text
stringlengths
0
6.48k
हॉटेल आणि धाबे मालकांनी अनधिकृत सुरू केलेले हे 'बिगिन अगेन' पर्यटकांच्या पथ्थ्यावर पडले.
माळशेजमध्ये मात्र मज्जावमाळशेज घाट परिसरात मात्र पर्यटकांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला.
घाटाच्या पायथ्याशीच महामार्गावर पोलिस पहारा होता.
माळशेजकडे जाणाऱ्या आडवाटांवरही पोलिस प्रवाशांना हटकताना दिसत होते.
त्यामुळे माळशेज घाट परिसरात पर्यटकांचा उच्छाद नव्हता.
मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर चौफेर टीका सुरू केली आहे.
सुशांत प्रकरणात सरकारमधील मंत्र्यावर आरोप करणारे आमदार नीतेश राणे यांनीही या निकालानंतर ट्वीट केलं आहे.
त्यांच्या ट्वीटमुळं वेगळीच चर्चा रंगली आहे.
वाचा: गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत; राजीनाम्याची मागणीसुरुवातीला बॉलिवूडमधील व्यावसायिक स्पर्धेपर्यंत मर्यादित असलेल्या सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते.
भाजपच्या कुठल्याही नेत्याने थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होता.
शिवसेना व ठाकरे कुटुंबाशी राजकीय हाडवैर असलेले भाजपचे खासदार नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनी या संदर्भात अनेकदा थेट ट्वीट केले होते.
सातत्यानं आरोप होऊनही राज्य सरकारनं हे प्रकरण सीबीआयला देण्यास नकार दिला होता.
मुंबई पोलीस व्यवस्थित तपास करत असून इतर कुठल्याही यंत्रणेमार्फत तपासाची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं.
त्यानंतरही सीबीआय चौकशीची मागणी थांबत नव्हती.
सर्वोच्च न्यायालयानं मात्र सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळं भाजप आता आणखी आक्रमक झाला आहे.
भाजपच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया येत आहेत.
नीतेश राणे यांनीही केवळ काही शब्दांचं ट्वीट केलं आहे.
'अब बेबी पेंग्विन तो गियो.
.. इट्स शो टाइम' असं त्यांनी म्हटलं आहे.
#JusticeForSSR असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.
त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
वाचा: आता न्याय होणार!
भाजपने ठाकरे सरकारला घेरले!
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी हवेत आरोप करू नका.
हिंमत असेल तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन आरोप करा, असं खुलं आव्हानच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आज थेट भाजपचं नाव घेऊन हे आव्हान दिलं.
कुणीही हवेतल्या गप्पा मारू नये.
हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करा.
पुरावे घेऊन पुढे या, असं राऊत म्हणाले.
आदित्य ठाकरे हे राजकारणातील उभरतं नेतृत्व आहे.
त्यांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.
पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून ते चांगलं काम करत आहेत.
त्यांचं हे काम अनेकांना खूपत आहे.
कोविड सेंटर उभारण्यात त्यांची मोठी कामगिरी आहे.
एका चांगल्या नेतृत्वाला हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून हे खपवून घेतलं जाणार नाही, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत गोत्यात; सुशांतचा भाऊ ठोकणार अब्रुनुकसानीचा दावामुंबई पोलीस सुशांत प्रकरणाचा तपास करत आहेत.
मात्र पहिल्या दिवसांपासून तपासात अडथळे आणले जात आहेत.
खोटी माहिती जोडली जात आहे.
खोटेपणाची सुरुवात ज्यांनी केली.
त्यांनी आता माघार घ्यावी, असं सांगतानाच जे लोक मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत आहेत.
ते लोक आपल्याच राज्याची बदनामी करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
सुशांतसिंह हा महाराष्ट्राचा मुलगा आहे.
त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाची आम्हाला काळजी आहे.
संवेदना आहे.
या महाराष्ट्राच्या मुलाला आम्ही संपूर्ण न्याय देऊ, असं सांगतानाच सीबीआयपेक्षा आधी मुंबई पोलिसांच्या चौकशीचा अहवाल येऊ द्या, असंही ते म्हणाले.
बिहार पोलीस या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ईडीच्या चौकशीत रियाने लपवला स्वतःचा अजून एक फोन नंबरफडणवीसांवर टीकाकर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला असून त्याचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले आहेत.
त्यावरून राऊत यांनी राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मध्यप्रदेशमध्ये पुतळा हटविला गेला होता.
तेव्हा फडणवीसांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दम दिला होता.
आता कर्नाटकातील पुतळा हटवला गेला आहे.
त्यामुळे फडणवीस यांनी कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांना दम द्यावा, असा टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
व्हिडिओ व्हायरल, सुशांतसिंह एवढा आनंदी कधीच नव्हता
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे.
सलमानच्या हत्येसाठी मुंबईत रेकी करणाऱ्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
राहुल ऊर्फ सांगा ऊर्फ बाबा असं या गँगस्टरचं नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर असून या गँगकडून सलमानला या आधीच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.
पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यात ही टोळी सक्रिय आहे.
राहुल हा कुविख्यात गुंड असून त्याने आतापर्यंत चार हत्या केल्या आहेत.
ऑगस्ट २०१९मध्ये झज्जरमध्ये एका व्यक्तिची हत्या केली होती.
लॉरेन्स बिश्नोईच्या इशाऱ्यावरून त्याने डिसेंबर २०१९मध्ये मनोट येथे एकाची हत्या केली होती.
तसेच २० जून २०२०मध्येही त्याने भिवानी येथे एकाची हत्या केली होती.
त्याने फरिदाबादच्या एसजीएम नगरमध्येही २४ जून २०२०मध्ये एकाची हत्या केली होती.
दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे.
त्याची चौकशी सुरू असून मुंबई पोलीसही त्याची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राहुलने मुंबईत वांद्रे येथे जानेवारीत सलमानची रेकी केली होती.
त्यासाठी तो दोन दिवस मुंबईत थांबला होता.
यावेळी सलमान किती वाजता घरातून बाहेर पडतो यावर लक्ष ठेवून असायचा.
पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी त्याला उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथून अटक केली.
त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मंगळवारी त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्याची निमका तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
सलमान पैसे वाटायला येणार; भिवंडीत अफवापोलीस अधिकारी राजेश दुग्गल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.
राहुलने जानेवारी २०२०मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहराच्या इशाऱ्यावरून सलमानच्या घराची रेकी केली होती.
त्यानंतर त्याने राजस्थानच्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला रेकीची माहिती दिली होती, असं दुग्गल यांनी सांगितलं.
रेकी केल्यानंतर राहुल पुन्हा राजस्थानात आला.
त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा संपूर्ण प्लॅन फेल गेला.
दरम्यान, राहुलला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बर्थ डे स्पेशल: सलमानचे 'दबंग' डायलॉग्सरुग्णालयात जाण्यापूर्वी भावूक झाला संजय; म्हणाला'माझ्यासाठी प्रार्थना करा'
ठाणे: गणेशोत्सावाच्या काळात लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नवीन योजना आखली आहे.
विसर्जनस्थळी गर्दी होऊन करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आता गणेश विसर्जनासाठी प्रत्येकाला वेळ देण्यात येणार आहे.
ऑनलाइनच्या माध्यामातून हे टाइम स्लॉट देण्यात येणार आहेत.
महापालिका प्रशासनाने ही योजना आखली आहे.
यंदा गणेशोत्सवात डीजी प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
करोनाचं संकट पाहता प्रशासनाने बनविलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं, असं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ.
विपिन शर्मा यांनी केलं आहे.
पोलीस आणि पालिका प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचं पालन पालन व्हावं आणि विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने १३ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत.
तर २० ठिकाणी मूर्ती स्वीकारण्याचं केंद्र तयार करण्यात आली आहेत.
गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने डीजी ठाणे कोविड१९ डॅशबोर्डावर जाऊन ऑनलाइन टाइम स्लॉट घ्यावा लागणार आहे.
या डॅशबोर्डवर जाऊन गणेश भक्तांना विसर्जनाची वेळ बुक करावी लागणार आहे.
आजपासूनच ठाणेकर या योजनेचा लाभ उठवू शकणार आहेत.
त्यासाठी www.
covidthane.
org या संकेतस्थळावर जाऊन टाइम स्लॉट बुक करता येणार आहे.
दरम्याना, ठाणे शहरातील हॉटस्पॉट झोनमध्ये राहत असलेल्या गणेश भक्तांना झोनच्या बाहेर जाऊन गणेश विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
त्यांना आपल्या सोसायटी किंवा घरांच्या परिसरातच गणेश विसर्जन करावं लागणार आहे.
राष्ट्रवादीमध्ये काहीतरी घडतंय?