text
large_string
केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या (Ministry of Rural Development) जयपूर (Jaipur) येथील राष्ट्रीय सनियंत्रण संस्था भारती विकास संस्थेतर्फे मनोज दीक्षित व श्रीमती मोनिका हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे...
नुकताच सुरू झालेला 'डान्स महाराष्ट्र डान्स' हा शो प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अवघ्या काही दिवसांतचं या शो मधील छोट्या डान्सर्सनी सर्वच चाहत्यांना त्यांच्या डान्सने वेड लावलं आहे. दरम्यान या शो मध्ये येत्या भागात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिची एन्ट्री होणार आहे. सोनाली बेंद्रेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेय...
परभणी :कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील एस. टी. महामंडळाची सेवा बंद करण्यात आली आहे. मागील दहा दिवसांपासून एस. टी. बस धावत नसल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ उडत आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी किंवा जिल्ह्यांतर्गत प्रवासाची सुविधाच उपलब्ध नसल्याने नाइलाजाने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. परभणी : येथील वसंतराव...
देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंब...
आरोग्य शिबिरामध्ये साधू वासवाणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या विषयांवर पथनाट्य सादर करून जनजागृती केली. आजार कसे होतात, त्यापासून बचाव कसा केला पाहिजे. त्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे विद्यार्थ्यांनी न...
पुणेः कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणी राज्यातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स (फाम) कडून करण्यात आली आहे. "फाम'चे पदाधिकारी ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पणनमंत्री बाळासाहेब पाटील आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदन दिले आह...
शहरात होणारा उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्यासाठी निधी देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी, ७ जुलै रोजी मुंबईत विविध खात्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत याविषयी काय निर्णय होतो, याकडे नगरकरांचे लक्ष लागलेले आहे. शहरात होणारा उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्यासाठी निधी देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी, ...
पी. व्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. बर्गिंहॅम : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूने (PV Sindhu) राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) मध्ये सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले आहे. तब्बल ८ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर सिंधूने रौप्य पदकाची सीमा ओलांडली आणि सुवर्ण पदकाला गवसणी घातली. फाय...
नवी दिल्ली : नवनवीन प्रयोग करत, युझर्सना नवीन सुविधा देत त्यांच्या मनातील आपले स्थान आणि दर्जा टिकवण्याच्या प्रयत्नात ऍप्पलचे स्मार्टफोन नेहमीच यशस्वी होतात. त्यामुळेच ते नेहमी नंबर वन असतात. यावेळी मात्र, त्यांचा नंबर घसरला आहे. स्मार्ट फोनच्या या क्रमवारीत यावेळी सॅमसंगने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, या क्रमवारीत ची...
वॉशिंग्टन, 07 ऑक्टोबर : लहान मुलं (Children playing) कधी, काय आणि कशासोबत खेळतील सांगू शकत नाही. त्यांच्या हाती जी वस्तू लागेल ती त्यांच्यासाठी खेळणंच असते. अशाच एका चिमुकल्याला असं खेळणं सापडलं, जे त्याच्या हातात पाहून वडिलांनाही धक्का बसला. चिमुकल्याच्या हातात एक दगडासारखी वस्तू होती पण प्रत्यक्षात मात्र तो दगड नाही,...
अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2. 1 कोटी झाली आहे. />अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2. 1 कोटी झाली आहे. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये अमिताभ पहिल्या क्रमांकावर आहेत, तर या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 73 वर्षा...
लखनऊः ऊस मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, राज्य सरकारने गेल्या साडे तीन वर्षांमध्ये ऊस शेतकर्यांना 1.12 लाख करोड रुपये भागवले आहेत, जे आतापर्यंत सर्वाधिक थकबाकी आहे. त्यांनी दावा केला की, गेल्या सपा सरकारच्या पाच वर्षांमध्ये संयुक्त ऊस दर भागवण्याच्या तुलनेमध्ये राज्यातील 17,314 करोड रुपये भागवणे जास्त आहे. लॉकडाउन...
नाना पाटेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. ते चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेते आपल्या विलक्षण कौशल्याने चाहत्यांना वेड लावतात. रुपेरी पडद्यावर आपलं कर्तृत्व सिद्ध करणारा हा अभिनेता बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीतून गायब आहे. ते शेवटचा 2020 मध्ये इट्स माय लाइफ या चित्...
extending harbour line to Borivli : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव आणि पनवेल ते गोरेगाव अशी हार्बर सेवा सध्या सुरू आहे. लवकरच हार्बर सेवेचा आणखी विस्तार होणार आहे. हार्बर मार्गावरील लोकल मुंबईत बोरिवली पर्यंत जाणार आहे. यामुळे हार्बरच्या मार्गात मालाड, कांदिवली आणि बोरिवली अशा तीन स्टेशनांची भर पडेल. मालाड य...
मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्याचे थाट सजलेले पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्ये लग्नबांधनात अडकणार असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. आता आणखी एक लाडका अभिनेता लवकरच विवाहबद्ध होत असल्याचे समोर आल...
डेन्मार्क : डेन्मार्कमध्ये बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा मंजूर केला आहे. मानवी हक्क कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. असा कायदा करण्याची आवश्यकता नव्हती असे मानवी हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. डेन्मार्कच्या संसदेत बुरखा आणि निकाब...
ब्रेस्ट कॅन्सर हा बहुतांशी शहरी रोग म्हणून ओळखला जातो. शहरांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण जास्त दिसून येते. शहरातील बहुतेक मुली उशीरा लग्न करतात आणि त्यांना मुलंही उशीरा होतात. ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढण्यामागे या घटकांचा मोठा वाटा आहे. भारतीय स्त्रियांमध्ये स्तनांच्या पेशींमध्ये वाढणारा कॅन्सर हा गर्भाशयाच्या कॅन...
आगामी निवडणुकीत तुम्ही सोबत असाल तर ठिक अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुका लढवून सत्तेवर येईल, असा इशारा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी दिला. जळगाव- भारतीय जनता पक्ष आज देशातील क्रमांक एकचा पक्ष आहे. राज्यात आम्ही सत्तेतील मित्र पक्षाच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेला समजून घेत आहोत. याचा ...
Shani Jayanti 2023 Date, Puja vidhi, Muhurat and Importance: ज्योतिषशास्त्र आणि हिंदू कॅलेंडरनुसार, शनि जयंती दरवर्षी मे महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. शनि जयंतीच्या दिवशी श्री शनिदेवाची आराधना केल्याने स्थानिकांना विशेष फळ मिळते. शनिदेवाची उपासना केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि वाईट दिवस दुर होतात. या...
आम्ही हॉटेलसाठी लॉबी खुर्च्या तयार करतो आणि निर्यात करतो. अंगभूत फूटरेस्ट आणि स्टोरेज पॉकेटसह आमच्या खुर्च्या अतिशय गोंडस आणि आरामदायी आहेत. युमेया चेअर्स हॉटेल लॉबी चेअरची आकर्षक रचना बाजाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. हॉटेल लॉबी चेअरला वापरकर्त्यांमध्ये चांगली प्रतिष्ठा आणि विश्वास आहे. युमेया चेअर्सची हॉटेल लॉबी चेअ...
बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर इश्वर बिदरी यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ते कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. इश्वर बिदरी बॉलिवूडमधील एक प्रख्यात सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखले जायचे. १९७१ साली 'कारवा' या च...
मुंबई । नालासोपारा येथील अर्नाळा बीचवर आज (२१ मार्च) समुदात ५ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वसई पश्चिम येथील अर्नाळा बीचवर काही जण समुद्रामध्ये होळी साजरी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यापैकी ५ जणांचा मुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हे पाचही जण वसईतील गोकुळ पार्क येथील रहिवासी आहेत. 1) निशा कमलेश मौर्या (3...
बुलडाणाः वाचन संस्कृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथालय किंवा ग्रंथोत्सवाचा मूळ घटक वाचक असतो. त्यामुळे वाचक दूर जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. बुलडाणाः वाचन संस्कृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथालय किंवा ग्रंथोत्सवाचा मूळ घटक वाचक असतो. त्यामुळे वाचक द...
रविवारी खारघर रेल्वे स्थानकावर छतावरून प्लास्टरचा एक भाग पडल्याने ३० वर्षीय कंत्राटी रेल्वे अनाऊंसरच्या डोक्याला दुखापत झाली. सूरज निभांकर असे त्याचे नाव आहे. ही घटना दुपारी 3.55 च्या सुमारास घडली आणि ऑन-ड्युटी आरपीएफ कॉन्स्टेबल महेंद्र सिंग मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर त्यांनी घोषणा कक्षाकडे धाव घेतली. सुरज गंभीर जखमी ...
Just read the author's note in the preview. It is so interesting that I could not wait to write the review of the preview. Looking forward to reading the book. सध्याच्या लोकडउन मध्ये वेळ घालवण्यासाठी मी माझ्या मित्राकडून भास्करायण ही कादंबरी वाचायला घेतली. माझ्या मित्राने ती बुकगंगावर विकत घेतली होती. नाव व मुळंपृष्ठ आ...
मुंबई : आयपीएल 2022 मध्ये खराब सुरुवात केल्यानंतर हैदराबाद संघ विजयी मार्गावर परतला आहे. त्यांच्या पाचव्या सामन्यात हैदराबादने कोलकात्याचा सात गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 175 धावा केल्या होत्या आणि हैदराबादने 17. 5 षटकात 3 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. या सामन्यात हैद...
येथील महानगरपालिका हद्दीतील डेंग्यू रुग्णांच्या रक्ताचे तपासणीसाठी पाठविलेल्या एकाच दिवसाच्या सहा नमुन्यांपैकी पाच नमुने बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे. यामुळे शहरात डेंग्यूच्या आजाराने खोलवर हातपाय पसरले असल्याचे उघड झाले आहे. पाठविलेल्या नमुन्यांत एका दिवसाचे इतके, तर गेल्या चार महिन्यांत किती रुग्णांना डेंग्यूची बा...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लष्कराला 'मोदी जी की सेना' असे संबोधल्याने काँग्रेसने आदित्यनाथांवर टीकेची झोड उठवून हा लष्कराचा अपमान आहे, असे म्हटले आहे. येथे झालेल्या सभेत आदित्यनाथांनी 'मोदीजी की सेना' आणि 'काँग्रेस के लोग' असे म्हणत विरोधाभास साधला. 'काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालता...
मुंबई । मुंबईमध्ये प्लास्टिक बंदीसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही मार्केटमध्ये भाजीवाले, फळवाल्यांकडे, किराणा दुकानात या पिशव्या सर्रास उपलब्ध होतात. तेल, दूध सुटे घेताना उपलब्ध होणाऱ्या पिशव्याही पातळ असतात. या पातळ पिशव्या रिसायकल होत न...
दूध उत्पादनासाठी काही वर्षापूर्वी भूम तालुका अग्रेसर होता. दूध उत्पादनासाठी काही वर्षापूर्वी भूम तालुका अग्रेसर होता. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाला गती मिळाली होती. मात्र सततचा दुष्काळ, चाऱ्याचे वाढलेले भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, दूध उत्पादनातही कमालीची घट झाली आहे. दोन महिन्...
सेवा ज्येष्ठतेनुसार राज्यातील १५५८ पोलिस उपनिरीक्षकांची सहायक निरीक्षकपदी बढती झाली. त्यानुसार जिल्ह्यातील ३१ उपनिरीक्षकांचा पदोन्नतीमध्ये समावेश आहे. पोलिस महासंचालक सु. कु. जायस्वाल यांनी यांसबधीचा आदेश शुक्रवारी काढला. पदोन्नती झालेले अधिकारी असे : सचिन अशोक पंडित (औरंगाबाद), पवन सतीश मोरे, सतीश महादेव पाटील, रमेश ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने १२ अकृषक विद्यापीठांसह तीन अभिमत विद्यापीठांना मंजूर केलेली ८० टक्के प्राध्यापक भरती बिंदूनामावलीअभावी (रोस्टर) अडकली आहेत. राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतात. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे विद्यापीठाचे पालक म्हणून राज्यपालांनी या पदभरतीचा तिढा सोडवावा, अशी अपेक्षा ...
एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. नागपूर :अवनी किंवा टी-१ नावाच्या वाघिणीच्या मृत्यूवरून देशभरात वादंग सुरू आहे. आठवडभरापासून या वाघिणीला मारताना ...
Bigg Boss Marathi 4: वाट लागली! बिग बॉस गेले सुट्टीवर. . राखीच्या हातात घरचा कारभार. . Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४ आता मोठ्या रंजक वळणावर आलं आहे. घरात आता चार वााइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आहेत. बिग बॉसच्या खेळाचा कडक अनुभव असलेले सगळे मातब्बर आहेत हे चौघे. त्यातील एक राखी सावंत जिला हिंदी बिग बॉसचा दोन वेळा ...
Panvel : शिवकर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच अनिल ढवळे यांच्या पुढाकाराने प्रियांका रोडे व आकाश रुके यांचा विवाह रविवार, २० डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. पनवेल : लॉकडाऊनमुळे अनेकांना विवाह पुढे ढकलावे लागले, तर अद्यापही काही जण जमलेले विवाह सुरळीत पार पाडण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत पनवे...
पद्धतः मैदा, तेल, मीठ आणि पाणी एका मिश्रण भांड्यात घालून मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यावा. उकडलेले बटाटे, चिरलेला कोथिंबीर, मिरची, मिरची आणि मीठ यांचे मिश्रण करून घ्यावे. भिजवलेल्या काणिकेच्या गोळयाच्या चापत्या लाटून घ्या आणि त्यात बटाट्याचे सारण भरून तो करंजी प्रमाणे दुमडून घ्याल. तेला मधे पराठा खरपूस भाजून घ्या...
'स्पेलिंग बी' स्पर्धेत भारतीय वंशांच्या कार्तिक नेम्मानी या १४ वर्षांच्या मुलानं बाजी मारली आहे. कार्तिक मुळचा टेक्सास येथे राहणारा आहे. आठवीत शिकणाऱ्या कार्तिकनं भारतीय वंशांचा प्रतिस्पर्धी न्यासा मोदीला हरवून अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावला आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर कार्तिकला २००० अमेरिकन डॉलर रोकड, ...
नागपूरः अयोध्येतील त्या जागेवर केलेल्या उत्खननात मंदीराचे अवशेष सापडले असून तिथे राममंदीरच होते, ती भूमी राम लल्लाचीच आहे. न्यायालयीन प्रक्रियेला उशीर होत असून अयोध्येतील त्या जागी मंदीर बनविण्यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे राममंदीराच्या कायद्यासाठी जनजागृती करण्...
गोष्ट सिनेसृष्टीत पडद्याआड असल्याने जनमानसात परिचित नसलेल्या मातृत्वाची. मराठ्यात जन्मलो म्हणून आंबेडकरांना मनमोकळं कवटाळता येत नाही, पण आज ठरवलय.. तिनं सिनेमाचं तिकीट ब्लॅक करून घर बांधलं, मला व्हाईट हाऊस पेक्षा भारी वाटलं. तब्बू आज ५० वर्षांची झालीये, अन ह्या वयात सुद्धा तिचं लग्न न करता राहणं मला चोरटं सुख देतं.
क्रिकेटची पुन्हा सुरुवात करण्याच्या दृष्टीने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नियम शिथिल झाल्यास 18 मे पासून कौशल्य आधारित आऊटडोअर सराव सुरू करण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी गुरुवारी हे संकेत दिले होते. लॉकडाऊनमध्ये अडकलेले भारतीय खेळाडू सध्या घरातच फिटनेसवर भर देत आहेत. आत दोन महिन्यांनंतर ट...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - आपला भारत देश हा खेड्यांनी नटलेला आहे, त्यामुळे 'खेड्याकडे चला अन् खेड्याचा विकास करा 'असे महात्मा गांधी यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही, असे दिसून येते. त्यामुळे शहरे प्रचंड प्रमाणात वाढत असून अनेक नागरी समस्या होत आहेत. तर दुसरीकड...
राज्य निवडणूक आयोगाने १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यात कारंजा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या ग्रामपंचायतीत सात सदस्यांची निवड करावी लागणार होती. ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावकरी आणि लोकप्रतिनिधींनी पुरेप...
व्हिक्टोरिया आणि डेव्हिड बेकहॅम यांच्या जीवनात एक कठीण काळाची सुरुवात होते फॅशन डिझायनर यूके सोडले आणि हौट कॉटure वीकसाठी तयार करण्यासाठी फ्रान्सची राजधानी येथे गेला, जो लवकरच पॅरिसमध्ये होईल. डेव्हिड, कुटुंबातील रिअल वडील असल्याने, मुले देखरेख करण्यासाठी राहिले. - प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्ले यांच्या लग्नापासून सर्वा...
पाटण : पाटण वनविभागाने यावर्षीच्या पावसाळी हंगामाचा फायदा उठविण्यासाठी सुमारे ८५८२५ रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले असून विविध जातींच्या वृक्ष लागवडीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नरक्या (अमृता) या औषधी वनस्पतींची ११ हजार रोपे रासाटी येथील रोपवाटिकेत तयार केली आहेत. यापूर्वी पाटण वनविभागाने पाचगणी येथील...
मुंबई : सालाबादाप्रमाणे याही वर्षी आम्ही गणपती घरी आणलं असून पाच दिवस आमच्या घरी आनंदाचं वातावरण राहतं. त्यानंतर आम्ही कोकणात जात असतो. परंतु महाराष्ट्रात जे काही विघ्न आलं होतं. ते आता टळलं असून आता राज्यात विकासाकडे वाटचाल सुरू असल्याची अपेक्षा करतो. असं मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. मुंबई येथील ज...
दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावापासून तेराशे मीटर वर पांढरेवाडी जाधववस्ती पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण काम निकृष्ट पद्धतीने केले जात असल्याच चित्र दिसत आहे. कुरकुंभ ते पांढरेवाडी हद्दीपर्यंत असा चार ते पाच किलोमीटर रस्ता हा पूर्ण खराब झाला आहे परंतु संबंधित विभागाने या रस्त्याचे काम फक्त तेराशे मिटरच काम असल्याने पुढचे काम ...
Exit Poll Results in Gujarat: गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) सत्ताधारी भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाने दिल्ली महापालिकेतील सत्ता गमावल्याचे दिसत असताना भाजपासाठी गुजरातमधून गुड न्यूज येत आहे. गुजरातमध्ये आपच्या अरविंद केजरीवालांनी नुसतीच हवा केल्याचे ...
लाईव्ह न्यूज : अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai Santa Fe ची पहिली झलक समोर; Land Rover Defender ला देऊ शकते टक्कर! विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना! ब्यूटी : आरोग्य : Weight Loss Tips : रात्री 'हे' एक काम करूनही कम...
तुळजापुर : तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांचा अवमान केल्या प्रकरणी तहसीलदार योगिता कोल्हे व सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बजावलेल्या नोटीशीप्रमाणे दोघांनाही तुमच्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे विचारण्यात आले आहेत. सं...
उत्तर प्रदेशातील (UP) मऊ जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे लग्नादरम्यान वराची कृती पाहून वधूने लग्नाला नकार दिला. या प्रकरणावरून लोकांमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वराची ही कृती पाहिली तेव्हा तेही चक्रावून गेले. खूप समज देऊनही काही निष्पन्न न ...
मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून आज त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. ऋतुजा ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत असून रविवारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर सोमवारी भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्यफेरीत धडक मारली आहे. तीन वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताने अनपेक्षित धक्का देत ही कामगिरी केली...
मराठमोळी अभिनेत्री विदुला चौघुले सध्या चर्चेतलं नाव आहे. जीव झाला येडापिसा या मालिकेतून विदुलाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विदुलाच्या सोंदर्याने चार चॉंद लावले आहेत. विदुलाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत. विदुलाने गडद निळ्या रंगाचा कट- आऊट वनपीस परिधान केला आहे. विदुलाने वेगवेगळ्या पोझमध्ये हे नवं फोटोशू...
Umesh Yadav: भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि त्याच्या कुटुंबावर फेब्रुवारीच्या अखेरीस दुःखाचा डोंगर कोसळला. उमेशला 22 फेब्रुवारी रोजी पितृशोक झाला होता. त्याचे वडील आजारी असल्याचे समजले होते. दरम्यान, वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून काही दिवसातच उमेश भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना देखील खेळला. आत...
तारुण्याच्या रसरशीत ऊर्जेसाठी. . निसर्गाच्या कुशीत शिरा आणि करा 'काया'पालट. . का येतो आपल्याला ताण? का येतो कधीकधी पच्रंड वैताग? चिडचिड होते, एखाद्यावर ओरडावंसं वाटतं, काही प्रसंगी तर त्याला बुकलून काढावंसं वाटतं. . कशामुळे होतं हे सारं? . . त्यातली प्राथमिक आणि आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात जर पुरेशी एन...
रवींद्र जडेजा संघात नसल्याने पदार्पणाची संधी मिळालेल्या अष्टपैलू कृणाल पंड्याने संधीचं सोनं करत वेगवान अर्धशतकी खेळी केली. कृणालने 26 बॉलमध्येच अर्धशतकाला गवसणी घालत पदार्पणात वेगवान अर्धशतकाचा विक्रम रचला. 1990 मध्ये जॉन मॉरिस यांनी पदार्पणात 35 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. कृणालने त्यांचा विक्रम मोडला. विराट कोहल...
गोंदिया : आजचे युग स्पर्धेचे युग असल्याचे म्हटले जात असून, त्यानुसार लोकांचे जीवन घडाळाच्या काट्यावर धावत आहे. अशात कामानिमित्त सतत प्रवास करणाऱ्यांना गाडीच्या वेळेनुसार आपले काम आटोपते घ्यावे लागते. यात रेल्वेच्या संकेतस्थळावरून आता गाडी कोठपर्यंत आली आहे, हे कळून जाते व प्रवाशांना आपले नियोजन करता येते. मात्र, बसने ...
मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यामध्ये अतिक्रमण हा मोठा अडथळा ठरत आहेत. एमयूटीपी ३मधील कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्प सात वर्षांपासून रखडल्याने आत्तापर्यंत केवळ ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यामध्ये अतिक्रमण हा मोठा अडथळा ठरत आहेत. एमयूटीपी ३मधील ...
इस्लामाबादः लंडनमध्ये उपचार घेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाकिस्तान सरकारने फरार घोषित केले आहे. नवाझ शरीफ यांना देण्यात आलेल्या जामिनाचा अवधी न वाढवण्याचा निर्णय पंजाब सरकारने मंगळवारी घेतला होता. शरीफ यांनी जामिनासाठी असलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन केले असल्याचे सरकारने म्हटले आहे. पाकिस्तान...
सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले. नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घ...
जळगाव : अयोध्या नगरातील श्रद्धा रेसिडेंसी या अपार्टमेंटमधे एकाच वेळी तिन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा रक्षकाच्या घरासह एकुण तिन बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. एकुण 3 लाख 53 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला असून त्यात एक लाख रुपयांसह सोन्या चां...
गोंदिया : अवघ्या राज्यातीलच परिस्थिती आता दिवसेंदिवस गंभीर चालली असून कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊनची पाळी आली आहे. तर, जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून ही धोक्याची सूचना आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर काही दिवसांनी जिल्ह्यात त्याचे पडसाद दिसून येत असल्याचे अभ्यासातून दिसून आले...
बॉलिवूडमध्ये अनेक उत्तोमोत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत. कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होत असला की त्या चित्रपटातील स्टार कास्ट, गाणी यांची चर्चा नेहमीच होत असते. अशातच 'गोविंदा नाम मेरा' या हिंदी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड मधील मोठे स्टार असूनही चर्चा मात्र एका मराठमोळ्या अभिने...
सडक-अर्जुनी : तालुक्यातील कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित संस्थेच्या पार पडलेल्या निवडणूकीत शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत पराभव केला. रविवारी (दि. १६) झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. विशेष म्हणजे हे गाव पालकमंत्री राजकु...
01/24/20--14:30: _बंदचा परिणाम नाही ;...\n01/24/20--14:30: _देशभक्तीपर गीतांनी ...\n01/24/20--14:30: _बलीदान देणाऱ्यांची ...\n01/24/20--14:30: _विविधतेतून एकतेचे द...\n01/24/20--14:30: _खनिकर्म अधिकाऱ्यांव...\n01/24/20--14:30: _स्मार्ट रोड उद्यापा...\n01/24/20--14:30: _नळकनेक्शन खंडित\n01/24/20--14:30: _सीसीसीटीव्हींचे...
Husband who kills wife is sentenced to life imprisonment : २८ ऑगस्ट २०१७ रोजी पती संजयने शिलाई मशीनसाठी वापरण्यात येणाऱ्या कैचीने पत्नी राजश्रीवर १४ वार केले हाेते. अकाेला : मुर्तीजापूर शहरातील रहीवासी असलेल्या एका कौटुंबिक वादातून पत्नीवर कैचीने वार करून तिचा खून करणाऱ्या पतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवर...
येथील सरपंचपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने सरपंचपदासाठी शंकुतला कसुरे व निर्मला बुट्टे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र गावांच्या विकासासाठी एकत्रित येण्याचा निर्णय घेत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी तीसगाव ग्रामपंचा...
ASUS सुरू केली आहे ऑडिओ, ज्यामुळे PCI-कार्ड , एक वेळ Xonar D2, आणि नंतर PCI-Express उत्पादन आवृत्ती पुढे - D2X मॉडेल. Gilding आणि PCIe छान आहे. DAC भर्रर् असा आवाज-ब्राऊन 24-बिट / 192 kHz - उच्च दर्जाचे आणि सर्वोत्तम, फक्त खरेदीसाठी उपलब्ध आहे. डॉल्बी आणि DTS-एन्कोडिंग देखील चांगला आहे. पण कोण इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे...
अनेक शाळा सध्या मनमानी शुल्कवाढ करीत आहे. या शुल्काचा बोजा हा पालक वर्गाला सहना करावा लागत आहे. लॉक डाऊन मुळे अनेक पालकांची नोकरी ची समस्या निर्माण झाली आहे त्यात च आता ही शुल्कवाढ. लॉक डाऊन मुले अनेकांचे हाल झाले आहे. ही बाब समजून शाळा नी आपली मनमानी शुल्कवाढ ही या काळात थांबवली पाहिजे. तसेच सरकारने या वर काही कठोर पा...
राष्ट्रवादीची खरी ताकद असलेल्या आमदार हसन मुश्रीफांना चारही बाजूने घेरण्याचे नियोजन भाजपने केले आहे. राष्ट्रवादीवर हल्ला करताना केवळ मुश्रीफांना टार्गेट करत भाजपने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नवी खेळी खेळण्यास सुरूवात केली आहे. कोल्हापूरः राष्ट्रवादीची खरी ताकद असलेल्या आमदार हसन मुश्रीफांना चारही बाजूने घेरण्...
नागपूर मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. या कारागृहातील फाशीच्या कैद्यासह नऊ जण कोरोना बाधित आढळण्याने खळबळ उडाली आहे. यात एका कारागृह रक्षका लाही कोरोनाची लागण झाली आहे. या कारागृहात सध्या २२०० कैदी आहेत. दोन दिवसांपासून कैद्यांना कोरोना लस दिली जात आहे. पहिल्या दिवशी २०० कैद्यांना लस देण...
ठाणेः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा विशेष कल असतो. त्यामुळे सुवर्णकारांच्या व्यवहारात यादिवशी मोठी उलाढाल होत असते. दोन वर्षांनी कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर ग्राहकांनी पाडव्याची खरेदी केली; परंतु ती केवळ लग्नानिमित्त वधू- वरांसाठी ला...
आम्हाला स्वतंत्र आर्थिक क्षेत्राची आवश्यकता का आहे? मुक्त आर्थिक क्षेत्र एक ऐवजी पारंपरिक संकल्पना आहे. आज या व्याख्येचे तीस अर्थ आहेत. सर्व अटींमध्ये, तथापि, क्षेत्रामध्ये वस्तूंचे प्राधान्य किंवा कर्तव्य मुक्त निर्यात आणि आयात करणे ही संकल्पना लागू करण्यात आली आहे, आर्थिक, आर्थिक, व्यापार आणि आर्थिक अटींमध्ये देशाच्...
परतवाडा : अंगणवाडीतून वितरित केल्या जाणाऱ्या पूरक आहारातून तेल गायब झाले आहे. या तेलाऐवजी ते साखर देत आहेत. दिल्या जाणारी साखर अत्यंत बारीक असून, चणे निकृष्ट दर्जाचे आहेत. या चण्यांमध्ये न शिजणारे अधिक असून आकारानेही ते बारीक आहेत. भिजायला टाकल्यानंतर किंवा शिजायला ठेवल्यानंतर हे चणे भिजतच नाहीत, शिजतही नाहीत. आहारास...
१९८३ सालच्या भारतीय क्रिकेट टीमकडून कोणालाही फारशा अपेक्षा नव्हत्या. कोणीही सहज म्हटलं असतं की भारतीय टीम कधीच वर्ल्डकप जिंकू शकणार नाही. पण जेव्हा २५ जून १९८३ साली भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हा सर्वांनाच समजलं की आपण यांना कमी लेखून फार मोठी चूक केली आहे. हा धडा एका माणसाला आयुष्यभर आठवणीत राहिला.\nचला तर आज ८३ सालचा...
Pressure using institutions like CBI and ED, we will continue to fight this isademocratic country - MP Supriya Sule । सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन दबाव आणला जातोय; मात्र हा लोकशाही असलेला देश, आम्ही लढत राहू - खासदार सुप्रिया सुळे - Divya Marathi\nPressure Using Institutions Like CBI And ED, We Will Conti...
विचारवेध ही 1993 मध्ये महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंतांनी एकत्र येऊन उभी केलेली चळवळ. महाराष्ट्रात ठिकठिकाणी 15 वार्षिक संमेलने भरवून झाल्यानंतर तिचे कार्य थांबले. आज परत एकदा विचारवेध संमेलन भरवण्याची तातडीची गरज भासली - कारण आत्ताच्या असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी आणि बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार म...
तिरूअनंतपुरम : केरळ सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव मंत्री असलेले ए. के. शशींद्रन अडचणीत सापडले आहेत. पक्षातील एका स्थानिक नेत्याच्या मुलीने पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतील एका सदस्याविरूध्द विनयभंगाची तक्रार केली आहे. या प्रकरणात शशींद्रन यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप प...
शास्त्रघटना आणि शास्त्रे तिहास, पृथ्वीवर सर्वत्र दिसून येणारें गुरुत्वाकर्षणासंयंधाचें. गुरुत्वा येत नव्हतें हो गोट फ्यूल आहे; पण हा घर सोडलेला बाण कर्षण हा शब्द उच्चारतांच त्या तत्त्वाचा आद्य संशोधक परत साठी जमिनीवर ज्या गुरुत्वाकर्षणाने पडतो तें गुरुवा न्यूटन याचे नांव आपल्या डोळ्यासमोर येतें, आणि या सुप्र । कर्षण म्...
नवी दिल्ली, 25 जूनः तुम्ही येणाऱ्या काही दिवसात विमानप्रवास (Air Travel) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही स्वस्तात विमानप्रवासाचा आनंद घेऊ शकतो. कोरोनाकाळात (Coronavirus) प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध एअरलाइन्स कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन आल्या आहेत. स्पाइसजेट या बजेट एअरलाइनकडू...
सातारा- धावपळीच्या युगात कोणीही कोणासाठी वेळ देत नाही. प्रामाणिकपणा तर दूरच राहतो. मात्र, येथील एच.पी.प्रिया एजन्सीने दाखवून दिले आहे.ऑफिसमध्ये राहिलेली पैशासह कागदपत्रे व बॅग ग्राहकास परत केल्याने कौतूकास पात्र ठरली आहे. येथीळ नागरिक अनिल वीर कामानिमित्त दिवसभर अनेक कामे केल्याने बॅग कुठे राहिली हे विसरले होते. ते जेथ...
मुंबई, 29 जून : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. गुरूवारी होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिलेत. राज्यापालांनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. राज्...
पिंपरी येथे केक कापून वाढदिवस साजरा झाल्यानंतर, वाढदिवसाला आलेल्या तरुणाचे अपहरण करून, त्याला सिम्बॉयसेस कॉलेज रस्ता नांदेगाव येथील डोंगरात नेवून, हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास समोर आला आहे. आरोपी फरार झाले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आदित्य ...
ओ पी रल्हन यांनी १९६० ते १९८० मध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटात अनेक नवीन कलाकारांना स्थान दिले. त्यांनी फूल और पत्थर धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या चित्रपट स्टार केले. काही लोक देव आनंद ने झीनत अमानला हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातून आणले असा गैरसमज आहे पण झीनत अमान ओ पी रल्हन यांनी प्रथम त्याच्य...
नवी दिल्ली - 'बाबा का ढाबा'च्या मालकाचा युट्यूबवर भावनिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते कमालीचे प्रसिद्धि झोतात आले होते. त्यांचा दोन दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यात बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. Delhi: Kanta Prasad, the 80-year-old owner of 'Bab...
देशातील सर्व पक्षांच्या राजकारण्यांनी प्रौढपणाने राजकारण करायला हवे. समाजाचे भले कशात आहे ते ओळखून, आपण सत्तेत नसलो तरी प्रकल्पांना पाठिंबा दिला पाहिजे; अन्यथा उद्योग कसे वाढणार आणि गरिबी दूर कशी होणार ? गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रातील कारखानदारी क्रमाक्रमाने कमी होत गेली असून, ती आता धोक्याच्या पातळीपर्यंत खाली आली ...
शारीरिक आणि मानसिक छळाच्या वाढत्या घटनांनी संबंध देश हादरून गेला आहे. याविषयी बदलते कायदे, त्यावर होणारी चर्चासत्रे, प्रसारमाध्यमांतून होणारा प्रचंड भडिमार यामुळे घराघरातील मुले 'बाबा, बलात्कार म्हणजे काय? ' असा प्रश्न विचारू लागली आहेत. शारीरिक आणि मानसिक छळाच्या वाढत्या घटनांनी संबंध देश हादरून गेला आहे. याविषयी बदल...
परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे कँटिनऐवजी पोरांची गर्दी लायब्ररीत होतेय. डोळ्यांसमोरचे मोबाइल्स जाऊन तिथे पुस्तकं आली आहेत. राहिलेल्या अभ्यासाच्या भीतीने, 'चलो लायब्ररी' हा सध्याचा कॅम्पस मंत्रा आहे.
तंत्रज्ञान प्रगत होतय, पण माणसातील संवाद हरवतोय, असा एक सूर बरेचदा ऐकायला मिळतो. पण खरं तर तंत्रज्ञानाचा वापर करुन घेणार्यांना, उलट संवाद वाढतोय, असच म्हणावं लागेल. कित्येक वर्ष न भेटलेली लोकं भेटताहेत. आणि. . . . . . . . . . असो. याच रांगेतलं अजुन एक तंत्र आणि माणुस (की) चा संगम म्हणावा असं गुगल हेल्पआऊट. आपणा जे ज...
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी नुकताच काँग्रेसच्या एक मोठ्या नेत्याने भाजपमध्ये (bjp) प्रवेश केल्याने महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मनाला जातो. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे (Sachin Sathe) यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी ते कुठल्या पक्...
या असामान्य लक्षणाला पेरोस्मिया म्हटलं जातं. ज्यात सुघंण्याची क्षमता बिघडते. हे लक्षण सामान्यपणे तरूणांमध्ये आणि हेल्थवर्कर्समध्ये आढळून येतं. खाण्या-पिण्याच्या पदार्थांची चव आणि गंध न जाणवणे कोरोना व्हायरसच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. पण ज्या लोकांमध्ये कोरोना अधिक काळ राहतो अशा लोकांमध्ये आता काही वेगळीच लक्षणे सम...
मनोरः पालघर जिल्ह्यातील जर्जर आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाच्या दोनशे वीस खाटांच्या ट्रामा केअर रुग्णालयातून प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा रुग्णांना करावी लागणार आहे. कारण कामासाठी आवश्यक असलेल्या 36 कोटी रुपयांच्या निधीसाठी शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा कायम आहे. ट्रा...
Vaishali Yede Speech in 92nd Akhil Bharatiya Marathi Sahitya sanmelan Yawatmal । अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यवतमाळमध्ये थाटात उद्घाटन; वैशालींनी मांडले वास्तव - Divya Marathi\nVaishali Yede Speech In 92nd Akhil Bharatiya Marathi Sahitya Sanmelan Yawatmal\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यवतमाळमध्ये थाटात उ...
नांदेड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे आदिवासी पारधी समाजाला अजूनही रेशनकार्ड नाही, जातीचा दाखला नाही, मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड नाही की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यांच्या सुविधा नाहीत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १४) जिल्हाधिकार...
"तुला बरं वाटत नाही का ?" रामोनने व्याकुळ होऊन विचारले. सिबिलची अवस्था दोलायमान झाली. तिला तिच्या नशिबाचे दार कायमचे बंद तर करून टाकायचे नव्हते, पण "तू हो म्हणायला हवंस, " रामोन आग्रह करत होता. "किती तरी दिवस तुझ्या नजरेत होकार तरळतोय्" अखेर अगदी हळू, भग्न आवाजात सिबिल म्हणाली, "मला तू आवडतोस रामोन. मला तुझ्याशी लग्न क...
मुंबई - उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या राज्यातील चार यात्रेकरुंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मृत्युमुखी पडलेल्या चौ...
लवकरच तुम्हाला आयकर रिटर्न भरल्यानंतर सरकारकडून टॅक्स रिफंडसाठी 63 दिवस वाट पाहावी लागणार नाही. केवळ एका दिवसात तुम्हाला प्राप्तिकर मिळावा मिळेल. कारण प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी अवघ्या एक दिवसात करणाऱ्या एकात्मिक 'ई-फायलिंग' आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आ...
दिल्लीतील गुलाबीबाग परिसरात रविवारी एका कारने फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना चिरडले. तिन्ही मुले गंभीर जखमी आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात अनियंत्रित कार फुटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना चिरडताना दिसत आहे. एक मूल उडी मारून गाडीच्या मागे पडताना दिसत आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित लोकां...
मुंबई । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौरपदी आपल्या पक्षाचा नेता बसावा, अशी सर्वच राजकीय पक्षांची इच्छा असते. त्यासाठी सगळेच पक्ष तसे प्रयत्न करत असतात. भाजपचे नेते राम कदम यांनी येत्या काळात मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, असं म्हटलं आहे. मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असणार, त्या दृष्टीने आमची तयारी सुरू आहे...
रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य यांनी लागवड तंत्रज्ञानाच्या सुधारित पद्धतींचा अवलंब करीत भाताची हेक्टरी उत्पादकता सर्वोच्च पातळीवर नेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य यांनी लागवड तंत्रज्ञानाच्या सुधारित पद्धतींचा अवलंब करीत भाताची हेक्टरी उत्पादकता सर्वोच्च पातळीवर नेली आहे. २०१६ मध्ये ३...