text stringlengths 0 6.48k |
|---|
२१ १५ एप्रिल ४३७ ४३ ९. |
८४ ३ मे २९५१ ४९९ २४. |
३३ १७ मे ४०१८ २०१४ ५०. |
१२ १९ जून १३७५० ८५२४ ६१. |
९९२८ जुलै ८१०५६ ५१६२९ ६३. |
६९१२ ऑगस्ट ११५१२८ ८६८१७ ७५. |
४०गेल्या महिन्यात सर्वाधिक मृत्यूपुणे शहर आणि जिल्ह्यात दोन जुलैपर्यंत ८०६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. |
एकूण रुग्णांची संख्या २९ हजार ९४४ इतकी होती, तर मृत्यूदर ३. |
२३ टक्के होता. |
दोन जुलै ते १२ ऑगस्ट यादरम्यान रुग्णसंख्येने एक लाख १५ हजारांचा टप्पा ओलांडला. |
या ४० दिवसांत १८१३ मृत्यू नोंदवले गेले. |
प्रतिनिधी, पुणेकरोनाच्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा मिळाल्यास उपचार करणे शक्य होईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्तपेढ्यांकडे धाव घेतली. |
मात्र, शनिवारी दिवसभरात ओ आणि बी पॉझिटिव्हसह अन्य रक्तगटाचे प्लाझ्मा मिळू शकले नाहीत. |
प्लाझ्मासाठी मागणी वाढली असली, तरी त्या तुलनेत दाते तसेच प्लाझ्मा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून 'प्लाझ्मा देता का प्लाझ्मा' अशी विनवणी सुरू झाली आहे. |
शहरातील रुग्णालयांमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर जाणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. |
आजमितीला शहरातील रुग्णांची संख्या पाहता दोन हजारपेक्षा रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. |
तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्याही चारशेच्या घरात आहे. |
अशा गंभीर रुग्णांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडासह अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी नाही. |
अशा रुग्णांना जीवदान देण्यासाठी ससून, नवले रुग्णालय आणि पूना हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपीचे उपचार सुरू आहेत. |
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यासाठी देशातील मोजक्याच रुग्णालयांना परवानगी दिली आहे. |
काही प्रमाणात प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असून रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. |
त्यामुळे उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांकडून प्लाझ्मा आणण्याची सूचना नातेवाइकांना केली जात आहे. |
त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाइक रक्तपेढ्यांकडे धाव घेत असून प्लाझ्माची मागणी करीत आहेत. |
परंतु, रक्तपेढ्यांना अद्याप परवानगी नसल्याने त्यांच्याकडून नकार दिला जात आहे. |
जनकल्याण रक्तपेढीचे वैद्यकीय संचालक डॉ. |
अतुल कुलकर्णी म्हणाले, 'सध्या प्लाझ्मास मोठी मागणी आहे. |
गंभीर रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णांचे नातेवाइक; तसेच रुग्णालयांकडून प्लाझ्मासाठी चौकशी सुरू आहे. |
प्लाझ्मा देण्यास रक्तपेढ्यांना अद्याप परवानगी नाही. |
त्याबाबतची नियमावलीदेखील स्पष्ट नाही. |
राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे आम्ही याबाबत पाठपुरावा करीत आहोत. |
प्लाझ्माची गरज पाहता करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांनी दान करण्यासाठी पुढे आले पाहिजे. |
'रुग्णाचे नातेवाइक पंकज भावसार म्हणाले, 'माझ्या सासऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला. |
डॉक्टरांनी प्लाझ्मा आणण्यास सांगितले. |
अनेक ठिकाणी चौकशी केली. |
मित्रांकडे विचारणा केली. |
पण प्लाझ्मा कोठेच मिळाला नाही. |
अखेर रक्तपेढ्यांशी संपर्क केला. |
परंतु, त्यांच्याकडे उपलब्धता नाही. |
'सध्या डेंगीच्या आजाराच्या रुग्णांना प्लेटलेटची मागणी होत आहे. |
त्याकरिता प्लाझ्मासाठी मागणी वाढली आहे. |
परंतु, दाते मिळत नाहीत. |
त्याशिवाय रक्तपेढ्यांमध्ये अद्याप ते मिळत नसल्याने आम्हीच दाते पुरवित आहोत. |
शनिवारी दिवसभरत ओ आणि बी पॉझिटिव्ह या रक्तगटाचा प्लाझ्मा कोठेच उपलब्ध झाला नाही. |
दात्यांनी पुढे यायला हवे तरच तुटवडा दूर होईल. |
- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्टसद्यस्थितीत करोनाची भीती, सामाजिक दडपण, कुटुंबातून प्रोत्साहन नसल्याने दाते पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. |
काही जणांनी रक्तदान केले नाही. |
प्लाझ्मा दान हा रक्तदानाचा पुढचा टप्पा आहे. |
रक्त काढून प्लाझ्मा तयार करण्याबबात रक्तपेढ्यांमध्ये जागृती नाही. |
बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असली, तरी जून महिन्यापर्यंत बरे झालेल े रुग्ण पात्र ठरणार आहेत. |
- डॉ. |
अतुल कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, जनकल्याण रक्तपेढी |
नवी दिल्लीः गलवान खोऱ्याच्या उत्तरेस असलेल्या डेपसांगच्या मैदानावरून सैनिकांना मागे हटवण्याच्या मुद्द्यावर भारत आणि चीन सैन्यात मेजर जनरल स्तरावर सुरू आहे. |
ही बैठक दौलत बेग ओल्डी येथे सुरू आहे. |
भारताकडून ३ माउंटन डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अभिजित बापट हे भारताच्या वतीने चर्चेचे नेतृत्व करत आहेत. |
तर चीनच्या वतीने पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) वरिष्ठ कर्नल हान रुई थेआ हे बैठकीचे नेतृत्व करत आहेत. |
ही बैठक आज सकाळी सुरू झाली आहे. |
गलवान खोऱ्यात उत्तर भागात असलेल्या डेपसांगच्या मैदानावरून सैनिक मागे हटवण्याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे. |
डेपसांगच्या विरोधी दिशेला सुमारे १५ हजार चिनी सैनिकांना तैनात आहेत. |
या बैठकीत १६००० फूट उंचीवरील ९०० चौरस किलोमीटर मैदानी भागातून सैनिक मागे घेण्याबाबत आणि तिथून हटवण्याच्या यंत्रणेवर काम करण्यासंदर्भात चर्चा होईल. |
एलएसीवर (प्रत्यक्ष ताबा रेषा) यथास्थिती निर्माण करण्यासाठी कमांडर स्तरावर चर्चा झाली होती. |
पण त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. |
यानंतर आज मेजर जनरल स्तरीय चर्चा होत आहे. |
भारतीय लष्कराचा डेपसांगच्या मैदानावर वचक आहे. |
तर चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी त्याच्या पूर्वेकडे आहे. |
दौलत बेग ओल्डीच्या मोक्याच्या हवाई तळापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या 'बॉटलनेक' नावाच्या भागावर चिनी सैन्याने लक्ष केंद्रीत केलं आहे. |
दोन्ही बाजूचे सैनिक गस्त घालण्यापासून एकमेकांना विरोध करत आहेत. |
तिथे प्रत्यक्ष ताबा रेषेची धारणा कित्येक किलोमीटरने बदलते. |
६ जूनपासून ते आतापर्यंत भारत आणि चिनी सैन्यात पाच बैठका झाल्या आहेत. |
आता ही सहावी बैठक आहे. |
बोगस करोना रिपोर्ट फक्त १ हजार रुपयांत, असा झाला भांडाफोडकुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेशचीनची घुसखोरी चीन भारतीय सीमेत सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. |
जून महिन्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये यावरूनच रक्तरंजित संघर्ष झाला होता. |
ज्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. |
त्याचबरोबर उत्तर लद्दाखच्या डेपसांग-डीबीओ भागांमध्ये नवीन मोर्चा उघडण्याचा चीनचा कुटील डाव आहे. |
डेपसांगमध्ये भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनने सैनिकांची तैनाती पूर्वीपेक्षा जास्त वाढवली आहे. |
चिनी वाहनांची हालचाल वाढली आहे. |
भारतीय सैनिकांनी त्यांना सहसा तिथून पिटाळून लावतात. |
पण यावेळी त्यांची संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे. |
प्रतिनिधी, पुणे करोनाचे वाढते आकडे सातत्याने धडकी भरवत असताना पुणेकरांसाठी येत्या दोन-तीन आठवड्यांनंतर दिलासादायक चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. |
मुंबईत यापूर्वी प्रादुर्भावाचा उच्चांक असलेली असलेली परिस्थिती सध्या पुण्यात निर्माण झालेली आहे. |
मुंबईचा अनुभव पाहता पुण्यातील ही परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे. |
त्यानंतर पुण्यातील करोनाचा जोर ओसरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले, 'जिल्हा प्रशासनाने मुंबई आणि पुण्यातील प्रादुर्भावाची तुलना केली असून, त्यामध्ये पुणेकरांसाठी दिलासादायक चित्र दिसते आहे. |
मुंबईमध्ये १४ जूनच्या सुमारास करोना संसर्गाचा उच्चांक गाठला होता. |
पुण्यात उच्चांक गाठण्यासाठी २६ जुलै उजाडला. |
त्यामुळे येत्या दोन ते तीन आठवड्यांनंतर पुण्यातील प्रादुर्भाव ओसरण्यास सुरुवात होईल. |
' मुंबई आणि पुण्यातील आकडेवारीचे तौलनिक विश्लेषण करताना राव म्हणाले, 'पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा या सर्व ठिकाणची परिस्थिती पुणे म्हणून गृहीत धरण्यात आली आहे. |
पुण्यातील करोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी २२ दिवसांवर पोहोचला आहे. |
पुण्यात दहा लाख लोकसंख्येमागे दर दिवशी ९३० चाचण्या करण्यात येत आहेत. |
ही संख्या राज्यात सर्वाधिक असून, राज्यात सरासरी ३१५ तर मुंबईत ६१० चाचण्या केल्या जातात. |
' 'मुंबईतील हिट रेट (एकूण चाचण्या आणि त्यातुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या) १४ टक्के आहे; तर, पुण्याचा २१ टक्के आहे. |
मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दर दिवशी एक टक्का आहे. |
पुण्यात सध्या ते तीन टक्के आहे. |
पुण्याचा दर एक टक्क्यांपर्यंत कमी आल्यानंतर येथील बाधितांची संख्याही घटेल,' अशी माहिती राव यांनी दिली. |
पुण्यातील परिस्थितीत आटोक्यात येण्यासाठी अजून वेळ लागणार असल्यानेची शक्यता गृहीत धरूनच जंबो रुग्णालयांची उभारणी सुरू करण्यात आली आहे. |
पुणेकरांसाठी पुढील दोन ते तीन आठवडे महत्त्वाचे असून, या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजचे आहे. |
हिट रेट २५ टक्के मुंबईचा सरासरी 'हिट रेट' हा २२ टक्के इतका आहे. |
मात्र, गेल्या एका आठवड्यातील परिस्थिती पाहता हा दर १४ टक्क्यांपर्यंत खाली आहे. |
पुण्याचा सरासरी 'हिट रेट' हा २१ टक्के इतका आहे. |
मात्र, गेल्या आठवड्यातील परिस्थिती पाहता हा दर २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. |
पुण्यातील 'हिट रेट' कमी होण्यास सुरूवात झाली की, करोनाचा जोर ओसरण्यास सुरुवात झाल्याचे ते निदर्शक असणार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.