text stringlengths 0 6.48k |
|---|
.......अविस्मरणीय आठवणी आहेत . |
@marathisanmaan @marathiiworld @marathicineyug @marathiasmitaofficial #cinema #marathifilmsfanclub #marathifilm #internationalcinema A post shared by Sandeep Kulkarni (@sandeepkulkarniofficial) on Dec 11, 2019 at 12:18am PST २००५ मध्ये त्यांनी पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. |
तो म्हणजे सुपरहिट डोंबिवली फास्ट. |
या सिनेमामुळे निशिकांत कामत हे नाव घराघरात पोहोचलं. |
पहिलाच दिग्दर्शित सिनेमा आणि त्याला मिळालेलं घवघवीत यश यामुळे दिग्दर्शन वर्तुळात निशिकांत यांचं नाव ठळकपणे घेतलं जाऊ लागलं. |
या सिनेमानंतर निशिकांत यांच्यातला दिग्दर्शक पुर्णपणे स्वतंत्र झाला आणि त्यांनी इतर भाषिक सिनेमांचंही दिग्दर्शन करायला सुरुवात केली. |
२००७ मध्ये त्यांनी एक तमिळ सिनेमाही दिग्दर्शित केला. |
२००८ मध्ये ते पुन्हा एकदा हिंदी सिनेमांकडे वळले आणि 'मुंबई मेरी जान' हा सिनेमा दिग्दर्शित केला. |
या सिनेमामुळेही निशिकांत यांच्या नावाची चर्चा झाली. |
एकीकडे दिग्दर्शनात घवघवीत यश मिळत असताना त्यांच्यातला अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. |
२०११ मध्ये आलेल्या ४०४ या हिंदी सिनेमात त्यांनी अभिनय केला. |
यानंतर २०११ मध्ये त्यांनी जॉन अब्राहम स्टारर फोर्स सिनेमाचं दिग्दर्शन केलं. |
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमावला होता. |
या सिनेमाने त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. |
यानंतर २०१४ मध्ये रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. |
दृश्यममुळे निशिकांत कामत आले लाइमलाइटमध्ये२०१५ मध्ये आलेल्या दृश्यम सिनेमामुळे निशिकांत कामत लाइमलाइटमध्ये आले. |
निशिकांत यांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जातं. |
बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. |
यानंतर २०१६ मध्ये जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. |
याशिवाय इरफान खान स्टारर मदारी आणि अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनच्या भावेश जोशी सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता. |
निशिकांत कामत यांचे आगामी सिनेमेनिशिकांत सध्या दरबदर या त्यांच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत होते. |
२०२२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. |
पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अजून पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. |
सिनेमांशिवाय रंगबाज फिर से आणि फायनल कॉल या दोन टीव्ही प्रोग्रामचेही निशिकांत निर्माते होते. |
जन्म- १७ जून १९७० मध्ये मुंबईतील दादर येथे निशिकांत यांचा जन्म झाला. |
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निशिकांत यांचं स्वप्न यशाच्या शिखरावर पोहोचण्याचं होतं. |
रूईया कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. |
पुरस्कार- निशिकांत यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे. |
२००६ मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. |
तसेच या सिनेमासाठी फिल्मफेअरचा बेस्ट क्रिटिक अवॉर्डही मिळाला होता. |
मुंबई: राजस्थानात काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतल्यानं तेथील सत्तांतराची चर्चा फोल ठरली आहे. |
तेथील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करण्यात आली आहे. |
तसंच, महाराष्ट्रातील सरकार कोसळण्याची भाकिते करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवरही सडकून टीका करण्यात आली आहे. |
वाचा: ४८ तासांत माफी मागा नाहीतर. |
.. राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीसनारायण राणे यांनी अलीकडेच बोलताना राज्यातील सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोसळेल, असं भाकीत केलं होतं. |
'राज्यात सरकारचं अस्तित्वच जाणवत नाही. |
आपसातील कुरघोडींतूनच हे सरकार कोसळेल, असं राणे म्हणाले होते. |
वाचा: 'उद्धव ठाकरे, तुम्हाला व तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल'राजस्थानातील कथित 'ऑपरेशन कमळ'वर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपचे खासदार नारायण राणे यांचाही समाचार घेतला आहे. |
शिवसेनेनं त्यांना 'भोंदू डॉक्टर' म्हणून हिणवलं आहे. |
'काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. |
महाराष्ट्रातील पहाटेचे ऑपरेशन फसले. |
आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे,' असा टोला शिवसेनेनं राणे यांचं नाव न घेता हाणला आहे. |
Live: राज्यातील सर्व ठळक घडामोडी एकाच क्लिकवर'राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 'ऑपरेशन कमळ'चेच ऑपरेशन करून भाजपला धडा शिकवला. |
तिथे ऑपरेशन महिनाभर चालूनही फसले. |
भाजपनं आता तरी धडा घ्यावा. |
थोडे थांबावे आणि पुढे जावे, कारण वळणावर धोका आहे,' असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे. |
दावा सोशल मीडियावर एका पत्राचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. |
कथित पणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अयोध्येत झालेल्या राम मंदिर भूमिपूजनावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिले आहे. |
या पत्रात हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तूती केली आहे. |
या पत्रात लिहिले आहे की, प्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सर्वात आधी मी तुम्हाला व तुमच्या टीमला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठीच्या योगदानाबद्दल शुभेच्छा देतो. |
राम मंदिर एक मैलाचा दगड बनवण्यासाठी हिंदू नेहमी तुमचे व तुमच्या टीमचे आभारी राहतील. |
जो एक हिंदू राष्ट्रसाठी नवीन इतिहास बनणार आहे. |
२०२२ निवडणुकीसाठी तुम्हाला आम्ही आताच शुभेच्छा देतो. |
मी राम मंदिराच्या निर्माणासाठी लवकरात लवकर ५० कोटी रुपये पाठवत आहे. |
या पत्रावर मोदी यांची कथित स्वाक्षरी सुद्धा आहे. |
यावर ७ ऑगस्ट २०२० ची तारीख आहे. |
शेयर करण्यात येत असलेले पत्र फेक आहे. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना असे कोणतेही पत्र लिहिले नाही. |
प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या फॅक्ट चेकच्या टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या पत्राला फेक असल्याचे म्हटले आहे. |
हायलाइट्स:देशभरात मुहर्रम जुलूस काढण्यासाठी याचिकाविशिष्ट ठिकाणी असतं तर धोका लक्षात घेऊन परवानगी देणं शक्य - सर्वोच्च न्यायालयपुढील सुनावणी येत्या सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी होणार नवी दिल्ली : करोनाकाळात पाच जणांसहीत मुहर्रम जुलूसला सर्वोच्च न्यायालयानं सध्या तरी परवानगी देण्यास नकार दर्शवला आहे. |
शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाब यांनी संपूर्ण देशभरात मुहर्रम जुलूस काढण्याची परवानगी मागितली होती. |
याचिकाकर्त्यांनी सरकारी गाईडलाईन्सची काळजी घेतली जाईल. |
तसंच यात्रेत केवळ पाच लोक सहभागी होतील, असं म्हटलं होतं. |
या प्रकरणाची पुढली सुनावणी सोमवारी होणार आहे. |
जुलूस काढण्यास परवानगी दिली तर पुन्हा एका समुदायाला करोना फैलावण्याच्या नावावर निशाण्यावर घेतलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाला हे नकोय. |
लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालय देणार नाही असंही न्यायालयानं म्हटलंय. |
मुहर्रम जुलूस संपूर्ण देशात ठिकठिकाणी निघेल यासाठी प्रत्येक राज्य सरकारची परवानगी किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, असंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी म्हटलंय. |
यावर, याचिकाकर्त्यांनी मुहर्रम जुलूस प्रत्येक वर्षी निघतो, असं म्हटलं. |
यावर, करोना मात्र प्रत्येक वर्षी नसतो, असं प्रत्यूत्तर न्यायालयानं दिलं. |
वाचा :नवा रेकॉर्ड! |
देशात २४ तासांत ७५ हजारांहून अधिक नवीन रुग्ण दाखलवाचा :परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना उड्डाण मंत्रालयाची महत्त्वाची सूचना'. |
.. म्हणून जगन्नाथ पुरी यात्रेला मिळाली परवानगी'न्यायालयात मुहर्रमला परवानगी देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी जगन्नाथपुरी यात्रेचं उदाहरण दिलं. |
यावर सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 'तुम्ही संपूर्ण देशभरात जुलूस काढण्याची परवानगी मागत आहात. |
जगन्नाथ पुरी यात्रा एका विशिष्ट जागेवरच होते. |
इथे एक रथ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. |
जर एका ठराविक जागेची गोष्ट असतील तर जोखिम लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ शकलो असतो' असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. |
जगन्नाथ पुरी यात्रेसाठीही सर्वोच्च न्यायालयानं परवानगी नाकारली होती. |
'यात्रेची परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत. |
महामारीच्या काळात असं आयोजन केलं जाऊ शकत नाही' असं म्हणत परवानगी नाकारण्यात आली होती. |
परंतु, पुनर्विचार याचिका दाखल झाल्यानंतर काही अटींसहीत न्यायालयानं यात्रेची परवानगी दिली होती. |
देशभरात मुहर्रम जुलूसला परवानगी देण्यास न्यायालयाचा नकारवाचा :'बाहुबली' आमदार मुख्तार अन्सारीच्या अवैध बांधकामांवर बुलडोझरवाचा :लज्जास्पद! |
विधवा महिला, दिव्यांग व्यक्तीच्या तोंडाला काळं फासून गावभर धिंड |
प्रतिनिधी, पुणेपुणे शहर आणि जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, १२ ऑगस्टपर्यंत ७५ टक्क्यांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. |
पूर्ण जिल्ह्यात सध्या एक लाख १५ हजार १२८ करोनाबाधित असून, त्यापैकी ८६ हजार ८१७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. |
मात्र, गेल्या चाळीस दिवसांत करोनामुळे १८१३ मृत्यूही झाले आहेत. |
महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने करोनाबाबतची मार्च महिन्यापासूनची आकडेवारी जाहीर केली आहे. |
पुण्यात मार्चअखेर ४३ रुग्णांची नोंद झाली होती. |
त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर १६ जण करोनामुक्त झाले होते. |
करोनाची लागण झालेल्या पहिल्या महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण केवळ ३७ टक्के इतके होते. |
प्रशासनाने गेल्या चार महिन्यांत करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वेगाने वाढले असून, १२ ऑगस्टपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील ७५. |
४० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. |
शहर आणि जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला. |
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, १९ जूनला १३ हजार ७५९ इतकी रुग्णसंख्या होती. |
त्यामध्ये वेगाने वाढ होऊन २८ जुलैला हीच संख्या ८१ हजारांच्या घरात पोहोचली. |
मात्र, त्याच वेगाने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून, ७५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. |
पुण्यात २६ जुलैनंतर करोनाबाधितांची संख्या कमी होईल, अशी शक्यता वाटत होती. |
मात्र, लागण होण्याचे प्रमाण तितकेसे कमी न झाल्याने प्रशासनापुढील चिंता कायम आहे. |
त्यातच लॉकडाउन शिथिल झाले असल्याने व्यवहार पूर्ववत होत आहेत. |
त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा रुग्णवाढीचा आलेख उंचावला, तर त्याला तोंड देण्यासाठी जंबो रुग्णालये लवकर साकारणे आवश्यक आहे. |
तारीख रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण टक्केवारी ३० मार्च ४३ १६ ३७. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.