text
stringlengths
0
6.48k
तेथून जहाजातून छुप्या पद्धतीने मुंबईत व मुंबईहून हस्तकांमार्फत दिल्लीत तस्करी केली जाते.
ही अशी मोठी साखळी असल्यानेच एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीचाच तो भाग आहे', असे डीआरआयमधील उच्चाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील ही कारवाई महाराष्ट्रातील सर्वात मोठी आहे.
याआधी हेरॉइनचा १३४ किलो साठा जप्त झाला होता.
पण ती कारवाई प्रामुख्याने दिल्ली कार्यालयाकडून करण्यात आली होती.
त्यामुळेच ही अशी पहिलीच मोठी कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील टोळीची सर्वात मोठी असल्याला डीआरआय, मुंबईचे सहसंचालक समीर वानखेडे यांनीही दुजोरा दिला.
आणखी तिघे अटकेतअफगाणिस्तानातून हेरॉइन दिल्लीत आणण्यासाठी इराण व मुंबई (न्हावा-शेवा) हा तस्करीचा मार्ग असल्याने त्यात अनेक दलालांचा समावेश असल्याचा तपास संस्थांना संशय आहे.
या टोळीचा भारतातील महत्त्वाचा दलाल सर्वेश भाटीया याला सोमवारी अटक केली होती.
त्यानंतर मंगळवारी पुन्हा याप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली.
अलीगड: अलीगडमध्ये चीनी हवाला रॅकेटचा संशयित राहुल हा कथिकपणे दोन चीनी कंपन्यांचा संचालक आहे.
मात्र त्याचे आई-वडिलांना आपल्या या मुलाच्या 'कर्तृत्वाची' जरा देखील कल्पना नाही.
राहुलचे वडील श्यामसुंदर आणि त्यांच्या पत्नी पुष्पा या अलीगड येथील खैर विभागातील पीपल या गावात एका खोलीच्या घरात राहात आहेत.
आपला मुलगा राहुल (२५) हा दोन चीन कंपन्यांचा संचालक आहे आणि इतर दोन कंपन्यांचा तो शेअर होल्डर आहे, याची कल्पना देखील आई-वडिलांना नाही.
सुमारे १००० कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटमध्ये हवा असलेला राहुल याचा फोन रविवार दुपारपासून स्वीच ऑफ येत आहे.
त्यामुळे त्याच्या लोकेशनबाबत काहीच माहिती मिळत नाही.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सरकारी यंत्रणा राहुलचा शोध घेत त्याच्या घरी पोहोचल्या आणि त्याना आश्चर्याचा धक्काच बसला.
शुक्रवारी आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी अनेक यंत्रणांचे अधिकारी आपल्या घरी आल्याची माहिती राहुलचे वडील श्यामसुंदर यांनी दिली.
स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र अशा प्रकारच्या यंत्रणांच्या प्रतिनिधींच्या दौऱ्याची माहिती दिली नाही.
राहुल नव्या कंपनीची माहिती वडिलांना नाहीआपला मुलगा नोएडा येथे एका कंपनीत काम करत होता.
ही कंपनी मोटर वेहीकल पार्ट्सच्या डिलिंगचे काम करत होती.
त्यानंतर त्याने पार्ट टाइम जॉब सुरू केला.
कारण नवी कंपनी त्याला जास्त पैसे देत नव्हती, असे श्यामसुंदर यांनी सांगितले.
त्यांना या कंपनीचे नाव मात्र माहीत नाही.
राहुलला दर महिन्याला २००० रुपये मिळतात, तर दुसरीकडून त्याला अतिरिक्त २००० रुपये मिळतात असे राहुलने आपल्याला सांगितले असल्याचे श्यामसुंदर म्हणाले.
नवी नोकरी करताना त्याचे आधार आणि पॅन कार्ड देखील घेतले गेले होते.
सध्या राहुल दिल्लीत असून तो दिल्लीत नेमका कोठे आहे, ते मात्र माहीत नसल्याचे श्यामसुंदर म्हणाले.
आई म्हणते, राहुल निर्दोष, त्याला फसवले गेले!
राहुलच्या नकळत त्याच्या कागदपत्रांचा वापर मनी लाँड्रिंग रॅकेटमध्ये करण्यात येत होता असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हे रॅकेट काही दिवसांपूर्वी एनसीआर येथे उघड झाले होते.
आपल्या मुलाने इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे.
तो नोकरीच्या शोधात नोएडाला गेला, असे त्याची आई सांगते.
माझा मुलगा निर्दोष असून या सर्व गोष्टी समजून घेण्याइतपत तो मोठा झालेला नाही.
त्याला त्याच्या ऑफिसमधील लोकांनी फसवले आहे आणि सरकारी यंत्रणांनी अशा लोकांची नावे उघड करावीत, असे राहुलची आई म्हणाली.
वाचा: 'या' राज्यात फक्त भूमिपुत्रांनाच मिळणार शासकीय नोकरी; लवकरच कायदाशेजाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्काराहुल अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सहभागी असू शकतो यावर त्याच्या शेजाऱ्यांचा जराही विश्वास नाही.
राहुलचे घरही खूप जुने झाले आहे आणि त्याच्याकडे एवढा पैसा असेल असे वाटत नाही, असे शेजारी सांगतात.
राहुलचे आईवडिल शेतीवरच आपली उपजीविका करतात.
वाचा-PM केअर फंडातील पैशांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयवाचा: कमला हॅरिस यांनी यशप्राप्तीसाठी मावशीकरवी मंदिरात फोडले होते १०८ नारळ
दुबई : करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती शुन्याखाली गेल्याने जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक सौदी अरामकोला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सौदी अरामकोच्या नफ्यात तब्बल ७३.
४ टक्के घसरण झाली आहे.
कंपनीला ३० जून २०२० अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत २४.
६ अब्ज रियाल ( ६.
५७ अब्ज डॉलर) नफा मिळाला आहे.
गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ९२.
६ अब्ज रियाल इतका नफा मिळालं होता.
सौदी अरामको रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करणार होती.
मात्र काही कारणास्तव हा करार पूर्णत्वास आला नाही.
'RBI'चा खातेदारांना दणका; 'ओव्हरड्राफ्ट'मधील 'चालू'गिरीवर घातली मर्यादासौदी अरामकोच्या निराशाजनक कामगिरीने करोनाची दाहकता दिसून आली आहे.
इंधनाची जागतिक बाजारपेठ अजूनही करोनाच्या प्रभावात आहे.
काही देशांनी लॉकडाउन केले आहे तर काही देश नियम शिथिल करण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे लवकरच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येतील आणि इंधन मागणी वाढेल, अशी अपेक्षा सौदी अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासिर यांनी सांगितले.
सौदी अरामकोसह जगभरातील सर्वच बड्या तेल उत्पादक कंपन्यांना करोनाचा फटका बसला आहे.
भारतासह काही देशांनी जवळपास दोन महिने देशात कडक लॉकडाउन ठेवला होता.
त्यात सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध होते.
त्यामुळे इंधन मागणीत प्रचंड घट झाली.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कोसळले.
तेलाच्या किमती दोन दशकांच्या नीचांकावर गेल्या होत्या.
सोने महागले ; आज पुन्हा सोन्याची नवीन झेपचालू वर्षात कच्च्या तेलाच्या किमती ३८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
तेलाच्या किमतींमधील घसरण रोखण्यासाठी ओपेक संघटनेने उत्पादनात कपात केली होती.
मात्र तरीही तेलाचे भाव गडगडले होते.
सौदी अरामकोने दुसऱ्या तिमाहीत १८.
७५ अब्ज डॉलर लाभांश वितरण करण्याचे ठरवले आहे.
स्पर्धक कंपन्या बीपी आणि रॉयल डच शेल या दोन कंपन्यांनी यापूर्वीच लाभांशला कात्री लावली आहे.
रिलायन्सबाबत अजूनही आशावादी सौदी अरामकोच्या नफ्यात मोठी घसरण झाली असली तरी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत करार करण्यास अजूनही उत्सुक आहोत, असे कंपनीने म्हटलं आहे.
रिलायन्सच्या केमिकल आणि रिफायनरी व्यवसायात १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याच्या प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे असे नासीर यांनी सांगितले.
मुंबईः राज्यातील करोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख वाढतच आहे.
आज दिवसभरात ८ हजार ४९३ नवीन रुग्ण सापडल्यानं रुग्णसंख्येनं ६ लाखांचा टप्पा पार केला आहे.
राज्यात करोना साथीचे नवा उच्चांक गाठणारे आकडे आज समोर आले आहेत.
(Coronavirus in maharashtra) राज्यातील करोना स्थितीचे आजचे आकडे हे चिंता वाढवणारे आहेत तर काही अंशी दिलासा देणारे आहेत.
आज दिवसभरात ११ हजार ३९१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.
त्यामुळं राज्यातील एकूण करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाख २८ हजार ५१९वर पोहोचली आहे.
त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.
०९ टक्के इतका आहे.
मंदिरे खुली करा; राज यांच्यानंतर 'हा' नेताही साधुसंतांच्या पाठिशीराज्यात आज ८ हजार ४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील रुग्णसंख्या ६ लाखांच्या घरात पोहोचली आहे.
इतक्या मोठ्या संख्येनं करोना रुग्ण आढळणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
त्यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे.
तर, आजपर्यंत ३२ लाख ०६ हजार २४८ चाचण्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तीन वर्षीय चिमुरड्याचा करोनाने मृत्यूआज दिवसभरात २२८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या २० हजार २६५ इतकी झाली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर ३.
३५ टक्के इतका झाला आहे.
तर, राज्यातील विविध रुग्णालयांत एकूण १ लाख ५५ हजार २६८ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सध्या राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ३७ हजार ५५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
विशेष प्रतिनिधी, मुंबईमास्क आणि सॅनिटायझरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीला तीन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढला असून, त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य सरकारमार्फत समिती नेमण्याचा निर्णय आरोग्यमंत्री टोपे व अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.
राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता.
त्यानुसार शुक्रवारी आरोग्य विभागाने समिती नेमली आहे.
राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
सुधाकर शिंदे समितीचे अध्यक्ष असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य औषध नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
करोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हाच असल्याने नागरिकांनाही वेळोवेळी त्यांचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात आहे.
परिणामी या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली असून त्या नियंत्रित दराने मिळण्यासाठी त्यांच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समितीने उपाययोजना करताना कमाल दरमर्यादा ठरवायच्या आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
या समितीला तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या दोन्ही वस्तूंच्या किमती नियंत्रणात आल्यास सामान्यांना दिलासा मिळेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
जोधपूर: राजस्थानमधील जोधपूर शहरात तरुणाची हत्या करण्यात आली होती.
त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून नाल्यात फेकण्यात आले होते.
त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
या निर्घृण हत्याकाडांचा उलगडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केला.
मृत तरुणाची पत्नी, दोन मेहुण्या आणि मेहुणीच्या मित्रानं ही हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.