text
stringlengths
0
6.48k
हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून त्यांनी नाल्यात फेकले होते.
या हत्याकांड प्रकरणात कायदेशीर मर्यादा लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक तपशील दिले नाहीत.
मृत तरूण आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, मृत तरुणाची पत्नी ही समलिंगी होती आणि तिचे अन्य एका महिलेशी संबंध होते.
त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होत होते.
या वादातूनच तिने बहिणींच्या मदतीने पतीची हत्या केली, अशी माहिती उघडकीस आली आहे.
पुणे: भाजप नगरसेविकेच्या पतीला खंडणीसाठी धमकीधक्कादायक!
गांजा विक्रीसाठी ई-पासचा वापर, १० लाखांचा मुद्देमाल जप्तपोलीस उपायुक्त धर्मेंद्र सिंह यादव यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी नांदडी गोशाळेच्या पाठिमागे एसटीएफ प्लांटजवळ एका अनोळखी व्यक्तीचे कापलेले हात, पाय आणि संध्याकाळी कापलेले शिर आढळून आले होते.
या घटनेची गंभीर दखल घेऊन घटनास्थळी एफएसएल पथक, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस उपायुक्त भागचंद यांच्या नेतृत्वाखाली एसीपी राजेंद्र दिवाकर, अशोक आंजना आणि लालाराम यांचे पथक नेमले.
त्यांनी या नाल्याची पाहणी केली.
परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती संपूर्ण राज्यातून मागवली.
पत्नीने चहा करायला दिला नकार, पतीनं केलं भयानक कृत्य'ते' फोटो दाखवून विवाहितेला केलं ब्लॅकमेल; पूर्वाश्रमीच्या प्रियकराला अटकमामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्याने पतीनं स्वीकारण्यास दिला नकारज्या बॅगमधून मृतदेहाचे तुकडे फेकले होते, त्यातील एक बॅग आनंदपूर कालू आणि एक बॅग मेडतामधील दुकानातील होती.
त्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाची माहिती मिळाली.
१० ऑगस्ट रोजी चरणसिंह उर्फ सुशील चौधरी हा बेपत्ता असल्याची तक्रार मेडता शहर पोलीस ठाण्यात दाखल होती.
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आणि या हत्याकाडांचे धागेदोरे हाती लागले.
पत्नीनेच आपल्या बहिणींच्या आणि त्यांच्या एका मित्राच्या मदतीने सुशीलची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
त्रिमूर्ती चौक,कामटवाडा रोडवर काट्याचा ढिग ऊचलण्यात आला आहे .
ही समस्या 'मटा सिटिझन रिपोर्टर' मध्ये मांडली होती त्यावर संबंधित महानगरपालिकेने दखल घेऊन योग्य ती दुरूस्ती काली.
त्यासाठी संबंधित विभागाचे व 'महाराष्ट्र टाईम्स' चे विशेष आभार
प्रतिनिधी, औरंगाबादकरोना संसर्गाच्या भीतीने औरंगाबादसह मराठवाड्यातून उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांत गेलेले श्रमिक, विद्यार्थी औरंगाबादला परत येत आहेत.
गेल्या दहा दिवसांत साडेतीन हजारांवर परप्रांतीय 'सचखंड एक्स्प्रेस'ने औरंगाबादमध्ये आले आहेत.
नांदेड ते अमृतसर आणि अमृतसर ते नांदेड (सचखंड एक्स्प्रेस) रेल्वे नियमित सुरू आहे.
या रेल्वेतून औरंगाबादहून अमृतसरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे, मात्र गेल्या दहा दिवसांपासून या रेल्वेतून दररोज ३०० ते ४०० प्रवासी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर येत आहेत.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आलेल्या या प्रवाशांची 'अँटिजन टेस्ट' करण्यात येत आहे.
गेल्या दहा दिवसांत औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे साडेतीन हजारांवर परप्रांतीय प्रवाशांची आले आहेत.
औरंगाबादला दाखल होत असलेल्या प्रवाशांमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेश येथून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
श्रीकांत सावंत, ठाणेठाण्यातील घोडबंदरपट्ट्यातील कोलशेत, बाळकूम, वाघबीळपर्यंत पाणथळ भूमी, खारफुटींची जंगले आणि खासगी शेतजमिनींवर भराव टाकून त्यावर इमारतींची बांधणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरात पूरस्थिती वाढू लागली आहे.
ठाण्यातील म्युज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन ठाण्यातील बाळकूम भागातील खाडी किनाऱ्यावरील एप्रिल २०१० ते एप्रिल २०२० या १० वर्षांच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी बाळकूम गावाजवळचा सुमारे ९.
४५ हेक्टर हरित क्षेत्र भराव टाकून नष्ट केल्याचे वास्तव समोर आले आहे.
ठाणे शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत.
पर्यावरणाची हानी करून त्यावर गृहसंकुलांचा विकास केला जात आहे.
विशेष म्हणजे अशा बड्या गृहसंकुलांनी यापुर्वीच खाडी किनाऱ्यावरील बऱ्याच पाणथळ भूमीचा आणि खारफुटींचा विध्वंस केला आहे.
यासंदर्भात सातत्याने तक्रारी होत असून गुन्हेही दाखल झाले आहेत.
परंतु अद्याप कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे हरितक्षेत्रात भराव टाकून कांदळवन आणि पाणथळ जागा नष्ट करून सरकारी जमिनी लाटण्याचा प्रकारही वेगाने वाढला आहे.
विशेष म्हणजे महापालिकेसारख्या यंत्रणांनीही खाडीकिनाऱ्यावर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांच्या नावाखालीही मोठ्या प्रमाणात कांदळवने आणि पाणथळी नष्ट केल्या आहेत.
त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांवर पुरात बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा करणाऱ्या आणि पाणी वाहून नेणाऱ्या जागाच नष्ट झाल्यामुळे ठाणे शहरामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांत पावसाचे पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे.
याच पाश्वभूमीवर म्युज फाऊंडेशनने ठाण्यातील खाडी किनाऱ्यांचा अभ्यास सुरू केला आहे.
ठाण्यातील बाळकूम गावाजवळच्या खाडीकिनाऱ्यावरील दहा वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजद्वारे घेतलेल्या नकाशांचे विश्लेषण म्यूजच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यावेळी दहा वर्षांपूर्वीचे स्थिती आणि सध्याच्या स्थितीमध्ये मोठा फरक झाल्याचे उघड झाले आहे.
कांदळवनांवर भराव टाकून त्याठिकाणी जमीन तयार करून त्यावर वेगवेगळ्या अनधिकृत व्यवसायासाठी त्याचा वापर केला जात आहे.
याप्रकरणी म्युज फाउंडेशनकडून कांदळवन सनियंत्रण समिती आणि कांदळवन कक्षाकडे पत्र आणि छायाचित्र पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुढील टप्प्यात याप्रकरणी उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जनहित याचिकेदरम्यानही या प्रकरणाची सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्युजच्या निशांत बंगेरा यांनी स्पष्ट केले आहे.
कांदळवन समितीच्या बैठकीत यावर आवाज उठवण्याचे अश्वासन पर्यावरणतज्ज्ञ डी.
स्टॅलिन यांनी दिले आहे.
तर पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनीही येथील येथील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
९.
४५ हेक्टरची सद्यस्थितीकोलशेत येथील बाळकूम पाइपलाइन रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी कचरा डम्पिंग सुरू आहे.
तर दुसरीकडे खाडीकिनाऱ्यावर भराव टाकून ठाणे महापालिकेकडून वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात आहे.
खासगी व्यक्तींकडून या ठिकाणी कचऱ्याचे डंम्पिंग केले जात असून त्यामध्ये प्लास्टिक, बांधकाम कचरा, जैव वैद्यकीय कचरा, तुटलेल्या मद्याच्या बाटल्या आणि इतर धोकादायक कचरा असतो.
तर दुसरीकडे छोटी बांधकामे करून जागा अतिक्रमित केली जात आहे.
'कांदळवनक्षेत्र 'कांदळवनकक्षा'च्या ताब्यात द्या'कांदळवन संरक्षणासाठी कांदळवन कक्षाची स्थापना केली असली तरी त्यांच्याकडे अद्याप कांदळवन क्षेत्राचा बराच भाग देण्यात आलेला नाही.
ठाण्यातील कांदळवन क्षेत्राची निश्चिती करून ते कांदळवन कक्षाकडे संरक्षणासाठी सुपूर्द करावे.
महापालिकेकडूनही शहरातील कांदळवने संरक्षित राखले जात नसून वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली ते नष्ट केले जात असल्याने महापालिका यंत्रणांकडूनही पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे गरजेचे असल्याचे म्यूज फाऊंडेशनचे म्हणणे आहे.
नवी दिल्लीः देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे.
भारतात रुग्णसंख्येनं तब्बल १७ लाखांचा आकडा पार केला आहे.
सर्वसामान्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही करोनानं गाठलं आहे.
अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
करोनाची प्राथमिक लक्षण आढळल्यानंतर त्यांनी करोना टेस्ट केली होती.
त्या करोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शहा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचं कळताच राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांनीच त्यांना लवकरच बरे वाटेल अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विट करत अमित शहा लवकरच बरे होऊन येतील व तेवढ्याच जोमानं कामालाही लागतील, असे म्हटलं आहे.
अमित भाई, तुम्ही लवकर बरे होऊन याल व नेहमीप्रमाणे त्याच जोमानं या करोनाच्या परिस्थितीत आम्हाला मार्गदर्शन कराल, अशी आशा करतो, असं ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
तर, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शहा तुम्ही लवकरच पूर्णपणे बरे व्हाल, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असं म्हटलं आहे.
तुम्ही लवकरच करोनावर मात कराल, यासाठी आम्ही सगळेच प्रार्थना करू, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.
अमित शहा तुम्ही लवकरात लवकर स्वस्थ होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल, अशी इच्छा व्यक्त करतो.
माझ्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत, अशी कळकळ भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा कार्यरत व्हा, अशी इच्छा व्यक्त करतो.
माझे श्रद्धास्थान रामेश्वराच्या चरणी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.
वाचाः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण, रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला
बंगळुरू : करोना संक्रमणाची धास्ती नागरिकांनी किती घेतलीय?
हे दर्शवणारी एक धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये उघडकीस आलीय.
करोनानं माणुसकीलाही हरवलंय की काय?
अशी शंका यावी, असंच हे उदाहरण.
.. या घटनेचा एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडिओमध्ये एक कुटुंब आपल्या घरातील मृत व्यक्तीचा मृतदेह सायकलवरून नेताना दिसत आहेत.
स्मशानभूमीपर्यंत येण्यासाठीही शेजाऱ्यांनी नकार दिल्यानं तसंच अॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं या कुटुंबावर ही वेळ आल्याचं समजतंय.
मृत व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय शेजाऱ्यांना होता.
त्यामुळे त्यांनी अंत्ययात्रेत सहभागी होण्यासही नकार दिला.
कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या कीत्तूरचा हा अंगावर काटे आणणारा व्हिडिओ.
.. ही घटना गेल्या रविवारी घडल्याचं समोर येतंय.
मृत व्यक्ती करोना संसर्गामुळे मरण पावल्याचं शेजाऱ्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी अंत्ययात्रेत सामील होण्यास नकार दिला.
त्यामुळे जवळच्या व्यक्तीच्या निधनानं अगोदरच दु:खात असलेल्या कुटुंबीयांसमोर पेच उभा राहिला.
संबंधित बातम्या :वाचा :करोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावं लागतंय रुग्णालय, डॉक्टर चिंतेतवाचा :फोटोफीचर: करोनाच्या 'या' लशींवर भारताची नजर; पाहा, कधी मिळणार?
वाचा :तो दसपट खरतनाक करोना विषाणू भारतात?
; इंडिया कनेक्शनने वाढली चिंतामृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी काही मार्ग दिसेना त्यामुळे कुटुंबीयांनी एका सायकलचा आसरा घेतला.
.. आणि एम के हुबळी गावातील स्मशानभूमीपर्यंत हा मृतदेह सायकलवरून नेण्यात आला.
इथं या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले.
धक्कादायक : शेजाऱ्यांनी मदतीस नकार दिल्यानंतर कुटुंबानं सायकलवर नेला मृतदेहकरोनाची सद्य परिस्थितीदरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २७,०२,७४३ वर पोहोचलीय.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण ५१,७९७ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
तर १९,७७,७८० रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
सध्या देशात ६,७३,१६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
इतर बातम्या :वाचा :१६ तास पाण्यात अडकून पडलेल्या तरुणाची भारतीय वायुदलानं अशी केली सुटका!