text
stringlengths
0
6.48k
खात्री करून घेण्यासाठी आणि स्मशानभूमीत मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असतं म्हणून डॉक्टरला बोलावण्यात आलं.
डॉक्टरनं त्या गृहस्थाला तपासून मृत्यू प्रमाणपत्र दिलं.
लोकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली.
गावातल्या प्रथेप्रमाणे धर्मगुरू आले.
त्यांनी आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली.
प्रेत तिरडीवर बांधले.
'राम नाम सत्य है' म्हणत अन्त्ययात्रा स्मशानात पोहोचली.
तोपर्यंत तिरडीवरच्या शरीरात हालचाल सुरू झाली.
खरंतर ते गृहस्थ मृत्यू पावले नव्हते.
ते लोकांना व्याकूळ होऊन विनंती करू लागले, "मी मेलो नाहीये.
कृपा करून मला जाळू नका.
तिरडीला मला ज्या दोराने बांधला आहे तो सोडा.
मी जिवंत आहे.
" त्याचे नातेवाईक आणि परिचित लोक आश्चर्यचकित झाले.
त्या गृहस्थाच्या अन्त्यसंस्कारासाठी आलेले लोक खूप शिकले-सवरलेले होते.
त्यांनी तिथेच सभा घेतली.
चर्चेअंती असे ठरले की एका उच्च शिक्षित, तज्ज्ञ डॉक्टरने हे गृहस्थ मृत्यू पावले आहेत असे प्रमाणपत्र दिलंय.
ते खोटं कसं असू शकेल?
धर्मगुरूने अंतिम प्रार्थनाही केली आहे.
त्यामुळे आपण 'मृतदेह' परत नेऊ शकत नाही.
तसा ठराव पसार झाला.
काही जणांनी सत्य जाणून घ्या, म्हणून करूणा भाकली.
पण बहुमतवाल्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.
तिरडीवरच्या गृहस्थालाही ही समस्या समजावण्यात आली.
मग अन्त्यसंस्कार व्यवस्थित पार पडला.
या रूपककथेचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे.
आमची संस्कृती, रीतीभाती, सणवार, आमच्या भाषा-लोकभाषा, कृषी पद्धती, आमची शिक्षण पद्धती, हे सारेच आम्ही आधुनिकतेच्या वा आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली किंवा परकीय संस्कृतीच्या प्रभावामुळे मृत अथवा कालबाह्य ठरवतो आहोत.
दूरदर्शन मालिकांच्या मोहात पडून दिवेलागणीला घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून 'शत्रुबुद्धी विनाशाय' अशी प्रार्थना शिकवणारी आमची संस्कृती आम्हाला आठवत नाही.
अपरिग्रहाची शिकवण देणारी जीवनपद्धती आम्ही विसरतो आहोत.
समग्र व्यक्तिविकास करणारी भारतीय शिक्षण पद्धती दूर सारून नोकरी लागल्यावर पॅकेज काय मिळेल, ते शिकविणारी व्यवस्था आम्ही स्वीकारतो आहोत.
विदेशी खाद्यपद्धती अनुसरून आमचे शरीरस्वास्थ्य बिघडवतो आहोत.
सांस्कृतिक देवघेव वाईट नाही.
पण चांगले काय, वाईट काय याचेही आत्मभान वेळीच यायला नको का?
विशेष प्रतिनिधी, नागपूरशेगावचे संत श्री गजानन महाराज जवळपास सहा महिने नागपुरात वास्तव्याला होते.
या काळात चतुर्थ रघुजी राजे भोसले यांनी सक्करदरा परिसरात संत गजानन महाराज आणि संत ताजुद्दीन बाबांची एकत्र मिरवणूक काढली होती.
या दिवसाची आजही आठवण काढली जाते.
ऋषिपंचमीनिमित्त तर या खास क्षणाचे नागपुरात स्मरण होतेच.
गजानन महाराज १९०८ मध्ये नागपुरात सीताबर्डीवर गोपाळराव बुटी यांच्याकडे आले.
साधारण चार महिने त्यांचे वास्तव्य बुटींच्या वाड्यात होते.
बर्डी परिसरात आजही हा वाडा अस्तित्वात आहे.
बुटींकडून महाराज महालात रघुजी राजे भोसले यांच्या वाड्यात गेले.
या राजवाड्याच्या आत लक्ष्मीनारायण मंदिर, महादेव मंदिर आणि जवळच प्राचीन विहीर आहे.
शेजारीच संगमरवरी दगडाचा ओटा आहे.
या ओट्यावर रघुजी राजांनी गजानन महाराजांची पाद्यपूजा केली होती.
हा ओटा आजही अस्तित्वात आहे.
महाराज बुटींकडे असतानाच डॉ.
परांजपेंच्या वाड्यात गेले होते.
गांधीसागरजवळ आज जिथे शिक्षक सहकारी बँकेचे सभागृह आहे, तेथे पूर्वी हा वाडा होता.
एकदा महाराज पाताळेश्वर शिवमंदिरात गेले.
तेथे जोरजोरात घंटा वाजवून 'हम आ रहा हैं' असे ते म्हणत होते.
मग रघुजी राजांसह ते बग्गीने छोटा ताजबागला आले.
येथील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात संत हिरासिंग महाराज आणि संत केजाजी महाराज वास्तव्याला होते.
या दोन्ही संतांची महाराजांनी ऊरभेट घेतली.
आज लक्ष्मीनारायण मंदिराशेजारीच हिरासिंग महाराजांची संजीवन समाधी आहे.
छोटा ताजबाग परिसरात भोसले पॅलेसजवळ चिंचेच्या झाडाखाली ताजुद्दीन बाबांचा मुक्काम होता.
या झाडाखाली गजानन महाराज व ताजुद्दीन बाबा यांनी एकमेकांना आलिंगन दिले.
दोन्ही संतांनी तेथे चर्चा केली.
त्याचवेळी रघुजी राजांनी बग्गी सजवून त्या बग्गीत या दोन्ही संतांना बसवून त्यांची सक्करदरा परिसरात वाजत-गाजत मिरवणूक काढली.
अनेक ठिकाणी पावन स्पर्श.
..महाराज रघुजी राजांकडे असताना इतवारीतील निकालस मंदिरातही येत.
येथे काही काळ ध्यानधारणा करून मंदिराच्या समोरील ओट्यावर येऊन बसत.
इतवारी परिसरात हे मंदिर आजही आहे.
त्याचप्रमाणे रघुजींच्या वाड्याशेजारी असलेल्या नागपूर महापालिकेच्या कार्यालयासमोरील काळ्या दगडाच्या ओट्यावरही महाराज अनेकदा बसलेले दिसत.
महालातील बडकस चौकात (पं.
बच्छराज व्यास चौक) एका बाजूला बडकस यांची मोठी इमारत होती.
या इमारतीच्या ओट्यावरही महाराज येऊन बसत.
आता त्या ठिकाणी महाराष्ट्र एम्पोरियम हे कापडाचे दुकान आहे.
भोसले यांच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले व तेथून ते शेगावला निगून गेले.
आपल्या सहा महिन्यांच्या काळात महाराजांनी आपल्या पावन स्पर्शाने नागपुरातील अनेक स्थळे पुनित केली होती.
२००८ साली श्री गजानन महाराजांच्या नागपूर आगमनाची शताब्दी नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरी झाली होती.
खास प्रतिनिधी, नाशिकएका महिला पदाधिकाऱ्यामुळे रेंगाळलेली भाजपची बहुप्रतिक्षित जम्बो कार्यकारिणी बुधवारी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी जाहीर केली.
तब्बल सव्वाशे जणांचा समावेश असलेल्या कार्यकारिणीत १० उपाध्यक्ष, चार सरचिटणीस आणि ५० सदस्यांचा समावेश आहे.
महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांची तर कार्यकारिणीत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय नीलेश बोरा यांनाही संधी मिळाल्याने आमदार प्रा.
देवयानी फरांदे यांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे.
भाजपच्या शहर कार्यकारिणीला सात महिन्यांपासून मुहूर्त लागत नसल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती.
शहराध्यक्ष पालवे यांनी नव्या दमाची कार्यकारिणी तयार केली असली तरी भाजपच्या एका आमदार पदाधिकाऱ्याने आपल्या विरोधकांच्या नावावर फुली मारल्याने शहराध्यांचीच कोंडी झाली होती.
नूतन कार्यकारिणीचा वाद थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यापर्यंत गेला होता.
पालवे यांनी प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने अखेर १२५ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली.
त्यात रामहरी संभेराव, बाळासाहेब पाटील, नीलेश बोरा, हरिभाऊ लोणारी, सचिन ठाकरे, कुणाल वाघ, प्रकाश घुगे, यशवंत निकुळे, अलका जांभेकर, प्रा.
वर्षा भालेराव यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.
डॉ.
जाधव, केदार, पाटील, भगुरकर यांना बढती डॉ.
प्रशांत जाधव यांच्याकडे संघटन सरचिटणीसपद देण्यात आले आहे.
सुनील केदार, जगन पाटील, पवन भगुरकर यांना सरचिटणीसपदी बढती मिळाली आहे.
आशिष नहार यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आले आहे.
शशांक हिरे यांच्याकडे अनुसूचित जाती मोर्चा, हेमंत पिंगळे यांच्याकडे किसान मोर्चा, फिरोज शेख यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चा, परशराम वाघेरे यांच्याकडे अनुसूचित जमाती मोर्चा, चंद्रकात थोरात यांच्याकडे ओबीसी मोर्चाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
इतर १९ आघाड्यांच्या प्रमुखांचीही नावे जाहीर करण्यात आली आहे.
आमदार फरांदेंना धक्का!
भाजप महिला मोर्चाचे शहर अध्यक्षपद हिमगौरी आडके-आहेर यांना देण्यास आमदार प्रा.
फरांदे यांनी विरोध दर्शवला होता.
सोबत युवा मोर्चाचे अध्यक्ष मनीष बागूल तर नीलेश बोरांना थेट पक्षाच्या कार्यकारिणीत घेण्यासही त्यांचा विरोध होता.
परंतु, आता त्यांनाच पदे देण्यात आल्याने प्रा.
फरांदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
प्रतिनिधी, नगर: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येणार असल्याचे विधान केले होते.
त्यामुळे अशा संभाव्य नावांवर चर्चा सुरू झाली आहे.
अकोलेचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचेही नाव या यादीत घेतले जात होते.
त्यावर ‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी अहोत’ अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली आहे.
ज्येष्ठ नेते पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू मानले जात होते.
मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी पुत्र वेभव यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला.
निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला.