरिक्त अन्य वस्तूंना विषय न करण...
पाम बीच मार्गाच्या देखण्या रचनेमुळे त्यावरून जाताना सुसाट वाहन चालविण्याचा मोह वाहनचालकांना आवरत नाही. नवी मुंबई : नवी मुंबईतील क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पाम बीच मार्ग हा गेल्या काही दिवसांपासून अपघात मार्ग म्हणूनही ओळखला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील अपघातांची वाढती संख्या पाहता त्यांना आवर घालण्यासाठ...
पेठ : तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणातून सर्वच जागा शिवसेनेने जिंकून भगवा फडकवला. येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरिष भामरे यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू करण्यात आली. सर्वप्रथम धोंडमाळ गणाचा निकाल घोषित करण्यात आला...
लोकमत आपल्या दारी उपक्रमांतर्गत लोकमत चमू रविवारी बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत हद्दीतील कळंबे ले-आऊट वॉर्ड क्र. ३ येथे दाखल झाली. लोकमत आपल्या दारी उपक्रमांतर्गत लोकमत चमू रविवारी बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत हद्दीतील कळंबे ले-आऊट वॉर्ड क्र. ३ येथे दाखल झाली. परिसरात दाखल होत असतानाच रस्त्यावर वाहत असलेले सांडपाणी आणि खडबडी...
मुंबई, 9 सप्टेंबर : घरामध्ये स्टील, अॅल्युमिनियम, तांबं आणि प्लास्टिकची भांडी प्राधान्यानं वापरली जातात. यातल्या काही भांड्यांचा वापर दररोज होतोच असं नाही. त्यामुळे स्टीलची भांडी (Steel Utensils) गंजू शकतात. अशी भांडी जुनी झाल्यावर ती फेकून दिली जातात. कारण स्टीलची भांडी गंजल्यावर ती तुटतात. परंतु, अशा काही घरगुती पद्ध...
मुंबई : राज्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर आता केवळ लॉकडाऊन Lockdown हाच उपाय असल्याच्या निष्कर्षापर्यंत राज्य शासन आले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नाही तर ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे, अशा शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच आर...
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने खा. राजीव सातव यांच्या नेतृत्वात फेब्रुवारीमध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनार्थ आज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. हिंगोली : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने खा. राजीव सातव यांच्य...
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि त्या ऑनलाईन की, ऑफलाईन पध्दतीने घ्यावयाच्या, याबाबतचा निर्णय आज, गुरुवारी शिवाजी विद्यापीठ विद्या परिषदेच्या बैठकीत होणार आहे. या परिषदेची बैठक दुपारी बारा वाजता सुरू होईल. कला, वाणिज्य आणि व...
लखनसिंह कटरे यांच्या अवरुद्धलेल्या रुंद वाटा काव्यसंग्रहाचे लोकार्पण () कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नरेंद्र शुक्ला होते, तर काव्यसंग्रहावर भाष्य करण्याकरिता भवभुती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे व डॉ. अनिल मुंजे हे प्रामुख्याने उपस्थित होते. हा कवितासंग्रह कवी कसे जगले, त्यांना कसे जीवनातून जीवनान...
भारतात ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? RTGS (Real Time Gross Service) निष्कर्ष - RTGS, NEFT, IMPS मध्ये काय फरक आहे? आज आम्ही तुम्हाला NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे काय आणि त्यांच्यात काय फरक आहे ते सांगणार आहोत. तुम्हाला नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास, तुमच...
सर्वोत्तम फ्रेंच वाघ एक "ओपल 408" आहे. तो चांगला बाह्य डेटा आणि आरामदायी कार्याभ्यासाची आतील आहे याशिवाय या मशीनच्या तांत्रिक तपशील, खरोखर चांगले आहेत - थोडक्यात, सर्व सरासरी ड्राइव्हर करणे आवश्यक आहे. आम्ही मूळचा कार "ओपल 408" वैशिष्ट्य चर्चा करण्यापूर्वी, आम्ही थोडक्यात इतिहास उल्लेख करू इच्छितो. त्यामुळे, हे मॉडेल...
केंद्रीय भूपृष्ट परिवहन, जहाजराणी व जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच आचार्यश्री देवेंद्रसागरजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी आचार्यश्री यांच्याशी विविध राष्ट्रीय मुद्यांवर गडकरी यांनी चर्चा केली. सकल जैन समाजाच्यावतीने श्री संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर, वर्धमाननगर येथे या विशेष चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आ...
Arjun Kapoor : येथून मुंबईचा सुंदर नजारा दिसतो. या व्हिलाची खास बात म्हणजे येथे एक मिनी गोल्फ एरियाही आहे. 'इश्कजादे' म्हणून बॉलिवूड डेब्यू करणारा अर्जुन कपूर (Arjun Kapoor) रिअल लाईफमध्येही कुठल्या 'इश्कजादे'पेक्षा कमी नाही. फार कमी वेळात अर्जुनने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या छोट्याशा करिअरमध्ये त्याने अ...
'जय गंगाजल'च्या 'त्या' सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने... - Dainik Bombabomb\n'जय गंगाजल'च्या 'त्या' सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने...\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) ही अशी एक अभिनेत्री आहे जिने हॉलिवूडमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. ...
आम्ही सतत आमचा 'कल्पकता आणणारा विकास, उच्च-गुणवत्तेची खात्री देणारा निर्वाह, व्यवस्थापन जाहिराती आणि विपणन लाभ, पाईप घालण्याच्या मशीनसाठी खरेदीदारांना आकर्षित करणारा क्रेडिट इतिहास,' ही आमची भावना सतत राबवतो.घर्षण विंच (Imyj), कॉस्टमाइज्ड स्विंग गियर्स, हायड्रोलिक स्लीविंगपेज,हायड्रोलिक पंप मोटर.पहिला व्यवसाय, आम्ही एक...
वर्षापूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कचेरीसमोर नोटाबंदीचे श्राद्ध घालण्यात आले. निफाड : वर्षापूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी न...
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर सजले आहे. पंढरपूरात भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र ...
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हैदोस सुरुच असून शनिवारी धर्मतारी जिल्ह्यात माओवादी आणि सीआरपीएफ जवानांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे सहायक कमांडंट एस. के. दास यांचा मृत्यू झाला. मटा ऑनलाइन वृत्त । रायपूरछत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हैदोस सुरुच असून शनिवारी धर्मतारी जिल्ह्यात माओवादी आणि सीआरपीएफ जवानांमध्ये झालेल्या चकमकी...
ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडलीमध्ये अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालींवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ,...
'ड्रोन' म्हटलं की आठवतं ते अमेरिकी लष्करातलं, बॉम्बचा मारा करणारं छोटेखानी विमान. सध्या पाकिस्तानातील आदिवासी भागात अमेरिकी लष्कराची जी दहशतवादविरोधी मोहीम सुरू आहे, त्यात ड्रोन हल्ल्यांनी तालिबान्यांना सळो की पळो करून सोडलंय. 'ड्रोन' म्हटलं की आठवतं ते अमेरिकी लष्करातलं, बॉम्बचा मारा करणारं छोटेखानी विमान. सध्या पाकि...
भावा, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कसा काय लागला ब्रेक? कोल्हापूर : नियंत्रण मुक्त असलेले पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत तरीसुद्धा दर स्थिर कसे राहिले रे भाऊ अशी विचारणा लोकांतून होत आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, दिल्ली, गोवा...
भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहे. दरम्यान, या परिषदेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमं...
लूटमार करण्यास सांपडणार नाहीं, चैन करावयास मिळणार नाही. यावरून खात्री पटते ती एवढीच कों, असले धर्मप्रचारक आपला मतलब सिद्ध करण्यांत पूर्ण तरबेज होते आणि ह्मणूनच अशांची गणना ' अनाप्त या लोकांत करण्यास हरकत नाहीं. कारण ह्यांच्यासारखे प्रकार आप्त ह्मणजे विद्वान, जगत्कल्याणेच्छु जनांच्या हातून होणेच शक्य नाहींत व अशा विद्वा...
जयपूर। मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. हा सामना राजस्थान संघाने 7 विकेट्सने जिंकत या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानकडून या सामन्यात तीन विकेट्स घेणारा श्रेयस गोपाळ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स ...
एका मोठ्ठ्या कारखान्याच्या आवारात तो उभा होता. आसपास इमारतीच इमारती पसरल्या होत्या. नाही, फक्त इमारतीच नाही. शेकड्यांनी अॅम्ब्युलन्सेससुद्धा होत्या. अॅम्ब्युलन्सेसचाच कारखाना होता तो. पण बाकी त्याला काही म्हणजे काही सुधरत नव्हतं. गावाबाहेर माळरानावर तो आला होता. आसपास झाडोरा वगैरे अस्ताव्यस्त सुटला होता. नुसत्याच मंद उ...
Pune Cable car: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नवनवीन कल्पना नेहमीच मांडत असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गडकरींनी आता पुण्यात हवेतील बस सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी ज्यामधे रोपवे, केबल कार व्हर्नाक्युलर रेल्वेचा समावेश होतो. याची जबाबदारी आपल्याक...
वास्तविक ब्रेड ही ब्रिटिशांची देणगी आहे कारण त्यांच्या राजवटीत ब्रेड भारतात आला. त्या काळी ब्रेड खाल्ला तो बाटला असे म्हटले जायचे. त्यामुळे अनेक वर्ष ब्रेड निषिद्ध होता. मात्र आता ब्रेड हा रोजचा आहार झाला आहे. बहुतेकदा न्याहारीला ब्रेड खाण्याचा रिवाज भारतात पडला आहे. काही घरांमध्ये अगदी रोज खाल्ला नाही तरीही तो व्यर्ज ...
शहरांच्या गर्दीमुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या संकुचित होत आहे आणि लोकसंख्या कमी आहे. या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शीच्या दारिद्र्य निर्मूलन धोरणांनी देशहितावर लक्ष केंद्रित केले आहे. सोमवारी राज्याची बातमी एजन्सी सिन्हुआने जाहीर केली शेवटचे नऊ काऊन्टी या यादीतून काढून टाकले गेले होते, ते सर्व नै southत्येकडील गुईझोउ प्रा...
03 मार्च : केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर झालाय. आता 18 मार्चला सादर होणार्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यावेळी आयबीएन लोकमतने राज्याच्या मागच्या अर्थसंकल्पाच्या खर्चाचा पाठपुरावा केला. यावेळी मागच्या अर्थसंकल्पामधले फक्त 42 टक्के निधी खर्च झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. 18 मार्च 2015 . ....
शिकागो : हिंदू बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करायला हवं, असं आवाहन राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित केलेल्या विश्व हिंदू काँग्रेस संमेलनात भागवत बोलत होते. जवळपास अडीच हजा...
23 जून 1894 साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनण्यास प्रवृत्त करणे हा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्याचा हेतू आहे. पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस २३ जून १९४८ ला साजरा करण्यात आला. पोर्तुगाल, ग्र...