text
stringlengths
0
6.48k
ब्रिटनच्या चलनी नण्यावर छबी असणार महात्मा गांधी हे पहिले अश्वेत वर्णयी नेते आहेत.
ही घटना ऐतिहासिक समजली जात आहे.
संडे टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, नाण्यांची डिझाइन आणि नाण्याबाबत सल्ला देणाऱ्या रॉयल मिंट अॅडवायझरी कमिटीने महात्मा गांधी यांची छबी असलेल्या नाण्यावर काम करणे सुरू केले आहे.
या ऐतिहासिक निर्णयामागे भारतीय वंशाचे ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आहेत.
कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक वंशाच्या नागरिकांनी ब्रिटनला आधुनिक बनवण्यासाठी मदत केली असून त्यांचे आभार मानण्याची मोहीम ब्रिटनमध्ये सुरू आहे.
सुनक यांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.
वाचा: नेपाळची वळवळ वाढली!
१९४७ चा 'तो' करार नव्यानं करण्याची मागणीऋषी सुनक यांनी या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या जेहरा जैदी यांना पत्र लिहिले असून कृष्णवर्णीय, आशियाई आणि अन्य वंशाच्या अल्पसंख्याक समुदायाने ब्रिटनच्या संस्कृती विकासात योगदान दिले आहे.
महात्मा गांधी यांची छबी ब्रिटनच्या चलनावर दिसून येणार असून ते पहिले कृष्णवर्णीय नेत असणार असल्याचेही सुनक यांनी सांगितले.
जेहरा जैदी यांना सुनक यांचे आभार मानले आहेत.
ब्रिटनच्या अर्थ मंत्रालयाने अर्थ मंत्री सुनक यांनी रॉयल मिंट अॅडवायझरी कमिटीला पत्र लिहीले असल्याचे सांगितले आहे.
कमिटी आता महात्मा गांधी यांचे स्मरण आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक नाणे प्रकाशित करणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले.
वाचा: करोनाची भीती!
'या' देशातील नागरिकांनी २.
२५ ट्रिलियन नोटा जाळल्यामहात्मा गांधी यांनी अहिंसेचा पुरस्कार करत ब्रिटीशांच्या विरोधातील लढाईला वेगळे वळण दिले.
ब्रिटिशांविरोधात आणि स्वातंत्र्य भारताच्या चळवळीचे महात्मा गांधी यांनी नेतृत्व केले.
महात्मा गांधी यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो.
महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली.
महात्मा गांधी यांनी कायम हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला.
महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत होते.
तेथेही त्यांनी ब्रिटीशांच्या जुल्माविरोधात आंदोलन सुरू केले होते.
महात्मा गांधी यांच्या अहिंसक आंदोलनाचा आधार घेत जगभरात अनेक ठिकाणी वसाहतवाद, वर्णद्वेषाविरोधात लढे लढले गेले.
भारताचा अष्टपैलू सिक्सर किंग युवराज सिंगने गेल्यावर्षी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती.
त्यामुळे युवराज आता आपल्याला मैदानात खेळताना कधीच दिसणार नाही, याचे चाहत्यांना वाईट वाटले होते.
पण आता घेतलेल्या निवृत्तीला सोडचिठ्ठी देऊन युवराज पुन्हा एकदा मैदानात परतणार असल्याचे दिसत आहे.
भारताच्या संघातून युवराजला बऱ्याच कालावधीसाठी बाहेर ठेवण्यात आले होते.
त्यामुळे युवराजने गेल्यावर्षी अखेर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.
आपली निवृत्ती ही मैदानात व्हावी, अशी युवराजची इच्छा होती.
पण युवराजला निवृत्तीचा सामनाही भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळायला दिला नाही.
निवृत्तीचा सामना न मिळाल्यामुळे युवराज चांगलाच वैतागला होता.
आपल्याबरोबर भारताच्या राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर यासारख्या दिग्गज खेळाडूंनाही निवृत्तीचा सामना न दिल्यामुळे युवराज भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता.
पण आता युवराजने पुन्हा एकदा मैदानात येण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते.
या मार्गदर्शनाचा फायदा भारताच्या युवा क्रिकेटपटूंना झाला होता.
त्यामुळे आता युवराजने मैदानात परतावे आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे, अशी मागणी जोर धरायला लागली आहे.
त्यामुळे युवराजने जर ठरवले तर त्याचे मैदानात आता पुनरागमन होऊ शकते, असे दिसत आहे.
युवराजने शुभमन गिल, बरिंदर सरण, जीवनज्योत सिंग आणि तरुवर कोहली या युवा क्रिकेटपटूंना काही दिवसांपूर्वी मार्गदर्शन केले होते.
त्यानंतर पंजाबच्या क्रिकेट संघटनेतील पुनीत बाली यांनी युवराजने मैदानात परतण्याची विनंती केली आहे.
खेळता खेळता युवराज या युवा खेळाडूंना चांगले मार्गदर्शन करू शकतो, असे बाली यांचे म्हणणे आहे.
बाली यांनी सांगितले की, " युवराजने काही दिवसांपूर्वी युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते.
त्यानंतर युवराजने खेळता खेळता आम्हाला मार्गदर्शन केले तर चांगले होईल, अशी विनंती या युवा खेळाडूंनी आम्हाला केली होती.
त्यानंतर संघचनेच्या माध्यमातून मी आता युवराजला मैदानात परतण्याची विनंती करत आहे.
विशेष प्रतिनिधी,नागपूरनाल्यांवर बांधकाम करीत अतिक्रमण करणाऱ्या घरांवर मनपाने ऐन पावसाळ्यात हातोडा मारण्यास सुरूवात केली आहे.
विशेषत: अशा भागात झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण असल्याने शहरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
पंधरवड्यापूर्वी मनपाच्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार ८०हून अधिक नाले अतिक्रमणामुळे गायब झाले आहेत.
शहरातील अनेक भागातील नाल्यांकाठावरील बांधकामधारकांना नोटीस देण्यात आली होती.
त्यानंतर आता ही धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
हे सर्व बांधकाम अनधिकृत असल्याने त्यावर नियमानुसार कारवाई होत आहे.
एकाचवेळी दहाही झोनमध्येही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहरात ४२७ झोपडपट्ट्या आहेत.
यातील २९८ सरकारदरबारी नोटीफाइड आहेत.
या झोपडपट्ट्यांना मालकी हक्क पट्टे मिळतील.
५० झोपडपट्ट्या या नाल्यांकाठी वसल्या आहेत.
त्यांची अतिक्रमणे नाल्यांवर आहेत.
त्यामुळे नाल्याचा प्रवाह बंद झाला आहे.
कुठे नालेच गायब झाले आहेत.
अशा प्रकारांमुळे पावसाळ्यात पूर येऊन शहरातील अनेक भागात पाणी साचते.
त्याचा फटका शहरातील रस्त्यांनाही बसते.
जोशी समितीने सादर केलेल्या अहवालात यासर्व बाबी नमूद आहेत.
अनेक ठिकाणी झोपड्या, घरे व दोन ते तीन माळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहेत.
काही ठिकाणी नाल्यांच्या भिंतींवरच बांधकाम आहे.
लकडगंज झोनमधील आदर्शनगर येथे दोन ते तीन माळ्याचे बांधकाम झाले आहे.
त्यातील चार बांधकामे तोडण्यात आलीत.
काहींना मालकी पट्टे मिळाले.
त्यानंतरही विनापरवानगी पक्के बांधकाम करण्यात आल्याने, यातील पाच घरांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईला नागरिकांनी विरोध केला.
परंतु पथकाने कारवाई केली.
सतरंजीपुरा झोनमधील चांभार नाल्यावरील तीन बांधकामेही पाडण्यात आलीत.
माजी नगरसेवक अॅड.
यशवंत मेश्राम यांनी आदर्शनगरमधील बांधकामावर कारवाईचा निषेध केला.
नागरिकांना मालकी पट्टे मिळाले आहेत.
त्यामुळे झालेले बांधकाम हे अतिक्रमण ठरविणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांनी करोना व पावसाळ्यात नागरिकांना बेघर करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले.
उपायुक्त महेश मोरोणे यांनी नाल्यांवरील अतिक्रमण कारवाई नियमानुसार होत असल्याचा दावा केला.
गडरलाइनवर घरेआसीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक तीनमधील अनेक भागातील घरे गडरलाइनवर बांधण्यात आली आहेत.
यात सुलतान चौक परिसरातील पवननगर, संगमनगर, मेहबुबपुरा, हबीबनगर आणि प्रभाग क्रमांक मीनमधील एलजी कॉलनीचा समावेश आहे.
या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या कायम तक्रारी असतात.
पाहणीत जवळपास अडीच हजारांवर घरांना याचा फटका बसत आहे.
यापूर्वी हा भाग नासुप्रच्या कार्यक्षेत्रात होता.
आता मनपा नियोजन प्राधीकरण असल्याने नाल्यांवरील बांधकाम हटविण्याची कारवाई होत आहे.
गडरलाइनवरील बांधकाम हटवून नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा करून संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.
पावसाळ्यात प्राणहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ नये हा प्रयत्न आहे.
त्यासाठीच नाला परिसर मोकळा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
कुणाला बेघर करण्याचा यामागचा हेतू नाही.
जे नियमबाह्य आहे.
त्यावर कारवाई होईल.
या कारवाईत अडथळा आणण्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- तुकाराम मुंढे, मनपा आयुक्त
मुंबई: आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आंदोलकांसाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेली योजना बंद करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपनं जोरदार टीका केली आहे.
'ज्यांनी सोनिया गांधी यांच्या नावानं शपथ घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार,' असा खोचक टोला भाजपचे आमदार अॅड.
आशिष शेलार यांनी हाणला आहे.
(BJP MLA Ashish Shelar attacks Thackeray Sarkar over scraping emergency pension scheme)आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मानधन योजना सुरू केली होती.
१९७५ ते १९७७ या काळात तत्कालीन सरकारविरुद्ध लोकशाहीसाठी लढा देताना तुरुंगात गेलेल्यांसाठी ही योजना होती.
एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मसिक दहा हजार व त्यांच्या पश्च्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस पाच हजार व एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक रुपये पाच हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस रुपये अडीच हजार रुपये मानधन सुरू करण्यात आले होते.
वाचा: भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; सेनेचा हल्लाबोलजानेवारी २०१८ पासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
राज्यातील ३२६७ जणांना याचा लाभ मिळाला होता.
यासाठी २९ कोटी रुपयांचे वितरणही झाले होते.
कागदपत्रे नसतील तर केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारे या योजनेचा लाभ मिळत होता.
आणीबाणी लागू करण्यास तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाला जबाबदार मानले जाते.
विशेष म्हणजे त्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांमध्ये भाजप आणि संघ परिवारातील व्यक्तींची संख्या अधिक होती.