text stringlengths 0 6.48k |
|---|
कर्णधार अजहर अलीने नाबाद १४१ धावा केल्या. |
वृत्तसेवा, ठाणेठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरामधील अस्वच्छ भांड्यात पाल आढळल्याची बाब समोर आली आहे. |
याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांनी उपअधीकांकडे खुलासा मागविला असून तातडीने रुग्णालयस्तरावरून आहार समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. |
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची ११९ वर्षांपूर्वीची जुनी इमारत असून दरवर्षी ५४ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. |
सध्याच्या घडीला मनोरुग्णालयात ८५३ रुग्णांवर उपचार सुरू असून, ७१३ कर्मचारी कार्यरत आहेत. |
एका वॉर्डमध्ये साधारण ५०हून अधिक रुग्ण आहेत. |
रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महिला विभागातील दहा नंबरच्या वॉर्डमध्ये नाष्ता आणण्यासाठी संबंधित व्यक्ती आहार विभागात गेल्यानंतर एका अस्वच्छ भांड्यात पाल आढळून आल्याचा प्रकार समोर आला. |
या प्रकारामुळे विषबाधा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. |
दरवर्षी आहार समिती स्थापन करण्यात येते. |
यंदा एक महिना उलटला तरी ही समिती स्थापन केली गेली नसल्याची बाब समोर आली आहे. |
या समितीमध्ये सहा सदस्यांचा समावेश असून या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून उपअधीक्षक काम पाहत आहेत. |
याचबरोबर आहारतज्ज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, स्टाफ परिचारिका, मेट्रन आदींचा समावेश असतो. |
या प्रकाराबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी उपअधीक्षक रिता परवडे यांना तातडीने खुलासा करण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे. |
कर्मचाऱ्यांना लावली शिस्तकाही दिवसांपासून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाची जबाबदारी डॉ. |
संजय बोदडे यांनी पुन्हा नव्याने स्वीकारली आहे. |
यामुळे गेल्या एक-दीड वर्षात रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर आता नियंत्रण आणण्यास सुरुवात झाली आहे. |
लॉकडाउनचे कारण सांगत अनेक कर्मचारी चार ते पाच दिवसांच्या सुट्या घेत असल्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर कर्मचाऱ्यांना शिस्त लावत सर्वांना हजर राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. |
ही प्रशासकीय बाब असल्यामुळे या प्रकरणाबाबत खुलासा मागवितण्यात आला असून रुग्णालयस्तरावरून आहार समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. |
संजय बोदडे, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे |
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) केवळ बी-टाउनपुरतेच नव्हे तर ते खऱ्या अर्थाने ‘शहेनशाह’ आहेत. |
आजही अभिनय क्षेत्रामधील तसंच सिनेरसिकांच्या हृदयातील त्यांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. |
अमिताभ यांचे वय ७७ वर्ष एवढे आहे. |
त्यांचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. |
तसंच प्रश्न गॅजेट्सचा असो किंवा फॅशन स्टाइलचा, बिग बींना तरुणवर्गासोबत खांद्याला खांदा लावून चालणे पसंत आहे. |
महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाइल बाबत सांगायचे झाले तर बऱ्याचदा ते आगळ्यावेगळ्या फॅशन लुक मध्ये आपल्याला दिसतात. |
त्यांचा पेहराव इतका अप्रतिम असतो की तरुणी देखील त्यांचे भरभरून कौतुक करतात. |
केबीसी १२ (KBC 12) च्या शुटिंग सेटवर असेच काहीसे पाहायला मिळाले. |
(आराध्याने आई ऐश्वर्या रायला अशी केली होती मदत, फोटो पाहून चाहते म्हणाले. |
..)केबीसीच्या सेटवर घडलेला किस्सा खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटर पोस्ट द्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. |
अमिताभ बच्चन यांनी आपला चष्मा बदलला आहे. |
व्हिंटेज लुक असलेल्या त्यांच्या चष्माला काळ्या रंगाची स्टायलिश फ्रेम आहे. |
या स्टायलिश चष्म्याचे होत असलेल्या कौतुकासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. |
(बिग बी अमिताभ बच्चन जुन्या कपड्यांचं काय करतात? |
)ट्विटर पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, 'कुछ देवियां आज शूटिंग पर मेरे चश्मे को देखकर बोलीं Cool. |
.. मैंने मन में सोचा, चलो बच गए, वातावरण अनुकूल है।' ही पोस्ट पाहिल्यानंतर युजर्सकडूनही त्यांची स्टाइल आणि चष्म्याचे कौतुक केले जात आहे. |
बिग बींचा कूल अवतारदरम्यान, यापूर्वीही अमिताभ यांनी केबीसीच्या शुटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले होते. |
या फोटोंमध्येही त्यांचा कूल लुक पाहायला मिळाला. |
या या फोटोंमध्ये त्यांनी काळ्या रंगांचा स्वेटशर्ट आणि त्यावर मॅचिंग जॉर्गर्स परिधान केल्याचे दिसत आहे. |
हुडीच्या बॉर्डर आणि पायजमावर पांढऱ्या रंगाची पट्टीदार डिझाइन आणि कोट्स दिसत आहे. |
या आउटफिटमध्ये महानायक अमिताभ बच्चन कूल दिसत आहेत. |
(आराध्या आणि ऐश्वर्या राय-बच्चनची सेम-टू-सेम स्टाइल, पाहा फोटो) |
नवी दिल्लीः वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन वनप्लस नॉर्डचा आज पहिला सेल आज आयोजित करण्यात आला होता. |
परंतु, काही कारणास्तव तो पुढे ढकलला आहे. |
आता हा सेल ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. |
कंपनीने या फोनला नुकतेच लाँच केले आहे. |
वनप्लसचा हा लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. |
फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 90Hz रिफ्रेश रेट सोबत अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. |
पहिल्या सेलमध्ये कंपनीने आकर्षक ऑफर दिली आहे. |
ज्यात युजर्संना ६ हजार रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. |
वाचाः ६ ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्सपहिल्या सेलमध्ये वनप्लस नॉर्डला खरेदी केल्यावर अमेरिकन एक्सप्रेस कार्ड होल्डर्सला २ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. |
जर तुम्ही वनप्लस रेड केबल मेंबर्स असाल तर तुम्हाला एक्सक्लूसिव्ह एक्सटेंडेड वॉरंटी सोबत अनेक थर्ड पार्टी बेनिफिट्स आणि वनप्लस क्लाउड वर ५० जीबी फ्री स्टोरेज मिळतो. |
वनप्लस नॉर्डला तुम्ही अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. |
वाचाः सॅमसंगची जबरदस्त ऑफर, TV आणि फ्रिज खरेदीवर महागडे स्मार्टफोन फ्रीवनप्लस नॉर्डचे वैशिष्ट्ये फोनमध्ये ९० एचझेड रिफ्रेश रेट सोबत ६. |
४४ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. |
या फोनमध्ये गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन दिला आहे. |
८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. |
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर दिला आहे. |
हा फोन अँड्रॉयड १० बेस्ड Oxygen OS 10. |
5 वर काम करतो. |
फोटोग्राफईसाठी या फोनमध्ये ड्यूल एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. |
वाचाः गुगलचा स्वस्त फोन Pixel 4a लाँच, फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्यायात ४८ मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्यात एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक दोन मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. |
सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. |
फोनला पॉवर देण्यासाठी यात ४११५ एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. |
या फोनमध्ये वॉर्प चार्ज ३० टी फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. |
वाचाः ६ ऑगस्टपासून सेल; फोनवर ४० टक्के तर TVवर ५० टक्के सूटवाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्यावाचाः मित्रों अॅप ३ कोटींहून जास्त डाउनलोड्स, एका महिन्यात ९०० कोटी व्ह्यूज |
गेल्यावर्षी भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा उत्तेजक सेवन चाचणीमध्ये पॉझिटीव्ह सापडला होता. |
त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. |
पण आता भारताचा एक युवा खेळाडूही उत्तेजक सेवन चाचणीमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. |
कामगिरी अधिक चांगली होण्यासाठी या युवा खेळाडूने एक औषध घेतल्याचे म्हटले जात आहे. |
या खेळाडूची जेव्हा उत्तेजक चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यामध्ये अनाबोलिक स्टेरॉयड N19 -नोरैंड्रोस्टेरोन हे औषध सापडले होते. |
हे औषध आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी घेतले जाते, असे ब्रिटिश जनरल ऑफ मेडिसिनने म्हटले आहेत. |
त्यामुळे आता या युवा खेळाडूवर कडक कारवाई होणार असल्याचे समजते. |
सध्याच्या घडीला राष्ट्रीय उत्तेजक सेवनविरोधी संस्था (नाडा) ही भारतामध्ये उत्तेजक सेवन चाचणी घेत असते. |
'नाडा'ने या खेळाडूच्या युरिनचे काही नमुने घेतले होते. |
हा एक अष्टपैलू क्रिकेटपटू आहे आणि मार्च महिन्यात या क्रिकेटपटूला संघातून बाहेर करण्यात आले होते, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली होती. |
वाचा-सुशांतसिंग राजपूतच्या प्रेमात रिया चक्रवर्ती का पडली, सांगतोय भारतीय क्रिकेटपटू. |
..हा क्रिकेटपटू मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. |
बीसीसीआयच्या २३ वर्षीय क्रिकेट स्पर्धेत त्याने प्रतिनिधीत्व केले होते. |
या खेळाडूचे नाव सांगण्यात आलेले नाही, पण हा खेळाडू मध्य प्रदेशचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे आता समोर आले आहे. |
हा खेळाडू जर उत्तेजक चाचणीत दोषी आढळला असेल तर त्याच्यावर बंदीची कारवाई अटळ असल्याचे म्हटले जात आहे. |
वाचा- पतंजलीला जर आयपीएलचे प्रायोजकत्व मिळाले, तर कसा असेल लोगो पाहा. |
..या खेळाडूवर काय होऊ शकते कारवाईयापूर्वी जेव्हा पृथ्वी शॉ हा उत्तेजक सेवन चाचणीमध्ये दोषी आढळला होता, तेव्हा त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. |
पण पृथ्वीपेक्षा हे प्रकरण जास्त गंभीर असल्याचे समजते आहे. |
त्यामुळे आता या खेळाडूवर चार वर्षांची बंदी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. |
पण या बदीनंतर हा खेळाडू आपली काय भूमिका मांडतो, यावर शिक्षेचा पुर्नविचार होऊ शकतो. |
त्यामुळे आता हा खेळाडू नेमकी काय भूमिका मांडतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. |
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या निधनानंतर त्याच्या आईनं सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. |
११ ऑगस्ट रोजी आशुतोषनं ३२ वा वाढदिवस साजरा केला असता, पण त्यापूर्वीच त्यानं त्यांचं आयुष्य संपवलं आणि जगाचा निरोप घेतला. |
आशुतोषच्या निधनानंतर १३ दिवसांनी त्याच्या आई अनुराधा भाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. |
त्यांनी आशुतोषच्या डिप्रेशन संदर्भात लिहिलं आहे. |
डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी घरच्यांनी केलेले प्रयत्न, त्याची घेतलेली काळजी हे सर्व त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. |
विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या सुनेबद्दल म्हणजेच अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्याबद्दल जे काही लिहिलं आहे ते वाचून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आल्याच्या प्रतिक्रिया येत आहे. |
मयुरीनं ज्या प्रकारे आशुतोषची काळजी घेतली, डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी तिनं किती प्रयत्न केले हे सांगताना त्यांनी मयुरीचं कौतुक केलं आहे. |
आशुतोषसाठी तिनं अनेक मालिकांच्या ऑफर्स येत असताना त्यांना नकार दिला. |
आशुतोषला तिनं प्राधान्य दिलं. |
हे सांगताना त्यांनी 'केवळ आशुच्या आग्रहाखातर नाट्य व सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादे नाटक व सिनेमा स्वीकारला. |
ह्या काळात मयुरीने त्याच्या पत्नीच्या व्यतिरिक्त त्याची मैत्रिण , मार्गदर्शक, आणि विशेष म्हणजे त्याची आई होवून लहान बाळा प्रमाणे काळजी घेतली', असं लिहिलं आहे. |
'आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर रितीरिवाजानुसार मयुरीला तिच्या आई वडिलांबरोबर पाठवावे असे सर्व नातेवाईक यांचे म्हणणे प्रमाणे ठरले. |
घाटावरून दहाव्याचा कार्यक्रम आटोपून सर्व नातेवाईक परतले नंतर सर्वांसमोर मयुरी ने तिच्या आई वडिलांना सांगितले की रुढीपरंपरेनुसार मी तुमचे बरोबर यायला पाहिजे, पण इथे मम्मी व पप्पा एकटेच पडतील, अभिलाष देखील दूर अमेरिकेत आहे, आता त्यांना माझी गरज जास्त आहे त्यामुळे मी त्यांचे जवळ नांदेड येथेच थांबते. |
मी तुमच्याकडे येतांना त्यांना दहा पंधरा दिवसांसाठी घेवून येते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.