text stringlengths 0 6.48k |
|---|
या अॅपच्या मदतीनं तुमच्या मोबाइल, टॅब्लेट, लॅपटॉपमध्ये असलेल्या प्लेलिस्ट अँड्रॉइड टीव्हीमध्ये प्ले करू शकता. |
म्युझिक पॉडकास्ट आणि प्लेलिस्टसाठी हे अॅप फायदेशीर आहे. |
या अॅपमध्ये खास सुविधांचा वापर करायचा असेल तर काही विशिष्ट रक्कम भरावी लागते. |
AIIMS Nursing Officer Recruitment 2020: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. |
या भरती प्रक्रियेद्वारे देशातील विविध एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरची पदे भरली जाणार आहेत. |
राज्यातील नागपूर एम्सचा देखील या भरती प्रक्रियेत समावेश आहे. |
एम्स दिल्लीने यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. |
कोणत्या एम्समध्ये किती जागा रिक्त आहेत? |
अर्ज कधीपर्यंत करता येतील? |
पात्रतेचे निकष काय आहेत? |
या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या बातमीत मिळेल. |
सोबत नोटिफिकेशन तसेच अर्ज करण्याची थेट लिंकही देण्यात येत आहे. |
पदांची माहितीपदाचे नाव - नर्सिंग ऑफिसरपदांची एकूण संख्या - ३,८०३ कोणत्या एम्समध्ये किती जागा रिक्त? |
एम्स नवी दिल्ली - ५९७एम्स भुवनेश्वर - ६००एम्स देवघर - १५०एम्स गोरखपुर - १००एम्स जोधपुर - १७६एम्स कल्याणी - ६००एम्स मंगलागिरी - १४०एम्स नागपूर - १००एम्स पाटणा - २००एम्स रायबरेली - ५९४एम्स रायपूर - २४६एम्स ऋषिकेश - ३००ONGC मध्ये ४,१८२ पदांवर अप्रेंटिस भरती; कॉमर्स ग्रॅज्युएट्सना संधीअर्जाची माहितीया भरती प्रक्रियेत सहभाग... |
अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे. |
अर्ज प्रक्रियी ५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. |
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - १८ ऑगस्ट २०२०अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख - १८ ऑगस्ट २०२०परीक्षेची तारीख - १ सप्टेंबर २०२०भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरतीअर्जाचे शुल्कसर्वसाधारण आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी १५०० रुपये, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएससाठी १२०० रुपये शुल्क आहे. |
दिव्यांग उमेदवरांसाठी अर्ज नि:शुल्क आहे. |
निवड प्रक्रियाएम्स नर्सिंग ऑफिसर (AIIMS Nursing Officer) पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे होईल. |
या परीक्षेचे नाव नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलीटी टेस्ट (NORCET 2020) असे आहे. |
स्टेट बँकेत जम्बो भरती; हजारो पदे रिक्तपात्रतानर्सिंगमध्ये बीएससी किंवा अन्य कोर्स करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. |
अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये आहे. |
वयोमर्यादाकिमान १८ वर्षे तर कमाल ३० वर्षे वयोमर्यादा. |
आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. |
पश्चिम रेल्वेत भरती; पदवीधरांसाठी नोकरीची संधीAIIMS Nursing Officer vacancy notification 2020 साठी येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करण्याच्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा. |
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अर्थव्यवस्थेच्या खालावत जाणाऱ्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. |
राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या वक्तव्यावर देखील टिप्पणी केली आहे. |
करोना ही साथ एक दैवी घटना असून यामुळेच जीएसटीवर परिणाम झाला आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते. |
या वर्षी आम्ही एका विलक्षण परिस्थितीचा सामना करत आहोत. |
आम्ही एका दैवी संकटाचा सामना करत आहोत. |
आम्हाला मंदीचा (Contraction) देखील सामना करावा लागत आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते. |
यावर राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. |
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'भारतीय अर्थव्यवस्था तीन गोष्टींमुळे उद्ध्वस्त झाली आहे- नोटाबंदी, दोषयुक्त जीएसटी आणि अपयशी लॉकडाउन, या व्यतिरिक्त बाकी सारे खोटे आहे. |
' (rahul gandhi criticizes modi government regarding indian economy) राहुल गांधींपूर्वी CPI (M) ने देखील GST महसूलात (GST Revenue) घट येण्याबाबतच्या मुद्द्यावर शुक्रवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. |
सरकार उद्योगपतींना मिळालेले असून व्यर्थ धोरणे आणि कडक दृष्टीकोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून ते आता देवाला जबाबदार धरत आहे, असे सीपीआयने म्हटले आहे. |
पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. |
गरज भासल्यास सरकार कर्ज घेऊन राज्यांची थकबाकी देऊ शकते. |
राज्य सरकारांनी का म्हणून कर्ज घ्यावे? |
, काय हे सहकारावर आधारित संघराज्य आहे का? |
, देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केल्यानंतर आता दैवी कारणे पुढे करत राज्यांना लुटले जात आहे, असे येचुरी म्हणाले. |
उद्योगपतींशी हातमिळवणी, अक्षमता आणि असंवेदनशीतेमुळे करोना येण्याच्या फार पूर्वीपासूनच लोकांचा रोजगार आणि जीवन उद्ध्वस्त झाले होते. |
आता देवाला जबाबदार धरले जात आहे, असेही येचुरी म्हणाले. |
क्लिक करा आणि वाचा- काश्मीर: चकमकीत ४ दहशतवादी ठार; यात सरपंचाची हत्या करणारे २ दहशतवादीसरकारने वित्तीय वर्ष २०१९-२९ साठी राज्यांच्या जीएसटीच्या नुकसानभरपाईच्या स्वरुपात केंद्र सरकारने १. |
६५ लाख कोटी रुपये वितरीत केले असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले होते. |
यात मार्चमधील १३,८०६ कोटी रुपयांचा देखील समावेश आहे. |
जीएसटीच्या नुकसानभरपाईसाठी एकत्रित उपकर (Cess) ९५,४४४ कोटी रुपये होता, कर राज्यांना १,६५ लाख कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. |
क्लिक करा आणि वाचा- ६० कोटींच्या विमानाने उड्डाण करणार मुख्यमंत्री; पाहा, विमानाची वैशिष्ट्ये! |
क्लिक करा आणि वाचा- 'या' टीव्ही शोवर एक महिन्याची बंदी; 'लव्ह जिहाद'ला उत्तेजन देण्याचा आरोप |
नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपन्यांनी आपली विक्री वाढवण्यासाठी फोनवर डिस्काउंट आणि ऑफर्स देण्यास सुरूवात केली आहे. |
देशात उद्या ७४ वे स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. |
या दिनानिमित्त टेक कंपनी विवोने आपल्या फोनवर जबरदस्त डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. |
कंपनीने नुकताच लाँच केलेल्या स्मार्टफोनवर ही ऑफर्सची घोषणा केली आहे. |
यात Vivo X50 सीरीज, Vivo V19 आणि Vivo Y50 या स्मार्टफोनचा समावेश आहे. |
ही १६ ऑगस्ट रोजी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर आणि ऑफलाइन स्टोर्सवर ग्राहकांना मिळणार आहे. |
वाचाः जिओ-एअरटेल-वोडाः रोज 4GB पर्यंत डेटा, फ्री कॉलिंगइंडिपेंडेंस डे ऑफर्स (Independence Day Sale) सोबत विवो आपल्या ग्राहकांना फोन खरेदीवर ईएमआय ऑप्शन सुद्धा देत आहे. |
९९९ रुपयांच्या ईएमआयवर फोन खरेदी करता येवू शकतो. |
फोन खरेदीवर कंपनी ऑफर देत आहे. |
एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक ग्राहकांना नवीन गिंबल कॅमेऱ्याचा Vivo X50 सीरीज स्मार्टफोन खरेदीवर ४ हजारांपर्यंत कॅशबॅक देणार आहे. |
या सीरीज अंतर्गत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर केवळ १९९० रुपयात देत आहे. |
वाचाः रेडमीचा नवा लॅपटॉप लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्सस्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर Vivo V19 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ९९९ रुपयांत स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर या सेलमध्ये मिळणार आहे. |
विवो कस्टमर्सला १२ महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी मिळत आहे. |
तसेच हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वोडाफोन - आयडिया युजर्संना ८१९ रुपयांच्या प्लान रिचार्जवर रोज २ जीबी डेटा एक्स्ट्रा मिळणार आहे. |
Vivo X50 सीरीज मध्ये Vivo X50 Pro आणि Vivo X50 स्मार्टफोनचा समावेश आहे. |
वाचाः ४ कॅमेरे, 5000mAh बॅटरी रियलमी स्मार्टफोनचा आज सेल, किंमत ८९९९Vivo V19 स्वस्त या सेलमध्ये ग्राहक या फोनला २४ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकतो. |
तसेच ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा Vivo Y50 हा स्मार्टफोन १७ हजार ९९० रुपयात खरेदी केला जावू शकतो. |
तसेच कंपनीने नुकताच लाँच केलेला V19 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. |
४ हजार रुपयांची कपात मिळाल्यानंतर ४ जीबी रॅमचा फोन २४ हजार ९९९ रुपयांना तर ८ जीबी रॅम फोन २७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. |
वाचाः जिओची जबरदस्त ऑफर, १४१ रुपयात घेऊन जा JioPhone 2वाचाः पुस्तकासारखा स्मार्टफोन येतोय, पुढच्या महिन्यात होणार लाँचवाचाः सॅमसंग गॅलेक्सी A21s झाला स्वस्त, पाहा नवी किंमतवाचाः BSNL ने लाँच केला ८० दिवसांचा स्वस्त प्लान, हे दोन प्लान बंद |
भारतीय सौर १५ श्रावण शके १९४२, श्रावण कृष्ण तृतीया रात्री १२. |
१४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका सकाळी ११. |
१७ पर्यंत, चंद्रराशी : कुंभ, सूर्यनक्षत्र: आश्लेषा , सूर्योदय: सकाळी ६. |
१८, सूर्यास्त: सायं. |
७. |
१०, वृश्चिक: व्यायामाची आवड लावून घ्या; वाचा, तुमचे आजचे राशीभविष्यचंद्रोदय: रात्री ९. |
१५, चंद्रास्त: सकाळी ८. |
२९, पूर्ण भरती: दुपारी १. |
५१ पाण्याची उंची ४. |
३३ मीटर, उत्तररात्री १. |
५८ पाण्याची उंची ३. |
९० मीटर, पूर्ण ओहोटी: सकाळी ७. |
२० पाण्याची उंची ०. |
८० मीटर, सायं. |
५७ पाण्याची उंची १. |
३७ मीटर. |
प्रतिनिधी, ठाणेलॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भिवंडीकरांना दिलासा देण्यासाठी लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा बुधवारी महापौर प्रतिभा पाटील यांनी केली. |
मात्र राज्य सरकारने महापालिकेला अनुदान दिल्यास करमाफी देता येईल, अशी पुस्ती प्रशासनाने जोडल्यामुळे हा दिलासा प्रत्यक्षात येण्यास अवकाश दिसतो. |
भिवंडी महापालिकेमध्ये बुधवारी झूम अॅपद्वारे महासभा आयोजित करण्यात आली होती. |
यावेळी सभागृहात केवळ महापौर यांच्यासह उपमहापौर इम्रान वली मोहमद खान, पालिका आयुक्त डॉ. |
पंकज आशिया, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, सभागृह नेता विलास पाटील यांच्यासह इतरही सदस्य उपस्थित होते. |
दुपारी सभा सुरू झाल्यानंतर लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याच्या विषयावर चर्चा झाली. |
या चर्चेत झूम अॅपद्वारे इतरही सदस्य सहभागी झाले होते. |
लॉकडाउनमुळे गोरगरीब नागरिकांसह व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. |
हे नुकसान भरून येणारे नाही. |
त्यामुळे शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देणे हे महापालिकेचे प्रमुख काम आहे, असे सांगत तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतिभा पाटील यांनी केली. |
याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. |
तसे पत्रकही नंतर महापालिकेने जारी केले. |
मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. |
त्यामुळे सरकारी अनुदानाशिवाय करमाफी शक्य नाही, अशी माहिती पालिका सचिव अनिल प्रधान यांनी दिली. |
भारती ठाकूरएका गावातील अत्यंत सज्जन, सुसंस्कारित, विद्वान वगैरे विशेषणं लावता येतील अशा व्यक्तीचा मृत्यू झाला, असे लोकांना वाटले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.