text
stringlengths
0
6.48k
राजा येथील ५२ वर्षीय पुरूष व मलकापूर येथील एका ७१ वर्षीय पुरूष रूग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे.
तसेच आज ५० रूग्णांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात करोना रुग्णांची एकूण संख्या २१७९ झाली असून त्यापैकी १३०३ रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ८३६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत ४० करोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
नवी दिल्लीः इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) प्रायोजकांमध्ये चिनी कंपन्या असल्याने आता त्याला विरोध होत आहे.
नागरिकांनी टी -20 क्रिकेट लीगवर बहिष्कार घालण्याचा विचार केला पाहिजे, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने सोमवारी आवाहन केले.
चिनी कंपन्या प्रायोजक असल्याने अनेक भारतीय नागरिकांनी सोशल मीडियावर यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लडाखमध्ये चीनच्या आक्रमकतेविरोधात देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
'हा सैनिकांचा अपमान' टी -20 क्रिकेट सामने आयोजित करणारी संस्था इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) एका चिनी मोबाइल कंपनीला प्रायोजक बनवल्याच्या निर्णयाने सर्व चकीत झाले आहेत.
या निर्णयाने आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांनाच अपमान केला आहे, असं स्वदेशी जागरण मंचने म्हटलं आहे.
चीनला विरोध करायलाच हवाः स्वदेशी जागरण मंच'सध्या देश अर्थव्यवस्थेला बाजारपेठेतील चिनी वस्तुंपासून मुक्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
चिनी वस्तूंना बाजारपेठेतून हद्दपार करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे.
चीनी गुंतवणूक आणि चिनी कंपन्यांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आयपीएलची ही कृती केवळ देशाच्या विचारधारे विरोधातच नाही तर देशाची सुरक्षा आणि आर्थिक चिंतेकडेदेखील दुर्लक्ष करणारे आहे.
प्रायोजक बदला अन्यथा.
..चिनी कंपनीला दिलेल्या प्रायोजकाच्या निर्णयावर आयपीएलच्या आयोजकांनी पुनर्विचार करावा.
आयपीएलच्या आयोजकांनी निर्णय बदलला नाही तर नागरिकांना आयएपीएलवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करावे लागेल.
लक्षात ठेवा देशाची सुरक्षा आणि अभिमानाच्या पलिकडे काहीही नाही, हे लक्षात ठेवा असा इशारा दिला आहे.
चांगली बातमी!
भारतात ऑक्सफोर्डच्या करोनावरील लसीच्या मानवी चाचणीला मंजुरीराम नाम भाजपची वडिलोपार्जित मालमत्ता नाही, उभा भारतींचा पक्षाला घरचा अहेरसोशल मीडियावर नाराजीइंडियन प्रीमियर लीगच्या आगामी स्पर्धेतही चिनी कंपनीचे प्रायोजक कायम ठेवले आहे.
रविवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला.
यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आयपीएलचा निषेध केला.
एवढच नव्हे तर मोठ्या संख्येने नागरिक चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करताना दिसून आले.
त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या कराराचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले होते.
पण आयपीएलमध्येही चिनी कंपनी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामन्यात महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ने मारलेला षटकार कोणताही भारतीय चाहता विसरणार नाही.
धोनीच्या त्या षटकाराने भारताने २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला.
इतकच नव्हे तर घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा प्रथमच एखाद्या संघाने वर्ल्ड कप जिंकला होता.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात जेव्हा भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले तेव्हा धोनी वरच्या स्थानावर खेळण्यास आला.
त्याने नाबाद ९१ धावांची खेळी केली.
सामन्यात धोनीने लंकेचा जलद गोलंदाज नुआन कुलशेखराच्या चेंडूवर षटकार (Dhoni Six in Final of World Cup 2011) मारत वर्ल्ड कप जिंकून दिला.
वाचा- एकेकाळी तिकीट काढण्याचे पैसे नव्हेत; आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत क्रिकेटपटूधोनी मारलेला चेंडू वानखेडे मैदानावरील ज्या जागे(सीट)वर पडला होता त्या सीटला धोनीचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)ला मिळालेल्या एका प्रस्ताव मिळाला आहे.
ज्यात फायनल मॅचमध्ये षटकार ज्या ठिकाणी पडला होता त्याला धोनीचे नाव द्यावे असे म्हटलेय.
गेल्या शनिवारी धोनीने १६ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधून निवृत्तीचा (MSD Retire) निर्णय घेतला होता.
वाचा- 'आज संध्याकाळी 19.
29 पासून मला निवृत्त समजा'; असं कुणी रिटायर झालंय का आजपर्यंत!
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अजिंक्य नाईक यांनी त्या सीटला धोनीचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
त्यांच्या मते ती सीट सजवली जावी.
धोनीने मारलेला षटकार ज्या सीटवर पडला होता ती अशा पद्धतीने सजवली जावी की ज्यातून धोनीचे भारतीय क्रिकेटमधील योगदान आणि वानखेडे स्टेडियमशी जोडलेला स्नेह याचा सन्मान व्हावा.
वाचा- धोनीच्या निवृत्तीचे खरे कारण; निर्णय जाहीर करण्याआधी या व्यक्तीची भेट घेतलीइंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेटमधील महेंद्र सिंह धोनीच्या योगदानाचा विचार करता २०११च्या वर्ल्ड कपमधील तो प्रसिद्ध सिक्स ज्या ठिकाणी पडला होता.
त्या सीटला धोनीचे नाव दिले जाऊ शकते.
वाचा- धोनी म्हणाला होता, आजही पश्चाताप होतोय!
नाईक यांनी दिलेल्या प्रस्तावात त्या सीटला रंग देता येईल.
जेणेकरून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वानखेडे स्टेडियममधील त्या जागेचे महत्त्व उठून दिसेल.
या शिवाय MCAच्या क्रिकेट संग्राहलय यात वर्ल्ड कपमधील बॉल ठेवला जावा.
वाचा- आणखी २ ते ३ वर्ष खेळायचे होते; पण १५ मिनिटात घेतली निवृत्ती.
..वर्ल्ड कपमधील तो बॉल कुठे आहे याची माहिती काढली तर चांगले होईल.
तो बॉल संग्राहलयाचे आकर्षक ठरेल, असे नाईक यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला थेट तुरुंगात जावं लागलंय.
या प्रकरणात उत्तर २४ परगना जिल्ह्यातील २४ वर्षीय भाजप कार्यकर्ता सुभदीप दास याला अटक करण्यात आलीय.
बुधवारी सायंकाळी हावडा पोलीस स्टेशनमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याकडून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारीवर कारवाई करताना पोलिसांनी आयटी अॅक्टच्या वेगवेगळ्या कलमांनुसार, आरोपीवर गुन्हा दाखल केलाय.
यामध्ये, कलम ५०४ (शांत भंग करण्याच्या उद्देशानं जाणून-बुजून एखाद्याचा अपमान करणं), ५०५ (खोटी वक्तव्य करणं किंवा सार्वजनिक शांती भंग करण्यासाठी अफवा पसरवणं) अशा वेगवेगळ्या गुन्हे आरोपीवर दाखल करण्यात आलेत.
त्यानंतर आरोपी सुभदीप दास याला गुरुवारी बारासात न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
वाचा :ज्योतिरादित्य शिंदेंची फेसबुकवरून राहुल गांधींवर टीका; म्हणाले.
..वाचा :मुंबईतील 'ही' मंदिरे उघडण्याची सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगीवाचा :'इस्रो' खासगीकरणाच्या जोरदार चर्चा; अध्यक्ष के सिवन यांचं स्पष्टीकरणयानंतर भाजपकडून पोलिसांवर अतिसक्रियतेचा आरोप करण्यात येतोय.
भाजप कार्यकर्त्यांना सुनियोजित पद्धतीनं अशा प्रकरणांत अडकवण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे नेते निलिमेश दास यांनी मात्र पोलीस कायद्याचं पालन करत असल्याची प्रतिक्रिया दिलीय.
'बंगाल भाजपचे प्रभारींना स्वत:ला राजकीय विरोधकांना सन्मान करता येत नसेल तर साहजिकच त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचंच अनुकरण करणार' अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
भाजप कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावर आमच्या सन्माननीय खासदारांना शिवीगाळ करण्यात आली होती.
आज संपूर्ण देश जाणतोय की भाजप आपला राजकीय उद्देश्य साध्य करण्यासाठी फेसबुकचा कशा पद्धतीनं वापर करत आहे.
पोलिसांनी योग्य तीच कारवाई केलीय.
जर भविष्यात कुणी अशा पद्धतीचं कृत्य केलं तर त्याच्यावरही अशीच कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.
वाचा :न्यायालय अवमान प्रकरणात माफी मागणार नाही, शिक्षेसाठी तयार : प्रशांत भूषणवाचा :मास्क परिधान केलं नाही म्हणून सरकारी अधिकाऱ्याची 'दबंग' मारहाणवाचा :मुलाच्या परीक्षेसाठी वडिलांचीही जिद्द, सायकलवर १०५ किलोमीटर प्रवास
प्रतिनिधी, नगर: करोनाच्या अनुषंगाने ठरवून देण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करीत, दरवर्षीप्रमाणे कोणतीही मोठी मिरवणूक न काढता मुस्लिम बांधवांनी मोहरमच्या सवाऱ्यांचे जागेवरच विसर्जन केले.
कोठला येथे छोटे इमाम आणि हवेली येथे बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची स्थापना झाली होती, त्याच जागेवरच या सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले.
मोहरमच्या दिवशी नगरमध्ये मोठी विसर्जन मिरवणूक दरवर्षी निघत असते.
यंदा मात्र विसर्जन मिरवणुकीस निर्बंध आहेत.
त्यामुळे जागेवरच विसर्जन करण्यात आले असून ही आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे.
नगरमधील मोहरम हा देशात प्रसिद्ध आहे.
दरवर्षी येथे मोहरमची मोठी विसर्जन मिरवणूक काढण्यात येत असते.
यंदाच्या वर्षी मात्र करोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे मोहरम सवारी विसर्जन मिरवणुकीस निर्बंध घालण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनीही सर्व नियमांचे पालन करीत सवाऱ्यांचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाला सहकार्य केले.
कोठला व हवेली या दोन्ही ठिकाणी अतिशय शांतता आणि धार्मिक वातावरणात सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले.
सवारी विसर्जनासाठी मोजक्याच भाविकांची नियुक्ती करण्यात आली होती.
प्रशासनातर्फे त्यांना पास देण्यात आले होते.
कोठला परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता.
कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिषाने डॉक्टरला साडेसात लाखांचा गंडामासे पकडण्यासाठी गेले, सेल्फीच्या नादात आईसमोर सख्खे भाऊ नदीत बुडालेदरम्यान, मोहरमच्या पार्श्वभूमीवर कोठला परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
कोठला आणि हवेलीकडे येणारे सर्व रस्ते बंद केले होते.
पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेण्यात येत होता.
मुंबई- हिंदी सिनेसृष्टीसाठी २०२० हे वर्ष फारच कठीण आहे.
एकीकडे करोना व्हायरस सारख्या महामारीने आर्थिक संकट आणलं आहे तर दुसरीकडे अनेक नावाजलेले आणि हरहुन्नरी कलाकार जगाचा निरोप घेत आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचंही प्रदीर्घ आजाराने निधन झालं.
क्रोनिकल लीवर डिसीस आजाराने त्रस्त होते.
त्यांच्या फिल्मी सफरनाम्यावर एक नजर टाकू.
..प्रत्येक तरूणाप्रमाणे निशिकांत यांचंही सिनेमावर अतीव प्रेम होतं.
निशिकांत यांनीही सुरुवातीच्या काळात अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं.
भविष्यात त्यांचं हे स्वप्न पूर्णही झालं.
२००४ मध्ये आलेल्या हवा आने दे सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
या सिनेमात त्यांनी अभिनेता म्हणून काम केलं.
प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे प्रदीर्घ आजाराने निधनयानंतर निशिकांत यांनी काही मराठी सिनेमात अभिनेता म्हणून काम केलं.
यातला गाजलेला सिनेमा होता सातच्या आत घरात.
या सिनेमाचं लेखनही निशिकांत यांनीच केलं होतं.
पण यानंतर अभिनयात त्यांना फारसं यश मिळालं नाही.
पण सिनेमात्या प्रेमाखातर त्यांनी अभिनयातून आपलं लक्ष दिग्दर्शनाकडे वळवलं.
अगदी थोड्याच काळात त्यांनी स्वतंत्रपणे सिनेमे दिग्दर्शित करायला सुरुवात केली.
View this post on Instagram माझे मित्रा #दिग्दर्शक #Nishikantkamat आणि #satishrajwade अश्या बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटतात तेव्हा #Dombivlifast आणि #Gaiir #सिनेमा करताना ज्या काही घडामोडी घडल्या त्यच्या आठवणी निघाल्या .
....ह्या प्रोजेक्ट्स मुळे आम्ही मनाने खूपच जवळ आलो होतो .