text
stringlengths
0
6.48k
मुंबई- पुणे तुलना दहा लाख लोकसंख्येमागील चाचण्या - ६१० ९३०हिट रेट १४ टक्के २५टक्के रुग्णसंख्या उच्चांक - १४ जून २६ जुलैरुग्ण दुप्पट होणाचा कालावधी - ७५ दिवस २२ दिवसरोजच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण - १ टक्का ३ टक्के
नवी दिल्ली: केंद्र सरकारने अनलॉक ३.
० च्या कालावधीत (Unlock 3.
0) जिम आणि योग संस्था (Yoga institutes Guidelines) सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
५ ऑगस्टपासून जिम आणि योगसंस्था सुरू होत आहेत.
या बरोबरच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या ठिकाणांवर करोनाचा संसर्ग (Corona in India Updates) रोखण्यासाठी सुरक्षात्मक नियम जारी केले आहेत.
दरम्यान देशभरात करोना रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली असून ३८ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(Guidelines for Yoga Institutes & Gymnasiums)या नियमांचे करावे लागणार पालन>> योग आणि जिममध्ये लोकांसाठी पुरेशी जागा असावी.
सोशल डिस्टन्सिंगसाठी मशीन आणि इतर गोष्टींमध्ये योग्य ते अंतर असावे.
>> जर परिसराबाहेर जागा असेल तर तेथे उपकरणे ठेवण्याची व्यवस्था करावी.
>> परिसरात येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांचा वापर करावा.
या व्यतिरिक्त रांगांचे व्यवस्थापन करण्याची सिस्टमचा वापर करावा आणि कमीतकमी ६ फुटांचे अंतर राहील हे पाहावे.
>> पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस सिस्टमचा ( स्पर्श होणार नाही अशी पद्धत) वापर केला जावा.
>> एसी/ व्हेंटिलेशनच्या वापरासाठी CPWD च्या नियमांचे पालन करावे.
सर्व एसीचे तापमान २४ ते ३० डिग्रीदरम्यान असावे.
अशा प्रकारे ह्यूडीटीचा स्तर ४० ते ७० टक्क्यांपर्यंत असावा.
ताजी हवा येण्यासाठी अधिक जागा असावी आणि व्हेंटिलेशनसाठी पुरेशी जागा असावी.
>> जिममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असावी.
लॉकरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत केला जाऊ शकतो.
>> डस्टबीन आणि ट्रॅश केन नेहमीच झाकलेले असावेत.
>> परिसराचे सतत निर्जंतुकीकरण केले जावे.
कर्मचारी आणि लोकांनी ज्याचा वापर केला आहे असे प्रवेशद्वार, बिल्डिंग, खोल्या, वॉशरूम, शौचालये आणि इतर सामानांचे सतत निर्जंतुकीकरण केले जावे.
वाचा: अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार; मुस्लिम नेत्याचा निर्धारजिम आणि योगसंस्थांनी असे करावे प्लॅनिंग>> जास्तीत जास्त क्षमतेचे मूल्यांकन करून या संस्थांनी वेळेचे नियोजन करावे आणि त्याबाबत सदस्यांना माहिती द्यावी.
>> योग क्रिया काही काळासाठी स्थगित करावी.
जर ती करणे आवश्यक असेल तर ती खुल्या जागेत केली पाहिजे.
योगाकरिता आयुष मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे पाहिली जावीत.
>> फिटनेस रूम आणि क्लासेसच्या सत्रांदरम्यान १५ ते ३० मिनिटांचे अंतर असले पाहिजे.
येणारे जाणारे एकत्र भेटू नयेत हा त्यामागील उद्देश.
वाचा: अमित शहा आणि राम मंदिर पुजाऱ्याला अशुभ मुहूर्तामुळे करोना: दिग्विजय>> शक्य असल्यास फिटनेस क्लास ऑनलाइन घ्यावेत.
खोलीच्या आकारानुसार किती लोकांना वर्गात घ्यावे याबाबत योजना आखली जावी.
>> योग संस्था / जिममधील वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठीही नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
पर्सनल प्रशिक्षक ६ फूटांच्या अंतराचे पालन करावे.
प्रशिक्षक आणि व्यायाम करणाऱ्यांमध्ये शारीरिक संपर्क येणार नाहीत अशा प्रकारचे व्यायाम प्रकार घ्यावेत.
>> प्रत्येक सत्रात ग्राहकांची संख्या ठरवा आणि सर्व ग्राहकांमधील अंतरांची काळजी घ्या.
वाचा: अयोध्येत भूमिपूजनाला उपस्थित राहणार नाही, माझे नाव यादीतून रद्द करा: उमा भारती
प्रतिनिधी, पुणे: मनापासून प्रेम करणारी आपली प्रेयसी रिक्षा चालकाबरोबर पळून गेली.
त्यामुळे प्रेमभंग झालेल्या प्रियकराने रिक्षाचालकांनाच लक्ष्य केले.
त्यांचे महागडे फोन त्याने लांबवले.
लष्कर पोलिसांनी या प्रेमवीर चोरट्याला अटक केली आहे.
त्याने ८० हून अधिक मोबाइल चोरल्याची माहिती उघड झाली आहे.
पुण्यासह मुंबईमधील अनेक रिक्षाचालकांचे मोबाइल या चोरट्याने लंपास केले आहेत.
आसिफ उर्फ भुरा शेख (वय ३७, सध्या रा.
पूना कॉलेज जवळ, मूळ रा.
बिहार, उत्तर प्रदेश) असे या चोरट्याचे नाव आहे.
आसिफची प्रेयसी गुजरातच्या अहमदाबादमधील होती.
तो सध्या पूना कॉलेजजवळ राहत होता.
काही महिन्यांपूर्वी त्याच्या प्रेयसीचे एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले.
याची माहिती आसिफला मिळण्याआधीच तिने त्या रिक्षावाल्यासोबत पळ काढला.
आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेली हे ऐकून आसिफला चांगलाच धक्का बसला.
त्याला रिक्षाचालकांची चीड आली.
त्याच रागातून त्याने रिक्षाचालकांना लक्ष्य केले.
त्यांचे मोबाइल चोरण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
थरार!
पोलिसांनी केला गुंडाचा १२ किमी पाठलाग; दोन्ही बाजूंनी गोळीबार, नंतर.
..न्यायनिवाडा करणाऱ्या पंचांनीच महिलेवर केला सामूहिक बलात्कारवडापाव अडीच लाखांना पडला!
घडलंच असं की.
..कात्रज, कोंढवा तसेच शहरातील विविध भागांतून रिक्षामधून प्रवास करताना आसिफ रिक्षाचालकांना हेरून त्यांच्याकडे महागडे मोबाइल आहेत का हे पाहायचा.
त्यानंतर रिक्षातून उतरल्यावर मोबाइल घरीच राहिला असल्याची बतावणी करत एक फोन करण्यासाठी संबधित रिक्षा चालकाकडून मोबाइल घ्यायचा.
चालक आपली रिक्षा उभी करण्यात गुंग असताना तो मोबाइल घेऊन पसार व्हायचा.
मोबाइल चोरणाऱ्या आसितची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
त्याने चोरीचे कारण सांगितल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्य वाटले.
चोरी करताना आसिफने इतर कुणाचेही फोन न चोरता केवळ रिक्षाचालकांचे फोन चोरल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता त्याला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
टीव्ही पत्रकाराची हत्या; आधी लाठ्याकाठ्यांनी मारहाण, नंतर गोळ्या घातल्याधक्कादायक!
७ वर्षीय मुलानं ४ वर्षांच्या मुलाचा चिरला गळा; मृत्यूशी झुंजप्रेमभंग झाल्याने त्याचा बदला म्हणून हा चोरटा रिक्षाचालकांना टार्गेट करून त्यांचे महागडे फोन चोरत होता.
त्याने ८० मोबाइल चोरले असून त्यापैकी १२ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
- चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे
गंगेवर अनेकविध विधी, पूजाअर्चा, दर्शन आदि कारणासाठी लोक येथे येतात.
तेव्हा एकमेकाची वाट पाहतात किंवा दर्शन झाल्यावर एखाद्या ठिकाणी बसतात.
परंतु कोरोणाच्या प्रादुर्भाव काळात प्रत्येकाने मुखपट्टी बांधून शारीरिक अंतर राखूनच बसावे याचे भान श्री गंगा गोदावरी मंदिराच्या बाहेर ठेवलेल्या बाकावर बसलेल्या या भाविकांना नसल्याचे चित्र येथे दिसत आहे.
अशी परिस्थिती गंगेवर सर्वत्र पहायला मिळते.
कोरोणावर मात करावयाची असेल तर सर्व संबंधितांनी मूखपट्टी बांधून शारीरिक अंतर राखून बसावे.
अंशुमन शिरोरे
अमरेन्द्र धनेश्वर'अवर नॅशनॅलिटी इज ह्युमॅनिटी; अवर होम इज द वर्ल्ड.
' असं डॉ.
सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत असत.
त्यांची ही उक्ती आपल्या कृतीतून, जगण्यातून आणि मरण्यातूनही खरी करून दाखविणारे गायक-कलाकार म्हणजे पं.
जसराज!
गेली कित्येक वर्षं जसराज युरोप आणि अमेरिकेत संगीताच्या कार्यक्रमांसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रदीर्घ वास्तव्य करून होते.
वयोमानानुसार प्रकृती साथ देत नसतानाही, आपलं हे व्रत त्यांनी अखंडपणे सुरूच ठेवलं.
आपला अंतकाळ फारसा दूर नाही याची जाणीवही त्यांना असणारच.
परंतु देह इथे भारतात ठेवला काय किंवा अमेरिकेतल्या न्यू जर्सीत ठेवला काय; जसराजांच्या दृष्टीनं सर्व सारखंच होतं.
कारण 'हे विश्वचि माझे घर' हा त्यांचा बाणा बनला होता.
१९५० नंतर हिंदुस्थानी संगीताची पाश्चात्य जगतात गांभीर्याने दखल घेतली जाऊ लागली.
तसं छोट्या प्रमाणावर एकोणिसाव्या शतकापासूनच हिंदुस्थानी संगीतकार विलायतेला जाऊ लागले होते.
१८८६ साली मुशर्रफ खान हे रुद्रवीणा वादक लंडनला कार्यक्रमानिमित्त गेले होते.
परंतु खरा ओढा सुरू झाला तो १९५५ नंतर अली अकबर खान आणि रविशंकर यांच्या दिग्विजयी अमेरिका वारीनंतर.
जसराजांचं वैशिष्ट्य असं, की ते वादक म्हणून तिथे गेले नाहीत.
ते आपलं कंठसंगीत पाश्चात्यांना आणि तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांना ऐकविण्यासाठी, रिझविण्यासाठी आणि शिकविण्यासाठी जात राहिले.
त्यातून त्यांनी जो लोकसंग्रह केला, त्यामुळे अवकाशात सोडण्यात आलेल्या एका कृत्रिम ग्रहाला त्यांचं नाव देण्यात आलं.
यापूर्वी अवकाशातील 'चॅलेंजर' या यानात पृथ्वीवरील सर्जनशीलतेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून केशरबाई केरकरांची 'जात कहाँ हो' ही भैरवी जतन करून ठेवण्यात आली होती.
केशरबाईंव्यतिरिक्त असा सन्मान फक्त जसराजांच्या वाट्याला यावा, हे केवढं मोठं भाग्य!
जसराजांची कारकीर्द विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडली आणि एकविसाव्या शतकाची दोन दशकंही त्यांनी गाजवली.
जसराज हे मेवाती घराण्याचे गायक मोतीराम यांचे सुपुत्र.
त्यांचे दोन मोठे भाऊ मणिराम आणि प्रताप नारायण हेही गायक होते.
जसराज सुरुवातीला तबलावादक होते.
प्रताप नारायणांनी त्यांना तबल्याची तालीम दिली होती.
फाळणीपूर्वीच्या काळात लाहोरला एका कार्यक्रमात कुमार गंधर्व कोणता राग गायले, यासंबंधी संगीतकारांच्या एका जमघटमध्ये 'कुमार भूपाली गायले' असं जसराजांनी ठासून सांगितलं, तेव्हा त्याविषयी दुमत व्यक्त करणारी गवई मंडळीही होती.
नंतर दिल्लीला स्थायिक झालेले अमरनाथ ('जोगियासे प्रीत किये दुख होय' या लताबाईंनी गायलेल्या प्रसिद्ध गीताचे संगीतकार) एकदम संतापून जसराजांशी बोलले असं सांगतात.