text
stringlengths
0
6.48k
वाचा :देशात विवाहासाठी मुलींच्या किमान वयाच्या बदलावर चर्चा, का आहे याची गरज?
वाचा :सत्ताधारी भाजपशी लागेबांधे?
वादानंतर 'फेसबुक'चं स्पष्टीकरण
प्रतिनिधी, मुंबईरेल्वे स्थानकांतील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी क्यूआर (क्विक रिस्पॉन्स) कोडवर आधारित प्रवेशद्वार बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येईल.
मेट्रो स्थानकाच्या धर्तीवर हे गेट काम करणार असल्याने अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
करोनापश्चात वाहतूक क्षेत्रात विशेषत: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल अपेक्षित आहेत.
अनलॉकचा पुढील टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरू होईल.
सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास सुरू होण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
मुंबई लोकलमधून रोज ८० लाख प्रवासी करतात.
यापैकी ३५ लाख प्रवासी पश्चिम रेल्वेवर प्रवास करतात.
चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्रवेश-निर्गमनद्वारावर क्यूआर प्रणालीवर आधारित दरवाजा बसविण्यात येईल.
सप्टेंबरअखेर हा दरवाजा सुरू करण्याचे नियोजन आहे.
या रेल्वे स्थानकातील अहवालानंतर उर्वरित रेल्वे स्थानकांत ही यंत्रणा बसविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) जी.
एल.
सत्यकुमार यांनी सांगितले.
खासगी कंपनीच्या मदतीने पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांत क्यूआर आधारित दरवाजासाठी ११ ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली होती.
याचा अहवाल लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.
या अहवालाअंती स्थानकातील किती प्रवेशद्वारांवर ही यंत्रणा बसवण्यात येईल, ती कशाप्रकारे काम करेल याबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यालयीन वेळांबाबत विचारलॉकडाउनमुळे सर्वसामान्यांसाठी लोकलबंदी आहे.
केवळ राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
आत्तापर्यंत या प्रवाशांच्या प्रवासासाठी २ लाख क्यूआर पासचे वाटप करण्यात आले आहे.
करोनापश्चात वाहतूक सुरू केल्यानंतर मुंबई लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी स्थानकातील अनावश्यक प्रवाशांवर बंधने हवीत, त्याचबरोबर राज्य सरकारने कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत वाहतूक तज्ञांकडून व्यक्त होत आहेत.
करोना पश्चात लोकलमधील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलणे गरजेचे आहे.
विविध क्षेत्र आणि कार्यालयातील वेळा बदलण्याबाबत महापालिकेसह सकारात्मक चर्चा सुरू आहे.
लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
कार्यालयीन वेळा बदलल्यास लोकलमधील गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल.
- जी.
सत्यकुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे
प्रतिनिधी, पुणेपुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांच्या परिसरात संततधार कायम असून, दोन दिवसांत तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा वाढल्याने चार धरणांमध्ये १३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला धरण हे शंभर टक्के भरले जाण्याची शक्यता असल्याने गुरुवारी सायंकाळनंतर या धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
खडकवासला धरण सुमारे ६२ टक्के भरले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास गुरुवारी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.
त्यानंतर मुठा नदीत पाणी सोडले जाणार आहे.
टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून बुधवारी सकाळी आठपर्यंत टेमघर धरण परिसरात १७० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १६५ मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात १७७ मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
संततधारेमुळे चारही धरणांची पातळी वाढली असून, टेमघर धरणात ०.
९६ टीएमसी, वरसगाव धरणांमध्ये ५.
३७ टीएमसी, पानशेत धरणात ५.
४५ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.
२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
सध्या खडकवासला धरण सुमारे ६२ टक्के, पानशेत धरण हे सुमारे ५१ टक्के भरले आहे.
वरसगाव धरण सुमारे ४२ टक्के आणि टेमघर सुमारे २६ टक्के भरले आहे.
नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा'खडकवासला धरण हे भरल्यानंतर सायंकाळनंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सावधता बाळगावी.
नदीपात्रात अतिक्रमणे केली असल्यास संबंधितांनी अतिक्रमणे काढावीत' असे आवाहन खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे.
धरण क्षेत्रांत बुधवारी दिवसभर संततधार होती.
सकाळी आठनंतर दिवसभर टेमघर धरण परिसरात आणखी ४० मिलिमीटर पाऊस पडला.
वरसगाव परिसरात ५५ मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात ५४ मिलिमीटर आणि खडकवासला धरणात १२ मिलिमीटर पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत चार प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा हा कमी आहे.
गेल्या वर्षी या दिवशी या धरणांमध्ये २८.
९५ टीएमसी पाणीसाठा होता.
त्यामुळे धरणे ही सुमारे ९९.
३१ टक्के भरली होती.
यंदा आतापर्यंत १३ टीएमसी पाणीसाठा असल्याने धरणे ही ४४.
५६ टक्के भरली आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
पावसाचे प्रमाण पाहता खडकवासला धरण हे शंभर टक्के भरले जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गुरुवारी सायंकाळनंतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे.
मुठा नदीबरोबरच मुठा उजवा कालव्यातूनही काही प्रमाणात पाणी सोडले जाणार आहे.
विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
प्रतिनिधी, नागपूरः एकाच दिवशी झालेले विक्रमी मृत्यू आणि नव्या बाधितांच्या उच्चांकी संख्येनंतर आता करोना मुक्त होणाऱ्यांनीही सोमवारी विक्रमाची नोंद केली.
दिवसभरात शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या सक्रिय ९७९ रुग्णांना कुठलीही लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले.
त्यामुळे विषाणू लागण झाल्याने आतापर्यंत करोना मुक्त होणाऱ्यांची संख्याही १२०३२ वर गेली आहे.
या घडामोडीत आज दिवसभरात ३० करोना बाधितांचा मृत्यू तर नव्या ७१५ बाधितांची नोंद घेण्यात आली.
नव्याने करोनाची बाधा झालेल्या ७१५ जणांपैकी ५८५ हे शहरातील तर १२७ जण ग्रामीण भागातील आहेत.
आज दिवसभरात दगावलेल्या ३० जणांपैकी २१ शहरातील ३ जिल्ह्याबाहेर तर ६ जण ग्रामीण भागातील रहिवासी होते.
त्यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातून करोनामुळे मृत झालेल्यांची संख्याही १११ पर्यंग गेल्याने विषाणू प्रादुर्भावाची समुह साखळी आता ग्रामीणमध्येही पोचल्याचे सिद्ध होत आहे.
करोनाची बाधा झाल्याचे निदान झालेल्यांपैकी अँटिजन चाचणीत ३६३, खासगीतून १३४, मेयोतून ९४, मेडिकलमधून ९३ आणि निरीतून ३१ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
करोनाची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान दगावलेल्यांमध्ये सदरपरिसरातल्या छावणी येथील ५०, जयभीम चौक हिवरी नगर येथील ६६, जुनी मंगळवारीतील ६४, कामठीतील ५५, महाकाली नगर मानेवाडातील ६८ वर्षीय पुरुष आणि यासिन प्लॉट मोठा ताजबाग येथील ५५, खरबीतील ५३, मौदा येथील ५४ वर्षीय महिलांचा समावेश आहे.
दिवसभरात जवळजवळ ३ हजार नमुने निगेटिव्हजिल्ह्यातून आज दिवसभरात ३६६० संशयितांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला.
त्यापैकी २८६७ नमुने शहरातील तर १२०६ नमुने ग्रामीण परिसरातील होते.
शहरातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या या नमुन्यांपैकी आज २९४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.
दिवसभरात तब्बल १४ हजार २१९ करोनामुक्त; रिकव्हरी रेटही वाढलाकरोनाची कॉलर ट्यून ऐच्छिक हवी का?
; रोहित पवारांनी केला सवालदोन टक्क्यांनी वाढला करोना मुक्तीचा दर आज दिवसभरात करोना मुक्त झालेल्या ९७९ जणांमुळे करोनामुक्तीचा दर दोन टक्क्यांनी वाढून ५६.
८८ वर गेला आहे.
आजार मुक्त झालेल्या १२०३२ जणांपैकी ८२३४ हे शहरातील तर ३७९८ हे ग्रामीण भागातील आहेत.
आजचे पॉझिटिव्ह- ७१५आजचे निगेटिव्ह- २९४५सक्रिय करोनाबाधित- ८३६०ग्रामीणमधील सक्रिय बाधित- ६०४६
साउथम्पटन: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे.
या सामन्यात इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे.
प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ५८३ धावा केल्या.
तर पाकिस्तानला पहिल्या डावात फक्त २७३ धावा करता आल्या.
इंग्लंडकडून जेम्स अॅडरसनने पाच विकेट घेतल्या.
पहिल्या डावात पाकिस्तान ३१० धावांनी पिछाडीवर आहे.
कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद अब्बास याची विकेट खास ठरली.
विशेष म्हणजे इंग्लंडच्या खेळाडूने आधी एक सोपा कॅच सोडला आणि त्यानंतर अजब पद्धतीने फलंदाजाला रनआऊट केले.
या रनआउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा- महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने चीनची दाणदाण उडवली; भारताचा शानदार विजयतिसऱ्या दिवशी पाकिस्तान ८ विकेट गमावून २६१ धावांवर खेळत होता.
जेम्मी अॅडरसनने चार विकेट घेतल्या होत्या.
त्याला पाच विकेट घेण्यासाठी आणखी एका विकेटची गरज होती.
पाकचा कर्णधार अजहर अली १२९ धावांवर खेळत असताना अॅडरसनचा चेंडू हवेत मारला.
तो स्टुअर्ट ब्रॉडकडे आला.
पण एक सोपा कॅच त्याच्या हातातून सुटला.
तेव्ह अजहरने धाव घेण्याचा प्रयत्न केला.
ब्रॉडने फलंदाजीकरणाऱ्या दिशेने चेंडू फेकला आणि तो थेट विकेटवर लागला.
चेंडू विकेटला लागला तेव्हा मोहम्मद अब्बास क्रीझपर्यंत पोहोचला नव्हता.
अजब पद्धतीने धाव बाद झाल्यावर अब्बासला हसू रोखता आले नाही.
वाचा- धोनीच्या निवृत्तीने अनुष्का दु:खी; इस्टाग्रामवर शेअर केला खास मेसेजसामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५८३ धावा केल्या.
यात जॅक क्रॉलीच्या २६७ धावांच्या धमाकेदार खेळीचा समावेश होता.
त्या शिवाय जॉस बटलरने १५२ धावा केल्या.
उत्तरादाखल पाकिस्तानला काही खास करता आले नाही.
त्याचा एकही फलंदाज मैदानावर टिकला नाही.