text stringlengths 0 6.48k |
|---|
- ईशर, सामाजिक कार्यकर्त्या |
मायको सर्कल रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून डिवायडर मधील वाढलेले झाडे रस्त्यावर आली आहे त्यामुळे अपघात होऊ शकतो तरी याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करायला हवी |
मुंबईः माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. |
करोनाचा संसर्ग झाल्यानंतर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयांत त्यांच्यावर दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. |
किरीट यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती दिली आहे. |
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. |
मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. |
पंडित आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या 'उपचारांनंतर मी व माझी पत्नी मेधी आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे. |
करोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय,' असं ट्वीट त्यांनी केलंय. |
नवनीत राणांना पुन्हा करोना; पालिकेनं केलेल्या चाचणीत अहवाल पॉझिटिव्हकिरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा यांनी १० ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. |
त्यांनी तसं ट्विटही केलं होतं. |
मी व माझी पत्नी यांना करोनाची लागण झाली असून आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं ते म्हणाले होते. |
करोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामानिमित्त मतदारसंघात वा जनतेमध्ये फिरत आहेत. |
बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. |
त्यामुळंच लोकप्रतिनिधांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. |
किरीट सोमय्या यांनीही करोना संकटाच्या काळात त्यांनी अनेक भागांत जाऊन प्रत्यक्ष मदत केली होती. |
नवनीत राणांचा पुन्हा रिपोर्ट पॉझिटिव्हआमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी करोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. |
मात्र, आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची करोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे. |
मुंबई महापालिकेनं पुन्हा नवनीत राणा आणि रवी राणा यांची करोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. |
पालिकेनं राणा दाम्पत्यांना १५ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. |
नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. |
चिंदबरम यांनी अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर त्यांच्याच 'देवाची करणी' (Act Of God) वक्तव्यावरून निशाणा साधलाय. |
पी. |
चिदंबरम यांनी काही सलग ट्विट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारलेत. |
'जर ही दैवी घटना असेल तर आपण २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० दरम्यान अर्थव्यवस्थेतील गैरप्रकाराचं वर्णन कसं करणार? |
आता अर्थमंत्री 'देवदूत' (Messenger of god) बनून उत्तर देणार आहेत का? |
असा सवाल पी चिदंबरम यांनी केलाय. |
वाचा :मृतांच्या यादीतही भारत तिसऱ्या क्रमांकावर; दररोज १००० पेक्षा जास्त मृत्यूवाचा :'या' तीन गोष्टींमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली'; मोदी सरकारवर हल्लाबोलइतर पर्याय देताना राज्यांना आरबीआयकडून पैसे उधार घेण्यास सांगितलं जातं. |
ही केवळ सावकारी आहे. |
फक्त नाव वेगळं आहे. |
पुन्हा सगळं आर्थिक ओझं राज्यांवरच पडणार आहे. |
केंद्र सरकार कोणत्याही आर्थिक जबाबदारीतून सरळ-सरळ अंग काढून घेत आहे. |
हा विश्वासघात आहेच शिवाय कायद्याचं थेट उल्लंघन आहे, असं पी चिदंबरम यांनी म्हटलंय. |
गुरुवारी झालेल्या वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या बैठकीत सीतारमन यांनी करोनाचा उल्लेख करताना 'देवाची करणी' असा केला होता. |
करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगतानाच त्यांनी राज्यांसमोर पैशांसाठी दोन पर्याय ठेवलेत. |
यातील पहिला पर्याय म्हणजे, आरबीआयशी चर्चा करून राज्यांना योग्य व्याज दरानं ९७ हजार कोटी रुपये दिले जाऊ शकतात. |
या पैशाची सेस कलेक्शनच्या माध्यमातून पाच वर्षांत परतफेड केली जाऊ शकते, असं त्यांनी सांगितलं. |
अर्थमंत्र्यांनी राज्यासमोर ठेवलेला दुसरा पर्याय म्हणजे या पूर्ण वर्षातील जीएसटीच्या परतफेडीतील तफावत आरबीआयचा सल्ला घेऊन उधारीच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते. |
निर्मला सीतारमण यांनी केलेल्या 'देवाची करणी' या वक्तव्यावर मात्र देशभरातून मोठी टीका होतेय. |
वाचा :'ब्रेन डेड' व्यक्तीमुळे दोघांना नवं आयुष्य, मोनिका मोरेला पुन्हा मिळाले हातवाचा :'इंडियन आयडल' फेम रेणू नागरच्या प्रियकराची आत्महत्या, गायिकेची प्रकृती गंभीर |
प्रतिनिधी, सांगली: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. |
जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी गुरुवारी प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला. |
बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ मिळावी यासाठी सहकार राज्यमंत्री डॉ. |
विश्वजीत कदम (vishwajeet kadam) आणि आमदार विक्रम सावंत प्रयत्नशील होते. |
मात्र, पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी अखेर प्रशासकाची नियुक्ती करून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेससह विद्यमान संचालकांना दणका दिला. |
सांगली बाजार समितीची २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. |
स्वर्गीय डॉ. |
पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विक्रम सावंत यांच्या पॅनेलविरोधात पालकमंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप आणि स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली होती. |
कदम यांच्या आघाडीने सतरापैकी चौदा जागांवर बाजी मारली होती. |
विरोधी पॅनेलला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. |
मात्र अडीच वर्षापूर्वी बाजार समितीमधील राजकीय समीकरणे बदलली. |
त्यानंतर विरोधी गटाचे संचालक दिनकर पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागली. |
बाजार समितीत डॉ. |
कदम, सावंत गटाची सत्ता असली तरी, विरोधी गटाचे सभापती होते. |
संचालक मंडळाची २६ ऑगष्ट रोजी पाच वर्षांची मुदत संपली. |
महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम १९६३ मधील कलम १४ (३)(अ) च्या तरतुदीनुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका २४ जुलै २०२० पासून सहा महिने कालावधीसाठी पुढे ढकलल्या आहेत. |
परंतु, बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक येणार की संचालकांना मुदतवाढ मिळणार याबाबत जिल्ह्यात उत्सुकता होती. |
बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ मिळवण्यासाठी सहकार राज्यमंत्री डॉ. |
विश्वजीत कदम आणि आमदार सावंत यांचे प्रयत्न सुरू होते. |
पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना करोना झाल्याने त्यांचा पदभार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. |
मंत्री पाटील यांनी तातडीने प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्याने सहकार राज्यमंत्री डॉ. |
कदम यांनी बुधवारी रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. |
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सहभागी असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच प्रशासक नियुक्तीचा निर्णय व्हावा, अशी विनंती केली होती. |
मात्र, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासक नियुक्तीचा निर्णय कायम ठेवला. |
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा शासन आदेश गुरुवारी दुपारी जिल्हा सहकार विभागाला मिळाला. |
या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक करे यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. |
करे यांनी प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला. |
प्रशासक नियुक्ती मधून पालकमंत्री पाटील यांनी बाजार समितीमधील पराभवाचे उट्टे काढत काँग्रेसला शह दिल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. |
मुंबई: राज्यात करोना संकट काळात करण्यात आलेल्या बदल्या या नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहेत. |
या बदल्या करताना मोठं अर्थकारण झाल्याने या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशीचे आदेश द्यावेत, अन्यथा न्यायालयात जाऊन दाद मागू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. |
चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या चौकशीची मागणी केली करत कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे. |
राज्य सरकारच्या अर्थविभागाने ४ मे रोजी शासन निर्णय जारी केला व त्यामध्ये करोनामुळे बदल्या करू नयेत, असे म्हटले होते. |
पण त्या अनुषंगाने ७ जुलै रोजी शासन निर्णय जारी करताना सामान्य प्रशासन विभागाने पंधरा टक्के बदल्यांना परवानगी दिली. |
राज्य सरकारचे धोरण मनमानीपणे बदलले. |
तसेच करोनाविषयी उपाययोजनांमध्ये सातत्य राखले नाही. |
पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देताना ३१ मेपर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या असे स्पष्ट म्हटले होते. |
तरीही बदल्या करण्यास दिलेली ३१ जुलैची मुदत व नंतर वाढविलेली १० ऑगस्टची मुदत याचा आधार घेऊन ३१ मेपर्यंत ज्या अधिकारी – कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची मुदत संपत नव्हती त्यांनाही हटविण्यात आले व मोक्याच्या ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांना आणण्यात आले. |
यामध्ये बदलीच्या कायद्याचा भंग झाला, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात केला आहे. |
शरद पवार यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह; चार दिवस भेटीगाठी बंदबदलीच्या नियमांप्रमाणे तीन आयएएस अधिकाऱ्यांची आस्थापना समिती बदली प्रस्ताव तयार करते व त्यामध्ये बदल करायचा असेल तर संबंधित मंत्र्याने कारणाची लेखी नोंद करायची असते व नंतर मुख्यमंत्र्यांनी सही करायची असते. |
तीन वर्षे पूर्ण झाली नाही, अशांची बदली करायची असेल तरीही मंत्र्यांनी कारण लेखी नोंदवायचे व अंतिम स्वाक्षरी मुख्यमंत्र्यांनी करायची असा नियम आहे. |
यावेळी ही प्रक्रिया पार पाडली का, याचा जाहीर खुलासा होण्याची गरज आहे. |
या संबंधीच्या सर्व फाईल जनतेसमोर खुल्या करण्याचा आदेश द्यावा. |
तसेच बदलीच्या कायद्याचा भंग कोणी केला याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. |
डॉक्टरांना खरंच काही कळत नाही का; 'मार्ड'चा मुख्यमंत्र्यांना प्रश्नराज्याची वित्तीय स्थिती करोनामुळे गंभीर झाली असल्याने वित्त विभागाने विविध खर्चावर निर्बंध घातले. |
मार्च महिन्याचा पूर्ण पगारही दिला नाही. |
पण बदल्यांना परवानगी देऊन सर्वसाधारण बदली झालेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना बदली भत्ता देण्याचा मोठा खर्च राज्य सरकारने ओढवून घेतला. |
या प्रकरणात राज्य सरकारवर किती वित्तीय बोजा पडला हे जाहीर करावे, असंही ते म्हणाले. |
नीलेश राणेंना करोना; रोहित पवारांनी केलं ट्वीट |
प्रतिनिधी, मुंबईअफगाणिस्तानातील हेरॉइन हा अंमली पदार्थ इराणमार्गे मुंबईत छुप्या पद्धतीने आणला जात आहे. |
यासंदर्भात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोमवारी केलेल्या कारवाईत मोठी आंतरराष्ट्रीय टोळी उजेडात आली. |
मुंबई या तस्करीचे मोठे केंद्र होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. |
डीआरआयने मंगळवारी न्हावा-शेवा बंदरावर १९३ किलो हेरॉइनचा साठा जप्त केला. |
अत्यंत गुप्त पद्धतीने नळ्यांमधून हा साठा मुंबईत आणला जात होता. |
त्याची बाजारातील किंमत सुमारे एक हजार कोटी रुपये इतकी आहे. |
ही मुंबईतील अशा प्रकारची आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. |
या सर्व कृत्यात आंतरराष्ट्रीय टोळीचा मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. |
'अफगाणिस्तान हे हेरॉइनचे जागतिक केंद्र आहे. |
त्यात भारतात अलीकडे दिल्ली व परिसरात हेरॉइनची मागणी वाढली आहे. |
परंतु, अफगाणिस्तानहून थेट दिल्लीला ही तस्करी करणे शक्य नसते. |
त्यामुळे तस्कर अफगाणिस्तानहून इराकला हा साठा आणतात. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.