text stringlengths 0 6.48k |
|---|
कानपूरच्या इंडियन इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ अभय करंदीकर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ संजय चंहादे हे समितीचे अन्य सदस्य होते. |
समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानतर राज्यपालांनी डॉ सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. |
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबाबतच्या तपासाची सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयात झाली. |
या सुनावणीमध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. |
त्यानंतर त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारला काही जणांनी धारेवर धरले होते. |
आता तर भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानेही एक ट्विट केले असून ते चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. |
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. |
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. |
बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. |
महाराष्ट्र सरकार मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहे. |
मुंबई पोलिसांनी तपास केलेला नसून केवळ चौकशी केली आहे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. |
सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडे सोपवले आहे. |
या पुढे या प्रकणात कोणताही एफआयआर दाखल झाल्यास तो सीबीआयच पाहण्याचे काम करेल असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. |
सुशांतसिंगच्या तपासाबाबत रैनाने एक ट्विट केले आहे. |
त्याबद्दल रैनाने म्हटले आहे की, " तुझ्या निधनाने मला बऱ्याच वेदना झाल्य आहेत, हे दु:ख विसरता येऊ शकत नाही. |
पण मला एक गोष्ट माहिती आहे की, तुझ्या प्रकरणात सत्याचाच विजय होईल. |
"सुशांतसिंगप्रकरणी बबिता फोगटने उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरले होते. |
..याप्रकरणाचा निकाल आल्यावर बबिताने महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. |
बबिताने याबाबत एक ट्विट केले आहे. |
या ट्विटमध्ये बबिताने म्हटले आहे की, " सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबाबतचा तपास आता सीबीआय करणार आहे. |
याप्रकरणी सीबीआय योग्यप्रकारे तापस करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. |
त्याचबरोबर बिहार पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर ही योग्य असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. |
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. |
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना 'इमॅच्युअर' म्हणत जाहीररित्या फटकारल्यापासून राजकीय वर्तुळात प्रतिक्रियांची माळच लागली आहे. |
विशेषत: विरोधी पक्ष भाजपकडून खोचक प्रतिक्रिया येत आहेत. |
कोल्हापूरच्या जिल्हा परिषद सदस्या शौमिका महाडिक यांनी थेट पवारांना टोला हाणला आहे. |
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडली होती. |
त्यामुळं राष्ट्रवादीची कोंडी झाली होती. |
शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही कोंडी फोडली. |
'पार्थ पवार अपरिपक्व आहे. |
त्याच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही,' असं पवार म्हणाले होते. |
त्यावरून पवार कुटुंबातील वादाची चर्चा सुरू झाली आहे. |
भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. |
काहींनी थेट पार्थ पवारांची पाठराखण केली आहे. |
भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी थेट शरद पवारांनाच टोला हाणला आहे. |
वाचा: नाही म्हणत म्हणत फडणवीस पवार कुटुंबातील वादावर बोललेच! |
शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. |
त्यांनी याआधी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. |
भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत. |
महाडिक यांनी पवारांच्या वक्तव्याच्या अनुषंगानं दोन ट्वीट केले आहेत. |
पहिल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, 'आज गोपाळकाला आहे. |
महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या 'पार्थ'चे युद्धात ज्याने सारथ्य केले. |
त्या श्रीकृष्णाचा दिवस. |
.!वाचा: राऊतांच्या भेटीनंतरच शरद पवार सुशांत प्रकरणावर का बोलले? |
; चर्चा थांबेचनापहिल्या ट्वीटनंतर महाडिक यांनी लगेचच दुसरं ट्वीट केलं. |
त्यात त्या म्हणतात, 'मगाशी एका ट्वीटमध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. |
माणसाकडून चुका होतात. |
जेमतेम दोन ते तीन मिनिटांत चूक कळताच मी ती सुधारली. |
पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे. |
मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही. |
'महाडिक यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर केलेल्या या टीकेची जोरदार चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आहे. |
संपदा जोशी'जीव झाला येडापिसा' या मालिकेतला रांगडा शिवा लष्करे, म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाईच्या अभिनयाचं कौतुक होतंय. |
मालिकेत त्याच्याशी चुकीच्या वागणाऱ्यांचा 'इषय कट' करणारा अशोक प्रत्यक्षात कसा आहे? |
भूमिकेसाठी त्यानं घेतलेली मेहनत यावर त्याच्याशी झालेल्या गप्पा. |
० तू मूळचा गोव्याचा. |
मालिकेतला सांगलीतला रांगडा शिवा साकारताना किती मेहनत घ्यावी लागली? |
रांगड्या शिवाची शरीरयष्टी पिळदार आहे. |
त्यामुळे भूमिकेसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. |
शिवा साकारण्याआधी माझं वजन कमी होतं. |
ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला साधारण १० किलो वजन वाढवावं लागलं. |
आमच्या गोव्यामध्ये कोंकणी भाषा बोलली जाते. |
'शिवा'च्या या भूमिकेसाठी कोल्हापूर, सांगलीची स्थानिक भाषा अवगत करणं हे माझ्यासाठी आव्हान होतं. |
भाषेसाठी मला खूप वेळ द्यावा लागला. |
भाषेच्या अभ्यासासाठी मला मालिकेचे संवादलेखक विकास पाटील यांनी मदत केली. |
मला माझ्या आहारातही बदल करावा लागला. |
वर्कआउट सुरु झालं आणि अंडी, चिकन, फळं हे पदार्थ वेळेनुसार जास्त खाऊ लागलो. |
० चित्रिकरणामुळे घरापासून खूप लांब राहावं लागतं. |
घर आणि शूटिंगचं वेळापत्रक यांचा ताळमेळ कसा घालतोस? |
घरी खूप कमी जायला मिळतं. |
कधी दोन दिवसांची सुट्टी मिळाली, तरच घरच्यांना भेटता येतं. |
साधारण दोन महिन्यातून एकदा वगैरे घरी जाणं होतं. |
० शिवा हे पात्र चुकीचं वागणाऱ्यांशी जशास तसं असं वागणारा आहे. |
खरा अशोक पण असाच आहे का? |
शिवा आणि अशोक हे काही प्रमाणात सारखे आहेत असं म्हणता येईल. |
प्रामाणिकपणा, कोणतंही काम करण्याची तयारी, नम्रपणा, घरच्यांवर प्रेम करणारा, जीव लावणारा अशा काही गोष्टींबाबतीत अशोकही शिवा या पात्रासारखाच आहे. |
शिवाचं जे तत्त्व आहे, की 'साता पाचा पस्तीस अन माझ्याशी जो नडला त्याचा डावघीस' किंवा विचार न करता तोडफोड करणं असं अशोकचं नाहीय. |
माझ्याशी कोणी चुकीचं वागलं, तर मी ते बसून शांतपणे सोडवायचा प्रयत्न करतो. |
आता मालिकेत सिद्धीमुळे शिवाला कळतंय, की समजून सांगूनही गोष्टी सोडवता येतात. |
तसा काहीसा अशोक प्रत्यक्षात आहे. |
० मालिकेतल्या एका दृश्यासाठी सूर मारणं वगैरे तू शिकलास. |
..तो अनुभव कसा होता? |
दिग्दर्शकानं मला केलेल्या पहिल्याच फोनमध्ये, 'तुला सूर मारता येतो का? |
म्हणजेच पाण्यात पोहता येतं का? |
' असं विचारलं होतं. |
मला सूर मारता येतो. |
पण, सुरमारीच्या सीनसाठी नंतर मी चांगल्या प्रकारे सूर मारायला शिकलो. |
सांगलीमध्ये एक वस्ताद आहेत त्यांच्याकडे मी कुस्तीसुद्धा शिकायला जायचो. |
लक्षात राहिलेली आठवण सोशल मीडियावर एका चाहत्यांनी मला प्रतिक्रिया पाठवली होती. |
ते मूळचे भारतीय आहेत. |
साधारण २० वर्षांपासून ते कॅनडामध्ये वास्तव्यास आहेत. |
त्यांना आमची मालिका आणि माझं पात्र फार आवडतं. |
ते जेव्हा कॅनडाहून भारतात आले, तेव्हा आमच्यावरील प्रेमापोटी ते आम्हाला भेटायला सेटवर आले होते. |
आमच्यासाठी ते सेटवर भेटवस्तू वगैरे घेऊन आले होते. |
ही आठवण अविस्मरणीय आहे. |
ललित कला केंद्रातून शिक्षण घेऊन सहा महिने झाले होते. |
त्यानंतर मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. |
पहिलीच मालिका आणि त्यात मुख्य नायकाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. |
काम करायला खरंच मजा येते आहे. |
-अशोक फळदेसाई |
लंडन: इंग्रजांचा वसाहतवाद, छळ, शोषण या विरोधात अहिंसक आंदोलनाचा वणवा देशभरात पेटवणारे महात्मा गांधी यांची छबी आता ब्रिटनच्या पाउंडवर असणार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.