text
stringlengths
0
6.48k
; बैठकसत्रामुळे चर्चेला उधाण
मुंबई: मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिवांची बैठक घेऊन सरकारला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आली आहे.
मराठा आरक्षणविषयक कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार सदस्य आहेत.
हीच समिती आता मराठा समाजाच्या इतर मागण्यांचाही पाठपुरावा करेल.
अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला एकप्रकारे जोरदार धक्काच दिल्याचे बोलले जात आहे.
मुंबई- सुशांतसिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होत आहे.
ईडीने सुशांतच्या बँक अकाउंटच्या चौकशीत शुक्रवारी रियाची आठ तासांहून अधिक तास चौकशी करण्यात आली.
त्या चौकशीत रियाने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं न दिल्यामुळे तिला पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
सुशांतला औषधांचा ओवरडोस द्यायची रिया चक्रवर्ती, बिहार पोलिसांचा आरोपरिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीच्या चौकशीसाठी ईडीने अजून एक समन्स पाठवला आहे.
यात सोमवारी तिला पुन्हा एकदा हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी रियाच्या चौकशीनंतर शनिवारी तिच्या भावाची शौविकची १८ तास चौकशी करण्यात आली.
आता सोमवारी पुन्हा एकदा रियाची चौकशी करण्यात येणार आहे.
असं म्हटलं जातंय की यावेळीही रियाला तिची मालमत्ता आणि मिळकतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात येतील.
ईडीने केलेल्या चौकशीत हे समोर आलं आहे की, रिया चक्रवर्तीचे मुंबईत खार पूर्वेला आणि नवी मुंबईत फ्लॅट आहे.
यानंतर ईडीने रियाला गेल्या पाच वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न दाखवण्याची मागणी केली.
सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांनी रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला होता.
विशेष प्रतिनिधी,नागपूरः रूग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम लाटणाऱ्या जगनाडे चौकातील सेव्हन स्टार रूग्णालयास मनपाने दणका दिला आहे.
या रूग्णालयातील तब्बल ६८७ नॉन कोव्हीड रूग्णांकडूनही अधिकचा शुल्क आकारल्याचे उघडकीस आले आहे.
शिवाय, पाच करोनामुक्त झालेल्या रूग्णांकडूनही अधिकची रक्कम वसूल केल्याचे आढळले आहे.
दोन दिवसात या रूग्णांकडून आकारलेले अतिरीक्त् शुल्क परत करून, स्पष्टीकरण द्यावे अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने करोना काळात खासगी रूग्णालयात कोव्हीड व्यतिरीक्त इतरही रूग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरपत्रक ठरविले आहे.
करोनाबाधीत रूग्णांकडूनही आकारले जाणारे शुल्क निर्धारीत केले आहे.
मनपाने खासगी रूग्णालयावर कारवाईसाठी नेमलेल्या विशेष पथकाने आकस्मिक पाहणी केली असता मोठा घोळ आढळला.
रूग्णालयात उपचारार्थ असलेल्या ९९१ रूग्णांपैकी ३०४ रूग्णांची माहितीच दिली नाही.
शिवाय, ६८७ रूग्णांना दिलेले बील समितीला उपलब्ध करून दिले नाही.
२१ जुलै रोजी शासनाने यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाचे हे सरळसरळ उल्लंघन आहे.
समितीच्या तपासणीत पाच करोनाबाधीत रूग्णांकडूनही काही शुल्क अतिरीक्त आकारण्यात आल्याचे समितीला आढळले.
सेव्हन स्टार रूग्णालय व्यवस्थापनाने रूग्णांवर उपचार व त्यांच्याकडून आकारल्या गेलेल्या शुल्काची माहितीही दडवून ठेवली.
त्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा,२०११,मुंबई नर्सीग होम कायदा, २००६ आणि द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा,१९५० या कायद्याचे उल्लंघन असल्याने आपणाविरूध्द कारवाई का करू नये, अशी नोटीस आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बजावली.
दोन दिवसात तपासणी पथकाने दिलेल्या १७ मुद्यांवर आधारीत सुस्पष्ट स्पष्टीकरणासह रूग्णांकडून अतिरीक्त आकारण्यात आलेले शुल्क परत केल्याचे देयक व अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी, औरंगाबादआपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
सजावट साहित्यांनी दुकाने सजली असून, मूर्ती विक्रेत्यांनी जिल्हा परिषद मैदानासह विविध ठिकाणी आपली दालने उभारण्यास सुरुवात केली आहे.
निराला बाजार, टीव्ही सेंटरसह शहर परिसरातील विविध भागात विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असून, यानिमित्ताने 'श्रीं'ची नानवधी रुपे पाहण्यास मिळत आहेत.
अनेक नागरिकांनी गणेशमूर्तींचे 'बुकिंग' केले आहे.
विघ्नहर्ता गणरायाच्या आगमानाचे वेध साऱ्यांनाच लागले असून, यानिमित्ताने आतापासूनच सर्वत्र उत्साहाचे व मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दक्षता घेत आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
दरवर्षी औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावर गणेशोत्सवाच्या सुमारे २० ते २५ दिवस आधीपासूनच विक्रेते आपली दुकाने थाटण्यात येतात, पण यंदा परवानगी उशिरा मिळाली.
औरंगपुरा रस्त्यालगत, टीव्ही सेंटर, श्री गजानन महाराज मंदिर रोड, शिवाजीनगर यांसह शहर परिसरातील विविध भागात मूर्ती विक्रेत्यांची दालने आहेत.
'प्लास्टर ऑफ पॅरिस'सह शाडू मातीचे गणपती उपलब्ध असून, गणरायाच्या शाडू मातीच्या मूर्तीला मोठी मागणी आहे.
त्यात अनेक भक्त 'बुकिंग' करत आहेत, अशी माहिती जवळेकर आर्टस्‌चे बी.
जवळेकर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
सार्वजनिक मंडळापेक्षा घरगुती गणरायाच्या मूर्तींना अधिक मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यंदा कृष्णधवल गणरायची मूर्तीला मोठी मागणी आहे.
सिंहासनावर आरूढ, दगडूशेठ हलवाई; तसेच राजगादीवर विराजमान, लालबाग, बाल गणेशाची वेगवेगळी रुपे, उंदरावर स्वार झालेला गणराय, नागधारी, फेटेवाला, बालगणेश अशा विविध रुपांतील गणरायाचे दर्शन भाविकांना यानिमित्ताने होत आहे.
सहा इंचांपासून ते चार फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती बनविण्यात आल्या असून, स्थानिक; तसेच पेण, नगर या ठिकाणाहूनही मूर्ती दाखल झाल्याचे जवळेकर यांनी सांगितले.
दरम्यान, इंधन दरवाढ, 'पीओपी', काथ्या, रंग यांचे वाढलेले भाव, कर्मचाऱ्यांचे वेतन, जागेचे भाडे आदीमध्ये कारणांमुळे मूर्तीचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेते दहा ते १५ टक्क्यांनी वधारल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
'सोशल मीडिया'वर गणरायगणरायाच्या आगमानास अवघे काही दिवस शिल्लक आहे.
त्यात पावसाची संततधार सुरू आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी अनेक विक्रेत्यांनी 'सोशल मीडिया'चा आधार घेतला आहे.
दालनात उपलब्ध मूर्तींची माहिती छायाचित्रांसह नियमित ग्राहकांसह परिचितांना 'सोशल मीडिया'च्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गुरुवारी आपल्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली होती.
हार्दिक आणि नताशा यांना गुरुवारी पुत्ररत्न झाले होते.
भारताच्या एका क्रिकेटपटूने आज आनंदाची बातमी दिली असून त्याच्या घरीही पाळणा हलला आहे.
आज सकाळी भारतीय खेळाडूला पुत्ररत्न झाल्याची माहिती मिळाली आहे.
या क्रिकेटपटूनेच ट्विट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा यांना शुक्रवारी पुत्ररत्न झालं.
आता बाबा झाल्यावर हार्दिकची जबाबदारी वाढलेली आहे.
त्यामुळे आपल्या मुलासाठी आपण एक खास काम करत असल्याचे हार्दिकने शनिवारी सांगितले होते.
पण आता हार्दिकने आपल्या मुलाबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आपल्याला मुलगा झाल्याची बातमी हार्दिकने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे.
त्यानंतर हार्दिकने आता मुलासाठी काही कामं करायला सुरुवात केली आहे.
पहिल्यांदाच एक नवीन काम तो करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुलगा झाल्यावर हार्दिकची जबाबदारीही वाढली आहे.
त्यामुळे तो ही जबाबदारी पूर्ण करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
शनिवारी आपल्या मुलासाठी डायपर घेऊन हार्दिक हॉस्पिटलमध्ये गेल्याचे पाहायला मिळाले.
ही गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली असून त्याच्या या फोटोला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
हार्दिकने आज आपल्या मुलाबरोबरचा हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा फोटो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते आहे.
भारताचा क्रिकेटपटू अभिनव मुकुंदच्या घरी आज एक नवा पाहुणा आला आहे.
मुकुंद आणि त्याच्या पत्नीला पुत्ररत्न झाले आहे.
ही माहिती मुकुंदने ट्विटरवरर पोस्ट करून दिली.
मुकुंद म्हणाला की, " माझी पत्नी आरभी आणि माझ्या आयुष्याला आज एक वेगळे वळण मिळाले.
एक पालक म्हणून आमचा प्रवास आजपासून सुरु होत आहे.
आज सकाळी आमच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले आहे.
"
नवी दिल्ली: देशाला आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी इस्टाग्राम पोस्टवरून एक व्हिडिओ पोस्ट करत ही घोषणा केली.
धोनीच्या या निवृत्तीबद्दल त्याच्या सर्वात जवळच्या मित्राने एक मोठी माहिती दिली आहे.
वाचा- धोनीचे करिअर कोणी संपवले?
चहलने केला खुलासासंध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटापासून मला निवृत्त समजा असा मेसेज धोनीने टाकला.
त्यानंतर धोनीची पत्नी साक्षीने देखील त्यासाठी इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
धोनीच्या चाहत्यांना एक एकूण धक्का बसेल की इतक्या मोठ्या निर्णयाबद्दल पत्नी साक्षीला देखील कल्पना नव्हती.
धोनीचा जवळचा मित्र आणि त्याच्या सोबत शाळेत क्रिकेट खेळणारा गौतम उपाध्ययने बीडी क्रिकटाइमशी बोलताना सांगितले की, क्रिकेट संदर्भात सर्व निर्णय धोनी मनात ठेवतो.
त्यासंदर्भात को कधीच कोणाशी चर्चा करत नाही.
वाचा- फक्त रैना नव्हे धोनीनंतर आणखी एकाची निवृत्ती; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच घटनामी धोनीला २५ वर्षांपासून ओळखतोय.
या बाबत मला शंकाच आहे की धोनीने निवृत्ती संदर्भात साक्षी सोबत चर्चा केली असेल, असे गौतम म्हणाला.
मला पूर्ण विश्वास आहे की या साक्षीने देखील धोनीच्या या घोषणेबद्दल विचार केला नसेल.
धोनी अगदी कधी तरीच आमच्या सोबत क्रिकेटबद्दल बोलतो.
वाचा- दारात BMW आणि फेरारी; पण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू मारुती ८०० साठी झुरतोययाआधी अनेक वेळा तो सहजपणे म्हणाला होता की, सध्या क्रिकेट बंद आहे.
मी भरपूर क्रिकेट खेळले आहे.
आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतो.
गौतमच्या मते, धोनीला वर्ल्ड कप खेळायचा होता.
पण या वर्षी वर्ल्ड कप होणार नाही आणि त्यामुळेच त्याने निवृत्तीची घोषणा केली.
वाचा- धोनीच्या निवृत्तीचे खरे कारण; निर्णय जाहीर करण्याआधी या व्यक्तीची भेट घेतलीफक्त धोनीचा मित्र गौतमच नाही तर याआधी भारतीय संघातील त्याचा सहकारी आणि फिरकीपटू चहलने देखील असेच म्हटले होते.
धोनीला वर्ल्ड कप खेळायचा होता.
पण करोनामुळे त्याचे करिअर लवकर संपले.
चहलच्या मते धोनी जेव्हा मैदानावर असतो तेव्हा माझे काम ५० टक्के कमी होते.
तो खेळपट्टी कशी आहे हे आधीच ओळखतो आणि आम्हाला मार्गदर्शन करतो.