text stringlengths 0 6.48k |
|---|
राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास, अशी खंत व्यक्त करतानाच भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. |
पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. |
सगळ्यांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे. |
पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. |
त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील. |
बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. |
राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे. |
श्रीरामाचीही तीच इच्छा असेल! |
सारा देश आज एकसुरात गर्जत आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे. |
दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेनेने ही सल बोलून दाखवली आहे. |
राम मंदिर भूमिपूजनः दिव्यांच्या तेजात अशी उजळली अयोध्या, सर्वत्र राम नामाचा जयघोषशिवसेनेने काय म्हटलं? |
>> डॉ. |
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राममंदिराचे श्रेय पी. |
व्ही. |
नरसिंह राव व राजीव गांधी यांना दिलेच आहे. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते राममंदिराचे श्रेय द्यायला तयार नाहीत, पण मोदी यांच्या काळातच न्यायालयाच्या गुंत्यातून राममंदिर सुटले व आजचा सुवर्णक्षण उगवला हे मान्य करावेच लागेल. |
तसे नसते तर राममंदिराच्या बाजूने निर्णय देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर लगेच राज्यसभेचे सदस्य झाले नसते. |
राममंदिर निर्माणासाठी अनेकांनी वेगवेगळय़ा प्रकारे किंमत मोजली आणि योगदान दिले ते असे. |
>> बाबरीचा ढाचा संपूर्ण जमीनदोस्त होताच उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा दिला. |
राममंदिरासाठी कल्याणसिंग यांनी आपल्या सरकारचाच त्याग केला. |
ते कल्याणसिंग आजच्या सुवर्ण सोहळ्याला मंचावर नाहीत, पण निमंत्रितांच्या यादीत तरी असावेत ही अपेक्षा. |
>> राममंदिराच्या लढ्याने देशाला हिंदुत्वाचा खरा सूर सापडला व त्याच सुराचा धागा पकडत भाजप आणि शिवसेनेने राजकीय शिखर पार केले हे मान्य केले पाहिजे. |
लालकृष्ण आडवाणी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाची ही ज्वाला पेटत ठेवली. |
देशातील बहुसंख्य हिंदूंच्या छातीवर पाय देऊन कुणाला राजकारण करता येणार नाही. |
निधर्मीपणाचे लक्षण म्हणजे फक्त एकाच धर्माचे लांगूलचालन नाही. |
हिंदू समाजाला त्यांच्या श्रद्धांशी तडजोड करता येणार नाही व त्यांच्या भावना लाथाडून पुढे जाता येणार नाही. |
राम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्हणाले. |
..अकलेचे तारे तोडले, पाकच्या नव्या नकाशावर भारताचे सणसणीत उत्तर |
दावा सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला जात आहे. |
ज्यात न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेयरवर लावलेल्या बिलबोर्ड्समध्ये भगवान रामचा फोटो दिसत आहे. |
दावा करण्यात येत आहे की, अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजनाच्या आनंदाने बिलबोर्डावर भगवान राम यांचा फोटो लावला आहे. |
हा फोटो फेक आहे आणि अन्य एका फोटोसोबत छेडछाड करून हा फोटो बनवला आहे. |
काही संबंधित कीवर्ड्सच्या मदतीने आम्ही फोटोला सर्च केले. |
त्यानंतर आम्हाला खरा फोटो मिळाला. |
पाहा खरा फोटो खऱ्या फोटोला एडिट करुन त्यात भगवान रामचा फोटो जोडला गेला आहे. |
पाहा खरा आणि फेक फोटो एकत्र आम्हाला एक अशीच वेबसाईट मिळाली. |
या वरून कोणीही युजर टाइम्स स्क्वेयरच्या याच फोटोवर आपल्या मनपसंतीचा फोटो लावू शकतो. |
निष्कर्ष टाइम्स स्क्वेयर बिलबोर्ड वर भगवान रामचा फोटो फेक आहे, असे 'मटा फॅक्ट चेक'च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. |
प्रतिनिधी, मुंबईसरासरी वीज बिलाचा भरणा केलेल्या ग्राहकांच्या बिलातून महावितरणने युनिटऐवजी रकमेची वजावट केल्याने ग्राहकांना जबर फटका बसला आहे. |
हा फटका काही हजार रुपयांत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. |
या संदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'ने काही वीजबिलांचा अभ्यास केला. |
त्यानुसार एका ग्राहकाचा लॉकडाउन काळात (१९ मार्च ते १८ जून) या काळात एकूण २४७४ युनिट वीज वापर झाला. |
त्यापोटी त्याचे वीज आकार शुल्क २२ हजार ९१२ रुपये अर्थात, सरासरी ९. |
२६ रुपये प्रति युनिट होते. |
या ग्राहकाने लॉकडाउन काळात एकूण ५३४ युनिट वीज देयकाचा भरणा केलेला आहे. |
२४७४ मधून ५३४ युनिट थेट वजा केल्यास व उर्वरित १९४० युनिट्सचा ९. |
२६ रुपये प्रति युनिट या दराने गुणाकार केला तरी वीज आकार फक्त १७ हजार ९६४ रुपये होतो. |
परंतु महावितरणने तब्बल २२ हजार ९१२ रुपयांचे बिल पाठवत लूट केलेली आहे. |
अन्य एका देयकात, ग्राहकाचा लॉकडाऊन काळातील वीज वापर १५७५ युनिट होता. |
त्यानुसार या ग्राहकाला १२ हजार ४११ रुपये वीज आकारानुसार (सरासरी ७. |
८८ रुपये प्रति युनिट) देयक पाठविण्यात आले. |
या ग्राहकाने ७६४ युनिट्स वीज वापराच्या देयकाचा लॉकडाऊन काळात भरणा केला. |
यामध्ये महावितरणने १५७५ मधून ७६४ वजा करून या ग्राहकाला वीज बिल पाठवणे अत्यावश्यक होते. |
तसे केले असते तर ८११ युनिट्ससाठी ७. |
८८ रुपये प्रति युनिट दराने या ग्राहकाला १२ हजार ४११ रुपयांऐवजी फक्त ६ हजार ९३० रुपयांच्या वीज आकाराचे बिल आले असते. |
पण महावितरणकडून मोठी वसुली झाल्याचे स्पष्ट होत आहे. |
आणखी एका देयकात ग्राहकाचा लॉकडाउन काळातील वीज वापर १४८९ युनिट्स होता. |
या ग्राहकाने लॉकडाऊन काळात ६२७ युनिट्सचा भरणा केला. |
या ग्राहकाला ९,१९० रुपयांचे (प्रति युनिट सरासरी ६. |
१७ रुपये) बिल पाठविण्यात आले. |
त्याऐवजी १४८९ मधून ६२७ युनिट्स वजा करून ८६२ युनिट्सचे देयक पाठवले असते तर या ग्राहकाचा वीज आकार जेमतेम ५ हजार ३२० रुपये असता. |
प्रत्यक्षात तो खूप अधिक आला आहे. |
वजावटीत सुसूत्रताच नाहीलॉकडाउन काळात सरासरी भरणा केलेल्या ग्राहकांना अदानी इलेक्ट्रिसिटी व बेस्टने युनिटची वजावट दिली आहे. |
महावितरणने मात्र रकमेची वजावट दिली. |
यामध्ये कुठल्याही नियमाचे उल्लंघन नसले तरी वजावट किंवा समायोजनात सुसूत्रता नाही व त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. |
खास प्रतिनिधी, नाशिकशहरात संततधार पावसाने दमदार हजेरी लावली असून, त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी वाढू लागली आहे. |
गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या पायाच्या पोटरीपर्यंत पाणी आले आहे. |
पुढील दोन दिवस ग्रामीण भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने धरणातील विसर्ग वाढल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, नदीकाठालगतच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. |
शहरात आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढू लागला आहे. |
विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस अधिक असल्याने धरणांमधील पाणीपातळीत गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. |
त्यामुळे गंगापूर धरणातून शनिवारी सायंकाळी विसर्गही वाढविण्यात आला. |
धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि शहरात सुरू असलेली संततधार यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीतदेखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. |
गोदापात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असून, या हंगामात पहिल्यांदाच गोदाघाटावरील मारुतीच्या मूर्तीला नदीपात्रातील पाण्याचा स्पर्श झाला आहे. |
हे पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे संकेत मानले जाते. |
येत्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. |
सकाळपासून वाढत चाललेल्या पावसाच्या जोरामुळे हा अंदाज खरा ठरण्याचे संकेत मिळू लागले आहेत. |
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, तर अधिक वेगाने विसर्ग केला जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. |
त्यामुळे गोदावरीत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून, नदीकाठच्या रहिवाशांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. |
गेल्या रविवारी गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. |
५०० क्यूसेक वेगाने हा विसर्ग सुरू होता. |
पावसाचा जोर वाढल्याने सध्या गंगापूर धरणातून १५०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. |
परंतु, शहरातील होळकर पुलाखालून मात्र २८०० क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. |
त्यामुळे गोदाघाटावरील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे चित्र आहे. |
वृत्तसेवा, ठाणेपावसाळी पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी, त्यातून होणारे अपघात आणि इतर आपत्ती टाळण्यासाठी गेली काही वर्षे ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटकांना अशा ठिकाणी मज्जाव केला जातो. |
यंदा तर करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने होईल, अशी अपेक्षा होती. |
मात्र अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील जंगल आणि जलाशयांच्या काठी हे नियम खुंटीला टांगले जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. |
गेल्या शनिवार, रविवारी मुंबई, ठाण्यातील अनेक पर्यटक चारचाकी आणि दुचाकी वाहनांनी येऊन या भागात संचार करीत होते. |
या पर्यटकांनी तोंडावर मास्क बांधण्याचे सौजन्यही दाखविलेले नव्हते. |
बारवी धरण परिसरात दिवसभर पर्यटकांची वर्दळ होती. |
धरणाच्या पात्राचा सेल्फी पॉइंटसारखा वापर करून समूह छायाचित्रण सुरू होते. |
त्यापुढे असलेल्या जंगलात तर चक्क रस्त्याशेजारी बैठक मारून काही पर्यटक दारू पिताना दिसत होते. |
अनेक गाड्या रस्त्यावर होत्या. |
त्यावरून जंगलाच्या आतही काही पर्यटक गेल्याचे समोर आले. |
त्यांना हटकण्यासाठी त्या संपूर्ण आठ-दहा किलोमीटरच्या रस्त्यावर वन विभाग अथवा पोलिसांपैकी कुणाचाही पहारा नव्हता. |
जणू काही बारवीचे जंगल पर्यटकांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती शनिवार-रविवारी दिसली. |
महामार्गावरून जोरात वाहने हाकत वाट फुटेल तिकडे पर्यटकांचा संचार सुरू होता. |
गेले महिनाभर हा धुडगूस कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. |
२४ जुलैच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने या वास्तवाकडे लक्ष वेधले होते. |
मात्र पर्यटनस्थळी चौक्या, पहारे नसल्याने पर्यटकांचे फावत आहे. |
धाबे, हॉटेलकडून नियमभंगपार्सलसेवेचे बंध मोडून महामार्गावरील अनेक धाबे मालकांनी पर्यटकांना खाद्यपदार्थ बसून खाण्यास परवानगी दिल्याचे दिसून आले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.