text stringlengths 0 6.48k |
|---|
धोनी नसेल तर खेळपट्टी कशी आहे हे ओळखण्यासाठी आम्हाला २ ओव्हर टाकावे लागतात. |
सद्या औद्योगिक परिसरात बऱ्याच कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी positive येत आहेत. |
त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे. |
त्यासाठी प्रत्येक कंपनीत कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट झाली पाहिजे. |
जेणेकरून संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. |
एक कर्मचारी |
Teaching in mother tongue: नव्या शिक्षण धोरणा पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिकवण्याची शिफारस करण्यात आली आहे. |
याबाबत बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. |
रमेश पोखरियाल निशंक यांनी सोमवारी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. |
'आम्ही इंग्रजी भाषेच्या विरोधात नाही, पण आम्हाला भारतीय भाषा आणखी बळकट करायच्या आहेत,' असे ते म्हणाले. |
'ज्या लोकांचा मातृभाषेला शिक्षणाचं माध्यम करण्यास विरोध आहे त्यांनी विकसित देशांकडे पाहावे. |
तेथे या प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे. |
नव्या शिक्षण धोरणानुसार किमान पाचवीपर्यंत आणि शक्य असल्यास आठवी किंवा त्यानंतरदेखील शिक्षणाचं माध्यम मातृभाषा, स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाष असेल. |
'आत्मनिर्भर मध्य प्रदेश वेबिनारमध्ये पोखरियाल बोलत होते. |
ते पुढे म्हणाले, 'या धोरणाला देशातील ९९ टक्के लोकांचे समर्थन मिळाले आहे. |
आघाडीच्या विकसित देशांनी मुलांना आपल्या मातृभाषेत शिकवून प्रगतीची शिखरं पादाक्रांत केली आहेत. |
इंग्रजी भाषेला विरोध नाही, ती एक विषय म्हणून शिकवली जाईल. |
विद्यार्थ्यांची गुणपत्रिका ही आता खऱ्या अर्थाने प्रगती पुस्तक असेल. |
विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ते स्वत:, त्यांचे सोबती, त्यांचे शिक्षक करतील. |
'नवे शिक्षण धोरण: पंतप्रधान मोदींनी दिली 'या' सात प्रश्नांची उत्तरेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याविषयी यापूर्वी भूमिका मांडली आहे. |
ते म्हणाले होते, 'मूल जर मातृभाषेत शिकले तर त्याच्यातील शिकण्याचा वेग वाढतो. |
मुलांच्या घरातली बोली आणि शाळेतली शिकण्याची भाषा एकच असेल तर मुलांची आकलन क्षमता वाढते. |
म्हणूनच पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकण्याची सहमती देण्यात आली आहे. |
यामुळे मुलांचा शिक्षणाचा पाया मजबूत होईल. |
' |
नवी दिल्ली: आज बुधवारी, ५ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन (Ram Mandir Bhoomi Pujan)करत आहेत. |
यानंतर मंदिर निर्मितीचे काम सुरू होणार आहे. |
राम मंदिर भूमिपूजनाच्या काही तास आधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ट्विट केले आहे. |
सुप्रीम कोर्टाच्या निकाल अन्यायकारक असल्याचा उल्लेख करत बोर्डाने बाबरी मशीद होती आणि ती कायमस्वरूपी मशीदच राहील, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. |
या वेळी बोर्डाने हागिया सोफिया मशिदीचेही उदाहरण दिले आहे. |
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आपल्या ट्विटमध्ये म्हणते, 'बाबरी मशीद होती आणि नेहमीच मशीदच राहील. |
हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण आहे. |
अन्यायपूर्ण, दमनकारी, लज्जास्पद आणि बहुसंख्यंकांचे तुष्टीकरण करणाऱ्या निर्णयाद्वारे जमिनीवर झालेले पुनर्निर्माण हे बदलू शकणार नाही. |
दु:खी होण्याची आवश्यकता नाही. |
कोणतीही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही. |
' वाचा- Ram राम मंदिर भूमिपूजन Live: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनअयोध्येतील बाबरी मशिदीची निर्मिती ही कोणतेही मंदिर पाडून करण्यात आलेली नव्हती, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी मौलाना मोहम्मद वली रहमानी यांनी म्हटले आहे. |
अयोध्येत कोणतेही मंदिर पाडून बाबरी मशीद पाडलेली नाही, हे सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या नोव्हेंबरच्या निकालात मान्य केले असल्याचे मौलाना रहमानी यांनी म्हटले आहे. |
हागिया सोफियाचे पुन्हा मशिदीत झाले रुपांतर१५०० वर्षे जुना असलेला वारसा असलेल्या आणि यूनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत समावेश असलेल्या हागिया सोफिया संग्रहालयाबाबत मोठा बदल करण्यात आला. |
गेल्याच महिन्यात जुलैमध्ये तुर्कस्थानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यब एर्दोगन यांनी हे ऐतिहासिक संग्रहालय पुन्हा मशिदीत रुपांतरीत केले आहे. |
सन १४३४ मध्ये हागिया सोफिया या मशिदीचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले होते. |
पाहा- Ram Mandir Bhumi pujan: धोती, सोनेरी कुर्ता. |
.. रामरंगात अयोध्येला निघाले मोदीनक्की पाहा- फोटोफीचर: 'असे' दिसेल अयोध्येतील भव्य राम मंदिर, पाहा झलक! |
प्रतिनिधी, ठाणेसतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरी भागास पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीपातळी वाढली असून त्यातून विसर्ग सुरू होणार असल्याने बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. |
धरणातील पाण्याची पातळी शुक्रवारी सकाळी ६७. |
७६ मीटर होती. |
धरणाचे स्वयंचलित गेट बंद करून पाणीपातळी ७२. |
६० मीटरपर्यंत वाढल्यानंतर धरणात ३४०. |
४८ दलघमी पाण्याचा साठा पूर्ण होणार आहे. |
त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाईल. |
धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने धरणातून पाणी सोडल्यानंतर नदीच्या पाण्याची पातळीत वाढणार आहे. |
त्यामुळे नदीकाठच्या गावांसह महापालिका, जिल्हाधिकारी, रेल्वे आणि पोलिस प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा एमआयडीसीच्या उपअभियंत्यांकडून देण्यात आला आहे. |
गतवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी बुधवारपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. |
धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढत असून धरणे भरण्याची घडी जवळ येऊ लागली आहे. |
बारवी धरण क्षेत्रात गुरुवारी ५३. |
५० मिमी पाऊस पडला असून आत्तापर्यंत एकूण एक हजार २८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. |
बारवी धरणातील पाणीसाठा २१४. |
४१ दलघमी (६३. |
२८ टक्के) झाला आहे. |
धरणातील पाण्याची पातळी ६७. |
७६ मीटरपर्यंत पोहचली असून बारवी पूर्वीच्या पातळीच्या आसपास धरण भरले आहे. |
स्वयंचलित गेट बंद करून धरणाचा पाणीसाठा ७२. |
६० मीटरपर्यंत वाढणार आहे. |
पाणीसाठा ३४०. |
४८ दलघमी झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल. |
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. |
मागील वर्षी बारवी धरणाची वाढलेली उंची, त्यामुळे झालेला अतिरिक्त पाणीसाठा, नोव्हेंबरपर्यंत धरणातून सुरू न झालेला विसर्ग, मार्चपासून रोडावलेली पाण्याची मागणी यामुळे यंदा ठाणे जिल्ह्याची पाणीकपातीतून सुटका झाली होती. |
अगदी जुलै महिन्यापर्यंत पावसाने दांडी मारल्यानंतरही नागरिकांना पाणी कपातीची झळ बसली नव्हती. |
'नदीपात्रापासून दूर राहा'एमआयडीसीच्या बारवी धरण उपविभागाचे उपअभियंता यांनी अंबरनाथ तालुक्यातील नदी काठच्या आस्नोली, राहटोली, चोण, सागांव, पाटीलपाडा, चांदप, पादीरपाडा, पिंपळोली, कारंद, चांदपपाडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. |
याशिवाय कल्याण, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महापालिका, ठाणे जिल्हाधिकारी, महसूल विभाग, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे प्रशासनालाही याची याविषयी माहिती देण्यात आली आहे. |
त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. |
तानसा, वैतरणा नदीकाठीही इशाराबृहन्मुंबई महापालिकेची तानसा व वैतरणा धरणे भरू लागल्याने या दोन्ही नद्यांच्या काठावरही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. |
शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवरील टेंभा गावाजवळील मोडकसागर धरण ७७ टक्के भरला आहे. |
या धरणामध्ये ९९. |
३०० दलघमी पाणी जमा झाले असून १२८ दलघमी क्षमता पूर्ण झाल्यानंतर या धरणातून वैतरणा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात होईल. |
तानसा नदीमधील पाण्याची पातळीही वाढली आहे. |
तानसा धरण १४५ दलघमी क्षमतेचे असून या धरणात ९५. |
०४० दलघमी पाणी जमा झाले असून ६५ टक्के धरण भरले आहे. |
या धरणाच्या पाण्याची पातळीही वेगाने वाढत आहे. |
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून काठावरच्या गावांना पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा देण्यात आला आहे. |
वाडा आणि पालघर तालुक्यातील ४२ गावांना पुराचा धोका असल्याचे मुंबई महापालिकेकडून कळवण्यात आले आहे. |
प्रतिनिधी, मुंबईसार्वजनिक मंडळांची गणेशमूर्तींची उंची ४ फुटांपर्यंत असावी, हा नियम भारत-पाकिस्तान सीमेवरील पूंछ येथील 'बॉर्डरच्या राजा'ला देखील लागू झाला आहे. |
करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नियमांनुसार बॉर्डरच्या राजाची उंचीही दोन फूट इतकी असेल, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. |
गेल्या वर्षी कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात आल्याने सीमाभागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. |
त्यामुळे गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. |
यंदा करोनामुळे पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली होती. |
मात्र सर्व अडचणींवर मात करत आज, १ ऑगस्ट रोजी वांद्रेहून विशेष एक्स्प्रेसमधून ही मूर्ती पूंछच्या दिशेने रवाना होईल. |
पूंछ येथील प्राचीन 'शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट'तर्फे गेली दहा वर्षे गणेशोत्सव साजरा केला जातो. |
सुरुवातीची काही वर्षे ही मूर्ती काश्मीरमध्येच घडवली जात होती. |
परंतु मागील तीन वर्षांपासून ही मूर्ती महाराष्ट्राच्या मातीतच घडायला हवी, असा विचार करून ट्रस्टच्या उपाध्यक्षा ईशर व सामाजिक कार्यकर्ते छत्रपती आवटे यांनी ही मूर्ती मुंबईहून नेण्याचे ठरवले. |
त्यानुसार सुरुवातीला मूर्तिकार उदय राणे तर मागील दोन वर्षांपासून विद्याविहार परिसरातील दिव्यांग मूर्तिकार विक्रांत पांढरे 'बॉर्डरचा राजा' घडवत आहेत. |
यंदा करोनामुळे रेल्वेसेवा काही काळासाठी खंडीत करण्यात आल्याने गणरायाची मूर्ती पूंछपर्यंत कशी नेता येईल, असा प्रश्न आयोजकांना पडला होता. |
मात्र कुठल्याही परिस्थितीत 'बॉर्डरच्या राजा'ची परंपरा खंडित होऊ देणार नसल्याचा ठाम निर्धार सामाजिक कार्यकर्त्या ईशर यांनी 'मटा'कडे बोलताना व्यक्त केला. |
यावर्षी करोनामुळे उद्धवलेली कठीण परिस्थिती लक्षात घेत मूर्तीचा आकार सातऐवजी दोन फूटपर्यंत कमी करण्यात आला आहे. |
तसेच प्रवासात सुरक्षा निकषांचे काटेकोपणे पालन केले जाणार आहे. |
ही मूर्ती आज दुपारी वांद्रे येथून विशेष एक्स्प्रेसने जम्मू रेल्वे स्थानकापर्यंत नेली जाणार आहे. |
तेथून स्थानिक पोलिस प्रशासनाच्या सूचनांनुसार पूंछपर्यंतचा प्रवास पूर्ण केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. |
मूर्ती विद्याविहार येथून वांद्रे स्थानकाकडे नेण्यापूर्वी उपस्थितांना मास्कवाटप केले जाणार असल्याचे कळते आहे. |
गतवर्षी कलम ३७० आणि ३५ अ रद्द झाल्यामुळे कमी उंचीची मूर्ती नेत उत्सवाची परंपरा अखंडित ठेवण्यात आली होती. |
यंदा करोनामुळे दोन फूट उंचीची मूर्ती नेत आहोत. |
बाप्पाच्या आगमनाने करोना संकटातून मुक्त होऊ, असा विश्वास आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.